श्रीरामशक्तिविषयकमनुभवं प्रतिपाद्य मारीचेन रावणस्य श्रीरामापराधकरणान्निवारणम् -
|
श्रीरामांच्या शक्तिविषयी आपला अनुभव सांगून मारीचाने रावणाला त्यांचा अपराध करण्यापासून परावृत्त करणे -
|
कदाचिदप्यहं वीर्यात् पर्यटन् पृथिवीमिमाम् ।
बलं नागसहस्रस्य धारयन् पर्वतोपमः ॥ १ ॥
|
एका समयाची गोष्ट आहे की मी आपल्या पराक्रमाच्या अभिमानाने पर्वतासमान शरीर धारण करून या पृथ्वीवर फिरत होतो. त्या समयी माझ्यामध्ये एक हजार हत्तींचे बळ होते. ॥१॥
|
नीलजीमूतसंकाशस्तप्तकाञ्चनकुण्डलः ।
भयं लोकस्य जनयन् किरीटी परिघायुधः ॥ २ ॥
व्यचरन् दण्डकारण्यमृषिमांसानि भक्षयन् ।
|
माझे शरीर नील मेघासमान काळे होते. माझ्या कानात चोख सोन्याची कुंडले मी घातलेली होती. माझ्या मस्तकावर किरीट होता आणि हातात परिध. मी ऋषिंचे मांस खात होतो आणि समस्त जगताच्या मनात भय उत्पन्न करीत दण्डकारण्यात विचरत होतो. ॥२ १/२॥
|
विश्वामित्रोऽथ धर्मात्मा मद्वित्रस्तो महामुनिः ॥ ३ ॥
स्वयं गत्वा दशरथं नरेन्द्रमिदमब्रवीत् ।
|
त्या काळात धर्मात्मा महामुनि विश्वामित्रांना माझ्या पासून फार भय उत्पन्न झाले होते. ते स्वतः राजा दशरथांजवळ गेले आणि त्यांना या प्रकारे म्हणाले - ॥३ १/२॥
|
अद्य रक्षतु मां रामः पर्वकाले समाहितः ॥ ४ ॥
मारीचान्मे भयं घोरं समुत्पन्नं नरेश्वर ।
|
नरेश्वर ! मला मारीच नामक राक्षसापासून घोर भय उत्पन्न झाले आहे. म्हणून हे श्रीराम माझ्या बरोबर येऊ देत आणि पर्वकाळी एकाग्रचित्त होऊन ते माझे रक्षण करोत. ॥४ १/२॥
|
इत्येवमुक्तो धर्मात्मा राजा दशरथस्तदा ॥ ५ ॥
प्रत्युवाच महाभागं विश्वामित्रं महामुनिम् ।
|
मुनिंनी असे सांगितल्यावर त्या समयी धर्मात्मा राजा दशरथांनी महाभाग महामुनि विश्वामित्रांना या प्रकारे उत्तर दिले- ॥५ १/२॥
|
ऊनद्वादशवर्षोऽयमकृतास्त्रश्च राघवः ॥ ६ ॥
कामं तु मम यत् सैन्यं मया सह गमिष्यति ।
बलेन चतुरङ्गेण स्वयमेत्य निशाचरम् ॥ ७ ॥
वधिष्यामि मुनिश्रेष्ठ शत्रुं तव यथेप्सितम् ।
|
मुनिश्रेष्ठ ! रघुकुलनंदना (राघवा)ची अवस्था आता बारा वर्षा पेक्षांही कमी आहे. त्यांना अस्त्र-शस्त्रांच्या उपयोगाचा पूरा अभ्यासही नाही आहे. आपली इच्छा असेल तर माझ्या बरोबर माझी सारी सेना तेथे येईल आणि मी चतुरंगिणी सेनेसह स्वतः येऊन आपल्या इच्छेनुसार त्या शत्रुरूप निशाचराचा वध करीन. ॥ ६-७ १/२॥
|
एवमुक्तः स तु मुनी राजानमिदमब्रवीत् ॥ ८ ॥
रामान्नान्यद् बलं लोके पर्याप्तं तस्य रक्षसः ।
|
राजांनी असे म्हटल्यावर मुनि त्यांना या प्रकारे बोलले - त्या राक्षसासाठी श्रीरामाशिवाय दुसरी कुठलीही शक्ती पर्याप्त नाही आहे. ॥८ १/२॥
|
देवातानामपि भवान् समरेष्वभिपालकः ॥ ९ ॥
