शैवोपनिषदे


मुक्तिकोपनिषदांत ’१०८ उपनिषदांचा अभ्यास कर’ असा रामाने हनुमंतास उपदेश केला. अव्यक्त परमात्म्याचे गुणानुसार तीन विभाग मानतात त्याला ’ईश्वर’ ही संज्ञा आहे. हे तीन ईश्वर म्हणजे ब्रह्मा, विष्णु, शिव. पण या तिन्ही ईश्वरांचे कार्य परम परमात्म्याच्या अगणित सामर्थ्यांपैकी ’शक्ति’ नामक कार्यात्मक सामर्थ्याने चालते. त्या ’शक्ति’चेही सगुण रुप म्हणजे ’शाक्त’ स्वरूप. कार्या्‍यानुसार परमात्म्याचे तीन ईश्वर अंश आणि त्याची ’शक्ति’ अंश हे सर्व म्हणजेच परमात्म्याचे ’दैवी’ सगुण रूप समजतात. १०८ उपनिषदांपैकी भगवंताच्या ’शिव’ या ईश्वराच्या अवतारांसंबंधीत १५ उपनिषदे आहेत.