श्री रामदासस्वामिकृत्

॥ करुणा स्तोत्रें ॥

॥ श्रीराम समर्थ ॥

करूणास्तोत्रे.


विद्यानिधान गणराज विराजताहे । सिंधूर तो घवघवीत रसाळपाहे ।
विनांसि मार अनिवारचि होत आहे । आनंदरूप तुळणा दुसरीन साहे ॥ १ ॥
गंडस्थळे झिरपती बहु वास जेथें । सुवासमस्त रिझले अळिकूळ तेथें ।
शुंडा प्रचंड मिरवी गजकर्णथापा । तेजाळ अंकुश म्हणे दुरितासि कापा ॥ २ ॥
फर्सा पुसूनि सरसावतसे अघाला । भक्तांसि विघ्न रचितां रिचवीत घाला ।
साठीसहस्र गण त्यांसरिसा निघाला । मूषकवाहन करी दुरितासि हाला ॥ ३ ॥
वीतंडसा बलयंड गिरितुल्य धांवे । भक्तांसि रक्षित रिपूवरि तो उठावे ।
अंदूस तोडरगुणे करितो चपेटा । गर्जिनल्या घणघणाट प्रचंड घंटा ॥ ४ ॥
ध्यानीं धरील नरकुंजर बुद्धिदाता । त्याची फिटे अबलिळा सकढक चिंता ।
आधीं गणेश सकळांपुजणेंचि लागे । दासां मनीं तजविजा ओवजा न लागे ॥ ५ ॥



२ गणेशशारदासद्‌गुरु. P

गजवदन विराजे रंगसाहित्य माजे । रतिपतिगति लाजे लुब्ध कैळासराजे ।
फरश कमळ साजे तोडरीं बीद गाजे । सिद्धि बुद्धि अबळा जेपावती विश्वबीजें ॥ १ ॥
नटवर नटनाट्ये नाट्यनटांगसंगी । गजवदन सुरंगी रंगसाहित्यरंगी ।
अभिनव नटलीळा रंगणी रंग माजे । चपळपण विराजे सर्व कल्लोळ गाजे ॥ २ ॥
हरिसुतदुहिता ते मुख्य आधीं नमावी । मग सुगमपथीं हे सीघ्र काळे गावी ।
मतिकमळ विकासे सर्व साहित्यभासे । दुरित सकळ नासे स्वस्व-रूपी विळासे ॥ ३ ॥
तुजविण मति माझी मंदली शारदांवे । लमंचग जगदंबे तूं करीं वो विलंबें ।
प्रगट रुप करावें वैखरीमाजि आतां । अगणित गुण गातां तोषवीं बुद्धिमतां ॥ ४ ॥
अगणितसुखदाता त्यासि वंदीन आतां । शुभ लिखित विधाता शीकवी धातमाता ।
गुरुवचनबळे हा साधका मोक्ष लाभे । विमळ भजनलीळा अंतरामाजि शोभे ॥ ५ ॥



३ विमळ विवेक.


गजमुख सुखदाता मानसीं आठवावा । मग बिमळमतीचा योग पुढे करावा ।
सुरवर मुनि योगी वंदिती धुंडिराजा । सकळ सफळ विद्या यावया आत्मकाजा ॥ १ ॥
खळखळ खळयोगें बाउगी होत आहे । तळमळ मळ पोटीं सज्जनांतं न साहे ।
मळमळ करिताहे तें कदाही न रहे । परि विमळविवेकें कल्पना स्थीर राहे ॥ २ ॥
चटपट विषयांची सर्व सोडूनि द्यावी । वटवट न करावी भक्ति भावें कराबी ।
खटपट हटयोगें कामना ते नसावी । झटपट श्रवणाची सार चित्तीं वसावी ॥ ३ ॥
जपतजपत काचा मेळ त्या मातृकांचा । निगमगुज फुकाचा योग सी सुखाचा ।
सकलभुवनवासी चूकलासी तयासी । हर हर हर कासीसर्वदा तूजपासी ॥ ४ ॥



४ नमन.


नमूं फर्शपाणी नमूं यंत्रपाणी । नमूं मोक्षपाणी नमूं चापपाणी ।
नमूं चक्रपाणी नमूं शूळपाणी । नमूं दंडपाणी हरिलूमपाणी ॥ १ ॥
नमूं आदिमाता नमूं योगमाता । नमूं वेदमाता नमूं विश्वमाता ।
नमूं भक्तिमाता नमूं मुक्तिमाता । नमूं सज्जनाची कृपा ज्ञानमाता ॥ २ ॥
नमूं योगरूपी नमूं ज्ञानरूपी । नमूं संतरूपी नमूं ध्यानरूपी ।
नमूं दिव्यरूपी नमूं निश्वरूपी । नमूं येकरूपी गुरु सस्वरूपी ॥ ३ ॥
नमूं संतयोगी नमूं सिद्धयोगी । नम भक्त ज्ञानी विवेकी विरागी ।
नमूं आत्मनिष्ठा नमूं योगनिष्ठां । नमूं सर्वश्रेष्ठां वरिष्ठां वरिष्ठां ॥ ४ ॥
मनी चिंतितां राम विश्राम वाटे । जगज्जाळजंजाळ हे सर्व तूटे ।
तुटे काळजी काळ जिंकावयाची । फुटे वृत्ति अर्थातरी जावयाची ॥ ५ ॥



गणपती मति दे मज लाघवी । जनकजापतिचा लघुसा कवी ।
विनवितों करुणाळयकारणा । परम सुंदर दे मज धारणा ॥ १ ॥
सबळ रामकथा वदतां नये । म्हणुाने वांछितसे तुझिये दये ।
विधिसुते स्वहिते करुणालये । हरिजना विजयो तुजला जये ॥ २ ॥
बहुत बाड पवाडे वदों कसे । कवित-जाडैकळा हदई नसे ।
बहुत हीण कठीण कुलक्षणु । रघुविराकरितांचि सुलक्षणु ॥ ३ ॥
बहुत सेवक त्याहुनि हीण मा । बहुत सेवक त्याहुनि दीन भी ।
बहुत काय बदों गुण आपुले । पतित ते मजहूनि भले भले ॥ ४ ॥
पतित दास जनीं तुमचे खरे । पतितपावन नाम कसें उरे ।
वचन लागतसे पाहातां धुरे । नुधरितां ब्रिद हे तुमचे नुरे ॥ ५ ॥