आसीत् तव कृतं कर्म त्रिलोकविदितं नृप ।
|
राजन ! यात संदेह नाही की समरभूमीमध्ये आपण देवतांचेही रक्षण करण्यात समर्थ आहात. आपण जे महान कार्य केले आहे ते तिन्ही लोकांत प्रसिद्ध आहे. ॥९ १/२॥
|
काममस्ति महत् सैन्यं तिष्ठत्विह परंतप ॥ १० ॥
बालोऽप्येष महातेजाः समर्थस्तस्य निग्रहे ।
गमिष्ये राममादाय स्वस्ति तेऽस्तु परंतप ॥ ११ ॥
|
शत्रूंना संताप देणार्या नरेशा ! आपल्या जवळ जी विशाल सेना आहे ती आपली इच्छा असेल तर येथेच राहू दे. (आपणही येथेच राहावे.) महातेजस्वी श्रीराम बालक आहेत तरीही त्या राक्षसाचे दमन करण्यास समर्थ आहेत. म्हणून मी श्रीरामांनाच बरोबर घेऊन जाईन. आपले कल्याण होवो. ॥१०-११॥
|
एवमुक्त्वा तु स मुनिस्तमादाय नृपात्मजम् ।
जगाम परमप्रीतो विश्वामित्रः स्वमाश्रमम् ॥ १२ ॥
|
असे म्हणून (लक्ष्मणसहित) राजकुमार श्रीरामांना बरोबर घेऊन महामुनि विश्वामित्र मोठ्या प्रसन्नतेने आपल्या आश्रमात गेले. ॥१२॥
|
तं तथा दण्डकारण्ये यज्ञमुद्दिश्य दीक्षितम् ।
बभूवोपस्थितो रामश्चित्रं विस्फारयन् धनुः ॥ १३ ॥
|
या प्रकारे दण्डकारण्यात जाऊन त्यांनी यज्ञासाठी दीक्षा ग्रहण केली आणि श्रीराम आपल्या अद्भुत धनुष्याची टणत्कार करीत त्यांच्या रक्षणासाठी जवळच उभे राहिले. ॥१३॥
|
अजातव्यञ्जनः श्रीमान् बालः श्यामः शुभेक्षणः ।
एकवस्त्रधरो धन्वी शिखी कनकमालया ॥ १४ ॥
|
त्या समयापर्यंत श्रीरामांच्या ठिकाणी तारूण्याची चिन्हे प्रकट झालेली नव्हती. (त्यांची किशोरावस्था होती) ते एक शोभासंपन्न बालकाच्या रूपात दिसून येत होते. त्यांच्या श्रीअङ्गांचा रंग सावळा होता आणि डोळे फार सुंदर होते. ते एक वस्त्र धारण करून हातात धनुष्य घेऊन सुंदर शिखा आणि सोन्याच्या हाराने सुशोभित झाले होते. ॥१४॥
|
शोभयन् दण्डकारण्यं दीप्तेन स्वेन तेजसा ।
अदृश्यत ततो रामो बालचन्द्र इवोदितः ॥ १५ ॥
|
त्या समयी आपल्या उद्दीप्त तेजाने दण्डकारण्याची शोभा वाढवीत असलेले श्रीरामचंद्र नवोदित बालचंद्रा समान दृष्टिगोचर होत होते. ॥१५॥
|
ततोऽहं मेघसंकाशस्तप्तकाञ्चनकुण्डलः ।
बली दत्तवरो दर्पादाजगामाश्रमान्तरम् ॥ १६ ॥
|
इकडे मीही मेघा समान काळ्या शरीराने अत्यंत घमेंडीत त्या आश्रमाच्या आत घुसलो. माझ्या कानात तप्त केलेल्या सुवर्णाची कुण्डले झगमगत होती. मी बलवान तर होतोच, मला वरदानही मिळालेले होते की देवता मला मारू शकणार नाहीत. ॥१६॥
|
तेन दृष्टः प्रविष्टोऽहं सहसैवोद्यतायुधः ।
मां तु दृष्ट्वा धनुः सज्यमसम्भ्रान्तश्चकार ह ॥ १७ ॥
|
आत प्रवेश करताच श्रीरामचंद्रांची दृष्टी माझ्यावर पडली. मला पहाताच त्यांनी एकाएकी धनुष्य उचलले आणि जराही न घाबरता त्यांवर प्रत्यंचा चढविली. ॥१७॥
