श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
चतुर्थः स्कन्धः
प्रथमोऽध्यायः


जनमेजयप्रश्नाः

जनमेजय उवाच
वासवेय मुनिश्रेष्ठ सर्वज्ञाननिधेऽनघ ।
प्रष्टुमिच्छाम्यहं स्वामिन्नस्माकं कुलवर्धन ॥ १ ॥
शूरसेनसुतः श्रीमान्वसुदेवः प्रतापवान् ।
श्रुतं मया हरिर्यस्य पुत्रभावमवाप्तवान् ॥ २ ॥
देवानामपि पूज्योऽभून्नाम्ना चानकदुन्दुभिः ।
कारागारे कथं बद्धः कंसस्य धर्मतत्परः ॥ ३ ॥
देवक्या भार्यया सार्धं किमागः कृतवानसौ ।
देवक्या बालषट्कस्य विनाशश्च कृतः पुनः ॥ ४ ॥
तेन कंसेन कस्माद्वै ययातिकुलजेन च ।
कारागारे कथं जन्म वासुदेवस्य वै हरेः ॥ ५ ॥
गोकुले च कथं नीतो भगवान्सात्वतां पतिः ।
गतो जन्मान्तरं कस्मात्पितरौ निगडे स्थितौ ॥ ६ ॥
देवकीवसुदेवौ च कृष्णस्यामिततेजसः ।
कथं न मोचितौ वृद्धौ पितरौ हरिणामुना ॥ ७ ॥
जगत्कर्तुं समर्थेन स्थितेन जनकोदरे ।
प्राक्तनं किं तयोः कर्म दुर्विज्ञेयं महात्मभिः ॥ ८ ॥
जन्म वै वासुदेवस्य यत्रासीत्परमात्मनः ।
के ते पुत्राश्च का बाला या कंसेन विपोथिता ॥ ९ ॥
शिलायां निर्गता व्योम्नि जाता त्वष्टभुजा पुनः ।
गार्हस्थ्यञ्च हरेर्ब्रूहि बहुभार्यस्य चानघ ॥ १० ॥
कार्याणि तत्र तान्येव देहत्यागं च तस्य वै ।
किंवदन्त्या श्रुतं यत्तन्मनो मोहयतीव मे ॥ ११ ॥
चरितं वासुदेवस्य त्वमाख्याहि यथातथम् ।
नरनारायणौ देवौ पुराणावृषिसत्तमौ ॥ १२ ॥
धर्मपुत्रौ महात्मानौ तपश्चेरतुरुत्तमम् ।
यौ मुनी बहुवर्षाणि पुण्ये बदरिकाश्रमे ॥ १३ ॥
निराहारौ जितात्मानौ निःस्पृहौ जितषड्गुणौ ।
विष्णोरंशौ जगत्स्थेम्ने तपश्चेरतुरुत्तमम् ॥ १४ ॥
तयोरंशावतारौ हि जिष्णुकृष्णौ महाबलौ ।
प्रसिद्धौ मुनिभिः प्रोक्तौ सर्वज्ञैर्नारदादिभिः ॥ १५ ॥
विद्यमानशरीरौ तौ कथं देहान्तरं गतौ ।
नरनारायणौ देवौ पुनः कृष्णार्जुनौ कथम् ॥ १६ ॥
यौ चक्रतुस्तपश्चोग्रं मुक्त्यर्थं मुनिसत्तमौ ।
तौ कथं प्रापतुर्देहौ प्राप्तयोगौ महातपौ ॥ १७ ॥
शूद्रः स्वधर्मनिष्ठस्तु देहान्ते क्षत्रियस्तु सः ।
शुभाचारो मृतो यो वै स शूद्रो ब्राह्मणो भवेत् ॥ १८ ॥
ब्राह्मणो निःस्पृहः शान्तो भवरोगाद्विमुच्यते ।
विपरीतमिदं भाति नरनारायणौ च तौ ॥ १९ ॥
तपसा शोषितात्मानौ क्षत्रियौ तौ बभूवतुः ।
केन तौ कर्मणा शान्तौ जातौ शापेन वा पुनः ॥ २० ॥
ब्राह्मणौ क्षत्रियौ जातौ कारणं तन्मुने वद ।
यादवानां विनाशश्च ब्रह्मशापादिति श्रुतः ॥ २१ ॥
कृष्णस्यापि हि गान्धार्याः शापेनैव कुलक्षयः ।
प्रद्युम्नहरणं चैव शम्बरेण कथं कृतम् ॥ २२ ॥
वर्तमाने वासुदेवे देवदेवे जनार्दने ।
पुत्रस्य सूतिकागेहाद्धरणं चातिदुर्घटम् ॥ २३ ॥
द्वारकादुर्गमध्याद्वै हरिवेश्माद्दुरत्ययात् ।
