योगोपनिषदे


मुक्तिकोपनिषदांत ’१०८ उपनिषदांचा अभ्यास कर’ असा रामाने हनुमंतास उपदेश केला. विद्वानांनी या उपनिषदांमध्ये चर्चिलेल्या विषय संबंधाने, म्हणजे देवतांसंबंधी, योग संबंधी, संन्यास विषयक असे काही विभाग पाडले आहेत. त्यात जिथे विशिष्ट विषय संबंध नाही अशा उपनिषदांना ’सामान्य उपनिषदे’ म्हटले आहे. अशा विषय विभागात २० उपनिषदे योग विषयक आहेत.