श्रीमद् भगवद्‌गीता
षष्ठोऽध्यायः

आत्मसंयमयोगः


पांचव्या अध्यायाच्या शेवटीं आत्मसाक्षात्काराचे अंतरंग साधन असा जो ध्यानयोग, त्याचे 'स्पर्शान्कृत्वा' इत्यादि सूत्रभूत श्लोक उपदेशिले. आतां त्या श्लोकांच्या विवरणस्थानीं असलेला हा सहावा अध्याय आरंभिला जातो. ध्यानयोगाचे बहिरंग कर्म आहे, म्हणून ध्यानयोगावर आरोहण करण्यास समर्थ होईतों कर्माधिकारी गृहस्थाने कर्म करावे, असे विधान आहे. म्हणून भगवान् अगोदर त्याची स्तुति करतात -

श्रीभगवानुवाच -
अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥ ६-१ ॥

अन्वय : यः कर्मफलं अनाश्रितः - जो कर्मफळाचा आश्रय न घेता; कार्यं कर्म करोति - कर्तव्य कर्म करतो; सः संन्यासी च योगी - तो संन्यासी आणि योगी आहे; च निरग्निः न - परंत्उ फक्त अग्नीचा त्याग करतो तो संन्यासी नव्हे; च अक्रियः न - तसेच फक्त क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे. ॥ १ ॥

व्याख्या : हे अर्जुन ! यः कर्मी कर्मफलं कर्मणां फलं कर्मफलं अनाश्रितः सन्‌ कर्मफलाभिसंधिरहितः सन्‌ कार्यं कर्तव्यतया शास्त्रेण विहितं योग्यं कार्यं कर्म नित्यनैमित्तिकं अग्निहोत्रादि कर्म करोति संपादयति । प्राप्तं अनुष्ठानं संपादयति इत्यर्थः । सः कर्मी संन्यासी चेत्यपरं योगी मंतव्यः । चेत्यपरं निरग्निः निर्गतः अग्निर्यस्य सः निरग्निः । अग्निसाध्य श्रौतकर्मत्यागी न भवति इति शेषः । चेत्यपरं अक्रियः न विद्यते क्रिया कर्मानुष्ठानं यस्य सः अक्रियः अग्निनिरपेक्षस्मार्तक्रियात्यागी न भवति ॥ १ ॥

अर्थ : श्रीभगवान् म्हणाले - कर्माच्या फलाचा आश्रय न केलेला जो गगृहस्थ अवश्य कर्तव्य कर्म म्ह० नियत कर्म- नित्य अग्निहोत्रादि कर्म करतो, तो संन्यासी व योगी आहे. केवल अग्निरहित व क्रियारहित पुरुषच संन्यासी आहे असे नाहीं.
ज्याने श्रौतस्मार्त अग्नीचा त्याग केला आहे व त्यामुळे अग्निसाध्य क्रिया सोडल्या आहेत, तसेच तप, दान इत्यादि अग्निसाध्य नसलेल्या क्रियांचाहि त्याग केला आहे. म्ह० ज्याने यज्ञ, दान, तपोरूप कर्म सोडले आहे, तोच तेवढा संन्यासी व योगी असे समजू नये. तर जो कर्मफलाचा अभिलाष न धरतां अग्निहोत्रादिक नित्य कर्तव्यकर्मे करतो, तोहि गौण संन्यासीच आहे, असे समजावे. ॥ १ ॥

विवरण :


'श्रुत्यादिकांत ज्याने अग्नींचा व दानादिकांचा यथाशास्त्र त्याग केला आहे, त्यालाच संन्यासित्व व योगित्व सांगितले आहे. असे असतांना येथें साग्नि म्ह० अग्निहोत्रादिक अग्निसाध्य क्रिया करणारा आणि सक्रिय म्ह० दानादि अनग्निसाध्य क्रिया करणारा जो गृहस्थ, त्याला श्रुत्यादिकांत प्रसिद्ध नसलेले संन्यासित्व व योगित्व आहे, असे तुम्ही कसे सांगतां ! ' असा प्रश्न अर्जुन करील म्हणून भगवान् सांगतात - अर्जुना, गृहस्थाचे संन्यासित्व व योगित्व मुख्यवृत्तीनें कधींच संभवत नाहीं, म्हणून मज भगवानाला गौणवृत्तीनें त्याच्या ठिकाणीं तीं दोन्ही संपादन करावयाचीं आहेत. त्यामुळे पूर्वोक्त दोष येत नाहीं. कर्मफलाविषयींचा संकल्प टाकल्यानें-कर्मफलसंकल्पाचा संन्यास केल्याने गृहस्थाला संन्यासित्व आहे व योगाचे अंग-साधन या रूपानें कर्माचें अनुष्ठान केल्यामुळे किंवा चित्ताच्या विक्षेपाला कारण होणार्‍या कर्मफलाविषयींच्या संकल्पाचा त्याग केल्यामुळे त्याला योगित्व आहे. याप्रमाणें गृहस्थाचे हे संन्यासित्व व योगित्वहि गौण आहे, 'पण मुख्य संन्यासित्वादि संभवत असतांना येथे गौणसंन्यासित्वादि कां घ्यावयाचे ?' म्हणून म्हणशील - तर कर्मी गृहस्थाच्या ठिकाणीं मुख्य संन्यासित्व व योगित्व शक्य नाहीं. म्हणून त्याच्या कर्मफळाची स्तुति सिद्ध होण्यासाठी येथील संन्यासित्वादिक गौणच मानणे इष्ट आहे. 'अहो पण, चित्ताच्या व्याकुलतेला कारण होणार्‍या कामनेचा त्याग केल्यामुळें चित्ताच्या समाधानादिकांची सिद्धि होते व त्यामुळें कर्मी गृहस्थाच्याही योगित्वाची सिद्धि होते, हे म्हणणे मान्य आहे. पण त्याला संन्यासी म्हणणे मात्र अयोग्य आहे, ' असे म्हणशील, तर सांगतो -

यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव ।
न ह्यसन्न्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन ॥ ६-२ ॥

अन्वय : पाण्डव यं संन्यासं इति प्राहुः - हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात; तं योगं विद्धि - त्यालाच योग असे तू जाण; हि असंन्यस्तसंकल्पः - कारण संकल्पाण्चा त्याग न अक्रणारा; कश्चन योगी न भवति - कोणताही पुरुष योगी होऊ शकत नाही. ॥ २ ॥

व्याख्या : हे पांडव ! उभयलक्षणज्ञाः यं सर्वकर्मफलपरित्यागं संन्यासं इति एवंप्रकारेण प्राहुः कथयंति । त्वं योगं फलतृष्णाकर्तृत्वाभिमानयोः परित्यागेन विहितं कर्मानुष्ठानं तं संन्यासं विद्धि जानीहि । कश्चन कश्चिदपि पुरुषः असंन्यस्तसंकल्पः न संन्यस्ताः न त्यक्ताः संकल्पाः संकल्पमूलानि कर्माणि येन सः असंन्यस्तसंकल्पः योगी निश्चलांतःकरणः न भवति । हि इति निश्चयेन ॥ २ ॥

अर्थ : हे अर्जुना, श्रुति-स्मृतिवेत्ते ज्याला संन्यास असे म्हणतात, त्यालाच तूं योग समज. कारण ज्याने संकल्प टाकलेला नाहीं, असा कोणीहि योगी होत नाहीं.
खरा संन्यासी काय करतो, सर सर्व कर्मे व त्यांचीं साधने सोडतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रवृत्तीचे कारण, असा जो काम व त्याचे कारण संकल्प यांचा त्याग करतो. संकल्पाचा त्याग केला असतां त्याचे कार्य-काम सुटतो, कामाच्या अभावीं त्याच्या प्रवृत्तीचा त्याग सिद्ध होतो. संन्यासी सर्व कमें, त्यांचीं साधने, त्यांचीं फले व त्यांविषयींचा संकल्प यांचा त्याग करितो. हा कर्मयोगीहि कर्म करीत असतांनाच त्याच्या फलाविषयींचा संकल्प टाकतो. कारण ज्याने फलाविषयींचा संकल्प-आशय टाकलेला नाहीं, असा कोणीही कर्मी-गृहस्थ, योगी-समाधानयुक्त होत नाहीं. ज्यानें कर्मांच्या फलाविषयीचा अभिलाष सोडलेला नाहीं, असा कोणीच योगी होऊं शकत नाहीं. उलट ज्या कर्मठ गृहस्थानें फलांविषयींच्या संकल्पाच त्याग केलेला असतो, तोच योगी-चित्तसमाधानानें युक्त होऊं शकतो. याप्रमाणे परमार्थ संन्यास व कर्मयोग यांचे कर्याच्या द्वारा असलेले संन्यासाचे सादृश्य घेऊन त्याच्या अपेक्षेने 'ज्याला संन्यास म्हणतात तोच तूं योग समज' या वाक्यानें येथें कर्मयोगाच्या स्तुतीसाठी कर्मयोग्याला संन्यासित्व सांगितलें आहे. ॥ २ ॥

विवरण :


फलाची अपेक्षा न करतां आचरलेला कर्मयोग हे ध्यानयोगाचे बहिरंग-साधन आहे. म्हणून त्या कर्मयोगाची संन्यासत्वानें स्तुति करून आता कर्मयोगाला ध्यानयोगाचे साधनत्व आहे, असे भगवान् दाखवितात -

आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ ६-३ ॥

अन्वय : योगम् आरुरुक्षोः मुनेः - कर्मयोगावर आरूढ होण्याची इच्छा असणार्‍या मननशील पुरुषाला: कर्म कारणम् उच्यते - योगाच्या प्राप्तीसाठी निष्काम भावनेने कर्म करणे हाच हेतू सांगितला आहे; तस्य योगरूढस्य - नंतर योगारूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाचा; यः शम एव कारणं उच्यते - सर्व संकल्पांचा अभाव हाच कारण म्हटला जातो. ॥ ३ ॥

व्याख्या : मुनेः मननशीलः मुनिः तस्य मुनेः कर्मफलतृष्णात्यागिनः कर्म शास्त्रविहितं अग्निहोत्रादि नित्यं भगवदर्पणबुद्ध्या कृतं कर्म कारणं योगारोहणे साधनं उच्यते कथ्यते । कथंभूतस्य मुनेः योगं अंतःकरणशुद्धिरूपं वैराग्यं आरुरुक्षोः आरोढुं इच्छतीति आरुरुक्षुः तस्य आरुरुक्षोः तस्यैव पूर्वं कर्मिणोपि योगारूढस्य योगं अंतःकरणशुद्धिरूपं वैराग्यं आरूढः प्राप्तः योगारूढः तस्य शमः सर्वकर्मसंन्यासः कारणं अनुष्ठेयतया ज्ञानपरिपाकसाधनं उच्यते कथ्यते ॥ ३ ॥

अर्थ : ध्यानयोगावर आरूढ होण्याची इछा करणान्या मुमुक्षु गृहस्थाला 'फलनिरपेक्ष कर्मानुष्ठान' हे साधन सांगितले. आहे. पण तोच 'मुमुक्षु' -गृहस्थ कर्माभ्यासानें योगारूढ झाला असतां त्याला उपगम-सर्व कर्मांपासून उपरम पावणें हे साधन सांगितले जाते.
ध्यानयोगावर आरूढ होण्याची इच्छा करणार्‍या मुमुक्षु गृहस्थाने आरूढ होईपर्यंत कर्म करावे आणि कर्मानुष्ठानानें ध्यानयोगावर आरूढ होण्याची, म्हणजे निर्विघ्नपणें ध्यान करण्याची योग्यता आली म्हणजे त्या योगारूढ गृहस्थानेच शम करावा. सर्व कर्मांपासून निवृत्त व्हावे. योगात्वाला मुख्य योग प्राप्त होण्याचें कर्मनिवृत्ति हेंच एक साधन आहे. साधक जों जों कर्मापासून उपरम पावतो, तों तों आयासरहित व जितेंद्रिय झालेल्या त्याचें चित्त समाहित होते आणि तो सत्त्वर प्राप्तयोग होतो. ध्यान करण्याचे सामर्थ्य येईपर्यंत निष्काम कर्मानुष्ठान व ते आल्यावर कर्मत्याग, ही कर्मानुष्ठानाची व कर्मत्यागाची मर्यादा फार महत्त्वाची आहे. ॥ ३ ॥

विवरण :


यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते ।
सर्वसङ्कल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते ॥ ६-४ ॥

अन्वय : यदा - ज्यावेळी साधक; इन्द्रियार्थेषु न अनुषज्जते - इंद्रियांच्या भोगांमध्ये आसक्त होत नाही; तथा कर्मसु न अनुषज्जते - तसेच कर्मामध्येही आसक्त होत नाही; तदा सर्वसंकल्पसंन्यासी - त्यावेळी सर्व संकल्पांचा त्याग करणारा तो पुरुष; योगारूढ उच्यते - योगारूढ म्हटला जातो. ॥ ४ ॥

व्याख्या : यदा यस्मिन्‌ चित्तसमाधानकाले योगी इंद्रियार्थेषु इंद्रियाणां अर्थाः इंद्रियार्थाः तेषु इंद्रियार्थेषु शब्दादिविषयेषु चेत्यपरं कर्मसु नित्यनैमित्तिक काम्यलौकिकप्रतिषिद्धेषु न अनुषज्जते तेषां मिथ्यात्वदर्शनेन अभिनिवेशं न करोति । हि यस्मात्‌ कारणात्‌ तदा तस्मिन्‌ काले सर्वसंकल्पसंन्यासी सर्वे च ते संकल्पाश्च कर्ममूलसंकल्पाः सर्वसंकल्पाः सर्वसंकल्पान्‌ संन्यसितुं त्यक्तुं शीलं स्वभावः यस्य सः सर्वसंकल्पसंन्यासी विद्‌वद्‌भिः पंडितैः योगारूढः योगं समाधिं आरूढः योगारूढः जीवब्रह्मणोः ऐक्यफलकारूढः उच्यते कथ्यते ॥ ४ ॥

अर्थ : अर्जुना, जेव्हां योगी विषयांमध्ये व नित्य-नैमित्तिकादि कर्मांमध्ये आसक्त होत नाहीं व सर्व संकल्पांचा संन्यास करतो, तेव्हां तो योगारूढ म्हटला जातो.
जेव्हां तो 'पुरुष विषय मला अवश्य भोगले पाहिजेत व ही कर्मे मला अवश्य केली पाहिजेत,' अशी वृत्ति ठेवीत नाहीं; ऐहिक व पारलौकिक विषयां-विषयींचे सर्व संकल्प सोडतो; किंबहुना तशी वृत्ति न धरणें व संकल्प सोडणे हा त्याचा स्वभावच झालेला असतो, तेव्हां तो योगारूढ म्हटला जातो. संकल्पाचाच त्याग केल्यावर विषय व कर्म यांचा त्याग अनायासानें होतो. कारण मूळच उघडून टाकल्पावर त्याच्या कार्याची निवृत्ति होण्यासाठी निराळा यत्‍न करावा लागत नाही. ॥ ४ ॥

विवरण :


उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ६-५ ॥

अन्वय : आत्मना आत्मानं उद्धरेत् - आपणच संसारसागरातून आपला उद्धार करावा; च आत्मानम् न अवसादयेत् - आणि आपणाला अधोगतीला नेऊ नये; हि आत्मा एव - कारण आत्मा आपण स्वतःच; आत्मनः बन्धुः - आपला मित्र आहे तसेच; आत्मा एव आत्मनः रिपुः - आपण स्वतःच आपला शत्रू आहे. ॥ ५ ॥

व्याख्या : मुमुक्षुः मोक्तुं इच्छति इति मुमुक्षुः एकाकी सहायशून्यो भूत्वा आत्मना स्वरूपज्ञानेन आत्मानं स्वं जीवं उद्धरेत्‌ अंतर्बहिर्वासनारूपसंसारात्‌ भिन्नं कुर्यात्‌ । किंच आत्मानं नावसादयेत्‌ अधोभागेन नयेत्‌ विवेकद्वारा आत्मनः स्वस्य बंधु हितकर्ता आत्मैव अस्ति तथा अविवेकद्वारा आत्मनः स्वस्य रिपुः शत्रुः आत्मैव भवति नान्यः कश्चित्‌ शत्रुः हितकारी च ॥ ५ ॥

