स्तोत्राणि

श्रीगणेशस्तोत्रे

श्रीविष्णुस्तोत्रे

श्रीरामस्तोत्रे

श्रीकृष्णस्तोत्रे

श्रीशिवस्तोत्रे

श्रीशक्तिस्तोत्रे

श्रीदेविस्तोत्रे


प्रास्ताविक

भारतभू देवी समृद्धिनें समृद्ध आहेच, परंतु आसुरी संपत्तीच्या झगझगाटामध्ये तें तेज थिटे वाटू लागले आहे. चार दिवसांची ही आसुरी संपत्ती चिरंतन सुख देणार नाही हे उघड आहे, तरीपण आजच्या मानवाला केवळ बाहेरचा झगझगाट मात्र दिसतो आणि तेच आपले वैभव असे मानून तो या जगांत वावरतो. ज्यावेळी कोणतीही आसुरी संपत्ती मानवाला समाधानाचं पाथेय देत नाही तेव्हा तो तिच्या व्यतिरिक्त वैभवाचा किंचितसा विचार करू लागतो. तेव्हा त्याला कळून येते की आसुरी संपत्ती सुद्धा देवी संपत्तीचे कवच आहे. ते दूर करता आले तर मानवी जीवन दैवी वैभवाने भरून जाईल. हे आसुरी कवच कसे उकलावयाचे आणि दैवी संपत्तीची जवळीक कशी साधावयाची याचा परामर्श घेण्यासाठीच या पुस्ताकाचा उपक्रम आहे. दैवी संपत्तीने एक मनुष्य जरी समृद्ध बनला तरी अत्यल्प काळांत तो संबंध राष्ट्राचे भवितव्य घडवू शकेल. राष्ट्राचे चिरंतन वैभव दैवी संपत्तीच्या गुणीजनांवर अवलंबून आहे. ही देवी संपत्ती ज्या अनेक साधनांतून मिळविता येते त्यांत स्तोत्र हे एक महान साधन आहे. या स्तोत्राच्या परिपाठाने सर्वसत्ताधीश बनता येते असा विख्यात अनुभव पूर्वसूरींनी नमूद केला आहे. या स्तोत्रांचे खरे सामर्थ्य त्यांच्या विनियोगांत आहे." देवता प्रीत्यर्थे जपे विनियोगः । असा जो संकल्प आहे यांतच या स्तोत्राचे सर्व रहस्य आहे. या स्तोत्राच्या जपाने आपली आकर्षण शक्ती वाढत जाते. आपल्या उपास्य देवतेचे तेज आपण या शरीराने ग्रहण करतो. शरीर आणि त्या बरोबर आपले मन तेजोमय बनते. त्या तेज्यांत पूर्वी प्रत्ययाला न आलेल्या अनेक गोष्टी आपल्या प्रत्ययाला येतात. त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव येतो. यालाच आपण आपली देवता आपणास प्रसन्न झाली असे म्हणतो. आपल्या या शरीरात ते देवताचें तेज ग्रहण करण्याची शक्ती आहे हे सांगूनही सामान्य माणसाला पटणार नाही. परंतु अनुभवाची कास धरली तर त्याची सत्यता प्रत्ययाला तेव्हाच येते. अशी अनेक स्तोत्रे आहेत. त्यांतल्या त्यांत ज्या स्तोत्रांचा पाठ लोक नित्य करतात किंवा ज्यांचा पाठ नित्य करण्याची आवश्यकता आहे अशाच स्तोत्रांचा या पुस्तकांत समावेश केला आहे. ज्यांचा प्रत्यय गोचर झाला त्यांचेच वैभव मी अक्षरांकित केले आहे. जिज्ञासू साधकांनी त्याचा अनुभव घ्यावा आणि आजच्या विस्कळित जीवन प्रवाहात समाधान मिळवावे.

GO TOP