श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
चत्वारिंशोऽध्यायः


लक्ष्म्युत्पत्तिवर्णनम्

नारद उवाच
नारायणप्रिया सा च परा वैकुण्ठवासिनी ।
वैकुण्ठाधिष्ठातृदेवी महालक्ष्मीः सनातनी ॥ १ ॥
कथं बभूव सा देवी पृथिव्यां सिन्धुकन्यका ।
पुरा केन स्तुताऽऽदौ सा तन्मे व्याख्यातुमर्हसि ॥ २ ॥
श्रीनारायण उवाच
पुरा दुर्वाससः शापाद्‌ भ्रष्टश्रीश्च पुरन्दरः ।
बभूव देवसङ्‌घश्च मर्त्यलोके हि नारद ॥ ३ ॥
लक्ष्मीः स्वर्गादिकं त्यक्त्वा रुष्टा परमदुःखिता ।
गत्वा लीना तु वैकुण्ठे महालक्ष्मीश्च नारद ॥ ४ ॥
तदा शोकाद्ययुः सर्वे दुःखिता ब्रह्मणः सभाम् ।
ब्रह्माणं च पुरस्कृत्य ययुर्वैकुण्ठमेव च ॥ ५ ॥
वैकुण्ठे शरणापन्ना देवा नारायणे परे ।
अतीव दैन्ययुक्ताश्च शुष्ककण्ठोष्ठतालुकाः ॥ ६ ॥
तदा लक्ष्मीश्च कलया पुराणपुरुषाज्ञया ।
बभूव सिन्धुकन्या सा सर्वसम्पत्स्वरूपिणी ॥ ७ ॥
तथा मथित्वा क्षीरोदं देवा दैत्यगणैः सह ।
सम्प्राप्ताश्च महालक्ष्मीं विष्णुस्तां च ददर्श ह ॥ ८ ॥
सुरादिभ्यो वरं दत्त्वा वनमालां च विष्णवे ।
ददौ प्रसन्नवदना तुष्टा क्षीरोदशायिने ॥ ९ ॥
देवाश्चाप्यसुरग्रस्तं राज्यं प्रापुश्च नारद ।
तां सम्पूज्य च सम्भूय सर्वत्र च निरापदः ॥ १० ॥
नारद उवाच
कथं शशाप दुर्वासा मुनिश्रेष्ठः कदाचन ।
केन दोषेण वा ब्रह्मन् ब्रह्मिष्ठस्तत्त्ववित्पुरा ॥ ११ ॥
ममन्थुः केनरूपेण जलधिं ते सुरादयः ।
केन स्तोत्रेण वा देवी शक्रं साक्षाद्‌बभूव सा ॥ १२ ॥
को वा तयोश्च संवादो बभूव तद्वद प्रभो ।
श्रीनारायण उवाच
मधुपानप्रमत्तश्च त्रैलोक्याधिपतिः पुरा ॥ १३ ॥
क्रीडां चकार रहसि रम्भया सह कामुकः ।
कृत्वा क्रीडां तया सार्धं कामुक्या हृतमानसः ॥ १४ ॥
तस्थौ तत्र महारण्ये कामोन्मथितमानसः ।
कैलासशिखरे यान्तं वैकुण्ठादृषिसत्तमम् ॥ १५ ॥
दुर्वाससं ददर्शेन्द्रो ज्वलन्तं ब्रह्मतेजसा ।
ग्रीष्ममध्याह्नमार्तण्डसहस्रप्रभमीश्वरम् ॥ १६ ॥
प्रतप्तकाञ्चनाकारं जटाभारमहोज्ज्वलम् ।
शुक्लयज्ञोपवीतं च चीरदण्डौ कमण्डलुम् ॥ १७ ॥
महोज्ज्वलं च तिलकं बिभ्रन्तं चेन्दुसन्निभम् ।
समन्वितं शिष्यलक्षैर्वेदवेदाङ्‌गपारगैः ॥ १८ ॥
दृष्ट्वा ननाम शिरसा सम्प्रमत्तः पुरन्दरः ।
शिष्यवर्गं तदा भक्त्या तुष्टाव च मुदान्वितम् ॥ १९ ॥
मुनिना च सशिष्येण दत्तास्तस्मै शुभाशिषः ।
विष्णुदत्तं पारिजातपुष्पं च सुमनोहरम् ॥ २० ॥
तज्जरारोगमृत्युघ्नं शोकजं मोक्षकारकम् ।
शक्रः पुष्पं गहीत्वा च प्रमत्तो राज्यसम्पदा ॥ २१ ॥
पुष्पं स न्यस्तयामास तदैव करिमस्तके ।
हस्ती तत्स्पर्शमात्रेण रूपेण च गुणेन च ॥ २२ ॥
तेजसा वयसाकस्माद्विष्णुतुल्यो बभूव ह ।
