श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
विंशोऽध्यायः


महिषवधानन्तरं पृथिवीसुखवर्णनम्

जनमेजय उवाच -
अथाद्‌भुतं वीक्ष्य मुने प्रभावं
     देव्या जगच्छान्तिकरं परञ्च ।
न तृप्तिरस्ति द्विजवर्य शृण्वतः
     कथामृतं ते मुखपद्मजातम् ॥ १ ॥
अन्तर्हितायां च तदा भवान्या
     चक्रुश्च किं देवपुरोगमास्ते ।
देव्याश्चरित्र परमं पवित्रं
     दुरापमेवाल्पपुण्यैर्नराणाम् ॥ २ ॥
कस्तृप्तिमाप्नोति कथामृतेन
     भिन्नोऽल्पभाग्यात्पटुकर्णरन्ध्रः ।
पीतेन येनामरतां प्रयाति
     धिक्तान्नरान् ये न पिबन्ति सादरम् ॥ ३ ॥
लीलाचरित्रं जगदम्बिकाया
     रक्षान्वितं देवमहामुनीनाम् ।
संसारवार्धेस्तरणं नराणां
     कथं कृतज्ञा हि परित्यजेयुः ॥ ४ ॥
मुक्ताश्च ये चैव मुमुक्षवश्च
     संसारिणो रोगयुताश्च केचित् ।
तेषां सदा श्रोत्रपुटैश्च पेयं
     सर्वार्थदं वेदविदो वदन्ति ॥ ५ ॥
तथा विशेषेण मुने नृपाणां
     धर्मार्थकामेषु सदा रतानाम् ।
मुक्ताश्च यस्मात्खलु तत्पिबन्ति
     कथं न पेयं रहितैश्च तेभ्यः ॥ ६ ॥
यैः पूजिता पूर्वभवे भवानी
     सत्कुन्दपुष्पैरथ चम्पकैश्च ।
बैल्वैर्दलैस्ते भुवि भोगयुक्ता
     नृपा भवन्तीत्यनुमेयमेवम् ॥ ७ ॥
ये भक्तिहीना समवाप्य देहं
     तं मानुषं भारतभूमिभागे ।
यैर्नार्चिता ते धनधान्यहीना
     रोगान्विताः सन्ततिवर्जिताश्च ॥ ८ ॥
भ्रमन्ति नित्यं किल दासभूता
     आज्ञाकराः केवलभारवाहाः ।
दिवानिशं स्वार्थपराः कदापि
     नैवाप्नुवन्त्यौदरपूर्तिमात्रम् ॥ ९ ॥
अन्धाश्च मूका बधिराश्च खञ्जाः
     कुष्ठान्विता ये भुवि दुःखभाजः ।
तत्रानुमानं कविभिर्विधेयं
     नाराधिता तैः सततं भवानी ॥ १० ॥
ये राजभोगान्वितऋद्धिपूर्णाः
     संसेव्यमाना बहुभिर्मनुष्यैः ।
दृश्यन्ति ये वा विभवैः समेता-
     स्तैः पूजिताम्बेत्यनुमेयमेव ॥ ११ ॥
तस्मात्सत्यवतीसूनो देव्याश्चरितमुत्तमम् ।
कथयस्व कृपां कृत्वा दयावानसि साम्प्रतम् ॥ १२ ॥
हत्वा तं महिषं पापं स्तुता सम्पूजिता सुरैः ।
क्व गता सा महालक्ष्मीः सर्वतेजःसमुद्‌भवा ॥ १३ ॥
कथितं ते महाभाग गतान्तर्धानमाशु सा ।