रघुपतितनुरंगें रंगली नीळशोभा । रघुपतिरुपयोगें सर्वलावण्यगाभा ।
रघुपतिगुणगंधे धैर्य गांभीर्य लोकीं । रघुपति मम चित्तीं बैसला येकनेकीं ॥ १ ॥
त्रैलोक्यनाथ रघुनाथ अनाथबंधू । त्रैलोक्यनाथ रघुनाथ करुणकसिंधू ।
त्रैलोक्यनाथ रघुनाथ कोदंडधारी । त्रैलोक्यनाथ रघुनाथ लीळावतारी ॥ २ ॥
रघुपतिपदयुग्मीं लीन भावे असावें । रविकुळटिळकाचें नाम वाचे वसावें ।
श्रवणमनन भावें आदरेसीं करावें । परम सुख समाधी संतसंगें तरावें ॥ ३ ॥
तुजविण सिण जाला धांव रे रामराया । कठिण दिवस जातो तापली सर्व काया ।
सकळ विकळ गात्र अवस्था लागली रे । तुजविण जगदीशा बुद्धि हे भंगली रे ॥ ४ ॥



७ गूज हें सज्जनाचें.


वदनिं मदन इंदू तूळितांही तुळेना । अगणितगुणसिंधू बिंदु तो वर्णवेना ।
सकळ भुवन पाळी ऊपमा काय द्यावी । विकळशरिरभावे भावितां चित्त गोवी ॥ १ ॥
दशशतवदनाचा धीर मेरू बळाचा । परम कुशळ वाचा शेष सर्वोत्तमाचा ।
अगणितगुणमुद्रा शोधितां त्या नरेंद्रा । अकळ विकळभावे जाहला गुणनिद्रा ॥ २ ॥
स्मरण स्मररिपूचें वीषहर्ते वपूचें । निजबिज निगमाचे सार सर्वागमांचें ।
मन त्रिभुवनाचे गूज योगीजनाचें । जिवन जड जिवांचें नाम या राघवाचें ॥ ३ ॥
हरिजनभजनाचा होय साक्षी मनाचा । सकळत्रिभुवनाचा प्राण साधूजनांचा ।
परिहरिभजनाचा आखिलासे दिनाचा । घननिळगगनाचा रंग सर्वोत्तमाचा ॥ ४ ॥
विधिकुळभुषणाचे धाम सर्वांगुणांचें । भरण अभरणाचें सर्वलावण्य साचें ।
सुख परमसुखाचे ध्येय ब्रह्मादिकांचें । भजन हरिजनाचें गूज हें सज्जनाचें ॥ ५ ॥



८ शीतल छाया.


रघुविरभजनाची मानसीं प्रीति लागो । रघुविरस्मरणाची अंतरीं वृत्ति जागो ।
रघुावरचरणाची वासना वास मागो । रघुविरगुण गातां वाणि हे नित्य रंगो ॥ १ ॥
चतुरपण जनी हे पाहता आडळेना । निकट रघुविराचें रूप कैसे कळेना ।
चपळमन वळेना गर्वताठा गळेना । तुजविण जगदीशा कर्मरेखा टळेना ॥ २ ॥
तरुणपण देहाचें लापता वेळ नाहीं । तनमनधन अंतीं वोसरे सर्वकाहीं ।
सकळ जन बुडाले. व्यर्थ मायाप्रवाहीं । झडकरि सुमना रे हीत शोधूनि पाही ॥ ३ ॥
पळपळ चळताहे बाळ तारुण्य देहीं । तळमळ विषयांची नेणवे हीत काहीं ।
लळलळ गरळा तो काळ लाळीत आहे । जळजळ शितळा हे भक्तिसेउनि राहे ॥ ४ ॥
दिनकरकुळवल्ली लोटली अंगभारें । रघुविरअवतार दाटली थोरथोरें ।
सुखरूप सुखवासी राहिले योगरासी । सफळ सितळ छाया फावली रामदासी ॥ ५ ॥



९ श्रीरामाचे उपकार.


हिणाहून मी हीण जैसे भिकारी । दिनाहून मी दीन नानाविकारी ।
पतीतासिरे आणि हातीं धरावें । समर्था तुझें काय उत्तीर्ण व्हावें ॥ १ ॥
जनीं भक्ति नाहीं मनीं भाव नाहीं । मला युक्ति ना बुद्धि काहींच नाहीं ।
कृपाळपणे राज्य रंकासि द्यावें । समर्था तो काय उत्तीर्ण व्हावें ॥ २ ॥
बहुसाल अन्याय कोट्यानकोटी । रघूनायके घातले सर्व पोटीं ।
किती काय गूणांसि म्यां आठवावें । समर्था तुझें काय उत्तीर्ण व्हावें ॥ ३ ॥
समर्थे दिल्हें सौख्य नानापरीचें । सदा सर्वदा जाणसी अंतरीचें ।
लळे पाळिले तूं कृपाळू स्वभावें । समर्था तुझें काय उत्तीर्ण व्हावें ॥ ४ ॥
दिनानाथ हे ब्रीद त्वां साच केलें । ह्मणे दास भक्तांसि रे उद्धरीलें ।
मुखें सांडणे या देह्याचें करावें । समर्था तुझें काय उत्तीर्ण व्हावें ॥ ५ ॥



१.प्रभु दर्शन.