त्यक्त्वा शक्रं गजेन्द्रश्च जगाम घोरकाननम् ॥ २३ ॥
न शशाक महेन्द्रस्तं रक्षितुं तेजसा मुने ।
तत्पुण्यं त्यक्तवन्तं च दृष्ट्वा शक्रं मुनीश्वरः ॥ २४ ॥
तमुवाच महारुष्टः शशाप च रुषान्वितः ।
मुनिरुवाच
अरे श्रिया प्रमत्तस्त्वं कथं मामवमन्यसे ॥ २५ ॥
मद्दत्तपुष्पं दत्तं च गर्वेण करिमस्तके ।
विष्णोर्निवेदितं चैव नैवेद्यं वा फलं जलम् ॥ २६ ॥
प्राप्तिमात्रेण भोक्तव्यं त्यागेन ब्रह्महा भवेत् ।
भ्रष्टश्रीर्भ्रष्टबुद्धिश्च पुरभ्रष्टो भवेत्तु सः ॥ २७ ॥
यस्त्यजेद्विष्णुनैवेद्यं भाग्येनोपस्थितं शुभम् ।
प्राप्तिमात्रेण यो भुङ्‌क्ते भक्तो विष्णुनिवेदितम् ॥ २८ ॥
पुंसां शतं समुद्धृत्य जीवन्मुक्तः स्वयं भवेत् ।
नैवेद्यं भोजनं कृत्वा नित्यं यः प्रणमेद्धरिम् ॥ २९ ॥
पूजयेत्स्तौति वा भक्त्या स विष्णुसदृशो भवेत् ।
तत्स्पर्शवायुना सद्यस्तीर्थौघश्च विशुध्यति ॥ ३० ॥
तत्पादरजसा मूढ सद्यः पूता वसुन्धरा ।
पुंश्चल्यन्नमवीरान्नं शूद्रश्राद्धान्तमेव च ॥ ३१ ॥
यद्धरेरनिवेद्यं च वृथा मांसस्य भक्षणम् ।
शिवलिङ्‌गप्रदानं च यद्दत्तं शूद्रयाजिना ॥ ३२ ॥
चिकित्सकद्विजान्नं च देवलान्नं तथैव च ।
कन्याविक्रयिणामन्नं यदन्नं योनिजीविनाम् ॥ ३३ ॥
उच्छिष्टान्नं पर्युषितं सर्वभक्षावशेषितम् ।
शूद्रापतिद्विजानां च भूषवाहद्विजान्नकम् ॥ ३४ ॥
अदीक्षितद्विजानां च यदन्नं शवदाहिनाम् ।
अगम्यागामिनां चैव द्विजानामन्नमेव च ॥ ३५ ॥
मित्रद्रुहां कृतज्जानामन्नं विश्वासघातिनाम् ।
मिथ्यासाक्ष्यप्रदान्नं च ब्राह्मणान्नं तथैव च ॥ ३६ ॥
एते सर्वे विशुध्यन्ति विष्णोनैवेद्यभक्षणात् ।
श्वपचश्चेद्विष्णुसेवी वंशानां कोटिमुद्धरेत् ॥ ३७ ॥
हरेरभक्तो मनुजः स्वं च रक्षितुमक्षमः ।
अज्ञानाद्यदि गृह्णाति विष्णोर्निर्माल्यमेव च ॥ ३८ ॥
सप्तजन्मार्जितात्पापान्मुच्यते नात्र संशयः ।
ज्ञात्वा भक्त्या च गृह्णाति विष्णोनैवेद्यमेव च ॥ ३९ ॥
कोटिजन्मार्जितात्पापान्मुच्यते निश्चितं हरे ।
यस्मात्संस्थापितं पुष्पं गर्वेण करिमस्तके ॥ ४० ॥
तस्माद्युष्मान्परित्यज्य यातु लक्ष्मीर्हरेः पदम् ।
नारायणस्य भक्तोऽहं न बिभेमि सुराद्विधेः ॥ ४१ ॥
कालान्मृत्योर्जरातश्च कानन्यान् गणयामि च ।
किं करिष्यति ते तातः कश्यपश्च प्रजापतिः ॥ ४२ ॥
बृहस्पतिर्गुरुश्चैव निःशङ्‌कस्य च मे हरे ।
इदं पुष्पं यस्य मूर्ध्नि तस्यैव पूजनं परम् ॥ ४३ ॥
इति श्रुत्वा महेन्द्रश्च धृत्वा स चरणं मुनेः ।
उच्चै रुरोद शोकार्तस्तमुवाच भयाकुलः ॥ ४४ ॥
महेन्द्र उवाच
दत्तः समुचितः शापो मह्यं मायापहः प्रभो ।
हृतां न याचे सम्पत्तिं किञ्चिज्ज्ञानं च देहि मे ॥ ४५ ॥
