श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ षट्चत्वारिंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामलक्ष्मणौ विसंज्ञौ दृष्ट्‍वा इंद्रजितो हर्षोद्‌गारो, विभीषणेन सुग्रीवस्य प्रबोधनं, इंद्रजिता लङ्‌कां गत्वा पितरं प्रति शत्रुवधवृत्तांतस्य श्रावणं, प्रसन्नेन रावणेन स्वपुत्रस्य अभिनंदनम् - श्रीराम आणि लक्ष्मणांना मूर्छित पाहून वानरांचा शोक, इंद्रजिताचा हर्षोद्‌गार, विभीषणाने सुग्रीवास समजावणे, इंद्रजिताने लंकेत जाऊन पित्याला शत्रुवधाचा वृत्तांत सांगणे आणि प्रसन्न झालेल्या रावणाच्या द्वारा आपल्या पुत्राचे अभिनंदन -
ततो द्यां पृथिवीं चैव वीक्षमाणा वनौकसः ।
ददृशुः संततौ बाणैः भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १ ॥
त्यानंतर जेव्हा उपर्युक्त दहा वानर पृथ्वी आणि आकाशात शोध घेऊन परत आले, तेव्हा त्यांनी दोघे भाऊ रामलक्ष्मण यांना बाणांनी विंधलेले पाहिले. ॥१॥
वृष्ट्‍वेवोपरते देवे कृतकर्मणि राक्षसे ।
आजगामाथ तं देशं ससुग्रीवो विभीषणः ॥ २ ॥
जसे वृष्टि करून देवराज इंद्र शांत झाला असावा त्याप्रकारे तो राक्षस इंद्रजित जेव्हा आपले काम साधून बाणवृष्टि करण्यापासून विरत झाला, तेव्हा सुग्रीवासह विभीषणही त्या स्थानावर आले. ॥२॥
नीलद्विविदमैन्दाश्च सुषेणकुमुदोङ्‌गदः ।
तूर्णं हनुमता सार्धं अन्वशोचन्त राघवौ ॥ ३ ॥
हनुमानाबरोबर नील, द्विविद, मैंद, सुषेण, कुमुद आणि अंगदही तात्काळ (दोन्ही) राघवांसाठी शोक करू लागले. ॥३॥
अचेष्टौ मन्दनिःश्वासौ शोणितेन परिप्लुतौ ।
शरजालाचितौ स्तब्धौ शयानौ शरतल्पगौ ॥ ४ ॥
त्यासमयी ते दोघे भाऊ रक्ताने चिंब होऊन बाणशय्येवर पडलेले होते. बाणांनी त्यांचे सारे शरीर व्याप्त झाले होते. ते निश्चल होऊन मंद मंद श्वास घेत होते. त्यांची सर्व हालचाल बंद पडली होती. ॥४॥
निश्वसन्तौ यथा सर्पौ निश्चेष्टौ मन्दविक्रमौ ।
रुधिरस्रावदिग्धाङ्‌गौ तपनीयाविव ध्वजौ ॥ ५ ॥
सर्पांप्रमाणे श्वास खेचणार्‍या आणि निश्चेष्ट पडलेल्या त्या दोन्ही भावांचा पराक्रम मंद झाला होता. सर्व शरीरांतून रक्त वाहिल्याने ते रक्तात भिजून गेले होते. तुटून पडलेल्या दोन सुवर्णमय ध्वजांसमान ते दोघे दिसत होते. ॥५॥
तौ वीरशयने वीरौ शयानौ मन्दचेष्टितौ ।
यूथपैः स्वैः परिवृतौ बाष्पव्याकुललोचनैः ॥ ६ ॥
वीरशय्येवर झोपलेले, मंद हालचाल झालेले ते दोन्ही वीर अश्रू भरलेल्या नेत्रांच्या आपल्या यूथपतिनी घेरले गेले होते. ॥६॥