नव्हे राजयोगी महद्भाग्य त्यागी । उदासीन जो वीतरागी विरागी ।
जनस्थानगोदातटीं वास केला । प्रभू देखिला दास संतुष्ट जाला ॥ १ ॥
लिळाविग्रही देव ब्रह्मादिकांचा । सदा बोलणे चालणे सत्य वाचा ।
जया चिंतितां चंद्रमौळी निवाला । प्रभु देखिला दास संतुष्ट जाला ॥ २ ॥
दिनानाथ विख्यात हे नाम साजे । प्रजापाळकू रामराजा विराजे ।
बहू सुकृताचा बरा काळ आला । प्रभु देखिळा दास संतुष्ट जाला ॥ ३ ॥
जेणे सोडिल्या देवकोटी अचाटो । सुखें चालती स्वर्गिच्या स्वर्गवाटा ।
प्रतापेंचि त्रैलोक्य आनंदवीला । प्रभू देखिला दास संतुष्ट जाला ॥ ४ ॥
ऋषी तापसी योगरासी विळासी । मनीं चिंतिती राम लावण्यरासी ।
असंभाव्य त्या कीर्तिच्या कीर्तिढाला । प्रभू देखिला दास संतुष्ट जाला ॥ ५ ॥



११ श्रीसमर्थाची इच्छा.


सीवणा मनाचा विपरीतवाणा । उदास वाटे बहुसाल प्राणा ।
मग राघवा रे तुज बाहिलों रे । कृपाळुवें सत्वर पाहिलों रे ॥ १ ॥
देवें दयाळं करुणा करावी । भक्ताभिमानें भरणी भरावी ।
। हे रामनीमी तरणी तरावी । दासां समस्तां चरणी वरावी ॥ २ ॥
रघुनाथदासा कल्याण व्हावें । अती सौख्य व्हावें आनंदवावें ।
उद्वेग नासी वर शत्रु नासो । नानाविळास मग तो विळासो ॥ ३ ॥
कोटें नको रे कळहो नको रे । कापट्य की सहसा नको रे ।
निर्वाणचिंता निरसीं अनंता । शरणागतां दे बहु धातमाता ॥ ४ ॥
अजयो न हो रे जयवंत हो रे । आपदा नको रे बहु भाग्य हो रे ।
श्रीमंतकारी जनहीतकारी । परऊपकारी हरि दास तारीं ॥ ५ ॥



१२ श्रीसमर्थांची निष्ठा.


तज वर्णितों भाट मी देवराया । सदा सर्वदा गाय ब्रीदं सवाया ।
महाराज दे आंगिचे वस्त्र आतां । बहू जीर्ण जाली देहेबुद्धिकथा ॥ १ ॥
तुझा भिक्षकू दातया रामचंद्रा । सदा स्वस्था चिंतीतसे गा महींद्रा ।
राजाधीश देशा उरपूर्ण द्यावें । भवदैन्य हें देशधाडी करावें ॥ २ ॥
तुझा भृत्य मी भार्गादर्पजीता । जीवित्व असे अपिलें तूज आतां ।
भवा जिंकितां जीव देईन पाहे । तुज सन्मुख पाठिसी स्थीर राहे ॥ ३ ॥
रघुनायका नीकट दास तूझा । तुला वीकिलासे स्वयें देह माझा ।
सदा सर्वभावें करी दास्य तूझें । देई आपुलें वेसवेतेन माझें ॥ ४ ॥
तुझे मारुतीसारिखे दास देवा । मज मानवा किंकरा कोण केवा ।
दिनानाथ विख्यात हे ब्रीद गाजे । तेणें मानसी थोर आनंद माजे ॥ ५ ॥



१३ चाफळी श्रीरामाच्या आगमनाचा आनंद.


लवे नेत्रपातें स्फुरे आजि बाहे । दिनानाथ हा राम येणार आहे ।
जयाचेनि योगें सुखानंद लोटे । तया देखतां अंतरीं वाष्प दाटे ॥ १ ॥
लळे पाळितो राम आम्हां दिनांचे । कृपासागरू भाव जाणे मनाचे ।
नुपेक्षी कदा संकटीं धांव घाली । तया देखतां मानसें तें निवालीं ॥ २ ॥
लगा पाहतां राघवेंवीण नाहीं । निराधार हे पाहतां सर्व कांहीं ।
चळेना जनीं तोचि आश्रो धरावा । रघुराज आधार याचा करावा ॥ ३ ॥
लपावें अती आदरें रामरूपी । भयातीत निश्चिंत ये स्वस्वरूपी ।
कदा तो जनी पाहतां ही दिसेना । सदा ऐक्य तो भिन्न भावं बसेना ॥ ४ ॥
लघूलाघवी राम कोदंडधारी । मनी चिंतितां शोक संताप हारी ।
महां संकट नाम घेतां निवारी । भवसागरी मूढ पाषाणतारी ॥ ५ ॥



१४ श्रीरामाचे ब्रीद.


चकोरासि चंद्रोदयीं सूख जैसे । रघुनायका देखता सूख तैसें ।
सगूणासि लांचावलें स्थीर राहे । रघुनंदनेंवीण कांहीं न पाहे ॥ १ ॥
चळेना समरंगणी ठाण मागें । चळेना मुखें बोलतां वाक्य यूगें ।
चळेना कृपासिंधु कल्पांतकाळीं । रघुराज हा आदरें दास पाळी ॥ २ ॥
चमत्कारले चित्त हे रामगूणीं । उठे कीर्ति वाखाणितां प्रीति दूणी ।
रघूनायकासारिखा देव नाहीं । क्रिया पाहतां चोखडी सर्व काहीं ॥ ३ ॥
चळेना कदा राज्य बीभीषणाचें । चळेना देहे चालतां मारुतीचें ।
चळेना तगी राहतां नामछंदीं । चळेना सिमा घातली सेतीं ॥ ४ ॥
चपेटा विझे काळमाथां जयाचा । धरीं रे मना पंथ या राघवाचा ।
विवेकी जनें राजपंथें चि जावें । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥ ५ ॥



१५ रामरूप.


परमसुंदर रूपश्यामळ । इंद्रनीळकिळकांति कोमळ ।
भयनिवारण भक्तवत्सळ । चरपराक्रम कीर्तिवीमळ ॥ १ ॥
भुवनकंटकदैत्यमारक । अमरमोचन दैन्यहारक ।
दुरितनाशन पुण्यकारक । हरितसंकट दासतारक ॥ २ ॥
विकटविषमताळछेदक । बरअनावदैत्यभेदक ।
वशमुखांतकसीरच्छेदक । ऋषिमुनीजनचित्तवेधक ॥ ३ ॥
अमरभूषण उत्तमोत्तम । भुवनपाळक हा रघूत्तम ।
। विरवीरांतक हा वीरोत्तम । असुर अंतक हा वरोत्तम ॥ ४ ॥
बहुतपीडकदैत्यभंजन । ऋषिमुनीजनयोगिरंजन ।
दुरितदानवदुष्टभंजन । अतुळकीर्तन व्यस्तव्यंजन ॥ ५ ॥



१६ परशुरामाची प्रार्थना.


