हनुमता श्रीरामं प्रति सीतासन्देशस्य श्रावणम् -
|
हनुमानांनी भगवान श्रीरामांना सीतेचा सन्देश ऐकविणे -
|
एवमुक्तस्तु हनुमान् राघवेण महात्मना ।
सीताया भाषितं सर्वं न्यवेदयत राघवे ॥ १ ॥
|
महात्मा राघवाचे हे भाषण ऐकून हनुमानाने सीतेने सांगितलेल्या सर्व गोष्टी त्यांना निवेदन केल्या.॥१॥
|
इदमुक्तवती देवी जानकी पुरुषर्षभ ।
पूर्ववृत्तमभिज्ञानं चित्रकूटे यथातथम् ॥ २ ॥
|
हनुमान म्हणाले, 'हे पुरुषोत्तम ! जानकी देवीने पूर्वी चित्रकूटावर घडलेली एक घटना अगदी जशी घडली तशी सांगितली आहे. ती गोष्ट खूण म्हणून तुला सांगण्या करितां तिने वर्णन केली होती.॥२॥
|
सुखसुप्ता त्वया सार्धं जानकी पूर्वमुत्थिता ।
वायसः सहसोत्पत्य विरराद स्तनान्तरे ॥ ३ ॥
|
पूर्वी चित्रकूटमध्ये असतां जानकी एकदां तुझ्यासह सुखपूर्वक झोपली होती. ती आपल्या पूर्वीच झोपेतून उठली असतां त्यावेळी एक काकपक्ष्याने तिच्यावर एकाएकी झडप घालून तिचे वक्ष:स्थळावर चोच मारली.॥३॥
|
पर्यायेण च सुप्तस्त्वं देव्यङ्के भरताग्रज ।
पुनश्च किल पक्षी स देव्या जनयति व्यथाम् ॥ ४ ॥
|
'भरताग्रज ! आपण पाळीपाळीने परस्पराच्या मांडीवर मस्तक ठेवून झोपत होता. ज्यावेळी आपण सीता देवीच्या मांडीवर मस्तक ठेवून झोपला होतात, त्यावेयेऊन पुन्हा त्या पक्ष्याने तेथे येऊन देवीला कष्ट देण्यास सुरुवात केली.॥४॥
|
पुनः पुनरुपागम्य विरराद भृशं किल ।
ततस्त्वं बोधितस्तस्याः शोणितेन समुक्षितः ॥ ५ ॥
|
अशा रीतीने त्याने पुन्हा येऊन झडप घालून तिचे वक्ष:स्थळ खरोखरच अतिशयच ओरबाडले तेव्हां त्यातून रक्त वाहू लागले आणि ते अंगावर पडल्यामुळे आपण जागे झालात.॥५॥
|
वायसेन च तेनैवं सततं बाध्यमानया ।
बोधितः किल देव्या त्वं सुखसुप्तः परन्तप ॥ ६ ॥
|
हे परन्तपा ! (शत्रूतापना) रामा ! तो काकपक्षी ज्यावेळी एकसारखा येऊन तिला पीडा देऊ लागला, तेव्हा गाढ झोपलेल्या आपणास देवी सीतेने उठविले॥६॥
|
तां तु दृष्ट्वा महाबाहो दारितां च स्तनान्तरे ।
आशीविष इव क्रुद्धस्ततो वाक्यं त्वमूचिवान् ॥ ७ ॥
|
हे महाबाहो ! तिच्या वक्ष:स्थलावर घाव (जखम) झाला आहे हे पाहून आपण विषधर सर्पाप्रमाणे कुपित होऊन उठलात आणि म्हणालात—॥७॥
|
नखाग्रैः केन ते भीरु दारितं तु स्तनान्तरम् ।
कः क्रीडति सरोषेण पञ्चवक्त्रेण भोगिना ॥ ८ ॥
|
हे भीरु ! नखांच्या टोकानी तुझ्या वक्ष:स्थलावर ओरखडे कोणी काढले आहेत ? अरे, क्रुद्ध झालेल्या पंचमुखी सर्पाबरोबर कोण खेळत आहे ?॥८॥
|
निरीक्षमाणः सहसा वायसं समदैक्षथाः ।
नखैः सरुधिरैस्तीक्ष्णैस्तामेवाभिमुखं स्थितम् ॥ ९ ॥
|