न ज्ञातं वासुदेवेन तत्कथं दिव्यचक्षुषा ॥ २४ ॥
सन्देहोऽयं महान्ब्रह्मन्निसन्देहं कुरु प्रभो ।
यत्पत्‍न्यो वासुदेवस्य दस्युभिर्लुण्ठिता हृताः ॥ २५ ॥
स्वर्गते देवदेवे तु तत्कथं मुनिसत्तम ।
संशयो जायते ब्रह्मंश्चित्तान्दोलनकारकः ॥ २६ ॥
विष्णोरंशः समुद्‌भूतः शौरिर्भूभारहारकृत् ।
स कथं मथुराराज्यं भयात्त्यक्त्वा जनार्दनः ॥ २७ ॥
द्वारवत्यां गतः साधो ससैन्यः ससुहृद्‌गणः ।
अवतारो हरेः प्रोक्तो भूभारहरणाय वै ॥ २८ ॥
पापात्मनां विनाशाय धर्मसंस्थापनाय च ।
तत्कथं वासुदेवेन चौरास्ते न निपातिताः ॥ २९ ॥
यैर्हृता वासुदेवस्य पत्‍न्यः संलुण्ठिताश्च ताः ।
स्तेनास्ते किं न विज्ञाताः सर्वज्ञेन सता पुनः ॥ ३० ॥
भीष्मद्रोणवधः कामं भूभारहरणे मतः ।
अर्चिताश्च महात्मानः पाण्डवा धर्मतत्पराः ॥ ३१ ॥
कृष्णभक्ताः सदाचारा युधिष्ठिरपुरोगमाः ।
ते कृत्वा राजसूयञ्च यज्ञराजं विधानतः ॥ ३२ ॥
दक्षिणा विविधा दत्त्वा ब्राह्मणेभ्योऽतिभावतः ।
पाण्डुपुत्रास्तु देवांशा वासुदेवाश्रिता मुने ॥ ३३ ॥
घोरं दुःखं कथं प्राप्ताः क्व गतं सुकृतञ्च तत् ।
किं तत्पापं महारौद्रं येन ते पीडिताः सदा ॥ ३४ ॥
द्रौपदी च महाभागा वेदीमध्यात्समुत्थिता ।
रमांशजा च साध्वी च कृष्णभक्तियुता तथा ॥ ३५ ॥
सा कथं दुःखमतुलं प्राप घोरं पुनः पुनः ।
दुःशासनेन सा केशे गृहीता पीडिता भृशम् ॥ ३६ ॥
रजस्वला सभायां तु नीता भीतैकवाससा ।
विराटनगरे दासी जाता मत्स्यस्य सा पुनः ॥ ३७ ॥
धर्षिता कीचकेनाथ रुदती कुररी यथा ।
हृता जयद्रथेनाथ क्रन्दमानातिदुःखिता ॥ ३८ ॥
मोचिता पाण्डवैः पश्चाद्‌बलवद्‌भिर्महात्मभिः ।
पूर्वजन्मकृतं पापं किं तद्येन च पीडिताः ॥ ३९ ॥
दुःखान्यनेकान्याप्तास्ते कथयाद्य महामते ।
राजसूयं क्रतुवरं कृत्वा ते मम पूर्वजाः ॥ ४० ॥
दुःखं महत्तरं प्राप्ताः पूर्वजन्मकृतेन वै ।
देवांशानां कथं तेषां संशयोऽयं महान्हि मे ॥ ४१ ॥
सदाचारैस्तु कौन्तेयैर्भीष्मद्रोणादयो हताः ।
छलेन धनलाभार्थं जानानैर्नश्वरं जगत् ॥ ४२ ॥
प्रेरिता वासुदेवेन पापे घोरे महात्मना ।
कुलं क्षयितवन्तस्ते हरिणा परमात्मना ॥ ४३ ॥
वरं भिक्षाटनं साधोर्नीवारैर्जीवनं वरम् ।
योधान्न हत्वा लोभेन शिल्पेन जीवनं वरम् ॥ ४४ ॥
विच्छिन्नस्तु त्वया वंशो रक्षितो मुनिसत्तम ।
समुत्पाद्य सुतानाशु गोलकाच्छत्रुनाशनान् ॥ ४५ ॥
सोऽल्पेनैव तु कालेन विराटतनयासुतः ।
तापसस्य गले सर्पं न्यस्तवान्कथमद्‌भुतम् ॥ ४६ ॥
नकोऽपि ब्राह्मणं द्वेष्टि क्षत्रियस्य कुलोद्‌भवः ।
तापसं मौनसंयुक्तं पित्रा किं तत्कृतं मुने ॥ ४७ ॥
एतैरन्यैश्च सन्देहैर्विकलं मे मनोऽधुना ।
स्थिरं कुरु पितः साधो सर्वज्ञोऽसि दयानिधे ॥ ४८ ॥


