शूर्पणखातस्तदीयदुर्दशावृत्तान्तमाकर्ण्य कुपितेन खरेण रामादीनां वधाय चतुर्दशसहस्रराक्षसानां प्रेषणम् -
|
शूर्पणखेच्या मुखाने तिच्या दुर्दशेचा वृत्तांत ऐकून क्रोधाने भडकलेल्या खराने श्रीराम आदिंचा वध करण्यासाठी चौदा राक्षसांना धाडणे -
|
तां तथा पतितां दृष्ट्वा विरूपां शोणितोक्षिताम् ।
भगिनीं क्रोधसन्तप्तः खरः पप्रच्छ राक्षसः ॥ १ ॥
|
आपल्या बहीणीला या प्रकारे अङ्गहीन आणि रक्ताने भिजलेली अशा अवस्थेत पृथ्वीवर पडलेली पाहून राक्षस खर क्रोध संतप्त झाला आणि याप्रकारे विचारू लागला - ॥१॥
|
उत्तिष्ठ तावदाख्याहि प्रमोहं जहि सम्भ्रमम् ।
व्यक्तमाख्याहि केन त्वमेवंरूपा विरूपिता ॥ २ ॥
|
’(बहीणी) ताई, उठ आणि आपली हकिगत सांग. मूर्च्छा आणि भीति सोडून दे, तसेच स्पष्ट स्पष्ट सांग. कुणी तुला या प्रकारे (रूपहीन) कुरूप बनविले आहे ?’ ॥२॥
|
कः कृष्णसर्पमासीनमाशीविषमनागसम् ।
तुदत्यभिसमापन्नमङ्गुल्यग्रेण लीलया ॥ ३ ॥
|
’कोण आपल्या समोर गुपचुप बसलेल्या निरपराध आणि विषारी काळ्या सापाला आपल्या बोटांच्या अग्रभागानी खेळत खेळत पीडा देत आहे ?’ ॥३॥
|
कालपाशं समासज्य कण्ठे मोहान्न बुध्यते ।
यस्त्वामद्य समासाद्य पीतवान् विषमुत्तमम् ॥ ४ ॥
|
’ज्याने आज तुझ्यावर आक्रमण करून तुझे नाक- कान कापले आहेत त्याने उच्चकोटीचे विष प्यायले आहे तसेच त्याने आपल्या गळ्यात काळाचा फास घालून घेतला आहे आणि तरीही मोहवश तो ही गोष्ट समजत नाही आहे.’ ॥४॥
|
बलविक्रमसम्पन्ना कामगा कामरूपिणी ।
इमामवस्थां नीता त्वं केनान्तकसमागता ॥ ५ ॥
|
’तू तर स्वतः ही दुसर्या प्राण्यांसाठी यमराजा प्रमाणे आहेस, बल आणि पराक्रमानी संपन्न आहेस तसेच इच्छेनुसार सर्वत्र विचरण करण्यास आणि आपल्या आवडी प्रमाणे रूप धारण करण्यास समर्थ आहेस, तरी ही तुला कोणी य दुरवस्थेत घातले आहे की ज्यामुळे दुःखी होऊन तू येथे आली आहेस ?’ ॥५॥
|
देवगन्धर्वभूतानामृषीणां च महात्मनाम् ।
कोऽयमेवं महावीर्यस्त्वां विरूपां चकार ह ॥ ६ ॥
|
’देवता, गंधर्व, भूते तथा महात्मा ऋषिंच्या मध्ये हा कोण असा महान बलशाली आहे ज्यानें तुला रूपहीन बनवून टाकले ?’ ॥६॥
|
नहि पश्याम्यहं लोके यः कुर्यान्मम विप्रियम् ।
अमरेषु सहस्राक्षं महेन्द्रं पाकशासनम् ॥ ७ ॥
|
’संसारात तर मला असा कुणी दिसून येत नाही की जो माझे अप्रिय करू शकेल ? देवतांच्या मध्ये ही सहस्त्रनेत्रधारी पाकशासन इंद्र ही असे साहस करू शकेल असे मला दिसून येत नाही.’ ॥७॥
|
अद्याहं मार्गणैः प्राणानादास्ये जीवितान्तकैः ।
सलिले क्षीरमासक्तं निष्पिबन्निव सारसः ॥ ८ ॥
|
’ज्याप्रमाणे हंस पाण्यात मिसळलेले दूध पिऊन टाकतो त्याप्रमाणे मी आज या प्राणांतकारी बाणांनी तुझा अपराध करणार्याच्या शरीरातून त्याचे प्राण काढून घेईन.’ ॥८॥