असे म्हणून आपण जेव्हा सहसा इकडे तिकडे पाहू लागलात तेव्हा, ज्याची तीक्ष्ण नखे रक्ताने रंगलेली आहेत आणि जो सीता देवी समोर तिच्याकडे तोंड करून बसला होता त्या कावळयावर आपली दृष्टी पडली.॥९॥
|
सुतः किल स शक्रस्य वायसः पततां वरः ।
धरान्तरचरः शीघ्रं पवनस्य गतौ समः ॥ १० ॥
|
असे ऐकले आहे की उडणार्यांमध्ये श्रेष्ठ असलेला तो कावळा साक्षात इन्द्राचा पुत्र होता आणि त्या समयी तो पृथ्वीवर विचरण करत होता. तो वायुदेवते प्रमाणे शीघ्रगामी होता.॥१०॥
|
ततस्तस्मिन् महाबाहो कोपसंवर्तितेक्षणः ।
वायसे त्वं व्यधाः क्रूरां मतिं मतिमतां वर ॥ ११ ॥
|
'हे बुद्धिमानामध्ये श्रेष्ठ महाबाहो ! त्या वेळी रागाने आपले डोळे फिरू लागले आणि त्या कावळयाला कठोर दण्ड देण्याचा आपण विचार केलात.॥११॥
|
स दर्भसंस्तराद् गृह्य ब्रह्मास्त्रेण न्ययोजयः ।
स दीप्त इव कालाग्निर्जज्वालाभिमुखं खगम् ॥ १२ ॥
|
'आपण आपल्या चटईतील एक दर्भ काढून हातात घेतलात आणि तो ब्रह्मास्त्राने अभिमन्त्रित केलात. मग तर तो दर्भ प्रलयकालच्या अग्नीप्रमाणे प्रज्वलित झाला. त्याचे लक्ष्य तो कावळाच होता.॥१२॥
|
स त्वं प्रदीप्तं िक्षेप दर्भं तं वायसं प्रति ।
ततस्तु वायसं दीप्तः स दर्भोऽनुजगाम ह ॥ १३ ॥
|
'आपण त्या जळत असलेल्या दर्भाला त्या काकपक्ष्यावर सोडलेत. मग तर तो प्रदीप्त दर्भ त्या कावळ्याच्या मागे लागला.॥१३॥
|
भीतैश्च सम्परित्यक्तः सुरै सर्वैश्च वायसः ।
त्रिंल्लोकान् सम्परिक्रम्य त्रातारं नाधिगच्छति ॥ १४ ॥
|
'आपल्या भयाने घाबरलेल्या समस्त देवांनीही त्या कावळयाचा त्याग केला. तो तीन्ही लोकात फिरला पण त्याला कोणी वाली मिळाला नाही.॥१४॥
|
पुनरप्यागतस्त्रत्र त्वत्सकाशमरिन्दम ।
त्वं तं निपतितं भूमौ शरण्यः शरणागतम् ॥ १५ ॥
वधार्हमपि काकुत्स्थ कृपया परिपालयः ।
|
'हे शत्रूदमना रामा ! सर्व बाजूनी निराश होऊन तो कावळा परत येथे येऊन आपल्याला शरण आला. शरण येऊन जमिनीवर पडलेल्या त्या काकाला आपण आश्रय दिलात, कारण की आपण शरणागत -वत्सल आहात. जरी त्याचा वध करणेच योग्य होते तरीही आपण कृपापूर्वक त्याचे रक्षण केलेत.॥१५ १/२॥
|
मोघमस्त्रं न शक्यं तु कर्तुमित्येव राघव ॥ १६ ॥
भवांस्तस्याक्षि काकस्य हिनस्ति स्म स दक्षिणम् ।
|
'रघुनन्दना ! राघवा ! त्या ब्रह्मास्त्राला व्यर्थ करता येत नाही म्हणून आपण त्या कावळ्याचा उजवा डोळा फोडलात.॥१६ १/२॥
|
राम त्वां स नमस्कृत्य राज्ञो दशरथस्य च ॥ १७ ॥
विसृष्टस्तु तदा काकः प्रतिपेदे स्वमालयम् ।
|
'श्रीरामा ! त्यानन्तर आपला निरोप घेऊन तो कावळा भूतलावर आपल्याला आणि स्वर्गामध्ये राजा दशरथांना नमस्कार करून आपल्या घरी चालता झाला.॥१७ १/२॥
|
एवमस्त्रविदां श्रेष्ठः सत्त्ववाञ्छीलवानपि ॥ १८ ॥