महांकोप अग्नी ऋसी जामदग्नी । समर्था तया जाणिजे सर्वसूज्ञी ।
सदा सर्वदा घेतसे नाम तुझें । वरिष्ठा स्वभावेंचि हे गोत्र माझें ॥ १ ॥
वसे सागराचे तिरी सूत तूझा । समाचार तो घेत नाहींच माझा ।
तयाला बहुतांपरी शीकवावें । स्वभावेंचि वाढेल ऐसें करावें ॥ २ ॥
किती येक मागे बहू युद्ध केलें । कितीवेळ या ब्राह्मणा राज्य दिल्हें ।
अकस्मात सामर्थ्य तें काय जालें । युगासारिखें काय नेणों विझालें ॥ ३ ॥
चिरंजीव आहेसि ऐसी वदंती । समर्था ! तुझें चित्तकाठिण्य कीती ।
तुझें नामधारी तुला हे कळेना । कृपाळूपणे चित्त कैसे बळेना ॥ ४ ॥
नको रे उदासीन हे वाक्य मानी । समर्था असावें बहू साभिमानी ।
करावी दिनानाथ हे सत्य वाचा । तुला चिंतितों दास मी राघवाचा ॥ ५ ॥



१७ उदासीन हा काळ कोठे न कंठे.


समाधान साधुजनाचेनि योगें । परी मागुतें दुःख होतें वियोगें ।
घडीने घडी शीण अत्यंत वाटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ १ ॥
घरें सुंदरें सौख्य नाना परीचें । परी कोण जाणेल तें अंतरीचें ।
मनी आठवीतांचि तो कंठ दाटे । उदासीन हा काळ कोठें न कंठे ॥ २ ॥
बळें लावितां चित्त कोठें जडेना । समाधान तें कांहि केल्या घडेना ।
नव्हे धीर नैनीं सदा नीर लोटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ ३ ॥
अवस्था मनी लागली काय सांगों । गुणी गंतला हेत कोण्हासि मागों ।
बहुसाल भेटावया प्राण फूटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ ४ ॥
कपाळपणे भेट रे रामराया । वियोगें तुझ्या सर्व व्याकूळ काया ।
जनामाजि लौकीक हा ही न सूटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ ५ ॥
अहा रे विधी ! त्वां असें काय केलें । पराधेनता पाप माझें उदेलें ।
बहुतांमधे चूकतां तूक तूटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ ६ ॥
समर्था मनीं सांडि माझी नसावी । सदा सर्वदा भक्तचिंता असावी ।
घडेना तुझा योग हाँ प्राप्त खोटें । उदासीन हाँ काळ कोठे न कंठे ॥ ७ ॥
अखंडीत हे सांग सेवा घडावी । न होतां तुझी भेटि काया पडावी ।
दिसंदीस आयुष्य हे व्यर्थ आटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ ८ ॥
भजों काय सर्वोपरी हीण देवा । करूं काय रे सर्व माझाचि ठेवा ।
म्हणों काय मी कर्मरेखा न लोटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ ९ ॥
म्हणे दास मी वास पाहें दयाळा । रघुनायका भक्तपाळा भुपाळा ।
पहावें तुला हे जिवीं आर्त मोठे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ १० ॥



१८ तुजवीण रामा मज कंठवेना.


तुझिया वियोगें जीवित्व आलें । शरीरंपांगें बहु दुःख जालें ।
अज्ञान दारिद्य माझें सरेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १ ॥
परतंत्र जीणें कंहूं किती रे । उच्चाट माझे मनीं वाटतो रे ।
ललाटरेखा तरि पालटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ २ ॥
जडली उपाधी अभिमान साधी । विवेक नाहीं बहुसाल बाधी ।
स्वामी बियोगें पळही गमेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३ ॥
विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं । कुळाभिमानें पडिलों प्रबाहीं ।
स्वहीत माझें होतां दिसेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ४ ॥
विषयी जनानं मज लाजवीलें । प्रपंचसंगें आयुष्य गेलें ।
समयीं बहुकोध शांती घडेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ५ ॥
सदृढ जाली देहेबुद्धि देहीं । वैराग्य काही होणार नाहीं ।
अपूर्ण कामीं मन हे विटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ६ ॥
निरूपणी हे सदवृत्ति होते । स्थळत्याग होतां सवेंचि जाते ।
काये करूं रे किया घडेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ७ ॥
संसारसंगें बह पीडलों रे । कारुण्यसिंधु मज सोडवीं रे ।
कृपाकटाक्षे सांभाळी दीना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ८ ॥
जय जय दयाळा त्रैलोक्य पाळा । भवसिंधुहारी मज तारि हेळा ।
स्वामी वियोंगे पळही गमेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ९ ॥
आम्हां अनाथां तूं एक दाता । संसारचिंता चुकवीं समर्था ।
दासा मनीं आठव वीसरेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १० ॥



१९ रघुनायका मागणे हेचि आता.


उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी । अती आदरें सर्व सेवा करावी ।
सदा प्रीति लागो तुझे गूण गातां । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥ १ ॥
तुझें रूपडे लोचनीं म्यां पहावें । तुझे गुण गातां मनासी रहावें ।
उठो आवडी भक्तिपंथेंचि जातां । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥ २ ॥
मनी वासना भक्ति तुझी करावी । कृपाळूपणे राघवें पूरबावी ।
वसावें मज अंतरीं नाम घेतां । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥ ३ ॥
सदा सर्वदा योग तूझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा ।
नुपेक्षीं मज गुणवंता अनंता । रघुनायका मागणे हेचि आतां ॥ ४ ॥
नको द्रव्यदारा नको येरझारा । नको मानसी ज्ञानगवे फुगारा ।
सगुणी मज लावि रे भक्तिपंथा । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥ ५ ॥
भवें व्यापलों प्रीतिछाया करावी । कृपासागरें सर्वचिता हराबी ।
मज संकटीं सोडवावें समर्था । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥ ६ ॥
मनी कामना कल्पना ते नसावी । कुबुद्धी कुडी वासना नीरसाबी ।
नकी संशयो तोडिं संसारव्यथा । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥ ७ ॥
समर्थापुढे काय मागों कळेना । दुराशा मनी बैसली हे ढळेना ।
पुढे संशयो नीरसी सर्व चिंता । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥ ८ ॥
बिदाकारणें दीम हातीं धरावें । म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावें ।
सुटो ब्रीद आम्हांसि सांडूनि जातां । रघुनायका मागणें हेंचि आता ॥ ९ ॥



२० रामपंचायतन.


