श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
अष्टमोऽध्यायः


नारायणनारदसंवादे कलिमाहात्म्यवर्णनम्

श्रीनारायण उवाच
सरस्वती पुण्यक्षेत्रमाजगाम च भारते ।
गङ्‌गाशापेन कलया स्वयं तस्थौ हरेः पदे ॥ १ ॥
भारती भारतं गत्वा ब्राह्मी च ब्रह्मणः प्रिया ।
वाण्यधिष्ठातृदेवी सा तेन वाणी प्रकीर्तिता ॥ २ ॥
सरो वाप्यां च स्रोतस्तु सर्वत्रैव हि दृश्यते ।
हरिः सरस्वांस्तस्येयं तेन नाम्ना सरस्वती ॥ ३ ॥
सरस्वती नदी सा च तीर्थरूपातिपावनी ।
पापिनां पापदाहाय ज्वलदग्निस्वरूपिणी ॥ ४ ॥
पश्चाद्‍भागीरथी नीता महीं भगीरथेन च ।
सा वै जगाम कलया वाणीशापेन नारद ॥ ५ ॥
तत्रैव समये तां च दधार शिरसा शिवः ।
वेगं सोढुमयं शक्तो भुवः प्रार्थनया विभुः ॥ ६ ॥
पद्मा जगाम कलया सा च पद्मावती नदी ।
भारतं भारतीशापात्स्वयं तस्थौ हरेः पदे ॥ ७ ॥
ततोऽन्यया सा कलया लेभे जन्म च भारते ।
धर्मध्वजसुता लक्ष्मीर्विख्याता तुलसीति च ॥ ८ ॥
पुरा सरस्वतीशापात्पश्चाच्च हरिशापतः ।
बभूव वृक्षरूपा सा कलया विश्वपावनी ॥ ९ ॥
कलेः पञ्चसहस्रं च वर्षं स्थित्वा तु भारते ।
जग्मुस्ताश्च सरिद्‌रूपं विहाय श्रीहरेः पदम् ॥ १० ॥
यानि सर्वाणि तीर्थानि काशीं वृन्दावनं विना ।
यास्यन्ति सार्धं ताभिश्च वैकुण्ठमाज्ञया हरेः ॥ ११ ॥
शालग्रामः शक्तिशिवौ जगन्नाथश्च भारतम् ।
कलेर्दशसहस्रान्ते त्यक्त्वा यान्ति निजं पदम् ॥ १२ ॥
साधवश्च पुराणानि शङ्‌खानि श्राद्धतर्पणे ।
वेदोक्तानि च कर्माणि ययुस्तैः सार्धमेव च ॥ १३ ॥
देवपूजा देवनाम तत्कीर्तिगुणकीर्तनम् ।
वेदाङ्‌गानि च शास्त्राणि ययुस्तैः सार्धमेव च ॥ १४ ॥
सन्तश्च सत्यधर्मश्च वेदाश्च ग्रामदेवताः ।
व्रतं तपश्चानशनं ययुस्तैः सार्धमेव च ॥ १५ ॥
वामाचाररताः सर्वे मिथ्याकपटसंयुताः ।
तुलसीरहिता पूजा भविष्यति ततः परम् ॥ १६ ॥
शठाः क्रूरा दाम्भिकाश्च महाहङ्‌कारसंयुताः ।
चोराश्च हिंसकाः सर्वे भविष्यन्ति ततः परम् ॥ १७ ॥
पुंसो भेदः स्त्रीविभेदो विवाहो वापि निर्भयः ।
स्वस्वामिभेदो वस्तूनां भविष्यति ततः परम् ॥ १८ ॥
सर्वे स्त्रीवशगाः पुंसः पुश्चल्यश्च गृहे गृहे ।
तर्जनैर्भर्त्सनैः शश्वत्स्वामिनं ताडयन्ति च ॥ १९ ॥
गृहेश्वरी च गृहिणी गृही भृत्याधिकोऽधमः ।
चेटीदाससमौ वध्वाः श्वश्रूश्च श्वशुरस्तथा ॥ २० ॥
कर्तारो बलिनो गेहे योनिसम्बन्धिबान्धवाः ।
विद्यासम्बन्धिभिः सार्धं सम्भाषापि न विद्यते ॥ २१ ॥
यथापरिचिता लोकास्तथा पुंसश्च बान्धवाः ।
सर्वकर्माक्षमाः पुंसो योषितामाज्ञया विना ॥ २२ ॥
ब्रह्मक्षत्रविशः शूद्रा जात्याचारविवर्जिताः ।
सन्ध्या च यज्ञसूत्रं च भवेल्लुप्तं न संशयः ॥ २३ ॥
म्लेच्छाचारा भविष्यन्ति वर्णाश्चत्वार एव च ।
म्लेच्छशास्त्रं पठिष्यन्ति स्वशास्त्राणि विहाय च ॥ २४ ॥
ब्रह्मक्षत्रविशां वंशाः शूद्राणां सेवकाः कलौ ।
सूपकारा धावकाश्च वृषवाहाश्च सर्वशः ॥ २५ ॥
सत्यहीना जनाः सर्वे सस्यहीना च मेदिनी ।
फलहीनाश्च तरवोऽपत्यहीनाश्च योषितः ॥ २६ ॥
क्षीरहीनास्तथा गावः क्षीरं सर्पिर्विवर्जितम् ।
दम्पती प्रीतिहीनौ च गृहिणः सत्यवर्जिताः ॥ २७ ॥
प्रतापहीना भूपाश्च प्रजाश्च करपीडिताः ।