|
अवजानन्नहं मोहाद् बालोऽयमिति राघवम् ।
विश्वामित्रस्य तां वेदिमभ्यधावं कृतत्वरः ॥ १८ ॥
|
मी मोहवश श्रीरामचंद्रांना हा बालक आहे असे समजून त्यांची अवहेलना करीत मोठ्या वेगाने विश्वामित्रांच्या त्या यज्ञवेदीकडे धावलो. ॥१८॥
|
तेन मुक्तस्ततो बाणः शितः शत्रुनिबर्हणः ।
तेनाहं ताडितः क्षिप्तः समुद्रे शतयोजने ॥ १९ ॥
|
इतक्यात श्रीरामांनी एक असा तीक्ष्ण बाण सोडला, जो शत्रुचा संहार करणारा होता. परंतु त्या बाणाचा आघात होताच (मी मेलो नाही), मी शंभर योजने दूर समुद्रात येऊन पडलो. ॥१९॥
|
नेच्छता तात मां हन्तुं तदा वीरेण रक्षितः ।
रामस्य शरवेगेन निरस्तो भ्रान्तचेतनः ॥ २० ॥
पातितोऽहं तदा तेन गम्भीरे सागराम्भसि ।
प्राप्य संज्ञां चिरात् तात लङ्कां प्रति गतः पुरीम् ॥ २१ ॥
|
तात ! वीर रामचंद्र त्यावेळी मला मारण्याची इच्छा करीत नव्हते म्हणूनच माझे प्राण वाचले. त्यांच्या बाणाच्या वेगाने मी भ्रान्तचित्त होऊन दूर फेकला गेलो आणि समुद्राच्या खोल पाण्यात फेकून दिला गेलो. नंतर दीर्घ काळानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी लंकापुरीत गेलो. ॥२०-२१॥
|
एवमस्मि तदा मुक्तः सहायास्ते निपातिताः ।
अकृतास्त्रेण रामेण बालेनाक्लिष्टर्मणा ॥ २२ ॥
|
याप्रकारे त्यावेळी मी मरणापासून वाचलो. अनायासेच महान कर्म करणारे श्रीराम त्यावेळी केवळ बालक होते आणि त्यांना अस्त्रे चालविण्याचा पूरा अभ्यासही नव्हता तरीही त्यांनी माझ्या सर्व सहाय्यकांना मारून टाकले, जे माझ्या बरोबर गेलेले होते. ॥२२॥
|
तन्मया वार्यमाणस्तु यदि रामेण विग्रहम् ।
करिष्यस्यापदं घोरां क्षिप्रं प्राप्य न शिष्यसि ॥ २३ ॥
|
म्हणून मी नको म्हणत असतांही जर तुम्ही श्रीरामांशी विरोध कराल तर शीघ्रच घोर आपत्तिमध्ये पडाल आणि शेवटी आपल्या जीवनालाही मुकून बसाल. ॥२३॥
|
क्रीडारतिविधिज्ञानां समाजोत्सवदर्शिनाम् ।
रक्षसां चैव सन्तापमनर्थं चाहरिष्यसि ॥ २४ ॥
|
खेळात आणि भोगविलासातच जाणकार असणार्या आणि सामाजिक उत्सव पाहूनच मनोरंजन करणार्या राक्षसांसाठी तुम्ही संताप आणि अनर्थ (मरण) यांनाच बोलावून आणाल. ॥२४॥
|
हर्म्यप्रासादसम्बाधां नानारत्नविभूषिताम् ।
द्रक्ष्यसि त्वं पुरीं लङ्कां विनष्टां मैथिलीकृते ॥ २५ ॥
|
मैथिली सीतेसाठी तुम्हांला धनिकांच्या अट्टालिकांनी तसेच राजभवनांनी भरलेल्या तसेच नाना प्रकारच्या रत्नांनी विभूषित लंकापुरीचा नाशही आपल्या डोळ्यांनी पहावा लागेल. ॥२५॥
|
अकुर्वन्तोऽपि पापानि शुचयः पापसंश्रयात् ।
परपापैर्विनश्यन्ति मत्स्या नागह्रदे यथा ॥ २६ ॥
|