|
निहतस्य मया सङ्ख्ये शरसङ्कृत्तमर्मणः ।
सफेनं रुधिरं कस्य मेदिनी पातुमिच्छति ॥ ९ ॥
|
’युद्धात माझ्या बाणांनी ज्याचे मर्मस्थल छिन्न-भिन्न होऊन गेले आहे तसेच जो माझ्या हातून मारला गेला आहे अशा कुठल्या पुरुषाचे फेसासहित गरम-गरम रक्त ही पृथ्वी पिऊ इच्छित आहे ?’ ॥९॥
|
कस्य पत्ररथाः कायान् मांसमुत्कृत्य सङ्गताः ।
प्रहृष्टा भक्षयिष्यन्ति निहस्य मया रणे ॥ १० ॥
|
’रणभूमित माझ्या द्वारे मारल्या गेलेल्या कुठल्या व्यक्तीच्या शरीराचे मांस कुरतडून कुरतडून हे हर्षाने भरलेले झुंडीच्या झुंडी पक्षी खातील ?’ ॥१०॥
|
तं न देवा न गन्धर्वा न पिशाचा न राक्षसाः ।
मयापकृष्टं कृपणं शक्तास्त्रातुं महाहवे ॥ ११ ॥
|
’ज्याला मी महासमरात खेंचून आणीन, त्या दीन अपराध्याचे देवता, गंधर्व, पिशाच आणि राक्षसही प्राण वाचवू शकत नाहीत.’ ॥११॥
|
उपलभ्य शनैः सञ्ज्ञां तं मे शंसितुमर्हसि ।
येन त्वं दुर्विनीतेन वने विक्रम्य निर्जिता ॥ १२ ॥
|
’हळू हळू शुद्धिवर येऊन तू मला त्याचे नाव सांग ज्या उद्दण्डाने वनात तुझ्यावर बलपूर्वक आक्रमण करून तुला परास्त केले आहे.’ ॥१२॥
|
इति भ्रातुर्वचः श्रुत्वा क्रुद्धस्य च विशेषतः ।
ततः शूर्पणखा वाक्यं सबाष्पमिदमब्रवीत् ॥ १३ ॥
|
भावाचे विशेषतः क्रोधाने संतप्त झालेल्या भाऊ खराचे हे वचन ऐकून शूर्पणखा नेत्रातून अश्रू ढाळीत या प्रकारे बोलली- ॥१३॥
|
तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥ १४ ॥
|
’बंधो ! वनात दोन तरूण पुरुष आले आहेत जे दिसण्यात अत्यंतच सुकुमार, रूपवान आणि महान बलवान आहेत. त्या दोघांचे मोठमोठे नेत्र जणु काय फुललेल्या कमळाप्रमाणे वाटत आहेत. ते दोघेही वल्कल वस्त्रे आणि मृगचर्म नेसलेले आहेत.’ ॥१४॥
|
फलमूलाशनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यास्तां भ्रातारौ रामलक्ष्मणौ ॥ १५ ॥
|
’फळ आणि मूल हेच त्यांचे भोजन आहे. ते जितेन्द्रिय, तपस्वी आणि ब्रह्मचारी आहेत. दोघे ही राजा दशरथांचे पुत्र आणि परस्परांचे भाऊ आहेत. त्यांची नावे राम आणि लक्ष्मण आहेत.’ ॥१५॥
|
गन्धर्वराजप्रतिमौ पार्थिवव्यञ्जनान्वितौ ।
देवौ वा दानवावेतौ न तर्कयितुमुत्सहे ॥ १६ ॥
|
’ते दोघेही गंधर्व राजा प्रमाणे भासत आहेत; आणि राजोचित लक्षणांनी संपन्न आहेत. हे दोन्ही भाऊ देवता अथवा दानव आहेत हे मी अनुमानाने ही जाणू शकत नाही.’ ॥१६॥
|
तरुणी रूपसम्पन्ना सर्वाभरणभूषिता ।
दृष्टा तत्र मया नारी तयोर्मध्ये सुमध्यमा ॥ १७ ॥
|
’त्या दोघांच्या मध्ये एक तरूण अवस्था असणारी रूपवती स्त्री ही तेथे पाहिली आहे, जिच्या शरीराचा मध्यभाग फारच सुंदर आहे. ती सर्वप्रकारच्या आभूषणांनी विभूषित आहे.’ ॥१७॥
|
ताभ्यामुभाभ्यां सम्भूय प्रमदामधिकृत्य ताम् ।