अर्थ : याप्रमाणें योगारूढ होणें हाच 'आत्मोद्धार-संसारोद्धार' असल्यामुळें आत्म्यानें-आत्म्याच्याच योगाने आत्म्याला संसारसागरातून वर काढावे. त्याला अधोगतीस पोंचवूं नये. कारण स्वतः आत्माच आत्म्याचा बंधु आहे व तोच त्याचा रिपु आहे.
संसारसागरात बुडालेल्या आत्म्याला आत्म्यानेंच वर काढणें म्हणजे त्याला योगारूढ करणे होय. आत्म्याला योगारूढ करणे, हाच त्याचा संसारसागरांतून उद्धार आहे. आत्माच आत्म्याचा बंधु आहे. संसारसागरांतून मुक्त करील असा त्याचा दुसरा कोणीही बंधु नाही. उलट पुत्र-मित्र-कलत्र वगैरे स्नेहादि बंधनांचीं स्थाने आहेत. तसेच, स्वतः आत्माच आत्म्याचा शत्रु आहे. ॥ ५ ॥

विवरण :


बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ॥ ६-६ ॥

अन्वय : येन आत्मना - ज्या जीवात्म्याचे द्वारा; आत्मा जितः - मन व इंद्रियांसहित शरीर जिंकले गेले आहे; तस्य आत्मनः - त्या जीवात्म्याचा तर तो; आत्मा एव बन्धुः - आपण स्वतःच मित्र आहे; तु अनात्मनः - आणि ज्याने मन व इंद्रिये यांसह शरीर जिंकलेले नाही, त्याच्यासाठी तो; आत्मा एव शत्रुवत् - आपण स्वतःच शत्रूसमान; शत्रुत्वे वर्तेत - शत्रुतेचा व्यवहार करतो. ॥ ६ ॥

व्याख्या : येन विवेकज्ञानसंपन्नेन आत्मा कार्यकारणसंघातः आत्मनैव विवेकयुक्तेन मनसैव जितः वशीकृतः अहमिति साक्षात्कारं आपादितः संपादितः तस्य विवेकज्ञानसंपन्नस्य आत्मा स्वरूपं आत्मनः स्वस्य बंधुः हितकर्ता भवति । अनात्मनस्तु देहाभ्यासवतस्तु शत्रुवत्‌ अपकारिवत्‌ शत्रुत्वे शत्रोर्भावः शत्रुत्वं तस्मिन्‌ आत्मैव स्वयमेव वर्तेत वर्तते ॥ ६ ॥

अर्थ : ज्या पुरुषाने शरीरेंद्रियसंघाताला आपल्या स्वाधीन ठेवलें आहे, तो जितेंद्रिय आत्मा त्या आत्म्याचा बंधु आहे. पण ज्यानें शरीरेद्रियसंघाताला आपल्या स्वाधीन ठेवलेले नसतें, त्या अनात्म्याचा आत्माच शत्रुप्रमाणें शत्रुत्व करण्यांत तत्पर रहातो.
कारण ज्याने शरीरेंद्रियांना आपल्या स्वाधीन ठेविले आहे, त्याच्या चित्तांत विक्षेपाचा अभाव असतो. त्यामुळे त्याच्या चित्ताचें समाधान संभवते. म्हणून तो आत्म्याचा बंधु म्ह० हितकर्ता होतो. पण ज्याने शरीरेंद्रियसंघाताला आपल्या स्वाधीन ठेवलेले नसते, त्याच्या चित्तांत पुनः विक्षेप होतो. त्यामुळे आत्म्यामध्ये चित्ताचें समाधान संभवत नाहीं. म्हणून अजितेंद्रिय आत्मा हाच आत्म्याचा शत्रु आहे. कारण तो प्रसिद्ध बाह्यशत्रूप्रमाणें आपल्यालाच अपकार करतो. ॥ ६ ॥

विवरण :


जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ ६-७ ॥

अन्वय : शीतोष्णसुखदुःखेषु - शीत, उष्ण, सुख- दुःख इत्यादींमध्ये; तथा मानापमानयोः - तसेच मान आणि अपमान यांमध्ये; प्रशान्तस्य - ज्याच्या अंतःकरणाच्या वृत्ती चांगल्या प्रकारे शंत असतात; जिइतात्मनः - मन, बुद्धी, शरीर व इंद्रिये ही ज्याच्या ताब्यात असतात अशा पुरुषाच्या ज्ञानामध्ये; परमात्मा समाहितः - सच्चिदानंदघन परमात्मा योग्य प्रकाराने स्थित असतो म्हणजे त्याच्या ज्ञानामध्ये परमात्माशिवाय अन्य काही असतच नाही. ॥ ७ ॥

व्याख्या : जितात्मनः जितः आत्मा अंतःकरणं येन सः जितात्मा तस्य जितात्मानः प्राप्त साक्षात्कारस्य अत एव प्रशांतस्य सर्वविकारातीतस्य परं केवलं आत्मा अंतःकरणं शीतोष्णसुखदुःखेषु शीतं च उष्णं च सुखं च दुःखं च शीतोष्णसुखदुःखानि तेषु तथा मानापमानयोः मानश्च अपमानश्च मानापमानौ तयोः मानापमानयोः समाहितः सम्यक्‌ स्वरूपे आहितः तद्‌रूपेण अवस्थितः समाहितः । भवति इति शेषः । यद्वा परमात्मा सर्वाधिष्ठानभूतः समाहितः हृदि आविर्भूतः भवति ॥ ७ ॥

अर्थ : ज्याने शरीरेंद्रियसंघाताला जिंकले आहे, त्याचा आत्माच बंधु कसा, ते सांगतों - ज्यानें शरीरादिसंघाताला जिंकले आहे व त्यामुळे ज्याचे अंतःकरण अत्यंत प्रसन्न झाले आहे, अशा परमार्थसंन्यासाचा साक्षि-चिद्‌रूप आत्मा साक्षात् आत्मभावाने रहातो. त्याचप्रमाणें शीत-उष्ण, सुख-दुःख, मानापमान, इत्यादि प्रसंगी तो सम असतो. ॥ ७ ॥

विवरण :


ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः ॥ ६-८ ॥

अन्वय : ज्ञानविज्ञानतृप्तात्मा - ज्याचे अंतःकरण ज्ञान व विज्ञान यांनी तृप्त झाले आहे; कूटस्थः - ज्याची स्थिती विकाररहित आहे; विजितेन्द्रियः - त्याने चांगल्याप्रकारे इंद्रियांना जिंकले आहे; च समलोष्टाश्मकांचनः - आणि ज्याच्या बाबतीत माती, दगड, व सोने हे समान आहेत, असा; सः योगी युक्तः इति उच्यते - तो योगी युक्त म्हणजे भगवंताप्रत पोचलेला आहे असे म्हटले जाते. ॥ ८ ॥

व्याख्या : योगी परमहंसपरिव्राजकः इति एवं प्रकारेण युक्तः योगारूढः विद्‌वद्‌भिः उच्यते कथ्यते । कथंभूतः योगी । ज्ञानविज्ञानतृप्तात्मा ज्ञानं च शास्त्रीयं विज्ञानं च अनुभवः ज्ञानविज्ञाने ज्ञानविज्ञानाभ्यां तृप्तः ब्रह्मानंदानुभवेन संतुष्ट आत्मा अंतःकरणं यस्य सः । पुनः कथंभूतः योगी । कूटस्थः कूटवत्‌ निश्चल इव तिष्ठतीति कूटस्थः संसारविकाररहितः । 'कूटं यंत्रे रते राशौ निश्चले लोहमुद्गरे' इति विश्वप्रकाशः । पुनः कथंभूतः योगी विजितेंद्रियः विशेषेण जितानि वशीकृतानि इंद्रियाणि येन सः । पुनः कथंभूतः योगी । समलोष्टाश्मकांचनः लोष्टं पांसुपिंड च अश्मा पाषाणः च कांचनः सुवर्णं लोष्टाश्मकांचनानि समानि तुल्यानि लोष्टाश्मकांचनानि यस्य सः तथोक्तः ॥ ८ ॥

अर्थ : शास्त्रोक्त पदांच्या अर्थाचें ज्ञान व त्यांचा तसाच अनुभव भेणे हे विज्ञान; यांच्या योगाने ज्याचे चित्त तृप्त झाले आहे, त्यामुळें जो अप्रकंप्य- मनांत न डगमगणारा व जितेंद्रिय होतो, ज्याला मातीचे ढेंकुळ, दगड व सुवर्ण ही सम झाली आहेत, अशा योग्याला-विरक्ताला योगारूढ-समाहित असें म्हणतात.
हे सर्व धर्म परमहंस परिव्राजकाच्या ठिकाणींच संभवतात, कर्मयोगी गृहस्थाच्या ठिकाणी संभवत नाहींत. ॥ ८ ॥

विवरण :


सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥ ६-९ ॥

अन्वय : सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु - सुहृद, मित्र, उदासीन, मध्यस्थ, द्वेष्य आणि बंधुगणांच्या ठिकाणी; साधुषु च पापेषु अपि - धर्मात्म्या पुरुषांचे ठिकाणी आणि पापी पुरुषांचे ठिकाणी सुद्धा; समबुद्धिः विशिष्यते - समान भाव ठेवणारा पुरुष अत्यंत श्रेष्ठ आहे. ॥ ९ ॥

व्याख्या : सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबंधुषु सुहृत्‌ प्रत्युपकारं अनपेक्ष्य पूर्वस्नेहसंबंधं विना हितकर्ता च मित्रं स्नेहोपकारकः च अरिः स्वकृतापकारं अनपेक्ष्य स्वभावक्रौर्येण अपकारकर्ता च उदासीनः विवदमानयोः उभयोः प्रेक्षकः च मध्यस्थ विवदमानयोः उभयोरपि हितैषी च द्वेष्यः स्वकृतापकारं अपेक्ष्य अपकारकर्ता च बंधुः संबंधेन उपकारकर्ता सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबंधवः तेषु सुहृन्मित्रार्युदासीनद्वेष्यबंधुषु साधुषु शास्त्रविहितकारिषु पापेषु शास्त्रप्रतिषिद्धकारिष्वपि समबुद्धिः समा ब्रह्मदर्शनेन एकरूपा बुद्धिर्यस्य सः समबुद्धिः विशिष्यते विशिष्टो भवति ॥ ९ ॥

अर्थ : तसेच, प्रत्युपकाराची अपेक्षा न करणारा सुहृद, स्नेही, शत्रु, कोणत्याही पक्षाचा अभिनिवेश न धरणारा उदासीन, दोन्ही परस्परविरुद्ध पक्षांचे हित इच्छिणारा मध्यस्थ, अप्रिय असलेला द्वेष्य व संबंधी या सर्वांतील शास्त्रानुसार वर्तन करणारे आणि त्याचप्रमाणे शस्त्रनिषिद्ध आचरण करणारे, यामध्ये समान बुद्धि ठेवणारा - त्या सर्वांकडे समदृष्टीने पाहणारा ध्यानयोगी उत्तम होय.
साधु, पापी व सुहृदादि यांतील हा कोणत्या जातीचा व गोत्राचा आहे. हा आपला कोण ? आपल्याशीं कसा व्यवहार करतो, इत्यादि कांहीं विचार न करता सर्वांच्या ठिकाणीं समानवृत्ति ठेवणारा योगारूढ सर्वांत श्रेष्ठ होय. इष्टानिष्ट, स्वकीय-परकीय, सदाचारी-दुराचारी, यांना एकसारखेच समजणे - त्यांच्याविषयीं चित्तवृत्ति सम ठेवणे हे योगारूढाचें उत्तम लक्षण होय. ॥ ९ ॥

विवरण :


योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।
एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥ ६-१० ॥

अन्वय : यतचित्तात्मा - मन व इंद्रिये यांसहित शरीराला वश करून घेणार्‍या; निराशी च अपरिग्रहः - आशारहित आणि संग्रहरहित; योगी एकाकी रहसि स्थितः - अशा ध्यानयोग्याने एकटेच एकान्त स्थानी स्थित होऊन; आत्मानम् सततम् युञ्जीत - आत्म्याला निरंतर परमात्म्यामध्ये लावावे. ॥ १० ॥

व्याख्या : योगी योगारूढ रहसि गुहादौ योगप्रतिबंधकदुर्जनादिवर्जिते देशे स्थितः सन्‌ उपविष्टः सन्‌ सततं निरंतरं आत्मानं मनः युंजीत एकाग्रं कुर्यात्‌ । कथंभूतः योगी । एकाकी त्यक्तसर्वगृहपरिजनः । पुनः कथंभूतः योगी । यतचित्तात्मा चित्तं अंतःकरणं च आत्मा देहः वित्तात्मानौ यतौ संयतौ चित्तात्मानौ यस्य सः यतचित्तात्मा । पुनः कथंभूतः योगी । निराशीः वैराग्यदार्ढ्येन विगततृष्णः । पुनः कथंभूतः योगी । अपरिग्रहः न विद्यते परिग्रहो चित्तविक्षेपकरः यस्य सः अपरिग्रहः ॥ १० ॥

अर्थ : म्हणून ध्यानाचा अभ्यास करणार्‍या योग्याने एकांतांत एकटेच बसून आपल्या चित्ताचे व देहाचे नियमन करून तृष्णाशून्य व सर्वपरिग्रहरहित होऊन अंतःकरणाला निरंतर समाहित करावे.
एकांतांत एकटे बसणे, सर्व तृष्णा व परिग्रह टाकणे, सतत योगाभ्यास करणें, इत्यादि योगाभ्यासाचे सर्व विधान कर्मयोगासाठी नसून निवृत्त ज्ञानयोग्यासाठींच आहे, हे उघड होतें. ॥ १० ॥

विवरण :


योगाचे स्वरूप व त्याचीं कांहीं अंगे यांचें प्रदर्शन केल्यानंतर आतां योगाचा अभ्यास करणार्‍या यतीला आसन, आहार-विहार, आसनादिकांचे अवांतर भेद इत्यादिकांचा योगाच्या साधनत्वानें नियम सांगावा व ज्याला योग प्राप्त झाला आहे, त्याचे लक्षण व फल म्ह० योगाचे फल सम्यग्ज्ञान, ज्ञानाचे फल कैवल्य, योगभ्रष्टाचा आत्यंतिक नाश न होणे, इत्यादि सांगावे, म्हणून या पुढील ग्रंथसंदर्भ आहे. पण त्यांतील योगानुष्टानाचे मुख्य अंग-आसनच प्रथम सांगून त्यावर बसून काय करावे, त्याचा उपदेश करतात -

शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥ ६-११ ॥
तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः ।
उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ॥ ६-१२ ॥

अन्वय : शुचौ देशे - शुद्ध भूमीवर; चैलाजिनकुशोत्तरम् - कुश, मृगचर्म व वस्त्र पसरलेले; न अति उछ्रितम् तथा न अतिनीचम् - जे फार उंच नाही वा फार खाली नाही; आत्मनः आसनम् - स्वतःचे आसन; स्थिरम् प्रतिष्ठाप्य - स्थिरपणे स्थापन करून; ॥ ११ ॥
तत्र आसने उपविश्य - त्या आसनावर बसून; यतचित्तेन्द्रियक्रियः - इंद्रिये व चित्त यांच्या क्रियांना वश करून; मनः एकाग्रं कृत्वा - मनाला एकाग्र करून; आत्मविशुद्धये योगं युञ्ज्यात् - अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा. ॥ १२ ॥