राघवौ पतितौ दृष्ट्‍वा शरजालसमन्वितौ ।
बभूवुर्व्यथिताः सर्वे वानराः सविभीषणाः ॥ ७ ॥
बाणांच्या जाळ्यांनी आवृत्त होऊन पृथ्वीवर पडलेल्या त्या दोन रघुवंशी बंधुंना पाहून विभीषणासहित सर्व वानर व्यथित होऊन गेले. ॥७॥
अन्तरिक्षं निरीक्षन्तो दिशः सर्वाश्च वानराः ।
न चैनं मायया च्छन्नं ददृशू रावणिं रणे ॥ ८ ॥
संपूर्ण वानरांनी संपूर्ण दिशामध्ये आणि आकाशात वारंवार दृष्टिपात केला पण तरीही मायाच्छन्न रावणकुमार इंद्रजिताला ते रणभूमीत पाहू शकले नाहीत. ॥८॥
त तु मायाप्रतिच्छन्नं माययैव विभीषणः ।
वीक्षमाणो ददर्शाग्रे भ्रातुः पुत्रमवस्थितम् ।
तमप्रतिमकर्माणं अप्रतिद्वन्द्वमाहवे ॥ ९ ॥
तेव्हा विभीषणाने मायेनेच पहावयास आरंभ केला. त्यासमयी त्यांनी मायेने लपलेल्या आपल्या त्या पुतण्याला समोरच उभा असल्याचे पाहिले, ज्याचे कर्म अनुपम होते आणि युद्धस्थळी ज्याचा सामना करणारा कोणीही योद्धा नव्हता. ॥९॥
ददर्शान्तर्हितं वीरं वरदानाद् विभीषणः ।
तेजसा यशसा चैव विक्रमेण च संयुतः ॥ १० ॥
तेज, यश आणि पराक्रमाने युक्त विभीषणाने मायेच्या द्वारेच वरदानाच्या प्रभावाने अंतर्धान झालेल्या वीर इंद्रजिताला पाहिले. ॥१०॥
इन्द्रजित् त्वात्मनः कर्म तौ शयानौ समीक्ष्य च ।
उवाच परमप्रीतो हर्षयन् सर्व राक्षसान् ॥ ११ ॥
श्रीराम आणि लक्ष्मणांना युद्धभूमीमध्ये झोपलेले पाहून इंद्रजिताला फार प्रसन्नता वाटली. त्याने समस्त राक्षसांचा हर्ष वाढवीत आपल्या पराक्रमाचे वर्णन करण्यास आरंभ केला- ॥११॥
दूषणस्य च हन्तारौ खरस्य च महाबलौ ।
सादितौ मामकैर्बाणैः भ्रातरौ रामलक्ष्णौ ॥ १२ ॥
ते पहा, ज्यांनी खर आणि दूषणांचा वध केला होता, ते दोन्ही भाऊ महाबली राम आणि लक्ष्मण माझ्या बाणांनी मारले गेले आहेत. ॥१२॥
नेमौ मोक्षयितुं शक्यौ एतस्मादिषुबंधनात् ।
सर्वैरपि समागम्य सर्षिसङ्‌घैः सुरासुरैः ॥ १३ ॥
जरी सार्‍या मुनिसमूहांसहित समस्त देवता आणि असुरही जरी आले तरी ते या बाण-बंधनांतून या दोघांची सुटका करू शकणार नाहीत. ॥१३॥
यत्कृते चिन्तयानस्य शोकार्तस्य पितुर्मम ।
अस्पृष्ट्‍वा शयनं गात्रैः स्त्रियामा याति शर्वरी ॥ १४ ॥

कृत्स्नेयं यत्कृते लङ्‌का नदी वर्षास्विवाकुला ।
सोऽयं मूलहरोऽनर्थः सर्वेषां शमितो मया ॥ १५ ॥
ज्यांच्या कारणाने चिंता आणि शोक पीडित होऊन माझ्या पित्याला सारी रात्र शय्येला स्पर्श न करता घालवावी लागली होती; तसेच ज्यांच्यामुळे ही सारी लंका वर्षाकाळच्या नदीप्रमाणे व्याकुळ रहात होती, आम्हा सर्वांचे निर्मूलन करणार्‍या त्या अनर्थाला आज मी शांत केले आहे. ॥१४-१५॥