इमामवस्थां नीताहं यथानाथासती तथा ॥ १८ ॥
|
’त्या स्त्रीच्या मुळेच त्या दोघांनी मिळून माझी एका अनाथ आणि कुलटा स्त्री प्रमाणे अशी दुर्गती केली आहे.’ ॥१८॥
|
तस्याश्चानृजुवृत्तायास्तयोश्च हतयोरहम् ।
सफेनं पातुमिच्छामि रुधिरं रणमूर्धनि ॥ १९ ॥
|
’मी युद्धात त्या कुटील आचरणाच्या स्त्रीचे आणि त्या दोन्ही राजकुमारांचे ही ते मारले गेल्यावर फेसासहित रक्त पिऊ इच्छिते.’ ॥१९॥
|
एष मे प्रथमः कामः कृतस्तत्र त्वया भवेत् ।
तस्यास्तयोश्च रुधिरं पिबेयमहमाहवे ॥ २० ॥
|
’रणभूमीमध्ये त्या स्त्रीचे आणि त्या पुरुषांचे ही रक्त मी पिऊ शकेन - ही माझी सर्वप्रथम आणि प्रमुख इच्छा आहे, जी तुझ्याकडूनच मी पूर्ण केली गेली पाहिजे.’ ॥२०॥
|
इति तस्यां ब्रुवाणायां चतुर्दश महाबलान् ।
व्यादिदेश खरः क्रुद्धो राक्षसानन्तकोपमान् ॥ २१ ॥
|
शूर्पणखेने असे म्हटल्यावर खराने कुपित होऊन अत्यंत बलवान चौदा राक्षसांना, जे यमराजासमान भयंकर होते, हा आदेश दिला- ॥२१॥
|
मानुषौ शस्त्रसम्पन्नौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ।
प्रविष्टौ दण्डकारण्यं घोरं प्रमदया सह ॥ २२ ॥
|
’वीरांनो ! या भयंकर दण्डकारण्या मध्ये चीर आणि काळे मृगचर्म धारण केलेले दोन शस्त्रधारी मानव (मनुष्य) एका युवती स्त्रीसह घुसून आलेले आहेत.’ ॥२२॥
|
तौ हत्वा तां च दुर्वृत्तामुपावर्तितुमर्हथ ।
इयं च भगिनी तेषां रुधिरं मम पास्यति ॥ २३ ॥
|
’तुम्ही लोक तेथे जाऊन प्रथम त्या दोन्ही पुरुषांना मारून टाका आणि नंतर त्या दुराचारिणी स्त्रीचे प्राण घ्या. माझी ही बहीण त्या तिघांचे रक्त पिईल.’ ॥२३॥
|
मनोरथोऽयमिष्टोऽस्या भगिन्या मम राक्षसाः ।
शीघ्रं सम्पाद्यतां गत्वा तौ प्रमथ्य स्वतेजसा ॥ २४ ॥
|
’राक्षसांनो ! माझ्या या बहीणीचा हा प्रिय मनोरथ आहे. तुम्ही तेथे जाऊन आपल्या प्रभावाने त्या दोन्ही मनुष्यांना ठार मारून टाका आणि बहीणीचा हा मनोरथ शीघ्र पूरा करा.’ ॥२४॥
|
युष्माभिर्निहतौ दृष्ट्वा तावुभौ भ्रातरौ रणे ।
इयं प्रहृष्टा मुदिता रुधिरं युधि पास्यति ॥ २५ ॥
|
’रणभूमीमध्ये त्या दोन्ही भावांना तुमच्या द्वारा मारले गेलेले पाहून ती हर्षाने प्रफुल्लित होईल आणि आनंदमग्न होऊन युद्धस्थलावर त्यांचे रक्तपान करील.’ ॥२५॥
|
इति प्रतिसमादिष्टा राक्षसास्ते चतुर्दश ।
तत्र जग्मुस्तया सार्धं घना वातेरिता इव ॥ २६ ॥
|
खराची अशी आज्ञा मिळताच ते चौदा राक्षस हवेने उडविलेल्या मेघां प्रमाणे विवश होऊन शूर्पणखेसह पंचवटीत गेले. ॥२६॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे एकोनविंशः सर्गः ॥ १९ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्ष रामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा एकोणीसावा सर्ग पूरा झाला. ॥१९॥
|