श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
पञ्चत्रिंशोऽध्यायः


सुरथराजसमाधिवैश्ययोर्देवीभक्त्येष्टप्राप्तिवर्णनम्

व्यास उवाच
इति तस्य वचः श्रुत्वा दुःखितौ वैश्यपार्थिवौ ।
प्रणिपत्य मुनिं प्रीत्या प्रश्रयावनतौ भृशम् ॥ १ ॥
हर्षेणोत्फुल्लनयनावूचतुर्वाक्यकोविदौ ।
कृताञ्जलिपुटौ शान्तौ भक्तिप्रवणचेतसौ ॥ २ ॥
भगवन्पावितावद्य शान्तौ दीनौ शुचान्वितौ ।
तव सूक्तसरस्वत्या गङ्गयेव भगीरथः ॥ ३ ॥
साधवः सम्भवन्तीह परोपकृतितत्पराः ।
अकृत्रिमगुणारामाः सुखदाः सर्वदेहिनाम् ॥ ४ ॥
पूर्वपुण्यप्रसङ्गेन प्राप्तोऽयमाश्रमः शुभः ।
तवावाभ्यां महाभाग महादुःखविनाशकः ॥ ५ ॥
भवन्ति मानवा भूमौ बहवः स्वार्थतत्पराः ।
परार्थसाधने दक्षाः केचित्क्वापि भवादृशाः ॥ ६ ॥
दुःखितोऽहं मुनिश्रेष्ठ वैश्योऽयं चातिदुःखितः ।
उभौ संसारसन्तप्तौ तवाश्रमपदे मुदा ॥ ७ ॥
दर्शनादेव हे विद्वन् गतं दुःखमिहावयोः ।
देहजं मानसं वाक्यश्रवणादेव साम्प्रतम् ॥ ८ ॥
धन्यावावां कृतकृत्यौ जातौ सूक्तिसुधारसात् ।
पावितौ भवता ब्रह्मन् कृपया करुणार्णव ॥ ९ ॥
गृहाणास्मत्करौ साधो नय पारं भवार्णवे ।
मग्नौ श्रान्ताविति ज्ञात्वा मन्त्रदानेन साम्प्रतम् ॥ १० ॥
तपः कृत्वातिविपुलं समाराध्य सुखप्रदाम् ।
सम्प्राप्य दर्शनं भूयो यास्यावो निजमन्दिरम् ॥ ११ ॥
वदनात्तव सम्प्राप्य देवीमन्त्रं नवाक्षरम् ।
स्मरणञ्ज करिष्यावो निराहारौ धृतव्रतौ ॥ १२ ॥
व्यास उवाच
इति संचोदितस्ताभ्यां सुमेधा मुनिसत्तमः ।
ददौ मन्त्रं शुभं ताभ्यां ध्यानबीजपुरःसरम् ॥ १३ ॥
तौ च प्राप्य मुनेर्मन्त्रं सम्मन्त्र्य गुरुदैवतौ ।
जग्मतुर्वैश्यराजानौ नदीतीरमनुत्तमम् ॥ १४ ॥
एकान्ते विजने स्थाने कृत्वाऽऽसनपरिग्रहम् ।
उपविष्टौ स्थिरप्रज्ञौ तावतीव कृशोदरौ ॥ १५ ॥
मन्त्रजाप्यरतौ शान्तौ चरित्रत्रयपाठकौ ।
निन्यतुर्मासमेकं तु तत्र ध्यानपरायणौ ॥ १६ ॥
तयोर्मासव्रतेनैव जाता प्रीतिरनुत्तमा ।
पादाम्बुजे भवान्यास्तु स्थिरा बुद्धिस्तथाप्यलम् ॥ १७ ॥
कदाचित्पादयोर्गत्वा मुनेस्तस्य महात्मनः ।
कृतप्रणामावागत्य तस्थतुश्च कुशासने ॥ १८ ॥
नान्यकार्यपरौ क्वापि बभूवतुः कदाचन ।
देवीध्यानपरौ नित्यं जपमन्त्ररतौ सदा ॥ १९ ॥
एवं जाते तदा पूर्णे तत्र संवत्सरे नृप ।
बभूवतुः फलाहारं त्यक्त्वा पर्णाशनौ नृप ॥ २० ॥
वर्षमेकं तपस्तत्र चक्रतुर्वैश्यपार्थिवौ ।
शुष्कपर्णाशनौ दान्तौ जपध्यानपरायणौ ॥ २१ ॥
पूर्णे वर्षद्वये जाते कदाचिद्दर्शनञ्च तौ ।
प्रापतुः स्वप्नमध्ये तु भगवत्या मनोहरम् ॥ २२ ॥
रक्ताम्बरधरां देवीं चारुभूषणभूषिताम् ।
कदाचिनॄपतिः स्वप्नेऽप्यपश्यज्जगदम्बिकाम् ॥ २३ ॥
वीक्ष्य स्वप्ने च तौ देवीं प्रीतियुक्तौ बभूवतुः ।
जलाहारैस्तृतीये तु स्थितौ संवत्सरे तु तौ ॥ २४ ॥
एवं वर्षत्रयं कृत्वा ततस्तौ वैश्यपार्थिवौ ।
चक्रतुस्तौ तदा चिन्तां चित्ते दर्शनलालसौ ॥ २५ ॥
प्रत्यक्षं दर्शनं देव्या न प्राप्तं शान्तिदं नृणाम् ।
देहत्यागं करिष्यावो दुःखितौ भृशमातुरौ ॥ २६ ॥
इति सञ्चिन्त्य मनसा राजा कुण्डं चकार ह ।
त्रिकोणं सुस्थिरं सौम्यं हस्तमात्रप्रमाणतः ॥ २७ ॥
संस्थाप्य पावकं राजा तथा वैश्योऽतिभक्तिमान् ।
जुहावासौ निजं मांसं छित्त्वा छित्त्वा पुनः पुनः ॥ २८ ॥
