श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
षष्ठः स्कन्धः
पञ्चविंशोऽध्यायः


व्यासस्वकीयमोहवर्णनम्

व्यास उवाच
वासवी चकिता जाता श्रुत्वा मे वाक्यमीदृशम् ।
दाशेयी मामुवाचेदं पुत्रार्थे भृशमातुरा ॥ १ ॥
अम्बालिका वधूर्धन्या काशिराजसुता सुत ।
भार्या विचित्रवीर्यस्य विधवा शोकसंयुता ॥ २ ॥
सर्वलक्षणसम्पन्ना रूपयौवनशालिनी ।
तस्यां जनय सङ्गं त्वं कृत्वा पुत्रं सुसम्मतम् ॥ ३ ॥
नान्धो राजाधिकारी स्यात्तस्मात्पुत्र मनोहरम् ।
उत्पादय राजपुत्र्यां वचनान्मम मानद ॥ ४ ॥
इत्युक्तोऽहं तदा मात्रा स्थितस्तत्र गजाह्वये ।
यावदृतुमती जाता काशिराजसुता मुने ॥ ५ ॥
एकान्ते शयनागारे प्राप्ता सा मम सन्निधौ ।
लज्जमाना सुकेशान्ता स्वश्वश्रूवचनात्तदा ॥ ६ ॥
दृष्ट्वा मां जटिलं दान्तं तापसं रसवर्जितम् ।
सा स्वेदवदना जाता पाण्डुरा विमना भृशम् ॥ ७ ॥
कुपितोऽहं तदा दृष्ट्वा कामिनीं निशि सङ्गताम् ।
वेपमानां स्थितां पार्श्वे ह्यब्रवं तामहं रुषा ॥ ८ ॥
दृष्ट्वा मां यदि गर्वेण पाण्डुवर्णा समावृता ।
अतस्ते तनयः पाण्डुर्भविष्यति सुमध्यमे ॥ ९ ॥
इत्युक्त्वा निशि तत्रैव स्थितोऽम्बालिकया युतः ।
भुक्त्वा तां निशि निर्यातः स्थानमापृच्छ्य मातरम् ॥ १० ॥
ततस्ताभ्यां सुतौ काले प्रसूतावन्धपाण्डुरौ ।
धृतराष्ट्रश्च पाण्डुश्च प्रथितौ सम्बभूवतुः ॥ ११ ॥
माता मे विमना जाता तादृशौ वीक्ष्य तौ सुतौ ।
ततः संवत्सरस्यान्ते मामाहूय तदाब्रवीत् ॥ १२ ॥
द्वैपायन सुतौ जातौ राज्ययोग्यौ न तादृशौ ।
अन्यं मनोहरं पुत्रं समुत्पादय मे प्रियम् ॥ १३ ॥
तथेति सा मया प्रोक्ता मुदिता जननी तदा ।
अम्बिकां प्रार्थयामास सुतार्थे काल आगते ॥ १४ ॥
पुत्रि व्यासं समालिङ्ग्य पुत्रमुत्पादयाद्‌भुतम् ।
कुरुवंशस्य कर्तारं राज्ययोग्यं वरानने ॥ १५ ॥
वधूर्लज्जान्विता किञ्चिन्नोवाच वचनं तदा ।
गतोऽहं शयनागारे मातुस्तद्वचनान्निशि ॥ १६ ॥
दासी विचित्रवीर्यस्य रूपयौवनसंयुता ।
प्रेषिताम्बिकया त्वत्र विचित्राभरणाम्बरा ॥ १७ ॥
चन्दनारक्तदेहा सा पुष्पमालाविभूषिता ।
आयाता हावसंयुक्ता सुकेशी हंसगामिनी ॥ १८ ॥
पर्यङ्के मां समावेश्य संस्थिता प्रेमसंयुता ।
प्रसन्नोऽहं तदा तस्या विलासेनाभवं मुने ॥ १९ ॥
रात्रौ संक्रीडितं प्रेम्णा तया सह मया भृशम् ।
वरो दत्तः पुनस्तस्यै प्रसन्नेन तु नारद ॥ २० ॥
सुभगे भविता पुत्रः सर्वलक्षणसंयुतः ।
सुरूपः सर्वधर्मज्ञः सत्यवादी शमे रतः ॥ २१ ॥
