॥ पञ्चदशी ॥
दशमः परिच्छेदः - नाटकदीपः



परमात्माऽद्वयानन्दपूर्णः पूर्वं स्वमायया ।
स्वयमेव जगद्‌भूत्वा प्राविशज्जीवरूपतः ॥ १ ॥
विष्ण्वाद्युत्तमदेहेषु प्रविष्टो देवता भवेत् ।
मर्त्याद्यधमदेहेषु स्थितो भजति मर्त्यताम् ॥ २ ॥
अनेकजन्मभजनात् स्वविचारं चिकीर्षति ।
विचारेण विनष्टायां मायायां शिष्यते स्वयम् ॥ ३ ॥
अद्वयानन्दरूपस्य सद्वयत्वं च दुःखिता ।
बन्धः प्रोक्तः स्वरूपेण स्थितिर्मुक्तिरितीर्यते ॥ ४ ॥
अविचारकृतो बन्धो विचारेण निवर्तते ।
तस्माज्जीवपरात्मानौ सर्वदैव विचारयेत् ॥ ५ ॥
अहमित्यभिमन्ता यः कर्ताऽसौ तस्य साधनम् ।
मनस्तस्य क्रिये अन्तर्बहिर्वृत्ति क्रमोत्थिते ॥ ६ ॥
अन्तर्मुखाऽहमित्येषा वृत्तिः कर्तारमुल्लिखेत् ।
बहिर्मुखेदमित्येषा बाह्यं वस्त्विदमुल्लिखेत् ॥ ७ ॥
इदमो ये विशेषाः स्युर्गन्धरूपरसादयः ।
असाङ्कर्येण तान भिद्याद् घ्राणादीन्द्रियपञ्चकम् ॥ ८ ॥
कर्तारं च क्रियां तद्वद्व्यावृत्तविषयानपि ।
स्फोरयेदेकयत्‍नेन योऽसौ साक्ष्यत्र चिद्वपुः ॥ ९ ॥
ईक्षे शृणोमि जिघ्रामि स्वादयामि स्पृशाम्यहम् ।
इति भासयते सर्वं नृत्यशालास्थदीपवत् ॥ १० ॥

मागील प्रकरणांत उपासना म्हणजे काय व तिचा मुक्तीस किती उपयोग आहे हें सांगितले आतां या प्रकरणी साक्षीचे स्वरूप नाटकाच्या रूपाने तुम्हांस सांगतो.
सृष्टीच्या पूर्वीं अद्वयानंद परिपूर्ण जो आत्मा होता, तोच आपल्या मायेच्या योगानं आपणच जग होऊन त्यांतच जीवरूपानें प्रवेश करिता झाला. ॥ १ ॥
तोच परमात्मा विष्णू आदि करून उत्तम देहाचेठायी प्रवेश करून देवतारूप बनला, आणि मनुष्यादिक देहाचेठायी प्रवेश करून त्याचा पूजक झाला. याप्रमाणे पूज्य आणि पूजक हे दोघेही एकाच परमात्म्याची रूपे आहेत. ॥ २ ॥
मग अनेक जन्मीं ईश्वराचे भजन करून आपल्या स्वरूपाचा विचार करण्याची इच्छा होते. विचारांती मायेचा नाश होऊन पूर्वींप्रमाणे अद्वयानंद पूर्ण आहे तसा रहातो. ॥ ३ ॥
आत्मा अद्वयानंदरूप असून त्याला द्वैताचा आरोप आला हाच दुःखरूप बंध आहे आणि स्वरूपेंकरून जी स्थिति तीच मुक्ति असें म्हटलें आहे. ब्रह्माहमस्मि या ज्ञानापासून मुक्ति होते असें जें म्हटलें त्याचा हाच अर्थ आहे. ॥ ४ ॥
अविचारापासून जो बंध प्राप्त झाला आहे त्याची निवृत्ति होण्यास दुसरा उपायच नाहीं. म्हणून जीवात्मा म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय याचा सतत विचार करावा. ॥ ५ ॥
देहादिकाला मी असें म्हणणारा जो चिदाभास त्यास कर्ता असें म्हणतात, तोच जीव. मन हें त्याचें साधन आहे. त्या मनाच्या, एक अन्तर्वृत्ति आणि दुसरी बहिर्वृत्ति अशा क्रमाने होणाऱ्या दोन क्रिया आहेत. ॥ ६ ॥
मी मी अशी जी अंतर्मुख वृत्ति ती कर्त्याला दाखविते. आणि इदम् म्हणजे हें म्हणणारी जी बहिर्मुखवृत्ति ती जगांतील बाह्य वस्तूस दाखविते. ॥ ७ ॥
या इदंवृत्तीचे शब्द स्पर्शादि पांच भेद आहेत. इदंवृत्ति ही मनाची एक सामान्य वृत्ति आहे. वरील पांच भेद घ्राणादि इंद्रियपंचकांनीं निरनिराळे केले आहेत. ॥ ८ ॥
पूर्वी सांगितलेला कर्ता क्रिया व निरनिराळे विषय या सर्वांस एकदम भासविणारा जो एक कोणी ज्ञानरूप आहे त्यास वेदांतशास्त्रांत साक्षी असें म्हणतात. ॥ ९ ॥
ज्याप्रमाणें नाटकगृहांतील दिवा त्या गृहासहित नटप्रेक्षकादिकांस एकदम प्रकाशवितो, त्याप्रमाणें मी पाहतो, मी ऐकती, मी हसतो, मी स्वाद घेतो आणि मी स्पर्श जाणतो, या सर्व ज्ञान क्रिया त्या साक्षीच्या योगानें एकदम भासविल्या जातात. ॥ १० ॥