व्याख्या : इदं द्वाभ्यां श्लोकाभ्याम्‌ - योगी योगारूढः आत्मनः स्वस्य स्थिरं निश्चलं आसनं आस्यते उपविश्यते यस्मिन्‌ तत्‌ आसनं शुचौ स्वभावेन संस्कारेण शुद्धे देशे जनसमुदायरहिते निर्भयगंगातटगुहादौ समे स्थाने प्रतिष्ठाप्य स्थापयित्वा तत्र तस्मिन्निति तत्र आसने उपविश्य उपवेशनं कृत्वा ऐकाग्र्यं विक्षेपरहितं मनः अंतःकरणं कृत्वा आत्मविशुद्धये आत्मनः अंतःकरणस्य विशुद्धिः ब्रह्मसाक्षात्कारयोग्यता तस्यै आत्मविशुद्धये योगं उपायभूतं समाधिं युंज्यात्‌ अभ्यसेत्‌ । कथंभूतः योगी । यतचित्तेंद्रियक्रियः चित्तं अंतःकरणं चेत्यपरं इंद्रियाणि ज्ञानेंद्रियकर्मेंद्रियाणि चित्तेंद्रियाणां क्रियाः वृत्तयः चित्तेंद्रियक्रियाः यताः उपरताः चित्तेंद्रियक्रियाः यस्य सः तथोक्तः । कथंभूतं आसनम्‌ । नात्युच्छ्रितं अति अत्यंतं उच्छ्रितं उच्चं न भवति तत्‌ नात्युच्छ्रितम्‌ । पुनः कथंभूतं आसनम्‌ । नातिनीचं अति अत्यंतं नीचं न भवति तत्‌ नातिनीचम्‌ । पुनः कथंभूतं आसनम्‌ । चैलाजिनकुशोत्तरं चैलं मृदुवस्त्रादि च अजिनं मृदुव्याघ्रचर्मादि चैलाजिने कुशेभ्यः दर्भेभ्यः उत्तरे चैलाजिने यस्मिन्‌ तत्‌ चैलाजिनकुशोत्तरम्‌ - ' कुशानां उपरि अजिनं अजिनस्य उपरि चैलं वस्त्रमिति ज्ञेयम्‌ । पाठक्रमादर्थक्रमो बलीयान्‌' - इति न्यायात्‌ ॥ ११-१२ ॥

अर्थ : पवित्र स्थानी, स्वतःचे, फार उंच नाहीं व फार सखल नाहीं असे व खाली दर्भ, ज्यावर हरिणाचे किंवा वाघाचे चर्म व त्यावर वस्त्र असे अचक आसन स्थापून त्या आसनावर बसावे. चित्त व इंद्रियें यांच्या क्रिया नियमित कराव्या. मनाला एकाग्र करावे आणि चित्तशुद्धीसाठीं ध्यान करावे.
एखादे स्थान स्वभावतःच पवित्र असते, किंवा झाडणें, सारवणे इत्यादि संस्कारांनीं ते पवित्र करता येतें. अशा पवित्र स्थानीं आपले आसन मांडावें. दुसर्‍याच्या आसनावर बसणे हितकर नाही, म्हणून 'स्वतःचे' असे मुद्दाम म्हटले आहे. पाट, चौरंग इत्यादि स्वरूपाच्या आसनावर क्रमानें दर्भ, अजिन व वस्त्र अंथरावे. त्या आसनावरून पडण्याची भीति वाटूं नये, म्हणून ते फार उंच नसावे व भूमि, पाषाण यांच्या संसर्गाने शरीरांतील वातादिकांचा क्षोभ होऊं नये, म्हणून अति सखलही नसावे. असे आसन पवित्र स्थानीं स्थापून, त्यावर बसून, सर्व विषयांपासून मनाचा निग्रह करून त्याचें एकाच ध्येयविषयांत समाधान करणे व चित्त आणि इंद्रिये यांच्या बाह्य क्रियांचे संयमन कर, या दोन साधनांनी चित्ताच्या विशेष शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. ॥ ११-१२ ॥

विवरण :


समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।
सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥ ६-१३ ॥
प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः ।
मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥ ६-१४ ॥

अन्वय : कायशिरोग्रीवम् स्मम् - काया, मस्तक आणि मान समान; च अचलम् धारयन् - तसेच अचल धारण करून; च स्थिरः स्वम् नासिकाग्रम् - आणि स्थिर होऊन आपल्या नासिकेच्या अग्रभागावर; संप्रेक्ष्य दिशः अवलोकयन् - दृष्टी ठेऊन व अन्य दिशांकडे न पहाता. ॥ १३ ॥
ब्रह्मचारिव्रते स्थितः - ब्रह्मचार्‍याच्या व्रतामध्ये स्थित; विगतभीः तथा प्रशान्तात्मा - भयरहित तसेच चांगल्या प्रकारे अंतःकरण शांत असणार्‍या; युक्तः मनः संयम्य - सावधान ध्यानयोग्याने मनाचा संयम करून; मच्चितः च मत्परः आसीत - माझ्या ठिकाणी मन लाऊन आणि मत्परायण होऊन स्थित असावे. ॥ १४ ॥

व्याख्या : योगी आसनारूढः स्थिरो भूत्वा दृढप्रयत्नो भूत्वा स्वं स्वकीयं नासिकाग्रं नासिकायाः अग्रं नासिकाग्रं संप्रेक्ष्य अवलोक्य नासिकाग्रावलोकनं तु दृष्टेः स्थिरतायैव न तु योगः मनसः स्थैर्याभावात्‌ योगो न सिद्ध्यति । चेत्यपरं दिशः अनवलोकयन्‌ सन्‌ न अवलोकयतीति अनवलोकयन्‌ आसीत तिष्टेत । कथंभूतः योगी । समं अवक्रं कायशिरोग्रीवं कायः शरीरमध्यः च शिरः मस्तकः च ग्रीवा कायशिरोग्रीवम्‌ । प्राण्यंगत्वादेकवद्‌भावः । मूलाधारादारभ्य मूर्ध्नपर्यंतं अचलं अकंपं धारयन्‌ धारयतीति धारयन्‌ । पुनः कथंभूतः योगी । प्रशांतात्मा प्रकर्षेण शांतः रागादिदोषरहितः आत्मा अंतःकरणं यस्य सः । पुनः कथंभूतः योगी । विगतभीः विगता भीः सर्वकर्मपरित्यागे युक्तत्वायुक्तत्वशंका यस्य सः विगतभीः । पुनः कथंभूतः योगी । ब्रह्मचारिव्रते ब्रह्मचारिणां व्रतं ब्रह्मचर्य गुरुशुश्रूषाभिक्षाभोजनादिव्रतं ब्रह्मचारिव्रतं तस्मिन्‌ स्थितः । पुनः कथंभूतः । मनः अंतःकरणं संयम्य विषयाकारवृत्तिशून्यं कृत्वा युक्तः योगयुक्तः । पुनः कथंभूतः । मच्चितः मयि परमेश्वरे परमात्मनि सगुणे अथवा निर्गुणे चित्तं अंतःकरणं यस्य सः मच्चितः । पुनः कथंभूतः योगी । मत्परः अहमेव परो परमानंदरूपत्वात्‌ परः पुरुषार्थो यस्य सः मत्परः एवं विषयाकारवृत्तिनिरोधेन भगवदेकाकारचित्तवृत्तियुक्तः संप्रज्ञातसमाधिं आसीत यथाशक्ति उपविशेत्‌ । न तु स्वेच्छया उत्तिष्ठेत । इयं भाष्यकाराणां मधुसूदनचिदानंद श्रीधराणां व्याख्या ॥ १३-१४ ॥

अर्थ : बाह्य आसन सांगितले, आतां शरीरधारण कसे करावे, ते सांगतों - शरीराचा मध्यभाग, शिर व मान, यांना सरळ व निश्चल धारण करावे. शरीर स्थिर ठेवावे. जणुकाय आपल्या नासिकेचे अग्र पहात असल्याप्रमाणें रहावे व इकडे तिकडे पाहूं नये. नंतर शांत चित्त, भयरहित व ब्रम्हचारीव्रतामध्ये स्थित असे होऊन मनाचे संयमन करून, मजमध्ये चित्त समाहित करून, मत्पर होऊन रहावे.
कंबरेपासून मानेपर्यंत जो शरीराचा भाग तोच शरीराचा मध्यभाग होय. यापुढे मान व मस्तक, या तीन्ही भागांना सरळ व अचल जरी धारण केलें, तरी तशा अवस्थेंतही हात व पाय हालविण्याची कित्येकांना संवयच असते, किंवा डाव्या किंवा उजव्या बाजूवर झुकतां येते. त्या सर्व परिस्थितीचा निषेध करण्यासाठीं सरळ व अचल शरीर धारण करूनही स्थिर होण्याचे येथे विधान आहे. जणुकाय नासिकाग्रदृष्टि करणें व पूर्वादि दिशेकडे न पहाणे, या विशेषणांनी दृष्टीचेंही स्थैर्य विवक्षित आहे. अंतःकरणाची शांति योगाभ्यासाला अत्यंत अवश्य आहे. म्हणून प्रशांतात्मा व्हावे, असे येथे सांगितलें आहे. कर्मपरित्याग केल्यामुळें 'मी पतित तर होणार नाहीं ना ?' अशी भीति वाटण्याचा संभव आहे. म्हणून 'विगतभीः' या पदानें तिचा निषेध केला आहे. ब्रह्मचर्य, गुरुशुश्रूषा, भिक्षाभोजन, त्रिकालस्नान, संध्यावंदन, शौच, आचमन इत्यादि ब्रह्मचारीव्रतें योगाभ्यासाला अनुकूल आहेत. यास्तव या सर्व साधनांनीं युक्त होऊन, चित्तवृत्तीच्या निरोध करून मज परमेश्वराच्या ठिकाणींच चित्त ठेवावे आणि मलाच श्रेष्ठ मानून शांत चित्तानें माझे ध्यान करावे. अंतःकरणाची शुद्धि हे योगाचे अवान्तर फल आहे. ॥ १३-१४ ॥

विवरण :


युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः ।
शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥ ६-१५ ॥

अन्वय : नियतमानसः योगी - ज्याचे मन स्वाधीन आहे असा योगी; एवं आत्मानम् सदा युञ्जन् - अशाप्रकारे निरंतर मज परमेश्वराच्या स्वरूपामध्ये लावून; मत्संस्थाम् निर्वाणपरमाम् - माझ्यामध्ये असणारी परमानंदाची पराकाष्ठारूप; शान्तिम् अधिगच्छति - शांती प्राप्त करून घेतो. ॥ १५ ॥

व्याख्या : योगी योगोस्यास्तीति योगी एवं उक्तप्रकारेण सद अनवरतं आत्मानं आत्मभासयुक्तं मनः युंजन्‌ सन्‌ युंजतीति युंजन्‌ अभ्यासवैरागाभ्यां समाहितं कुर्वन्‌ सन्‌ शांतिं मिक्षाख्यां शांतिं अधिगच्छति प्राप्नोति । कथंभूतः योगी । नियतमानसः नियतं निरुद्धं मानसं मनः येन सः यद्वा नियताः निरुद्धाः मानसाः वृत्तिरूपविकाराः येन सः । कथंभूतां शांतिम्‌ । निर्वाणपरमां वणति दुर्गंधं वाति तद्वाणं निर्गतं वाणं शरीरादिप्रपंचजातं यस्मात्‌ तत्‌ निर्वाणं निर्वाणं ब्रह्म परमं प्रकृष्टं यस्यां सा निर्वाणपरमा ताम्‌ । पुनः कथंभूताम्‌ । मत्संस्थां तिष्ठतीति स्था सम्यक्‌ स्था संस्था मयि संस्था मत्संस्था तां मत्संस्थां मद्‌रूपाम्‌ ॥ १५ ॥

अर्थ : योगाचे स्वरूप, त्याचे अंगभूत आसनद्वय व त्याचा विशिष्ट कर्ता, इतकें सांगितल्यावर आतां योगाचे परम फल सांगतों - याप्रमाणें मनाला सर्वदा समाहित करणारा योगी-ध्यायी-योगाभ्यासी पुरुष संयतचित्त होऊन मोक्ष हीच जिची निष्ठा आहे, अशी माझ्या अधीन असलेली जी मद्‌रूप शांति तिला प्रास होतो.
मोक्ष ही शांतीची पराकाष्ठा आहे. पूर्वोक्त क्रमानें चित्ताला समाहित करणारा पुरुष ब्रह्मावस्थानरूप मोक्षाख्य शांतीला प्राप्त होतो. ॥ १५ ॥

विवरण :


नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।
न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥ ६-१६ ॥

अन्वय : अर्जुन - हे अर्जुना; योगः अति अश्नतः तु न - हा ध्यानयोग खूप खाणार्‍याला सिद्ध होत नाही; च एकान्तम् अनश्नतः न - तसेच अजिबान न खाणार्‍यालाही सिद्ध होत नाही; च अतिस्वप्नशीलस्य न - आणि अतिशय निद्रा करण्याचा स्वभाव असणार्‍यालाही सिद्ध होत नाही; च जाग्रतः एव योगः न अस्ति - तसेच सदा जाग्रण करणार्‍यालाही हा योग सिद्ध होत नाही. ॥ १६ ॥

व्याख्या : हे अर्जुन ! अत्यश्नतः अशनं नियमितभोजनं अतीत्य अतिक्रम्य अश्नाति भक्षयतीति अत्यश्नन्‌ तस्य अत्यश्नतः अधिकं भूजानस्य योगः नास्ति न सिद्ध्यति चेत्यपरं एकांतं अत्यंतं अनश्नतः अशनं भक्षणं न करोतीति अनश्नन्‌ तस्य अनश्नतः अत्यंतं अभुंजानस्य निराहारस्य योगः न सिद्ध्यति चेत्यपरं अतिस्वप्नशीलस्य अत्यंतं स्वप्ने निद्रायां शीलं स्वभावो यस्य सः अतिस्वप्नशीलः तस्य योगः न भवति चेत्यपरं जाग्रतः जागर्तीति जाग्रन्‌ तस्य जाग्रतः अत्यंतजागरणशीलस्य योगः न भवति ॥ १६ ॥

अर्थ : योग्याचा आहार, विहार, जाग्रण, झोंप इत्यादिकांविषयीं काय नियम आहेत, ते सांगतो योग्याला विहित असलेल्या अन्नाहून अधिक अन्न खाणार्‍या, किंवा मुळींच कांहीं न खाणार्‍या साधकाला योग साध्य होत नाहीं. त्याचप्रमाणें अतिशय झोंप घेणार्‍या किंवा सवर्था जागणार्‍या पुरुषालाही योग प्राप्त होत नाही. ॥ १६ ॥

विवरण :


युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ ६-१७ ॥

अन्वय : युक्ताहारविहारस्य - यथायोग्य आहार व विहार करणार्‍याला; कर्मसु युक्तचेष्टस्य - कर्मांमध्ये यथायोग्य व्यवहार करणार्‍याला; च युक्तस्वप्नावबोधस्य - यथायोग्य निद्रा व जागरण करणार्‍याला; अयं दुःसहा भवति - हा दुःखाचा नाश करणारा योग सिद्ध होतो. ॥ १७ ॥

व्याख्या : योगिनः योगोस्यास्तीति योगी तस्य योगिनः योगयुक्तस्य योगः स्वाभिलषितयोगः दुःखहा दुःखं योगवैकल्पदुःखं अथवा जन्ममरणदुःखं हंति निवर्तयतीति दुःखहा भवति । कथंभूतस्य योगिनः । युक्ताहारविहारस्य आद्रियत इति आहारः विहरत इति विहारः आहारः अन्नं च विहारः संचारः आहारविहारौ युक्तौ परिमितौ योगानुकूलौ योगशास्त्रोक्तौ आहारविहारौ यस्य सः युक्ताहारविहारः तस्य । पुनः कथंभूतस्य । कर्मसु कर्तव्येषु युक्तचेष्टस्य युक्ता परिमिता चेष्टा व्यापारः यस्य सः युक्तचेष्टा तस्य । पुनः कथंभूतस्य योगिनः । युक्तस्वप्नावबोधस्य स्वप्नः निद्रा च अवबोधः जागरः स्वप्नावबोधौ युक्तौ परिमितौ स्वप्नावबोधौ यस्य सः युक्तस्वप्नावबोधः तस्य युक्तस्वप्नावबोधस्य ॥ १७ ॥