किमर्थमस्त्रं रक्षःसु न योजयति राघवः ।
|
'(सीता म्हणाली—) "हे राघवा ! याप्रकारे अस्त्रवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ शक्तिशाली आणि शीलसंपन्न असूनही आपण राक्षसांवर आपल्या अस्त्राचा प्रयोग का बरे करीत नाही ?॥१८ १/२॥
|
न दानवा न गन्धर्वा नासुरा न मरुद्गणाः ॥ १९ ॥
न च राम रणे शक्तास्तथा प्रतिसमासितुम् ।
|
'हे श्रीरामा ! दानव, गन्धर्व, असुर आणि देवता कोणीही समरांगणात आपला सामना करू शकत नाही.॥१९ १/२॥
|
तव वीर्यवतः कश्चिन्मयि यद्यस्ति सम्भ्रमः ॥ २० ॥
क्षिप्रं सुनिशितैर्बाणैर्हन्यतां युधि रावणः ।
|
'आपण बल-पराक्रमाने संपन्न आहात. जर माझ्या बद्दल आपल्याला काही आदर असेल तर आपण त्वरितच आपल्या तीक्ष्ण बाणांनी रणभूमीवर रावणाचा वध करा. त्याला मारून टाका. ॥२० १/२॥
|
भ्रातुरादेशमाज्ञाय लक्ष्मणो वा परन्तपः ॥ २१ ॥
स किमर्थं नरवरो न मां रक्षति राघवः ।
|
''हे हनुमान ! अथवा आपल्या बन्धूंची आज्ञा घेऊन शत्रूंना सन्ताप देणारे रघुकुलतिलक नरश्रेष्ठ लक्ष्मण का माझे रक्षण करीत नाहीत ?''॥२१ १/२॥
|
शक्तौ तौ पुरुषव्याघ्रौ वाय्वग्निसमतेजसौ ॥ २२ ॥
सुराणामपि दुर्धर्षौ किमर्थं मामुपेक्षतः ।
|
'ते दोन्ही पुरूषसिंह श्रीराम आणि लक्ष्मण वायु आणि अग्नितुल्य तेजस्वी आणि शक्तिशाली आहेत. देवतांसाठीही दुर्जय आहेत. मग कशासाठी माझी उपेक्षा करीत आहेत ?॥२२ १/२॥
|
ममैव दुष्कृतं किंचिन्महदस्ति न संशयः ॥ २३ ॥
समर्थो सहितौ यन्मां न रक्षेते परन्तपौ ।
|
'यात काहीही सन्देह नाही की माझेच काही असे महान पाप आहे की ज्यामुळे ते दोघे शत्रूस सन्ताप देणारे वीर एकत्र राहात असून, समर्थ असूनही माझे रक्षण करीत नाहीत." ॥२३ १/२॥
|
वैदेह्या वचनं श्रुत्वा करुणं साधुभाषितम् ॥ २४ ॥
पुनरप्यहमार्यां तामिदं वचनमब्रुवम् ।
|
'रघुनन्दना ! वैदेहीचे हे करुणाजनक उत्तम वचन ऐकून मी पुन्हा आर्या सीतेला म्हणालो—॥२४ १/२॥
|
त्वच्छोकविमुखो रामो देवि सत्येन ते शपे ॥ २५ ॥
रामे दुःखाभिभूते तु लक्ष्मणः परितप्यते ।
|
'देवि ! मी सत्याची शपथ घेऊन सांगतो की श्रीरामचन्द्र तुमच्या शोकामुळेच सर्व कार्यापासून विरत झालेले आहेत. श्रीराम दु:खी झाल्याने लक्ष्मण ही सन्तप्त होत आहेत.॥॥२५ १/२॥
|
कथंचिद् भवती दृष्टा न कालः परिशोचितुम् ॥ २६ ॥
अस्मिन् मुहूर्ते दुःखानामन्तं द्रक्ष्यसि भामिनि ।
|
'कसे का होईना आता आपले दर्शन झाले आहे. (आपल्या निवासस्थानाचा पत्ता लागला आहे.) म्हणून आता शोक करण्याचा अवसर नाही आहे. भामिनी ! आपण याच मुहूर्तात आपल्या सार्या दु:खांचा अन्त झालेला पहाल.॥२६ १/२॥
|
तावुभौ नरशार्दूलौ राजपुत्रौ परन्तपौ ॥ २७ ॥