ऐश्वर्यं विपदां बीजं ज्ञानप्रच्छन्नकारणम् ।
मुक्तिमार्गकुठारश्च भक्तेश्च व्यवधायकम् ॥ ४६ ॥
मुनिरुवाच
जन्ममृत्युजराशोकरोगबीजाङ्‌कुरं परम् ।
सम्पत्तितिमिरान्धश्च मुक्तिमार्गं न पश्यति ॥ ४७ ॥
सम्पन्मत्तो विमूढश्च सुरामत्तः स एव च ।
बान्धवैर्वेष्टितः सोऽपि बन्धुत्वेनैव हे हरे ॥ ४८ ॥
सम्पत्तिमदमत्तश्च विषयान्धश्च विह्वलः ।
महाकामी राजसिकः सत्त्वमार्गं न पश्यति ॥ ४९ ॥
द्विविधो विषयान्धश्च राजसस्तामसः स्मृतः ।
अशास्त्रज्ञस्तामसश्च शास्त्रज्ञो राजसः स्मृतः ॥ ५० ॥
शास्त्रं च द्विविधं मार्गं दर्शयेत्सुरपुङ्‌गव ।
प्रवृत्तिबीजमेकं च निवृत्तेः कारणं परम् ॥ ५१ ॥
चरन्ति जीविनश्चादौ प्रवृत्तेर्दुःखवर्त्मनि ।
स्वच्छन्दं च प्रसन्नं च निर्विरोधं च सन्ततम् ॥ ५२ ॥
आयाति मधुनो लोभात्क्लेशेन सुखमानितः ।
परिणामे नाशबीजे जन्ममृत्युजराकरे ॥ ५३ ॥
अनेकजन्मपर्यन्तं कृत्वा च भ्रमणं मुदा ।
स्वकर्मविहितायां च नानायोन्यां क्रमेण च ॥ ५४ ॥
ततश्चेशानुगहाग्रच्च सत्सङ्‌गं लभते च सः ।
सहस्रेषु शतेष्वेको भवाब्धिपारकारणम् ॥ ५५ ॥
साधुस्तत्त्वप्रदीपेन मुक्तिमार्गं प्रदर्शयेत् ।
तदा करोति यत्‍नं च जीवो बन्धनखण्डने ॥ ५६ ॥
अनेकजन्मयोगेन तपसानशनेन च ।
तदा लभेन्मुक्तिमार्गं निर्विघ्नं सुखदं परम् ॥ ५७ ॥
इदं श्रुतं गुरोर्वक्याद्यत् पृच्छसि पुरन्दर ।
मुनेस्तद्वचनं श्रुत्वा वीतरागो बभूव सः ॥ ५८ ॥
वैराग्यं वर्धयामास तस्य ब्रह्मन् दिने दिने ।
मुनेः स्थानाद्‌ गृहं गत्वा स ददर्शामरावतीम् ॥ ५९ ॥
दैत्यैरसुरसङ्‌घैश्च समाकीर्णां भयाकुलाम् ।
विषमोपप्लवां पुत्रबन्धुहीनां च कुत्रचित् ॥ ६० ॥
पितृमातृकलत्रादिविहीनामतिचञ्चलाम् ।
शत्रुग्रस्तां च तां दृष्ट्वा जगाम वाक्पतिं प्रति ॥ ६१ ॥
शक्रो मन्दाकिनीतीरे ददर्श गुरुमीश्वरम् ।
ध्यायमानं परं ब्रह्म गङ्‌गातोये स्थितं परम् ॥ ६२ ॥
सूर्याभिसम्मुखं पूर्वमुखं च विश्वतोमुखम् ।
साश्रुनेत्रं पुलकिनं परमानन्दसंयुतम् ॥ ६३ ॥
वरिष्ठं च गरिष्ठं च धर्मिष्ठं श्रेष्ठसेवितम् ।
प्रेष्ठं च बन्धुवर्गाणामतिश्रेष्ठं च ज्ञानिनाम् ॥ ६४ ॥
ज्येष्ठं च भ्रातृवर्गाणामनिष्टं सुरवैरिणाम् ।
दृष्ट्वा गुरुं जपन्तं च तत्र तस्थौ सुरेश्वरः ॥ ६५ ॥
प्रहरान्ते गुरुं दृष्ट्वा चोत्थितं प्रणनाम सः ।
प्रणम्य चरणाम्भोजे रुरोदोच्चैर्मुहुर्मुहुः ॥ ६६ ॥
वृत्तान्तं कथयामास ब्रह्मशापादिकं तथा ।
पुनर्वरोपलब्धिं च ज्ञानप्राप्तिं सुदुर्लभाम् ॥ ६७ ॥
वैरिग्रस्तां च स्वपुरीं क्रमेणैव सुरेश्वरः ।
शिष्यस्य वचनं श्रुत्वा सुबुद्धिर्वदतां वरः ॥ ६८ ॥
बृहस्पतिरुवाचेदं कोपसंरक्तलोचनः ।
गुरुरुवाच
