देवीमहापुराण माहात्म्य

देवीमहापुराण स्कंध ( १ )

देवीमहापुराण स्कंध ( २ )

देवीमहापुराण स्कंध ( ३ )

देवीमहापुराण स्कंध ( ४ )

देवीमहापुराण स्कंध ( ५ )

देवीमहापुराण स्कंध ( ६ )

देवीमहापुराण स्कंध ( ७ )

देवीमहापुराण स्कंध ( ८ )

देवीमहापुराण स्कंध ( ९ )

देवीमहापुराण स्कंध ( १० )

देवीमहापुराण स्कंध ( ११ )

देवीमहापुराण स्कंध ( १२ )

श्रीमद्देवीमहापुराण - प्रस्तावना

अठरा पुराणांची जी नाममालिका आहे तींत या पुराणाचा उल्लेख नाहीं. परंतु शैव व पद्मपुराणांत याची अष्टदश महापुराणांत गणना केली आहे. व खुद्द या पुराणांतच पहिल्या स्कंधांत या पुराणास महापुराण म्हटलें आहे. कांहींच्या मतें वैष्णव भागवत हें महापुराण नसून एक वैष्णव तंत्र आहे व देवीभागवत हेंच महापुराण आहे. आणि या मतास पोषक आधार म्हणजे शैवपुराणानें अठरा पुराणांत वैष्णव भागवत वगळिलें आहे व देवीभागवताचा संग्रह केला अहे. शिवाय स्कंध व अध्याय यांच्या दोन्ही पुराणांच्या संख्येंत व विषयमांडणींत बरेंच साम्य आहे. परंतु वैष्णव भागवतावरील टीकाकार श्रीधर यानें 'भागवतपुराणें अनेक असलीं तरी विष्णुभागवत हेंच महापुराण होय' असें म्हटलें आहे. देवीभागवतावर नीलकंठाची टीका आहे. तो शैवमताचा असल्यामुळें देवीभागवत महापुराण ठरविण्याचा त्यानें बराच प्रयत्‍न केला आहे. त्याची टीका वाचण्यासारखी आहे. देवीभागवतावर आपल्या टीकेपूर्वी दुस‍र्‍या कोणाची टीका नव्हती असें नीलकंठ टीकाकारच म्हणतो. पद्मपुराणांत देवीभागवताबरोबर दुर्गाभागवताचाहि उल्लेख येतो. देवीभागवताचे बारा स्कंध असून सर्वांचे मिळून अध्याय ३१८ आहेत. या ग्रंथांतील विषय स्कंधवार पुढें दिले आहेत.

पहिल्या स्कंधांत ग्रंथविस्तार, जगाची उत्पत्ति, पुराणलक्षण, पुराणांचीं व उपपुराणांचीं नांवें, निपुत्रिकत्वाबद्दल व्यासचिंता, हयग्रीवाख्यान, मधुकैटभचरित्र, षुकोत्पत्ति, बुधोत्पत्ति, षुकजनसंवाद, शुकाचा विवाह, शुकनिर्वाण, पांडवांची उत्पत्ति इत्यादि कथा असून दुस-या स्कंधांत मत्स्यगंधेची उत्पत्ति, भीष्मजन्मकथेपासून कौरव-यादव नाशापर्यंत कथा, परिक्षिति, जन्मेजय यांच्या कथा व सर्पसत्र वर्णिलें आहे. स्कंध तीनमध्यें अंबा (देवी) विधान, सृष्टयुत्पत्ति, मधुकैटभनाश, जगदुत्पत्तीबद्दल देवीची ब्रह्मा-विष्णु-महेशास आज्ञा, देवकृत देवीची स्तुति, देवीमंत्रवीजकथन व उतथ्य कथा, देवीयज्ञ, सात्विक-राजस-तामसयज्ञ, सुदर्शन चरित्र व देवीप्रभावकथन, नवरात्रमाहात्म्य व रामकथा हे विषय आहेत. तसेंच चवथ्या स्कंधांत कृष्णचरित्र, नरनारायणाख्यान, संजीवनीप्राप्त्यर्थ शुक्राचार्याची तपश्चर्या (येथें बृहस्पतीनें शुक्राचार्याचा वेश घेऊन दैत्यांनां खोट्या जैनधर्माचा उपदेश केल्याचा उल्लेख आहे. ही कथा थोड्या फरकानें पद्मपुराणांत आहे.) पांचव्या स्कंधांत महिषासुरवध व येथून पुढील सर्व कथाभाग मार्कडेय पुराणांतील सप्तशती-देवीमाहात्म्याप्रमाणेंच आहे. सहाव्यांत वृत्रासुरवध, सौगत मताचा उल्लेख, त्रिविधकर्मकथन, युगोद्भवधर्म, आडि (पक्षि) बकयुद्ध, शुन:शेपकथा, वसिष्ठोत्पत्ति, सहस्त्रार्जुनकथा, भृगुवंशोच्छेद, हैहयकथा, स्त्रीरूपी नारद व त्याची संतति, हे विषय आहेत. सातव्यांत हरिश्चंद्रकथा, विष्वामित्रकालीन दुष्काळाचें विशेष हृदयद्रावक वर्णन, भारतवर्षांतील देवीच्या स्थानांचा उल्लेख, देवी व हिमालय यांच्या संवादप्रसंगीं देवीगीता (हींत भगवदीतेंतील श्लोक फार आहेत). आठव्या स्कंधांत भू, स्वर्ग, पाताळ, नरक, ग्रहनक्षत्रादि वर्णन व देवीच्या पूजेचे कालपरत्वे विधी दिले आहेत. स्कंध नऊ यांत देवीच्या अनेक शक्तींचें वर्णन, गंगादि नद्यांचे शाप, भक्त-अभक्त वर्णन, पृथ्वीची उत्पत्ति, तिची स्तुति, गंगास्नानमाहात्म्य, प्रस्कण्वशाखोक्त गंगास्तोत्र, अनेक लोकवर्णन, तुलसीची उत्पत्ति, शालिग्रामलक्षणें, सावित्रीकथा, मध्येंच धर्मशास्त्रकथन, तप्तमुद्रा व माध्यमतनिंदा, महालक्ष्मी उपाख्यान वगैरे व अनेक देवींची उपाख्यानें. दहाव्यांत स्वायंभुवादि मनूंच्या कथा. दशावतारांपैकीं नवव्यांत बुद्धगणना, स्कंध अकरा व बारा यांत आन्हिक प्रकरण वर्णिलें आहे.

श्री व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोशावरून...GO TOP