स्वर्गे वा मृत्युलोके वा संस्थिता भुवनेश्वरी ॥ १४ ॥
लयं गता वा तत्रैव वैकुण्ठे वा समाश्रिता ।
अथवा हेमशैले सा तत्त्वतो मे वदाधुना ॥ १५ ॥
व्यास उवाच
पूर्वं मया ते कथितं मणिद्वीपं मनोहरम् ।
क्रीडास्थानं सदा देव्या वल्लभं परमं स्मृतम् ॥ १६ ॥
यत्र ब्रह्मा हरिः स्थाणुः स्त्रीभावं ते प्रपेदिरे ।
पुरुषत्वं पुनः प्राप्य स्वानि कार्याणि चक्रिरे ॥ १७ ॥
यः सुधासिन्धुमध्येऽस्ति द्वीपः परमशोभनः ।
नानारूपैः सदा तत्र विहारं कुरुतेऽम्बिका ॥ १८ ॥
स्तुता सम्पूजिता देवैः सा तत्रैव गता शिवा ।
यत्र संक्रीडते नित्यं मायाशक्तिः सनातनी ॥ १९ ॥
देवास्तां निर्गतां वीक्ष्य देवीं सर्वेश्वरीं तथा ।
रविवंशोद्‌भवं चक्रुर्भूमिपालं महाबलम् ॥ २० ॥
अयोध्याधिपतिं वीरं शत्रुघ्नं नाम पार्थिवम् ।
सर्वलक्षणसम्पन्नं महिषस्यासने शुभे ॥ २१ ॥
दत्त्वा राज्यं तदा तस्मै देवा इन्द्रपुरोगमाः ।
स्वकीयैर्वाहनैः सर्वे जग्मुः स्वान्यालयानि ते ॥ २२ ॥
गतेषु तेषु देवेषु पृथिव्यां पृथिवीपते ।
धर्मराज्यं बभूवाथ प्रजाश्च सुखितास्तथा ॥ २३ ॥
पर्जन्यः कालवर्षी च धरा धान्यगुणावृता ।
पादपाः फलपुष्पाढ्या बभूवुः सुखदाः सदा ॥ २४ ॥
गावश्च क्षीरसम्पना घटोध्न्यः कामदा नृणाम् ।
नद्यः सुमार्गगाः स्वच्छाः शीतोदाः खगसंयुताः ॥ २५ ॥
ब्राह्मणा वेदतत्त्वाश्च यज्ञकर्मरतास्तथा ।
क्षत्रिया धर्मसंयुक्ता दानाध्ययनतत्पराः ॥ २६ ॥
शस्त्रविद्यारता नित्यं प्रजारक्षणतत्पराः ।
न्यायदण्डधराः सर्वे राजानः शमसंयुताः ॥ २७ ॥
अविरोधस्तु भूतानां सर्वेषां सम्बभूव ह ।
आकरा धनदा नृणां व्रजा गोयूथसंयुताः ॥ २८ ॥
ब्राह्मणाः क्षत्रिया वैश्याः शूद्राश्च नृपसत्तम ।
देवीभक्तिपराः सर्वे सम्बभूवुर्धरातले ॥ २९ ॥
सर्वत्र यज्ञयूपाश्च मण्डपाश्च मनोहराः ।
मखैः पूर्णा धराश्चासन् ब्राह्मणैः क्षत्रियैः कृतैः ॥ ३० ॥
पतिव्रतधरा नार्यः सुशीलाः सत्यसंयुताः ।
पितृभक्तिपराः पुत्रा आसन्धर्मपरायणाः ॥ ३१ ॥
न पाखण्डं न वाधर्मः कुत्रापि पृथिवीतले ।
वेदवादा शास्त्रवादा नान्ये वादास्तथाभवन् ॥ ३२ ॥
कलहो नैव केषाञ्चिन्न दैन्यं नाशुभा मतिः ।
