श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
षष्ठः स्कन्धः
द्वादशोऽध्यायः


हरिश्चन्द्रस्य जलोदरव्याधिपीडावर्णनम्

राजोवाच
तीर्थानि भुवि पुण्यानि ब्रूहि मे मुनिसत्तम ।
गम्यानि मानवैर्देवैः क्षेत्राणि सरितस्तथा ॥ १ ॥
फलं च यादृशं यत्र तीर्थेषु स्नानदानतः ।
विधिं तु तीर्थयात्रायां नियमांश्च विशेषतः ॥ २ ॥
व्यास उवाच
शृणु राजन् प्रवक्ष्यामि तीर्थानि विविधानि च ।
येषु तीर्थेषु देवीनां प्रशस्तान्यायनानि च ॥ ३ ॥
नदीनां जाह्नवी श्रेष्ठा यमुना च सरस्वती ।
नर्मदा गण्डकी सिन्धुर्गोमती तमसा तथा ॥ ४ ॥
कावेरी चन्द्रभागा च पुण्या वेत्रवती शुभा ।
चर्मण्वती च सरयूस्तापी साभ्रमती तथा ॥ ५ ॥
एताश्च कथिता राजन्नन्याश्च शतशः पुनः ।
तासां समुद्रगाः पुण्याः स्वल्पपुण्या ह्यनब्धिगाः ॥ ६ ॥
समुद्रगानां ताः पुण्याः सर्वदौघवहास्तु याः ।
मासद्वयं श्रावणादौ ताश्च सर्वा रजस्वलाः ॥ ७ ॥
भवन्ति वृष्टियोगेन ग्राम्यवारिवहास्तथा ।
पुष्करं च कुरुक्षेत्रं धर्मारण्यं सुपावनम् ॥ ८ ॥
प्रभासं च प्रयागं च नैमिषारण्यमेव च ।
विश्रुतं चार्बुदारण्यं शैलाश्च पावनास्तथा ॥ ९ ॥
श्रीशैलश्च सुमेरुश्च पर्वतो गन्धमादनः ।
सरांसि चैव पुण्यानि मानसं सर्वविश्रुतम् ॥ १० ॥
तथा बिन्दुसरः श्रेष्ठमच्छोदं नाम पावनम् ।
आश्रमास्तु तथा पुण्या मुनीनां भावितात्मनाम् ॥ ११ ॥
विश्रुतस्तु सदा पुण्यः ख्यातो बदरिकाश्रमः ।
नरनारायणौ यत्र तेपाते तौ मुनी तपः ॥ १२ ॥
वामनाश्रम आख्यातः शतयूपाश्रमस्तथा ।
येन यत्र तपस्तप्तं तस्य नाम्नातिविश्रुतः ॥ १३ ॥
एवं पुण्यानि स्थानानि ह्यसंख्यातानि भूतले ।
मुनिभिः परिगीतानि पावनानि महीपते ॥ १४ ॥
एषु स्थानेषु सर्वत्र देवीस्थानानि भूपते ।
दर्शनात्पापहारीणि वसन्ति नियमेन च ॥ १५ ॥
कथयिष्यामि तान्यग्रे प्रसङ्गेन च कानिचित् ।
तीर्थानि नृप दानानि व्रतानि च मखास्तथा ॥ १६ ॥
तपांसि पुण्यकर्माणि सापेक्षाणि महीपते ।
द्रव्यशुद्धिं क्रियाशुद्धिं मनःशुद्धिमपेक्ष्य च ॥ १७ ॥
पावनानि हि तीर्थानि तपांसि च व्रतानि च ।
कदाचिद्द्रव्यशुद्धिः स्यात्क्रियाशुद्धिः कदाचन ॥ १८ ॥
दुर्लभा मनसः शुद्धिः सर्वेषां सर्वदा नृप ।
मनस्तु चञ्चलं राजन्ननेकविषयाश्रितम् ॥ १९ ॥
कथं शुद्धं भवेद्‌राजन्नानाभावसमाश्रितम् ।
कामक्रोधौ तथा लोभो ह्यहङ्कारो मदस्तथा ॥ २० ॥
सर्वविघ्नकरा ह्येते तपस्तीर्थव्रतेषु च ।
अहिंसा सत्यमस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रहः ॥ २१ ॥
स्वधर्मपालनं राजन् सर्वतीर्थफलप्रदम् ।
नित्यकर्मपरित्यागान्मार्गे संसर्गदोषतः ॥ २२ ॥
व्यर्थं तीर्थाधिगमनं पापमेवावशिष्यते ।
क्षालयन्ति हि तीर्थानि सर्वथा देहजं मलम् ॥ २३ ॥
मानसं क्षालितुं तानि न समर्थानि वै नृप ।
शक्तानि यदि चेत्तानि गङ्गातीरनिवासिनः ॥ २४ ॥
मुनयो द्रोहसंयुक्ताः कथं स्युर्भावितेश्वराः ।
वसिष्ठसदृशाः प्रह्वा विश्वामित्रादयः किल ॥ २५ ॥
रागद्वेषरताः सर्वे कामक्रोधाकुलाः सदा ।
चित्तशुद्धिमयं तीर्थं गङ्गादिभ्योऽतिपावनम् ॥ २६ ॥
यदि स्याद्दैवयोगेन क्षालयत्यान्तरं मलम् ।
विशेषेण तु सत्सङ्गो ज्ञाननिष्ठस्य भूपते ॥ २७ ॥