स तदा विदुरो जातस्त्रयः पुत्रा मयाभवन् ।
माया वृद्धिं गता साधो परक्षेत्रोद्‌भवे मम ॥ २२ ॥
विस्मृतः शुकसम्बन्धी विरहः शोककारणम् ।
दृष्ट्वा त्रीन्स्वसुतान्कामं बलिनो वीर्यसम्मतान् ॥ २३ ॥
माया बलवती ब्रह्मन् दुस्त्यजा ह्यकृतात्मभिः ।
अरूपा च निरालम्बा ज्ञानिनामपि मोहिनी ॥ २४ ॥
मातरि स्नेहसम्बद्धं तथा पुत्रेषु संवृतम् ।
न मे चित्तं वने शान्तिमगान्मुनिवरोत्तम ॥ २५ ॥
दोलारूढं मनो जातं कदाचिद्धस्तिनापुरे ।
पुनः सरस्वतीतीरे न चैकत्र व्यवस्थितिः ॥ २६ ॥
कदाचिच्चिन्तयन् ज्ञानं मानसे प्रतिभाति वै ।
केऽमी पुत्राः क्व मोहोऽयं न श्राद्धार्हा मृतस्य मे ॥ २७ ॥
व्यभिचारोद्‌भवाः किं मे सुखदाः स्युः सुताः किल ।
माया बलवती मोहं वितनोति हि मानसे ॥ २८ ॥
जानन्मोहान्धकूपेऽस्मिन्पतितोऽहं मृषा मुने ।
इत्यकुर्वं रहस्तापं कदाचित्स्सुसमाहितः ॥ २९ ॥
राज्यं प्राप ततः पाण्डुर्बलवान्भीष्मसम्मतः ।
तदा मम मनो जातं प्रसन्नं सुतकारणात् ॥ ३० ॥
कुन्ती माद्री सुरूपे द्वे भार्ये तस्य बभूवतुः ।
शूरसेनसुता कुन्ती मद्रराजसुतापरा ॥ ३१ ॥
स शापं द्विजतः प्राप्य कामिनीद्वयसंयुतः ।
पाण्डुर्निर्वेदमापन्नस्त्यक्त्वा राज्यं वनं गतः ॥ ३२ ॥
तदा मामाविशच्छोकः श्रुत्वा पुत्रं वने स्थितम् ।
गतोऽहं तत्र यत्रासौ भार्याभ्यां सह संस्थितः ॥ ३३ ॥
तमाश्वास्य वने पाण्डुं पुनः प्राप्तो गजाह्वये ।
धृतराष्ट्रं समाभाष्य ह्यगमं ब्रह्मजातटे ॥ ३४ ॥
क्षेत्रजान्पञ्चपुत्रान्स समुत्पाद्य वनाश्रमे ।
धर्मतो वायुतः शक्रादश्विभ्यां पञ्च पाण्डवान् ॥ ३५ ॥
युधिष्ठिरो भीमसेनस्तथैवार्जुन इत्यपि ।
कुन्तीपुत्राः समाख्याता धर्मानिलसुरेशजाः ॥ ३६ ॥
नकुलः सहदेवश्च मद्रराजसुतासुतौ ।
कदाचित्तु रहो माद्रीं समालिङ्ग्य महीपतिः ॥ ३७ ॥
मृतः शापात्तु मुनिभिः संस्कृतो हुतभुङ्‌मुखे ।
माद्री तत्र सती भूत्वा प्रविष्टा पतिना सह ॥ ३८ ॥
स्थिता पुत्रयुता कुन्ती ज्वलिते जातवेदसि ।
मुनयः सुतसंयुक्तां शूरसेनसुतां तदा ॥ ३९ ॥
दुःखितां पतिहीनां तामानिन्युर्गजसाह्वये ।
समर्पिताथ भीष्माय विदुराय महात्मने ॥ ४० ॥
श्रुत्वाहं सुखदुःखाभ्यां पीडितस्तु परात्मभिः ।
भीष्मेण पालिताः पुत्राः पाण्डोरिति विचिन्त्य ते ॥ ४१ ॥
विदुरेण तथा प्रीत्या धृतराष्ट्रेण धीमता ।
दुर्योधनादयस्तस्य पुत्रा ये क्रूरमानसाः ॥ ४२ ॥
एकत्र स्थितिमापन्ना विरोधं चकुरद्‌भुतम् ।
