श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
एकादशः स्कन्धः
त्रयोविंशोऽध्यायः


तप्तकृच्छ्रादिलक्षणवर्णनम्

श्रीनारायण उवाच
अमृतापिधानमित्येवमुच्चार्य साधकोत्तमः ।
उच्छिष्टभाग्भ्यः पात्रान्नं दद्यादन्ते विचक्षणः ॥ १ ॥
ये के चास्मत्कुले जाता दासदास्योऽनकाङ्‌क्षिणः ।
ते सर्वे तृप्तिमायान्तु मया दत्तेन भूतले ॥ २ ॥
रौरवेऽपुण्यनिलये पद्मार्बुदनिवासिनाम् ।
अर्थिनामुदकं दत्तमक्षय्यमुपतिष्ठतु ॥ ३ ॥
पवित्रग्रन्थिमुत्सृज्य मण्डले भुवि निक्षिपेत् ।
पात्रे तु निक्षिपेद्यस्तु स विप्रः प‍ङ्‌क्तिदूषकः ॥ ४ ॥
उच्छिष्टस्तेन संस्पृष्टः शुना शूद्रेण च द्विजः ।
उपोष्य रजनीमेकां पञ्चगव्येन शुध्यति ॥ ५ ॥
अनुच्छिष्टेन संस्पृष्टैः स्नानमेव विधीयते ।
एकाहुतिप्रदानेन कोटियज्ञफलं लभेत् ॥ ६ ॥
पञ्चभिः पञ्चकोटीनां तदनन्तफलं स्मृतम् ।
प्राणाग्निहोत्रवेत्रे यो ह्यन्नदानं करोति च ॥ ७ ॥
दातुश्चैव तु यत्पुण्यं भोक्तुश्चैव तु यत्फलम् ।
प्राप्नुतस्तौ तदेव द्वावुभौ तौ स्वर्गगामिनौ ॥ ८ ॥
सपवित्रकरो भुङ्‌क्ते यस्तु विप्रो विधानतः ।
ग्रासे ग्रासे फलं तस्य पञ्चगव्यसमं भवेत् ॥ ९ ॥
पूजाकालत्रये नित्यं जपस्तर्पणमेव च ।
होमो ब्राह्मणभुक्तिश्च पुरश्चरणमुच्यते ॥ १० ॥
अधःशयानो धर्मात्मा जितक्रोधो जितेन्द्रियः ।
लघुमिष्टहिताशी च विनीतः शान्तचेतसा ॥ ११ ॥
नित्यं त्रिषवणस्नायी नित्यं स शुभभाषणः ।
स्त्रीशूद्रपतितत्व्रात्यनास्तिकोच्छिष्टभाषणम् ॥ १२ ॥
चाण्डालभाषणं चैव न कुर्यान्मुनिसत्तम ।
नत्वा नैव च भाषेत जपहोमार्चनादिषु ॥ १३ ॥
मैथुनस्य तथालापं तद्‌गोष्ठीमपि वर्जयेत् ।
कर्मणा मनसा वाचा सर्वावस्थासु सर्वदा ॥ १४ ॥
सर्वत्र मैथुनत्यागो ब्रह्मचर्यं प्रचक्षते ।
राज्ञश्चैव गृहस्थस्य ब्रह्मचर्यमुदाहृतम् ॥ १५ ॥
ऋतुस्तातेषु दारेषु सङ्‌गतिर्या विधानतः ।
संस्कृतायां सवर्णायामृतुं दृष्ट्वा प्रयत्‍नतः ॥ १६ ॥
रात्रौ तु गमनं कार्यं ब्रह्मचर्यं हरेन्न तत् ।
ऋणत्रयमसंशोध्य त्वनुत्पाद्य सुतानपि ॥ १७ ॥
तथा यज्ञाननिष्ट्वा च मोक्षमिच्छन्व्रजत्यधः ।
अजागलस्य यज्जन्म तज्जन्म श्रुतिचोदितम् ॥ १८ ॥
अतः कार्यं तु विप्रेन्द्र ऋणत्रयविशोधनम् ।
ते देवानामृषीणां च पितॄणामृणिनस्तथा ॥ १९ ॥
ऋषिभ्यो ब्रह्मचर्येण पितृभ्यस्तु तिलोदकैः ।
मुच्येद्यज्ञेन देवेभ्यः स्वाश्रमं धर्ममाचरेत् ॥ २० ॥
क्षीराहारी फलाशी वा शाकाशी वा हविष्यभुक् ।