सर्वत्र सुखिनो लोकाः काले च मरणं तथा ॥ ३३ ॥
सुहृदां न वियोगश्च नापदश्च कदाचन ।
नानावृष्टिर्न दुर्भिक्षं न मारी दुःखदा नृणाम् ॥ ३४ ॥
न रोगो न च मात्सर्यं न विरोधः परस्परम् ।
सर्वत्र सुखसम्पन्ना नरा नार्यः सुखान्विताः ॥ ३५ ॥
क्रीडन्ति मानवाः सर्वे स्वर्गे देवगणा इव ।
न चौरा न च पाखण्डा वञ्चका दम्भकास्तथा ॥ ३६ ॥
पिशुना लम्पटाः स्तब्धा न बभूवुस्तदा नृप ।
न वेदद्वेषिणः पापा मानवाः पृथिवीपते ॥ ३७ ॥
सर्वधर्मरता नित्यं द्विजसेवापरायणाः ।
त्रिधात्वात्सृष्टिधर्मस्य त्रिविधा ब्राह्मणास्ततः ॥ ३८ ॥
सात्त्विका राजसाश्चैव तामसाश्च तथापरे ।
सर्वे वेदविदो दक्षाः सात्त्विकाः सत्त्ववृत्तयः ॥ ३९ ॥
प्रतिग्रहविहीनाश्च दयादमपरायणाः ।
यज्ञास्ते सात्त्विकैरन्नैः कुर्वाणा धर्मतत्पराः ॥ ४० ॥
पुरोडाशविधानैश्च पशुभिर्न कदाचन ।
दानमध्ययनञ्चैव यजनं तु तृतीयकम् ॥ ४१ ॥
त्रिकर्मरसिकास्ते वै सात्त्विका ब्राह्मणा नृप ।
राजसा वेदविद्वांसः क्षत्रियाणां पुरोहिताः ॥ ४२ ॥
षट्कर्मनिरता सर्वे विधिवन्मांसभक्षकाः ।
यजनं याजनं दानं तथैव च प्रतिग्रहः ॥ ४३ ॥
अध्ययनं तु वेदानां तथैवाध्यापनं तु षट् ।
तामसाः क्रोधसंयुक्ता रागद्वेषपराः पुनः ॥ ४४ ॥
राज्ञां कर्मकरा नित्यं किञ्चिदध्ययने रताः ।
महिषे निहते सर्वे सुखिनो वेदतत्पराः ॥ ४५ ॥
बभूवुर्व्रतनिष्णाता दानधर्मपरास्तथा ।
क्षत्रियाः पालने युक्ता वैश्या वणिजवृत्तयः ॥ ४६ ॥
कृषिवाणिज्यगोरक्षाकुसीदवृत्तयः परे ।
एवं प्रमुदितो लोको महिषे विनिपातिते ॥ ४७ ॥
अनुद्वेगः प्रजानां वै सम्बभूव धनागमः ।
बहुक्षीरा शुभा गावो नद्यश्चैव बहूदकाः ॥ ४८ ॥
वृक्षा बहुफलाश्चासन्मानवा रोगवर्जिताः ।
नाधयो नेतयः क्वापि प्रजानां दुःखदायकाः ॥ ४९ ॥
न निधनमुपयान्ति प्राणिनस्तेऽप्यकाले
     सकलविभवयुक्ता रोगहीनाः सदैव ।
निगमविहितधर्मे तत्पराश्चण्डिकाया-
     श्चरणसरसिजानां सेवने दत्तचित्ताः ॥ ५० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाह्स्र्यां
संहितायां पञ्चमस्कन्धे महिषवधानन्तरं
पृथिवीसुखवर्णनं नाम विशोऽध्यायः ॥ २० ॥


