श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। तृतीयः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रामायणकाव्यगतानां विषयाणां संक्षेपेणोल्लेखः - वाल्मीकि मुनिंच्या द्वारे रामायण काव्यात निबद्ध विषयांचा संक्षेपाने उल्लेख -
श्रुत्वा वस्तु समग्रं तद्धर्मार्थसहितं हितम् ।
व्यक्तमन्वेषते भूयो यद् वृत्तं तस्य धीमतः ॥ १ ॥
नारदांच्या मुखाने धर्म, अर्थ आणि कामरूपी फलांनी युक्त, हितकर (मोक्षदायक) तसेच प्रकट आणि गुप्त - संपूर्ण रामचरित्राला, जी रामायण महाकाव्याची प्रधान कथावस्तु होती, ऐकून महर्षि वाल्मीकि बुद्धिमान श्रीरामाच्या त्या जीवनवृत्ताचा पुन्हा उत्तम प्रकारे साक्षात्कार व्हावा म्हणून प्रयत्‍न करू लागले. ॥ १ ॥
उपस्पृश्योदकं सम्यङ्‌मुनिः स्थित्वा कृताञ्जलिः ।
प्राचीनाग्रेषु दर्भेषु धर्मेणान्वेषते गतिम् ॥ २ ॥
ते पूर्वाग्र कुशांच्या आसनावर बसले आणि विधिवत् आचमन करून, हात जोडून, स्थिर भावाने स्थित होऊन योगधर्माच्या (समाधिच्या) द्वारा श्रीराम आदिंच्या चरित्रांचे अनुसंधान करू लागले. ॥ २ ॥
रामलक्ष्मणसीताभी राज्ञा दशरथेन च ।
सभार्येण सराष्ट्रेण यत् प्राप्तं तत्र तत्त्वतः ॥ ३ ॥

हसितं भाषितं चैवं गतिर्यावच्च चेष्टितम् ।
तत्सर्वं धर्मवीर्येण यथावत् संप्रपश्यति ॥ ४ ॥
श्रीराम-लक्ष्मण-सीता तसेच राज्य आणि राण्यांच्यासहित राजा दशरथांशी संबंध असणार्‍या जितक्या गोष्टी होत्या - हसणे बोलणे, चालणे आणि राज्यपालन आदि जितक्या म्हाणून क्रिया झाल्या होत्या, त्या सर्वांचा महर्षिंनी आपल्या योगधर्माच्या बलाने उत्तम प्रकारे साक्षातकार करून घेतला. ॥ ३-४ ॥
स्त्रीतृतीयेन च तथा यत् प्राप्तं चरता वने ।
सत्यसंधेन रामेण तत् सर्वं चान्ववेक्षितम् ॥ ५ ॥
सत्यप्रतिज्ञ श्रीरामचंद्रांनी लक्ष्मण आणि सीतेसह वनात विचरण करते समयी ज्या ज्या लीला केल्या होत्या, त्या सर्व त्यांच्या दृष्टीस पडल्या. ॥ ५ ॥
ततः पश्यति धर्मात्मा तत्सर्वं योगमास्थितः ।
पुरा यत् तत्र निर्वृत्तं पाणावमलकं यथा ॥ ६ ॥
योगाचा आश्रय घेऊन त्या धर्मात्मा महर्षिने पूर्वकाली ज्या ज्या घटना घडल्या होत्या त्या सर्व तेथे हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे प्रत्यक्ष पाहिल्या. ॥ ६ ॥
तत् सर्वं तत्त्वतो दृष्ट्‍वा धर्मेण स महामतिः ।
अभिरामस्य रामस्य तत् सर्वं कर्त्तुमुद्यतः ॥ ७ ॥
सर्वांच्या मनाला प्रिय वाटणार्‍या भगवान श्रीरामांच्या संपूर्ण चरित्राचे समाधिद्वारा यथार्थरूपाने निरीक्षण करून महाबुद्धिमान् महर्षि वाल्मीकिंनी त्या सर्वांना महाकाव्याचे रूप देण्याचा प्रय‍न केला. ॥ ७ ॥
कामार्थगुणसंयुक्तं धर्मार्थगुणविस्तरम् ।
समुद्रमिव रत्‍नाढ्यं सर्वश्रुतिमनोहरम् ॥ ८ ॥