भिक्षाशी वा जपेद्विद्वान्कृच्छ्रचान्द्रायणादिकृत् ॥ २१ ॥
लवणं क्षारमम्लं च गृञ्जनं कांस्यभोजनम् ।
ताम्बूलं च द्विभुक्तं च दुष्टवासः प्रमत्तनम् ॥ २२ ॥
श्रुतिस्मृतिविरोधं च जपं रात्रौ विवर्जयेत् ।
वृथा न कालं गमयेद्‌द्यूतस्त्रीस्वापवादतः ॥ २३ ॥
गमयेद्देवतापूजास्तोत्रागमविलोकनैः ।
भूशय्या ब्रह्मचारित्वं मौनचर्या तथैव च ॥ २४ ॥
नित्यं त्रिषवणस्नानं शूद्रकर्मविवर्जनम् ।
नित्यपूजा नित्यदानमानन्दस्तुतिकीर्तनम् ॥ २५ ॥
नैमित्तिकार्चनं चैव विश्वासो गुरुदेवयोः ।
जपनिष्ठस्य धर्मा ये द्वादशैते सुसिद्धिदाः ॥ २६ ॥
नित्यं सूर्यमुपस्थाय तस्य चाभिमुखो जपेत् ।
देवताप्रतिमादौ वा वह्नौ वाभ्यर्च्य तन्मुखः ॥ २७ ॥
स्नानपूजाजपध्यानहोमतर्पणतत्परः ।
निष्कामो देवतायां च सर्वकर्मनिवेदकः ॥ २८ ॥
एवमादींश्च नियमान्पुरश्चरणकृच्चरेत् ।
तस्माद्‌द्विजः प्रसन्नात्मा जपहोमपरायणः ॥ २९ ॥
तपस्यध्ययने युक्तो भवेद्‌भूतानुकम्पकः ।
तपसा स्वर्गमाप्नोति तपसा विन्दते महत् ॥ ३० ॥
तपोयुक्तस्य सिध्यन्ति कर्माणि नियतात्मनः ।
विद्वेषणं संहरणं मारणं रोगनाशनम् ॥ ३१ ॥
येन येनाथ ऋषिणा यदर्थं देवताः स्तुताः ।
स स कामः समृद्ध्येत तेषां तेषां तथा तथा ॥ ३२ ॥
तानि कर्माणि वक्ष्यामि विधानानि च कर्मणाम् ।
पुरश्चरणमादौ च कर्मणां सिद्धिकारकम् ॥ ३३ ॥
स्वाध्यायाभ्यसनस्यादौ प्राजापत्यं चरेद्‌द्विजः ।
केशश्मश्रुलोमनखान् वापयित्वा ततः शुचिः ॥ ३४ ॥
तिष्ठेदहनि रात्रौ तु शुचिरासीत वाग्यतः ।
सत्यवादी पवित्राणि जपेद्व्याहृतयस्तथा ॥ ३५ ॥
ज्येकाराद्यास्तु ता जप्त्वा सावित्रीं च तदित्यृचम् ।
आपो हि ष्ठेति सूक्तं च पवित्रं पापनाशनम् ॥ ३६ ॥
पुनन्त्यः स्वस्तिमत्यश्च पावमान्यस्तथैव च ।
सर्वत्रैतत्प्रयोक्तव्यमादावन्ते च कर्मणाम् ॥ ३७ ॥
आसहस्रादाशताद्वाप्यादशादथवा जपेत् ।
अकारं व्याहृतीस्तिस्रः सावित्रीमथवायुतम् ॥ ३८ ॥
तर्पयित्वाद्‌‍भिराचार्यानृषींश्छन्दांसि देवताः ।
अनार्येण न भाषेत शूद्रेणापि न गर्हितैः ॥ ३९ ॥
नापि चोदक्यया वध्वा पतितैर्नान्त्यजैर्नृभिः ।
न देवब्राह्मणद्विष्टैर्नाचार्यगुरुनिन्दकैः ॥ ४० ॥
न मातृपितृविद्विष्टैर्नावमन्येत कञ्चन ।
कृच्छ्राणामेष सर्वेषां विधिरुक्तोऽनुपूर्वशः ॥ ४१ ॥
प्राजापत्यस्य कृच्छ्रस्य तथा सान्तपनस्य च ।
पराकस्य च कृच्छ्रस्य विधिश्चान्द्रायणस्य च ॥ ४२ ॥
पञ्चभिः पातकैः सर्वैर्दुष्कृतैश्च प्रमुच्यते ।
तप्तकृच्छ्रेण सर्वाणि पापानि दहति क्षणात् ॥ ४३ ॥