न वेदा न च शास्त्राणि न व्रतानि तपांसि न ।
न मखा न च दानानि चित्तशुद्धेस्तु कारणम् ॥ २८ ॥
वसिष्ठो ब्रह्मणः पुत्रो वेदविद्याविशारदः ।
रागद्वेषान्वितः कामं गङ्गातीरसमाश्रितः ॥ २९ ॥
आडीबकं महायुद्धं विश्वामित्रवसिष्ठयोः ।
जातं निरर्थकं द्वेषाद्देवानां विस्मयप्रदम् ॥ ३० ॥
विश्वामित्रो बकस्तत्र जातः परमतापसः ।
शप्तः स तु वसिष्ठेन हरिश्चन्द्रस्य कारणात् ॥ ३१ ॥
कौशिकेन वसिष्ठोऽपि शस्त्वाडीदेहभाक्कृतः ।
शापादाडीबकौ जातौ तौ मुनी विशदप्रभौ ॥ ३२ ॥
निवासं प्रापतुस्तीरे सरसो मानसस्य च ।
चक्रतुर्दारुणं युद्धं नखचञ्चुप्रताडनैः ॥ ३३ ॥
वर्षाणामयुतं यावत्तावृषी रोषसंयुतौ ।
युयुधाते मदोन्मत्तौ सिंहाविव परस्परम् ॥ ३४ ॥
राजोवाच
कथं तौ मुनिशार्दूलौ तापसौ धर्मतत्परौ ।
परस्परं वैरपरौ सञ्जातौ केन हेतुना ॥ ३५ ॥
शापं परस्परं केन कारणेन महामती ।
दत्तवन्तौ मिथः क्लेशकारकौ दुःखदौ नृणाम् ॥ ३६ ॥
व्यास उवाच
हरिश्चन्द्रो नृपश्रेष्ठस्त्रिशंकुतनयः पुरा ।
बभूव रविवंशीयो रामचन्द्रस्य पूर्वजः ॥ ३७ ॥
अनपत्यः स राजर्षिर्वरुणाय महाक्रतुम् ।
प्रतिजज्ञे पुत्रकामो नरमेधं दुरासदम् ॥ ३८ ॥
वरुणस्तस्य सन्तुष्टो यज्ञस्य नियमे कृते ।
दधार गर्भं राज्ञस्तु भार्या परमसुन्दरी ॥ ३९ ॥
राजा बभूव सन्तुष्टो दृष्ट्वा भार्यां सदोहदाम् ।
चकार विधिवत्कर्म गर्भसंस्कारकारकम् ॥ ४० ॥
सुषुवे तनयं नारी सर्वलक्षणसंयुतम् ।
मुदं प्राप नृपस्तत्र पुत्रे जाते विशाम्पते ॥ ४१ ॥
कृतवाञ्जातकर्मादिसंस्कारविधिमुत्तमम् ।
ददौ हिरण्यं गा दोग्धीर्ब्राह्मणेभ्यो विशेषतः ॥ ४२ ॥
जन्मोत्सवेऽतिसंवृत्ते गेहे वै यादसाम्पतिः ।
आजगाम महाराज विप्रवेषधरस्तथा ॥ ४३ ॥
पूजितः पार्थिवेनाथ दत्त्वा विधिवदासनम् ।
कार्ये पृष्टेऽब्रवीद्वाक्यं वरुणोऽस्मीति भूपतिम् ॥ ४४ ॥
कुरु यज्ञं सुतं कृत्वा पशुं परमपावनम् ।
सत्यवाग्भव राजेन्द्र संकल्पस्तु त्वया कृतः ॥ ४५ ॥
तच्छ्रुत्वा वचनं राजा विह्वलोऽतिव्यथाकुलः ।
संस्तभ्याधिं नृपः प्राह वरुणं सत्कृताञ्जलिः ॥ ४६ ॥
स्वामिन्करोमि तं यज्ञं सर्वथा विधिपूर्वकम् ।
मया ते यत्प्रतिज्ञातं भवामि सत्यवागहम् ॥ ४७ ॥
पूर्णे मासे विशुध्येत धर्मपत्‍नी सुरोत्तम ।
विशुद्धायां तु भार्यायां कर्तव्यः स पशोर्मखः ॥ ४८ ॥
व्यास उवाच
इत्युक्ते वचने राज्ञा वरुणः स्वगृहं गतः ।
राजा बभूव सन्तुष्टः किञ्चिच्चिन्तातुरस्तथा ॥ ४९ ॥
पूर्णे मासि पुनः पाशी परीक्षार्थं नृपालये ।
आजगाम द्विजो भूत्वा सुवेषः सुष्ठुभाषकः ॥ ५० ॥
कृतार्हणं सुखासीनं भूपतिस्तं सुरोत्तमम् ।
उवाच विनयोपेतो हेतुगर्भं वचस्तदा ॥ ५१ ॥
असंस्कृतं सुतं स्वामिन्यूपे बध्नामि तं कथम् ।
संस्कत्य क्षत्रियं कृत्वा यजेऽहं यज्ञमुत्तमम् ॥ ५२ ॥
दयसे यदि देव त्वं ज्ञात्वा दीनं स्वसेवकम् ।
असंस्कृतस्य बालस्य नाधिकारोऽस्ति कुत्रचित् ॥ ५३ ॥
वरुण उवाच
प्रतारयसि राजेन्द्र कृत्वा समयमग्रतः ।
दुस्त्यजस्तव जानामि सुतस्नेहो ह्यपुत्रिणः ॥ ५४ ॥
गृहं व्रजामि भूपाल वचनात्तव कोमलात् ।
कियत्कालं प्रतीक्ष्याहमागमिष्यामि ते गृहम् ॥ ५५ ॥
भवितव्यं त्वया तात तदा सत्यवचोऽन्वितम् ।
अन्यथा त्वयि मुञ्चामि कोपं शापसमन्वितम् ॥ ५६ ॥