स यथा कथितं पूर्वं नारदेन महात्मना ।
रघुवंशस्य चरितं चकार भगवान् मुनिः ॥ ९ ॥
महात्मा नारदांनी प्रथम जसे वर्णन केले होते, त्याच क्रमाने भगवान् वाल्मीकि मुनिंनी रघुवंश विभूषण श्रीरामांच्या चरित्रविषयक रामायण काव्याची निर्मिती केली. ज्याप्रमाणे समुद्र सर्व रत्‍नांचा निधि आहे, त्या प्रकारे हे महाकाव्य, गुण, अलंकार, तसेच ध्वनि आदि रत्‍नांचे भाण्डार आहे. इतकेच नव्हे तर हे संपूर्ण श्रुतिंच्या सारभूत अर्थाचे प्रतिपादक असल्या कारणाने सर्वांच्या कानांना प्रिय वाटणारे आणि सर्वांच्या चित्ताला आकृष्ट करणारे आहे. हे धर्म, अर्थ, काम, मोक्षरूपी गुणांनी (फलांनी) युक्त आणि यांचे विस्तारपूर्वक प्रतिपादन तसेच दान करणारे आहे. ॥ ८-९ ॥
जन्म रामस्य सुमहद्‌वीर्यं सर्वानुकूलताम् ।
लोकस्य प्रियतां क्षान्तिं सौम्यतां सत्यशीलताम् ॥ १० ॥
श्रीरामांचा जन्म, त्यांचा महान् पराक्रम, त्यांची सर्वानुकूलता, लोकप्रियता, क्षमा, सौम्यभाव तसेच सत्यशीलतेचे या महाकाव्यात महर्षिंनी वर्णन केले आहे. ॥ १० ॥
नाना चित्राः कथाश्चान्या विश्वामित्रसहायने ।
जानक्याश्च विवाहं च धनुषश्च विभेदनम् ॥ ११ ॥
विश्वामित्रांच्या बरोबर श्रीराम-लक्ष्मण गेल्यानंतर त्यांच्याद्वारे ज्या नाना प्रकारच्या विचित्र लीला आणि अद्‌भुत गोष्टी घडल्या त्या सर्वांचे यात महर्षिंनी वर्णन केले आहे. श्रीराम द्वारा मिथिलेत केला गेलेल्या धनुष्यभंगाचे आणि जनकनंदिनी सीता आणि ऊर्मिला आदिंच्या विवाहांचे विस्तृत चित्रण यात केलेले आहे. ॥ ११ ॥
रामरामविवादं च गुणान् दाशरथेस्तथा ।
तथाभिषेकं रामस्य कैकेय्या दुष्टभावताम् ॥ १२ ॥

विघातं चाभिषेकस्य रामस्य च विवासनम् ।
राज्ञः शोकं विलापं च परलोकस्य चाश्रयम् ॥ १३ ॥

प्रकृतीनां विषादं च प्रकृतीनां विसर्जनम् ।
निषादाधिपसंवादं सूतोपावर्तनं तथा ॥ १४ ॥
श्रीराम-परशुराम संवाद, दशरथनंदन श्रीरामांचे गुण, त्यांचा अभिषेक, कैकेयीची दुष्टता, श्रीरामाच्या अभिषेकात विघ्न, त्यांचा वनवास, राजा दशरथांचा शोक, विलाप आणि परलोकगमन, प्रजेच्या बरोबर संभाषण आणि सूत सुमंत्राला अयोध्येला परत पाठवणे आदिंचेही यात उल्लेख केले गेले आहेत. ॥ १२-१४ ॥
गङ्‍गायाश्चापि संतारं भरद्वाजस्य दर्शनम् ।
भरद्वाजाभ्यनुज्ञानाच्चित्रकूटस्य दर्शनम् ॥ १५ ॥

