श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
एकत्रिंशोऽध्यायः


यमाष्टकवर्णनम्

श्रीनारायण उवाच
शक्तेरुत्कीर्तनं श्रुत्वा सावित्री यमवक्त्रतः ।
साश्रुनेत्रा सपुलका यमं पुनरुवाच सा ॥ १ ॥
सावित्र्युवाच
शक्तेरुत्कीर्तनं धर्म सकलोद्धारकारणम् ।
श्रोतॄणां चैव वक्तॄणां जन्ममृत्युजराहरम् ॥ २ ॥
दानवानां च सिद्धानां तपसां च परं पदम् ।
योगानां चैव वेदानां कीर्तनं सेवनं विभो ॥ ३ ॥
मुक्तित्वममरत्वं च सर्वसिद्धित्वमेव च ।
श्रीशक्तिसेवकस्यैव कलां नार्हन्ति षोडशीम् ॥ ४ ॥
भजामि केन विधिना वद वेदविदांवर ।
शुभकर्मविपाकं च श्रुतं नॄणां मनोहरम् ॥ ५ ॥
कर्माशुभविपाकं च तन्मे व्याख्यातुमर्हसि ।
इत्युक्त्वा च सती ब्रह्मन् भक्तिनम्रात्मकन्धरा ॥ ६ ॥
तुष्टाव धर्मराजं च वेदोक्तेन स्तवेन च ।
सावित्र्युवाच
तपसा धर्ममाराध्य पुष्करे भास्करः पुरा ॥ ७ ॥
धर्मं सूर्यः सुतं प्राप धर्मराजं नमाम्यहम् ।
समता सर्वभूतेषु यस्य सर्वस्य साक्षिणः ॥ ८ ॥
अतो यन्‍नाम शमनमिति तं प्रणमाम्यहम् ।
येनान्तश्च कृतो विश्वे सर्वेषां जीविनां परम् ॥ ९ ॥
कामानुरूपं कालेन तं कृतान्तं नमाम्यहम् ।
बिभर्ति दण्डं दण्डाय पापिनां शुद्धिहेतवे ॥ १० ॥
नमामि तं दण्डधरं यः शास्ता सर्वजीविनाम् ।
विश्वं च कलयत्येव यः सर्वेषु च सन्ततम् ॥ ११ ॥
अतीव दुर्निवार्यं च तं कालं प्रणमाम्यहम् ।
तपस्वी ब्रह्मनिष्ठो यः संयमी सञ्जितेन्द्रियः ॥ १२ ॥
जीवानां कर्मफलदस्तं यमं प्रणमाम्यहम् ।
स्वात्मारामश्च सर्वज्ञो मित्रं पुण्यकृतां भवेत् ॥ १३ ॥
पापिनां क्लेशदो यस्तं पुण्यमित्रं नमाम्यहम् ।
यज्जन्म ब्रह्मणोंऽशेन ज्वलन्तं ब्रह्मतेजसा ॥ १४ ॥
यो ध्यायति परं ब्रह्म तमीशं प्रणमाम्यहम् ।
इत्युक्त्वा सा च सावित्री प्रणनाम यमं मुने ॥ १५ ॥
यमस्तां शक्तिभजनं कर्मपाकमुवाच ह ।
इदं यमाष्टकं नित्यं प्रातरुत्थाय यः पठेत् ॥ १६ ॥
यमात्तस्य भयं नास्ति सर्वपापात्प्रमुच्यते ।
महापापी यदि पठेन्‍नित्यं भक्तिसमन्वितः ।
यमः करोति संशुद्धं कायव्यूहेन निश्चितम् ॥ १७ ॥


सावित्रीला देवीमंत्राचा उपदेश -

यमाने सांगितलेले शक्तीचे वर्णन ऐकल्यावर सावित्रीच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. ती यमास म्हणाली, "हे धर्मराज, सर्वांचा उद्धार करणारी शक्ती हेच सर्वांचे परमपद आहे. अशा शक्तीच्या कीर्तनाने वेद व योग यांचे आचरण केल्याचे फल मिळते. मुक्ती अमरत्व यांना शक्तीच्या सोळाव्या कलेचीही सर नाही. ह्या देवीला कसे भजावे हे मला सांगा. तसेच शुभ-अशुभ कर्माचे फलाविषयीही मला सांगा."

असे म्हणून सावित्रीने धर्माची स्तुती केली. ती म्हणाली, "पुष्कराज धर्माची आराधना करून सूर्याने धर्मरूपी पुत्राची प्राप्ती करून घेतली. त्या धर्मराजाला मी नमस्कार करते. त्याची सर्व भूतांचे ठिकाणी समबुद्धी आहे. म्हणून त्याला शमन म्हणतात. मी त्याला प्रणाम करते.

जो प्राण्याचा अंत करतो व कर्माप्रमाणे फल तो त्या कृतांताला माझा नमस्कार असो.
पाप्यांना दंड करण्यासाठी जो दंड धारण करतो, त्या शास्त्याला मी नमस्कार करते. सर्व काली विश्वाची गणना करणार्‍यास व अनिवार्य कालास मी वंदन करते.

जो तपस्व्यात स्थित असून मनोनिग्रही आहे, जो जितेंद्रिय आहे, अशा त्या कर्मफल देणार्‍या यमास मी नमस्कार करते. जो सर्वज्ञ व पुण्यवानांचा मित्र आहे, त्याला मी नमस्कार करते. ब्रह्मतेजाने ज्याचा जन्म झाला, जो ब्रह्मतेजाने झळकतो आहे, जो परब्रह्माचे ध्यान करतो, त्या ईश्वराला मी वंदन करते."

असे म्हणून सावित्रीने यमास नमस्कार केला, तेव्हा यमाने तिला शक्तीची उपासना व कर्मविपाक सांगितला. "हे यमाष्टक प्रातः काली जो नेमाने म्हणतो, तो यमाच्या भयापासून मुक्त होतो. महापाप्याने जरी भक्तिपूर्वक त्याचे पठण केले तरी यम त्याला शुद्ध करतो.


इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
नवमस्कन्धे यमाष्टकवर्णनं नामेकत्रिशोऽध्यायः ॥ ३१ ॥

अध्याय एकतिसावा समाप्त

GO TOP