अर्थ : अर्थात् ज्याचा आहार - अन्नाचे परिमाण व विहार-येणें, जाणें, वगैरे परिमित असतें; कर्मामध्यें परिमित व्यापार असतो; झोंप व जागणें ही दोन्ही ज्याचीं परिमित असतात; त्याचा योग सर्व संसारदुःखांचा नाश करणारा होतो.
ज्या योगाभ्यासी पुरुषाच्या आहार, विहार, कर्मानुष्टान, झोंपणे व जागणें या सर्व क्रिया परिमित असतात, त्याचा योग आध्यात्मिकादि सर्व दुःखांचा क्षय करतो. याप्रमाणे यत्‍न करणार्‍या योग्याचा पुढें सिद्ध होणारा योग विशुद्धविज्ञानद्वारा सर्व संसारदुःखांचा क्षय करणारा होतो. झोपेंतही सर्व दुःखांची निवृत्ति होते, पण ती नित्य नसते, पण या योगामुळे विज्ञानाच्या द्वारा सर्व संसारदुःखांची नित्य निवृत्ति होते. ॥ १७ ॥

विवरण :


यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।
निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥ ६-१८ ॥

अन्वय : विनियतम् चित्तम् - अत्यंत वश केले गेलेले चित्त; यदा आत्मनि एव - ज्यावेळी परमात्म्यामध्येच; अवतिष्ठते - चांगल्या प्रकारे स्थित होऊन राहते; तदा सर्वकामेभ्यः निःस्पृहः - कोणत्याही भोगाची इच्छा नसणारा पुरुष - युक्तः इति उच्यते - योगयुक्त असे म्हटले जाते. ॥ १८ ॥

व्याख्या : यदा यस्मिन्‌ काले विनियतं विशेषेण नियतं नियमितं विनियतं सर्वशून्यतां आपादितं चित्तं विगतरजस्तमस्कं अंतःकरणं आत्मन्येव आत्मनि स्वाधिष्ठाने अवतिष्ठते निश्चलं भवति तदा तस्मिन्‌ सर्ववृत्तिनिरोधकाले युक्तः समाहितचित्तः । विद्‌वद्‌भिः इति शेषः । इति एवं प्रकारेण उच्यते कथ्यते । कथंभूतः युक्तः । सर्वकामेभ्यः सर्वे च ते कामाश्च सर्वकामाः तेभ्यः सर्वकामेभ्यः दोषदर्शनेन दृष्टादृष्टविषयेभ्यः निस्पृहः निर्गता गता स्पृहा तृष्णा यस्य सः ॥ १८ ॥

अर्थ : ज्यावेळी विशेषप्रकारे नियमित केलेले - एकाग्रतेस प्राप्त झालेले चिप्त बाह्य विषयांचे चिंतन सोडून आत्म्यामध्येच अवस्थित होते - आत्मस्वरूपांतच मिळून जाते आणि योगी सर्व दृष्टादृष्ट विषयांविषयीं निःस्पृह-तृष्णाशून्य होतो, तेव्हां त्याला युक्त-योगी म्हणतात.
योगी दोन प्रकारचे आहेत. एक 'युंजान' व दुसरा 'युक्त'. 'युंजान' -निष्काम कर्मानुष्ठानानें योगारूढ होऊन पूर्वोक्त आसनादि प्रकारांनीं ध्यान करणारा आणि युक्त-आत्मस्वरूपांत स्थिर अवस्थित झालेला. यालाच प्राप्तयोग-सिद्धयोग म्हणतात. ॥ १८ ॥

विवरण :


यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।
योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥ ६-१९ ॥

अन्वय : यथा निवातस्थः दीपः न इंगते - ज्याप्रमाणे वायुरहित स्थानात असणारा दिवा चंचल होत नाही; सा उपमा - तीच उपमा; आत्मनः योगं युञ्जतः - परमात्म्याच्या ध्यानात लागलेल्या; योगिनः यतचित्तस्य स्मृता - योग्याच्या जिंकलेल्या चित्ताला सांगितली गेली आहे. ॥ १९ ॥

व्याख्या : यथा चलनहेत्वभावात्‌ दीपः निवातस्थः सन्‌ निर्गतः गतः वातः वायुः यस्मात्सः निवातः निवाते वायुरहितदेशे तिष्ठतीति निवातस्थः न इंगते न चलति सा प्रसिद्धा उपमा दृष्टांतः योगिनः योगयुक्तस्य योगज्ञैः स्मृता चिंतिता । कथंभूतस्य योगिनः । यतचित्तस्य यतं नियतं चित्तं अंतःकरणं यस्य सः यतचित्तः तस्य यतचित्तस्य निरुद्धसर्वचित्तवृत्तेः । पुनः कथंभूतस्य आत्मनः । आत्मविषयं योगं युंजतः युंजतीति युंजन्‌ तस्य युंजतः अभ्यसतः ॥ १९ ॥

अर्थ : अर्जुना, या युक्त योग्याच्या समाहित चिताला मी एक दृष्टान्त देतों. म्हणजे तुला त्याच्या चित्ताची चांगली कल्पना येईल. ज्याप्रमाणे वायुरहित प्रदेशांत असलेला दीप-दीपाची ज्योति हलत नाहीं, तर निश्चल तेवत असते, त्याप्रमाणें आत्म्याच्या योगाचे-समाधीचे अनुष्ठान करणार्‍या योग्याचे संयत चित्त असते.
चिताचा प्रसार कसा कसा होत असतो, ते जाणणार्‍या योगज्ञांनी मनाच्या समाधीचा अभ्यास करणार्‍या, नियतचित्त योग्याच्या स्थिर चित्ताला वायुरहित प्रदेशांतील दीपाच्या ज्योतीची उपमा दिली आहे. ॥ १९ ॥

विवरण :


यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।
यत्र चैवात्मनात्मानं पश्यनात्मनि तुष्यति ॥ ६-२० ॥
सुखं आत्यन्तिकं यत्तद्‌बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ।
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ ६-२१ ॥
यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।
यस्मिन्स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥ ६-२२ ॥
तं विद्याद् दुःखसंयोगवियोगं योगसञ्ज्ञितम् ।
स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥ ६-२३ ॥

अन्वय : योगसेवया निरुद्धं चित्त - योगाच्या अभ्यासाने निरुद्ध झालेले चित्त; यत्र उपरमते - ज्या अवस्थेमध्ये उपरत होऊन जाते; च यत्र आत्मना - ज्या अवस्थेमध्ये परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्मबुद्धीच्या द्वारा; आत्मानम् पश्यन् - परमात्म्याचा साक्षात्कार करून घेत; आत्मनि एव तुष्यति - सच्चिदानंद परमात्म्यामध्येच संतुष्ट होऊन राहते. ॥ २० ॥
अतीन्द्रियम् बुद्धिग्राह्यम् - इंद्रियांचे अतीत फक्त शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीचे द्वारा ग्रहण करण्यास योग्य असा; यत् आत्यन्तिकम् सुखम् - जो अनंत आनंद आहे; तत् यत्र वेत्ति - त्याचा ज्या अवस्थेमध्ये अनुभव येतो; च यत्र स्थितः - आणि ज्या अवस्थेत राहिला असता; अयं तत्त्वतः न एव चलति - हा योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. ॥ २१ ॥
यं लाभं लब्ध्वा - जो लाभ प्राप्त झाल्यावर; ततः अधिकं अपरं न मन्यते - त्याच्यापेक्षा अधिक दुसरा कोणताही लाभ तो योगी मानीत नाही; च यस्मिन् स्थितः - आणि प्रमात्मा प्राप्तिरूप ज्या अवस्थेमध्ये स्थित असणारा योगी; गुरुणा दुःखेन अपि न विचाल्यते - फार मोठ्या दुःखाने सुद्धा विचलित होत नाही. ॥ २२ ॥
यः दुःखसंयोगवियोगम् - दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे म्ह० जन्म- मरणरूप संसारातून कायम मुक्त करणारा आहे; योगसंज्ञितम् - ज्याला योग हे नाव आहे; तं विद्यात् - त्या योगाला जाणले पाहिजे; सः योगः अनिर्विण्णचेतसा - तो योग उबग न आलेल्या म्हणजे धैर्य व उत्साह यांनी युक्त अशा चित्ताने; निश्चयेन उप्क्तव्यः - निश्चयपूर्वक करणे हे कर्तव्य होय. ॥ २३ ॥

व्याख्या : पंडितः तं चित्तवृत्तिनिरोधं योगसंज्ञितं संज्ञा संजाता यस्य सः संज्ञितः योगेन संज्ञितः चिह्नितः योगसंज्ञितः तं विद्यात्‌ जानीयात्‌ इति चतुर्थेनान्वयः । यत्र यस्मिन्‌ परिणामे चित्तं अंतःकरणं योगसेवया योगस्य सेवा योगसेवा तया योगाभ्यासेन निरुद्धं सत्‌ रुद्धं सत्‌ उपरमते आत्मनिष्ठं भवति । चेत्यपरं यत्र यस्यां अवस्थायां आत्मना स्वरूपेण आत्मानं प्रपंचं पश्यन्‌ पश्यतीति पश्यन्‌ सन्‌ आत्मनि स्वरूपे तुष्यति तुष्टिं प्राप्नोति । अयं चिदानंदाभिप्रायः । अथवा यस्य यस्मिन्‌ परिणामे आत्मना शुद्धससत्त्वमात्रेण अंतःकरणेन आत्मानं प्रत्यक्‌ चैतन्यं सच्चिदानंदघनं अनंतं अद्वितीयं पश्यन्‌ वेदांतप्रमाणजन्या वृत्त्या साक्षात्कुर्वन्‌ आत्मन्येव परमानंदघने तुष्यति संतोषं प्राप्नोति । देहेंद्रियसंघाते न संतोषं प्राप्नोति । अयं मधुसूदनश्रीधरयोः अभिप्रायः ॥ २० ॥
किं च यत्र यस्मिन्‌ अवस्थाविशेषे यत्‌ सुखं परमानंदरूपं अस्ति तत्‌ सुखं योगी वेत्ति अनुभवति । कथंभूतं सुखम्‌ । आत्यंतिकं अंतं अतिक्रम्य वर्तत इति अत्यंतं अत्यंतमेव आत्यंतिकं अनंतं निरतिशयं ब्रह्मस्वरूपम्‌ । पुनः कथंभूतं सुखम्‌ । बुद्धिग्राह्यं बुद्ध्या रजस्तमोमलरहितया सत्त्वमात्रवाहिन्या ग्रहितुं योग्यं ग्राह्यम्‌ । पुनः कथंभूतं सुखम्‌ । अतींद्रियं इंद्रियाणि अतिक्रम्य वर्तत इति अतींद्रियं विषयेंद्रियसंबंधातीतं चेत्यपरं अयं विद्वान्‌ यत्र यस्मिन्‌ सुखे स्थितः सन्‌ स्थितिं प्राप्तः सन्‌ तत्त्वतः आत्मस्वरूपात्‌ नैव चलति पराग्वृत्तिर्न भवति ॥ २१ ॥
किं च योगी यं परमानंदरूपं लाभं लब्ध्वा प्राप्य ततः तस्मात्‌ परमानंदलाभात्‌ परं अपरं लाभं अधिकं उत्कृष्टं न मन्यते । योगी यस्मिन्‌ निरतिशयानंदे ब्रह्मणि स्थितः सन्‌ तादात्म्यं प्राप्तः सन्‌ गुरुणापि महतापि दुःखेन दुष्टत्वेन स्वरूपं खनति बहिर्निःसारयति अथवा पृथ्क्करोति इति दुःखं दुःखेन जन्ममरणदुःखेन न विचाल्यते स्वरूपात्‌ न प्रचलितो भवति ॥ २२ ॥
पंडितः तं चित्तवृत्तिनिरोधं योगसंज्ञितं योगेन संज्ञा संजाता यस्य सः योगसंज्ञितः तं योगसंज्ञितं योगचिन्हितं विद्यात्‌ जानीयात्‌ । कथंभूतं तं चित्तवृत्तिनोरोधनम्‌ । दुःखसंयोगवियोगं दुःखेन संयोगः दुःखसंयोगः दुःखसंयोगेन वियोगो यस्य सः दुःखसंयोगवियोगः तम्‌ । महाफलः योगः चित्तवृत्तिनिरोधरूपः योगः अनिर्विण्णचेतसा अनिर्विण्णं निर्वेदरहितं च तत्‌ चेतः अंतःकरणं च अनिर्विण्णचेतः तेन अनिर्विण्णचेतसा निश्चयेन शास्त्राचार्योपदेशजनितेन योक्तव्यः अभ्यसनीयः अनिर्विण्णचेतसा एतावता कालेन योगः न सिद्धः किं अतः परं कष्टं इत्यनुतापः निर्वेदः तद्‌रहितेन चेतसा इह जन्मनि जन्मांतरे वा योगः सिद्ध्यति त्वरया किं इत्येवं धैर्ययुक्तेन मनसा तदेतत्‌ गौडपादाः उदाजह्रुः उदाहरणं कथयामासुः । 'उत्सेक उदधेर्यद्वत्‌ क्य्शाग्रेणैव बिंदुना' । तद्वत्‌ मनसो निग्रहः उत्सेकः शोषणाध्यवसायेन जलोद्धरणम्‌ । अत्र संप्रदायविदः आख्यायिकां आचक्षंते - 'कस्यचित्‌ पक्षिणः अंडानि तीरस्थानि तरंगवेगेन समुद्रः उपजहार । स च पक्षी समुद्रं शोषयोष्याम्येवेति प्रवृत्तः । स्वमुखाग्रेण एकैकं जलबिंदु उपरि चिक्षेप । तदा च बहुभिः पक्षिभिः बंधुवर्गैः वार्यमाणोपि नैवोपरराम । यदृच्छया तत्र आगतेन नारदेन निवारितोपि अस्मिन्‌ जन्मनि जन्मांतरे वा येन केनाप्युपायेन समुद्रं शोषयिष्याम्येवेति प्रतिजज्ञे । ततश्च दैवानुकूल्यात्‌ कृपालुर्नारदो गरुडं तत्साहाय्याय प्रेषयामास । समुद्रस्त्वज्जातीयद्रोहेण त्वामवमन्यते इति वचनेन ततो गरुडपक्षवातेन शुष्यन्‌ समुद्रो भीतस्तान्यंडानि तस्मै पक्षिणे ददौ - ' इति एवं अखेदेन मनोनिरोधे परमधर्मे प्रवर्तमानं योगिनं ईश्वरः पक्षिण एव अनुगृह्णाति । ततः तस्य योगिनः अभिमतं सिद्ध्यातीति भावः । इत्ययं मधुसूदनाभिप्रायः ॥ २३ ॥

अर्थ : याप्रमाणें योगाभ्यासानें एकाग्र व निवांत प्रदेशांतील दीपाप्रमाणें स्थिर झालेले चित्त, जेव्हां निरुद्ध होत्सातें उपरतीस प्राप्त होते; त्याचप्रमाणे ज्या वेळीं समाधीने अत्यंत शुद्ध झालेल्या अंतःकरणाने चैतन्य ज्योतिःस्वरूप परमारम्याचा अनुभव घेणारा हा योगी स्वरूपांत संतुष्ट होतो; ज्यावेळीं केवळ बुद्धीनेच ग्राह्य व इंद्रियांचा विषय न होणारे जे अनंत सुख त्याचा अनुभव घेतो; ज्या अवस्थेंत हा ज्ञानी आत्मस्वरूपांत स्थित झाला असतां त्या तत्त्वापासून च्युत होत नाहीं, त्यावेळी त्याला योगसिद्धि होते आणि ज्या आत्मलाभाला प्राप्त होऊन हा योगी दुसर्‍या कोणत्याही लाभाला त्याहून अधिक समजत नाहीं; तसाच ज्या आत्मस्वरूपांत स्थित झालेला हा योगी फार मोठ्या दुःखानेंही चंचल होत नाहीं, त्या दुःखसंयोगाच्या वियोगाला योगसंज्ञित जाणावे, म्ह० त्या दुःखसंयोग-वियोगालाच योग समजावे व हा योग निश्चयानें व अखिन्न मनानें करावा.
ज्याचा योग इतका परिपक्व क्षालेला नसतो, तो योगी शस्त्रप्रहारादिकांमुळें फार मोठे दुःख झालें असतां स्वरूपापासून च्युत होऊन जसा देहभानावर येतो, तसा आस्मस्वरूपांत स्थित झालेला हा योगी शस्त्रपातादिकांमुळें केवढेंही मोठे दुःख जरी झालें, तरी त्यामुळे स्वस्वरूपापासून च्युत होत नाहीं. या दुःखसंयोगवियोगालाच 'योग' ही संज्ञा आहे. अशा प्रकारचा हा योग निश्चयानें व न त्रासतां साध्य करून घ्यावा. ॥ २०-२३ ॥