जनमेजय राजा शंकाकुल होतो -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

जनमेजयाने विचारले, "हे सत्यवतीपुत्रा, हे मुनीश्रेष्ठ, हे सर्वज्ञाननिधे, हे निष्पाप, हे प्रभो, हे अस्मदीय कुलवर्धक, मी आपणाला काही प्रश्‍न विचारू इच्छितो. त्या श्रीमान महाप्रतापी शुरसेनाचा पुत्र वसुदेव, हा अनकदुंदुभी या नावाने प्रसिद्ध होता. श्रीहरी त्याचा पुत्र झाला असे मी ऐकले आहे. तो वसुदेव देवांनाही पूज्य होता. पण हे श्रेष्ठा, तो वसुदेव आपली भार्या देवकीसह, त्या कंसाच्या कारागृहात कसा गेला ? कंसाचा त्याने कोणता अपराध केला होता ? त्या ययाति कुलोत्पन्न कंसाने वसुदेव देवकीच्या सहा बालकांचा नाश का केला ?

तसेच त्या भगवान वासुदेवाचा जन्म कारागृहात का झाला ? तो प्रख्यात यादवाधिपती गोकुळात कसा गेला ? प्रत्यक्ष क्षत्रिय कुलात जन्मास येऊनही लौकिक दृष्टया त्या वैश्यकुलात का जन्माला आला ? तो श्रीकृष्ण अत्यंत तेजस्वी असताही मातेच्या उदरामध्ये असताना तो आपल्या मातापित्यांची त्या शृंखलेतून, का बरे सोडवणूक करू शकला नाही ?

प्रत्यक्ष परमात्मा वासुदेव, वसुदेवाच्या पोटी जन्माला आला असताही, दुर्घट असे कोणते पातक त्या मातापित्याच्या हातून घडले होते ? ते पुत्र कोण होते ? कंसाने शीळेवर आपटत असतानाही निसटून आकाशवाणी रूप होणारी ती बाला कोण ?