जे लोक आचार- विचारांनी शुद्ध आहेत आणि पाप अथवा अपराध करीत नाहीत, तेही जर पापी लोकांच्या संपर्कात गेले तर दुसर्यांच्या पापांनीच नष्ट होऊन जातात; ज्याप्रमाणे साप असणार्या सरोवरात निवास करणारे मासे त्या सर्पाबरोबरच मारले जातात. ॥२६॥
|
दिव्यचन्दनदिग्धाङ्गान् दिव्याभरणभूषितान् ।
द्रक्ष्यस्यभिहतान् भूमौ तव दोषात् तु राक्षसान् ॥ २७ ॥
|
तुम्ही पहाल की ज्यांचे अंग दिव्य चंदनाने चर्चित होत होते तसेच जे दिव्य आभूषणांनी विभूषित राहात होते, तेच राक्षस तुमच्याच अपराधामुळे मारले जाऊन पृथ्वीवर पडलेले आहेत. ॥२७॥
|
हृतदारान् सदारांश्च दश विद्रवतो दिशः ।
हतशेषानशरणान् द्रक्ष्यसि त्वं निशाचरान् ॥ २८ ॥
|
तुम्हाला हेही दिसून येईल की कित्येक निशाचरांच्या स्त्रिया हरल्या गेल्या आहेत आणि काहींच्या स्त्रिया त्यांच्या बरोबर आहेत तसेच ते युद्धात मरण्यापासून वाचून असहाय अवस्थेत दाही दिशांना पळून जात आहेत. ॥२८॥
|
शरजालपरिक्षिप्तामग्निज्वालासमावृताम् ।
प्रदग्धभवनां लङ्कां द्रक्ष्यसि त्वमसंशयम् ॥ २९ ॥
|
निःसंदेह तुमच्या समोर हे दृश्य येईल की लंकापुरीवर बाणांचे जणु जाळेच पसरले गेले आहे. ती आगीच्या ज्वाळांनी घेरली गेली आहे आणि तिचे एकेक घर जळून भस्म होऊन जात आहे. ॥२९॥
|
परदाराभिमर्शात् तु नान्यत् पापतरं महत् ।
प्रमदानां सहस्राणि तव राजन् परिग्रहे ॥ ३० ॥
भव स्वदारनिरतः स्वकुलं रक्ष राक्षसान् ।
मानं वृद्धिं च राज्यं च जीवितं चेष्टमात्मनः ॥ ३१ ॥
|
राजन ! परस्त्रीच्या संसर्गाहून जास्त मोठे दुसरे कुठलेही महान पाप नाही. तुमच्या अंतःपुरात हजारो युवती स्त्रिया आहेत त्या आपल्या स्त्रियांच्या ठिकाणी अनुराग ठेवा. आपल्या कुळाचे रक्षण करा. राक्षसांचे प्राण वाचवा तसेच आपला मान, प्रतिष्ठा, उन्नति, राज्य आणि प्रिय जीवन नष्ट होऊ देऊ नका. ॥३०-३१॥
|
कलत्राणि च सौम्यानि मित्रवर्गं तथैव च ।
यदीच्छसि चिरं भोक्तुं मा कृथा राम विप्रियम् ॥ ३२ ॥
|
जर तुम्ही आपल्या सुंदर स्त्रिया तसेच मित्रांचे सुख अधिक काळपर्यंत भोगू इच्छित असाल तर मग तुम्ही श्रीरामांचा अपराध करू नका. ॥३२॥
|
निवार्यमाणः सुहृदा मया भृशं
प्रसह्य सीतां यदि धर्षयिष्यसि ।
गमिष्यसि क्षीणबलः सबान्धवो
यमक्षयं रामशरास्तजीवितः ॥ ३३ ॥
|
मी तुमचा हितैषी सुहृद आहे. जर मी वारंवार मना करूनही तुम्ही हट्टाने सीतेचे अपहरण कराल तर तुमची सर्व सेना नष्ट होऊन जाईल आणि तुम्ही श्रीरामांच्या बाणांनी आपले प्राण गमावून बंधु-बांधवांसह यमलोकाची यात्रा कराल. ॥३३॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे अष्टात्रिंशः सर्गः ॥ ३८ ॥
|
या प्रकारे श्रीवल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा अडतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३८॥
|