देवालये परम सुंदर दीपमाळा । वृंदावनें रमणिय बरधर्मशाळा ।
राजांगणे समघनें भुमिका सुढाळा । पुंजाळ ते झळकती बहु रत्न माळा ॥ १ ॥
सुवर्णवर्ण बहुवर्ण किरणें अपारें । मिश्रीत ते तळपती घन थोरथोरें ।
उंचावले गगन त्याहुनि उंच भासे । मुक्ताफळी जडित मंडप तो विळासे ॥ २ ॥
सिंहासनावरि रघूत्तस मध्यभागीं । बंधू तिघे परम सुंदर पृष्ठभागीं ।
वन्हीसुता निकट शोभत वाममार्गी । वीलासतो भिम भयानक पूर्वभागीं ॥ ३ ॥
मार्तडमंडप उर्दडचि सौख्यकारी । त्रैलोक्यपावन प्रभू दुरितें निवारी ।
ध्यातो सदाशिव अखंडित चापपाणी । ऊदंड कीर्ति निगमी महिमा पुराणीं ॥ ४ ॥
आनंदकंद रघुनंदन शाभताहे । कंवर्पकोटि वदनीं उपमा न साहे ।
आकर्ण पूर्णनयनीं रमणीय शोभा । विस्तीर्ण कीर्ण भुषणी जगदीश उभा ॥ ५ ॥



२१ रविकुळटिळक.


रविकुळटिळकाचे रूपलावण्य पाहे । रविकुळटिळकाचे चिंतनी चित्त रहे ।
रविकुळटिळकाची कीर्ति जीवीं भरावी । रविकुळटिळकाची मूर्ति ध्यानीं धरावी ॥ १ ॥
कमळनयनराम वेधिले पूर्णकामें । सकळभयविरामं राम विश्रामधाम ।
घननिळतनुश्यामें चित्ततोर्षे आरामें । भुवनभजनने में तारिले दास रामें ॥ २ ॥
बहुविध भजनाची वैवतें पाहिली हो । सकळ त्यजुनि रामी वृत्ति हेराहिली हो ।
विमळगुणशिळाची लागली प्रीति मोठी । बिमळ हृदय होतां उद्धरे कूळकोटी ॥ ३ ॥
विमळगुणशिळाचे आदरें गण गावे । विमळगुणशिळाचे दास वाचे वदावे ।
विमळगुणशिळाचा अंतरीं वेध लागो । विमळगुणशिळाचा रंगणीं रंग गाजो ॥ ४ ॥
सकळगुणनिधीचा राम लावण्यसिंधू । अगणित गणवेना शक्तिरूपें अगाधू ।
प्रबळ बळ चळेना वाउगें व्यर्थ कामीं । झणउनि मन रामी लागले पूणेकामीं ॥ ५ ॥
परमसुखनदीचा मानसीं पूर लोटे । घननिळतनु जेव्हां अंतरी राम भेटे ।
सुख परमसुखाचे सर्व लावण्य साचें । स्वरुप जगदिशाचें ध्यान त्या ईश्वराचें ॥ ६ ॥
मधुकर मन माझें रामपादांबुजी हो । सगुण गुण निजांगें नित्य रंगोनि राहो ।
अचपळ गुणगुणी बैसली प्रीति दूणी । शरणचरणभावें जाहला राम ऋणी ॥ ७ ॥
रघुपति गुणरंगें पाविजे भक्तिसंगें । भजन जनतरंगें सर्व सांडुनि मागें ।
अनुदिन वितरागें योगयागं विरागें । प्रगट तरत संगें सर्वदासानुरागें ॥ ८ ॥
रघुवरपर आतां कीर्तनीं गूण गावे । मथन त्रिभुवनाचे सर्व साहित्य फावे ।
सकळ जन तरावे वंश ही उद्धरावे । स्वजन जन करावें रामरूपी भरावें ॥ ९ ॥
सकळ भुवन तारी राम लीळावतारी । भवभय अपहारी राम कोदंडधारी ।
मनन करि मना रे धीर हे वासना रे । रघुविरभजनाची हे धरीं कामना रे ॥ १० ॥



२२ अनुदिन अनुतापें तापलों.