राजोवाच
समावर्तनकर्मान्ते सर्वथा यादसांपते ।
कृत्वा पुत्रपशुं यज्ञे यजिष्ये विधिपूर्वकम् ॥ ५७ ॥
व्यास उवाच
तच्छ्रुत्वा वचनं राज्ञो वरुणः प्रीतमानसः ।
तथेत्युक्त्वा ययौ तूर्णं नृपस्तु सुस्थितोऽभवत् ॥ ५८ ॥
रोहिताख्य इति ख्यातः सुतस्तस्य विवृद्धिमान् ।
सञ्जातश्चतुरः सर्वविद्यानां च विशारदः ॥ ५९ ॥
यज्ञस्य कारणं तेन ज्ञातं सर्वं सविस्तरम् ।
भयभीतस्ततः सोऽपि मत्वा मरणमात्मनः ॥ ६० ॥
कृत्वा पलायनं वीरो गतोऽसौ गिरिगह्वरे ।
अगम्ये नृपतिस्थाने स्थितस्तत्र भयातुरः ॥ ६१ ॥
प्राप्ते कालेऽथ वरुणो यज्ञार्थी नृपतेर्गृहम् ।
गत्वा तमाह भूपालं कुरु यज्ञं विशांपते ॥ ६२ ॥
प्रम्लानवदनो राजा तमाह व्यथितेन्द्रियः ।
किं करोमि गतः क्वापि सुतो मे सुरसत्तम ॥ ६३ ॥
श्रुत्वा तद्वचनं राज्ञः कुपितो यादसांपतिः ।
शशाप तं नृपं कोपादसत्यवादिनं भृशम् ॥ ६४ ॥
जलोदराभिधो व्याधिर्देहे भवतु ते नृप ।
यतः प्रतारितश्चाहं कृत्वा कपटपण्डित ॥ ६५ ॥
इति शप्त्वा ययौ धाम स्वकं पाशधरस्तदा ।
राजा चिन्तातुरस्तस्थौ भवने व्याधिपीडितः ॥ ६६ ॥
यदातिव्याधितो राजा रोगेण शापजेन ह ।
तदा शुश्राव पुत्रोऽपि पितरं व्याधिपीडितम् ॥ ६७ ॥
पान्थिकः प्राह पुत्रं हि पिता ते भृशदुःखितः ।
जलोदरविकारेण शापजेन नृपात्मज ॥ ६८ ॥
विनष्टं जीवितं तेऽद्य वृथा जातस्य दुर्मते ।
यत्त्यक्त्वा पितरं दुःस्थं प्राप्तोऽसि गिरिगह्वरम् ॥ ६९ ॥
किमनेन शरीरेण प्राप्तं ते जन्मनः फलम् ।
देहदं दुःखितं कृत्वा स्थितोऽस्यत्र सुताधम ॥ ७० ॥
प्राणास्त्याज्याः पितुः कार्ये सत्पुत्रेणेति निश्चयः ।
त्वदर्थे दुःखितो राजा क्रन्दति व्याधिपीडितः ॥ ७१ ॥
व्यास उवाच
तदाकर्ण्य वचस्तथ्यं पान्थिकाद्धर्मसंयुतम् ।
यदा चक्रे मनो गन्तुं द्रष्टुं तातं व्यथातुरम् ॥ ७२ ॥
तदा विप्रवपुर्भूत्वा वासवस्तमुपागमत् ।
रहः प्राह हितं वाक्यं दयावानिव भारत ॥ ७३ ॥
मूर्खोऽसि राजपुत्र त्वं गमनाय मतिं वृथा ।
करोषि पितरं त्वद्य न जानासि व्यथायुतम् ॥ ७४ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्या संहितायां षष्ठस्कन्धे
हरिश्चन्द्रस्य जलोदरव्याधिपीडावर्णनं नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥


अडिबक आख्यान -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

जनमेय म्हणाला, ''हे मुनिश्रेष्ठ, मानव व देव यांना भेट देण्यास योग्य अशा पुण्यक्षेत्रांचे वर्णन करा. तसेच त्यांच्या स्नानाने कोणती फले मिळतात ? त्यांचे नियम काय ? ते विस्ताराने सांगा.''

व्यास म्हणाले, ''नद्यांमध्ये जान्हवी, यमुना, सरस्वती, नर्मदा, गंडकी, सिंधू, गोमती, तमसा, कावेरी, चंद्रभागा, वेत्रवती, चर्मण्वती, शरयू, तापी, साभ्रमती ह्या सर्व पवित्र नद्या आहेत. याच आणखी काही पुण्यकारक नद्या समुद्राला मिळाल्या आहेत.

ज्यांचा ओघ कायम असतो त्या विशेष पुण्यकारक असतात. या सर्व नद्या श्रावण व भाद्रपद महिन्यांत रजस्वला असतात. पावसाळ्यात गावाला उपयोगी पडणार्‍या लहान नद्या निर्माण होतात. पुष्कर, कुरूक्षेत्र, धर्मारण्य, प्रभास, प्रयाग, नैमिषारण्य, अर्बुदारण्य, तसेच श्रीशैल, सुमेरू, गंधमादन, मानससरोवर, बिंदुसरोवर, अक्षोद सरोवर व मुनींचे आश्रम ही सर्व पुण्यस्थाने असतात.