विवरण :


सङ्कल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः ।
मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥ ६-२४ ॥
शनैः शनैः उपरमेद्‌बुद्ध्या धृतिगृहीतया ।
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् ॥ ६-२५ ॥

अन्वय : संकल्पप्रभवान् सर्वान् कामान् - संकल्पापासून उत्पन्न होणार्‍या सर्व कामनांचा - अशेषतः त्यक्त्वा - निःशेषरूपाने त्याग करून; मनसा इन्द्रियग्रामम् - मनानेच सर्व इंद्रियांना; समन्ततः एव विनियम्य - सर्व बाजूंनीच चांगल्याप्रकारे संयमित करून; ॥ २४ ॥
शनैः शनैः उपरमेत् - क्रमाक्रमाने अभ्यास करत असताना उपरती प्राप्त करून घ्यावी; च धृतिगृहीतया बुद्ध्या - तसेच धैर्याने युक्त अशा बुद्धीच्या मार्फत; मनः आत्मसंस्थम् कृत्वा - मनाला परमात्म्यामध्येच स्थित करून; किंचित् अपि न चिन्तयेत् - परमात्म्याशिवाय अन्य कशाचा विचारही करू नये. ॥ २५ ॥

व्याख्या : किंच एवं वक्ष्यमाणप्रकारेण योगं अभ्यसमानं योगिनं उत्तमं सुखं उपैति - इति चतुर्थेनान्वयः । योगप्राप्तौ साधनानि अहं योगी सर्वान्‌ ब्रह्मलोकपर्यंतान्‌ संपूर्णान्‌ अशेषतः सवासनान्‌ कामान्‌ काम्यंत इति कामाः काम्यंते इच्छंते तान्‌ कामान्‌ मनोरथान्‌ त्यक्त्वा समंततः आसमंताद्‌भागे इंद्रियग्रामं इंद्रियाणां ग्रामः इंद्रियग्रामः तं इंद्रियग्रामं बाह्यांतःकरणसमुदायं मनसा सह विनियम्य विशेषेण नियम्य बुद्ध्या निश्चयवृत्त्या शनैः शनैः गुरूपदिष्टमार्गेण मंदं मंदं उपरमेत्‌ उपरमं कुर्यात्‌ । उप स्वरूपसमीपे रमं रमयतीति रमः तं रमं प्रीतिं संपादयेत्‌ । कथंभूतान्‌ कामान्‌ । संकल्पप्रभावान्‌ संकल्पात्‌ प्रभवो येषां ते संकल्पप्रभवाः तान्‌ । कथंभूतया बुद्ध्या धृतिगृहीतया धृत्या धैर्येण गृहीता धृतिगृहीता तया । किंच योगी मनः अंतःकरणं आत्मसंस्थं तिष्ठति तत्‌ स्थं सम्यक्‌ स्थं संस्थं आत्मन्येव संस्थं आत्मसंस्थं कृत्वा किंचिदपि अन्यदपि न चिंतयेत्‌ ॥ २४-२५ ॥

अर्थ : संकल्प हेंच जयाचें कारण आहे - संकल्पापासून उत्पन्न झालेल्या सर्व कामांचा समूळ त्याग करून व विवेकयुक्त मनानेंच इंद्रिय समुदायास सर्व बाजूंनी नियमित करून धैर्याने युक्त अशा बुद्धीनें हळु हळू उपरत व्हावे. अंतःकरणाला शांत करावे. मनाला आत्म्यामध्ये संस्थित करून, आत्माच सर्व आहे, त्याहून निराळें कांहीं नाहीं. अशाप्रकारें मनाला आत्मसंस्थ करून कशाचेंही चिंतन करूं नये. मनाची निवडता हा योगाचा परम अवधि आहे. ॥ २४-२५ ॥

विवरण :


यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥ ६-२६ ॥

अन्वय : एतत् अस्थितम् चंचलम् मनः - हे स्थिर न राहणारे आणि चंचल असणारे मन; यतः यतः निश्चरति - ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात संचार करते; ततः ततः नियम्य - त्या त्या विषयापासून रोखून म्हणजे बाजूला नेऊन; आत्मनि एव वशं नयेत् - पुनः पुनः परमात्म्यामध्येच निरुद्ध करावे. ॥ २६ ॥

व्याख्या : मनः अंतःकरणं यतः यतः यस्मात्‌ यस्मात्‌ शब्ददिव्य्षयात्‌ चंचलं सत्‌ विक्षिप्तं सत्‌ निश्चरति समाधिविरोधिनीं वृत्तिं उत्पादयति तथा लयहेतूनां निद्राश्रमादीनां मध्ये यतः यतः निमित्तात्‌ मनः स्थिरं सत्‌ लयाभिमुखं सत्‌ निश्चरति समाधिविरोधिनीं निद्राख्यां वृत्तिं उत्पादयति ततः ततः विक्षेपनिमित्तात्‌ चेत्यपरं लयनिमित्तात्‌ एतत्‌ मनः नियम्य निर्वृत्तिकं कृत्वा आत्मन्येव स्वप्रकाशपरमानंदघने वशं नयेत्‌ निरुंध्यात्‌ । यथा न विक्षिप्येत न लीयेत तथैव प्रविलापयेत्‌ ॥ २६ ॥

अर्थ : याप्रमाणें योगाभ्यासाच्या आरंभी मनाला आत्म्यामध्ये निश्चल करावयास प्रवृत्त झालेल्या योग्याचे मन रागादि स्वभावदोषामुळे अत्यंत चंचल व त्यामुळेंच अस्थिर होऊन ज्या ज्या शब्दादि विषयांच्या निमिताने बाहेर पडते- आत्म्यापासून दूर होऊन विषयांच्या मागोमाग धावूं लागते; त्या त्या शब्दादि विषयांपासून त्याला नियमित करून आत्म्यामध्येंच स्थिर करावे. त्याला आत्मवश करावे.
शब्दादि विषय, हे निमित्त क्षणभंगुर, दुःखमिश्र, कष्टसाध्य आहे, इत्यादि त्याच्या यथार्थ स्वरूपाचें आलोचन करून व वैराग्यभावनेनें 'हे मला नकोत. हे दुःखद आहेत' अशा चिंतनानें, त्या त्या निमित्ताला आभासरूप करून शब्दादि निमित्त हें सुखसाधन नसून मिथ्या आभास आहे, असा निश्चय करावा आणि त्या त्या निमित्तापासून मनाचें नियमन करून त्याला आत्मवश्यतेला प्राप्त करावे. त्याला आत्म्याच्या अधीन करावे. विषयांकडे जाऊं देऊं नये. याप्रमाणे योगाभ्यासाच्या बलाने योग्याचें मन आत्म्यामध्यें प्रशांत होतें. ॥ २६ ॥

विवरण :


प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतममकल्मषम् ॥ ६-२७ ॥

अन्वय : हि प्रशान्तमनसम् - कारण ज्याचे मन चांगल्या प्रकारे शांत झाले आहे; अकल्मषम् च शान्तरजसम् - जो पापाने रहित आहे आणि ज्याचा रजोगुण शांत होऊन गेलेला आहे अशा; ब्रह्मभूतम् एनम् योगिनम् - सच्चिदानंदघन ब्रह्माशी एकीभाव प्राप्त झालेल्या या योग्याला; उत्तमम् सुखम् उपैति - उत्तम आनंद प्राप्त होतो. ॥ २७ ॥

व्याख्या : उत्तमं निरतिशयं सुखं ब्रह्मसुखं एनं प्रस्तुतं योगिनं उपैति प्राप्नोति प्रत्यग्‌रूपेण आविर्भवति ॥ हि इति निश्चयेन । कथंभूतं योगिनम्‌ । प्रशांतमनसं प्रकर्षेण शांतं उपशमं गतं मनो यस्य सः प्रशांतमनाः तम्‌ । पुनः कथंभूतं योगिनम्‌ । शांतरजसं शांतं रजः रजोगुणः यस्य सः शांतरजाः तं शांतरजसं विक्षेपशून्यम्‌ । पुनः कथंभूतं योगिनम्‌ । अकल्मषं नि विद्यते कल्मषं लयहेतु तमः यस्य सः अकल्मषं तम्‌ । अकल्मषं संसारहेतुधर्मादिरहितं लयशून्यम्‌ । पुनः कथंभूतम्‌ । ब्रह्मभूतं ब्रह्मैव सर्वमिति निश्चयेन समं वा ब्रह्मप्राप्तं जीवन्मुक्तमित्यर्थः । अयं मधुसूदनाभिप्रायः । कथंभूतं सुखम्‌ । ब्रह्मभूतं सिद्धब्रह्मरूपम्‌ । पुनः कथंभूतं सुखम्‌ । शांतरजसं गुणातीतम्‌ । पुनः कथंभूतं सुखम्‌ । अकल्मषं प्रपंचदोषरहितम्‌ । अयं चिदानंदाभिप्रायः ॥ २७ ॥

अर्थ : ज्याचें चित्त अत्यंत शांत झाले आहे व ज्याच्यांतील मोहादि क्लेशरूप मल शांत झाले आहेत, अशा या ब्रह्म झालेल्या जीवन्मुक्त व अधर्मादि रहित योग्याला निरतिशय सुख प्राप्त होतें. ॥ २७ ॥

विवरण :


युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः ।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥ ६-२८ ॥

अन्वय : विगतकल्मषः योगी - पापरहित योगी हा; एवं सदा आत्मानं युञ्जन् - अशाप्रकारे निरंतर आत्म्याला परमात्म्यामध्ये लावीत; सुखेन ब्रह्मसंस्पर्शम् - सुखाने परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती हे स्वरूप असणारा; अत्यंतम् सुखम् अश्नुते - अनंत आनंद अनुभवतो. ॥ २८ ॥

व्याख्या : योगी योगयुक्तः सुखेन अनायासेन अत्यंतं अतं नाशं अतीत्य अतिक्रम्य वर्तत इति अत्यंतं सुखं सुष्ठुं प्रपंचं खनति अनात्मत्वेन दूरीकरोति तत्‌ सुखं विज्ञानमानंदं ब्रह्म अश्नुते व्याप्नोति अहं ब्रह्मेति व्याप्तिं करोति । कथंभूतः योगी । एवं प्रकारेण सदा निरंतरं सद्‌रूपेण आत्मानं मनः युंजन्‌ युंजतीति युंजन्‌ स्वनिष्ठं कुर्वन्‌ । पुनः कथंभूतं योगी । विगतकल्मषः विशेषेण गतं अदर्शनं नीतं कल्मषं विवर्तरूपं प्रपंचजातं यस्य सः । पुनः कथंभूतं सुखम्‌ । ब्रह्म संस्पर्शं ब्रह्मणः संस्पर्शो तादात्म्यं यस्मिन्‌ तत्‌ ब्रह्मसंस्पर्शन्‌ ॥ २८ ॥

अर्थ : अर्जुना, हेच मी अधिक स्पष्ट करून सांगतो - पूर्वोक्त क्रमाने राग-द्वेषशून्य योगी सदा चित्तसमाधानाचा अभ्यास करतो. त्या अभ्यासामुळेंच त्याचे सर्व पाप निवृत्त होते. त्यामुळे त्याला ब्रह्मस्वरूपभूत नित्य सुख अनायासाने होते.
ब्रह्माशीं तादात्म्य पावलेल्या त्याला नित्य सुख स्वभावतःच मिळते. ॥ २८ ॥

विवरण :


सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥ ६-२९ ॥

अन्वय : योगयुक्तात्मा - सर्वव्यापी अनंत चैतन्यान एकीभावाने स्थितिरूप अशा योगाने युक्त असा आत्मवान्; सर्वत्र समदर्शनः - तसेच सर्व ठिकाणी समभावाने पाहणारा ओगी; आत्मानम् सर्वभूतस्थम् - आत्म्याला सर्व भूतांमध्ये स्थित; च सर्वभूतानि आत्मनि ईक्षते - सर्व भूतांना आत्म्यामध्येच कल्पित असे पाहतो. ॥ २९ ॥

व्याख्या : योगी योगमुक्तः सर्वभूतस्थं सर्वाणि च तानि भूतानि च सर्वभूतानि सर्वभूतेषु स्थावरजंगमेषु शरीरेषु तिष्ठतीति सर्वभूतस्थः तं आत्मानं प्रत्यक्‌चेतनं साक्षिणं आनंदघनं विवेकेन ईक्षते पश्यति । चेत्यपरं आत्मनि साक्षिणि सर्वभूतानि सर्वाणि च तानि भूतानि च सर्वभूतानि स्थावरजंगमानि विवेकेन ईक्षते पश्यति । कथंभूतः योगी । योगयुक्तात्मा योगेन वृत्तिनिरोधरूपेण युक्तः समाहितः आत्मा अंतःकरणं यस्य सः । पुनः कथंभूतः योगी । सर्वत्र सर्वेष्विति सर्वत्र सर्वेषु स्थावरजंगमेषु समदर्शनः समं ब्रह्मैव दर्शनं अवलोकनं यस्य सः ॥ २९ ॥

अर्थ : ज्याचे अंतःकरण योगाने युक्त समाहित आहे आणि ज्याचे ज्ञान सर्व भूतांमध्ये सम आहे, तो स्वात्म्याला सर्वभूतांमध्यें व सर्वभूतांना आत्म्यामध्ये स्थित असलेले पाहतो.
समाहितचित्त व सर्वत्र समब्रह्म पहाणारा योगी स्वात्म्याला सर्व भूतांमध्ये पहातो. त्याला ब्रह्मात्मैक्य ज्ञान होते. तो ब्रह्मादिस्तंबपर्यत सर्व भूते आत्म्यामध्ये एकतेला प्रास झालीं आहेत, असे जाणतो. येथे सर्व संसाराच्या विच्छेदाचे कारण जे ब्रह्मैकत्वदर्शनरूप योगफल तेंच सांगितले आहे. ॥ २९ ॥

विवरण :


यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥ ६-३० ॥

अन्वय : यः सर्वत्र मां पश्यति - जो पुरुष सर्व भूतांमध्ये सर्वांचा आत्मा अशा मज परमात्म्यालाच व्यापक असे पाहतो; च सर्वं मयि पश्यति - आणि सर्व भूतांना मज वासुदेवामध्येच पाहतो; तस्य अहं मी न प्रणश्यामि - त्याच्या बाबतीत मी अदृश्य होत नाही; च सः मे न प्रणश्यति - तसेच तो माझ्यासाठी अदृश्य होत नाही. ॥ ३० ॥

व्याख्या : यः योगी सर्वत्र भूतमात्रे आत्मत्वेन मां सदानंदरूपं पश्यति । चेत्यपरं सर्वं भूतमात्रं मयि आत्मनि आत्मन्येव पश्यति तस्य योगिनः अहं न प्रणश्यामि अदृश्यो न भवामि परोक्षत्वेन तिष्ठामि । चेत्यपरं सः योगी सर्वत्र समदर्शी मे मम न प्रणश्यति अदृश्यो न भवति । उभयोः एकरूपत्वात्‌ परस्परं तादात्म्येन अवस्थानं भवतीति तात्पर्यम्‌ ॥ ३० ॥

