शिवपुराण माहात्म्य

( १ ) विद्येश्वर संहिता

( २ ) रुद्रसंहितांतर्गत

( २.१ ) सृष्टीखण्ड

( २.२ ) सतीखण्ड

( २.३ ) पार्वतीखण्ड

( २.४ ) कुमारखण्ड

( २.५ ) युद्धकाण्ड

( ३ ) शतरुद्रसंहिता

( ४ ) कोटिरुद्रसंहिता

( ५ ) उमासंहिता

( ६ ) कैलाससंहिता

( ११ ) वायवीयसंहिता-पूर्व

( १२ ) वायवीयसंहिता-उत्तर

शिवमहापुराण - प्रस्तावना

जो आदि व अंत यांत नित्य मंगलमय आहे, ज्याची समानता व तुलना कोठे होऊच शकत नाही, जो आत्म्याचे स्वरूप प्रकाशन करणारा देव आहे, ज्याला पाच मुखे आहेत व जो सहज क्रीडेतून अनायासे जगताची रचना, त्याचे पालन, त्याचा संहार, त्यावर अनुग्रह व तिरोभावरूप अशी पाच प्रबल कार्ये करतो, त्या सर्वश्रेष्ठ अजर, अमर, ईश्वराचे अंबिकापती भगवान शंकरांचे मी मनातल्या मनात चिंतन करीत आहे.

अशा एकनिष्ठ वृत्तीने सर्वच शिवमय जगताचे वर्णन करणारे एकमेव महापुराण म्हणून शिवपुराणाची ख्याती आहे. शिवपुराणाच्या दृष्टीने आरंभी एकच रुद्रदेव विद्यमान असतात. दुसरे कोणीच नसते. तेच नेहमी या सृष्टीची रचना करतात. तेच या सृष्टीचा संहार करतात. त्यांचे नेत्र सर्व दिशांना आहेत. सर्व दिशांना त्यांची मुखे आहेत. स्वर्ग व पृथ्वी उत्पन्न करणारे तेच एक महेश्वर देव आहेत. तेच सर्व देवांची निर्मिती करतात. त्यांचे पालन करतात व सर्व देवांत प्रथम ब्रह्मदेवांना तेच निर्माण करतात. हेच सर्वांत महत्त्वाचे व श्रेष्ठ असे रुद्रदेव महान ऋषी आहेत. त्यांची अंगकांती सूर्याप्रमाणे आहे. हे प्रभू अज्ञानांधकारापलीकडे विराजमान आहेत, या परमात्म्याच्या पलीकडे दुसरी कोणतीच वस्तू नाही.

त्यांच्याहून अत्यंत सूक्ष्म व त्यांच्याहून अत्यंत महान् वस्तूच नाही. त्यांनीच हे समस्त जगत परिपूर्ण आहे. तेच सर्व प्राण्यांच्या हृदयात निवास करतात. ते सर्वव्यापी आहेत. भगवान् शिव सर्वांत आहेत. ते सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणतात. पण वास्तविक ते सर्व इंद्रियांच्या पलीकडचे आहेत. तेच सर्वांचे स्वामी, शासक, शरणदाते व सुहृद आहेत. ते डोळ्यांशिवाय पाहतात. कानांशिवाय ऐकतात. ते सर्व काही जाणतात. त्यांना पूर्णरूपाने जाणणारा कोणी नाही. त्यांना परमपुरुष म्हणतात. ते अणूहून लहान व महानापेक्षा महान आहेत. हे अविनाशी परमेश्वर प्राण्यांच्या हृदयात निवास करतात. तेच निष्कल, सर्वज्ञ, त्रिगुणाधीश्वर, साक्षात परब्रह्म आहेत. सर्व विश्व त्यांचेच रूप आहे.

असे सर्वत्र शिवस्वरूप प्रतिपादन करणारे शिवपुराण हे महापुराण की उपपुराण या संबंधी थोडे मतभेद आहेत. विष्णू पुराणातील यादीत हे महापुराण असून त्याचा क्रमांक चौथा आहे. देवीभागवत, मत्स्यपुराण व नारदपुराण यांत चौथे पुराण वायुपुराण आहे. या पुराणांनी शिवपुराणास उपपुराण मानले आहे. यांतील बराचसा भाग वायुदेवांनी सांगितला असल्याने व याचे वायवीतसंहिता या नावाचे दोन भागात असल्याने काहींनी शिवपुराणात व वायूपुराण एकच मानले आहे. परंतु आज प्रचलित असलेले शिवपुराण व वायुपुराण हे दोन स्वतंत्र पुराणग्रंथ आहेत, असे समजून येण्यासारखे आहे. त्यांच्या आकारांत, स्वरूपांत व वर्ण्यविषयांतही भिन्नता आहे.


to be continued ...


GO TOP