भरतस्य सम्पत्या श्रीरामस्य राजसूय यज्ञकरणविषयक विचारतो विनिवृत्तिः -
|
भरतांच्या सांगण्यावरून श्रीरामांनी राजसूय यज्ञ करण्याच्या विचारापासून निवृत्त होणे -
|
तच्छ्रुत्वा भाषितं तस्य रामस्याक्लिष्ट कर्मणः । द्वाःस्थः कुमारावाहूय राघवाय न्यवेदयत् ॥ १ ॥
|
क्लेशरहित कर्मे करणार्या श्रीरामांचे हे कथन ऐकून द्वारपालाने कुमार भरत आणि लक्ष्मणांना बोलावून आणून राघवांच्या सेवेमध्ये उपस्थित केले. ॥१॥
|
दृष्ट्वा तु राघवः प्राप्तौ उभौ भरतलक्ष्मणौ । परिष्वज्य तदा रामो वाक्यमेतदुवाच ह ॥ २ ॥
|
भरत आणि लक्ष्मणास आलेले पाहून राघवांनी त्यांना हृदयाशी धरले आणि हे वाक्य बोलले - ॥२॥
|
कृतं मया यथा तथ्यं द्विजकार्यं अनुत्तमम् । धर्मसेतुमथो भूयः कर्तुमिच्छामि राघवौ ॥ ३ ॥
|
रघुवंशी राजकुमारांनो ! (राघवांनो !) मी ब्राह्मणाचे ते परम उत्तम कार्य यथावत रूपाने सिद्ध केले आहे. आता मी पुन्हा राजधर्माची चरम सीमारूप राजसूय यज्ञाचे अनुष्ठान करू इच्छितो. ॥३॥
|
अक्षय्यश्चाव्ययश्चैव धर्मसेतुर्मतो मम । धर्मप्रवचनं चैव सर्वपापप्रणाशनम् ॥ ४ ॥
|
माझ्या मते धर्मसेतू (राजसूय) अक्षय आणि अविनाशी फळ देणारा आहे तसेच तो धर्माचा पोषक आणि समस्त पापांचा नाश करणारा आहे. ॥४॥
|
युवाभ्यां आत्मभूताभ्यां राजसूयं अनुत्तमम् । सहितो यष्टुमिच्छामि तत्र धर्मो हि शाश्वतः ॥ ५ ॥
|
तुम्ही दोघे माझा आत्माच आहात म्हणून माझी इच्छा तुमच्या बरोबरच हे उत्तम राजसूय यज्ञाचे अनुष्ठान करण्याची आहे कारण की त्यात राजाचा शाश्वत धर्म प्रतिष्ठित आहे. ॥५॥
|
इष्ट्वा तु राजसूयेन मित्रः शत्रुनिबर्हणः । सुहुतेन सुयज्ञेन वरुणत्वमुपागमत् ॥ ६ ॥
|
शत्रूंचा संहार करणार्या मित्रदेवतेने उत्तम आहुतिने युक्त राजसूय नामक श्रेष्ठ यज्ञद्वारा परमात्म्याचे यजन करून वरुणाचे पद प्राप्त केले होते. ॥६॥
|
सोमश्च राजसूयेन इष्ट्वा धर्मेण धर्मवित् । प्राप्तश्च सर्वलोकेषु कीर्तिस्थानं च शाश्वतम् ॥ ७ ॥
|
धर्मज्ञ सोम देवतेने धर्मपूर्वक राजसूय-यज्ञाचे अनुष्ठान करून संपूर्ण लोकांमध्ये कीर्ति तसेच शाश्वत स्थानाची प्राप्ती केली होती. ॥७॥
|
अस्मिन्नहनि यच्छ्रेयः चिन्त्यतां तन्मया सह । हितं चायतियुक्तं च प्रयतौ वक्तुमर्हथः ॥ ८ ॥
|
म्हणून आजचा दिवस तुम्ही माझ्या बरोबर बसूनही हा विचार करा की आपल्यासाठी कोणते कर्म लोक आणि परलोकात कल्याणकारी होईल तसेच संयतचित्त होऊन तुम्ही दोघे या विषयात मला सल्ला द्यावा. ॥८॥
|
श्रुत्वा तु राघवस्यैतद् वाक्यं वाक्यविशारदः । भरतः प्राञ्जलिर्भूत्वा वाक्यमेतदुवाच ह ॥ ९ ॥
|
राघवांचे हे वचन ऐकून वाक्यविशारद भरतांनी हात जोडून म्हटले - ॥९॥
|
त्वयि धर्मः परः साधो त्वयि सर्वा वसुन्धरा । प्रतिष्ठिता महाबाहो यशश्चामितविक्रम ॥ १० ॥
|
साधो ! अमित पराक्रमी महाबाहो ! आपल्या ठिकाणी उत्तम धर्म प्रतिष्ठित आहे. ही सारी पृथ्वीही आपल्यावरच आधारित आहे तसेच आपल्यामध्येच यशाची प्रतिष्ठा आहे. ॥१०॥
|
महीपालाश्च सर्वे त्वां प्रजापतिमिवामराः । निरीक्षन्ते महात्मानं लोकानाथं यथा वयम् ॥ ११ ॥