रामस्य लक्ष्मणस्यैव सर्वेषां च वनौकसाम् ।
विक्रमा निष्फलाः सर्वे यथा शरदि तोयदाः ॥ १६ ॥
जसे शरदऋतुतील सारे ढग पाण्याची वृष्टि न करण्यामुळे व्यर्थ ठरतात, त्याच प्रकारे श्रीराम, लक्ष्मण आणि संपूर्ण वानरांचे सर्व बळ-विक्रम निष्फळ होऊन गेले आहेत. ॥१६॥
एवमुक्त्वा तु तान् सर्वान् राक्षसान् परिपश्यतः ।
यूथपानपि तान् सर्वान् ताडयत् स च रावणिः ॥ १७ ॥
आपल्याकडे बघणार्‍या त्या सर्व राक्षसांना असे सांगून रावणकुमार इंद्रजिताने वानरांच्या त्या समस्त सुप्रसिद्ध यूथपतिंना मारण्यास आरंभ केला. ॥१७॥
नीलं नवभिराहत्य मैन्दं च द्विविदं तथा ।
त्रिभिस्त्रिभिरमित्रघ्नः तताप परमेषुभिः ॥ १८ ॥
त्या शत्रुसूदन निशाचराने नीलाला नऊ बाणांनी घायाळ करून मैंद आणि द्विविद यांना तीन-तीन उत्तम सायकांच्या द्वारे मारून संतप्त करून टाकले. ॥१८॥
जांबवन्तं महेष्वासो विद्ध्वा बाणेन वक्षसि ।
हनूमतो वेगवतो विससर्ज शरान् दश ॥ १९ ॥
महाधनुर्धर इंद्रजिताने जांबवानाच्या छातीमध्ये एका बाणाने खोल जखम करून वेगवान्‌ हनुमानांनाही दहा बाण मारले. ॥१९॥
गवाक्षं शरभं चैव तावप्यमितविक्रमौ ।
द्वाभ्यां द्वाभ्यां महावेगो विव्याध युधि रावणिः ॥ २० ॥
रावणकुमाराचा वेग यावेळी फारच वाढलेला होता. त्याने युद्धस्थळी अमित पराक्रमी गवाक्ष आणि शरभालाही दोन दोन बाण मारून घायाळ करून टाकले. ॥२०॥
गोलाङ्‌गूलेश्वरं चैव वालिपुत्रमथाङ्‌गदम् ।
विव्याध बहुभिर्बाणैः त्वरमाणोऽथ रावणिः ॥ २१ ॥
त्यानंतर अत्यंत उतावळेपणाने बाण सोडून रावणकुमार इंद्रजिताने पुन्हा बहुसंख्य बाणांच्या द्वारे लंगूरांचा राजा गवाक्ष यांस आणि वालिपुत्र अंगदास खोल जखमा केल्या. ॥२१॥
तान् वानरवरान् भित्त्वा शरैरग्निशिखोपमैः ।
ननाद बलवांस्तत्र महासत्त्वः स रावणिः ॥ २२ ॥
याप्रकारे अग्नितुल्य तेजस्वी सायकांनी त्या मुख्य मुख्य वानरांना घायाळ करून महान्‌ धैर्यशाली आणि बलवान्‌ रावणकुमार तेथे जोरजोराने गर्जना करू लागला. ॥२२॥
तानर्दयित्वा बाणौघैः त्रासयित्वा च वानरान् ।
प्रजहास महाबाहुः वचनं चेदमब्रवीत् ॥ २३ ॥
आपल्या बाणसमूहांनी त्या वानरांना पीडित तसेच भयभीत करून महाबाहु इंद्रजित अट्टहास करू लागला आणि याप्रकारे म्हणाला- ॥२३॥
शरबंधेन घोरेण मया बद्धौ चमूमुखे ।
सहितौ भ्रातरावेतौ निशामयत राक्षसाः ॥ २४ ॥