तथा वैश्योऽपि दीप्तेऽग्नौ स्वमांसं प्राक्षिपत्तदा ।
रुधिरेण बलिं चास्यै ददतुस्तौ कृतोद्यमौ ॥ २९ ॥
तदा भगवती दत्त्वा प्रत्यक्षं दर्शनं तयोः ।
प्राह प्रीतिभरोद्‌भ्रान्तौ दृष्ट्वा तौ दुःखितौ भृशम् ॥ ३० ॥
देव्युवाच
वरं वरय भो राजन् यत्ते मनसि वाञ्छितम् ।
तुष्टाहं तपसा तेऽद्य भक्तोऽसि त्वं मतो मम ॥ ३१ ॥
वैश्यं प्राह तदा देवी प्रसन्नाहं महामते ।
किं तेऽभीष्टं ददाम्यद्य प्रार्थयाशु मनोगतम् ॥ ३२ ॥
व्यास उवाच
तच्छ्रुत्वा वचनं राजा तामुवाच मुदान्वितः ।
देहि मेऽद्य निजं राज्यं हतशत्रुबलं बलात् ॥ ३३ ॥
तमुवाच तदा देवी गच्छ राजन् निजं गृहम् ।
शत्रवः क्षीणसत्त्वास्ते गमिष्यन्ति पराजिताः ॥ ३४ ॥
मन्त्रिणस्ते समागम्य ते पतिष्यन्ति पादयोः ।
कुरु राज्यं महाभाग नगरे स्वं यथासुखम् ॥ ३५ ॥
कृत्वा राज्यं सुविपुलं वर्षाणामयुतं नृप ।
देहान्ते जन्म सम्प्राप्य सूर्याच्च भविता मनुः ॥ ३६ ॥
व्यास उवाच
वैश्यस्तामप्युवाचेदं कृताञ्जलिपुटः शुचिः ।
न मे गृहेण कार्यं वै न पुत्रेण धनेन वा ॥ ३७ ॥
सर्वं बन्धकरं मातः स्वप्नवन्नश्वरं स्फुटम् ।
ज्ञानं मे देहि विशदं मोक्षदं बन्धनाशनम् ॥ ३८ ॥
असारेऽस्मिंश्च संसारे मूढा मज्जन्ति पामराः ।
पण्डिताः सन्तरन्तीह तस्मान्नेच्छन्ति संसृतिम् ॥ ३९ ॥
व्यास उवाच
तदाकर्ण्य महामाया वैश्यं प्राह पुरःस्थितम् ।
वैश्यवर्य तव ज्ञानं भविष्यति न संशयः ॥ ४० ॥
इति दत्त्वा वरं ताभ्यां तत्रैवान्तरधीयत ।
अदर्शनं गतायां तु राजा तं मुनिसत्तमम् ॥ ४१ ॥
प्रणम्य हयमारुह्य गमनाय मनो दधे ।
तदैव तस्य सचिवास्तत्रागत्य नृपं प्रजाः ॥ ४२ ॥
प्रणेमुर्विनयोपेतास्तमूचुः प्राञ्जलिस्थिताः ।
राजंस्ते शत्रवः सर्वे पापाच्च निहता रणे ॥ ४३ ॥
राज्यं निष्कण्टकं भूप कुरुष्व पुरमास्थितः ।
तच्छ्रुत्वा वचनं राजा नत्वा तं मुनिसत्तमम् ॥ ४४ ॥
आपूच्छ्य निर्ययौ तत्र मन्त्रिभिः परिवारितः ।
सम्प्राप्य च निजं राज्यं दारान्स्वजनबान्धवान् ॥ ४५ ॥
बुभुजे पृथिवीं सर्वां ततः सागरमेखलाम् ।
वैश्योऽपि ज्ञानमासाद्य मुक्तसङ्गः समन्ततः ॥ ४६ ॥
कालातिवाहनं तत्र मुक्तबन्धश्चकार ह ।
तीर्थेषु विचरन्गायन्भगवत्या गुणानथ ॥ ४७ ॥
एतत्ते कथितं देव्याश्चरितं परमाद्‌भुतम् ।
आराधनफलप्राप्तिर्यथावद्‌भूपवैश्ययोः ॥ ४८ ॥
दैत्यानां हननं प्रोक्तं प्रादुर्भावस्तथा शुभः ।
एवंप्रभावा सा देवी भक्तानामभयप्रदा ॥ ४९ ॥
यः शृणोति नरो नित्यमेतदाख्यानमुत्तमम् ।
सम्प्राप्नोति नरः सत्यं संसारसुखमद्‌भुतम् ॥ ५० ॥
ज्ञानदं मोक्षदं चैव कीर्तिदं सुखदं तथा ।
पावनं श्रवणान्नूनमेतदाख्यानमद्‌भुतम् ॥ ५१ ॥
अखिलार्थप्रदं न्नॄणां सर्वधर्मसमावृतम् ।
धर्मार्थकाममोक्षाणां कारणं परमं मतम् ॥ ५२ ॥
सूत उवाच
जनमेजयेन राज्ञासौ पृष्टः सत्यवतीसुतः ।
उवाच संहितां दिव्यां व्यासः सर्वार्थतत्त्ववित् ॥ ५३ ॥
चरितं चण्डिकायास्तु शुम्भदैत्यवधाश्रितम् ।
कथयामास भगवान्कृष्णः कारुणिको मुनिः ।
इति वः कथितः सारः पुराणानां मुनीश्वराः ॥ ५४ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां पञ्चमस्कन्धे सुरथराजसमाधिवैश्ययोर्देवी-
भक्त्येष्टप्राप्तिवर्णनं नाम पञ्चत्रिंशोऽध्यायः ॥ ३५ ॥
॥ पंचमः स्कन्धः समाप्तः ॥