|
देवता ज्याप्रमाणे प्रजापति ब्रह्मदेवानांच महात्मा आणि लोकनाथ समजतात, त्याच प्रकारे आम्ही आणि समस्त भूपाल आपल्यालाच महापुरुष तसेच समस्त लोकांचे स्वामी मानतो - या दृष्टिनेच आपल्याकडे पहातो. ॥११॥
|
पुत्राश्च पितृवद् राजन् पश्यन्ति त्वां महाबल । पृथिव्या गतिभूतोऽसि प्राणिनामपि राघव ॥ १२ ॥
|
राजन् ! महाबली राघवा ! पुत्र जसे पित्यास पहातो त्याच प्रकारे आपल्या प्रति सर्व राजेलोकांचा भाव आहे. आपणच समस्त पृथ्वी आणि संपूर्ण प्राण्यांचाही आश्रय आहात. ॥१२॥
|
स त्वमेवंविधं यज्ञं आहर्तासि कथं नृप । पृथिव्यां राजवंशानां विनाशो यत्र दृश्यते ॥ १३ ॥
|
नरेश्वरा ! मग आपण असा यज्ञ कसा करू शकाल, ज्यात भूमण्डलाच्या समस्त राजवंशांचा विनाश दिसून येत आहे. ॥१३॥
|
पृथिव्यां ये च पुरुषा राजन् पौरुषमागताः । सर्वेषां भविता तत्र संक्षयः सर्वकोपजः ॥ १४ ॥
|
राजन् ! पृथ्वीवर जे पुरुषार्थी पुरुष आहेत, त्या सर्वांचा सर्वांच्या कोपाने त्या यज्ञात संहार होऊन जाईल. ॥१४॥
|
सर्वं पुरुषशार्दूल गुणैरतुलविक्रम । पृथिवीं नार्हसे हन्तुं वशे हि तव वर्तते ॥ १५ ॥
|
पुरुषसिंह ! अतुल पराक्रमी वीरा ! आपल्या सद्गुणांच्या मुळे सारे जगत आपणास वश आहे. आपल्यासाठी या भूतलावरील निवासी लोकांचा विनाश करणे उचित होणार नाही. ॥१५॥
|
भरतस्य तु तद् वाक्यं श्रुत्वाऽमृतमयं तदा । प्रहर्षमतुलं लेभे रामः सत्यपराक्रमः ॥ १६ ॥
|
भरताचे हे अमृतमय वचन ऐकून सत्यपराक्रमी श्रीरामांना अनुपम हर्ष प्राप्त झाला. ॥१६॥
|
उवाच च शुभं वाक्यं कैकेय्यानन्दवर्धनम् । प्रीतोऽस्मि परितुष्टोऽस्मि तवाद्य वचनेऽनघ ॥ १७ ॥
|
ते कैकेयीनंदन भरतास हे शुभवचन बोलले - निष्पाप भरता ! आज तुझे वचन ऐकून मी खूप प्रसन्न आणि संतुष्ट झालो आहे. ॥१७॥
|
इदं वचनमक्लीबं त्वया धर्मसमागतम् । व्याहृतं पुरुषव्याघ्र पृथिव्याः परिपालनम् ॥ १८ ॥
|
पुरुषसिंह ! तुझ्या मुखातून निघालेले हे उदार आणि धर्मसंमत वचन सर्व पृथ्वीचे रक्षण करणारे आहे. ॥१८॥
|
एष्यदस्मद् अभिप्रायाद् राजसूयात् क्रतूत्तमात् । निवर्तयामि धर्मज्ञ तव सुव्याहृतेन च ॥ १९ ॥
|
धर्मज्ञा ! माझ्या हृदयात राजसूय यज्ञाचा संकल्प उठत होता परंतु आज तुझ्या या सुंदर भाषणाला ऐकून मी त्या उत्तम यज्ञाकडून आपल्या मनाला हटवीत आहे. ॥१९॥
|
लोकपीडाकरं कर्म न कर्तव्यं विचक्षणैः । बालानां तु शुभं वाक्यं ग्राह्य लक्ष्मणपूर्वज । तस्मात् शृणोमि ते वाक्यं साधु युक्तं महामते ॥ २० ॥
|
लक्ष्मणाच्या मोठ्या भावा ! बुद्धिमान् पुरुषाने ज्या कर्माने संपूर्ण जगताला पीडा होईल असे कर्म करता कामा नये. बालकांनी सांगितलेली गोष्ट ही जर चांगली असेल तर ती ग्रहण करणेच उचित आहे. म्हणून महाबली वीरा ! मी तुझे उत्तम तसेच युक्तिसंगत वाक्य अत्यंत लक्षपूर्वक ऐकले आहे. ॥२०॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे त्र्यशीतितमः सर्गः ॥ ८३ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा त्र्याऐंशिवा सर्ग पूरा झाला. ॥८३॥
|