त्रिभिश्चान्द्रायणैः पूतो ब्रह्मलोकं समश्नुते ।
अष्टभिर्देवताः साक्षात्पश्येत वरदास्तदा ॥ ४४ ॥
छन्दांसि दशभिर्ज्ञात्वा सर्वान्कामान्समश्नुते ।
त्र्यहं प्रातस्त्र्यहं सायं त्र्यहमद्यादयाचितम् ॥ ४५ ॥
त्र्यहं परं च नाश्नीयात्प्राजापत्यं चरेद्‌द्विजः ।
गोमूत्रं गोमयं क्षीरं दधि सर्पिः कुशोदकम् ॥ ४६ ॥
एकरात्रोपवासश्च कृच्छ्रं सान्तपनं स्मृतम् ।
एकैकं ग्रासमश्नीयादहानि त्रीणि पूर्ववत् ॥ ४७ ॥
त्र्यहं चोपवसेदित्थमतिकृच्छ्रं चरेद्‌द्विजः ।
एवमेव त्रिभिर्युक्तं महासान्तपनं स्मृतम् ॥ ४८ ॥
तप्तकृच्छ्रं चरन्विप्रो जलक्षीरघृतानिलान् ।
प्रतित्र्यहं पिबेदुष्णान्सकृत्स्नायी समाहितः ॥ ४९ ॥
नियतस्तु पिबेदापः प्राजापत्यविधिः स्मृतः ।
यतात्मनोऽप्रमत्तस्य द्वादशाहमभोजनम् ॥ ५० ॥
पराको नाम कृच्छ्रोऽयं सर्वपापप्रणोदनः ।
एकैकं तु ग्रसेत्पिण्डं कृष्णे शुक्ले च वर्धयेत् ॥ ५१ ॥
अमावास्यां न भुञ्जीत एवं चान्द्रायणे विधिः ।
उपस्पृश्य त्रिषवणमेतच्चान्द्रायणं स्मृतम् ॥ ५२ ॥
चतुरः प्रातरश्नीयाद्विप्रः पिण्डात्कृताह्निकः ।
चतुरोऽस्तमिते सूर्ये शिशुचान्द्रायणं स्मृतम् ॥ ५३ ॥
अष्टावष्टौ समश्नीयात्पिण्डान्मध्यन्दिने स्थिते ।
नियतात्मा हविष्यस्य यतिचान्द्रायणं व्रतम् ॥ ५४ ॥
एतद्रुद्रास्तथादित्या वसवश्च चरन्ति हि ।
सर्वे कुशलिनो देवा मरुतश्च भुवा सह ॥ ५५ ॥
एकैकं सप्तरात्रेण पुनाति विधिवत्कृतम् ।
त्वगसृक्‌पिशितास्थीनि मेदोमज्जावसास्तथा ॥ ५६ ॥
एकैकं सप्तरात्रेण शुध्यत्येव न संशयः ।
एभिर्व्रतैर्विपूतात्मा कर्म कुर्वीत नित्यशः ॥ ५७ ॥
एवं शुद्धस्य कर्माणि सिध्यन्त्येव न संशयः ।
शुद्धात्मा कर्म कुर्वीत सत्यवादी जितेन्द्रियः ॥ ५८ ॥
इष्टान्कामांस्ततः सर्वान्सम्प्राप्नोति न संशयः ।
त्रिरात्रमेवोपवसेद्रहितः सर्वकर्मणा ॥ ५९ ॥
त्रीणि नक्तानि वा कुर्यात्ततः कर्म समारभेत् ।
एवं विधानं कथितं पुरश्चर्याफलप्रदम् ॥ ६० ॥
गायत्र्याश्च पुरश्चर्यां सर्वकामप्रदायिनी ।
कथिता तव देवर्षे महापापविनाशिनी ॥ ६१ ॥
आदौ कुर्याद्‌व्रतं मन्त्री देहशोधनकारकम् ।
पुरश्चर्यां ततः कुर्यात्समस्तफलभाग्भवेत् ॥ ६२ ॥
इति ते कथितं गुह्यं पुरश्चर्याविधानकम् ।
एतत्परस्मै नो वाच्यं श्रुतिसारं यतः स्मृतम् ॥ ६३ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां एकादशस्कन्धे
तप्तकृच्छ्रादिलक्षणवर्णनं नाम त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥


व्रतांचे प्रकार

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारायण म्हणाले, उत्तम साधकाने, 'अमृतपिधनमसि' असे म्हणून आचमन करावे. नंतर पात्रातील अन्न प्राण्यासाठी टाकावे. भूतली दिलेल्या अन्नाने आमच्या कुलातील दास दासी यांची तृप्ती होवो.

पापाचे घर जो रौरव पद्मार्बुद यात रहाणार्‍यांना हे उदक नित्य मिळते. असे म्हणून पवित्रक काढून भूमीवर टाकावे. ते पात्रात टाकू नये. अच्छिद्र असताना जो शूद्राने अथवा ध्यानाने स्पर्शित झाल्यावरही एक रात्र उपोषण करतो तो शुद्ध होतो. इतरवेळी स्नान करावे. एका प्राणाहुतीने कोटी यज्ञाचे पुण्य मिळते. पाच आहुतीमुळे पाच कोटी यज्ञाचे फल मिळते. प्राणाग्नीहोत्र जाणणारास अन्न दान करतो त्या दात्याला व भोक्त्याला दोघांनाही स्वर्ग प्राप्त होतो. पवित्रक घालून भोजन करणारास पंचगव्याचे फल मिळते. तिन्ही पूजाकाली जप, तर्पण, होम व ब्राह्मणभोजन यालाच पुनश्चरण म्हणतात. त्याने भूमीवर शयन करावे. जितेंद्रिय व्हावे. विनयी व शांत असावे. त्रिकाल स्नान करून शुभ भाषण करावे. स्त्री, पतित, चांडाल यांच्याशी बोलू नये. मैथुनाच्या कथा व इतर गोष्टी वर्ज्य कराव्यात त्यालाच ब्रह्मचर्य म्हणतात. ऋतुस्नात स्त्रीशी विधीपूर्वक संगम करणे हेच गृहस्थाचे ब्रह्मचर्य. संस्कार न झालेल्या ऋतुस्नात स्त्रीशी गमन करावे. तीन ऋणातून मुक्त न होणारा, यज्ञ न करणारा, पुत्र उत्पन्न न करणारा अधोगतीस जातो. ब्रह्मचर्यामुळे ऋषींच्या, तिलोदकाने पितरांच्या, यज्ञाने देवांच्या ऋणातून मुक्त होता येते. म्हणून आश्रमयोग्य आचरण करावे. दूध, फले, भाजी, हविष्यान्न भक्षण करून, कृच्छ्र, चांद्रायण व्रत वगैरे आचरून ब्राह्मणाने जप करावा. आम्ल पदार्थ, तांबूल, दोन वेळ भोजन, दुष्टांचा सहवास इत्यादी श्रुतिस्मृतिविरोधी आचरण करू नये. द्यूत, स्त्रीसंभोग, निद्रा, वाद यात व्यर्थ काल घालवू नये. देवपूजा स्तोत्रे यात काल व्यतीत करावा.

भूमीवर शयन, ब्रह्मचर्य, पूजा, दान, स्तुती, कीर्तन हे सर्व जपसिद्धी करून देणारे आहे. सूर्योपस्थान करून जप करावा. देवतेची, अग्नीची मंत्रपूजा करावी. धर्मकृत्ये तत्पर असावे. सर्व कर्मे देवास अर्पण करावीत. तप व अध्ययन यातच सर्व वेळ घालवावा. भूतांवर दया करावी. तपामुळे स्वर्ग व तेज प्राप्त होते.

ज्या ऋषींनी ज्या कारणाकरता देवतेची स्तुती केली असेल, त्यांची ती इच्छा पूर्ण होते. आता ती विविध कर्मे सांगतो.

