श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
प्रथमः स्कन्धः
प्रथमोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


शौनकप्रश्नः -

ॐ सर्वचैतन्यरूपां तां आद्यां विद्यां च धीमहि ।
बुद्धिं या नः प्रचोदयात् ॥ १ ॥
शौनक उवाच -
सूत सूत महाभाग धन्योऽसि पुरुषर्षभ ।
यदधीतास्त्वया सम्यक् पुराणसंहिताः शुभाः ॥ २ ॥
अष्टादश पुराणानि कृष्णेन मुनिनानघ ।
कथितानि सुदिव्यानि पठितानि त्वयानघ ॥ ३ ॥
पञ्चलक्षणयुक्तानि सरहस्यानि मानद ।
त्वया ज्ञातानि सर्वाणि व्यासात्सत्यवतीसुतात् ॥ ४ ॥
अस्माकं पुण्ययोगेन प्राप्तस्त्वं क्षेत्रमुत्तमम् ।
दिव्यं विश्वसनं पुण्यं कलिदोषविवर्जितम् ॥ ५ ॥
समाजोऽयं मुनीनां हि श्रोतुकामोऽस्ति पुण्यदाम् ।
पुराणसंहितां सूत ब्रूहि त्वं नः समाहितः ॥ ६ ॥
दीर्घायुर्भव सर्वज्ञ तापत्रयविवर्जितः ।
कथयाद्य महाभाग पुराणं ब्रह्मसम्मितम् ॥ ७ ॥
श्रोत्रेन्द्रिययुताः सूत नराः स्वादविचक्षणाः ।
न शृण्वन्ति पुराणानि वञ्चिता विधिना हि ते ॥ ८ ॥
यथा जिह्वेन्द्रियाह्लादः षड्‌रसैः प्रतिपद्यते ।
तथा श्रोत्रेन्द्रियाह्लादो वचोभिः सुधियां स्मृतः ॥ ९ ॥
अश्रोत्राः फणिनः कामं मुह्यन्ति हि नभोगुणैः ।
सकर्णा ये न शृण्वन्ति तेऽप्यकर्णाः कथं न च ॥ १० ॥
अतः सर्वे द्विजाः सौम्य श्रोतुकामाः समाहिताः ।
वर्तन्ते नैमिषारण्ये क्षेत्रे कलिभयार्दिताः ॥ ११ ॥
येन केनाप्युपायेन कालातिवाहनं स्मृतम् ।
व्यसनैरिह मूर्खाणां बुधानां शास्त्रचिन्तनैः ॥ १२ ॥
शास्त्राण्यपि विचित्राणि जल्पवादयुतानि च ।
त्रिविधानि पुराणानि शास्त्राणि विविधानि च ।
विताण्डाच्छलयुक्तानि गर्वामर्षकराणि च ।
नानार्थवादयुक्तानि हेतुमन्ति बृहन्ति च ॥ १३ ॥
सात्त्विकं तत्र वेदान्तं मीमांसा राजसं मतम् ।
तामसं न्यायशास्त्रं च हेतुवादाभियन्त्रितम् ॥ १४ ॥
तथैव च पुराणानि त्रिगुणानि कथानकैः ।
कथितानि त्वया सौम्य पञ्चलक्षणवन्ति च ॥ १५ ॥
तत्र भागवतं पुण्यं पञ्चमं वेदसम्मितम् ।
कथितं यत्त्वया पूर्वं सर्वलक्षणसंयुतम् ॥ १६ ॥
उद्देशमात्रेण तदा कीर्तितं परमाद्‌भुतम् ।
मुक्तिप्रदं मुमुक्षूणां कामदं धर्मदं तथा ॥ १७ ॥
विस्तरेण तदाख्याहि पुराणोत्तममादरात् ।
श्रोतुकामा द्विजाः सर्वे दिव्यं भागवतं शुभम् ॥ १८ ॥
त्वं तु जानासि धर्मज्ञ पौराणीं संहितां किल ।
कृष्णोक्तां गुरुभक्तत्वात् सम्यक् सत्त्वगुणाश्रयः ॥ १९ ॥
श्रुतान्यन्यानि सर्वज्ञ त्वन्मुखान्निःसृतानि च ।
नैव तृप्तिं व्रजामोऽद्य सुधापानेऽमरा यथा ॥ २० ॥
धिक्सुधां पिबतां सूत मुक्तिर्नैव कदाचन ।
पिबन्भागवतं सद्यो नरो मुच्येत सङ्कटात् ॥ २१ ॥
सुधापाननिमित्तं यत् कृता यज्ञाः सहस्रशः ।
न शान्तिमधिगच्छामः सूत सर्वात्मना वयम् ॥ २२ ॥
मखानां हि फलं स्वर्गः स्वर्गात्प्रच्यवनं पुनः ।
एवं संसारचक्रेऽस्म्निन् भ्रमणं च निरन्तरम् ॥ २३ ॥
विना ज्ञानेन सर्वज्ञ नैव मुक्तिः कदाचन ।
भ्रमतां कालचक्रेऽत्र नराणां त्रिगुणात्मके ॥ २४ ॥
अतः सर्वरसोपेतं पुण्यं भागवतं वद ।
पावनं मुक्तिदं गुह्यं मुमुक्षूणां सदा प्रियम् ॥ २५ ॥