वास्तुकर्म निवेशं च भरतागमनं तथा ।
प्रसादनं च रामस्य पितुश्च सलिलक्रियाम् ॥ १६ ॥

पादुकाग्र्याभिषेकं च नन्दिग्रामनिवासनम् ।
दण्डकारण्यगमनं विराधस्य वधं तथा ॥ १७ ॥

दर्शनं शरभङ्‍गस्य सुतीक्ष्णेन समागमम् ।
अनसूयासमाख्यां च अङ्‍गरागस्य चार्पणम् ॥ १८ ॥

दर्शनं चाप्यगस्त्यस्य धनुशो ग्रहणं तथा ।
शूर्पणख्याश्च संवादं विरूपकरणं तथा ॥ १९ ॥

वधं खरत्रिशिरसोरुत्थानं रावणस्य च ।
मारीचस्य वधं चैव वैदेह्या हरणं तथा ॥ २० ॥

राघवस्य विलापं च गृध्रराजनिबर्हणम् ।
कबन्धदर्शनं चैव पम्पायाश्चापि दर्शनम् ॥ २१ ॥

शबरी दर्शनं चैव फलमूलाशनं तथा ।
प्रलापं चैव पम्पायां हनुमद्दर्शनं तथा ॥ २२ ॥

ऋष्यमूकस्य गमनं सुग्रीवेण समागमम् ।
प्रत्ययोत्पादनं सख्यं वालिसुग्रीवविग्रहम् ॥ २३ ॥

वालिप्रमथनं चैव सुग्रीवप्रतिपादनम् ।
ताराविलापं समयं वर्षरात्रनिवासनम् ॥ २४ ॥

कोपं राघवसिंहस्य बलानामुपसङ्‍ग्रहम् ।
दिशः प्रस्थापनं चैव पृथिव्याश्च निवेदनम् ॥ २५ ॥

अङ्‍गुलीयकदानं च ऋक्षस्य बिलदर्शनम् ।
प्रायोपवेशनं चैव सम्पातेश्चापि दर्शनम् ॥ २६ ॥

पर्वतारोहणं चैव सागरस्यापि लङ्‍घनम् ।
समुद्रवचनाच्चैव मैनाकस्य च दर्शनम् ॥ २७ ॥

राक्षसीतर्जनं चैव च्छायाग्राहस्य दर्शनम् ।
सिंहिकायाश्च निधनं लङ्‍कामलयदर्शनम् ॥ २८ ॥

रात्रौ लङ्‍काप्रवेशं च एकस्यापि विचिन्तनम् ।
आपानभूमिगमनमवरोधस्य दर्शनम् ॥ २९ ॥

दर्शनं रावणस्यापि पुष्पकस्य च दर्शनम् ।
अशोकवनिकायानं सीतायाश्चापि दर्शनम् ॥ ३० ॥

अभिज्ञानप्रदानं च सीतायाश्चापि भाषणम् ।
राक्षसीतर्जनं चैव त्रिजटास्वप्नदर्शनम् ॥ ३१ ॥

मणिप्रदानं सीताया वृक्षभङ्‍गं तथैव च ।
राक्षसीविद्रवं चैव किङ्‍कराणां निबर्हणम् ॥ ३२ ॥

ग्रहणं वायुसूनोश्च लङ्‍कादाहाभिगर्जनम् ।
प्रतिप्लवनमेवाथ मधूनां हरणं तथा ॥ ३३ ॥

राघवाश्वासनं चैव मणिनिर्यातनं तथा ।
सङ्‍गमं च समुद्रेण नल सेतोश्च बन्धनम् ॥ ३४ ॥

प्रतारं च समुद्रस्य रात्रौ लङ्‍कावरोधनम् ।
विभीषणेन संसर्गं वधोपायनिवेदनम् ॥ ३५ ॥

कुंभकर्णस्य निधनं मेघनादनिबर्हणम् ।
रावणस्य विनाशं च सीतावाप्तिमरेः पुरे ॥ ३६ ॥

विभीषणाभिषेकं च पुष्पकस्य च दर्शनम् ।
अयोध्यायाश्च गमनं भरद्वाज समागमम् ॥ ३७ ॥

प्रेषणं वायुपुत्रस्य भरतेन समागमम् ।
रामाभिषेकाभ्युदयं सर्वसैन्यविसर्जनम् ।
स्वराष्ट्ररञ्जनं चैव वैदेह्याश्च विसर्जनम् ॥ ३८ ॥