राक्षसांनो ! पहा, मी युद्धाच्या तोंडावरच भयंकर बाणांच्या पाशाने या दोघां भावांना रामलक्ष्मणांना एकाच वेळी बांधून टाकले आहे. ॥२४॥
एवमुक्तास्तु ते सर्वे राक्षसाः कूटयोधिनः ।
परं विस्मयमापन्नाः कर्मणा तेन हर्षिताः ॥ २५ ॥
इंद्रजिताने असे म्हटल्यावर कूट-युद्ध करणारे ते सर्व राक्षस अत्यंत चकित झाले आणि त्याच्या त्या कर्मामुळे त्यांना फार हर्ष ही झाला. ॥२५॥
विनेदुश्च महानादान् सर्वतो जलदोपमाः ।
हतो राम इति ज्ञात्वा रावणिं समपूजयन् ॥ २६ ॥
ते सर्वच्या सर्व मेघांप्रमाणे गंभीर स्वराने सिंहनाद करू लागले तसेच श्रीराम मारले गेले असे समजून त्यांनी रावणकुमाराचे फार अभिनंदनही केले. ॥२६॥
निष्पन्दौ तु तदा दृष्ट्‍वा भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
वसुधायां निरुच्छ्वासौ हतावित्यन्वमन्यत ॥ २७ ॥
इंद्रजितानेही जेव्हा हे पाहिले की श्रीराम आणि लक्ष्मण - दोघे भाऊ पृथ्वीवर निश्चेष्ट पडलेले आहेत तसेच त्यांचा श्वासही चालत नाही आहे, तेव्हा त्या दोघांना तो मेलेलेच समजला. ॥२७॥
हर्षेण तु समाविष्ट इन्द्रजित् समितिञ्जयः ।
प्रविवेश पुरीं लङ्‌कां हर्षयन् सर्वनैर्‌ऋतान् ॥ २८ ॥
यामुळे युद्धविजयी इंद्रजिताला फार हर्ष झाला आणि तो समस्त राक्षसांचा हर्ष वाढवीत लंकापुरीत निघून गेला. ॥२८॥
रामलक्ष्मणयोर्द्दष्ट्‍वा शरीरे सायकैश्चिते ।
सर्वाणि चाङ्‌गोपाङ्‌गानि सुग्रीवं भयमाविशत् ॥ २९ ॥
श्रीराम आणि लक्ष्मणांच्या शरीरांवर तसेच सर्व अंग-उपांगांना बाणांनी व्याप्त पाहून सुग्रीवाच्या मनात भय उत्पन्न झाले. ॥२९॥
तमुवाच परित्रस्तं वानरेन्द्रं विभीषणः ।
सबाष्पवदनं दीनं शोकव्याकुललोचनम् ॥ ३० ॥

अलं त्रासेन सुग्रीव बाष्पवेगो निगृह्यताम् ।
त्यांच्या मुखावर दीनता पसरली, अश्रूंची धार वाहू लागली आणि नेत्र शोकाने व्याकुळ होऊन गेले. त्यासमयी अत्यंत भयभीत झालेल्या वानरराजाला विभीषणाने म्हटले- सुग्रीव ! घाबरू नका. घाबरून काहीही फायदा नाही. अश्रूंचा हा वेग आवरून धरा. ॥३० १/२॥
एवं प्रायाणि युद्धानि विजयो नास्ति नैष्ठिकः ॥ ३१ ॥

सशेषभाग्यतास्माकं यदि वीर भविष्यति ।
मोहमेतौ प्रहास्येते महात्मानौ महाबलौ ॥ ३२ ॥

पर्यवस्थापयात्मानं अनाथं मां च वानर ।
सत्यधर्माभिरक्तानां नास्ति मृत्युकृतं भयम् ॥ ३३ ॥
वीरा ! सर्व युद्धात प्राय: अशी स्थिति होतच असते, त्यात विजय निश्चित असत नाही. जर आपले भाग्य शेष असेल तर हे दोघे महाबली महात्मा अवश्य मूर्छेचा त्याग करतील. वानरराज ! तुम्ही स्वत:ला आणि मला अनाथालाही सांभाळा. जे लोक सत्यधर्मात अनुराग ठेवतात त्यांना मृत्युचे भय असत नाही. ॥३१-३३॥