अर्थ : 'आतां या आत्मैकत्व ज्ञानाचे फल काय,' म्हणून विचारशील तर सांगतों - जो योगी-ज्ञानी मज वासुदेवाला - सर्व भूतांच्या आत्म्याला सर्व भूतांमध्ये पहातो आणि ब्रह्मादि सर्वच भूतजात मज सर्वात्म्यामध्ये पहातो, त्याला मी - परमानंदात्मा कधीं परोक्ष होत नाहीं. तर नेहमी प्रत्यक्ष असतो व तो एकत्वदर्शी ज्ञानी मला कधीं परोक्ष होत नाही.
त्याचें व माझें एकात्मत्व असल्यामुळें आम्ही परस्परांना नेहमी अपरोक्ष असतो. ॥ ३० ॥

विवरण :


सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥ ६-३१ ॥

अन्वय : एकत्वम् आस्थितः - एकीभावात स्थित होऊन; यः सर्वभूतस्थितम् - जो पुरुष सर्व भूतांत आत्मस्वरूपाने स्थित असणार्‍या; मां भजति - मज सच्चिदानंदघन वासुदेवाला भजतो; सः योगी सर्वथा - तो योगी सर्व प्रकारांनी - वर्तमानः अपि सः मयि वर्तते - व्यवहार करीत असताना सुद्धा तो माझ्यामध्येच व्यवहार करतो. ॥ ३१ ॥

व्याख्या : यः समदर्शी एकत्वं आत्मैकतां आस्थितः सन्‌ आश्रितः सन्‌ सर्वभूतस्थितं सर्वाणि च तानि भूतानि च सर्वभूतानि सर्वभूतेषु भूतमात्रेषु स्थितः अधिष्ठानतया स्थितः सर्वभूतस्थितः तं मां ईश्वरं भजति अनुभवति अहं ब्रह्मास्मीनि वेदांत्वाक्यज्ञानेन साक्षात्करोति सः योगी सर्वथा सर्वप्रकारेणे वर्तमानोपि कर्मत्यागेन विद्यमानोपि मयि सर्वाधिष्ठाने परमात्मनि वर्तते जीवन्नेव मदैक्यं प्राप्नोति । सर्वकर्मत्यागेन याज्ञवल्क्यादिवत्‌ विहितेन कर्मणा जनकादिवत्‌ निषिद्धेन कर्मणा च दत्तात्रेयादिवत्‌ भवति ॥ ३१ ॥

अर्थ : एकत्वास पूर्णपणे प्राप्त झालेला जो ज्ञानी सर्व भूतांमध्ये स्थित असलेल्या मला भजतो, तो योगी-ज्ञानी भक्त कोणत्याही प्रकारें जरी वागत असला, तरी माझ्या ठिकाणी-परमपदीं रहातो. ॥ ३१ ॥

विवरण :


आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥ ६-३२ ॥

अन्वय : अर्जुन - हे अर्जुना; यः आत्मौपम्येन - जो योगी आपल्याप्रमाणेच; सर्वत्र समं पश्यति - सर्व भूतांमध्ये सम पाहतो; वा सुखं यदि वा दुःखम् - तसेच सर्वांचे शुख वा दुःख आपल्याप्रमाणे सम पाहतो; सः योगी परमः मतः - तो योगी परम श्रेष्ठ मानला गेला आहे. ॥ ३२ ॥

व्याख्या : हे अर्जुन ! यः परमहंसपरिव्राट्‌ आत्मौपम्येन आत्मैव उपमा यस्य सः आत्मौपमः आत्मौपमस्य भावः आत्मौपम्यं तेन आत्मौपम्येन आत्मदृष्टांतेन सर्वत्र प्राणिजाते सुखं यदि वा अथवा दुःखं समं तुल्यं पश्यति अवलोकयति । यथा स्वस्य आत्मनः अनिष्टं अकल्याणं न संपादयति तथा परस्यापि अन्यस्यापि अकल्याणं न संपादयति । द्वेषशून्यत्वात्‌ । यथा स्वस्य आत्मनः इष्टं कल्याणं संपादयति तथा परस्यापि अन्यस्यापि कल्याणं संपादयति । रागशून्यत्वात्‌ । सः निर्वासनतया शांतात्मा योगी ब्रह्मवित्‌ परमः श्रेष्ठः ममापि मतः मान्यः अस्ति । तत्त्वज्ञानाभ्यासेन चेत्यपरं मनोनाशाभ्यासेन वासनाक्षयाभ्यासेन च रागद्वेषशून्यतया य योगी स्वपरदुःखादिषु समदृष्टिः वर्तते सः योगी परमः श्रेष्ठः मम मतः मान्यः अस्ति । यस्तु योगी विषमदृष्टिः वर्तते सः योगी तत्त्वज्ञानवानपि अपरमः अमान्यः ॥ ३२ ॥

अर्थ : अर्जुना, जो सर्वभूतांमध्ये आपल्या उपमेनें मुल किंवा दुःख पहातो, तो श्रेष्ठ योगी मानलेला आहे.
आपल्याला जसें सुख इष्ट व दुःख अनिष्ट त्याचप्रमाणें सर्प प्राण्यांना सुख इष्ट व दुःख अनिष्ट आहे, असें समजून जो ज्ञानी कोणालाही पीडा देत नाही, तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ योगी होय. ॥ ३२ ॥

विवरण :


या पूर्वोक्त सम्यग्ज्ञानरूप योगाचें संपादन मोठ्या कष्टानेच करतां येते. असे पाहून त्याच्या प्राप्तीचा निश्चित उपाय ऐकण्याची इच्छा करणारा अर्जुन म्हणाला -

अर्जुन उवाच ।
योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।
एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात्स्थितिं स्थिराम् ॥ ६-३३ ॥
चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्‌दृढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥ ६-३४ ॥

अन्वय : मधुसूदन - हे मधुसूदना; अयं यः साम्येन योगः - हा जो सम- भावाच्या बाबतीत योग; त्वया प्रोक्तः - तुम्ही संगितला; मनसः चंचलत्वम् एतस्य स्थिराम् - मनाच्या चंचलपणामुळे याची नित्य स्थिर; स्थितिं अहं न पश्यामि - स्थिती मला दिसत नाही. ॥ ३३ ॥
हि कृष्ण - कारण हे कृष्णा; मनः चंचलम् - मन फार चंचल; प्रमाथि - घुसळून काढण्याचा स्वभाव असणारे; दृढम् - अत्यंत बळकट; च बलवत् - आणि बलवान् आहे; अतः तस्य निग्रहम् - म्हणून त्याचा निग्रह करणे; वायोः इव - हे वायूला रोखण्यासारखे; दुष्करं अहं मन्ये - अत्यंत दुष्कर आहे असे मला वाटते. ॥ ३४ ॥

व्याख्या : हे मधुसूदन ! मधोः मधुनाम्नः दैत्यस्य सूदनं नाशनं यस्मात्सः मधुसूदनः तत्संबुद्धौ हे मधुसूदन ! यः अयं सर्वत्र समदृष्टिलक्षणः योगः युज्यते अनेनेति योगः युज्यते जीवः ब्रह्मणा सह ऐक्यं प्राप्यत इति योगः शास्त्रप्रसिद्धः साम्येन समत्वेन त्वया सर्वज्ञेन ईश्वरेण प्रोक्तः प्रकर्षेण कथितः । अहं एतस्य त्वदुक्तस्य सर्वमनोवृत्तिनिरोधलक्षणस्य योगस्य स्थितिं विद्यमानतां स्थिरां दीर्घकालानुवर्तिनीं मनसः चंचलत्वात्‌ चंचलस्य भावः चंचलत्वं तस्मात्‌ न पश्यामि नानुभवामि ॥ ३३ ॥
हे कृष्ण ! कर्षतीति कृष्णः तत्संबुद्धौ हे कृष्ण ! कर्षति भक्तानां पापादिदोषान्‌ सर्वथा निवारयितुं अशक्यानपि निवारयति । हे कृष्ण ! हे सदानंदस्वरूप ! मनः अंतःकरणं चंचलं स्वभावेनैव चपलं अस्ति इति अहं अनुभवामि । हि इति निश्चयेन । कथंभूतं मनः । प्रमाथि प्रकर्षेण शरीरं चेत्यपरं इंद्रियाणि मथितुं क्षोभयितुं शीलं स्वभावः यस्य तत्‌ प्रमाथि । पुनः कथंभूतं मनः । बलवत्‌ बलं विद्यते यस्य तत्‌ बलवत्‌ विचारेणापि जेतुं अशक्यम्‌ । पुनः कथंभूतं मनः । दृढं विषयवासनानुबद्धतया दुर्भेदं दुःखेन कष्टेन भेदितमशक्यं दुर्भेदम्‌ अहं तस्य मनसः निग्रहं निरोधं वायोरिव सुदुष्करं सर्वथा निग्रहं कर्तुं अशक्यं मन्ये जानामि यथा आकाशे दोधूयमानस्य वायोः कुंभादिषु निरोधनं अशक्यं तद्वत्‌ ॥ ३४ ॥

अर्थ : हे मधुसूदना, तूं जो हा योग समत्वाने सांगितलास, त्या योगाची निश्चल स्थिति मनाच्या चंचलपणामुळें मला संभवनीय दिसत नाहीं. कारण हे कृष्णा, मन अतिशय चंचल आहे. तें शरीर व इंद्रिये यांना व्याकुल करणारे, अतिशय दुर्निवार व अच्छेद्य आहे, त्याचा निग्रह वायूच्या निग्रहाप्रमाणें अति दुष्कर आहे, असे मी समजतों. मन अतिशय चंचल आहे, ही गोष्ट प्रसिद्ध असल्यामुळें मनोनिग्रहाच्या द्वारा योगाचे स्थैर्य संपादन करावे, अशी नुसती कल्पनाही करवत नाहीं. मन अतिशय अस्थिर आहे, इतकेच नव्हे, तर ते अतिशय क्षुब्ध करणारें, बलकट व तंतुनागाप्रमाणे अच्छेद्य आहे. त्यामुळे त्याचा निग्रह करणे म्हणजे वायुची मोट बांधणेच आहे. ॥ ३३-३४ ॥

विवरण :


श्रीभगवानुवाच -
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥ ६-३५ ॥

अन्वय : महाबाहो - हे महाबाहो; असंशयं मनः - निःसंशयपणे मन हे; चलम् च दुर्निग्रहम् - चंचल आणि वश करून घेण्यास कठीण आहे; तु कौन्तेय - परंतु हे कुंतिपुत्र अर्जुना; इदं मनः अभ्यासेन - हे मन अभ्यासाने; च वैराग्येण गृह्यते - आणि वैराग्याने वश करून घेता येते. ॥ ३५ ॥

व्याख्या : हे महाबाहो ! महांतौ साक्षात्‌ महादेवेनापि कृतप्रहरणौ बाहु यस्य सः महाबाहुः तत्संबुद्धौ हे महाबाहो ! मनः अंतःकरणं दुर्निग्रहं दुःखेनापि निगृहीतुं अशक्यं दुर्निग्रहं चलं स्वभावंचचलं अस्ति । इति त्वं असंशयं नास्त्येव संशयो यस्मिन्‌ तत्‌ असंशयं सत्यं ब्रवीषि । तथापि एवं सत्यपि हे कौंतेय ! हे पितृष्वसृपुत्र ! त्वं मया अवश्यमेव सुखी कर्तव्यः' इति स्नेहानुबंधसूचनेन आश्वासयति । योगिनां मनः अभ्यासेन परमात्माकारप्रत्ययावृत्त्या चेत्यपरं वैराग्येण विषयवैतृष्ण्येन गृह्यते वशीक्रियते । तदुक्तं योगशास्त्रे - 'मनसो वृत्तिशून्यस्य ब्रह्माकारतया स्थितिः । यः संप्रज्ञातनामासौ समाधिरभिधीयते' - इति ॥ ३५ ॥

अर्थ : श्रीकृष्ण म्हणाले - महापराक्रमी अर्जुना, मन अतिशय दुर्निवार्य व चंचल आहे यांत संशय नाही. पण अभ्यास व वैराग्य या उपायांनी याचा निग्रह करतां येतो.
चित्ताच्या समान प्रत्ययाची आवृत्ति व विषयदोष- दर्शनाचा अभ्यास यांच्या योगाने पूर्ण वैराग्य बाणून चित्ताच्या प्रचाराचा- विषयोन्मुखतेचा निरोध केला असतां तें विषयविमुख-अंतर्निष्ठ होऊन रहाते. ॥ ३५ ॥

विवरण :


असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः ।
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥ ६-३६ ॥

अन्वय : असंयतात्मना योगः - ज्याने मन वश करून घेतलेले नाही अशा पुरुषाला योग - दुष्प्रापः - प्राप्त होण्यास कठीण आहे; तु सः योगः वश्यात्मना - परंतु तो योग ज्याने मन वश करून घेतले आहे अशा; यतता उपायतः - प्रयत्‍न करणार्‍या पुरुषाला साधनाद्वरे; अवाप्तुम् शक्यः - प्राप्त करून घेणे सहज शक्य आहे; इति मे मतिः - असे माझे मत आहे. ॥ ३६ ॥

व्याख्या : असंयतात्मना असंयतः उत्पन्नेति तत्त्वसाक्षात्कारे वेदांतव्याख्यानादिव्यासंगात्‌ आलस्यादिदोषात्‌ अभ्यासवैरागाभ्यां अनिरुद्धः आत्मा अंतःकरणं येन सः असंयतात्मा तेन असंयतात्मना तत्त्वसाक्षात्कारवतापि योगिना योगः मनोवृत्तिनिरोधः दुष्प्रापः दुःखेनापि प्राप्तुं न शक्यते इति एवंप्रकारेण मे मम मतिः निश्चयः । अस्तीति शेषः । केन योगः प्राप्यते । वश्यात्मना तु वश्यः वैराग्यपरिपाकेन वासनाक्षये सति स्वाधीनः विषयपारतंत्र्यशून्यः आत्मा अंतःकरणं यस्य सः वश्यात्मा तेन वा एतादृशेन योगिना योगः सर्वचित्तवृत्तिनिरोधः उपायतः उपायात्‌ पुरुषकारस्य लौकिकस्य वैदिकस्य प्रारब्धकर्मापेक्षया प्राबल्यात्‌ अवाप्तुं चित्तचांचल्यनिमित्तानि प्रारब्धकर्माणि अभिभूय पराभूय प्राप्तुं शक्यः समर्थः । कथंभूतेन योगिना । यतता यततीति यतन्‌ तेन यतता वैराग्येण अभ्यासं कुर्वता ॥ ३६ ॥

अर्थ : ज्याचें चित्त अभ्यास व वैराग्य यांच्या योगानें निरुद्ध झालेले नसतें, त्याला योग मोठ्या कष्टाने संपादन करतां येतो, अशी माझी मति आहे. परंतु ज्याने आपले अंतःकरण अभ्यास व वैराग्य यांच्या योगाने स्वाधीन करून घेत. आहे व आणखींही जो यत्‍न करीत आहे, त्यालाच पूर्वोक्त उपायानें योग साध्य होणें शक्य आहे.
अंतःकरण जरी स्वाधीन झाले, तरी वैराग्यादिकांविषयीं अत्यंत आस्था बाळगावी. असे येथे 'यतता' या पदानें सूचविले आहे. ॥ ३६ ॥

विवरण :


इहलोक-परलोकाच्या प्राप्तीची साधनें अशीं जी अग्निहोत्रादि श्रौत- स्मार्त कमें, त्यांचा संन्यास करून योगाभ्यासाला आरंभ केला, पण योग- सिद्धीचे फळ व मोक्षाचें साधन असे जे सम्यग्ज्ञान तेंही प्राप्त झाले नाहीं. त्यामुळें योगी मरणसमयीं योगमार्गापासून चलित चित्त झाला, म्ह० त्याचे चित्त त्या मार्गापासून भ्रंश पावले. अशा स्थितीत त्याला दोन्ही फळापासून च्युत होण्याचा प्रसंग येतो. अशा आशयाने-