जलहीना महानद्यो दीर्घिकाकन्दरादयः ॥ २८ ॥
धर्महीना पुण्यहीना वर्णाश्चत्वार एव च ।
लक्षेषु पुण्यवान्कोऽपि न तिष्ठति ततः परम् ॥ २९ ॥
कुत्सिता विकृताकारा नरा नार्यश्च बालकाः ।
कुवार्ता कुत्सितः शब्दो भविष्यति ततः परम् ॥ ३० ॥
केचिद्‌ग्रामाश्च नगरा नरशून्या भयानकाः ।
केचित्स्वल्पकुटीरेण नरेण च समन्विताः ॥ ३१ ॥
अरण्यानि भविष्यन्ति ग्रामेषु नगरेषु च ।
अरण्यवासिनः सर्वे जनाश्च करपीडिताः ॥ ३२ ॥
सस्यानि च भविष्यन्ति तडागेषु नदीषु च ।
प्रकृष्टवंशजा हीना भविष्यन्ति कलौ युगे ॥ ३३ ॥
अलीकवादिनो धूर्ताः शठाश्चासत्यवादिनः ।
प्रकृष्टानि च क्षेत्राणि सस्यहीनानि नारद ॥ ३४ ॥
हीनाः प्रकृष्टा धनिनो देवभक्ताश्च नास्तिकाः ।
हिंसकाश्च दयाहीना पौराश्च नरघातिनः ॥ ३५ ॥
वामना व्याधियुक्ताश्च नरा नार्यश्च सर्वतः ।
स्वल्पायुषो गदायुक्ता यौवनै रहिताः कलौ ॥ ३६ ॥
पलिताः षोडशे वर्षे महावृद्धाश्च विंशतौ ।
अष्टवर्षा च युवती रजोयुक्ता च गर्भिणी ॥ ३७ ॥
वत्सरान्तप्रसूता स्त्री षोडशे च जरान्विता ।
पतिपुत्रवती काचित्सर्वा वन्ध्याः कलौ युगे ॥ ३८ ॥
कन्याविक्रयिणः सर्वे वर्णाश्चत्वार एव च ।
मातृजायावधूनां च जारोपेतान्नभक्षकाः ॥ ३९ ॥
कन्यानां भगिनीनां वा जारोपात्तानजीविनः ।
हरेर्नाम्नां विक्रयिणो भविष्यन्ति कलौ युगे ॥ ४० ॥
स्वयमुत्सृज्य दानं च कीर्तिवर्धनहेतवे ।
ततः पश्चात्स्वदानं च स्वयमुल्लङ्‌घयिष्यति ॥ ४१ ॥
देववृत्तिं ब्रह्मवत्तिं वृत्तिं गुरुकुलस्य च ।
स्वदत्तां परदत्तां वा सर्वमुल्लङ्‌घयिष्यति ॥ ४२ ॥
कन्यकागामिनः केचित्केचिच्च श्वश्रुगामिनः ।
केचिद्वधूगामिनश्च केचिद्वै सर्वगामिनः ॥ ४३ ॥
भगिनीगामिनः केचित्सपत्‍नीमातृगामिनः ।
भ्रातृजायागामिनश्च भविष्यन्ति कलौ युगे ॥ ४४ ॥
अगम्यागमनं चैव करिष्यन्ति गृहे गृहे ।
मातृयोनिं परित्यज्य विहरिष्यन्ति सर्वतः ॥ ४५ ॥
पत्‍नीनां निर्णयो नास्ति भर्तॄणां च कलौ युगे ।
प्रजानां चैव ग्रामाणां वस्तुनां च विशेषतः ॥ ४६ ॥
अलीकवादिनः सर्वे सर्वे चौराश्च लम्पटाः ।
परस्परं हिंसकाश्च सर्वे च नरघातिनः ॥ ४७ ॥
ब्रह्मक्षत्रविशां वंशा भविष्यन्ति च पापिनः ।
लाक्षा लोहरसानां च व्यापारं लवणस्य च ॥ ४८ ॥
वृषवाहा विप्रवंशाः शूद्राणां शवदाहिनः ।
शूद्रान्नभोजिनः सर्वे सर्वे च वृषलीरताः ॥ ४९ ॥
पञ्चयज्ञविहीनाश्च कुहूरात्रौ च भोजिनः ।
यज्ञसूत्रविहीनाश्च संध्याशौचविहीनकाः ॥ ५० ॥
पुंश्चली वार्धुषाजीवा कुट्टनी च रजस्वला ।
विप्राणां रन्धनागारे भविष्यति च पाचिका ॥ ५१ ॥
अन्नानां नियमो नास्ति योनीनां च विशेषतः ।
आश्रमाणां जनानां च सर्वे म्लेच्छाः कलौ युगे ॥ ५२ ॥
एवं कलौ सम्प्रवृत्ते सर्वं म्लेच्छमयं भवेत् ।
हस्तप्रमाणे वृक्षे च अङ्‌गुष्ठे चैव मानवे ॥ ५३ ॥
विप्रस्य विष्णुयशसः पुत्रः कल्किर्भविष्यति ।
नारायणकलांशश्च भगवान् बलिनां वरः ॥ ५४ ॥
दीर्घेण करवालेन दीर्घघोटकवाहनः ।
म्लेच्छशून्यां च पृथिवीं त्रिरात्रेण करिष्यति ॥ ५५ ॥
निर्म्लेच्छां वसुधां कृत्वा चान्तर्धानं करिष्यति ।
अराजका च वसुधा दस्युग्रस्ता भविष्यति ॥ ५६ ॥
स्थूलाप्रमाणा षड्‌रात्रं वर्षधाराऽऽप्लुता मही ।