जगाच्या कल्याणाचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

जनमेजय म्हणाला, "हे मुनिश्रेष्ठ, देवीचा प्रभाव व जगात शांती उत्पन्न करणारा देवीचा वर ही ऐकून आपण कथन करीत असलेले भगवती पुराण ऐकण्याची इच्छा अधिकच वाढली. भवानी गुप्त झाल्यावर देवांनी काय केले ? पुण्याच्या साठ्याशिवाय देवीचे चरित्र मानवांना ऐकण्यास मिळणार नाही. खरोखरच हे कथानक श्रवण केले तरी अमरत्व प्राप्त होईल. जे हे सादर ऐकत नाहीत त्यांचा धिक्कार असो. देव व मुनी यांच्या रक्षणासाठी अवतरलेली व मानवांना तारणारी जगदंबिका हिचे चरित्र कृतज्ञतापूर्वक ऐकावेसे वाटते.

जे या संसारसागरात अनेक मार्गाने पीडित असतील त्यांनी हे अंबिकाचरित्र श्रवण करावे. त्याचप्रमाणे राजांनी हे ऐकावे. ज्यांनी पूर्वजन्मी उत्कुष्ट कुंद-चंपकपुष्पे आणि बिल्वदले ह्यांच्या योगाने भवानीचे पूजन केले असेल तेच पुढील जन्मी राज्यपद भोगतात हेच खरे.

मानव देह प्राप्त होऊनही ज्यांनी भगवतीचे पूजन केले नाही त्यांना दारिद्र्य, रोग ह्या पीडा होत असतात. ते दुसर्‍याचे गुलाम होतात. उदरभरणाइतकेही त्यांना मिळत नाही. भगवतीचे स्मरण व आराधना जे करीत नाहीत ते अंध, मूक, बहिरे, लंगडे, कुष्ठी व दुःखी होतात.

ज्यांनी अंबिकेचे पूजन केले ते राजभोग, समृद्धी यांनी युक्त असतात हे निश्चित. म्हणून हे व्यासमुने, आपण दयाळू आहात तेव्हा मजवर कृपा करून आपण देवीचे पुढील उत्कृष्ट चरित्र कथन करा.

महिषासुराचा वध झाल्यावर देवांनी पूजिलेली ती महालक्ष्मी कुठे गेली ? अंतर्धान पावल्यावर ती भुवनेश्वरी स्वर्गलोकी राहिली की मृत्युलोकी ? वा तेथेच लय पावली अथवा हिमालय-वैकुंठ येथे गेली."

व्यास म्हणतात, "मणिद्वीप मनोहर असे स्थान आहे. तेच देवीला अत्यंत प्रिय आहे. त्याचठिकाणी ब्रह्मा, विष्णु, महेश्वर यांना स्त्रीत्व प्राप्त झाले व पुनरपी पुरुषत्व मिळाले. असे ते द्वीप सुधासागर आहे. त्या ठिकाणी अंबिका अनेक रूपे धारण करून क्रीडा करीत असते. तेथेच ती मायाशक्ती राहिली.

ती सर्वेश्वरी गुप्त झाल्यावर देवांनी सूर्यवंशातील पराक्रमी राजाला पृथ्वीपती केले. ती शत्रुहन नावाचा राजा सर्वगुणसंपन्न होता. त्याला महिषाच्या राज्यावर बसविले. नंतर सर्व देव आपल्या स्थानी परत गेले.

त्यानंतर पृथ्वीवर धर्मराज्य सुरू झाले. प्रजा सुखी झाली. वेळेवर पाऊस होऊन धनधान्याची समृद्धी झाली. वृक्षलता बहरल्यामुळे सुखदायक वाटू लागल्या. गाई विपुल दूध देऊ लागल्या. शीत जलाच्या नद्या सरळ मार्गाने वाहू लागल्या.

ब्राह्मण वेदरहस्य जाणून यज्ञकर्माचे पालन करू लागले. क्षत्रिय आपल्या नीतीने वागू लागले. राजे दानधर्म करून न्यायाने वागू लागले व प्रजाहितदक्ष झाले. सर्व प्राणीही मिळून मिसळून राहिले. गाईचे गोठे खिल्लारांनी व्याप्त झाले.

हे जनमेजय राजा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे सर्वही भूतलावर देवीविषयी तत्पर राहू लागले. भूप्रदेश यज्ञभूमींनी युक्त झाले. स्त्रिया सत्यनिष्ठ, सुशील, पतिव्रता झाल्या. पुत्र धर्मनिष्ठ व माता- पितरांची आज्ञा पाळू लागले. भूमीवर पाखंडी व अधार्मिक मिळेनात. वेद व शास्त्रे यांचीच चर्चा सर्वत्र होऊ लागली. दैन्य व कुविचार यांचा अभाव झाला. सर्वत्र प्रजा सुखी झाली. यथाकाळी मरण प्राप्त होऊ लागले. सुहृदांचा वियोग होईनासा झाला. अनावृष्टी, दुर्भिक्ष्म व महामारी यांचा अभाव झाला. रोग, परस्परविरोध, मत्सरभाव यांचा नायनाट झाला. स्त्रीपुरुष परस्पर सुखाने राहू लागले. स्वर्गात क्रीडा करणार्‍या देवांप्रमाणे मानवही भूतलावर क्रीडा करू लागले.

हे राजा, पृथ्वीवर चोर पाखंडी वंचक, दांभिक, चहाडखोर विषयलंपट व गर्विष्ठ लोक मुळीच दिसेनासे झाले. वेदांचा द्वेष करणारे पापी निपजतात. सर्वजण धार्मिक व देवसेवातत्पर झाले.

हे राजा, सात्त्विक, राजस, तामस तिन्ही प्रकारचे लोक वेदवेत्ते व कर्मदक्ष झाले. सात्त्विक ब्राह्मण दयाशील व इंद्रयदमन करणारे होते. ते धर्मतत्पर व सात्त्विक अन्न घेऊन यज्ञ करीत. कधीही पशूयज्ञ करीत नसत. दान, अध्ययन, यजन या तिन्ही कर्माविषयी ते दक्ष राहू लागले. राजस ब्राह्मणही वेदसंपन्न, षट्कर्मनिष्ठ व क्षत्रियांचे पुरोहित होऊन यज्ञामध्ये यथाविधी मांसभक्षण करीत, यजन, दान, परिग्रह, वेदाध्ययन, वेदाध्यापन ही सहा कर्मे वेळेवर करीत.

क्षत्रिय तत्परतेने प्रजेचे पालन करीत होते. वैश्य वाणिज्यवृत्तीने निर्वाह करीत असत. ते गोरक्षण व कृषी ही कार्ये करीत. काही व्याजबट्टा करीत. अशाप्रमारे महिषासुराचा वध झाल्यावर सर्व पृथ्वीवर आनंदीआनंद व समृद्धी, सुख नांदू लागले.

प्रजेतील भय नाहीसे झाले. धनप्राप्ती होऊ लागली. गाईंची पैदास विपुल दूध देणारी होऊ लागली. नद्या विपुल उदकांनी युक्त झाल्या. वृक्षांना पुष्कळ फळे येऊ लागली. मानव रोगरहित झाले. मानसिक दु:खे संपली. संकटे नाहीशी झाली. व्यास म्हणतात, "भगवतीच्या कृपाप्रसादाने घडलेल्या जगाचे विस्ताराने वर्णन केले. ते आता संक्षेपाने एका श्लोकात सांगतो.

न निधनमुपयांति प्राणिनस्तेऽप्यकाले
सकलविभवयुक्ता रोगहीना: सदैव ।
निगमविहित धर्मे तत्पराश्चण्डिकाया-
श्चरण सरसिजाना सेवने दक्षचित्ता ॥ १ ॥

प्राणी अकाली मरेनासे झाले. सर्वजण वैभव संपन्न होऊन सर्वदा निरोगी राहू लागले. वेदविहित धर्माविषयी सर्वही तत्पर राहू लागले आणि चंडिकेच्या चरणकमलाच्या ठिकाणी सर्वही दक्षतेने आपले मन लावू लागले."अध्याय विसावा समाप्त

GO TOP