हे निष्पाप, तसेच तो अनेक भार्यांनी युक्त असलेला श्रीहरी, त्याचा देहत्याग, याविषयी आपण मला कथन करा. खरोखरच आजवर मी इतरांकडून ऐकलेले वासुदेवाचे चरित्र मनोहर आहे. आपण मला ते विस्ताराने कथन करा. धर्मपुत्र महात्मे, पुरातन, श्रेष्ठ देवर्षी नरनारायणांनी उत्कृष्ठ तप केले. बद्रीकाश्रमात राहून निराहार, मनोनिग्रही कामक्रोध इत्यादी षड्‌रिपूवर विजय मिळवून ते राहिले. ते विष्णूअंश मुनी नरनारायण उत्कृष्ठ तप करीत होते.

नारदमुनींनी सर्व मुनींना सांगितले होते तेच कृष्णार्जुन म्हणून अंशत: अवतार होत. पण हे मुनीश्रेष्ठा, त्याचे नरनारायण हा एक देह कायम असता त्यांना दुसरी शरीरे कृष्णार्जुन म्हणून कशी प्राप्त झाली. ज्या श्रेष्ठ मुनींनी मुक्तीसाठी योगासह दारुण तप केले, त्या महातपस्यांना देह प्राप्ती कशी झाली ?

शूद्राने जर स्वधर्माचे आचरण उत्तम केले तर तो क्षत्रीय होतो. स्वधर्मानुचरण तत्पर व शत्रुवृत्ती असलेला शूद्र मृत्यूनंतर द्विजाचा जन्म प्राप्त होतो. ब्राह्मणाने शांत चित्ताने स्वधर्म आचरण केल्यास तो या भवसागरातून मुक्त होतो. पण तपःसामर्थ्याने स्वतःला शुद्ध करून घेतल्यावर ते नरनारायणमुनी पुन: क्षत्रिय झाले, याचे मला आश्चर्य वाटते आहे. त्यांना कुणाचा तरी शाप झाला की काय ?

हे व्यासमुने, हे सर्व चरित्र सविस्तरपणे ऐकण्याची माझी इच्छा आहे. एका ब्राह्मणांचा शाप झाल्यामुळे संपूर्ण यादव कुलाचा नाश झाला, असे माझ्या ऐकण्यात आहे. तसेच गांधारीच्या शापामुळे कृष्णाच्या कुलाचा नाश झाला असे समजते.

हे मुने, शंबराने प्रद्युम्नाला का हरण करून नेले ? प्रत्यक्ष देवाधिदेव तो भगवान जनार्दन त्यावेळी विद्यमान असताना, त्याच्या वाडयातून, प्रत्यक्ष द्वारकेच्या किल्ल्यातून त्या सूतिका गृहातून त्या पुत्राचे कसे हरण झाले ? दिव्यदृष्टी असलेल्या वासुदेवाला हे समजले कसे नाही ?

हे ब्राह्मणश्रेष्ठा, मला फारच संशय वाटू लागला आहे. हे प्रभो, आपण सर्व सविस्तर सांगून माझा संदेह दूर करा. भगवान श्रीकृष्ण स्वर्गास गेल्यावर चोरांनी त्याच्या भार्यांना लुटले. खरोखरच ही घटना मनाला क्षोभ देणारी आहे. तो शूरकुलात जन्मलेला कृष्ण विष्णूचा अंश असून भूमीचा भार हलका करण्याकरता त्याने भीतीने मथुरेच्या राज्याचा त्याग का बरे केला ?

हे ब्राह्मणश्रेष्ठा, तो आपले सर्व सैन्य व आप्तेष्टांना घेऊन द्वारवती नगरीस का गेला ? त्या भगवंताचा अवतारच जर भूमीचा भार हरण करण्याकरता, दुष्टांचा नाश करण्याकरता, तसेच धर्माला स्थैर्य आणण्याकरताच झाला होता, मग असे असून त्याने चोरांचा नाश का केला नाही ? तो सर्वज्ञ असताही आपल्या भार्या लुटल्या जात आहेत हे त्याला समजले नाही, हे कसे शक्य आहे ?