एवमुक्त्वा ततस्तस्य जलक्लिन्नेन पाणिना ।
सुग्रीवस्य शुभे नेत्रे प्रममार्ज विभिषणः ॥ ३४ ॥
असे म्हणून विभीषणाने जलाने भिजलेल्या हाताने सुग्रीवांचे दोन्ही नेत्र पुसले. ॥३४॥
ततः सलिलमादाय विद्यया परिजप्य च ।
सुग्रीवनेत्रे धर्मात्मा प्रममार्ज विभीषणः ॥ ३५ ॥
तत्पश्चात्‌ हातात जल घेऊन ते मंत्रपूत करून धर्मात्मा विभीषणाने ते सुग्रीवांच्या डोळ्यांना लावले. ॥३५॥
विमृज्य वदनं तस्य कपिराजस्य धीमतः ।
अब्रवीत् कालसंप्राप्तं असंभ्रान्तमिदं वचः ॥ ३६ ॥
नंतर बुद्धिमान्‌ वानरराजाचे भिजलेले मुख पुसून त्यांनी जराही न घाबरता समयोचित गोष्ट सांगितली- ॥३६॥
न कालः कपिराजेन्द्र वैक्लव्यमवलम्बितुम् ।
अतिस्नेहोऽपि कालेऽस्मिन् मरणायोपकल्पते ॥ ३७ ॥
वानरसम्राट ! ही वेळ घाबरून जाण्याची नाही. अशा समयी अधिक स्नेहाचे प्रदर्शनही मरणाचे भय उपस्थित करते. ॥३७॥
तस्मादुत्सृज्य वैक्लव्यं सर्वकार्यविनाशनम् ।
हितं रामपुरोगाणां सैन्यानामनुचिन्तय ॥ ३८ ॥
म्हणून सर्व कामांना बिघडविणारी ही भीती सोडून श्रीराम जिचे स्वामी आहेत, नेते आहेत, त्या सेनांच्या हिताचा विचार करा. ॥३८॥
अथवा रक्ष्यतां रामो यावत् सञ्ज्ञाविपर्ययः ।
लब्धसंज्ञो हि काकुत्स्थौ भयं नौ व्यपनेष्यतः ॥ ३९ ॥
अथवा जोपर्यंत श्रीरामचंद्र सावध होत नाहीत तोपर्यंत यांचे रक्षण केले पाहिजे. शुद्धिवर आल्यावर हे दोघे रघुवंशी वीर आमचे सारे भय दूर करतील. ॥३९॥
नैतत् किंचन रामस्य न च रामो मुमूर्षति ।
न ह्येनं हास्यते लक्ष्मीः दुर्लभा या गतायुषाम् ॥ ४० ॥
श्रीरामांसाठी हे संकट काहीच नाही. हे मरू शकत नाहीत, कारण की ज्यांचे आयुष्य समाप्त होत असते, त्यांच्यासाठी जी दुर्लभ लक्ष्मी (शोभा) आहे; ती यांचा त्याग करत नाही आहे. ॥४०॥
तस्मादाश्वासयात्मानं बलं चाश्वासय स्वकम् ।
यावत् सैन्यानि सर्वाणि पुनः संस्थापयाम्यहम् ॥ ४१ ॥
म्हणून तुम्ही आपल्याला संभाळा आणि आपल्या सेनेला आश्वासन द्या. तोपर्यंत मी या घाबरलेल्या सेनेला धीर देऊन परत सुस्थिर करतो. ॥४१॥
एते हि फुल्लनयनाः त्रासादागतसाध्वसाः ।
कर्णे कर्णे प्रकथिता हरयो हरिसत्तम ॥ ४२ ॥
कपिश्रेष्ठ ! पहा, या वानरांच्या मनात भय उत्पन्न झाले आहे. म्हणून हे डोळे फाडफाडून बघत आहेत आणि आपसात कानगोष्टी करत आहेत. ॥४२॥
मां तु दृष्ट्‍वा प्रधावन्तं अनीकं संप्रहर्षितुम् ।
त्यजन्तु हरयस्त्रासं भुक्तपूर्वामिव स्रजम् ॥ ४३ ॥