अनागतं च यत् किञ्चिद् रामस्य वसुधातले ।
तच्चकारोत्तरे काव्ये वाल्मीकिर्भगवानृषिः ॥ ३९ ॥
श्रीराम आदिंचे गंगापार जाणे, भरद्वाज मुनिंचे दर्शन घेणे, भरद्वाज मुनींची आज्ञा घेऊन चित्रकूटावर जाणे आणि तेथील नैसर्गिक शोभेचे अवलोकन करणे, चित्रकूटमध्ये कुटी बनविणे, तिच्यात निवास करणे, तेथे भरताचे श्रीरामास भेटण्यासाठी येणे, त्यांनी अयोध्येस परत यावे म्हणून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्‍न व मनधरणी करणे, श्रीरामद्वारा पित्याला जलांजली दान, भरतद्वारा अयोध्येच्या राजसिंहासनावर श्रीरामचंद्रांच्या श्रेष्ठ पादुकांचा अभिषेक आणि स्थापना, नंदिग्रामात भरताचा निवास, श्रीरामांचे दण्डकारण्यात गमन, त्यांच्या द्वारा विराधाचा वध, शरभंग मुनिंचे दर्शन, सुतीक्ष्णाबरोबर समागम, अनसूयेबरोबर सीतादेवीची काही कालपर्यंत स्थिति, तिच्याकडून सीतेस अंगराग समर्पण, श्रीराम आदिंच्या द्वारा अगस्तांचे दर्शन, त्यांनी दिलेल्या वैष्णव धनुष्याचे ग्रहण, शूर्पणखेशी संवाद, श्रीरामांचे आज्ञेने लक्ष्मणद्वारा तिचे विरूपीकरण (नाक, कान छेदन), श्रीराम द्वारा खर-दूषण आणि त्रिशिरा यांचा वध, शूर्पणखेने उत्तेजित करण्यामुळे रावणाचे श्रीरामांचा बदला घेण्यासाठी उठणे, श्रीरामद्वारा मारीचवध, रावणद्वारा विदेह नंदिनी सीतेचे हरण, सीतेसाठी श्रीरघुनाथाचा विलाप, रावणद्वारा गृध्रराज जटायूचा वध, श्रीराम आणि लक्ष्मणाची कबंधाशी भेट, त्यांच्याद्वारा पंपासरोवराचे अवलोकन, श्रीरामांनी शबरीला भेट देणे आणि तिने दिलेल्या फल-मूलादिंचे ग्रहण करणे, श्रीरामांचा सीतेसाठी प्रलाप, पंपासरोवराजवळ हनुमंताशी भेट, श्री राम आणि लक्ष्मणाचे हनुमानाबरोबर ऋष्यमूक पर्वतावर जाणे, तेथे सुग्रीवाची भेट करवून देणे, त्याला आपल्या बळाचा विश्वास देऊन त्यांच्याशी मैत्री करणे, वाली आणि सुग्रीवाचे युद्ध, श्रीरामद्वारा वालीचा विनाश, सुग्रीवाला राज्य समर्पण, आपला पति वाली यासाठी तारेचा विलाप, शरत्काली सीतेचा शोध करविण्याची सुग्रीवाची प्रतिज्ञा, श्रीरामांचे पावसाळ्यात माल्यवान पर्वताच्या प्रस्रवण नामक शिखरावर वास्तव्य, रघुकुलसिंह श्रीरामाचे सुग्रीवाप्रति क्रोध प्रदर्शन, सुग्रीव द्वारा सीतेच्या शोधासाठी वानरसेनेचा संग्रह, सुग्रीवाने सर्व दिशांना वानरांना धाडणे, आणि त्यांना पृथ्वीवरील द्विप, समुद्र आदि विभागांचा परिचय देणे, श्रीरामांनी सीतेस विश्वास वाटावा म्हणून हनुमंताजवळ आपली अंगठी देणे, वानरांना ऋक्षबिल (स्वयंप्रभा गुफा)चे दर्शन, त्यांचे प्रायोपवेशन (प्राणत्यागासाठी