विभिन्ना दिशः प्रति गच्छतां वानराणां सुग्रीवसमक्षे स्वीयसोत्साहवचसां श्रावणम् -
|
विभिन्न दिशांमध्ये जाणार्या वानरांनी सुग्रीवांसमक्ष आपली उत्साह सूचक वचने ऐकविणे -
|
सर्वांश्चाहूय सुग्रीवः प्लवगान् प्लवगर्षभः । समस्तानब्रवीद् राजा रामकार्यार्थसिद्धये ॥ १ ॥
|
त्यानंतर वानरश्रेष्ठ राजा सुग्रीवांनी अन्य समस्त वानरांना बोलावून रामकार्याच्या सिद्धिसाठी त्या सर्वांना म्हटले- ॥१॥
|
एवमेतद् विचेतव्यं भवद्भिः वानरोत्तमैः । तदुग्रशासनं भर्तुः विज्ञाय हरिपुंगवाः ॥ २ ॥ शलभा इव संछाद्य मेदिनीं संप्रतस्थिरे ।
|
’कपिवरांनो ! जसे मी सांगितले आहे त्यास अनुसरून तुम्ही सर्व श्रेष्ठ वानरांनी या जगतात सीतेचा शोध केला पाहिजे. स्वामींची ती कठोर आज्ञा उत्तम प्रकारे जाणून घेऊन ते संपूर्ण श्रेष्ठ वानर टोळांच्या दलाप्रमाणे पृथ्वीला आच्छादित करून तेथून प्रस्थित झाले. ॥२ १/२॥
|
रामः प्रस्रवणे तस्मिन् न्यवसत्सहलक्ष्मणः ॥ ३ ॥ प्रतीक्षमाणस्तं मासं यः सीताधिगमने कृतः ।
|
श्रीराम लक्ष्मणासहित त्या प्रस्त्रवण गिरिवरच थांबले आणि सीतेचा समाचार आणण्यासाठी जो एक महिन्याचा अवधि निश्चित केला गेला होता, त्याची प्रतीक्षा करू लागले. ॥३ १/२॥
|
उत्तरां तु दिशं रम्यां गिरिराजसमावृताम् ॥ ४ ॥ प्रतस्थे सहसा वीरो हरिः शतबलिस्तदा ।
|
त्या समयी वीर वानर शतबलिने गिरिराज हिमालयाने घेरलेल्या रमणीय उत्तर दिशेकडे शीघ्रतापूर्वक प्रस्थान केले. ॥४ १/२॥
|
पूर्वां दिशं प्रतिययौ विनतो हरियूथपः ॥ ५ ॥ ताराङ्गेदादिसहितः प्लवगो पवनात्मजः । अगस्त्यचरितामाशां दक्षिणां हरियूपथः ॥ ६ ॥ पश्चिमां तु दिशं घोरां सुषेणः प्लवगेश्वरः । प्रतस्थे हरिशार्दूलो दिशं वरुणपालिताम् ॥ ७ ॥
|
वानर यूथपति विनत पूर्व दिशेकडे गेले. कपिगणांचे अधिपती पवनकुमार हनुमान्, तार आणि अंगद आदिंच्यासह अगस्त्यसेवित दक्षिण दिशेकडे प्रस्थित झाले तसेच वानरेश्वर कपिश्रेष्ठ सुषेणानी वरुण द्वारा सुरक्षित घोर पश्चिम दिशेची यात्रा केली. ॥५-७॥
|
ततः सर्वा दिशो राजा चोदयित्वा यथा तथम् । कपिसेनापतिर्वीरो मुमोद सुखितः सुखम् ॥ ८ ॥
|
वानर सेनेचे स्वामी वीर राजा सुग्रीव संपूर्ण दिशामध्ये यथायोग्य वानरांना धाडून फार सुखी झाले आणि मनातल्या मनात हर्षाचा अनुभव करू लागले. ॥८॥
|
एवं संचोदिताः सर्वे राज्ञा वानरयूथपाः । स्वां स्वां दिशमभिप्रेत्य त्वरिताः संप्रतस्थिरे ॥ ९ ॥
|
याप्रकारे राजाची आज्ञा मिळून समस्त वानर यूथपति मोठ्या उतावळेपणाने आपापल्या दिशेकडे प्रस्थित झाले. ॥९॥
|
नदंतश्चोन्नदंतश्च गर्जंतश्च प्लवंगमाः । क्ष्वेलंतो धावमानाश्च विनदंतो महाबलाः ॥ १० ॥
एवं संचोदिताः सर्वे राज्ञा वानरयूथपाः । आनयिष्यामहे सीतां हनिष्यामश्च रावणम् ॥ ११ ॥ अहमेको वधिष्यामि प्राप्तं रावणमाहवे । ततश्चोन्मथ्य सहसा हरिष्ये जनकात्मजाम् ॥ १२ ॥ वेपमानां श्रमेणाद्य भवद्भिः स्थीयतामिति । एक एवाहरिष्यामि पातालादपि जानकीम् ॥ १३ ॥ विधमिष्याम्यहं वृक्षान् पातयिष्याम्यहं गिरीन् । धरणीं दारयिष्यामि क्षोभयिष्यामि सागरान् ॥ १४ ॥ अहं योजनसंख्यायाः प्लविता नात्र संशयः । शतं योजनसंख्यायाः शतं समधिकं ह्यहम् ॥ १५ ॥ भूतले सागरे वापि शैलेषु च वनेषु च । पातालस्यापि वा मध्ये न ममाच्छिद्यते गतिः ॥ १६ ॥
|
ते समस्त महाबली वानर आणि त्यांचे यूथपति आपल्या राजाच्या द्वारा या प्रकारे प्रेरित होऊन उच्च स्वरात निरनिराळ्या प्रकारचे शब्द करीत गर्जत, आरोळ्या ठोकत, किलकारी मारत, धावत आणि कोलाहल करीत म्हणू लागले- ’राजन ! आम्ही सीतेला बरोबर आणू आणि रावणाचा वध करून टाकू. युद्धात जर रावण माझ्या समोर आला तर मी एकटाच त्याला मारून टाकीन. तत्पश्चात् त्याच्या सार्या सेनेला पळवून, भयंकर कष्ट आणि भयाने थरथर कापत असलेल्या जानकीला एकाएकी येथे उचलून आणीन. आपण लोक येथेच थांबा. मी एकटाच पाताळातूनही जनक किशोरीला बाहेर घेऊन येईन. वृक्षांना उखडून टाकीन, पर्वतांचे तुकडे तुकडे करीन, पृथ्वीला विदीर्ण करून टाकीन आणि समुद्रांनाही विक्षुब्ध करून टाकीन. मी शंभर योजनापर्यंत उडी मारू शकतो यात संशय नाही. मी शंभर योजनपेक्षा अधिक अधिक दूरही जाऊ शकतो. पृथ्वी, समुद्र आणि पर्वत, वने आणि पाताळातही माझी गती थांबत नाही.’ ॥१०-१६॥
|
इत्येकैकं तदा तत्र वानरा बलदर्पिताः । ऊचुश्च वचनं तस्य हरिराजस्य संनिधौ ॥ १७ ॥
|
याप्रकारे तेथे वानरराज सुग्रीवाच्या समीप बळाच्या घमेंडीत भरलेले वानर त्या समयी एकेक करून येत होते आणि त्यांच्या समोर उपर्युक्त गोष्टी बोलत होते. ॥१७॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे पञ्चचत्वारिंशः सर्गः ॥ ४५ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा पंचेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४५॥
|