अनुदिन अनुतापें तापलों रामराया । परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ।
अचपळ मन माझे नावरे आवरीता । तुजविण शिण होतो धाव रे धांव आतां ॥ १ ॥
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला । स्वजनजनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला ।
रघुपति मति माझी आपुलीशी करावी । सकळ त्यजुनि भावें कास तूझी धरावी ॥ २ ॥
विषपजनित सूखें सौख्य होणार नाहीं । तुजविण रघुनाथा वोखटें सर्व काहीं ।
रविकुळटिळका रे हीत माझें करावें । दुरित दुरि हरावें स्वस्वरूपी भरावें ॥ ३ ॥
तनु मनु धनु माझें राघवा रूप तुझें । तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ।
प्रचळित न करावी सर्वथा बुद्धि माझी । अचळभजनलीळा लागली आस तुझी ॥ ४ ॥
चपळपण मनाचें मोडितां मोडवेना । सकळस्वजनमाया तोडितां तोडवेना ।
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा । म्हणउनि करुणा हे बोलतों दीनवाचा ॥ ५ ॥
जळत हवय माझें जन्म कोट्यानकोटी । मजवारे करुणेचा राघवा पूर लोर्टी ।
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधु । षडरिपुकुळ माझे तोडि याचा विरोधु ॥ ६ ॥
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी । सिणत सिणत पोटी पाहिली वास तुझी ।
झडकरि झड घालीं धांव पंचानना रे । तुजविण मज नेते जंबुकी वासना रे ॥ ७ ॥
सबळ जनक माझा राम लावण्यपेटी । म्हणउनि मज पोटी लागली आस मोठी ।
दिवस गणित बोटीं प्राण ठेऊनि कंठीं । अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥ ८ ॥
जननिजनकमाया लेकरूं काय जाणे । पय न लगत मूर्ख हाणतां वत्स नेणे ।
जळधरकणआशा लागली चातकासी । हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥ ९ ॥
तुजविण मज तैसें जाहलें देवराया । विलग विषमकाळी तूटली सर्व माया ।
सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं । वमकवमन जैसें त्यागिले सर्व काहीं ॥ १० ॥
स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे । रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे ।
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि देती । विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥ ११ ॥
सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे । जिवलग मग कैचें चालतें हेंचि साचें ।
विलग विषमकाळी सांडिती सर्व माळी । रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥ १२ ॥
सुख सुख म्हणतां हें दुःख ठाकूनि आलें । भजन सकळ गेले चित्त दुञ्चित्त जालें ।
भ्रमित मन कळेना हीत ते आकळेना । परम कठिण देहीं देहबुद्धी वळेना ॥ १३ ॥
उपरति मज रामी जाहली पूर्णकामी । सकळभ्रमविरामी राम विश्रामधामी ।
घडिघडि मन आतां रामरूपी भरावें । रविकुळटिळका रे आपुलेंसें करावें ॥ १४ ॥
जळचर जळवासी नेणती त्या जबासी । निशिदिन तुजपासीं चूकलों गुणरासी ।
भुमिधरनिगमांसी वर्णवेना जयासी । सकळभुवनवासी भेटि हे रामदासीं ॥ १५ ॥



२३ झडकरि मज रामा सोडवी.


वरुण बदन वापीमाजि जिव्हास्वरूपी । मुख वसत तदापी वैखरी कोकिळापी ।
मधुर मधुर कुंजे नाम या राघवाचें । निववी वसत संती श्रोतयां सज्जनाचें ॥ १ ॥
ममवदनसरोजी षटपदें शारदांबे । रघुपतिगुण रुंझे तूं न गुंते विलंब ।
तंववरि करि लाहो प्राण जै अर्क आहे । प्रचलित समयीं आकर्षणं स्थीर राहे ॥ २ ॥
वणवण विषयांची सर्वथा ही शमेना । अनुदिन मोहमाया लागली हे तुटेना ।
झडकरि मज रामा सोडवीं पूर्णकामा । तुजविण गुणधामा कोण रक्षील आम्हां ॥ ३ ॥
विषयविष वमा कल्पनेला दमावें । निजपद निजभावें दृढ चित्तीं धरावें ।
भवभय निरसावें साधुसंगी वसावें । सगुणभजन द्यावें स्वामि देवाधिदेवें ॥ ४ ॥
विगळित मन माझं तूं करीं देवराया । हरिभजन कराया पाहिजे दृढ काया ।
निरुपण विवराया तर्कपंथेचि जाया । रघुपतिगुणछाया चित्त माझं निवाया ॥ ५ ॥



२४ नाथलोकत्रयाचा.


हरि हरि दुरित तो स्वामि वैकुंठराजा । सुरवर नर पाळीं शोभती चारी भूजा ।
झळफटित किळा हे हेमरत्नांबरांचा । परम कुशळ शोभे नाथ लोकत्रयाचा ॥ १ ॥
शमशम विषयांची काहि केल्यां शमेना । अचपळ मन माझं साजणी हे दमेना ।
अनुदिन मज पोटीं दुःख तेही बमेना । तुजविण जगदीशा वेळ तोही गमेना ॥ २ ॥
विषम गति मनाची ते मला आवरेना । शरिर विकळ कामें तें कदा सांवरेना ।
सुख दुःख मज माझं वाढिलें तंचि जेऊं । रघुपति ! तुजला रे कासया बोल ठेऊ ॥ ३ ॥
नवस हरिकथेचे राम भक्ती करावे । कठिण विषम काटी मम जीवीं धराव ।
विविध सकळ कांहीं दोष नासोनि जाती । रघुविरभजन हो कामना पूर्ण होती ॥ ४ ॥



२५ तुझा दास मी व्यर्थ जन्मास आला.


असंख्यात रे भक्त होऊनि गेल । तिहीं साधनांचे बहू कष्ट केले ।
नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों॥ १ ॥
बहू दास ते तापसी तीर्थवासी । गिरीकंदरीं भेटि नाहीं जनांसी ।
स्थिती ऐकतां थोर विस्मीत जालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥ २ ॥
सदा प्रेमरासी तयां भेटलासी । तुझ्या दर्शनं स्पर्शने सौख्यराशी ।
अहंतामनी शब्दज्ञाने बुडालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ ३ ॥
तुझ्या प्रीतिचे दास जन्मास आलो । असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले ।
बहु धारणा थोर चक्कीत जाला । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥ ४ ॥
बहूसाल देवालय हाटकाची । रसाळा कळा लाघवें नाटकाचीं ।
पुजा देखतां जाड जीवीं गळाला । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ ५ ॥
कितेकी देहे त्यागिले तूजलागीं । पुढें जाहले संगतीचे विभागी ।
। देहेदुःख होतांचि वेगीं पळालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आला ॥ ६ ॥
किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती । किती धर्मसंस्थापना अन्नशांती ।
परस्तावलों कावलों तप्त जालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आला ॥ ७ ॥
सदासर्वदा राम सोडोनि कामीं । समर्था तुझं दास आम्ही निकामी ।
बहु स्वार्थबुद्धीन रे कष्टवीलों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ ८ ॥



२६ श्रीरामावर भार.


नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान कांहीं । नसे प्रेम हे राम विश्राम नाहीं ।
असा दीन अज्ञान मी दास तुझा । समर्था जनी घेतला भार माझा ॥ १ ॥
रघुनायका जन्मजन्मांतरांचा । अहंभाव छदानि टाकी दिनाचा ।
जनीं बोलती दास या राघवाचा । परी अंतरी लश नाहीं तयाचा ॥ २ ॥
दिनाचे उणं दीसता लाज कोणा । जगीं दास दास तुझा दन्यवाणा ।
शिरी स्वामि तूं राम पूर्णप्रतापी । तुझा दास पाहीं सदा शीघ्र कोपी ॥ ३ ॥
रघुनायका दीन हातीं धरावें । अहंभाव छेदोनियां उद्धरावें ।
अग्रणी तयालागि गूणी करावें । समर्थे भवसागरी ऊतरावें ॥ ४ ॥
किती भार घालू रघूनायकाला । मजकारणे शीण होतील त्याला ।
दिनानाथ हा संकटीं धाव घाली । तयाचेचि हे सर्व काया निवाली ॥ ५ ॥
मला कॉबसा राम कैवल्यदाता । तयाचेनि हे फीटली सर्व चिंता ।
समर्था तया काय उत्तीर्ण व्हावें । सदासर्वदा नाम वाचे वदावें ॥ ६ ॥



२७ बुद्धि दे रघुनायका.


युक्ति नाही बुद्धि नाहीं । विद्या नाहीं विवेकिता ।
नेणता भक्त मी तुझा । बुद्धि दे रघुनायका ॥ १ ॥
मन हे आवरेना की । बासना वावडे सदा ।
कल्पना धावते सैरा । बुद्धि दे रघुनायका ॥ २ ॥
अन्न नाहीं वस्त्र नाहीं । सौख्य नाहीं जनांमध्ये ।
आश्रयो पाहतां नाहीं । बुद्धि दे रघुनायका ॥ ३ ॥
बोलतां चालतां येना । कार्यभाग कळेचिना ।
बहू मी पीडलों लोकीं । बुद्धि दे रघुनायका ॥ ४ ॥
तुझा मी टोणपा जालों । कष्टलों बहुतांपरी ।
सौख्य ते पाहतां नाहीं । बुद्धि दे रघुनायका ॥ ५ ॥
नेटकें लिहिता येना । वाचितां चुकती सदा ।
अर्थ तो सांगतां येना । बुद्धि दे रघुनायका ॥ ६ ॥
प्रसंग वेळ तर्कना । सुचेना दीर्घ सूचना ।
मैत्रिकी राखितां येना । बुद्धि दे रघुनायका ॥ ७ ॥
कळेना स्फूर्ति होईना । आपदा लागली बहू ।
प्रत्यहीं पोट सोडीना । बुद्धि दे रघुनायका ॥ ८ ॥
संसार नेटका नाहीं । उद्वेगो वाटतो जिवीं ।
परमाथू कळेना की । बुद्धि दे रघुनायका ॥ ९ ॥
देईना पुरविना कोणी । उगेचि जन हांसती ।
विसरु पडेना पोटीं । बुद्धि दे रघुनायका ॥ १० ॥
पिशुने वाटती सर्वै । कोणीही मजला नसे ।
समर्था तूं दयासिंधू । बुद्धि दे रघुनायका ॥ ११ ॥
उदास वाटतें जीवीं । आतां जावें कुणीकडे ।
तूं भक्तवत्सला रामा । बुद्धि दे रघुनायका ॥ १२ ॥
काया वाचा मनोभावें । तुझा मी म्हणवीतसे ।
हे लाज तुजला माझी । बुद्धि दे रघुनायका ॥ १३ ॥
सोडवील्या देव कोटी । भूभार फेडिला बळें ।
भक्तांसि आश्रयो मोठा । बुद्धि दे रघुनायका ॥ १४ ॥
भक्त उदंड तुम्हांला । आम्हाला कोण पूसते ।
ब्रीद हे राखणे आधीं । बुद्धि दे रघुनायका ॥ १५ ॥
आशा हे लागली मोठी । दयाळू वा दया करीं ।
आणखी नलगे काहीं । बुद्धि दे रघुनायका ॥ १६ ॥
उदंड ऐकिली कीर्ति । पतीतपावना प्रभो ।
मी एक रंक दुर्बुद्धी । बुद्धि दे रघुनायका ॥ १७ ॥
रामदास म्हणे माझा । संसार तुज लागला ।
संशयो लागतो पोटीं । बुद्धि दे रघुनायका ॥ १८ ॥



२८ रघूनायका काय कैसे करावें.


उदासीन हा काळ जातो गमेना । सदा सर्वदा थोर चिंता शमेना ।
उठे मानसीं सर्व सोडोनि जावें । रघूनायका काय कैसे करावें ॥ १ ॥
जनीं बोलता बोलतां वीट बाटे । नसे अंतरीं सूख कोठे न कंठे ।
घडीने घडी चित्त कीती धरावें । रघुनायका काय कैसे करावें ॥ २ ॥
बहू पाहता अंतरी कोंड होतो । शरीरास तो हेत सांडोनि जातो ।
उपाधीस देखोनि वाटे सरावें । रघूनायका काय कैसें करावें ॥ ३ ॥
अवस्था मनीं होय नानापरीची । किती काय सांगूं गती अंतरींची ।
विवेकेंचि या मानसा आवरावें । रघुनायका काय कैसें करावें ॥ ४ ॥
म्हणे दास ऊदास जालों दयाळा । जनीं व्यर्थ संसार हा वायचाळा ।
तुझा मी तुला पूसतों प्रेमभावें । रघुनायका काय कैसें करावें ॥ ५ ॥



२९ सर्वोत्तमा के मज भेटि देसी.

दुःखानळें मी संतप्त देहीं । तुजवीण रामा विश्रांति नाहीं ।
आधार तुझा मज मी विदेसी । सर्वोत्तमा के मज भेटि देसी ॥ १ ॥
प्रारब्ध खोटें अभिमान आला । स्वामीसमर्था वियोग जाला ।
तेणें बहु क्षीति वाटे मनासी । सर्वोत्तमा के मज भेटि देसी ॥ २ ॥
तुझिया वियोगें बहु वेदना रे । विवेक नाहीं आम्हां दिनारे ।
पडिला समंधु या दुर्जनसीं । सर्वोत्तमा कै मज भेटि देसी ॥ ३ ॥
संसारचिंता मज वाटते रे । रामा प्रपची मन जातसे रे ।
संसर्ग आहे इतरां जनासीं । सर्वोत्तमा के मज भेटि देसी ॥ ४ ॥



३० उदासीन हे वृत्ति कोठे न लागे.