अर्जुन उवाच -
अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥ ६-३७ ॥
कच्चितन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥ ६-३८ ॥
एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः ।
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥ ६-३९ ॥

अन्वय : कृष्ण - हे श्रीकृष्णा; श्रद्धया उपेतः - जो योगाबर श्रद्धा ठेवणारा आहे; किंतु यः अयतिः - परंतु जो संयमी नाही या कारणाने ज्याचे मन अंतःकाळी; योगात् चलितमानसः - विचलित झाले आहे अशा साधक योग्याला; योगसंसिद्धिम् - योगाची सिद्धी म्हणजे भगवत्साक्षात्कार - योगाची सिद्धी म्हणजे भगवत्साक्षात्कार; अप्राप्य सः - प्राप्त होणार नाही तो; कां गतिं गच्छति - कोणती गती प्राप्त करून घेतो. ॥ ३७ ॥
महाबाहो - हे महाबाहू; सः ब्रह्मणः पथि - तो भगवत्प्राप्तीच्या मार्गावर; विमूढः च अप्रतिष्ठः - मोहित व आश्रयरहित असा पुरुष; छिन्न अभ्रं इव - छिन्न भिन्न झालेल्या ढगाप्रमाणे - उभयविभ्रष्टः कच्चित् न नश्यति - दोन्हींकडून भ्रष्ट होऊन नष्ट तर होत नाही ना ? ॥ ३८ ॥
कृष्ण, मे एतत् संशयम् - हे श्रीकृष्णा, माझा हा संशय; अशेषतः छेत्तुं अर्हसि - संपूर्णपणे नष्ट करण्यास तुम्हीच समर्थ आहात; हि अस्य संशयस्य - कारण या संशयाला; छेत्ता त्वदन्यः न उपपद्यते - छेदुण टाकणारा तुमच्याशिवाय दुसरा कोणी मिळणे संभवत नाही. ॥ ३९ ॥

व्याख्या : हे कृष्ण ! हे सदानंदरूप ! पूर्वं प्रथमं श्रद्धया आस्तिक्यबुद्ध्या उपेतः सन्‌ युक्तः सन्‌ योगे प्रवृत्तः सन्नापि पश्चात्‌ अयतिः सन्‌ यततीति यतिः न यतिः अयतिः प्रयत्नशिथिलः सन्‌ योगात्‌ योगाभ्यासात्‌ चलितमानसः चलितं योगफलं अप्राप्तं मानसं यस्य सः चलितमानसः तथोक्तः सन्‌ योगसंसिद्धिं योगस्य संसिद्धिः पुनरावृत्तिरहितं ज्ञानं योगसंसिद्धिः तां अप्राप्य न प्राप्य तत्त्वज्ञः मृतः सन्‌ कां गतिं गम्यत इति गतिः तां गतिं फलं वा सुगतिं वा दुर्गतिं गच्छति प्राप्नोति कर्मणां परित्यागात्‌ चेत्यपरं ज्ञानस्य अनुत्पत्तेः ॥ ३७ ॥
हे महाबाहो ! महांतः सर्वेषां भक्तानां सर्वोपद्रवनिवारणसमर्थाः अथवा पुरुषार्थचतुष्टयदानसमर्थाः चत्वारः बाहवो यस्य सः महाबाहुः तत्संबुद्धौ हे महाबाहो ! हे अनंतब्रह्मांडकटाहधारक ! ब्रह्मणः पथि ब्रह्मप्राप्तिमार्गे ज्ञाने विमूढः सन्‌ अनुत्पन्नब्रह्मात्मैक्यसाक्षात्कारः सन्‌ चेत्यपरं अप्रतिष्ठः सन्‌ देवयानपितृयानमार्गगमनहेतुभ्यां उपासनाकर्मभ्यां साधनाभ्यां रहितः सन्‌ एतादृशः तत्त्वज्ञः उभयभ्रष्टः सन्‌ ज्ञानमार्गात्‌ चेत्यपरं कर्ममार्गात्‌ विभ्रष्टः सन्‌ छिन्नाभ्रमिव वायुना छिन्नमिव विशकलितमिव यथा पूर्वस्मात्‌ मेघात्‌ भ्रष्टं उत्तरमेघं अप्राप्तं अभ्रं वृष्ट्ययोग्यं अंतराले नश्यति । तथा योगभ्रष्टोपि पूर्वस्मात्‌ कर्ममार्गात्‌ विच्छिन्नः उत्तरं ज्ञानमार्गं अप्राप्तः सन्‌ अंतराले नश्यति क्वचित्‌ वा न नश्यति किम्‌ ॥ ३८ ॥
हे कृष्ण ! हे सर्वज्ञ ! त्वं मे मम एतत्‌ इमं पूर्वोपदर्शितं संशयं साकांक्षं प्रश्नं अशेषतः संशयमूलाधर्माद्युच्छेदेन छेत्तुं अपनेतुं विशाशितुं अर्हसि योग्यो भवसि । त्वदन्यः त्वत्‌ परमेश्वरात्‌ सर्वज्ञात्‌ सर्वशास्त्रकृतः गुरोः कारुणिकात्‌ अन्यः त्वदन्यः कश्चित्‌ ऋषिः वा देवः सर्वज्ञः अस्य योगभ्रष्टपरलोकगतिविषयस्य संशयस्य उभयतः संविधानप्रत्ययस्य छेत्ता सम्यक्‌ उत्तरदानेन नाशयिता नोपपद्यते न संभवति । हि इति निश्चयेन । तस्मात्‌ त्वमेव प्रत्यक्षदर्शी सर्वस्य परमो गुरुः मम संशयमेनं छेत्तुं अर्हसि इत्यर्थः ॥ ३९ ॥

अर्थ : अर्जुन म्हणाला - हें कृष्णा, योगमार्गावर अतिशय श्रद्धा असल्यामुळें कर्मत्याग करून योगाचा अंगीकार केला; पण त्यासाठी जितका प्रयत्‍न करावयास पाहिजे, तितका केला नाहीं. शिवाय योगसिद्धीला विघ्ने फार असल्यामुळें एका जन्मांत तो सिद्ध होणे शक्य नसते, अशा अनेक कारणांनीं व मरणसमयीं इंद्रियादियादिकांच्या व्याकुळतेमुळें त्याला योगाचे स्मरण झालें नाही, तेव्हां तो योगभ्रष्ट योगसिद्धिला-आत्मसाक्षात्काराला प्राप्त न होतां कोणत्या गतीला जातो ग! हे पराक्रमी कृष्णा, कर्ममार्ग व योगमार्ग या दोन्ही मार्गांपासून विभ्रष्ट झालेला, भ्रंश आवलेला, त्यामुळे निराधार झालेला, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गांत अत्यंत मूढ झालेला तो आपल्या आधारापासून तुटून निराळ्या झालेल्या अभ्राप्रमाणें नाश तर पावत नाहीं ना ? हे कृष्णा, माझ्या या संशयाला पूर्णपणें तोडण्यास- संशय घालविण्यास तूंच योग्य आहेस. कारण या संशयाचा छेद करणारा तुजवांचून दुसरा कोणी संभवत नाही.
अभ्युदय व निःश्रेयस यांची अप्राप्ति हाच येथील नाश होय. कारण त्याला कोणत्याच मार्गाचा आधार उरलेला नसतो, त्यामुळे ब्रह्मप्राप्तीच्या मार्गांत विभूढ होत्साता तो उभयभ्रष्ट होतो की काय ? हा माझा संशय घालविण्यास तूंच योग्य आहेस. ॥ ३७-३९ ॥

विवरण :


श्रीभगवानुवाच -
पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।
न हि कल्याणकृत्कश्चिद्‌दुर्गतिं तात गच्छति ॥ ६-४० ॥

अन्वय : पार्थ, तस्य इह विनाशः न विद्यते - हे पार्था, त्या पुरुषाचा या लोकात विनाश होत नाही; अमुत्र एव न - तसेच परलोकातही त्याचा विनाश होत नाही; हि तात कल्याणकृत् - कारण अरे बाबा, आत्मोद्धारासाठी म्ह० भगवत्प्राप्तीसाठी कर्म करणारा; कश्चित् दुर्गतिं न गच्छति - कोणीही पुरुष दुर्गती प्राप्त करून घेत नाही. ॥ ४० ॥

व्याख्या : हे पार्थ ! हे कुंतिपुत्र ! कुंतीपुत्र इत्यनेन मातुलेयसंबंधेनगोप्यमपि त्वदुद्देशेन कथयामि तस्य श्रद्धायोगे प्रवृत्तस्य यथाशास्त्रं कृतसर्वकर्मसंन्यासस्य वेदांतश्रवणादि कुर्वतः अंतराले मृतस्य इह अस्मिन्‌ मनुष्यलोके वक्ष्यमाणप्रकारेण विनाशः अनिष्टं नास्त्येव । हि इति अव्ययं विकल्पे । हि अथवा अमुत्र परलोके विनाशः अनिष्टं नास्त्येव । हे तात ! इति लोकरीत्या लालयन्‌ संबोधयति । कश्चिदपि कल्याणकृत्‌ कल्याणं परमपुरुषार्थं करोति साधयतीति कल्याणकृत्‌ दुर्गतिं दुष्टा चासौ गतिश्च दुर्गतिः तां दुर्गतिं इह अकीर्तिं परत्र कीटकादिरूपां नारकीं योनिं न गच्छति न प्राप्नोति । अयं तु सर्वोत्कृष्ट एव सन्‌ दुर्गतिं न गच्छति इति किम्‌ वक्तव्यम्‌ ॥ ४० ॥

अर्थ : श्रीकृष्ण म्हणाले - हे अर्जुना, त्याचा विनाश या लोकीं तर नाहींच, पण परलोकींही होत नाहीं. कारण, अरे बाबा, कोणीही शुभाचरण करणारा दुर्गतीला जात नाही.
योगभ्रष्टाचा शिष्टनिंदारूप ऐहिक नाश किंवा हीनजन्मप्राप्तीरूप पारलौकिकनाश होत नाहीं. शुभाचरण करणारा कोणीहि निंद्यगतीला प्रास होत नाहीं हा नियम आहे. ॥ ४० ॥

विवरण :


प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ६-४१ ॥

अन्वय : योगभ्रष्टः - योगभ्रष्ट पुरुष हा; पुण्यकृताम् लोकान् - पुण्यवान माणसांचे लोक म्हणजे स्वर्गादी उत्तम लोक; प्राप्य - प्राप्त करून घेऊन; तत्र शाश्वतीः समाः - तेथे पुष्कळ वर्षेंपर्यंत - उषित्वा - निवास करून नंतर; सुचीनाम् श्रीमताम् - सुद्ध आचरण असणार्‍या श्रीमंत लोकांच्या; गेहे अभिजायते - घरामध्ये जन्म घेतो. ॥ ४१ ॥

व्याख्या : योगभ्रष्टोपि द्विविधः एकः मंदाभ्यासवान्‌ मृतः द्वितीयः चिरकालाभ्यस्तयोगः आसन्नफलकाले मृतः द्वयोर्मध्ये प्रथमः योगभ्रष्टः मंदाभ्यासवान्‌ मृतः सन्‌ पुण्यकृतां पुण्यं कुर्वंति ते पुण्यकृतः तेषां पुण्यकृतां अश्वमेधयाजिनां लोकान्‌ ब्रह्मलोकान्‌ प्राप्य गत्वा तेषु ब्रह्मलोकेषु शाश्वतीः ब्रह्मपरिमाणेन अक्षयाः समाः संवत्सरान्‌ उषित्वा वासं कृत्वा दिव्यान्‌ भोगान्‌ अनुभूय भोगावसाने शुचिनां सदाचाराणां श्रीमतां लक्ष्मीवतां महाराजचक्रवर्तिनां गेहे कुले अजातशत्रुजनकादिवत्‌ अभिजायते जन्म प्राप्नोति भोगवासनाप्राबल्यात्‌ ब्रह्मलोकांते सर्वकर्मसंन्यासायोग्यो महाराजो भवतीत्यर्थः ॥ ४१ ॥

अर्थ : योगभ्रष्टाचाचा दोन्ही लोकी जर नाश होत नाहीं, तर काय होते, तें सांगतों - योगमार्गापासून भ्रष्ट झालेला संन्यासी पुण्याचरण करणार्‍या श्रेष्ठांच्या लोकांस प्राप्त होऊन हजारों वषें त्या लोकी राहून शात्रोक्त आचरण करणार्‍या श्रीमंताच्या घरीं उत्पन्न होतो.
योगभ्रष्टाच्या मनांत पूर्ण वैराग्य उत्पन्न झालेले नसल्यास तो पुण्यवानांच्या लोकीं जाऊन व तेथे दीर्घकाळ राहून, सुखोपभोगाने पुण्यांशाचा क्षय होतांच येथे शास्त्रविहित आचरण करणार्‍या श्रीमानांच्या घरीं जन्म घेतो. ॥ ४१ ॥

विवरण :


अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् ॥ ६-४२ ॥

अन्वय : अथवा - किंवा वैराग्यवान पुरुष त्या स्वर्गादी लोकांत न जाता; धीमताम् योगिनाम् - ज्ञानवान योग्यांच्या; कुले एव भवति - कुळामध्येच जन्म घेतो; किंतु ईदृशम् यत् एतत् जन्म - परंतु अशा प्रकारचा जो हा जन्म आहे; तद् लोके - तो या संसारात; हि दुर्लभतरम् - निःसंशयपणे अत्यंत दुर्लभ आहे. ॥ ४२ ॥

व्याख्या : मंदाभ्यासवतः योगभ्रष्टस्य गतिं उक्त्वा इदानीं चिरकालाभ्यस्तस्य योगभ्रष्टस्य गतिमाह । अथेत्यनंतरं पूर्वोक्तगतिकथनानंतरं वा पक्षांतरसूचनार्थः योगभ्रष्टः चिरकालाभ्यस्तः मृतः सन्‌ श्रद्धावैराग्यादिकल्याणगुणाधिक्ये भोगवासनाविरहात्‌ पुण्यकृतां अश्वमेधयाजिनां लोकान्‌ ब्रह्मलोकान्‌ अप्राप्येव योगिनां दरिद्राणां ब्राह्मणानां धीमतां ब्रह्मविद्यावतां कुले वंशे भवति जन्म प्राप्नोति । लोके कर्मभूमौ अनेकसुकृतसाध्यत्वात्‌ मोक्षपर्यवसायित्वात्‌ एतत्‌ ईदृशं जन्म शुकादिवत्‌ दुर्लभतरं अतिशयेन दुर्लभं इति दुर्लभतरं दुर्लभादपि दुर्लभं अस्ति । यत्‌ ईदृशं जन्म लोके सर्वप्रमादकारणशून्यं भोगवासनाशून्यत्वेन केनचित्पुण्यातिशयेन दुर्लभम्‌ ॥ ४२ ॥

अर्थ : पण त्याच्यामध्ये श्रद्धा, वैराग्य इत्यादि कल्याणगुणांचें आधिक्य असल्यास कोणता दुसरा पक्ष संभवतो, तेहि सांगतो - किंवा तो योगभ्रष्ट बुद्धिमान् दारिद्र्यांच्याच कुलात उत्पन्न होतो. या लोकी अशाप्रकारचा जन्म होणे हे अतिशय दुर्लभ आहे.
योगभ्रष्टाचा श्रीमानाच्या कुलात जन्म होणे हा एक पक्ष व श्रीमानाच्या कुळाहून भिन्न अशा योग्यांच्याच म्ह० बुद्धिमान् दरिद्री लोकांच्याच कुलांत तो होणें हा दुसरा पक्ष होय. ऐश्वर्यवान् व सदाचारसंपन्न अशा लोकांच्या घरांत जन्म होणे जरी सुलभ नाही, कारण तेही मोठ्या पुण्याईच फल आहे. तरी शुचि, दरिद्री व विद्यावान् लोकांच्या कुलांत जन्म होणे त्याहूनही अधिक दुर्लभ आहे. ॥ ४२ ॥

विवरण :


तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् ।
यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥ ६-४३ ॥