सर्व कर्मात पुरश्चरण सिद्धी देते. स्वाध्याय करणार्‍याने प्राजापत्यव्रत करावे. केश, मिशा, लोप, नखे काढून उदकात बुडी मारून दिवसा रहावे. दीर्घकाल मौन करावे. सत्यभाषण करून व्याहृती जप करावा. तद् ऋचारूप गायत्री अपोहिष्ठा हे पवित्र व पापनाशक सूक्त पुनत्यः स्वस्तिमत्त्वः, पावमान्यः इत्यादी ऋचा म्हणून कर्मारंभ करावा. सहस्र, शत, दहा, जप करून ॐकार व व्याहृती यांनी सावित्रीचा दहा हजार जप करावा. आचार्य, ऋषी, छंद देवता यांना तृप्त करावे.

पतिता, पतित, अंत्यज, देव ब्राह्मण यांसी द्वेष माता, पिता, आचार्य, गुरु यांची निंदा करू नये. हेच प्राजापत्यकृच्छ्र होय. आता चांद्रायण, पराककृच्छ्र सांगतो.

तीन चांद्रायणांच्या योगाने प्राणी पवित्र होतो व ब्रह्मलोकी जातो. आठ चांद्रायणांमुळे त्याला वर देणार्‍या देवता दिसतात. दहा चांद्रायणांमुळे सर्व छंदांचे ज्ञान होऊन कामना पूर्ण होतात. तीन दिवस सकाळी, तीन दिवस सायंकाळी, तीन दिवस अयाचित व तीन दिवस निराहार राहून प्राजापत्य करावे. गोमूत्र, गोमय, क्षीर, दही, तूप, कुशोदक यांचे मिश्रण करून पहिल्या दिवशी पंचगव्य प्राशन करावे. दुसर्‍या दिवशी उपवास करावा. याला सांतपन कृच्छ्र म्हणतात.

पूर्वीप्रमाणेच तीन दिवस एकेक घास खावा. तीन दिवस उपवास करावा. हे अतिकृच्छ्र व्रत होय. हेच तिप्पट प्रमाणात केल्यास महासंतापन होय. असे तप्त कृच्छ्र ब्राह्मणाने करावे. उष्ण जल, दूध, घृत, वायु हे तीन दिवसांनी बदलून घ्यावे. शांत चित्ताने स्नान करावे. नियमित उदक प्राशावे. यालाच प्राजापत्यविधी म्हणतात.

ज्याने आपला आत्मा नियमित केला आहे, जो सावध आहे, अशा पुरुषाने बारा दिवस भोजन करू नये. यास पराकसंज्ञक कृच्छ्र म्हणतात. हे सर्व पाप नष्ट करते.

कृष्ण पक्षात रोज एकेक घास घ्यावा. शुक्त पक्षात वाढवावा. अमावास्येस भोजन करू नये. हा चांद्रायणविधी होय. दोन्ही पक्षात त्रिकाल स्नान केल्यानेही चांद्रायण होते.

सर्व अन्हिके उरकून सकाळी चार घास खावे. सूर्यास्त झाल्यावर चार घास खावे. हे शिशुचांद्रायण होय. मध्यान्हकाळी हविष्यान्नाचे आठ ग्रास नियमित भक्षण करावे म्हणजे यात चांद्रायण होते. रुद्र, वसू आदित्य यांचे आचरण करतात. त्यामुळे सर्व देव व भूमीसह वायु कुशलसंपन्न झाले आहेत.

हे सर्व विधीयुक्त आचरण करावे. या व्रतामुळे मन शुद्ध होते. त्यामुळे कर्मे शुद्ध होतात. नंतर त्याला सर्व इष्ट पदार्थ साध्य होतात.

सर्व कर्म रहित होऊन तीन रात्री उपवास करावा किंवा तीन व्रते करावी व कर्मास आरंभ करावा. आता पुरश्चरण फल सांगतो.

गायत्रीचे पुरश्चरण सर्व हेतु पूर्ण करते. हे नारदा, महापातकांचा नाश करते. ते विधान मी तुला सांगितले. प्रथम मंत्रवान पुरुषाने देहशुद्धी होणारे व्रत करावे. नंतर पुरश्चरण करावे म्हणजे तो साधक समस्त फलास पात्र होतो. हे नारदमुने, ह्याप्रमाणे मी तुला गुह्य असे पुरश्चरण विधान सांगितले. हे इतरांना सांगू नये. कारण श्रुतींचे सार आहे असे शास्त्रात सांगितले आहे.अध्याय तेविसावा समाप्त

GO TOP