रघुनायेकावीण हा शीण आहे । सदा सर्वदा रंग वोरंगताहे ।
निशिदीन या राघवाच्या बियोगें । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ १ ॥
गुणी गुंतलें चित्त हे आवरेना । तयावीण आणीक कांहीं स्मरेना ।
समाधान हे होय त्याचंनि संगे । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ २ ॥
मनी प्रीति हे लागली राघवाची । सदानंद हे राम मूर्ती सुखाची ।
पदार्थी बळें लावितां चित्त भंगे । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ ३ ॥
मनीं आठवीतां समाधान वाटे । तया देखतां संशयो सर्व तूटे ।
न लिंपे कदा चित्त दुश्चित भंगे । उदासीन हे वृत्ति कोठें न लागे ॥ ४ ॥
मनीं तुंत अनंत या राघवाचा । तट किंत तो नाबडे या भवाचा ।
सदा सर्वदा अंतरी राम जागे । उदासीन हे वृत्ति कोठं न लागे ॥ ५ ॥
मनी नावडे द्रव्य दारा पसारा । मनीं नाबडे मायिकांचा उबारा ।
मनी नावडे भोग हा राजयोगें । उदासीन हे वृत्ति कोठं न लागे ॥ ६ ॥
जनी पाहतां भवबुद्धी अनेका । मदमत्सर निदिती येकमेकां ।
घडे त्याग याकारणं लागवेगें । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ ७ ॥
बहुसाल हे बोलणें आवडेना । जनीं वासना शब्दज्ञाने पडेना ।
क्रियेवीण ते बोलतां चित्त भंगे । उदासीन हे वृत्तिं कोठे न लागे ॥ ८ ॥
मनीं सर्वथा सत्य तें सांडवेना । मनीं सर्वथा मिथ्य ते मांडवेना ।
समाधान ते योगसंग निसंगें । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ ९ ॥
जनासारिखें बोलणें ही घडेना । म्हणोनी जनीं सर्वथा ही पडेना ।
अहंतागुणें बुद्धि वीवाद लागे । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ १० ॥
उपाधीगु्णें सत्य तं मिथ्य हात । उपाधीगुण मिथ्य तें सत्य होते ।
उपाधीगुणें येक रंगे विरंग । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ ११ ॥
उपाधीगुणें लागतो पक्ष घेणें । उपाधीगुण सत्य सोडून देणं ।
उपाधीगुणें वीषयीं जीव रंगे । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ १२ ॥
उपाधीगुणें सर्व सोसीत जावें । उपाधीगणे मानाधन व्हावें ।
उपाधीगुणें बेर्थ हा स्वार्थ लागे । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ॥ १३ ॥
मनी सांडितां संगव्याधी उपाधी । पुढे सांपडे राम कारुण्यनीधी ।
विवेके मनींचा अहंभाव भंगे । उदासीन हे वृत्ति कोठें न लागे ॥ १४ ॥
पराधीनता राम-दासी घडेना । देहे चालतां रामभक्ति उडेना ।
उभा राम सांभाळितो पृष्ठभागें । उदासीन हे वृत्ति को न लागे ॥ १५ ॥



३१. श्रीरामराम हे म्हणा.


सुरेंद्र चंद्रशेखरु । अखंड ध्यातसे हरु ।
जनांसि सांगतो खुणा । श्री राम राम हे म्हणा ॥ १ ॥
महेश पार्वतीप्रती । विशेष गूज सांगती ।
सलाभ होतसे दुणा । श्री राम राम हे म्हणा ॥ २ ॥
विर्षे बहूत जाळिलें । विशेष अंग पोळलं ।
प्रचीत माझिया मना । श्री राम राम हे म्हणा ॥ ३ ॥
विशाळ व्याळं व्यस्त की । नदी खळाळ मस्तकीं ।
ऋषीभविष्यकारणा । श्री राम राम हे म्हणा ॥ ४ ॥
बहुत प्रेत्न पाहिलं । परंतु सर्व राहिल ।
विबूधपक्षरक्षणा । श्री राम राम हे म्हणा ॥ ५ ॥
अपाय होत चूकला । उपाय हा भला भला ।
नसे जयासि तूटणा । श्री राम राम हें म्हणा ॥ ६ ॥
विरांमधे विरोत्तमु । विशेष हा रघूत्तमु ।
सकाम काळ आंकणी । श्री राम राम हे म्हणा ॥ ७ ॥
बहूत पाहिलें खरें । परंतु दोनि आक्षरें ।
चुकेल यमयातना । श्री राम राम हे म्हणा ॥ ८ ॥
मनी धरुनि साक्ष । अखंड नाम हे जप ।
मनांतरी क्षणक्षणा । श्री राम राम हें म्हणा ॥ ९ ॥
देहे धरूनि वार्नरी । अखंड दास्य मी करीं ।
विमुक्त राज्य रावणा । श्री राम राम हें म्हणा ॥ १० ॥



३२ रामभक्ताची योग्यता.


श्रीराम भक्तमूळ रे । प्रसन्न सानुकूळ रे ।
समर्थ तो तयागुणें । समस्त होय ठेंगणें ॥ १ ॥
प्रपंच संचितां हरी । विसंचितां बरोबरीं ।
दयाळ तो परोपरी । विशाळ सेवकां करी ॥ २ ॥
समस्त ही पदें पदें । प्रभूपदेंचि वीशदें ।
विचार सार जोडला । सदृश्यभास मोडला ॥ ३ ॥
सदूपरी विवंचना । विचार आणितां मना ।
मनास ठाव नाडळे । विशेष हेतही गळे ॥ ४ ॥
विवेक हा भला भला । उदंड राम दाखला ।
पदी अनन्य मीळणी । उरी नसे दुजेपणी ॥ ५ ॥
विचार सार सारसा । करील कोण फारसा ।
बळेबळेचि नीवळे । कळे कळेचि आकळे ॥ ६ ॥



॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

GO TOP