बदरिकाश्रमात नरनारायणमुनींनी तप केले. त्याप्रमाणे वामनाश्रम व शतयूपाश्रम हे आश्रमही प्रसिद्ध आहेत.

हे भूपते, देवीची स्थाने दर्शनानेच पापहरण करतात. तीर्थे, दाने, व्रते यज्ञ व तपेही सक्षम पुण्यकर्मे आहेत. द्रव्य, क्रिया व मन शुद्ध असल्यास ती सुद्धा पवित्र स्थाने निर्माण करतात.

द्रव्यशुद्धी क्रियाशुद्धी या आढळतात, पण मनशुद्ध सर्वांना सुलभ असते असे नाही. हे राजा, मन फार चंचल असते.

हे राजा, अनेक भावनात्मक मन शुद्ध कसे होणार ? काम, क्रोध, लोभ, अहंकार व मद हे तपश्चर्या, तीर्थे, व्रते यांत विघ्ने आणतात. अहिंसा, सत्य, शौच, इंद्रियनिग्रह आणि धर्मपालन यामुळेच सर्व तीर्थांची फले प्राप्त होत असतात. नित्य कर्मांच्या त्यागामुळे तीर्थाटन व्यर्थ होते व संसर्गदोष घडल्यास व्यर्थता वृद्धिंगत होते.

हे राजा, तीर्थे देहाचा मल नाहीसा करतात, पण मनाच्या मलाचे क्षालन करण्यास ती समर्थ नाहीत. तसे असते तर गंगातीरी वास्तव्य करणारे व ईश्वराचे ध्यान करणारे मुनी एकमेकांचा द्रोह का करते ? वसिष्ठ - विश्वामित्रासारखे विनयसंपन्न मुनी काम व क्रोधांमुळे व्याकुल होतात. म्हणून हे राजा, चित्तशुद्धी करणारे तीर्थ गंगातीर्थापेक्षाही पावन असते. विशेषतः सत्संग प्राप्त झाला तरच मानसिक मलाचे क्षालन होते.

वेद, शास्त्रे, व्रते, तपश्चर्या, यज्ञ व दाने यांमुळे चितशुद्ध होतेच असे नाही. वेदांत निपुण असलेले ब्रह्मापुत्र वसिष्ठसुद्धा गंगातीराच्या आश्रयाला असूनही खरोखरच रागद्वेषांनी युक्त होते. विश्वामित्र व वसिष्ठ यांच्यात केवळ द्वेषामुळेच महायुद्ध झाले. देवांनाही त्यामुळे विस्मय वाटला. विश्वामित्र महातपस्वी असूनही वसिष्ठांनी शाप दिल्यामुळे बक झाला आणि विश्वामित्राने शाप देऊन वसिष्ठालाही अडीचा देह धारण करायला लावले.

ते महातेजस्वी मुनी शापामुळे अडिबक झाल्यावर काही दिवस मानससरोवराच्या तीरी राहिले. त्या ठिकाणी नखे व चोची ह्यांच्या प्रहारांनी त्यांनी दारुणयुद्ध केले. क्रुद्ध झालेले ते ऋषी दहा हजार वर्षे लोटेपर्यंत मदोन्मत्त सिंहाप्रमाणे युद्धच करत होते.''

राजा म्हणाला, ''ते तपस्वी कोणत्या कारणामुळे वैरी झाले ? एकमेकांना क्लेश देणार्‍या व त्यामुळे इतरांनाही दुःख देणार्‍या त्या महाविचारी मुनींनी परस्परांना शाप का दिला ?''

व्यास म्हणाले, ''रविवंशामध्ये त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र नावाचा श्रेष्ठ राजा होऊन गेला. त्याने पुत्रप्राप्तीसाठी नरमेध करण्याचा नवस केला. त्यामुळे वरुण संतुष्ट झाला. पुढे राजपत्नीला डोहाळे लागले. राजाही आनंदित झाला. गर्भसंस्कारकर्मे त्याने यथाविधी केली.

काही कालाने त्याला सर्वलक्षणसंपन्न पुत्र झाला. पुत्रजन्म झाल्यावर राजालाही आनंद झाला. त्याने जातकर्मादि संस्कारविधी करून ब्राह्मणांना सुवर्ण व दुभत्या गाई दिल्या. ह्याप्रमाणे जन्मोत्सव चालला असता राजाच्या घरी विप्रवेष धारण करून वरुण प्राप्त झाला. तेव्हा राजाने यथाविधी आसन देऊन व पूजा करून आगमनाचे कारण विचारले असता तो ब्राह्मण राजाला म्हणाला, ''मी वरुण आहे. पुत्र हाच अत्यंत पवित्र पशू कल्पून तू यज्ञ कर. तू यज्ञाचा नवस केला आहेस. यास्तव आता आपले वचन पाळ.

हे ऐकताच राजा दुःखाने व्याकुळ झाला. पण तो हात जोडून वरुणाला म्हणाला, ''हे प्रभो, मी प्रतिज्ञा केल्याप्रमाणे विधिपूर्वक यज्ञ करीन आणि आपले शब्द खरे करीन. हे सुरश्रेष्ठा, महिना भरल्यावर स्त्री शुद्ध होते. म्हणून भार्या शुद्ध झाल्यानंतर तो पशुयुक्त यज्ञ मी करीन.''

ते ऐकून वरुण स्वगृही परत गेला. राजा आनंद व दुःख एकाच वेळी भोगत होता. महिना पूर्ण झाल्यानंतर वरुण पुन: उत्कृष्ट वेष धारण करून द्विजरूपाने राजगृही परत आला. पूर्वीप्रमाणे पूजन झाल्यावर तो सुरश्रेष्ठ सुखाने बसला. हरिश्चंद्र राजा हेतुगर्भ भाषणाने म्हणाला, "हे प्रभो, त्या असंस्कृत पुत्राला मी यूपाशी कसा बरे बांधू ? संस्काराने शुद्ध केल्यानंतर मी उत्कृष्ट यज्ञ करीन.''

वरुण म्हणाला, ''हे राजेंद्रा, प्रतिज्ञा करून तू मला फसवीत आहेस. तू पूर्वी निपुत्रिक असल्यामुळे सांप्रत तुझ्या ठिकाणी उत्पन्न झालेले पुत्रप्रेम दूर होणे कठीण आहे. तथापि तुझ्या भाषणामुळे मी तूर्त जातो. काही काळ वाट पाहिल्यानंतर मी पुनः तुझ्या घरी येईन. तेव्हा मात्र तू सत्यवचनी हो. नाहीतर मी तुला शाप देईन.''

राजपुत्र रोहित हा अत्यंत बुद्धिमान व विद्यापारंगत झाला. पण त्याला यज्ञाचे कारण समजल्यावर तोही भयभीत होऊन कोणालाही न कळत पर्वताच्या गुहेत पळून गेला व गुप्त रीतीने राहू लागला.

नंतर राजाने सांगितलेला काल प्राप्त झाल्यावर वरुण यज्ञाच्या इच्छेने राजगृही आला व ''यज्ञ कर" असे म्हणाला, ''हे सुरश्रेष्ठ, मी काय करू ? माझा पुत्र कोठे निघून गेला हे समजत नाही.'' हे राजाचे भाषण श्रवण करून वरुण क्रुद्ध झाला आणि वारंवार असत्य भाषण करणार्‍या त्या राजाला क्रोधाने त्याने शाप दिला.

तो म्हणाला, ''हे कपटपटु राजा, ज्या अर्थी वचन देऊन तू मला फसविलेस त्या अर्थी तुला जलोदराची व्याधी होईल.

तेव्हा राजा रोगग्रस्त व चिंतातुर होऊन राहिला. शापजन्य रोगाने राजा पीडित झाला. पिता व्याधिग्रस्त झाल्याचे पुत्रालाही समजले.

तेव्हा आपल्यामुळे पित्याला दुःख झाले हे कळल्यावर तो आक्रोश करू लागला व घरी जाण्यास निघाला.

पण त्याच वेळी इंद्र त्याच्याकडे आला आणि हितोपदेशाच्या निमित्ताने म्हणाला, ''हे राजपुत्रा, तू मूर्ख आहेस. तू तेथे जाऊन राजाला अधिक दुःख देशील. तू जाऊ नकोस."अध्याय बारावा समाप्त


GO TOP