श्रुतं सर्वं सुरश्रेष्ठ मा रोदीर्वचनं शृणु ॥ ६९ ॥
न कातरो हि नीतिज्ञो विपत्तौ च कदाचन ।
सम्पत्तिर्वा विपत्तिर्वा नश्वरा श्रमरूपिणी ॥ ७० ॥
पूर्वस्य कर्मायत्ता च स्वयं कर्ता तयोरपि ।
सर्वेषां च भवत्येव शश्वज्जन्मनि जन्मनि ॥ ७१ ॥
चक्रनेमिक्रमेणैव तत्र का परिदेवना ।
उक्तं हि स्वकृतं कर्म भुज्यतेऽखिलभारते ॥ ७२ ॥
शुभाशुभं च यत्किञ्चित्स्वकर्मफलभुक् पुमान् ।
नाभुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटिशतैरपि ॥ ७३ ॥
अवश्यमेव भोक्तव्यं कृतं कर्म शुभाशुभम् ।
इत्येवमुक्तं वेदे च कृष्णेन परमात्मना ॥ ७४ ॥
सामवेदोक्तशाखायां सम्बोध्य कमलोद्‍भवम् ।
जन्मभोगावशेषे च सर्वेषां कृतकर्मणाम् ॥ ७५ ॥
अनुरूपं हि तेषां च भारतेऽन्यत्र चैव हि ।
कर्मणा ब्रह्मशापं च कर्मणा च शुभाशिषम् ॥ ७६ ॥
कर्मणा च महालक्ष्मीं लभेद्दैन्यं च कर्मणा ।
कोटिजन्मार्जितं कर्म जीविनामनुगच्छति ॥ ७७ ॥
न हि त्यजेद्विना भोगं तच्छायेव पुरन्दर ।
कालभेदे देशभेदे पात्रभेदे च कर्मणाम् ॥ ७८ ॥
न्यूनताधिकभावोऽपि भवेदेव हि कर्मणा ।
वस्तुदानेन वस्तूनां समं पुण्यं दिने दिने ॥ ७९ ॥
दिनभेदे कोटिगुणमसंख्यं वा ततोऽधिकम् ।
समे देशे च वस्तूनां दाने पुण्यं समं सुर ॥ ८० ॥
देशभेदे कोटिगुणमसंख्यं वा ततोऽधिकम् ।
समे पात्रे समं पुण्यं वस्तूनां कर्तुरेव च ॥ ८१ ॥
पात्रभेदे शतगुणमसंख्यं वा ततोऽधिकम् ।
यथा फलन्ति सस्यानि न्यूनान्यप्यधिकानि च ॥ ८२ ॥
कर्षकाणां क्षेत्रभेदे पात्रभेदे फलं तथा ।
सामान्यदिवसे विप्रदानं समफलं भवेत् ॥ ८३ ॥
अमायां रविसंक्रान्त्यां फलं शतगुणं भवेत् ।
चातुर्मास्यां पौर्णमास्यामनन्तं फलमेव च ॥ ८४ ॥
ग्रहणे शशिनः कोटिगुणं च फलमेव च ।
सूर्यस्य ग्रहणे वापि ततो दशगुणं भवेत् ॥ ८५ ॥
अक्षयायामक्षयं तदसंख्यं फलमुच्यते ।
एवमन्यत्र पुण्याहे फलाधिक्यं भवेदिति ॥ ८६ ॥
यथा दाने तथा स्नाने जपेऽन्यपुण्यकर्मसु ।
एवं सर्वत्र बोद्धव्यं नराणां कर्मणां फलम् ॥ ८७ ॥
यथा दण्डेन चक्रेण शरावेण भ्रमेण च ।
कुम्भं निर्माति निर्माता कुम्भकारो मृदा भुवि ॥ ८८ ॥
तथैव कर्मसूत्रेण फलं धाता ददाति च ।
यस्याज्ञया सृष्टमिदं तं च नारायणं भज ॥ ८९ ॥
स विधाता विधातुश्च पातुः पाता जगत्त्रये ।
स्रष्टुः स्रष्टा च संहर्तुः संहर्ता कालकालकः ॥ ९० ॥
महाविपत्तौ संसारे यः स्मरेन्मधुसूदनम् ।
विपत्तौ तस्य सम्पत्तिर्भवेदित्याह शङ्‌करः ॥ ९१ ॥
इत्येवमुक्त्वा तत्त्वज्ञः समालिङ्‌ग्य सुरेश्वरम् ।
दत्त्वा शुभाशिषं चेष्टं बोधयामास नारद ॥ ९२ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे
लक्ष्म्युत्पत्तिवर्णनं नाम चत्वारिंशोऽध्यायः ॥ ४० ॥


दुर्वासऋषींचा शाप -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारद म्हणाले, "ती अशाप्रकारे सर्वश्रेष्ठ असताना पृथ्वीवर ती समुद्राची कन्या कशी झाली याविषयी सविस्तर सांगा."

नारायण मुनी म्हणाले, "हे नारदा, पूर्वी दुर्वासांच्या शापामुळे इंद्र संपत्तीभ्रष्ट झाला. सर्व देवांसह तो भूलोकी आला. अत्यंत क्रुद्ध झाल्याने लक्ष्मी वैकुंठाला गेली. तेथे ती लीन झाली. सर्व देव दुःखाने ब्रह्मदेवाकडे गेले. त्याला पुढे करून ते वैकुंठी गेले. सर्वजण त्या नारायणाला शरण गेले. प्रवासाने त्यांचे कंठ कोरडे झाले होते.

ते अवलोकन करून पुराण पुरुषाच्या आज्ञेने लक्ष्मीचा अंश होऊन समुद्राची ती कन्या झाली. देवांनी दैत्यासंह समुद्रमंथन केले. तेव्हा ती प्राप्त झाली. नंतर तिने विष्णूला वरले. त्यामुळे असुरांनी घेतलेले राज्य देवांना परत मिळाले. तिची पूजा केल्यावर देव पुन्हा सुखाने राहू लागले."

नारद म्हणाले, "दुर्वासांनी तिला का शाप दिला ? समुद्राचे मंथन कसे केले ?"

नारायण मुनी म्हणाले, "पूर्वी इंद्र सुरापानामुळे अतिशय मत्त झाला. त्याने एकांतात रंभेसह क्रीडा केली. कामविव्हलतेने तो महाअरण्यात संचार करू लागला. त्याचवेळी कैलासाकडे निघालेले दुर्वास त्याला दिसले. ते ब्रह्मतेजाने झळकत होते. सहस्त्र सूर्याप्रमाणे त्यांची कांती होती. तप्त सुवर्णाप्रमाणे शरीर होते. जटाभार, यज्ञोपवीत, अजिन, दंड, कमंडलू यांनी ते युक्त होते. वेदांगांचे जाणकार, हजार शिष्यसमुदायाने वेष्टित अशा दुर्वासांना इंद्राने मस्तकाने प्रणाम केला व त्यांची स्तुती केली.

शिष्यांसह दुर्वासांनी त्याला आशीर्वाद दिले. विष्णूने दिलेले पारिजात पुष्प त्याला अर्पण केले. जरा, व्याधी, मृत्यु इत्यादींचा नाश करणारे ते पुष्प त्याने हत्तीच्या मस्तकावर टाकले. पुष्पाचे स्पर्शाने हत्ती विष्णूसारखा दिसू लागला. इंद्रास सोडून तो दूर अरण्यात निघून गेला. इंद्र त्याचे रक्षण करू शकला नाही.

इंद्राने पुष्प टाकून देताच मुनीश्वर क्रुद्ध झाला. तो म्हणाला, "हे मत्त इंद्रा, तू माझा अपमान केलास. मी दिलेले फूल तू हत्तीच्या मस्तकावर टाकलेस. विष्णूला अर्पण केलेले फूल, पान, नैवेद्य यांचा त्याग करणार्‍यास ब्रह्महत्येचे पातक लागते. विष्णू नैवेद्य टाकून देणारा बुद्धीभ्रष्ट होतो. त्याची संपत्ती नष्ट होऊन तो नगरापासूनही भ्रष्ट होतो. विष्णूचा प्रसाद भक्त भक्षण करतो, त्यामुळे शंभर पितरांचा उद्धार होऊन ते मुक्त होतात. नैवेद्य खाऊन हरीस नमस्कार करणारा विष्णुतुल्य होतो. त्याच्या स्पर्शाने वायु पवित्र होतो.

अरे मूर्खा, ज्याच्या पदरजाने पृथ्वी पवित्र होते, स्वैरिणीचे अन्न, निपुत्रिकेचे अन्न, शूद्रान्न, वृथा मांसभक्षण, शिवलिंगप्रदान, शूद्राचे दान, कुंटिणीचे अन्न, उच्छिष्ट, शिळे अन्न, शेष अन्न, शूद्र स्त्रीशी संबंध असलेल्या द्विजाचे अन्न, शवदाह करणार्‍याचे अन्न, अगमन्य स्त्रीशी गमन करणार्‍याचे अन्न, मित्रद्रोह्याचे अन्न, विश्वासघातक्याचे अन्न वगैरे सर्व विष्णूचा नैवेद्य भक्षण केल्याने शुद्ध होतात. विष्णुभक्त चांडाळ असला तरी तो आपली कुळे उद्धरतो. अज्ञानाने विष्णूचा निर्माल्य जरी घेतला तरी तो सर्व पापांपासून मुक्त होतो. भक्तीपूर्वक घेतल्यास कोटी जन्मांची पापे नष्ट होतात. तू गर्वोन्मत्त होऊन मी दिलेले पुष्प हत्तीच्या मस्तकावर टाकलेस, त्या अर्थी लक्ष्मी तुला सोडून हरीपदी जावो. मी नारायणाचा भक्त असून मी ब्रह्मदेवादी कोणत्याही देवास
भीत नाही. जरा, मृत्यु वगैरेपासून मला भीती नाही. तुझा पिता, गुरू बृहस्पती यांनाही मी मानणार नाही. म्हणून हे पुष्प ज्याच्या मस्तकावर पडेल ते सर्वांना पूजनीय होईल."

असा शाप ऐकताच इंद्राने दुर्वासांचे चरण धरले. भीतीने तो रडू लागला. तो म्हणाला, "हे प्रभो, मायेचा नाश करणारा शाप आपण मला दिलात. तेव्हा मला संपत्ती नको. पण ज्ञान द्या. ज्ञान भक्तिमार्गाच्या आड येणार नाही."

