श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
द्वादशः स्कन्धः
पञ्चमोऽध्यायः


श्रीगायत्रीस्तोत्रवर्णनम्

नारद उवाव
भक्तानुकम्पिन् सर्वज्ञ हृदयं पापनाशनम् ।
गायत्र्याः कथितं तस्माद्‌गायत्र्याः स्तोत्रमीरय ॥ १ ॥
श्रीनारायण उवाच
आदिशक्ते जगन्मातर्भक्तानुग्रहकारिणि ।
सर्वत्र व्यापिकेऽनन्ते श्रीसन्ध्ये ते नमोऽस्तु ते ॥ २ ॥
त्वमेव सन्ध्या गायत्री सावित्री च सरस्वती ।
बाह्मी च वैष्णवी रौद्री रक्ता श्वेता सितेतरा ॥ ३ ॥
प्रातर्बाला च मध्याह्ने यौवनस्था भवेत्पुनः ।
वृद्धा सायं भगवती चिन्त्यते मुनिभिः सदा ॥ ४ ॥
हंसस्था गरुडारूढा तथा वृषभवाहिनी ।
ऋग्वेदाध्यायिनी भूमौ दृश्यते या तपस्विभिः ॥ ५ ॥
यजुर्वेदं पठन्ती च अन्तरिक्षे विराजते ।
सा सामगापि सर्वेषु भ्राम्यमाणा तथा भुवि ॥ ६ ॥
रुद्रलोकं गता त्वं हि विष्णुलोकनिवासिनी ।
त्वमेव ब्रह्मणो लोकेऽमर्त्यानुग्रहकारिणी ॥ ७ ॥ ॥
सप्तर्षिप्रीतिजननी माया बहुवरप्रदा ।
शिवयोः करनेत्रोत्था ह्यश्रुस्वेदसमुद्‍भवा ॥ ८ ॥
आनन्दजननी दुर्गा दशधा परिपढ्यते ।
वरेण्या वरदा चैव वरिष्ठा वरवर्णिनी ॥ ९ ॥
गरिष्ठा च वरार्हा च वरारोहा च सप्तमी ।
नीलगङ्‌गा तथा सन्ध्या सर्वदा भोगमोक्षदा ॥ १० ॥
भागीरथी मर्त्यलोके पाताले भोगवत्यपि ।
त्रिलोकवाहिनी देवी स्थानत्रयनिवासिनी ॥ ११ ॥
भूर्लोकस्था त्वमेवासि धरित्री लोकधारिणी ।
भुवो लोके वायुशक्तिः स्वर्लोके तेजसां निधिः ॥ १२ ॥
महर्लोके महासिद्धिर्जनलोके जनेत्यपि ।
तपस्विनी तपोलोके सत्यलोके तु सत्यवाक् ॥ १३ ॥
कमला विष्णुलोके च गायत्री ब्रह्मलोकदा ।
रुद्रलोके स्थिता गौरी हरार्धाङ्‌गनिवासिनी । १४ ॥
अहमो महतश्चैव प्रकृतिस्त्वं हि गीयसे ।
साम्यावस्थात्मिका त्वं हि शबलब्रह्मरूपिणी ॥ १५ ॥
ततः परा परा शक्तिः परमा त्वं हि गीयसे ।
इच्छाशक्तिः क्रियाशक्तिर्ज्ञानशक्तिस्त्रिशक्तिदा ॥ १६ ॥
गङ्‌गा च यमुना चैव विपाशा च सरस्वती ।
सरयूर्देविका सिन्धुर्नर्मदैरावती तथा ॥ १७ ॥
गोदावरी शतद्रूश्च कावेरी देवलोकगा ।
कौशिकी चन्द्रभागा च वितस्ता च सरस्वती ॥ १८ ॥
गण्डकी तापिनी तोया गोमती वेत्रवत्यपि ।
इडा च पिङ्‌गला चैव सुषुम्णा च तृतीयका ॥ १९ ॥
गान्धारी हस्तिजिह्वा च पूषापूषा तथैव च ।
अलम्बुषा कुहूश्चैव शङ्‌खिनी प्राणवाहिनी ॥ २० ॥
नाडी च त्वं शरीरस्था गीयसे प्राक्तनैर्बुधैः ।
हृत्पद्मस्था प्राणशक्तिः कण्ठस्था स्वप्ननायिका ॥ २१ ॥
तालुस्था त्वं सदाधारा बिन्दुस्था बिन्दुमालिनी ।
मूले तु कुण्डलीशक्तिर्व्यापिनी केशमूलगा ॥ २२ ॥
शिखामध्यासना त्वं हि शिखाग्रे तु मनोन्मनी ।
किमन्यद्‌बहुनोक्तेन यत्किञ्चिज्जगतीत्रये ॥ २३ ॥
तत्सर्वं त्वं महादेवि श्रिये सन्ध्ये नमोऽस्तु ते ।
इतीदं कीर्तितं स्तोत्रं सन्ध्यायां बहुपुण्यदम् ॥ २४ ॥
महापापप्रशमनं महासिद्धिविधायकम् ।
य इदं कीर्तयेत्स्तोत्रं सन्ध्याकाले समाहितः ॥ २५ ॥
अपुत्रः प्राप्नुयात्युत्रं धनार्थी धनमाप्नुयात् ।
सर्वतीर्थतपोदानयज्ञयोगफलं लभेत् ॥ २६ ॥
भोगान्भुक्त्वा चिरं कालमन्ते मोक्षमवाप्नुयात् ।
तपस्विभिः कृतं स्तोत्रं स्नानकाले तु यः पठेत् ॥ २७ ॥
यत्र कुत्र जले मग्नः सन्ध्यामज्जनजं फलम् ।
लभते नात्र सन्देहः सत्यं सत्यं च नारद ॥ २८ ॥
शृणुयाद्योऽपि तद्‍भक्त्या स तु पापात्प्रमुच्यते ।
पीयूषसदृशं वाक्यं सन्ध्योक्तं नारदेरितम् ॥ २९ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
द्वादशस्कन्धे श्रीगायत्रीस्तोत्रवर्णनं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥


गायत्रीस्तोत्र

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारद म्हणाले, ''हे सर्वेशा, आता गायत्रीचे स्तोत्र सांगा. श्रीनारायण म्हणाले, ''हे आदिशक्ति जगन्माते, तू भक्तावर अनुग्रह करणारी आहेस. व्यापक व अनंत आहेस. हे श्रीसंध्ये, तुला नमस्कार असो. तू संध्याच गायत्री, सावित्री, सरस्वती, ब्राह्मणी, वैष्णवी, रौद्री, रक्ता, श्वेता, कृष्णा आहेस. प्रातःकाली अल्पवयस्क, मध्यान्हकाली तरुणी, सायंकाली वृद्धा अशा तुझे भगवतीचे सर्व मुनी चिंतन करतात. हंसारूढ झालेली, गरुडारूढ असलेली, वृषभ वाहन असलेली ऋग्वेदाचे अध्ययन करणारी, अशा रूपाने तू तपस्व्यांना दिसतेस.

यजुर्वेदाचे पठण करून अंतरिक्षात विराजमान झालेली, सामवेदांतर्गत अशी, भूलोकी भ्रमण करणारी, रुद्रलोकी गेलेली, विष्णुलोकी वास करणारी, ब्रह्मलोकी देवांवर अनुग्रह करणारी अशी तूच आहेस. सप्तर्षीची प्राती निर्माण करणारी, वरदायिनी, माया, शिव, शक्ती, यांच्या हाताच्या घामातून व अश्रूंपासून उत्पन्न झालेली, अशी दहा प्रकारची दुर्गा आहे.

वरण्या, वरदा, वरिष्ठा, गरिष्ठा, वाहा, वरारोहा, नीलगंगा, संध्या, सर्वभोग व मोक्ष देणारी, मर्त्यलोकी भागीरथी, पाताली भोगावती, अशी त्रैलोक्यात रहाणारी देवी तूच आहेस. भूर्लोक धारण करणारी धरित्री तूच असून भूवर्लोकात वायुशक्ती, स्वर्गलोकात तेजभांडार, महर्लोकात महासिद्धी, जनलोकात जननी, तपोलोकात तपस्विनी; सत्यलोकात सत्यवाणी, विष्णुलोकी कमला, ब्रह्मलोकी व रुद्रलोकी गायत्री तूच आहेस.

तू शंकराच्या अर्ध्यासनावर रहातेस. अहं, ओम्, अहत् अशी तू प्रकृती आहेस, साग्रगवस्थारूप शबल ब्रह्मरूपी आहेस. म्हणून परा, पराक्रमी, परमा असे तुला म्हणतात. इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती तूच आहेस. गंगा, यमुना, विपाशा, सरस्वती, शरयू देविका, नर्मदा, ऐरावती, गोदावरी, शतद्रू, कावेरी, देवलोकगा, कौशिकी, चंद्रभागा, विस्घृत, सरस्वती, गंडकी, तपिनी, करतोया, गोमती, वेत्रवती या सर्व नद्या; इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी, हस्तजिव्हा, पूषा, अलंबुषा, कुहू शंखिनी, प्राणवाहिनी या नाड्या तूच आहेस.

हृदयातील प्राणशक्ती, कंठातील स्वप्ननायिका, तालूतील आधार व बिंदुमालिनी तूच आहेस. केशमलापर्यंत व्यापणारी, ज्ञानलोकात असणारी, मूलधारातील कुंडलिनीशक्ती तूच आहेस. या त्रैलोक्यातील सर्व काही, हे महादेवी, तूच आहेस. हे श्रिये, हे संध्ये, तुला नमस्कार असो.

असे हे स्तोत्र किर्ती व पुण्य देते. महापाप नष्ट करून सिद्धी देते. हे स्तोत्र पठण करणार्‍या निपुत्रिकास पुत्र होतो. धनार्थीस धन मिळते. तीर्थे, तप, दान इत्यादींचे फल मिळते. अनंत सुखभोग भोगून मोक्ष मिळतो. स्तोत्र स्नानाचे वेळी म्हटल्यास त्याला संध्यास्नानाचे फल मिळते. ते भक्तीने श्रवण करणारा पापमुक्त होतो. हे संध्योग्न वाक्य आहे.अध्याय पाचवा समाप्त

GO TOP