आदिमायागीता





अध्याय-१

अध्याय-२


॥ आदिमायागीता ॥
आदिमाया ही गीता कूर्मपुराणातून संकलित केली आहे. कूर्मपुराण हे अष्टादश पुराणांमधील एक प्राचीन व महत्त्वाचे पुराण आहे. या गीतेचे एकूण दोन अध्याय असून पहिला अध्याय केवळ १६ श्लोकांचा आहे. दुसरा अध्याय ३२५ श्लोकांचा आहे. या अध्यायात देवी पार्वतीच्या उत्पत्तीची कथा आली आहे व नंतर तिची स्तुती वर्णन केली आहे. देवीने आपले पिता हिमालय यांना दिव्य दर्शन दिले. त्यामुळे प्रभावित झालेल्या पित्याने देवीची सहस्र नामांनी स्तुती केली. हाच भाग या गीतेत येतो. भगवद्गीतेप्रमाणे यात उपदेश किंवा तत्त्वज्ञानाचे विषय चर्चिलेले नाहीत, तर एका अर्थी ही भक्ताने केलेली देवीची स्तुती आहे. देवीमहात्म्यच या आदिमायागीतेतून प्रगट झाले आहे.

देवीची सहस्रनामे हे या गीतेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. ही नावे असल्यामुळे तिथे त्याचा अनुवाद नाही.तसेच हिमवानाने देवीच्या स्तुतीत महिमा आणि मुख्य विभूतिंचे वर्णन केले आहे. यात विश्वदर्शनाच उल्लेख दिसला नाही पण एके ठिकाणी हिमवान् म्हणतो की, देवि, हे तुझे उग्ररूप आवर आणि मला सौम्य रूपात पाहू दे.

GO TOP