लोकशून्या वृक्षशून्या गृहशून्या भविष्यति ॥ ५७ ॥
ततश्च द्वादशादित्याः करिष्यन्त्युदयं मुने ।
प्राप्नोति शुष्कतां पृथ्वी समा तेषां च तेजसा ॥ ५८ ॥
कलौ गते च दुर्धर्षे प्रवृत्ते च कृते युगे ।
तपःसत्त्वसमायुक्तो धर्मः पूर्णो भविष्यति ॥ ५९ ॥
तपस्विनश्च धर्मिष्ठा वेदज्ञा ब्राह्मणा भुवि ।
पतिव्रताश्च धर्मिष्ठा योषितश्च गृहे गृहे ॥ ६० ॥
राजानः क्षत्रियाः सर्वे विप्रभक्ता मनस्विनः ।
प्रतापवन्तो धर्मिष्ठाः पुण्यकर्मरताः सदा ॥ ६१ ॥
वैश्या वाणिज्यनिरता विप्रभक्ताश्च धार्मिकाः ।
शूद्राश्च पुण्यशीलाश्च धर्मिष्ठा विप्रसेविनः ॥ ६२ ॥
विप्रक्षत्रविशां वंशा देवीभक्तिपरायणाः ।
देवीमन्त्ररताः सर्वे देवीध्यानपरायणाः ॥ ६३ ॥
श्रुतिस्मृतिपुराणज्ञाः पुमांस ऋतुगामिनः ।
लेशो नास्ति ह्यधर्मस्य पूर्णो धर्मः कृते युगे ॥ ६४ ॥
धर्मस्त्रिपाच्च त्रेतायां द्विपाच्च द्वापरे ततः ।
कलौ वृत्ते चैकपाच्च सर्वलुप्तिस्ततः परम् ॥ ६५ ॥
वाराः सप्त तथा विप्र तिथयः षोडश स्मृताः ।
तथा द्वादश मासाश्च ऋतवश्च षडेव च ॥ ६६ ॥
द्वौ पक्षौ चायने द्वे च चतुर्भिः प्रहरैर्दिनम् ।
चतुर्भिः प्रहरै रात्रिर्मासस्त्रिंशद्दिनैस्तथा ॥ ६७ ॥
वर्षं पञ्चविधं ज्ञेयं कालसंख्याविधिक्रमे ।
यथा चायान्ति यान्त्येव यथा युगचतुष्टयम् ॥ ६८ ॥
वर्षे पूर्णे नराणां च देवानां च दिवानिशम् ।
शतत्रये षष्ठ्यधिके नराणां च युगे गते ॥ ६९ ॥
देवानां च युगं ज्ञेयं कालसंख्याविदां मतम् ।
मन्वन्तरं तु दिव्यानां युगानामेकसप्ततिः ॥ ७० ॥
मन्वन्तरसमं ज्ञेयमायुष्यञ्च शचीपतेः ।
अष्टाविंशतिमे चेन्द्रे गते ब्रह्मदिवानिशम् ॥ ७१ ॥
अष्टोत्तरशते वर्षे गते पातश्च ब्रह्मणः ।
प्रलयः प्राकृतो ज्ञेयस्तत्रादृष्टा वसुन्धरा ॥ ७२ ॥
जलप्लुतानि विश्वानि ब्रह्मविष्णुशिवादयः ।
ऋषयो ज्ञानिनः सर्वे लीनाः सत्ये चिदात्मनि ॥ ७३ ॥
तत्रैव प्रकृतिर्लीना तत्र प्राकृतिको लयः ।
लये प्राकृतिके जाते पाते च ब्रह्मणो मुने ॥ ७४ ॥
निमेषमात्रं कालश्च श्रीदेव्याः प्रोच्यते मुने ।
एवं नश्यन्ति सर्वाणि ब्रह्माण्डान्यखिलानि च ॥ ७५ ॥
निमेषान्तरकालेन पुनः सृष्टिक्रमेण च ।
एवं कतिविधा सृष्टिर्लयः कतिविधोऽपि वा ॥ ७६ ॥
कति कल्पा गतायाताः संख्यां जानाति कः पुमान् ।
सृष्टीनां च लयानां च ब्रह्माण्डानां च नारद ॥ ७७ ॥
ब्रह्मादीनां च ब्रह्माण्डे संख्यां जानाति कः पुमान् ।
ब्रह्माण्डानां च सर्वेषामीश्वरश्चैक एव सः ॥ ७८ ॥
सर्वेषां परमात्मा च सच्चिदानन्दरूपधृक् ।
ब्रह्मादयश्च तस्यांशास्तस्यांशश्च महाविराट् ॥ ७९ ॥
तस्यांशश्च विराट् क्षुद्रः सैवेयं प्रकृतिः परा ।
तस्याः सकाशात्सञ्जातोऽप्यर्धनारीश्वरस्ततः ॥ ८० ॥
सैव कृष्णो द्विधाभूतो द्विभुजश्च चतुर्भुजः ।
चतुर्भुजश्च वैकुण्ठे गोलोके द्विभुजः स्वयम् ॥ ८१ ॥
ब्रह्मादितृणपर्यन्तं सर्वं प्राकृतिकं भवेत् ।
यद्यत्प्राकृतिकं सृष्टं सर्वं नश्वरमेव च ॥ ८२ ॥
एवंविधं सृष्टिहेतुं सत्यं नित्यं सनातनम् ।
स्वेच्छामयं परं ब्रह्म निर्गुणं प्रकृतेः परम् ॥ ८३ ॥
निरुपाधि निराकारं भक्तानुग्रहकातरम् ।
करोति ब्रह्मा ब्रह्माण्डं यज्ज्ञानात्कमलोद्‍भवः ॥ ८४ ॥
शिवो मृत्युज्जयश्चैव संहर्ता सर्वसत्त्ववित् ।
यज्ज्ञानाद्यस्य तपसा सर्वेशस्तु तपो महान्॥ ८५ ॥
महाविभूतियुक्तश्च सर्वज्ञः सर्वदर्शनः ।
सर्वव्यापी सर्वपाता प्रदाता सर्वसम्पदाम् ॥ ८६ ॥
विष्णुः सर्वेश्वरः श्रीमान् यद्‍भक्त्या यस्य सेवया ।
महामाया च प्रकृतिः सर्वशक्तिमयीश्वरी ॥ ८७ ॥
सैव प्रोक्ता भगवती सच्चिदानन्दरूपिणी ।
यज्ज्ञानाद्यस्य तपसा यद्‍भक्त्या यस्य सेवया ॥ ८८ ॥
सावित्री देवमाता च वेदाधिष्ठातृदेवता ।
पूज्या द्विजानां वेदज्ञा यज्ज्ञानाद्यस्य सेवया ॥ ८९ ॥
सर्वविद्याधिदेवी सा पूज्या च विदुषां परा ।
यत्सेवया यत्तपसा सर्वविश्वेषु पूजिता ॥ ९० ॥
सर्वग्रामाधिदेवी सा सर्वसम्पत्प्रदायिनी ।
सर्वेश्वरी सर्ववन्द्या सर्वेषां पुत्रदायिनी ॥ ९१ ॥
सर्वस्तुता च सर्वज्ञा सर्वदुर्गार्तिनाशिनी ।
कृष्णवामांशसम्भूता कृष्णप्राणाधिदेवता ॥ ९२ ॥
कृष्णप्राणाधिका प्रेम्णा राधिका शक्तिसेवया ।
सर्वाधिकं च रूपं च सौभाग्यं मानगौरवे ॥ ९३ ॥
कृष्णवक्षःस्थलस्थानं पत्‍नीत्वे प्राप सेवया ।
तपश्चकार सा पूर्वं शतशृङ्‌गे च पर्वते ॥ ९४ ॥
दिव्यवर्षसहस्रं च पतिं प्राप्त्यर्थमेव च ।
जाते शक्तिप्रसादे तु दृष्ट्वा चन्द्रकलोपमाम् ॥ ९५ ॥
कृष्णो वक्षःस्थले कृत्वा रुरोद कृपया विभुः ।
वरं तस्यै ददौ सारं सर्वेषामपि दुर्लभम् ॥ ९६ ॥
मम वक्षःस्थले तिष्ठ मम भक्ता च शाश्वती ।
सौभाग्येन च मानेन प्रेम्णाथो गौरवेण च ॥ ९७ ॥
त्वं मे श्रेष्ठा च ज्येष्ठा च प्रेयसी सर्वयोषिताम् ।
वरिष्ठा च गरिष्ठा च संस्तुता पूजिता मया ॥ ९८ ॥
सततं तव साध्योऽहं वश्यश्च प्राणवल्लभे ।
इत्युक्त्वा च जगन्नाथश्चकार ललनां ततः ॥ ९९ ॥
सपत्‍नीरहितां तां च चकार प्राणवल्लभाम् ।
अन्या या याश्च ता देव्यः पूजिताः शक्तिसेवया ॥ १०० ॥
तपस्तु यादृशं यासां तादृक्तादृक्फलं मुने ।
दिव्यवर्षसहस्रं च तपस्तप्त्वा हिमाचले ॥ १०१ ॥
दुर्गा च तत्पदं ध्यात्वा सर्वपूज्या बभूव ह ।
सरस्वती तपस्तप्त्वा पर्वते गन्धमादने ॥ १०२ ॥
लक्षवर्षं च दिव्यं च सर्ववन्द्या बभूव सा ।
लक्ष्मीर्युगशतं दिव्यं तपस्तप्त्वा च पुष्करे ॥ १०३ ॥
सर्वसम्पत्प्रदात्री च जाता देवीनिषेवणात् ।
सावित्री मलये तप्त्वा पूज्या वन्द्या बभूव सा ॥ १०४ ॥
षष्टिवर्षसहस्रं च दिव्यं ध्यात्वा च तत्पदम् ।
शतमन्वन्तरं तप्तं शङ्‌करेण पुरा विभो ॥ १०५ ॥
शतमन्वन्तरं चेदं ब्रह्मा शक्तिं जजाप ह ।
शतमन्वन्तरं विष्णुस्तप्त्वा पाता बभूव ह ॥ १०६ ॥
दशमन्वन्तरं तप्त्वा श्रीकृष्णः परमं तपः ।
गोलोकं प्राप्तवान्दिव्यं मोदतेऽद्यापि यत्र हि ॥ १०७ ॥
दशमन्वन्तरं धर्मस्तप्त्वा वै भक्तिसंयुतः ।
सर्वप्राणः सर्वपूज्यः सर्वाधारो बभूव सः ॥ १०८ ॥
एवं देव्याश्च तपसा सर्वे देवाश्च पूजिताः ।
मुनयो मनवो भूपा ब्राह्मणाश्चैव पूजिताः ॥ १०९ ॥
एवं ते कथितं सर्वं पुराणं सयथागमम् ।
गुरुवक्त्राद्यथा ज्ञातं किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥ ११० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे नारायणनारदसंवादे
कलिमाहात्म्यवर्णनं नामाष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥


देवीचे दिव्य महात्म्य -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारायण म्हणाले, "गंगेच्या शापामुळे सरस्वती अंश रूपाने भारत वर्षातील पुण्यक्षेत्रात आली व पूर्णरूपाने ती वैकुंठातच राहिली. भारतवर्षात ती भारती होऊन ब्रह्मदेवाची ती ब्राह्मी झाली. ती वाणीची अधिष्ठात्री देवता असून ती वाणी या नावानेच ओळखली गेली.

सरोवरे, विहिरी, झरे इत्यादींमध्ये हरीचे अस्तित्व दृष्टोत्पत्तीस येतेच. म्हणून तो सारस्वत होय. त्याची ही शक्ती असल्याने त्या वाणीला सरस्वती असे म्हणतात. ती सरस्वती नदी अग्नीप्रमाणे दैदीप्यमान असून सर्व पातकांचा नाश करते.

भागीरथीला भगीरथाने भूलोकी नेले. तिला वाणीचा शाप झाल्याने ती अंशरूपाने भारतवर्षात गेली. पण तिचा वेग सहन न होऊन भूमीने भगवान शंकराची प्रार्थना केली. तेव्हा शंकराने तिला मस्तकावरील जटेत धारण केले. तसेच सरस्वतीचा शाप झाल्याने लक्ष्मीही अंशतः पद्मावती नदी होऊन भारतवर्षात आली व पूर्ण रूपाने ती वैकुंठातच राहिली. दुसर्‍या एका अंश रूपाने ती तुळशी नावाची धर्मध्वजाची सुप्रसिद्ध कन्या झाली. सरस्वती व श्रीहरी या दोघांच्याही शब्दाप्रमाणे ती विश्ववंद्य तुलसीरूपाने वृक्ष झाली.

कलीची पाच हजार वर्षे संपेपर्यंत ती भारतात राहील व नंतर नदीचे रूप टाकील आणि वैकुंठाप्रत जाईल.

या सर्वजणी एकाच वेळी आपली अवतार कार्ये संपवतील व वैकुंठात जाईल. या सर्वजणी एकाच वेळी आपली अवतार कार्ये संपवतील व वैकुंठात जातील. काशी, वृंदावन ह्या दोन तीर्थाशिवाय इतर सर्व तीर्थे त्या नद्यांबरोबर हरीच्या लोकी जातील. शालिग्राम, शक्ती, शिव आणि जगन्नाथ हे सर्वजण कलीची दहा हजार वर्षे संपल्यावरच स्वस्थानी जातील. साधु, पुराणे, शंख, श्राद्ध, तर्पणे, वेदोक्त कर्मे हीसुद्धा त्यांच्याबरोबरच जातील. देवपूजा, वेदांगे, शास्त्रे हे सर्व त्यांच्याबरोबर निजधामास जातील.

संत, सत्यदर्शन, वेद, ग्रामदेवता, व्रते, तप, उपोषणे हीसुद्धा त्यांच्याबरोबर प्रयाण करतील. नंतर सर्वजण मद्यमांसाप्रमाणे निषिद्ध असलेले अन्न सेवन करतील. असत्य व कपट यांनी जगत् भरून जाईल. तुलसीशिवाय लोक पूजा करू लागतील. नंतर शठ, क्रूर, दांभिक, दुराभिमानी, चोर, हिंसक अशा लोकांच्या वृत्ती होतील. सर्व जातीभेद नाहीसे होऊन पुरुष व स्त्री एवढाच भेद शिल्लक राहील.

कोणत्याही स्त्रीशी विवाह करणे हे कर्म निर्भयपणे घडेल. पित्याच्या वस्तूवर पित्याचाच अधिकार राहील. पुत्राची वस्तु पुत्राचीच राहील. पिता व पुत्र एकमेकांना आपले वित्त देणार नाहीत. पुरुष स्त्रीवश होतील. घरोघरी स्त्रिया व्यभिचारिणी बनतील. त्या निर्भत्सना व अपमान करून पतीला त्रस्त करतील. स्त्री हीच घराची प्रमुख होऊन पुरुष हा घरातल्या चाकराप्रमाणे राहील. सासू सुनेची बटिक होईल व सासरा दास होईल. स्त्रियांकडील नातेवाईक पुरुषांच्या घराचे कर्ते होतील.

विद्येमुळे ज्याचा संबंध जडेल त्याच्याशी भाषणे घडणार नाहीत. अपरिचित लोकांप्रमाणे पुरुषांचे आप्त दूरचे होतील. पुरुष स्त्रियांच्या आज्ञेवाचून कामे करण्यास अयोग्य ठरतील. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे जातीच्या आचरणास पारखे होतील. संध्या, यज्ञोपवीत हे सर्व लुप्त होऊन जाईल. चारी वर्णांचे लोक म्लेंच्छाप्रमाणे आचरण करतील. आपली शास्त्रे न अभ्यासता ते म्लेंच्छांची शास्त्रे अभ्यासतील. वरील सर्व वर्णांचे वंशज हे कलियुगात शुद्रांचे सेवक होतील. ते शूद्रांचे स्वयंपाकी, धोबी अथवा घरगडी याप्रमाणे होतील.

लोक सत्यापासून भ्रष्ट होतील. वृक्षांना फळे येणार नाहीत. स्त्रियांना अपत्ये होणार नाहीत. गाई दूध देणार नाहीत. दूध निकस होईल. दुधापासून तूप वगैरे निघणार नाही. पतिपत्नीत प्रेम रहाणार नाही. गृहस्थाश्रमी सत्यापासून वंचित होतील. राजे दुर्बल होतील. प्रजा करांनी पीडून जाईल. मोठमोठया नद्या, लहान ओढे यांतील पाणी आटेल. सर्व वर्णांचे लोक भ्रष्ट होऊन पापरत होतील. लाखामध्येही पुण्यवान आढळणे शक्य होणार नाही. पुरुष, स्त्रिया, बालक यांचे आकार ओबडधोबड होतील. वाईट वार्ता व निंद्य शब्द प्रचारात येतील.

काही गावे, नगरे मनुष्यरहित होऊन सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होईल. ग्राम, नगरे यातून अरण्ये वाढतील. कराने पीडल्यामुळे लोक अरण्यात राहू लागतील. नद्या व सरोवरातून धान्य उगवतील. कलियुगात उत्तम वंशात जन्मास आलेले लोक अधम होतील. ते वृथा भाषणे करतील. तसेच लबाड, शठ, खोटे भाषण करणारे अशा लोकांची समाजात वृद्धी होईल.

हे नारदा, सुपीक शेते धान्यरहित होतील. उत्तम दर्जाचे पुरुष दरिद्री होऊन नीच लोक धनसंपन्न होतील. देवभक्त नास्तिक होतील. तसेच हिंसक बनतील. ते निर्दय व मनुष्यघातकी होतील. कलियुगात पुरुष व स्त्रिया ठेंगू होतील. ते रोगग्रस्त, अल्पायुषी, आजन्म रोगी, तारुण्यशून्य असे होतील. सोळाव्या वर्षीच पुरुषांचे केस पिकतील. विसाव्या वर्षी ते वृद्धासारखे दिसतील. स्त्री रजोयुक्त होऊन गरोदर होऊ शकेल.

स्त्रिया प्रतिवर्षी प्रसूत होतील. त्या सोळाव्या वर्षीच जरायुक्त दिसू लागतील. एखादीच स्त्री पतिपुत्रांनी युक्त असेल. कलियुगात स्त्रिया वांझ होऊ लागतील. सर्व वर्गातील लोक कन्यांचा विक्रय करतील. माता, स्त्री, पुरुष हे सर्वजण स्त्रियांच्या जारांनी दिलेले अन्न भक्षण करतील. लोक हरिनामाचा विक्रय करू लागतील. कीर्ती वाढावी म्हणून दाने देतील व पुढे काही दिवसांनी तेच पुरुष परतफेड करून घेतील. काही कन्येशी गमन करतील. तसेच सासूचा, स्नुषेचा उपभोग घेणारे व काही तर सर्व जातींशी रत होणारे निर्माण होतील.

काही लोक भगिनींशी गमन करतील. काही सावत्र मातेशी निंद्य आचरण करतील. तसेच भावजयीशी रत होतील. एका मातेच्या योनीवाचून ते सर्वत्र विहार करतील. कलियुगात पत्नीचा व पतीचा काहीच नियम रहाणार नाही. इतकेच काय पण प्रजा, गाव, विशेषतः पदार्थ यांचाही काही निर्णय होणार नाही.

सर्वच खोटे बोलू लागतील. ते चोर, लंपट, परस्पर हिंसा करणारे तसेच मनुष्यघातकी होतील. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचे वंशज पापी होतील. लाक्षारस, लोहरस, मीठ सर्व प्रकारची मद्ये यांची विक्री करण्यात येईल. ब्राह्मण बैलाला हाकणारे होतील. ते शुद्रांची प्रेते जाळणारे, शूद्रान्न भक्षण करणारे, सर्व दुष्ट स्त्रियांशी रत होणारे निपजतील. कोणीही पंचमहायज्ञ करणार नाहीत. संध्या, शौच करणार नाहीत. यज्ञोपवीत धारण करणार नाहीत. अमावास्येला रात्री भोजन करतील. वेश्या, व्याजबट्टा करून उपजीविका करणारी स्त्री, कुंटिण व रजस्वला स्त्री या ब्राह्मणांच्या पाकगृहात स्वयंपाक करू लागतील. अन्न व योनी, आश्रम व वर्ण यांचा नियम रहाणार नाही.

सर्वत्र यथेच्छ आहार विहार सुरू होतील. सर्वजण म्लेंच्छ होतील. अशाप्रकारे कलियुगात वृक्ष हातभर उंचीचे आणि मानव अंगुष्ठाएवढे उत्पन्न होतील. सर्वत्र म्लेंच्छ वृत्तीचा प्रादुर्भाव होईल.

अशी सर्वत्र स्थिती झाल्यावर विष्णुमय नावाच्या ब्राह्मणाला कल्कि या नावाचा पुत्र होईल. तोच भगवान नारायणाचा अंश असल्याने तो बलवान व श्रेष्ठ होईल. त्याच्याजवळ भले मोठे खड्‌ग असेल. तो वायुवेगाने धावणार्‍या घोडयावरून सर्व पृथ्वी तीन दिवसांत म्लेंच्छरहित करून टाकील. त्यानंतर तो गुप्त होईल. त्यामुळे प्रजेला
राजा राहणार नाही. चोर प्रजेला छळतील. त्यानंतर अहोरात्र सहा दिवस मुसळधार पाऊस पडेल. जिकडे तिकडे जलमय होऊन पृथ्वी बुडून जाईल. पृथ्वीवर मनुष्यादि सजीव प्राणी आणि वृक्ष वगैरे वनस्पती कोठेही राहणार नाहीत.

हे नारदा, त्यानंतर बारा सूर्य एकाच वेळी उदित होतील आणि ते सर्व उदक शोषून पृथ्वीला शुष्क करतील, त्यामुळे तो दुर्धर कली नाश पावेल. पृथ्वीवर नवे कृतयुग सुरू होईल. कृतयुगात पुन्हा धर्म, तप अशाप्रकारचा धर्म सुरू होईल. तेव्हा घरोघर ब्राह्मण तपश्चर्या करणारे व स्त्रिया पतिव्रता अशा पुन्हा निर्माण होतील. राजे बुद्धिमान, प्रजाहिततत्पर निर्माण होतील. क्षत्रिय विप्रांचे भक्त होतील. ते प्रतापवान, धर्मशील व पुण्यवान होतील. नित्यकर्मात ते तत्पर राहतील

वैश्य वाणिज्यामध्ये तत्पर असतील. विप्रभक्त धर्मात तत्पर असतील. शूद्र स्वधर्माने वागतील. व विप्रांची सेवा करू लागतील. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र हे सर्वच वर्ण देवीच्या भक्तीत तत्पर रहातील. पुरुष श्रुतिस्मृति व पुराणे जाणतील, तसेच ऋतुकालीच भार्येशी गमन करतील

अशाप्रकारे नारदा, कृतयुगात अधर्म शिल्लक रहाणार नाही. सर्वजण धर्मपूर्ण वागतील. त्रेतायुगात धर्म त्रिपाद, द्वापर युगात द्विपाद, कलियुगात एकपाद असा राहून अखेर तो लुप्त होईल.

वार सात, तिथी सोळा, महिने बारा, ऋतू सहा, पक्ष दोन, अयने दोन असा काल सांगितला आहे. चार प्रहरांचा दिवस व चार प्रहरांची रात्र असते. अशा तीस अहोरात्री झाल्यावर एक महिना होतो. कर्तव्य असेल तर कालगणनेचे वर्ष पाच प्रकारांनी सांगावे. दिवसांप्रमाणेच युगेही येत असतात व जात असतात. मनुष्याचे एक वर्ष पूर्ण होते, तेव्हा देवांची एक अहोरात्र होते. मनुष्याची तीनशे साठ युगे लोटल्यावर देवांचे एक युग पूर्ण होते. देवांची एक्काहत्तर युगे म्हणजे एक मन्वंतर होय. इंद्राचे आयुष्य मन्वंतराएवढे असते. अठठावीस इंद्र गेले म्हणजे ब्रह्मदेवाची एक अहोरात्र होते. एकशेआठ वर्षे लोटली असता ब्रह्मदेवाचा पात होतो. ह्याला प्राकृत प्रलय म्हणतात.

तेव्हा सर्वच भूमी दिसेनाशी होते. जलाशिवाय काहीच आढळत नाही, असे पाहून ब्रह्मा, विष्णु, शिव वगैरे सर्व ज्ञानी ऋषीश्रेष्ठ चिदात्म्यात लीन होतात. त्याच चिदात्म्यामध्ये प्रकृतीही लीन होते. प्रकृती ब्रह्मामध्ये लीन झाल्यामुळे प्राकृतिक लय झाल्यावर त्यालाच प्रलय असे म्हणतात.

हे नारदा, हा प्रकृतिप्रलयाचा काल म्हणजे श्रीदेवीचा एक क्षण होतो. ह्याप्रमाणे या प्रलयात सर्व ब्रह्मांडे नष्ट होतात. सर्व सृष्टीचा लय झाल्यामुळे पुनः ब्रह्मापासून आकाश, आकाशापासून वायु अशा क्रमाने अनंत ब्रह्मांडे उत्पन्न होतात. अशारीतीने या जगाचा कितीतरी वेळा नाश व कितीतरी वेळा उत्पत्ती झाली आहे. असे कित्येक कल्प गेले व पुनः निर्माण झाले. त्यांची गणती करण्यास कोण समर्थ आहे ?

तसेच या सर्व विश्वब्रह्मांडातील ब्रह्मदेवादिकांची संख्या कोण बरे करू शकेल ? कारण या सर्वांचा एकच ईश्वर आहे. तो सच्चिदानंदरूप धारण करणारा असा एकच परमात्मा आहे. ब्रह्म वगैरे त्याचेच अंश असतात. तो महाविराट व क्षुद्र विराटही त्यांचेच अंशरूप. तो परमात्मा हीच मूलप्रकृती असून तिच्यापासूनच अर्धनरनारी नटेश्वर निर्माण होतो. तोच दोन प्रकारचा असून द्विभुज व चतुर्भुज असा कृष्णच आहे.

कृष्ण चतुर्भुज होऊन वैकुंठात वास्तव्य करतो व द्विभुज होऊन गोकुळात वास्तव्य करतो. ब्रह्मदेवादि सर्व व तृणेही त्या प्रकृतीचीच रूपे आहेत. जे प्रकृतीस्वरूप आहे ते नाशवंत आहे. असे हे सृष्टीचे कारण सत्य, नित्य, सनातन, स्वेच्छामय असे परब्रह्म आहे. ते निर्गुण, प्रकृतीहून वेगळे, उपाधिविरहित व निराकार असून भक्तांवर अनुग्रह करण्यास तत्पर आहे. त्याच्याच ज्ञानामुळे कमलोद्‌भव ब्रह्मदेव ब्रह्मांड निर्माण करतो. त्याच्याच ज्ञानामुळे व तपामुळे शिव मृत्युंजय, संहारकर्ता व सर्ववेत्ता झाला आहे. ब्रह्मदेवाने त्या परमात्म्याला उद्देशून घोर तप केले. तो श्रीमान विष्णु त्याच्या भक्तीमुळे व सेवेमुळे महाविभूतियुक्त, सर्वज्ञ, सर्वदर्शन, सर्वव्यापी, सर्वांचे पोषण करणारा, संपत्ती देणारा व सर्वेश्वर झाला. महामाया प्रकृतीसुद्धा त्या परमात्म्याच्या ज्ञानामुळे सर्वशक्तीमय ईश्वरी झाली. तिलाच सच्चिदानंदरूपिणी व भगवती असे म्हटले आहे.

सावित्री, देवमाता, सरस्वती याही त्याचे ज्ञान असल्यामुळे सर्वांना पूज्य व मान्य झाल्या. तसेच त्या वेदज्ञ झाल्या. सर्व विद्यांची अधिष्ठात्री देवता जी सरस्वती तीही त्याच्यामुळे सर्वांना पूज्य झाली.

त्या परब्रह्माच्या सेवेमुळे सर्व ब्रह्मांडामध्ये ती पूज्य व मान्य झाली. ती सर्व ग्रामांची आधिदेवता, सर्व संपत्तीदायिनी, सर्वेश्वरी व पुत्र देणारी लक्ष्मी तीही त्याच्याच ज्ञानामुळे सर्वांना वंद्य झाली आहे.

सर्वांचा व सर्व रोगांचा नाश करणारी दुर्गा त्याच्या सेवेमुळेच स्तुत्य झाली आहे. कृष्णाच्या डाव्या बाजूपासून उत्पन्न झालेली, त्याच्या प्राणाची अधिदेवता व त्याला प्राणापेक्षाही अधिक प्रिय अशी राधिका मूळ प्रकृतीच्या सेवेमुळेच अधिक रूपसंपन्न, सौभाग्यमान, गौरव यांनी युक्त झाली. सेवेनेच तिला कृष्णाचे वक्षस्थलाचे स्थान प्राप्त झाले. ती कृष्णाची पत्नी झाली.

तिने पूर्वी शतशृंग पर्वतावर पतीच्या प्राप्तीकरता हजार वर्षे देवांची तपश्चर्या केली. तिला शक्तीचा प्रसाद झाला. ती चंद्रकलेप्रमाणे दिसत असलेली पाहून कृष्णाने तिला पोटाशी धरले. तिच्यावर कृपा करताना तो विभू रडला. अत्यंत सुयोग्य असा सारभूत वर त्याने तिला दिला.

"सौभाग्य, मान, प्रेम, गौरव यांनी युक्त होऊन तू माझी नित्य भक्त हो व माझ्या वक्षस्थलावर जाऊन स्थिर हो. तू मला सर्वश्रेष्ठ असून प्रिय आहेस. तू मला ज्येष्ठ, प्रियकर व गौरवयुक्त आहेस, म्हणून मीही तुझी स्तुती करतो. तुझे पूजन करतो. मी तुला नित्य सुलभ असून तुझ्या आधीन आहे."

असे म्हणून त्या जगन्नाथाने तिला आपली पत्नी केले. तिला सवतीसारखा प्रतिस्पर्धी त्याने ठेवला नाही. त्या शक्तीची सेवा केल्यामुळे इतर देवीही पूज्य झाल्या. हे नारदमुने, जो असे तप करतो त्याला योग्यतेप्रमाणे फळ मिळते. हिमालय पर्वतावर देवांनी हजार वर्षे तपश्चर्या केल्यावर त्या पदांचे ध्यान करून सरस्वती सर्वांना वंद्य झाली. लक्ष्मीने पुष्कर तीर्थावर शंभर युगे देवांचे तप केले. उत्तम प्रतीची सेवा केल्यामुळे ती सर्व संपत्तीचे दान देते. साठ हजार वर्षे मलयपर्वतावर दिव्य तप केले असता व त्या पदांचे ध्यान केले असता त्या सावित्रीला सर्व पूज्य व वंद्य मानू लागले.

हे मुनीश्रेष्ठा, ब्रह्मदेवाने शंभर मन्वंतरे शक्तीचा जप केला. शंभर मन्वंतरे तिचे तप केल्यामुळेच विष्णूही सर्वांचा पोषणकर्ता झाला. कृष्णाने दहा मन्वंतरे उत्कृष्ट तप केले. त्यामुळेच त्याला दिव्य असे गोकुल प्राप्त झाले. अजूनही तो तेथे राहून सुखाचा उपभोग घेत आहे. धमनि भक्तियुक्त होऊन दहा मन्वंतरे तप केले, त्यामुळेच तो सर्वांचा प्राण, सर्वांचा आधार सर्वांना पूज्य झाला आहे.

ह्याप्रमाणे देवीला संतुष्ट करण्याकरता तप केल्यामुळेच सर्व देव पूज्य झाले. मुनी, मनू, राजे, ब्राह्मण हेही तिच्या तपामुळेच पूजनीय झाले.

हे नारदा, असे हे देवीचे महात्म्य गुरुमुखापासून मी श्रवण केले, ते तुला सविस्तर निवेदन केले. आता तुला आणखी काय ऐकायचे आहे ?


अध्याय आठवा समाप्त

GO TOP