त्वद्दर्शनकृतोत्साहौ लङ्कां भस्मीकरिष्यतः ।
|
'शत्रूंना सन्ताप देणारे ते दोन्ही नरश्रेष्ठ राजकुमार आपल्या दर्शनासाठी उत्कण्ठित होऊन लङ्कापुरीला जाळून भस्म करून टाकतील.॥२७ १/२॥
|
हत्वा च समरे रौद्र रावण सहबान्धवम् ॥ २८ ॥
राघवस्त्वां वरारोहे स्वां पुरीं नयिता ध्रुवम् ।
|
'हे वरारोहे, समरांगणात युद्धभूमीवर रौद्र राक्षस रावणाला बन्धुबान्धवांसहित मारून राघव तुला अवश्य आपल्या पुरीला (अयोध्येला) घेऊन जातील.॥२८ १/२॥
|
यत् तु रामो विजानीयादभिज्ञानमनिन्दिते ॥ २९ ॥
प्रीतिसञ्जननं तस्य प्रदातुं त्वमिहार्हसि ।
|
'सती-साध्वी देवी ! आता आपण मला ओळख पटण्यासाठी एखादी अशी खूणेची वस्तू द्या की श्रीरामचन्द्र जिला जाणत असतील आणि जी पाहून त्यांच्या मनाला प्रसन्नता वाटेल.॥२९ १/२॥
|
साभिवीक्ष्य दिशः सर्वा वेण्युद्ग्रथनमुत्तमम् ॥ ३० ॥
मुक्त्वा वस्त्राद् ददौ मह्यं मणिमेतं महाबल ।
|
'हे महाबलाढ्य वीरा ! तेव्हा तिने चोहीकडे पाहून वेणीमध्येच बान्धण्यास योग्य असा हा उत्कृष्ट मणि आपल्या वस्त्रातून सोडून माझ्या हाती दिला.॥३० १/२॥
|
प्रतिगृह्य मणिं दिव्यं तव हेतो रघुप्रिय ॥ ३१ ॥
शिरसा तां प्रणम्यैनामहमागमने त्वरे ।
|
'आणि हे रघुप्रिय रामा ! आपल्यासाठी हा मणि दोन्ही हातानी घेऊन मी सीतादेवीला मस्तक नमवून प्रमाण केला आणि इकडे येण्यासाठी मी उतावील झालो. (त्वरा करू लागलो.)॥३१ १/२॥
|
"गमने च कृतोत्साहं अवेक्ष्य वरवर्णिनी ॥ ३२ ॥
विवर्धमानं च हि मामुवाच जनकात्मजा ।
अश्रुपूर्णमुखी दीना बाष्पसन्दिग्धभाषिणी ॥ ३३ ॥
ममोत्पतनसम्भ्रान्ता शोकवेगसमाहता ।
मामुवाच ततः सीता सभाग्योऽसि महाकपे ॥ ३४ ॥
यद् द्रक्ष्यसि महाबाहुं रामं कमललोचनम् ।
लक्ष्मणं च महाबाहुं देवरं मे यशस्विनम् ॥ ३५ ॥
"
|
परत येण्याविषयी उत्सुक होऊन मी आपले शरीर वृद्धिंगत करीत आहे हे पाहून जनकनन्दिनी अत्यन्त दु:खी झाली. तिचे मुखावरून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या मी उड्डाण करण्याची तयारी करीत आहे हे पाहून ती घाबरून गेली आणि शोकाच्या वेगाने व्याकुळ झाली. त्यावेळी तिचा कंठ अश्रुमुळे दाटून आला होता. गदगद कंठाने ती मला म्हणू लागली—'हे महाकपि ! तू फार भाग्यवान आहेस कारण माझे प्रियतम महाबाहु कमलनयन राम, तसेच माझे यशस्वी दीर महाबाहु लक्ष्मण यांनाही तू आपल्या डोळ्यांनी पहाशील. ॥३२—३५॥
|
सीतयाप्येवमुक्तोऽहं अब्रुवं मैथिलीं तथा ।
पृष्ठमारोह मे देवि क्षिप्रं जनकनन्दिनी ॥ ३६ ॥
यावत् ते दर्शयाम्यद्य ससुग्रीवं सलक्ष्मणम् ।
राघवं च महाभागे भर्तारमसितेक्षणे ॥ ३७ ॥
|