इति श्रीमद्‌देवीभागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां संहितायां
प्रथमस्कन्धे शौनकप्रश्नो नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥


शौनक आदी ऋषींचा सूतांना प्रश्न -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

शौनक म्हणतात, "सुता, सर्व पुराणासंहितांचे तू चांगले अध्ययन केले आहेस. व्यास मुनींनी सर्व अठरा पुराणे रहस्यासह सांगितली, ती तू समजून घेतली आहेस. आमचा योगायोग चांगला म्हणून तू त्या दिव्य क्षेत्राला आला आहेस. हे मुनी पुराण ऐकण्याकरता उत्सुक आहेत. तेव्हा तू आम्हाला ब्रह्म कथन करणारे पुराण सांग. ज्याप्रमाणे रुचकर अन्नाने जिभेला आनंद मिळतो, त्याप्रमाणे शुभ पुरुषांच्या भाषणाने कानांना सुख वाटत असते. कान नसलेले भुजंगही गोड आवाजाने मोहित होतात, मग पुराणे श्रवण न करणारे बधिरच आहेत असे समजा पाहिजे तर. आम्ही सर्व कलीच्या भीतीने व्याकूळ होऊन या नैमिषारण्यात आलो आहोत. येथे काही काम नाही. कोणत्यातरी उपायाने काळ घालवावाच लागतो, पण मूर्खाचा काळ व्यसनात जातो आणि शाहण्यांचा काळ शास्त्रचिंतनात जातो. सर्व शास्त्रे ही विचित्र आणि नाना प्रकारची असून ती वितंडवादांनी युक्त असतात. त्यामुळे ती गर्व आणि क्रोध उत्पन्न करणारी आहेत. पुराणे ही तीन प्रकारची आहेत. ही सर्व शास्त्रे आणि पुराणे अनेक प्रकारच्या अर्थवादांनी भरलेली असून हेतूपूर्ण आहेत. त्यात वेदांत हा सात्विक, मिमांसा हा राजस होय. आणि हेतुवादाचा पगडा असलेले न्यायशास्त्र हे तामस होय.

त्याचप्रमाणे पुराणेही निर्गुणात्मक असून पाच लक्षणांनी युक्त अशी असतात. या पुराणापैकी पाचवे भागवतपुराण वेदाला मान्य असलेले आणि पुण्यकारक असून सर्व लक्षणांनी युक्त आहे. हे पवित्र भागवत, सूता, तू पूर्वी सांगितले आहेस. पण हे अदभूत आणि मुक्तिपुराण तू संक्षिप्त सांगितले आहेस, ते आता आम्हांला सविस्तर सांग. आम्ही सर्व ते ऐकायला उत्सुक आहोत.

धर्मज्ञ सूता, तू व्यासांनी सांगितलेली पुराण संहिता चांगली जाणतोस. ज्याप्रमाणे कितीही अमृत प्याले तरी देव तृप्त होत नाहीत, त्याप्रमाणे तुझ्याकडून इतर सर्व पुराणे ऐकली तरी आमची तृप्ती होत नाही. भागवतरुपी अमृतसेवन करणारे मुक्त होतात. पण आमृतपान करणारे देव कधीही मुक्त होत नाहीत. स्वर्गात अमृतपानाचा अधिकार देणारे हजारो यज्ञ आम्ही मनापासून केले आहेत, पण पुण्य संपले की मनुष्य पुन्हा स्वर्गातून खाली येतो आणि त्याचे संसारचक्रातले भ्रमण कायमच राहते, म्हणजे या कालचक्रात ज्ञानाशिवाय मुक्ती कधीही मिळणार नाही. म्हणून सर्व रसांनी युक्त, मुक्तिप्रद, पुण्यकारक आणि मुमुक्षूनां प्रिय असलेले गुह्य आणि पवित्र भागवतपुराण तू आम्हाला सांग."


अध्याय पहिला समाप्त

GO TOP