अनशन), संपातीशी त्यांची भेट आणि संभाषण, समुद्र लंघनासाठी हनुमंताचे महेंद्र पर्वतावर चढणे, समुद्र ओलांडणे, सामुद्राच्या सांगण्यावरून वर आलेल्या मैनाकाचे दर्शन करणे, त्याला राक्षसीने दटावणे, हनुमानद्वारा छायाग्राहिणी सिंहिकेचे दर्शन आणि तिचे निधन, लंकेच्या आधारभूत पर्वताचे (त्रिकूटाचे) दर्शन, रात्रीच्या वेळी लंकेत प्रवेश, एकटा असल्याने आपल्या कर्तव्याचा विचार करणे, रावणाच्या मद्यपान गृहात जाणे, त्याच्या अंतःपुरांतील स्त्रियांना पाहणे, हनुमंताने रावणास पाहणे, पुष्पक विमानाचे निरीक्षण करणे, अशोकवाटिकेत जाणे, सीतेचे दर्शन करणे, ओळख पटावी म्हणून सीतेला अंगठी देणे, आणि तिच्याशी संभाषण करणे, राक्षसींच्या द्वारे सीतेला भिती दाखविणे, दटावणे, त्रिजटेला शुभसूचक स्वप्नांचे दर्शन, सीतेने हनुमंतास चूडामणि प्रदान करणे, हनुमंताने अशोक वाटिकेतील वृक्ष तोडून टाकणे, राक्षसींचे पळून जाणे, रावणाच्या सेवकांचा हनुमान द्वारा संहार, वायुनंदन हनुमानाचे बंदी होऊन रावणाच्या सभेत जाणे, त्यांच्या द्वारा गर्जन आणि लंकादहन, परत येताना समुद्र ओलांडणे, वानरांचे मधुवनात जाऊन मधुपान करणे,हनुमंताने श्रीरामचंद्रास आश्वासन देणे आणि सीतेने दिलेला चूडामणि अर्पण करणे, सेनेसहित सुग्रीवाबरोबर श्रीरामांची लंकायात्रेच्या वेळी समुद्राशी भेट, नलाने समुद्रावर सेतु बांधणे, त्या सेतुद्वारा वानरसैन्याचे समुद्रापार जाणे, रात्री वानरांनी लंकेला चारी बाजूंनी वेढा घालणे, बिभीषणाशी श्रीरामांचा मैत्रीचा संबंध होणे, बिभीषणाने श्रीरामास रावणवधाचा उपाय सांगणे, कुंभकर्णाचे निधन, मेघनाधाचा वध, रावणाचा विनाश, सीतेची प्राप्ति, शत्रुनगरी लंकेत बिभीषणाचा अभिषेक, श्रीरामद्वारा पुष्पक विमानाचे अवलोकन, त्यांच्या द्वारे दलबलसहित त्यांचे अयोध्येसाठी प्रस्थान, श्रीरामांची भरद्वाज मुनिशी भेट, वायुपुत्र हनुमानाला दूत बनवून भरताकडे पाठविणे आणि अयोध्येस येऊन भरतास भेटणे, श्रीरामाच्या राज्याभिषेकाचा उत्सव, नंतर श्रीरामांनी सर्व वानरसेनेला निरोप देणे, आपल्या राष्ट्रातील समस्त प्रजेला प्रसन्न राखणे, इत्यादि वृत्तांताचे आणि या पृथ्वीवर श्रीरामांचे जे काही भविष्य चरित्र होते त्याचेही भगवान वाल्मीकि मुनिंनी आपल्या उत्कृष्ट महाकाव्यात अंकित केले. ॥१५-३९ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे तृतीयः सर्गः ॥ ३ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील बालकाण्डाचा तिसरा सर्ग समाप्त झाला. ॥ ३ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP