श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
द्वितीयोऽध्यायः


शर्यातिराजवर्णनम्

ममाख्याहि महाभाग राज्ञां वंशं सुविस्तरम् ।
सूर्यान्वयप्रसूतानां धर्मज्ञानां विशेषतः ॥ १ ॥
शृणु भारत वक्ष्यामि रविवंशस्य विस्तरम् ।
यथा श्रुतं मया पूर्वं नारदाद्‌ऋषिसत्तमात् ॥ २ ॥
एकदा नारदः श्रीमान्सरस्वत्यास्तटे शुभे ।
आजगामाश्रमे पुण्ये विचरन्स्वेच्छया मुनिः ॥ ३ ॥
प्रणम्य शिरसा पादौ तस्याग्रे संस्थितस्तदा ।
ततस्तस्यासनं दत्त्वा कृत्वार्हणमथादरात् ॥ ४ ॥
विधिवत्पूजयित्वा तं उक्तवान्वचनं त्विदम् ।
पावितोऽहं मुनिश्रेष्ठ पूज्यस्यागमनेन वै ॥ ५ ॥
कथां कथय सर्वज्ञ राज्ञां चरितसंयुताम् ।
राजानो ये समाख्याताः सप्तमेऽस्मिन्मनोः कुले ॥ ६ ॥
तेषामुत्पत्तिरतुला चरितं परमाद्‌भुतम् ।
श्रोतुकामोऽस्म्यहं ब्रह्मन् सूर्यवंशस्य विस्तरम् ॥ ७ ॥
समाख्याहि मुनिश्रेष्ठ समासव्यासपूर्वकम् ।
इति पृष्टो मया राजन्नारदः परमार्थवित् ॥ ८ ॥
उवाच प्रहसन्प्रीतः समाभाष्य मुदान्वयम् ।
नारद उवाच -
शृणु सत्यवतीसूनो राज्ञां वंशमनुत्तमम् ॥ ९ ॥
पावनं कर्णसुखदं धर्मज्ञानादिभिर्युतम् ।
ब्रह्मा पूर्वं जगत्कर्ता नाभिपङ्कजसम्भवः ॥ १० ॥
विष्णोरिति पुराणेषु प्रसिद्धः परिकीर्तितः ।
सर्वज्ञः सर्वकर्तासौ स्वयम्भूः सर्वशक्तिमान् ॥ ११ ॥
तपस्तप्त्वा स विश्वात्मा वर्षाणामयुतं पुरा ।
सृष्टिकामः शिवां ध्यात्वा प्राप्य शक्तिमनुत्तमाम् ॥ १२ ॥
पुत्रानुत्पदयामास मानसाञ्छुभलक्षणान् ।
मरीचिः प्रथिस्तेषामभवत्सृष्टिकर्मणि ॥ १३ ॥
तस्य पुत्रोऽतिविख्यातः कश्यपः सर्वसम्मतः ।
त्रयोदशैव तस्यासन्भार्या दक्षसुताः किल ॥ १४ ॥
देवाः सर्वे समुत्पन्ना दैत्या यक्षाश्च पन्नगाः ।
पशवः पक्षिणश्चैव तस्मात्सृष्टिस्तु काश्यपी ॥ १५ ॥
देवानां प्रथितः सूर्यो विवस्वान्नाम तस्य तु ।
तस्य पुत्रः स विख्यातो वैवस्वतमनुर्नृपः ॥ १६ ॥
तस्य पुत्रस्तथेक्ष्वाकुः सूर्यवंशविवर्धनः ।
नवाभवन्सुतास्तस्य मनोरिक्ष्वाकुपूर्वजाः ॥ १७ ॥
तेषां नामानि राजेन्द्र शृणुष्वैकमनाः पुनः ।
इक्ष्वाकुरथ नाभागो धृष्टः शर्यातिरेव च ॥ १८ ॥
नरिष्यन्तस्तथा प्रांशुर्नृगो दिष्टश्च सप्तमः ।
करूषश्च पृषध्रश्च नवैते मानवाः स्मृताः ॥ १९ ॥
इक्ष्वाकुस्तु मनोः पुत्रः प्रथमः समजायत ।
तस्य पुत्रशतं चासीज्ज्येष्ठो विकुक्षिरात्मवान् ॥ २० ॥
नवानां वंशविस्तारं संक्षेपेण निशामय ।
शूराणां मनुपुत्राणां मनोरन्तरजन्मनाम् ॥ २१ ॥
नाभागस्य तु पुत्रोऽभूदम्बरीषः प्रतापवान् ।
धर्मज्ञः सत्यसन्धश्च प्रजापालनतत्परः ॥ २२ ॥
धृष्टात्तु धार्ष्टकं क्षत्रं ब्रह्मभूतमजायत ।
संग्रामकातरं सम्यग्ब्रह्मकर्मरतं तथा ॥ २३ ॥
शर्यातेस्तनयश्चाभूदानर्तो नाम विश्रुतः ।
सुकन्या च तथा पुत्री रूपलावण्यसंयुता ॥ २४ ॥
च्यवनाय सुता दत्ता राज्ञाप्यन्धाय सुन्दरी ।
मुनिः सुलोचनो जातस्तस्याः शीलगुणेन ह ॥ २५ ॥
विहितो रविपुत्राभ्यामश्विभ्यामिति नः श्रुतम् ।
जनमेजय उवाच
सन्देहोऽयं महान् ब्रह्मन् कथायां कथितस्त्वया ॥ २६ ॥
यद्‌राजा मुनयेऽन्धाय दत्ता पुत्री सुलोचना ।
कुरूपा गुणहीना वा नारी लक्षणवर्जिता ॥ २७ ॥
पुत्री यदा भवेद्‌राजा तदान्धाय प्रयच्छति ।
ज्ञात्वान्धं सुमुखीं कस्माद्दत्तवान्नृपसत्तमः ॥ २८ ॥
कारणं ब्रूहि मे ब्रह्मन्ननुग्राह्योऽस्मि सर्वदा ।
सूत उवाच -
इति राज्ञो वचः श्रुत्वा परीक्षितसुतस्य वै ॥ २९ ॥
द्वैपायनः प्रसन्नात्मा तमुवाच हसन्निव ।
व्यास उवाच -
वैवस्वतसुतः श्रीमाञ्छर्यातिर्नाम पार्थिवः ॥ ३० ॥
तस्य स्त्रीणां सहस्राणि चत्वार्यासन्परिग्रहाः ।
राजपुत्र्यः सरूपाश्च सर्वलक्षणसंयुताः ॥ ३१ ॥
पत्‍न्यः प्रेमयुताः सर्वाः प्रिया राज्ञः सुसम्मताः ।
एका पुत्री तु तासां वै सुकन्या नाम सुन्दरी ॥ ३२ ॥
पितुः प्रिया च मातॄणां सर्वासां चारुहासिनी ।
नगरान्नातिदूरेऽभूत्सरो मानससन्निभम् ॥ ३३ ॥
बद्धसोपानमार्गं च स्वच्छपानीयपूरितम् ।
हंसकारण्डवाकीर्णं चक्रवाकोपशोभितम् ॥ ३४ ॥
दात्यूहसारसाकीर्णं सर्वपक्षिगणावृतम् ।
पञ्चधाकमलोपेतं चञ्चरीकसुसेवितम् ॥ ३५ ॥
पार्श्वतश्च द्रुमाकीर्णं वेष्टितं पादपैः शुभैः ।
सालैस्तमालैः सरलैः पुन्नागाशोकमण्डितम् ॥ ३६ ॥
वटाश्वत्थकदम्बैश्च कदलीखण्डराजितम् ।
जम्बीरैर्बीजपूरैश्च खर्जूरैः पनसैस्तथा ॥ ३७ ॥
क्रमुकैर्नारिकेलैश्च केतकैः काञ्चनद्रुमैः ।
यूथिकाजालकैः शुभ्रैः संवृतं मल्लिकागणैः ॥ ३८ ॥
जम्ब्वाम्रतिन्तिणीभिश्च करञ्जकुटजावृतम् ।
पलाशनिम्बखदिरबिल्वामलकमण्डितम् ॥ ३९ ॥
बभूव कोकिलारावः केकास्वनविराजितम् ।
तत्समीपे शुभे देशे पादपानां गणावृते ॥ ४० ॥
भार्गवश्च्यवनः शान्तस्तापसः संस्थितो मुनिः ।
ज्ञात्वासौ विजनं स्थानं तपस्तेपे समाहितः ॥ ४१ ॥
कृत्वा दृढासनं मौनमाधाय जितमारुतः ।
इन्द्रियाणि च संयम्य त्यक्ताहारस्तपोनिधिः ॥ ४२ ॥
जलपानादिरहितो ध्यायन्नास्ते पराम्बिकाम् ।
सवल्मीकोऽभवद्‍राजल्लँताभिः परिवेष्टितः ॥ ४३ ॥
कालेन महता राजन् समाकीर्णः पिपीलिकैः ।
तथा स संवृतो धीमान्मृत्पिण्ड इव सर्वतः ॥ ४४ ॥
कदाचित्स महीपालः कामिनीगणसंवृतः ।
आजगाम सरो राजन् विहर्तुमिदमुत्तमम् ॥ ४५ ॥
शर्यातिः सुन्दरीवृन्दसंयुतः सलिलेऽमले ।
क्रीडासक्तो महीपालो बभूव कमलाकरे ॥ ४६ ॥
सुकन्या वनमासाद्य विजहार सखीवृता ।
सुमनांसि विचिन्वन्ती चञ्चला चञ्चलोपमा ॥ ४७ ॥
सर्वाभरणसंयुक्ता रणच्चरणनूपुरा ।
चंक्रममाणा वल्मीकं च्यवनस्य समासदत् ॥ ४८ ॥
क्रीडासक्तोपविष्टा सा वल्मीकस्य समीपतः ।
ददर्श चास्य रन्ध्रे वै खद्योत इव ज्योतिषी ॥ ४९ ॥
किमेतदिति सञ्चिन्त्य समुद्धर्तुं मनो दधे ।
गृहीत्वा कण्टकं तीक्ष्णं त्वरमाणा कृशोदरी ॥ ५० ॥
सा दृष्टा मुनिना बाला समीपस्था कृतोद्यमा ।
विचरन्ती सुकेशान्ता मन्मथस्येव कामिनी ॥ ५१ ॥
तां वीक्ष्य सुदतीं तत्र क्षामकण्ठस्तपोनिधिः ।
तामभाषत कल्याणीं किमेतदिति भार्गवः ॥ ५२ ॥
दूरं गच्छ विशालाक्षि तापसोऽहं वरानने ।
मा भिन्दस्वाद्य वल्मीकं कण्टकेन कृशोदरि ॥ ५३ ॥
तेनेदं प्रोच्यमानापि सा चास्य न शृणोति वै ।
किमु खल्विदमित्युक्त्वा निर्बिभेदास्य लोचने ॥ ५४ ॥
दैवेन नोदिता भित्त्वा जगाम नृपकन्यका ।
क्रीडन्ती शङ्कमाना सा किं कृतं तु मयेति च ॥ ५५ ॥
चुक्रोध स तथा विद्धनेत्रः परममन्युमान् ।
वेदनाभ्यर्दितः कामं परितापं जगाम ह ॥ ५६ ॥
शकृन्मूत्रनिरोधोऽभूत्सैनिकानां तु तत्क्षणात् ।
विशेषेण तु भूपस्य सामात्यस्य समन्ततः ॥ ५७ ॥
गजोष्ट्रतुरगाणां च सर्वेषां प्राणिनां तदा ।
ततो रुद्धे शकृन्मूत्रे शर्यातिर्दुःखितोऽभवत् ॥ ५८ ॥
सैनिकैः कथितं तस्मै शकृन्मूत्रनिरोधनम् ।
चिन्तयामास भूपालः कारणं दुःखसम्भवे ॥ ५९ ॥
विचिन्त्याह ततो राजा सैनिकान्स्वजनांस्तथा ।
गृहमागत्य चिन्तार्तः केनेदं दुष्कृतं कृतम् ॥ ६० ॥
सरसः पश्चिमे भागे वनमध्ये महातपाः ।
च्यवनस्तापसस्तत्र तपश्चरति दुश्चरम् ॥ ६१ ॥
केनाप्यपकृतं तत्र तापसेऽग्निसमप्रभे ।
तस्मात्पीडा समुत्पन्ना सर्वेषामिति निश्चयः ॥ ६२ ॥
तपोवृद्धस्य वृद्धस्य वरिष्ठस्य विशेषतः ।
केनाप्यपकृतं मन्ये भार्गवस्य महात्मनः ॥ ६३ ॥
ज्ञातं वा यदि वाज्ञातं तस्येदं फलमुत्तमम् ।
कैश्च दुष्टैः कृतं तस्य हेलनं तापसस्य ह ॥ ६४ ॥
इति पृष्टास्तमूचुस्ते सैनिका वेदनार्दिताः ।
मनोवाक्कायनितं न विद्मोऽपकृतं वयम् ॥ ६५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
सप्तमस्कन्धे शर्यातिराजवर्णनं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥


च्यवनमुनींचा शाप -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

जनमेजय व्यासांना म्हणाला, "हे महर्षे, आपण सूर्यवंशातील परंपरेने उत्पन्न झालेल्या धर्मशील राजाची कथा मला विस्ताराने सांगा."

व्यास म्हणाले, "हे भारतश्रेष्ठा, ऐक तर. मी पूर्वी देवर्षी नारदांकडून जे ऐकले आहे तेच तुला विस्तारपूर्वक सांगतो."

पूर्वी शुभ अशा सरस्वतीच्या तीरी आश्रम बांधून तेथे वास्तव्य करीत असता एकदा महर्षी नारद आपण होऊनच तेथे आले. मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रणिपात केल्यावर त्यांच्या पुढे उभा राहिलो. त्यांना उत्कृष्ट आसन दिले व त्यांची अत्यंत नम्र भावनेने पूजा केली. नंतर मी त्यांना विचारले, "हे देवमहर्षे, आपल्यासारखी वंदनीय विभूती माझ्या येथे आली आहे, म्हणून आज मी धन्य व पवित्र झालो. तेंव्हा आता आपण महादेवी भगवतीचे संपूर्ण चरित्र मला कथन करावे. या सातव्या मनुवंशातील राजांची उत्पत्ती व त्यांची चरित्रेही अत्यंत रमणीय व श्रवणीय आहेत. तेव्हा भगवन्, ती अद्‌भुत कथा सांप्रत आपणांकडून ऐकण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे. म्हणूनच आपणास योग्य वाटेल तेथे संक्षेपाने अथवा विस्तारपूर्वक ते अद्‌भुत रमणीय चरित्र मला सांगा."

तेव्हा माझे बोलणे ऐकून प्रसन्न झालेले ते परमार्थतत्पर नारदमुनी अत्यंत प्रमुदित झाले व हसत हसत मला म्हणाले, "हे सत्यवतीपुत्रा, धर्मज्ञान व धर्मतत्पर असलेल्या त्या राजांचा अत्युत्तम वंश तू नीट ऐक. तो श्रवणास सुखद आहे."

विष्णूच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली हे पुराणात सांगितले आहे. तो ब्रह्मदेवच स्वयंभु सर्वशक्तिमान व सर्वज्ञ असल्याने त्याने सृष्टी उत्पन्न करण्यासाठी भाग्यवान शिवाची दहा हजार वर्षेपर्यंत तपश्चर्या केली. त्यानंतर सर्व शुभ लक्षणांनी युक्त असे मानसपुत्र त्याने निर्माण केले. त्यातलाच एक मरिची असून तोच सृष्टीकार्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचा अतिप्रसिद्ध असा दुसरा पुत्र म्हणजे कश्यप हा होय. दक्षाच्या तेरा कन्यांबरोबर त्याचा विवाह झाला होता. त्यांच्या ठिकाणी नंतर देव, दैत्य, यक्ष, पन्नग व इतर पशु या सर्व जीवनसृष्टीची उत्पत्ती झाली. म्हणूनच सृष्टीला काश्यपी सृष्टी हे नाव देण्यात आले.

विवस्वान हे नाव धारण केलेला सूर्य देवात अत्यंत प्रसिद्ध आहे. राजा वैवस्वत मनु त्याचा प्रसिद्ध पुत्र होय. त्याच मनूच्या इक्ष्वाकु ह्मा पुत्राने पुढे सूर्यवंशाचा विस्तार केला. इक्ष्वाकूनंतर मनूला पुढे नऊ पुत्र झाले. इक्ष्वाकू सूर्ववंशाचा विस्तारकर्ता म्हणून प्रसिद्ध आहे. शिवाय इतरांची नावे आता सांगतो. नाभाग, धृष्ट, शर्याति नरिष्यंत, प्रांशु, नृग, दिष्ट, कृरूष, पृषध असे मनूचे नऊ पुत्र प्रसिद्ध आहेत. मनूचा थोरला पुत्र इक्ष्वाकु याला शंभर पुत्र झाले. विकुक्षी हा इक्ष्वाकूचा जेष्ठ पुत्र जितेंद्रिय होता.

आता या मत्वंतरातील ह्मा नऊ पुत्रांचा वंशविस्तार झाला तो असा. महाप्रतापी, धर्मवेत्ता व सत्यवचनी राजा अंबरिष हा नाभागाचा पुत्र असून नेहमी प्रजाहिततत्पर होता. धृष्ट या मनुपुत्रापासून ब्रह्मभूत असे क्षात्रकुल उत्पन्न झाले. ते संग्रामभरित असले तरी ब्रह्मकर्म करण्यासाठी तत्पर होते.

तिसरा मनुपुत्र शर्याति याला आनर्त नावाचा अतिविख्यात असा पुत्र झाला व एक लावण्यसंपन्न अशी सुलक्षणी कन्या झाली. तिचे नाव सुकन्या होय. शर्यातीने आपली मुलगी सुकन्या ही अंध असलेल्या च्यवनाला अर्पण केली. पण सुकन्येच्या अतिपतिव्रत्यामुळे च्यवनमुनी डोळस झाला. सूर्याचे पुत्र अश्विनीकुमार यांनी च्यवनाला दृष्टी दिली असे आम्ही ऐकले आहे.

त्यावर अत्यंत शंकित झालेला जनमेजय संभ्रमात पडला. तो म्हणाला, "शर्यातीने आपली सुलोचना कन्या अंध असलेल्या मुनीला का अर्पण केली ? कुरूप, अवगुणी अथवा स्त्रियांची लक्षणे तिच्या अंगी नसती तरच तिला एखाद्या अंधाला अर्पण केले असते. सुकन्या तर सर्वगुण-सर्वलक्षणसंपत्र अशी होती. मग राजाने ती अंधालाच का अर्पण केली ? याचे कारण कृपा करून सांगा.

जनमेजयाचे भाषण ऐकल्यावर व्यास म्हणाले, वैवस्वत मनूचा पुत्र शर्याति याला चार हजार स्त्रिया होत्या. त्या सर्वगुणी, सुंदर व मनोहर असून उत्कृष्ट, कुलीन अशा राजकन्या होत्या. त्या सर्वजणींचे राजावर नितांत प्रेम होते. तसेच राजालाही सर्वजणी अत्यंत प्रिय होत्या. पण इतक्या भार्या असूनही राजाला ही एकच सुहास्यवदना अशी सुकन्या नावाची कन्या होती. ती जशी राजाला तशीच सर्वच मातांना प्रिय होती.

शर्याति राजाच्या राजधानी स्थानापासून जवळच एक महासरोवर होते. ते मानस सरोवराप्रमाणे पवित्र होते. त्याला सुंदर पायर्‍या होत्या. त्यातील उदक नेहमी स्फटिकाप्रमाणे स्वच्छ असे. त्यात हंस व कारंडव पक्षी नित्य क्रीडा करीत. चक्रवाक पक्षांमुळे त्याची शोभा वृद्धिंगत झाली होती. दाव्यूह (पाणकावळे) पक्षी व सारस पक्षी यांनी ते गजबजलेले सरोवर सदा विलोभनीय दिसत असे. अशाप्रकारचे तेथे अनेक पक्षीगण वास्तव्य करीत असत. त्या सरोवरात पाच प्रकारची कमले होती. त्यामुळे तेथे भुंगेही फार होते. ते दुतर्फा वृक्षराजींनी वेढलेले होते. साल, तमाल, सरल, पुन्नाग, अशोक अशा सुंदर वृक्षांनी त्या सरोवरास अतिशय शोभा प्राप्त झाली होती. वट, अश्वत्थ, कदंब व केळीचे फड यांच्यामुळे त्याच्या सौंदर्यात भर पडत होती. जंबीर, बीजपूर, जंजीर, पनस, क्रमुक, नारिकेल, केतक, कांचनवृक्ष, युथिक (जुई), मल्लिकागण (मोगरी) वगैरे वृक्ष-लतांनी ते वेढलेले होते. जंबू आम्र, निंबिणी, करंडी, कुरज हे वृक्ष तेथे आधारभूत होते. पलाश, निंब, खदिर, बिल्व, आमलकवृक्ष यांनी ते सरोवर विभूषित झाले होते. कोकिळा व मोर या पक्षांमुळे ते बहारदार दिसत होते.

ला सरोवराच्या सन्निध एके ठिकाणी च्यवनभार्गव नावाचे मुनी वास्तव्य करीत होते. ते वृत्तीने अत्यंत शांत व महातपस्वी होते. तो निर्जन भूभाग आहे असे जाणूनच तेथे ते मुनी तपश्चर्या करीत. ते दृढ आसन घालीत, मौन धारण केल्यावर प्राणाचे निरोधन करून इंद्रियांचा संयम करीत. निराहार राहून ते उदकही प्राशन करीत नसत. ते नित्य त्या देवी परांबिकेचे ध्यान करीत. अशी बरीच वर्षे तपश्चर्या केल्यावर त्यांच्या बसल्याजागेवरच लतांनी वेढलेले असे एक वारूळ त्यांच्याभोवती निर्माण झाले. त्याप्रमाणे ते बसले असता त्या वारुळातच दिसेनासे झाले.

एकदा राजा शर्याति हा आपल्या स्त्रियांसह क्रीडा करण्यासाठी तेथे आला. तेथे विहार करीत करीत राजा कमलांनी वेष्टित अशा निर्मल सरोवरापाशी येऊन पोहोचला. त्या सरोवरात क्रीडा करण्याची त्याला अत्यंत इच्छा झाली. आपल्या पित्यासह व मातासह सुकन्याही आलेली होती. ती आपल्या सख्यांसह फुले वेचण्यासाठी इतस्ततः हिंडू लागली. तिने सर्व भूषणे पीरधन केली होती. तिच्या पायातील तोरड्यांचा छुमछुम असा आवाज घुमत होता. फिरता फिरता ती अगदी सहजगत्या च्यवन मुनींना परिवेष्टित केलेल्या त्या वारूळापाशी आली.