भूभार हलका करण्याकरता, ज्याने भीष्म व द्रोण यांचाही वध केला. त्याने चोरांचा नाश कसा केला नाही, आश्चर्य नव्हे काय ? धर्मतत्पर सदाचारी, कृष्णभक्त अशा महात्मा पांडवांचे कृष्णाने रक्षण केले. राजसूय यज्ञ करून आणि उत्तमोत्तम दक्षिणा देऊन त्यांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. तें पांडवही देवाचेच अंश होते. पण ते कृष्णाच्या आश्रयाने राहिले, तरीही त्यांना भयंकर दुःखे का भोगावी लागली ? त्यांची पुण्ये कोणीकडे गेली ? एवढी महादुःखे भोगायला लागावी अशी कोणती घोर पापे त्यांनी केली ?

ती भगवती द्रौपदीही देवीचा अंश असूनही ती पतिव्रता प्रत्यक्ष वेदीतून निघाली होती. ती कृष्णाची परम भक्त होती. तरीही तिला अनंत दुःखे भोगावी लागली. असे का व्हावे ? दुःशासनाने तर भरसभेत तिची वेणी ओढली. त्यावेळी ती रजस्वला होती. पण दु:शासनाने तिला एकवस्त्रावर भरसभेत आणली. विराट नगरीत तिला राजाची दासी होऊन राहावे लागले. कीचकाने तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्‍न केला. तसेच एकदा जयद्रथानेही तिचे हरण केले. पण बलाढय पांडवांनी तिला पुन: सोडवून आणले.

तेव्हा हे महाबुद्धीमान मुनीश्रेष्ठा, पांडवाना इतकी संकटे भोगायला का लागली ? त्यांनी पूर्व जन्मी कोणती महाघोर पातके केली होती. माझ्या त्या पूर्वजांनी राजसूय यज्ञ केल्यावरही त्यांना फारच दु:ख भोगायला का लागले, हे समजत नाही. पण हे ब्राह्मणश्रेष्ठा, त्या देवांच्या अंशांना असली लौकिक दुःखे का भोगावी लागली ? याबद्दल मला फारच संशय प्राप्त झाला आहे. सदाचरण संपन्न पांडवांनी धनाच्या लोभाने भीष्मद्रोणांचा वध केला.

प्रत्यक्ष भगवंताने तसे करण्याविषयी त्या पांडवांना प्रेरणा दिली. त्या श्रीहरीच्या सहाय्याने त्यांनी प्रत्यक्ष कुलक्षय केला. खरोखर वीरश्रेष्ठांचा वध करण्यापेक्षा सज्जनांनी भिक्षेवर आपली उपजिविका करावी.

हे मुनिश्रेष्ठा, त्या जवळ जवळ नष्ट झालेल्या वंशात, आपण शत्रूंचा नाश करणारे गोळकपुत्र उत्पन्न केलेत, व कुलाचे रक्षण केलेत. पण त्याच वंशांत जन्मलेल्या परीक्षित राजाने तापसाच्या गळ्यात सर्प बांधण्याचे पाप केले.

क्षत्रिय कुलात जन्मास आलेल्या पुरुषांपैकी ब्राह्मणाचा द्वेष कोणीही करीत नाहीत. पण माझ्या पित्याने मात्र हे घोर पातक केले खरे. हे मुनी, खरोखरच अशा प्रकारच्या अनेक शंकांनी मी गोंधळून गेलो आहे. तेव्हा आपण माझे मन या संशयातून निवृत्त करा. हे दयानिधे, आपण सर्वज्ञ आहात.

इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां ॥
चतुर्थस्कन्धे जनमेजयप्रश्नो नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
अध्याय पहिला समाप्त

GO TOP