मुनी म्हणाले, "संपत्तीरूप तिमिराने अंध झालेल्यास मुक्तीमार्ग दिसत नाही. संपत्तीने मनुष्य मत्त होतो. संपत्तीने तो विषयांध होतो. सत्त्वगुण त्याच्यापाशी रहात नाही. तो तामसी शास्त्रे जाणू लागतो. ज्ञान दोन प्रकारचे आहे. एक प्रवृत्तीच्या दुःखात रहातात. मधाच्या लोभाने भ्रमर कमलावर बसतात. कमल मिटते. तसेच सुखाशेने क्लेश सहन करूनही परिणामी माणसास जरा, मृत्यु वगैरे प्राप्त होतात. कर्मफलाप्रमाणे विविध योनीत तो फिरत रहातो. नंतर ईश्वराच्या कृपेमुळे सत्संग घडून तो शुद्ध होतो

साधुपुरुष तत्त्वरूप दिपाने मुक्तीमार्ग दाखवतात. अनेक जन्मातील अभ्यास, तपे, व्रते, यामुळे अखेर मुक्ती मिळते. हे इंद्रा, मी हे ज्ञान गुरुमुखातून श्रवण केले आहे." दुर्वासमुनींच्या भाषणाने इंद्र विरक्त झाला. प्रतिदिनी त्याचे वैराग्य वाढू लागले. तेथून तो स्वगृही गेला. तेव्हा सर्व नगरी राक्षसांनी व्यापलेली त्याला दिसली. सर्वजण भयग्रस्त झाले होते. कोणाचे बंधु, कोणाचे माता पिता वगैरे नसल्याने नागरिक दुःखी होते. मंदाकिनीच्या तीरावर त्याला गुरू दिसला. तो सूर्याभिमुख होऊन ध्यान करीत होता. तो परमानंदयुक्त होऊन त्याचे शरीर रोमांचित झाले होते. नेत्रातून आनंदाश्रू वहात होते. तो गुरू सर्वात श्रेष्ठ असा जप करीत होता.

एका प्रहराने गुरू पाण्यातून बाहेर आल्यावर इंद्र त्यांना नमस्कार करून रडू लागला. त्याने आपणाला शाप व ज्ञानप्राप्ती कशी झाली याचा वृत्तांत गुरूस सांगितला. शत्रूंनी राजधानीची केलेली अवस्थाही त्याला निवेदन केली. ते ऐकून बृहस्पतीचे नेत्र क्रोधाने लाल झाले. गुरू म्हणाला, "हे इंद्रा, रडू नकोस. नीतिज्ञ पुरुषाने विपत्तीकाली भय बाळगू नये. संपत्ती, विपत्ती या नश्वर व श्रमरूप आहेत. पूर्वजन्माचे कर्माप्रमाणे फले प्राप्त होतात. हा चक्रनेमिक्रमच आहे. शुभ अशुभ कर्माचे फल भारतात भोगावे लागते. केलेले कर्म भोगलेच पाहिजे. कर्मामुळेच शाप अथवा आशीर्वाद मिळत असतो. लक्ष्मी, दैन्य हे क्रमाक्रमाने प्राप्त होत असते. पात्रतेनुसार कर्मभोग भोगावेच लागतात. प्रतिदिनी वस्तुदान केल्यास तितकेच पुण्य लागते. पण योग्य दिवशीच्या दानाने कोटीपट पुण्य लाभते. उत्तम क्षेत्री दान केल्यास त्याहूनही अधिक उत्तम फल मिळते. म्हणून पात्रतेप्रमाणेच फलप्राप्ती होते.

सामान्य दिवसापेक्षा अमावास्या, संक्रांत या दिवशी दान दिल्यास शतपट फल मिळते. चातुर्मासातील पौर्णिमेस अनंतपटीने पुण्य लाभते. चंद्रग्रहण समयीचे दान कोटीपट फलदायी असून सूर्यग्रहणाचे वेळी केलेले त्याहीपेक्षा दसपट अधिक फल देते. अशारीतीने पुण्यकारक फल योग्यतेनुरूप प्राप्त होते.

दानाप्रमाणे पुण्य कर्माचीही तशीच फले भोगावी लागतात. कुंभार ज्याप्रमाणे चक्र, दंडा वगैरेच्या सहाय्याने मृत्तिकेचा घट बनवतो, तसाच कर्माचे फल ब्रह्मा देत असतो. हे सर्व ज्याच्या आज्ञेने चालले आहे त्या नारायणाची भक्ती कर. तो सर्वांचा कर्ता, नियंता, आधारभूत असा सर्व काही आहे. मधुसूदनाचे स्मरण केल्यास विपत्तीची संपत्ती होईल असे शंकराने सांगितले आहे." असे म्हणून गुरूने इंद्रास आलिंगन दिले.


अध्याय चाळिसावा समाप्त

GO TOP