आपल्या सख्यांसह क्रीडा करीत असता ती वारूळाजवळ येऊन बसली. इतक्यात तिला वारूळाच्या छिद्रातून काजव्याप्रमाणे भासत असलेल्या दोन ज्योती दिसल्या. मनांत त्याविषयी शंका निर्माण झाल्याने तिने त्या ज्योती बाहेर काढण्याचा विचार केला. एक तीक्ष्ण काटा हातात घेऊन ती सिद्ध झाली. ज्योती बाहेर काढण्यासाठी ती वारुळाच्या अगदी नजीक आली. त्या मुनींनी ती सुकेशा सुकन्या अवलोकन केली. ती जणू दुसरी रतीच होती. ती विशालनयना सुकन्या जवळ आलेली पाहून च्यवनमुनी अत्यंत खोल गेलेल्या आवाजात म्हणाला, "हे सुनयने, दूर हो. मी तपस्वी असून तू हे वारुळ फोडण्याचा प्रयत्‍न करू नकोस."

अशाप्रकारे मुनी बोलले, पण त्या कन्येस ते भाषण ऐकावयास आले नसल्याने ती पूर्वीच्याच उत्सकतेने तेथे गेली व तिने ते ज्योतीप्रमाणे दिसणारे डोळे फोडले. दैवगतीच म्हणून की काय पण त्या कन्येने डोळे फोडल्यावर क्रीडेसाठी ती दुसरीकडे निघून गेली. पण आपण केलेल्या कार्याबद्दल तिच्या मनात शंका निर्माण होऊन ती स्वतःशीच भयभीत झाली.

इकडे आपले डोळे फोडले गेल्यामुळे च्यवनमुनी अत्यंत क्रुद्ध झाला. अत्यंत वेदना होत असल्याने त्याचा संताप अनावर झाला आणि 'सर्वांना मल, मूत्राचा रोध होवो"अशी शापवाणी तो वदला. त्यामुळे शर्यातीच्या राज्यातील सर्व प्राणी, अश्व वगैरे व सर्व प्रजा यांच्य मल- खाचा रोध झाल्याने दुःखी होऊन सर्वजण राज्याकडे गेले. राजाचीही तीच अवस्था झाली होती व त्याचे सैन्यही तेच सांगत आले. प्रजाही तेच म्हणू लागली. अशाप्रकारे शारीरिक पीडेमुळे सर्वजण त्रस्त झाले.

राजा विचार करू लागला व तसाच आपला राजधानीत परत आला. तो चिंताक्रांत होऊन कारण शोधू लागला. तो आपल्या सैनिकांस व आप्त-स्वकीयांस म्हणाला, "कोणाच्या दुष्कर्मामुळे हे घडले ? त्या सरोवराच्या पश्चिम भागात महातपस्वी च्यवनमुनी महान तपश्चर्या करीत आहे. त्या अग्रीप्रमाणे भासणार्‍या तेजस्वी मुनीला कोणी तरी त्रस्त केल्याशिवाय ही पीडा सर्वांनाच उत्पन्न होणार नाही. तेच कारण असावे.

त्या ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध महाल भार्गवाचा कोणी बरे अपराध केला ? तो जाणतेपणी असो वा अजाणतेपणी असो, पण त्याचे फल आपण भोगत आहोत. कोणा दुष्टाने त्या तापसाची अवहेलना केली ह्याचा सर्वांनी शोध करा."

राजाचे बोलणे ऐकून शरीरपीडेने त्रस्त झालेले सैनिक व इतरेजन म्हणाले, "महाराज, निश्चितपणे सांगतो की आमच्याकडून काया, वाचा मनेकरून कोणताही अपराध त्या तापसाच्या बाबतीत घडलेला नाही."अध्याय दुसरा समाप्त

GO TOP