देवीचे दर्शन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

त्या मुनींचे भाषण ऐकल्यावर राजाने व वैश्याने अत्यंत नम्र भावनेने मुनीना प्रणाम केला. त्यांच्या मनात भगवतीविषयी भक्ती निर्माण झाली. ते हात जोडून मुनीना म्हणाले, "हे भगवान, गंगेमुळे भगीरथ शांत झाला. तसेच आपल्या वाग्‌सरस्वतीने आम्ही शांत झालो. गुणांचे आश्रयस्थान, परोपकारी असे आपणांसारखे सत्पुरुष उत्पन्न होतात, म्हणून आमच्यासारख्या दीनांचा उद्धार होतो. पूर्व पुण्य थोर म्हणून आम्ही आपणाकडे आलो. कारण आपणासारखे नि:स्वार्थी क्वचित असतात.

आम्ही दोघेही दु:खित झाल्यावर सहज आपल्या आश्रमात आलो. आपल्या दर्शनामुळे आमची शरीरपीडा नष्ट झाली व सांप्रतच्या भाषणामुळे मानसिक दु:खही संपले.

हे ब्रह्मन्, आम्ही धन्य झालो. आपणच आम्हाला पवित्र केले आहे. संसारसागरात श्रांत झालेल्या आमचा हात धरून आम्हाला तरून न्या. आपला मंत्रोपदेश घेऊन आम्ही स्वस्थानी परत जाऊ. म्हणून आम्हाला नवाक्षर मंत्र द्या.