नृत्यशालास्थितो दीपः प्रभुं सभ्यांश्च नर्तकीम् ।
दीपयेदविशेषेण तदभावेऽपि दीप्यते ॥ ११ ॥
अहङ्कारं धियं साक्षी विषयानपि भासयेत् ।
अहङ्काराद्यभावेऽपि स्वयं भात्येव पूर्ववत् ॥ १२ ॥
निरन्तरं भासमाने कूटस्थे ज्ञप्तिरूपतः ।
तद्‌भासा भास्यमानेयं बुद्धिर्नृत्यत्यनेकधा ॥ १३ ॥

अहङ्कारः प्रभुः सभ्या विषया नर्तकी मतिः ।
तालादिधारिण्यक्षाणि दीपः साक्ष्यवभासकः ॥ १४ ॥
स्वस्थानसंस्थितो दीपः सर्वतो भासयेद्यथा ।
स्थिरस्थायी तथा साक्षी बहिरन्तः प्रकाशयेत् ॥ १५ ॥
बहिरन्तर्विभागोऽयं देहापेक्षो न साक्षिणि ।
विषया बाह्यदेशस्था देहस्यान्तरहङ्कृतिः ॥ १६ ॥
अन्तस्था धीः सहैवाक्षैर्बहिर्याति पुनः पुनः ।
भास्यबुद्धिस्थचाञ्चल्यं साक्षिण्यारोप्यते वृथा ॥ १७ ॥

गृहान्तरगतः स्वल्पो गवाक्षादातपोऽचलः ।
तत्र हस्ते नर्त्यमाने नृत्यतीवातपो यथा ॥ १८ ॥
निजस्थानस्थितः साक्षी बहिरन्तर्गमागमौ ।
अकुर्वन् बुद्धिचाञ्चल्यात् करोतीव तथा तथा ॥ १९ ॥
न बाह्यो नान्तरः साक्षी बुद्धेर्देऽशौ हि तावुभौ ।
बुद्ध्याद्यशेषसंशान्तौ यत्र भात्यस्ति तत्र सः ॥ २० ॥

ज्याप्रमाणें नाटकगृहांतील मुख्य दिवा, मुख्य यजमान, प्रेक्षकजन आणि रंगभूमीवर नाचणारी नर्तकी या सर्वांस एकदम प्रकाशित करतो; व त्याच्या अभावीही स्वतः प्रकाशमान असतो. ॥ ११ ॥
त्याप्रमाणें साक्षी हा अहंकार, विषय आणि बुद्धि या सर्वांस भासवून त्यांच्या अभावीं म्हणजे निद्रादिक अवस्थांच्या ठायींही तो स्वत: भासतो. ॥ १२ ॥
एथे अहंकारादिकांस बुद्धीच प्रकाशित करते, अशी शंका घेऊंनये. कारण, ती विकारी असल्यामुळें जड आहे. निरंतर ज्ञानरूपें करून भासणारा जो कूटस्थ त्याच्या प्रकाज्ञाने ही बुद्धि प्रकाशित होऊन नानाप्रकारचें नृत्य करते; म्हणजे एकदा घटाकार एकदा पटाकार होते. ॥ १३ ॥
एथे अहंकार हा मुख्य यजमान, विषय हे प्रेक्षकजन, बुद्धि ही नाचणारी कलावंतीण, इंद्रिये ही तालमृदंग वाजविणारे, आणि त्या सर्वांस प्रकाशविणारा साक्षी हा दिवा असें रूपक बसवावे. ॥ १४ ॥
दिवा जसा आपल्या ठिकाणींच असून सर्वत्र प्रकाश देतो, त्याप्रमाणें साक्षीही आपल्याच ठिकाणी स्थिर राहून आत बाहेर प्रकाशवितो. ॥ १५ ॥
येथें आंत बाहेर म्हणून जो विभाग केला तो साक्षीस लागत नाहीं. तो देहामुळे झाला आहे. देहाचे बाहेर विषय आहेत आणि आंत अहंकार आहे. ॥ १६ ॥
एथे साक्षीआंत बाहेर भासवितो असें जें म्हटलें त्याचा अर्थआंत एकदा भासवितो आणि बाहेर एकदा भासवितो असें समज नये. कारण साक्षीचेठायी तसें चांचल्य मुळींच नाही. तसें चांचल्य दिसण्याचे कारण हेंच कीं, देहाचे आंत असणारी बुद्धि नेत्रादिद्वारा वारंवार येरझारा घालते, तेव्हां त्या बुद्धीचें चांचल्य साक्षींत आहें असें उगीच भ्रांतीने वाटतें. ॥ १७ ॥
ज्याप्रमाणें खिडकींतून घराच्या आंतल्या बाजूस आलेले किरण स्वतः अचल असतांही त्यांत हात नाचविला असतां तें किरणच नाचते अशी आति वाटते. ॥ १८ ॥
त्याप्रमाणें साक्षीही आपल्या ठिकाणी स्थिर असून आंत बाहेर येरझारा करीत असूनही बुद्धिचांचल्यास्तव तो करतो अशी भ्रांति होते. ॥ १९ ॥
हा साक्षी बाहेरही नाहीं व आंतही नाहीं. आंत बाहेर हा देशविभाग केवळ बुद्धीचा आहे. बुध्यादिकांचा लय झाला असतां तो आपला आहे तेथेंच आहे. ॥ २० ॥


देशः कोऽपि न भासेत यदि तर्ह्यस्त्वदेशभाक् ।
सर्वदेशप्रक्लृप्त्यैव सर्वगत्वं न तु स्वतः ॥ २१ ॥

अन्तर्बहिर्वा सर्वं वा यं देशं परिकल्पयेत् ।
बुद्धिस्तद्देशगः साक्षी तथा वस्तुषु योजयेत् ॥ २२ ॥
यद्यद्‌रूपादि कल्प्येत बुद्ध्या तत्तत्प्रकाशयन् ।
तस्य तस्य भवेत्साक्षी स्वतो वाग्बुद्ध्यगोचरः ॥ २३ ॥
कथं तादृङ्‌मया ग्राह्यमिति चेन्मैव गृह्यताम् ।
सर्वग्रहोपसंशान्तौ स्वयमेवावशिष्यते ॥ २४ ॥
न तत्र मानापेक्षास्ति स्वप्रकाशस्वरूपतः ।
तादृग्व्युत्पत्त्यपेक्षा चेच्छ्रुतिं पठ गुरोर्मुखात् ॥ २५ ॥

यदि सर्वगृहत्यागोऽशक्यस्तर्हि धियं व्रज ।
शरणं तदधीनोन्तर्बहिर्वैषोऽनुभूयताम् ॥ २६ ॥
इति नाटकदीपोनाम दशमः परिच्छेदः ॥ १० ॥

आतां याजवर कोणी अशी शंका घेईल कीं, जेथे देश मुळींच नाहीं तेथे "आहे तेथेंच आहे" असें तरी साक्षीस म्हणणे कसें संभवेल ? तर आमचे तरी म्हणणें असें कुठे आहे ! त्याला देश परिच्छेद मुळींच नाहीं. आतां श्रुतीमध्ये सर्वगतत्व जें त्याला लावलें तें केवळ सर्व देशाची कल्पना मनांत आणून लावलें. स्वत: त्याला कोणचेंच विशेषण लागत नाहीं. ॥ २१ ॥
साक्षित्व सुद्धा जें आहें तें बुद्धीच्याच सबंधाने आहे, म्हणून आंत बाहेर किंवा सर्व देश यांची बुद्धि जशी जशी कल्पना करील त्या त्या देशांत तो साक्षी व्यापक आहे असें समजावे. ॥ २२ ॥
देशाप्रमाणे वस्तूंच्या ठायीं ही योजना करावी ती अशी कीं, ज्या ज्या रूपाची कल्पना बुद्धि करील त्या त्या रूपास प्रकाशविणारा हा साक्षी आहे. पण स्वतः तो जर म्हणाल तर वाणी आणि बुद्धि यांस अगोचर आहे. ॥ २३ ॥
तर असा जो वाणी आणि बुद्धि यांस अगोचर साक्षी तो मुमुक्षूस प्राप्त कसा व्हावा असें जर कोणी म्हणेल तर त्याजवर हें उत्तर कीं, त्याचें अग्राह्यच आम्हांस इष्टच आहे. सर्व पदार्थांच्या ग्रहणांची शांति झाली म्हणजे अर्थातच तो उर्वरित राहतो. ॥ २४ ॥
तुम्ही सांगितल्या युरकीने आत्मा उर्वरित राहतो असें जरी झालें तरी त्यास कांहीं तरी प्रमाण पाहिजे असें कोणी म्हणेल तर येथें प्रमाणाची अपेक्षा नाहीं. कारण तो स्वप्रकाशक आहे. तथापि तसें प्रमाणच पाहिजे असेल तर गुरूजवळ जाऊन श्रुतीचे अध्ययन कर. ॥ २५ ॥
सर्व ग्रहांचा त्याग करणें जर कठिण वाटेल तर बुद्धीलाच शरण गेलें म्हणजे झाले. बुद्धीस शरण जाणें म्हणजे तिचा निरोध न करतां तूं काय करशील तें कर असें म्हणून मोकळी सोडून दे म्हणजे झाले मग आंत बाहेर साक्षीचाच अनुभव येईल. ॥ २६
नाटकदीप समाप्त.