॥ श्रीमद् भगवद्‍गीता ॥

अध्याय १ ला

अध्याय २ रा

अध्याय ३ रा

अध्याय ४ था

अध्याय ५ वा

अध्याय ६ वा

अध्याय ७ वा

अध्याय ८ वा

अध्याय ९ वा

अध्याय १० वा

अध्याय ११ वा

अध्याय १२ वा

अध्याय १३ वा

अध्याय १४ वा

अध्याय १५ वा

अध्याय १६ वा

अध्याय १७ वा

अध्याय १८ वा


श्रीमद्‍भगवद्‍गीता ही भगवंताची दिव्य वाणी आहे. तिच्यातील विचार फारच सखोल व अनायासे कल्याण करणारे आहेत. त्यांचे मनन केल्याने साधकांच्या हृदयात नव-नवीन विलक्षण भाव प्रकट होतात. समुद्रात मिळणार्‍या रत्‍नांचा एखादेवेळी अंत लागू शकेल पण गीतेत मिळणारे मनोमुग्धकारक भावरत्‍‍नाचा अंत लागणे कठीण आहे.

गीतेतील विचारांचे यथायोग्य आकलन झाल्यास गीतेच्या व्यक्त्याचा म्ह० भगवंताचा, श्रोत्याचा म्ह० अर्जुनाचा, स्वयं गीतेचा व आपल्या स्वरूपाचा योग्य तर्‍हेने बोध होतो. . असा बोध झाल्यावर मनुष्य कृतकृत्य, ज्ञातज्ञातव्य आणि प्राप्त प्राप्तव्य म्हणजेच धन्य होतो. त्यानंतर त्यास काहीही करणे जाणणे किंवा मिळविणे शिल्लक राहात नाही. त्याचा मनुष्य जन्म सर्वप्रकारे सफल होतो.

ज्याप्रकारे भक्त ज्या भावनेने भगवंताची भक्ति करतो, भगवंत देखील ब्याच भावनेने त्याचे भजन करतो (४.११). त्याचप्रमाणे मनुष्य ज्या दृष्टिकोनातून गीतेचा अभ्यास करतो त्याला गीता देखील त्याच विचारांची आहे असे दिसू लागते. तसेच भगवंताची दिव्य वाणी गीता इतकी आश्चर्यकारक आहे की, मनुष्य हिच्या समोर जो सिद्धांत बनवून जातो त्याला तोच सिद्धांत गीतेत प्रतीत होतो. अशा प्रकारे गीतेत कर्मयोग्याला कर्मशास्त्र, ज्ञानयोग्याला ज्ञानशास्त्र तर भक्तयोग्याला भक्तिशास्त्र दिसून येते. सर्व साधकांना गीतेत आपली रुचि, श्रद्धा, विश्वास व योग्यता यांच्यानुसार आपल्या कल्याणाचे साधन हमखास मिळते.