द्रोणाचार्यस्तु सम्माप्तस्तत्र भीष्मेण मानितः ॥ ४३ ॥
अध्यापनाय पुत्राणां पुरे तस्मिन्निवासितः ।
कर्णः कुन्त्या परित्यक्तो जातमात्रः शिशुर्यदा ॥ ४४ ॥
सूतेन पालितो नद्यां प्रान्तश्चाधिरथेन ह ।
दुर्योधनप्रियश्चाभूत्कर्णः शूरतमस्तथा ॥ ४५ ॥
परस्परं विरोधोऽभूद्‌भीमदुर्योधनादिषु ।
धृतराष्ट्रस्तु सञ्चिन्त्य क्लेशं पुत्रेषु तेषु च ॥ ४६ ॥
निवासं कल्पयामास पाण्डवानां महात्मनाम् ।
विरोधशमनायैव नगरे वारणावते ॥ ४७ ॥
दुर्योधनेन तत्रैव द्रोहाज्जतुगृहाणि वै ।
कारितानि च दिव्यानि प्रेष्य मित्रं पुरोचनम् ॥ ४८ ॥
श्रुत्वा जतुगृहे दग्धान्पाण्डवान्पृथया युतान् ।
पौत्रभावान्मुनिश्रेष्ठ मग्नोऽहं व्यसनार्णवे ॥ ४९ ॥
शोकातुरो भृशं शून्ये वने पश्यन्नहर्निशम् ।
दृष्टा मयैकचक्रायां पाण्डवा दुःखकर्शिताः ॥ ५० ॥
ततस्तुष्टमनाश्चाहं जातः पार्थान्विलोक्य च ।
प्रेरितास्ते मया तूर्णं द्रुपदस्य पुरं प्रति ॥ ५१ ॥
ते गतास्तत्र दुःखार्ता विप्रवेषधराः कृशाः ।
मृगचर्मपरीधानाः सभायां संस्थितास्तदा ॥ ५२ ॥
कृत्वा पराक्रमं जिष्णुः स जित्वा द्रुपदात्मजाम् ।
चक्रुर्विवाहं मानिन्या पञ्चैव मातृवाक्यतः ॥ ५३ ॥
दृष्ट्वा विवाहं तेषां तु मुदितोऽहं भृशं तदा ।
ततो नागाह्वये प्राप्ताः पाञ्चालीसहिता मुने ॥ ५४ ॥
निवासं खाण्डवप्रस्थं धृतराष्ट्रेण कल्पितम् ।
पाण्डवानां द्विजश्रेष्ठ वसुदेवसुतेन वै ॥ ५५ ॥
तर्पितः पावकस्तत्र विष्णुना सह जिष्णुना ।
राजसूयः कृतो यज्ञस्तदाहं मुदितोऽभवम् ॥ ५६ ॥
दृष्ट्वाथ विभवं तेषां तथा मयकृतां सभाम् ।
दुर्योधनोऽतिसन्तप्तो दुरोदरमथाकरोत् ॥ ५७ ॥
दुर्द्यूतवेदी शकुनिरनक्षज्ञश्च धर्मजः ।
हृतं राज्यं धनं सर्वं याज्ञसेनी च क्लेशिता ॥ ५८ ॥
वने द्वादश वर्षाणि पाण्डवास्ते विवासिताः ।
पाञ्चालीसहितास्तेन दुःखं मे जनितं भृशम् ॥ ५९ ॥
एवं नारद संसारे सुखदुःखात्मके भृशम् ।
निमग्नोऽहं भ्रमेणैव जानन् धर्मं सनातनम् ॥ ६० ॥
कोऽहं कस्य सुतास्तेऽमी का माता किं सुखं पुनः ।
येन मे हृदयं मोहाद्‌भ्रमतीति दिवानिशम् ॥ ६१ ॥
किं करोमि क्व गच्छामि सन्तोषो नाधिगच्छति ।
दोलारूढं मनो मेऽत्र चञ्चलं न स्थिरं भवेत् ॥ ६२ ॥
सर्वज्ञोऽसि मुनिश्रेष्ठ सन्देहं मे निवर्तय ।
तथा कुरु यथाहं स्यां सुखितो विगतज्वरः ॥ ६३ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
षष्ठस्कन्धे व्यासस्वकीयमोहवर्णनं नाम पञ्चविंशोऽध्यायः ॥ २५ ॥