म्हणून मी यांना आश्वासन देण्यास जात आहे. मला हर्षपूर्वक इकडे तिकडे धावताना पाहून आणि माझ्याकडून धीर दिला गेल्याने प्रसन्न होतांना जाणून हे सर्व वानर पूर्वी भोगलेल्या ? ? ? ?प्रमाणे आपले सारे भय-शंका यांचा त्याग करतील. ॥४३॥
समाश्वास्य तु सुग्रीवं राक्षसेन्द्रो विभीषणः ।
विद्रुतं वानरानीकं तत् समाश्वासयत् पुनः ॥ ४४ ॥
याप्रकारे सुग्रीवाला आश्वासन देऊन राक्षसराज विभीषणांनी पळून जाण्यास उद्यत झालेल्या वानरसेनेला परत सांत्वना दिली. ॥४४॥
इन्द्रजित्तु महामायः सर्वसैन्यसमावृतः ।
विवेश नगरीं लङ्‌कां पितरं चाभ्युपागमत् ॥ ४५ ॥
इकडे महामायावी इंद्रजित सर्व सेनेसह लंकापुरीत परत आला आणि आपल्या पित्याजवळ आला. ॥४५॥
तत्र रावणमासाद्य अभिवाद्य कृताञ्जलिः ।
आचचक्षे प्रियं पित्रे निहतौ रामलक्ष्मणौ ॥ ४६ ॥
तेथे रावणाजवळ पोहोचून त्याने त्यांना हात जोडून प्रणाम केला आणि रामलक्ष्मण मारले गेल्याचा प्रिय संवाद ऐकविला. ॥४६॥
उत्पपात ततो हृष्टः पुत्रं च परिषस्वजे ।
रावणो रक्षसां मध्ये श्रुत्वा शत्रू निपातितौ ॥ ४७ ॥
राक्षसांमध्ये आपल्या दोन्ही शत्रुंच्या मारले जाण्याचा समाचार ऐकून रावण हर्षाने नाचू लागला आणि त्याने आपल्या पुत्राला हृदयाशी धरले- आलिंगन दिले. ॥४७॥
उपाघ्राय च तं मूर्ध्नि पप्रच्छ प्रीतमानसः ।
पृच्छते च यथावृत्तं पित्रे सर्वं न्यवेदयत् ॥ ४८ ॥

यथा तौ शरबंधेन निश्चेष्टौ निष्प्रभौ कृतौ ॥ ४९ ॥
नंतर त्याचे मस्तक हुंगून त्याने प्रसन्नचित्त होऊन त्या घटनेचे पूर्ण विवरण विचारले. विचारल्यावर इंद्रजिताने पित्याला सारा वृत्तांत जसाच्या तसा निवेदन केला आणि हे सांगितले की कोठल्या प्रकारे बाणांच्या बंधनात बांधून श्रीराम आणि लक्ष्मणांना निश्चेष्ट आणि निस्तेज केले गेले आहे. ॥४८-४९॥
स हर्षवेगानुगतान्तरात्मा
श्रुत्वा गिरं तस्य महारथस्य ।
जहौ ज्वरं दाशरथेः समुत्थं
प्रहृष्यवाचाभिननंद पुत्रम् ॥ ५० ॥
महारथी इंद्रजिताची ती हकीगत ऐकून रावणाचा अंतरात्मा हर्षाच्या उद्रेकाने फुलून गेला. दशरथनंदन श्रीरामांकडून जे त्याला भय आणि चिंता प्राप्त झाली होती, त्यांचा त्याने त्याग केला आणि प्रसन्नपूर्वक वचनांच्या द्वारे आपल्या पुत्राचे अभिनंदन केले. ॥५०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे षट्चत्वारिंशः सर्गः ॥ ४६ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा सेहेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP