श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
द्वितीयः स्कन्धः
सप्तमोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


पाण्डवानां कथानकं मृतानां दर्शनवर्णनम्

सूत उवाच
पञ्चानां द्रौपदी भार्या सा मान्या सा पतिव्रता ।
पञ्च पुत्रास्तु तस्याः स्युर्भर्तृभ्योऽतीव सुन्दराः ॥ १ ॥
अर्जुनस्य तथा भार्या कृष्णस्य भगिनी शुभा ।
सुभद्रा या हृता पूर्वं जिष्णुना हरिसम्मते ॥ २ ॥
तस्यां जातो महावीरो निहतोऽसौ रणाजिरे ।
अभिमन्युर्हतास्तत्र द्रौपद्याश्च सुताः किल ॥ ३ ॥
अभिमन्योर्वरा भार्या वैराटी चातिसुन्दरी ।
कुलान्ते सुषुवे पुत्रं मृतो बाणाग्निना शिशुः ॥ ४ ॥
जीवितः स तु कृष्णेन भागिनेयसुतः स्वयम् ।
द्रौणिबाणाग्निनिर्दग्धः प्रतापेनाद्‌भुतेन च ॥ ५ ॥
परिक्षीणेषु वंशेषु जातो यस्माद्वरः सुतः ।
तस्मात्परीक्षितो नाम विख्यातः पृथिवीतले ॥ ६ ॥
निहतेषु च पुत्रेषु धृतराष्ट्रोऽतिदुःखितः ।
तस्थौ पाण्डवराज्ये च भीमवाग्बाणपीडितः ॥ ७ ॥
गान्धारी च तथातिष्ठत् पुत्रशोकातुरा भृशम् ।
सेवां तयोर्दिवारात्रं चकारार्तो युधिष्ठिरः ॥ ८ ॥
विदुरोऽप्यतिधर्मात्मा प्रज्ञानेत्रमबोधयत् ।
युधिष्ठिरस्यानुमते भ्रातृपार्श्वे व्यतिष्ठत ॥ ९ ॥
धर्मपुत्रोऽपि धर्मात्मा चकार सेवनं पितुः ।
पुत्रशोकोद्‌भवं दुःखं तस्य विस्मारयन्निव ॥ १० ॥
यथा शृणोति वृद्धोऽसौ तथा भीमोऽतिरोषितः ।
वारबाणेनाहनत्तं तु श्रावयन्संस्थिताञ्जनान् ॥ ११ ॥
मया पुत्रा हताः सर्वे दुष्टस्यान्धस्य ते रणे ।
दुःशासनस्य रुधिरं पीतं हृद्यं तथा भृशम् ॥ १२ ॥
भुनक्ति पिण्डमन्धोऽयं मया दत्तं गतत्रपः ।
ध्वांक्षवद्वा श्ववच्चापि वृथा जीवत्यसौ जनः ॥ १३ ॥
एवंविधानि रूक्षाणि श्रावयत्यनुवासरम् ।
आश्वासयति धर्मात्मा मूर्खोऽयमिति च ब्रुवन् ॥ १४ ॥
अष्टादशैव वर्षाणि स्थित्वा तत्रैव दुःखितः ।
धृतराष्ट्रो वने यानं प्रार्थयामास धर्मजम् ॥ १५ ॥
अयाचत धर्मपुत्रं धृतराष्ट्रो महीपतिः ।
पुत्रेभ्योऽहं ददाम्यद्य निर्वापं विधिपूर्वकम् ॥ १६ ॥
वृकोदरेण सर्वेषां कृतमत्रौर्ध्वदैहिकम् ।
न कृतं मम पुत्राणां पूर्ववैरमनुस्मरन् ॥ १७ ॥
ददासि चेद्धनं मह्यं कृत्वा चैवोर्ध्वदैहिकम् ।
गमिष्येऽहं वनं तप्तुं तपः स्वर्गफलप्रदम् ॥ १८ ॥
एकान्ते विदुरेणोक्तो राजा धर्मसुतः शुचिः ।
धनं दातुं मनश्चक्रे धृतराष्ट्राय चार्थिने ॥ १९ ॥
समाहूय निजान्मर्वानुवाच पृथिवीपतिः ।
धनं दास्ये महाभागाः पित्रे निर्वापकामिने ॥ २० ॥
तच्छ्रुत्वा वचनं भ्रातुर्न्येष्ठस्यामिततेजसः ।
संग्रहेऽस्य महाबाहुर्मारुतिः कुपितोऽब्रवीत् ॥ २१ ॥
धनं देयं महाभाग दुर्योधनहिताय किम् ।
अन्धोऽपि सुखमाप्नोति मूर्खत्वं किमतः परम् ॥ २२ ॥
तव दुर्मन्त्रितेनाथ दुःखं प्राप्ता वने वयम् ।
द्रौपदी च महाभागा समानीता दुरात्मना ॥ २३ ॥
विराटभवने वासः प्रसादात्तव सुव्रत ।
दासत्वं च कृतं सर्वैर्मत्स्यस्यामितविक्रमैः ॥ २४ ॥
देविता त्वं न चेज्ज्येष्ठः प्रभवेत्संक्षयः कथम् ।
सूपकारो विराटस्य हत्वाभूवं तु मागधम् ॥ २५ ॥
बृहन्नला कथं जिष्णुर्भवेद्‌बालस्य नर्तकः ।
कृत्वा वेषं महाबाहुर्योषाया वासवात्मजः ॥ २६ ॥
गाण्डीवशोभितौ हस्तौ कृतौ कङ्कणशोभितौ ।
मानुषं च वपुः प्राप्य किं दुःखं स्यादतः परम् ॥ २७ ॥
दृष्ट्वा वेणीं कृतां मूर्ध्नि कज्जलं लोचने तथा ।
असिं गृहीत्वा तरसा छेद्म्यहं नान्यथा सुखम् ॥ २८ ॥
अपृष्ट्वा च महीपालं निक्षिप्तोऽग्निर्मया गृहे ।
दग्धुकामश्च पापात्मा निर्दग्धोऽसौ पुरोचनः ॥ २९ ॥
कीचका निहताः सर्वे त्वामपृष्ट्वा जनाधिप ।
न तथा निहताः सर्वे सभार्या धृतराष्ट्रजाः ॥ ३० ॥
मूर्खत्वं तव राजेन्द्र गन्धर्वेभ्यश्च मोचिताः ।
दुर्योधनादयः कामं शत्रवो निगडीकृताः ॥ ३१ ॥
दुर्योधनहितायाद्य धनं दातुं त्वमिच्छसि ।
नाहं ददे महीपाल सर्वथा प्रेरितस्त्वया ॥ ३२ ॥
इत्युक्त्वा निर्गते भीमे त्रिभिः परिवृतो नृपः ।
ददौ वित्तं सुबहुलं धृतराष्ट्राय धर्मजः ॥ ३३ ॥
कारयामास विधिवत्पुत्राणां चौर्ध्वदैहिकम् ।
ददौ दानानि विप्रेभ्यो धृतराष्ट्रोऽम्बिकासुतः ॥ ३४ ॥
कृत्वौर्ध्वदैहिकं सर्वं गान्धारीसहितो नृपः ।
प्रविवेश वनं तूर्णं कुन्त्या च विदुरेण च ॥ ३५ ॥
सञ्जयेन परिज्ञातो निर्गतोऽसौ महामतिः ।
पुत्रैर्निवार्यमाणापि शूरसेनसुता गता ॥ ३६ ॥
विलपन्भीमसेनोऽपि तथान्ये चापि कौरवाः ।
गङ्गातीरात्परावृत्य ययुः सर्वे गजाह्वयम् ॥ ३७ ॥
ते गत्वा जाह्नवीतीरे शतयूपाश्रमं शुभम् ।
कृत्वा तृणैः कुटीं तत्र तपस्तेपुः समाहिताः ॥ ३८ ॥
गतान्यब्दानि षट् तेषां यदा याता हि तापसाः ।
युधिष्ठिरस्तु विरहादनुजानिदमब्रवीत् ॥ ३९ ॥
स्वप्ने दृष्टा मया कुन्ती दुर्बला वनसंस्थिता ।
मनो मे जायते द्रष्टुं मातरं पितरौ तथा ॥ ४० ॥
विदुरं च महात्मानं सञ्जयं च महामतिम् ।
रोचते यदि वः सर्वान् व्रजाम इति मे मतिः ॥ ४१ ॥
ततस्ते भ्रातरः सर्वे सुभद्रा द्रौपदी तथा ।
वैराटी च महाभागा तथा नागरिको जनः ॥ ४२ ॥
प्राप्ताः सर्वजनैः सार्धं पाण्डवा दर्शनोत्सुकाः ।
शतयूपाश्रमं प्राप्य ददृशुः सर्व एव ते ॥ ४३ ॥
विदुरो न यदा दृष्टो धर्मस्तं पृष्टवांस्तदा ।
क्वास्ते स विदुरो धीमांस्तमुवाचाम्बिकासुतः ॥ ४४ ॥
विरक्तश्चरते क्षत्ता निरीहो निष्परिग्रहः ।
कुतोऽप्येकान्तसंवासी ध्यायतेऽन्तः सनातनम् ॥ ४५ ॥
गङ्गां गच्छन्द्वितीयेऽह्नि वने राजा युधिष्ठिरः ।
ददर्श विदुरं क्षामं तपसा संशितव्रतम् ॥ ४६ ॥
दृष्ट्वोवाच महीपालो वन्देऽहं त्वां युधिष्ठिरः ।
तस्थौ श्रुत्वा च विदुरः स्थाणुभूत इवानघः ॥ ४७ ॥
क्षणेन विदुरस्यास्यान्निःसृतं तेज अद्‌भुतम् ।
लीनं युधिष्ठिरस्यास्ये धर्मांशत्वात्परस्परम् ॥ ४८ ॥
क्षत्ता जहौ तदा प्राणाञ्छुशोचाति युधिष्ठिरः ।
दाहार्थं तस्य देहस्य कृतवानुद्यमं नृपः ॥ ४९ ॥
शृण्वतस्तु तदा राज्ञो वागुवाचाशरीरिणी ।
विरक्तोऽयं न दाहार्हो यथेष्टं गच्छ भूपते ॥ ५० ॥
श्रुत्वा ते भ्रातरः सर्वे सस्नुर्गङ्गाजलेऽमले ।
गत्वा निवेदयामासुर्धृतराष्ट्राय विस्तरात् ॥ ५१ ॥
स्थितास्तत्राश्रमे सर्वे पाण्डवा नागरैः सह ।
तत्र सत्यवतीसूनुर्नारदश्च समागतः ॥ ५२ ॥
मुनयोऽन्ये महात्मानश्चागता धर्मनन्दनम् ।
कुन्ती प्राह तदा व्यासं संस्थितं शुभदर्शनम् ॥ ५३ ॥
कृष्ण कर्णस्तु पुत्रो मे जातमात्रस्तु वीक्षितः ।
मनो मे तप्यतेऽत्यर्थं दर्शयस्व तपोधन ॥ ५४ ॥
समर्थोऽसि महाभाग कुरु मे वाञ्छितं प्रभो ।
गान्धार्युवाच
दुर्योधनो रणेऽगच्छद्वीक्षितो न मया मुने ॥ ५५ ॥
तं दर्शय मुनिश्रेष्ठ पुत्रं मे त्वं सहानुजम् ।
सुभद्रोवाच
अभिमन्युं महावीरं प्राणादप्यधिकं प्रियम् ॥ ५६ ॥
द्रष्टुकामास्मि सर्वज्ञ दर्शयाद्य तपोधन ।
सूत उवाच
एवंविधानि वाक्यानि श्रुत्वा सत्यवतीसुतः ॥ ५७ ॥
प्राणायामं ततः कृत्वा दध्यौ देवीं सनातनीम् ।
सन्ध्याकालेऽथ सम्प्राप्ते गङ्गायां मुनिसत्तमः ॥ ५८ ॥
सर्वांस्तांश्च समाहूय युधिष्ठिरपुरोगमान् ।
तुष्टाव विश्वजननीं स्नात्वा पुण्यसरिज्जले ॥ ५९ ॥
प्रकृतिं पुरुषारामां सगुणां निर्गुणां तथा ।
देवदेवीं ब्रह्मरूपां मणिद्वीपाधिवासिनीम् ॥ ६० ॥
यदा न वेधा न च विष्णुरीश्वरो
     न वासवो नैव जलाधिपस्तथा ।
न वित्तपो नैव यमश्च पावक-
     स्तदासि देवि त्वमहं नमामि ताम् ॥ ६१ ॥
जलं न वायुर्न धरा न चाम्बरं
     गुणा न तेषां च न चेन्द्रियाण्यहम् ।
मनो न बुद्धिर्न च तिग्मगुः शशी
     तदासि देवि त्वमहं नमामि ताम् ॥ ६२ ॥
इमं जीवलोकं समाधाय चित्ते
     गुणैर्लिङ्गकोशं च नीत्वा समाधौ ।
स्थिता कल्पकालं नयस्यात्मतन्त्रा
     न कोऽप्यस्ति वेत्ता विवेकं गतोऽपि ॥ ६३ ॥
प्रार्थयत्येष मां लोको मृतानां दर्शनं पुनः ।
नाहं क्षमोऽस्मि मातस्त्वं दर्शयाशु जनान्मृतान् ॥ ६४ ॥
सूत उवाच
एवं स्तुता तदा देवी माया श्रीभुवनेश्वरी ।
स्वर्गादाहूय सर्वान्वै दर्शयामास पार्थिवान् ॥ ६५ ॥
दृष्ट्वा कुन्ती च गान्धारी सुभद्रा च विराटजा ।
पाण्डवा मुमुदुः सर्वे वीक्ष्य प्रत्यागतान्स्वकान् ॥ ६६ ॥
पुनर्विसर्जितास्तेन व्यासेनामिततेजसा ।
स्मृत्वा देवीं महामायामिन्द्रजालमिवोद्यतम् ॥ ६७ ॥
तदा पृष्ट्वा ययुः सर्वे पाण्डवा मुनयस्तथा ।
राजा नागपुरं प्राप्तः कुर्वन् व्यासकथां पथि ॥ ६८ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां द्वितीयस्कन्धे
पाण्डवानां कथानकं मृतानां दर्शनवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥


व्यासांनी पांडवांना मृत स्वकीयांचे दर्शन घडविले -

पाच पांडवांची पत्‍नी द्रौपदी हिला पतीपेक्षा उत्कृष्ट असे पाच पुत्र झाले. कृष्णभगिनी सुभद्रा ही अर्जुनाची पत्‍नी होती. कृष्णाच्या अनुमोदनाने अर्जुनाने तिचे हरण केले होते. तिचा पुत्र महापराक्रमी अभिमन्यू व द्रौपदीचे पुत्र, हे युद्धात मृत्यू पावले. विराटाची मुलगी उत्तरा ही अभिमन्यूची पत्‍नी होती. पांडव कुळाचा अंत होण्याचा प्रसंग आला असता तिला सुंदर पुत्र झाला. पण अस्त्ररुप अग्नीमुळे तो मृत निपजला. आपल्या भाच्याचा पुत्र अश्वत्थामाच्या अस्त्रामुळे दग्ध झाला असताही, कृष्णाने आपल्या अदभूत सामर्थ्याने जिवंत केले. तोच परीक्षित या नावाने प्रसिद्ध पावला.

पुत्रवधानंतर भीमाचे कुत्सित शब्द सहन करीत धृतराष्ट्र पांडवांच्यात राहिला. गांधारीही तेथेच राहिली. युधिष्ठिर त्यांची काळजीपूर्वक सेवा करीत असे. युधिष्ठिराच्या विचाराने धर्मात्मा विदुर आपल्या भावाजवळ राहून त्याला बोध करीत असे. पितृतुल्य मानून युधिष्ठिर धृतराष्ट्राला सांभाळीत होता. पण भीमसेन मुद्दाम त्याला ऐकू जाईल असे कुत्सित बोलत असे. तो म्हणे,"याचे पुत्रांना मी रणात मारले व दु:शासनाचे गोड रक्त मी प्राशन केले. पण कावळा व श्वान यांच्याप्रमाणे हा अंध मी दिलेला तुकडा खात आहे. हा प्राणी विनाकारण जिवंत राहिला आहे."

असे भीमसेन जरी नित्य बोलत राहिला, तरी युधिष्ठिर धृतराष्ट्राचे सांत्वन करीत असे. दु:खी धृतराष्ट्र अठरा वर्षे तेथे राहिला. नंतर वनात जाण्यासाठी त्याने युधिष्ठिराची प्रार्थना केली. मी माझ्या पुत्रांचे यथाविधि श्राध्द करतो कारण भीमसेनाने पूर्वग्रह मनात ठेवून इतरांचे और्ध्वदेहिक कृत्य केले, पण माझ्या पुत्रांचे केले नाही. म्हणून तू मला द्रव्य सहाय्य कर. मी ते कार्य करुन वनात जाईन व स्वर्गप्राप्तीस्तव तप करीन." तसेच विदुरानेही सहाय्य देण्याबद्दल युधिष्ठिराला सांगितल्यावर धर्मराजाने आपल्या भावांना बोलाविले, तो म्हणाला,"श्राध्दासाठी मी पितृतुल्य धृतराष्ट्राला धन देणार आहे." हे ऐकताच भीमसेन क्रुद्ध झाला. "हे धर्मराजा, दुर्योधनाचे कल्याण व्हावे म्हणून आपण धन देणार काय? असे द्रव्य जाऊन दुष्ट अंधाला सुख का होऊ द्यावे? हा मूर्खपणा आहे. आपण भलताच विचार केलात म्हणून आम्हाला अरण्यवासात दु:खे भोगावी लागली. दुष्ट दुर्योधनाने द्रौपदीला ओढीत सभेत आणली. विराटच्या घरी आम्हा सर्व अतुल पराक्रमी पांडवांना त्याचे दास होऊन राहावे लागले. हा आपलाच प्रसाद बरे! आपल्या कृपेचे फळ आम्ही भोगले. आपण जेष्ठ असून, द्युत खेळला नसता. जरासंधाचा वध करणार्‍या मला, आचारी का व्हावे लागले असते? ह्या इंद्रपुत्र महापराक्रमी अर्जुनाला बृहन्नडा होऊन, स्त्री वेषात नृत्यशिक्षक व्हावे लागले नसते. अरे, पुरुषदेही असूनही याला बांगड्या भराव्या लागल्या, ह्यापेक्षा अधिक दु:ख कोणते? मस्तकावर वेणी, नेत्रात काजळ अशा अर्जुनाला अवलोकन केलेल्या मला, खड्गाने धृतराष्ट्राचे मस्तक उडविल्याशिवाय सुख मिळणार नाही. आम्हाला दग्ध करणार्‍या पुरोचनाला मी अग्नीत टाकून लाक्षागृह जाळून टाकले. ते आपल्या परवानगीशिवाय. सर्व किचकांनाही मी आपली संमति न घेता यमसदनाला पाठविले. तसाच प्रकार धृतराष्ट्राच्या बाबतीत मी केला नाही. याचे मला दु:ख होत आहे. हे राजेंद्रा, काय तुझा हा मूर्खपणा? असरे गंधर्वांनी पकडून नेलेल्या आपल्या शत्रूंना तू मुक्त केलेस आणि ते सर्व अपूर्ण आहे, म्हणून का तू आता, दुष्ट धृतराष्ट्राला धन देत आहेस! हे राजा, तू मला आज्ञा केलीस तरी मी धन देणार नाही."

असे सांगून भीमसेन निघून गेला. पण युधिष्ठिरानं तिघा भावांच्या संमतीने धृतराष्ट्राला विपुल धन दिले. नंतर अंबिका पुत्र धृतराष्ट्राने आपल्या पुत्रांचे और्ध्वदेहिक करविले व ब्राह्मणांना दाने दिली.

नंतर धृतराष्ट्र, कुंती,विदुर ह्यांसह गांधारीला घेऊन वनात गेला. संजयालाही हे समजले. पुत्र नको म्हणत असताही कुंती त्यांच्याबरोबर वनात गेली. भीमसेन व इतर आप्त दु:ख करीत, त्यांना निरोप देऊन गंगातीरावरुन परतली. जान्हवी तीरावरील पवित्र शतयूप आश्रमात धृतराष्ट्र सर्वांसह आला. तेथे तृणाची झोपडी बांधून तो तपश्चर्या करु लागला.

अशा तर्‍हेने सहा वर्षे उलटली. एक दिवस युधिष्ठिर आपल्या बंधूंना म्हणाला, "मला स्वप्नात माता कुंती अत्यंत थकलेली दिसली. म्हणून मातेची तसेच पितृतुल्य धृतराष्ट्र, गांधारी यांचे दर्शन घेण्याची मला इच्छा आहे. तसेच विदुर व संजय यांनाही भेटावेसे वाटते. तस्मात तुम्हाला हे मान्य असेल तर आपण त्यांचेकडे जाऊ."

युधिष्ठिराचा विचार पटल्यामुळेच सर्व पांडव,सुभद्रा, द्रौपदी,उत्तरा व इतर प्रतिष्ठित नागरिकांसह सर्व दर्शनोत्सुक मंडळी शतयूपाश्रमात आली. तेथे सर्वजण त्यांना भेटले. पण विदुर काही दिसेना. "विवेकी विदूर कोठे आहे ?" असे युधिष्ठिराने विचारले. धृतराष्ट्र म्हणाला, "विदूर निरिच्छ, संग्रहशून्य व विरक्त झाला असून कोठेतरी एकांतवासात राहून सनातन परमात्म्याचे ध्यान करीत आहे."

त्याचा शोध करीत असता दुसरे दिवशी निर्मल आचरण असलेला, तपश्चर्येमुळे कृश झालेला धर्मात्मा विदुर युधिष्ठिराच्या दृष्टीस पडला. युधिष्ठिराने आपण वंदन करीत असल्याचे सांगितले. पण तो वृक्षाप्रमाणे स्थिर होता. इतक्यात विदुराच्या मुखातून अदभूत तेज निघाले व युधिष्ठिरही धर्मात्मा असल्याने त्याच्या मुखात लीन झाले. त्याच क्षणी विदुराने प्राण त्याग केला.

युधिष्ठिर दु;खी अंत:करणाने त्याचे दहन करण्याच्या तयारीस लागला. पण इतक्यात आकाशवाणी झाली, "हे राजा, तू इच्छेप्रमाणे चालता हो. हा विरक्त असल्यामुळे दहनाला योग्य नाही."

ही आकाशवाणी ऐकताच सर्व आप्तांनी निर्मल गंगाजलात स्नान केले व धृतराष्ट्राजवळ जाऊन त्याला घडलेली घटना सांगितली. ते सर्व पांडव इतरेजनांसह आश्रमात राहत असता, एकदा व्यास व नारदमुनी इतर ऋषीमुनींसह तेथे आले. कुंती शुभवदन व स्थिर असलेल्या व्यासांना म्हणाली,

"हे कृष्णा, मी माझ्या कर्ण नावाच्या पुत्राला जन्मत:च काय ते पाहिले व शेवटचे पाहिले. म्हणून मला नित्य पश्चाताप होत आहे. आपण समर्थ आहात म्हणून माझी इच्छा पूर्ण करा. आपण मला त्याचे दर्शन द्या."

गांधारी म्हणाली, "रणांगणात दुर्योधन व त्याचे भ्राते म्रुत्युमुखी पडले. मी त्यांना पाहू शकले नाही मलाही माझे पुत्र एकदा दाखवा."

सुभद्रा म्हणाली,"प्राणापेक्षा प्रिय असलेला महाप्रतापी अभिमन्यू, त्याला अवलोकन करण्याची माझी इच्छा पूर्ण करा. असे भाषण ऐकताच, सर्वाचें मनोरथ पूर्ण करावे, म्हणून व्यासांनी प्राणायाम करुन सनातन देवीचे चिंतन केले. नंतर सायंकाल होताच व्यासांनी सर्वाना गंगाजलात स्नान करुन शुद्ध होण्यास सांगून, सर्वांसह जगदंबेचे स्तवन केले.

प्रकृतिरूप, चैतन्यापासून अभिन्न, सगुण,निर्गुण,ब्रह्मस्वर आणि मणिद्वीपामध्ये वास्तव्य करणारी जी देवांची अधिष्ठात्री देवी जगदंबा, हिचे व्यासांनी ध्यान केले. ते म्हणाले,"ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, वरुण, कुबेर, यम, अग्नि यांपैकी कोणीच नसते. पण हे देवी तूच असतेस, तुला नमस्कार असो. उदक, पृथ्वी,आकाश, त्याचे गुण, इंद्रिये, अहंकार, मन, बुद्धि सूर्य व चंद्र यापैकी कोणीही नसताना असलेल्या तुला, हे देवी, नमस्कार असो. हा जीव लोक हिरण्यगर्भरुप चित्रामध्ये ठेवून आणि गुणासहवर्तमान लिंगदेह, साम्यावस्थारुप समाधिमध्ये सुषुप्तिद्वारा नेऊन कल्पपर्यंत, काल, स्वतंत्रपणाने स्थित असता, जी तू नेत असतेस, त्या तुला जाणणारा कोणीही ज्ञानी नाही. हे जन मृतांचे दर्शन करुन देण्याविषयी, माझी प्रार्थना करीत आहेत. पण, हे माते तसे करण्यास मी समर्थ नाही. म्हणून तूच ह्याची विनंती मान्य कर, व मृत जनांचे दर्शन यांना घडवून दे."

अशा प्रकारे व्यासांनी देवीचे स्तवन करताच, मायारुप असलेल्या भुवनेश्वरी देवीने त्या सर्वांना स्वर्गातून बोलावून आणले व त्यांचे दर्शन घडविले. कुंती, गांधारी, सुभद्रा, उत्तरा व पांडव यांनी आपले आप्त स्वकीय यांचे दर्शन घेतले. त्यानंतर व्यासांनी आपल्या तपश्चर्येवर उत्पन्न केलेल्या त्या मृतात्म्यांना परत नेण्यास देवीस विनंती केली.

त्यानंतर सर्वजण स्वस्थानी परत गेले. युधिष्ठिर वगैरे पांडव व्यासांबद्दल गोष्टी करीत, परत हस्तिनापुरात आले.अध्याय सातवा समाप्त

GO TOP