व्यासांची संभ्रमावस्था -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

माझी माता पुनः मला म्हणाली, "हे पुत्रा आता तू दुसर्‍या सुनेच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न होईल असे कर. कारण अंध राजा राज्याधिकारी होणे शक्य नाही.''

मातेचे भाषण ऐकून मी तेथेच राहिलो. अंबालिका ऋतुस्नात झाल्यावर लज्जित होऊन एकांतात शयनगृहात मजकडे आली. परंतु माझ्यासारखा जटिल पाहून ती पांडुरवर्णी झाली. त्यामुळे मी क्रुद्ध झालो. मी म्हणालो, "मला पाहाताच तू पांडुरवर्णी झालीस म्हणून तुला पांडुरवर्णी पुत्र होईल.''

असे म्हणून मी त्या रात्री तिच्याशी समागम केला व दुसर्‍या दिवशी मातेचा निरोप घेऊन निघून गेलो. पुढे यथावकाश अंध धृतराष्ट्र व पांडुरवर्णी पांडू असे दोन पुत्र जन्मास आले. पण त्या पुत्रांना पाहून खिन्न झालेली माझी माता म्हणाली, "हे द्वैपायना, हे दोन्ही पुत्र राज्याला योग्य नाहीत, म्हणून तू मला प्रिय होईल असा मनोहर पुत्र उत्पन्न कर.''

असे म्हणून माझी माता अंबिकेला म्हणाली, ''हे कन्ये, तू व्यासाला आलिंगन दे व राज्यास योग्य असा पुत्र निर्माण कर."

पण लाजेने ती काहीच बोलली नाही. मातेच्या आज्ञेवरून रात्री मी शयनगृहात गेलो. पण तेथे अलंकारानी विभूषित अशी विचित्रवीर्याची दासी अंबिकेने पाठवली होती. तिने मजबरोबर शृंगाराच्या इच्छा धरून मला मंचकावर बसविले. तेव्हा मी प्रसन्न झालो व म्हणालो, "हे शुभांगी, तुला सर्वलक्षणसंपन्न, सुस्वरूप, धर्मवेत्ता, सत्यवचनी, जितेंद्रिय असा पुत्र होईल.''

पुढे तिच्यापोटी विदुर नावाचा उत्तम पुत्र उत्पन्न झाला. पण या तिन्ही परस्त्रींच्या पुत्रांमध्ये मी मायावश झालो. त्यामुळे शुकविरहाचे दुःख मी विसरलो.

रूपहीन, निराधार असलेल्या मायेने मीही व्याप्त होऊन गेलो, यावरून त्या मायेचा त्याग करण्यास समर्थ नाही हेच खरे. कारण तेव्हापासून मला वनात शांतता लागेना. मी कधी हस्तिनापुरात तर कधी सरस्वतीच्या तीरी असा राहू लागलो. एखाद्या वेळी विचार करताना मला ज्ञान होते. मी मलाच प्रश्‍न विचारतो, "कोण हे पुत्र ? काय हा मोह ? खरोखर माझ्या मृत्यूनंतर हे पुत्र माझे श्राद्ध करण्यासही योग्य नाहीत. व्यभिचारापासून उत्पन्न झालेले हे पुत्र कसे सुख देणार ? खरोखर जाणीव असूनही मी या मोहात पडलो आहे."

असे विचार मनात येऊन कित्येक वेळा मला पश्‍चात्ताप होतो.

पुढे भीष्माच्या आज्ञेने पांडूला राज्य मिळाले. कुंती व माद्री या त्याच्या दोघी भार्या होत्या. पण पुढे पांडू दैवयोगाने शापभ्रष्ट होऊन वनात राहिला. तेव्हा मी पांडूला धीर दिला. पुढे दानधर्म, वायु, इंद्र, अश्विनीकुमार यांच्यापासून पांडूला पाच क्षेत्रज पुत्र उत्पन्न झाले. युधिष्ठिर, भीमसेन, अर्जुन हे कुंतीचे पुत्र व नकुल, सहदेव हे माद्रीचे पुत्र होत.

एकदा एकांतसमयी पांडूने माद्रीला आलिंगन दिले. शापामुळे तो तत्काल मृत झाला. माद्री सती गेली. नंतर कुंतीला पाचही पुत्रांसह ऋषींनी हस्तिनापुरात आणले व सर्वांना विदुर व भीष्म यांच्या स्वाधीन केले.

पुढे त्या पुत्रांच्या संबंधाने मलाही दुःख झाले. पण भीष्म पांडुपुत्रांचे योग्य असे पालन करीत आहे. हे पाहून मी स्वस्थ झालो. धृतराष्ट्र व विदुर हेही त्यांचा नीट सांभाळ करीत होते. पण दुर्योधनादी धृतराष्ट्राचे पुत्र क्रुर अंत:करणाचे होते. ते पांडवांशी द्वेषाने वागू लागले.

पुढे द्रोणाचार्यांना गुरूचा मान दिला. कुंतीचा प्रथमपुत्र कर्ण हा दुर्योधनाचा मित्र झाला. नंतर भीम व दुर्योधन यांच्यात विरोध निर्माण झाला. विरोध वाढू नये म्हणून धृतराष्ट्राने वारणावत नगरात पांडवांना नेऊन ठेवले, पण दुर्योधनाने पुरोचनाकडून तेथे लाक्षागृहे तयार केली.

नंतर पांडव व कुंती लाक्षागृहात दग्ध झाल्याचे ऐकून मी पुनः दुःखी झालो. त्याच्यासाठी मी रानावनांत हिंडू लागलो. कृश झालेले पांडव एकचक्रानगरीमध्ये मला दिसले, तेव्हा संतुष्ट होऊन मी त्यांना स्वयंवराकरिता द्रुपदाच्या नगरीकडे पाठविले. तेथे ब्राह्मणवेषधारी अर्जुनाने पराक्रमाने द्रुपदकन्येस जिंकले. पण मातेच्या आज्ञेवरून त्या पाचही बांधवांनी द्रौपदीशी विवाह केला. मला त्यामुळे आनंद झाला. धृतराष्ट्राने पांडवाकरता खांडवनात वसतिस्थान तयार केले. नंतर कृष्णाच्या साह्याने अर्जुनाने खांडव वन अग्नीला अर्पण केले. पांडवांनी राजसूय यज्ञ केल्यामुळे मला अत्यंत आनंद झाला.

पांडवांचे वैभव वाढू लागल्याचे पाहून दुर्योधनाने द्यूत खेळण्यास धर्मराजाला आवाहन केले. कपटाने पांडवांचे सर्वस्व जिंकून कौरवांनी द्रौपदीला अत्यंत क्लेश दिले. पांडवांना द्रौपदीसह बारा वर्षे वनवास भोगावा लागला. तेव्हा मला अपार दुःख झाले.

हे नारदा, मी धर्माचा जाणकार असूनही भ्रमामुळे सुखदुःखामध्ये मग्न झालो. तेव्हा पुत्र, माता हे सर्व कोण ? सुख कोणते ? या विचाराने मला काहीही सुचेनासे झाले आहे. हे नारदा, या प्रसंगी मी काय करावे ? माझ्या मनाला समाधान लाभत नाही. हे चंचल मन स्थिर होत नाही. म्हणून हे मुनिश्रेष्ठा, आपण माझ्या संशयाचे निवारण करून मला सुखी व निश्चिंत करा.अध्याय पंचविसावा समाप्त


GO TOP