अन्वय : सः तत्र पौर्वदेहिकम् - तो तेथे पूर्वशरीरात् संपादन केलेला; तं बुद्धिसंयोगम् - तो बुद्धीचा संयोग म्हणजे समबुद्धिरूप योगाचा संस्कार; लभते - अनायासे मिळवितो; च कुरुनन्दन ततः - आणि हे कुरुनण्दना, त्याच्या प्रभावामुळे; सः संसिद्धौ - तो परमात्म्याच्या प्राप्तिरूप सिद्धीच्यासाठी; भूयः यतते - पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्‍न करतो. ॥ ४३ ॥

व्याख्या : तत्र तस्मिन्निति तत्र तस्मिन्‌ द्विप्रकारे जन्मनि योगभ्रष्टः तं ब्रह्मात्मैकविषयं बुद्धिसंयोगं बुद्धेः ज्ञानस्य संयोगः पूर्वसंस्कारेण संबंधः बुद्धिसंयोगः तं बुद्धिसंयोगं ज्ञानसंस्कारं लभते प्राप्नोति । कथंभूतं बुद्धिसंयोगम्‌ । पौर्वदेहिकं पूर्वदेहे पूर्वजन्मनि भवः पौर्वदेहिकः तं पौर्वदेहिकं सर्वकर्मसंन्यास गुरूपसदन श्रवणमनन निदिध्यासनानां मध्ये यावत्पर्यंतं अनुष्ठितं चेत्यपरं ततस्तदनंतरं तल्लाभानंतरं भूयः अधिकं संसिद्धौ अविलंबेन साक्षात्वैवल्यप्राप्तौ यतते प्रयत्नं करोति । हे कुरुनंदन ! तवापि शुचीनां श्रीमतां कुले योगभ्रष्टजन्म जातं इति पूर्ववासनावशात्‌ अनायासेनैव ज्ञानलाभो भविष्यति इति सूचयितुं महाप्रभावस्य कुरोः कीर्तनम्‌ ॥ ४३ ॥

अर्थ : कारण तो योगभ्रष्ट त्या दरिद्री योग्यांच्या कुलांत पूर्वदेहांतील या बुद्धिसंयोगास प्राप्त होतो आणि हे कुरुनंदना, योगसिद्धिसाठीं पूर्वजन्मांतील अभ्यासाच्या संस्कारामुळे अधिकच यत्‍न करितो.
या उत्तम जन्मांत त्याला पूर्वजन्मांतील बुद्धीच्या लाभ होतो व त्यामुळे तो पूर्वीपेक्षां श्रवणादिकांविषयीं फारच मोठ्या प्रमाणावर यत्‍न करतो. ॥ ४३ ॥

विवरण :


पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः ।
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥ ६-४४ ॥

अन्वय : सः तेन पूर्वाभ्यासेन एव - श्रीमंताच्या घरात जन्मलेला तो योगभ्रष्ट योगी, त्या पूर्वकृत अभ्यासामुळेच; अवशः हि ह्रियते - पराधीन होऊन निःसंशयपणे भगवंतांकडून आकर्षित केला जातो; तथा योगस्य जिज्ञासु अपि - तसेच समबुद्धिरूप योगाचा जिज्ञासूसुद्धा; शब्दब्रह्म अतिवर्तते - वेदात सांगितलेल्या सकाम कर्मांचे फळ उल्लंघन करून जातो. ॥ ४४ ॥

व्याख्या : सः योगभ्रष्टः तेन अविचिरव्यवहितजन्मोपचितेन पूर्वाभ्यासेन पूर्वश्चासौ अभ्यासश्च पूर्वाभ्यासः तेन पूर्वाभ्यासेन प्राक्‌ अर्जितज्ञानसंस्कारेण केनचित्प्रतिबंधेन अवशेपि मोक्षसाधनाय अप्रयतमानोपि ह्रियते स्ववशीक्रियते अकस्मादेव भोगवासनाभ्यः व्युत्थाय मोक्षसाधनोन्मुखः क्रियते । पश्य । यथा त्वमेव त्वमेव युद्धे प्रवृत्तः ज्ञानाय अप्रयतमानोपि पूर्वसंस्कार प्राबल्यात्‌ अकस्मादेव रणभूमौ ज्ञानोन्मुखः अभूः जातः । अनेकजन्म सहस्रव्यवहितोपि ज्ञानसंस्कारः स्वकार्यं करोत्येव । हे अर्जुन ! योगस्य मोक्षसाधनस्य जिज्ञासुः ज्ञातुं इच्छतीति जिज्ञासुः शब्दब्रह्म कर्मप्रतिपादकं वेदं अतिवर्तते अतिक्रम्य तिष्ठति । कर्माधिकारातिक्रमेण ज्ञानाधिकारी भवतीत्यर्थः ॥ ४४ ॥

अर्थ : कारण, पूर्वजन्मी केलेल्या त्याच अम्यासानें तो अवश असलेलाही योगभ्रष्ट आकर्षण केला जातो. योगाचे स्वरूप जाणण्याची इच्छा करणाराही तो वेदोक्त कर्मानुष्टानफलाचें उल्लंघन करतो.
कर्ममार्गांत प्रवृत्त झालेला कर्मी त्या मार्गांपासून भ्रष्ट होतो, असे म्हणतां येत नाहीं. या सामर्थ्यावरूनच येथील योगभ्रष्टही संन्यासी घेतला पाहिजे. म्ह० ज्ञानसिद्धिसाठीं कर्ममार्ग सोडून ज्यानें संन्यासलक्षण ज्ञानमार्ग स्वीकारला आहे, तोच योगश्रष्ट होण्याचा संभव आहे. अधर्मरूप प्रबळ प्रतिबंध नसल्यास पूर्वसंस्कार त्या परवश असलेल्या योगभ्रष्ट्रालाही योगाभ्यासांत, त्याची इच्छा नसली तरी, प्रवृत्त करितो. पण अधर्मरूप प्रबल प्रतिबंध असल्यास तो दुःखभोगानें क्षीण झाल्यावर योगाभ्यासजन्य संस्कार त्याला अभ्यासांत प्रवृत्त करतो. मध्ये कितीही काल जरी लोटला, तरी तो संस्कार नष्ट होत नाहीं. योगाचे स्वरूप जाणण्याच्या इच्छेने कर्मत्याग करून योगामध्ये प्रवृत्त झालेला योगभ्रष्टही जर वेदोक्त कर्म व त्याच्या अनुष्ठानापासून पाप्त होणारे फल यांचे उल्लंघन करून जातो, म्ह० त्याहून अधिक फळास प्रास होतो, तर मग योगाचें स्वरूप जाणून व तन्निष्ठ होऊन जो सतत अभ्यास करतो, त्याच्या अधिक फलप्राप्तीविषयीं काय सांगावें ! ॥ ४४ ॥

विवरण :


प्रयत्‍नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥ ६-४५ ॥

अन्वय : तु प्रयत्‍नात् यतमानः योगी - परंतु, प्रयत्‍नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर; अनेकजन्मसंसिद्धः - मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या सामर्थ्यामुळे याच जन्मात संसिद्ध होऊन; संशुद्धकिल्बिषः - संपूर्ण पापांनी रहित होऊन; ततः परां गतिं याति - नंतर तत्कळ परम गति प्राप्त करून घेतो. ॥ ४५ ॥

व्याख्या : योगी योगोस्यास्तीति योगी पूर्वोपचित संस्कारवान्‌ तेनैव योगप्रयत्नपुण्येनैव संशुद्धकिल्बिषः सन्‌ सम्यक्‌ उत्तमप्रकारेण शुद्धं धौतं किल्बिषं ज्ञानप्रतिबंधकं पापं यस्य सः संशुद्धकिल्बिषः ततः साधनपाकात्‌ परां प्रकृष्टां गतिं मुक्तिं याति प्राप्नोति । नास्त्येवात्र कश्चित्संशय इत्यर्थः । कथंभूतः योगी । प्रयत्‍नात्‌ पूर्वकृतप्रयत्‍नात्‌ यतमानः यततेऽसौ यतमानः प्रयत्‍नातिरेकं कुर्वन्‌ । पुनः कथंभूतः योगी । अनेकजन्म संसिद्धः अनेकानि च तानि जन्मानि च अनेकजन्मानि अनेकजन्मभिः संसिद्धः अनेकजन्मसंसिद्धः संस्कारातिरेकेण चेत्यपरं पुण्यातिरेकेण प्राप्तचरमजन्मा ॥ ४५ ॥

अर्थ : शिवाय अधिक यत्‍न करणारा विद्वान् ज्याचें पाप अत्यंत निवृत्त झाले आहे, असा होऊन तो अनेक जन्मांतील थोड्या थोड्या अभ्यासानें संसिद्ध होतो. नंतर योगसिद्धीमुळेंच तो 'मोक्ष' या नांवाच्या श्रेय गतीला प्राप्त होतो.
योगसिद्धीसाठीं भगीरथ यत्‍न करणारा योगी प्रयत्‍नाची पराकाष्ठा झाली असतां निष्पाप व विद्वान् होतो. प्रत्येक जन्मांत थोडा थोडा असा योगाभ्यासजन्य संस्कार जमतां, जमतां, अनेक जन्मांनी योगजन्य संस्कारांचा फार मोठा संचय होऊन त्यामुळे तो संसिद्ध होतो. त्याला सम्यग्ज्ञान होते व त्या ज्ञानामुळें तो संन्यासी श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो. यास्तव आपल्याला शीघ्र मुक्ति मिळावी, असे ज्याला वाटत असेल, त्याने पुष्कळ यत्‍न करावा. ॥ ४५ ॥

विवरण :


तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मातद्योगी भवार्जुन ॥ ६-४६ ॥

अन्वय : योगी तपस्विभ्यः अधिकः - योगी तपस्वी लोकांपक्षा श्रेह्ठ आहे; ज्ञानिभ्यः अपि अधिकः मतः - शास्त्रज्ञानी पुरुषांपेक्षा सुद्धा तो श्रेष्ठ मानला गेला आहे; तस्मात् अर्जुन योगी भव - म्हणून हे अर्जुना, योगी हो. ॥ ४६ ॥

व्याख्या : योगी तत्त्वज्ञानोत्पत्त्यनंतरं मनोनाशवासनाक्षयकारी तपस्विभ्यः प्रशस्तं तपो येषां ते तपस्विनः तेभ्यः तपस्विभ्यः कृच्छ्रचांद्रयणादितपः परायणेण्यः अधिकः उत्कृष्टः । अस्तीति शेषः । किं च योगी कर्मिभ्यः कर्म येषामस्ति ते कर्मिणः तेभ्यः कर्मिभ्यः दक्षिणासहितज्योतिष्टोमादि कर्मानुष्ठायिभ्यः अधिकः उत्कृष्टः अस्ति । चेत्यपरं कर्मिणां तपस्विनां अज्ञत्वेन मोक्षानर्हत्वात्‌ योगी अपरोक्षज्ञानवान्‌ ज्ञानिभ्योपि परोक्षज्ञानवद्‌भ्योपि अधिको मतः अधिकमान्यः अस्ति । मनोनाशवासनाक्षयत्वेन जीवन्मुक्तो योगी अधिको मतः मम संमतः । हे अर्जुन ! तस्मात्‌ कारणात्‌ त्वं योगी योगवान्‌ भव ॥ ४६ ॥

अर्थ : अर्जुना, कृच्छ्रचांद्रायणादि तप करणार्‍या तपस्व्यांहून वर सांगितल्याप्रमाणें योगाभ्यास करणारा अधिक श्रेष्ठ आहे. शास्त्रपांडित्यवान् ज्ञानी पुरुषाहूनही तो अधिक श्रेष्ठ मानलेला आहे. योगाभ्यासी अग्रिहोत्रादि कर्मे करणाराहूनही श्रेष्ठ आहे. तस्मात् तू योगी हो.
ध्यानयोग सम्यग्ज्ञानाच्या द्वारा मोक्षाला कारण होतो, म्हणून योगाभ्यासी तपस्वी, शास्त्रज्ञानवान् व श्रौतस्मार्तादि कर्मे करणारा यांहून श्रेष्ठ आहे. म्हणून ध्यानयोग हे ज्ञानाचे अंतरंगतर साधन आहे. प्रत्येक मुमुक्षुनें ध्यानयोगी अवश्य व्हावे, हें सुचविण्यासाठी ध्यानयोगाचे बेसच येथे प्रतिपादिलें आहे व अर्जुनालाही 'तूं धयानयोगी हो' असा उपदेश केला आहे. ॥ ४६ ॥

विवरण :


योगिनामपि सर्वेषां मद्‌गतेनान्तरात्मना ।
श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥ ६-४७ ॥

अन्वय : सर्वेषां योगिनां अपि - सर्व योगांच्यामध्ये सुद्धा; यः श्रद्धावान् योगी - जो श्रद्धावान योगी; मद्‌गतेन - माझ्या ठिकाणी लावलेल्या; अन्तरात्मना मां भजते - अंतरात्म्याने मला निरंतर भजतो; सः मे युक्ततमः मतः - तो योगी मला परमश्रेष्ठ म्हणून मान्य आहे. ॥ ४७ ॥

व्याख्या : सर्वेषां संपूर्णानां योगिनां वसुरुद्रादित्यादि क्षुद्रदेवताभक्तानां मध्ये यः पुरुषः मद्‍गतेन मयि भगवति वासुदेवे गतं पुण्यपरिपाकविशेषात्‌ प्रीतिवशात्‌ वा प्राप्तं मद्‍गतं तेन मद्‍गतेन मन्निष्ठेन अंतरात्मना अंतःकरणेन श्रद्धावान्‌ सन्‌ श्रद्धा भक्तिः विद्यते यस्य सः श्रद्धावान्‌ अतिशयेन श्रद्धायुक्तः सन्‌ मां नारायणं ईश्वरं सगुणं वा निर्गुणं भजते सेवते सततं चिंतयति । स एव मद्‌भक्तः योगी युक्ततमः सर्वेभ्यः समाहितचित्तेभ्यः युक्तेभ्यः श्रेष्ठः मे मम परमेश्वरस्य सर्वज्ञस्य मतः निश्चितः मान्यः अस्ति । समानेपि योगाभ्यासक्लेशे समानेपि भजनायासे मद्‍भक्तिशूनेभ्यः मद्‍भक्तस्यैव श्रेष्ठत्वाद्धेतोः त्वं मद्‍भक्तः परमः युक्ततमः अनायासेन भवितुं अर्हसि इति भावः ॥ ४७ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे कृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥

अर्थ : रुद्र, आदित्य इत्यादिकांचें ध्यान करणार्‍या दुसर्‍या सर्व योग्यांमध्येही जो श्रद्धावान् योगी-ध्यायी माझ्या ठिकाणीं स्थिर केलेल्या अंतःकरणाने मला भजतो, तो मला श्रेढ योगी म्हणून मान्य आहे.
जो सगुण किंवा निर्गुण भगवंताचे, त्याच्या ठिकाणीं अंतःकरण स्थिर करून मोठ्या श्रद्धेने सतत चिंतन करतो, तो इतर सर्व उपासकांमध्यें श्रेष्ठ योगी-ध्यायी आहे, असे भगवंताचे मत आहे. या अध्यायांत संन्यासाचे साधन, असा जो कर्मयोग त्याची मर्यादा - तो कोठपर्यंत आचरावा, तें सांगितलें. सांगयोगाचें विवरण केले. मनोनिप्रहाच्या दोन उपायांचा उपदेश केला. योगभ्रष्टाचा आत्यंतिक नाश होतो की काय या शंकेचे निरसन केले व 'त्वं' पदाचा मुख्य अर्थ जाणणार्‍या साधकाचे ज्ञाननिष्ठत्व सांगून वाक्यार्थ ज्ञानानें-अपरोक्ष आत्म-साक्षात्कारानें मुक्ति मिळते, हे सिद्ध केलें. ॥ ४७ ॥
येथे भगवद्‌गीतेचा 'ध्यानयोग-अभ्यासयोग' नांवाचा सहावा अध्याय समास झाला.

विवरण :


ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
आत्मसम्यमयोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥


॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP