ब्रह्मखण्ड ( १ )

प्रकृतिखण्ड ( २ )

गणेशखण्ड ( ३ )



ब्रह्मवैवर्तमहापुराण - प्रस्तावना

ब्रह्मवैवर्त पुराण – अथवा ब्रह्मकैवर्त पुराण असें दुसरे नावं आहे. या पुराणाचें दुसरें नांव दक्षिण हिदुस्थानांत प्रकरांत आहे. यांतील पहिल्या ब्रह्मकांडांत ब्रह्मदेवानें केलेंल्या सृष्ट्युत्पत्तीचें वर्णन आहे. हा ब्रह्मदेव पुथ्वींतील पहिला जीव म्हणजे दुसरा कोणी नसून खुद्द भगवान श्रीकृष्ण होत. दुसरें 'प्रकृतिखंड' यांत मुलद्रव्य जी प्रकृति तिचें वर्णन आहे. केवळ पौराणिकरीत्या असें कल्पिलें आहे कीं, त्या प्रकृतीपासून पुढें कृष्णाच्या आज्ञेनें पांच देवता – दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, सावित्री, राधा झाल्या. तिसरें गणेशखंड, यांत गजवदन गणेशाच्या कथा सांगितल्या आहेत. शेवटलें सर्वांत मोठें 'कृष्णजन्मकांड' यांमध्यें कृष्णजन्माची कथा देऊन शिवाय सर्व कृष्णचरित्र दिलें आहे; त्यांत त्यानें केलेंल्या लढाया व गोपींबरोबर केलेंल्या प्रणयकीडांचें वर्णन आहे. हा या पुराणांतील मुख्य भाग असून त्यांत कृष्ण व त्याची सखी राधा यांच्या पुष्कळ कथा, गोष्टी, स्तोत्रें वगैरे दिलीं आहेत. या पुराणांत कृष्णाचें सर्वश्रेष्टत्व वार्णिलें आहे.
to be concluded...



GO TOP