'याप्रमाणे सीतेने म्हटल्यावर मी मैथिलीला म्हटले—'देवी ! जनकनन्दिनी ! तू सत्वर माझ्या पाठीवर बस कशी म्हणजे हे महाभाग्यशालिनी ! हे श्यामलोचने ! मी आजच्या आज तुला सुग्रीव आणि लक्ष्मण यांच्यासह राघवाचे दर्शन करवितो. ॥३६-३७॥
|
साब्रवीन्मां ततो देवी नैष धर्मो महाकपे ।
यत्ते पृष्ठं सिषेवेऽहं स्ववशा हरिपुंगवः ॥ ३८ ॥
|
'हे ऐकून सीता देवी मला म्हणाली—'हे महाकपि ! हे वानरश्रेष्ठा ! मी स्वाधीन असतांना स्वेच्छेने तुझ्या पृष्ठभागावर आरोहण करणे हा माझा धर्म नाही.॥३८॥
|
पुरा च यदहं वीर स्पृष्टा गात्रेषु रक्षसा ।
तत्राहं किं करिष्यामि कालेनोपनिपीडिता ॥ ३९ ॥
गच्छ त्वं कपिशार्दूल यत्र तौ नृपतेः सुतौ ।
|
'हे वीरा ! पूर्वी माझ्या शरीराला जो राक्षस रावणाचा स्पर्श झाला आहे तो त्यावेळी मी काळाच्या तावडीत सापडल्यामुळे झाला, त्यावेळी मी तेथे काय करू शकत होते ? म्हणून हे वानरप्रवर ! जेथे ते दोन्ही राजकुमार आहेत तेथे तू जा.' ॥३९ १/२॥
|
इत्येवं सा समाभाष्य भूयः सन्देष्टुमस्थिता ॥ ४० ॥
हनुमन् सिंहसङ्काशौ तावुभौ रामलक्ष्मणौ ।
सुग्रीवं च सहामात्य सर्वान् ब्रूया अनामयम् ॥ ४१ ॥
|
असे म्हणून ती परत मला सन्देश देऊ लागली. ती म्हणाली— 'हनुमान ! सिंहाप्रमाणे पराक्रमी ते दोघे बन्धु श्रीराम आणि लक्ष्मण यांना आणि आमात्यांसह सुग्रीवाला, तसेच अन्य सर्व लोकांनाही तू माझा कुशल समाचार सांग आणि त्यांचेही कुशल विचार. ॥४०-४१॥
|
यथा च स महाबाहुर्मां तारयति राघवः ।
असमाद् दुःखाम्बुसंरोधात् तत् त्वमाख्यातुमर्हसि ॥ ४२ ॥
|
ज्या रीतीने ते महापराक्रमी रघुनाथ या दु:खसागरातून उद्धार करतील त्या रीतीने तू त्यांना माझा सर्व वृत्तान्त सविस्तर सांग. ॥४२॥
|
इमं च तीव्रं मम शोकवेगं
रक्षोभिरेभिः परिभर्त्सनं च ।
ब्रूयास्तु रामस्य गतः समीपं
शिवश्च तेऽध्वास्तु हरिप्रवीर ॥ ४३ ॥
|
''हे हरिप्रवीर (वानरामधील प्रमुख वीरा) हा माझा तीव्र शोकावेग आणि या राक्षसांच्या द्वारा होत असलेली माझी निर्भत्सना, हे सर्वही तू श्रीरामचन्द्रांच्या जवळ जाऊन त्यांना सांग, तुझा मार्ग मंगलमय होवो.'॥४३॥
|
एतत् तवार्या नृप संयता सा
सीता वचः प्राह विषादपूर्वम् ।
एतच्च बुद्ध्वा गदितं यथा त्वं
श्रद्धत्स्व सीतां कुशलां समग्राम् ॥ ४४ ॥
|
'हे राजा ! आपली प्रियतमा संयमशील आर्या सीतेने अत्यन्त विषादाने तुला हा निरोप सांगितला आहे. म्हणून मी सांगितलेल्या सर्व गोष्टीसंबन्धी आपण विचार करून विश्वास ठेवावा की सती शिरोमणी सीता सकुशल आहे.'॥४४॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे सप्तषष्टितमः सर्गः ॥ ६७ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा सदुसष्टावा सर्ग पूरा झाला.॥६७॥
|