तेव्हा सुमेधाऋषींनी त्यांना शुभ मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्रप्राप्तीनंतर त्यांचा निरोप घेऊन ते दोघेही नदीकाठी गेले. एकांतात दोघेही एकाग्र चित्त करून आसनस्थ झाले. त्यांनी जप-तप-तंत्र यांनी युक्त असा तीन चरित्र्यांचा नित्य पाठ एक महिनापर्यंत केला. त्यामुळे भगवतीबद्दल त्यांच्या मनात भक्ती उत्पन्न होऊन त्यांच्या मनाला शांतता लाभली.

पुढे फलहाराला त्याग करून ते पर्णे भक्षू लागले. ते जितेंद्रिये होऊन जपध्यान करू लागले. अशी दोन वर्षे गेल्यावर त्यांना एकदा देवीने स्वप्नात दर्शन दिले. मनोहर भूषणे लेवून रक्तवस्त्रांनी युक्त अशा देवीला त्या राजाने व वैश्याने स्वप्नात पाहिले.

त्यानंतर आनंदित होऊन त्यांनी तिसर्‍या वर्षी केवळ उदकावर उपजीविका केली. ते मनात म्हणाले, "परमशांतीदायी देवीचे प्रत्यक्ष दर्शन न झाल्यास आम्ही देहत्याग करू."

असा विचार करून वैश्याने व राजाने त्रिकोणाकृती तीन होमकुंडे तयार केली. लगत अग्नीची स्थापना करून आपल्या शरीरातील मांस तोडून ते अग्नीत टाकू लागले. तेव्हा प्रसन्न होऊन भगवतीने दर्शन दिले. त्यावेळी आपली दु:खे विसरून ते आनंदित झाले, त्यांना देवी म्हणाली, "हे राजा, हे वैश्या, तुमच्या व्रतामुळे मी प्रसन्न झाले आहे. आपणाला इच्छित वर मागून घ्या."

देवीच्या या भाषणाने दोघेही आनंदून गेले. राजा म्हणाला, "तू बलाने शत्रूचा वध करून मला राज्य दे." देवी म्हणाली, "हे राजा, आनंदाने तू स्वगृही जा. तुझे शत्रू पराजित होतील. तुझे मंत्री तुला शरण येतील. तू दहा हजार वर्षे राज्य करशील. पुढील जन्मी तू सूर्यापासून जन्मास येऊन सावर्णी नावाचा मनू होशील." त्यानंतर वैश्याला देवी म्हणाली, "हे श्रेष्ठा, तुला मोक्षप्रद प्राप्त होईल."

अशाप्रकारे दोघांनाही इच्छित वर देऊन देवी अंतर्धान पावली. नंतर राजाने मुनीना वंदन करून राजधानीकडे प्रयाण केले, तोच त्याचे मंत्री त्याच्यासमोर येऊन म्हणाले, "हे राजा, सर्व शत्रूंचा वध झाला आहे. तू राज्य कर."

नंतर राजाने आपल्या राज्याचा पूर्ण उपभोग घेतला. इकडे ज्ञानप्राप्ती होऊन मुक्त झालेला वैश्य भगवतीचे चिंतन करीत आपला काळ घालवू लागला. हे जनमेजय राजा, अशा रीतीने देवीचे अदभुत चरित्र मी तुला कथन केले. जो पुरुष भगवतीचे हे चरित्र श्रवण करतो, त्याला संसारात उत्तम सुख प्राप्त होते. ज्ञान, मोक्ष, कीर्ती यांचा लाभ होतो. पुरुषाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात."

सूत म्हणाले, "हे ऋषीहो, अशा रीतीने जनमेजय राजाने व्यास मुनीना प्रश्न विचारले असता त्या सर्वतत्त्ववेत्त्या व्यास मुनींनी त्याला अद्‌भुत संहिता सांगितली. ज्यामध्ये शुभनिशुंभाचा वध आहे अशा चंडीचे चरित्र राजाला निवेदन केले. तेच सर्व पुराणांचे सार असून हे मुनिश्रेष्ठांनो, मी ते सर्व तुम्हाला सांगितले आहे."अध्याय पस्तिसावा समाप्त
स्कंध पाचवा समाप्त

GO TOP