श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
दशमः स्कन्धः
प्रथमोऽध्यायः


मनुकृतं देवीस्तवनम्

नारद उवाच
नारायण धराधार सर्वपालनकारण ।
भवतोदीरितं देवीचरितं पापनाशनम् ॥ १ ॥
मन्वन्तरेषु सर्वेषु सा देवी यत्स्वरूपिणी ।
यदाकारेण कुरुते प्रादुर्भावं महेश्वरी ॥ २ ॥
तान्नः सर्वान्समाख्याहि देवीमाहात्म्यमिश्रितान् ।
यथा च येन येनेह पूजिता संस्तुतापि हि ॥ ३ ॥
मनोरथान्पूरयति भक्तानां भक्तवत्सला ।
तन्नः शुभूषमाणानां देवीचरितमुत्तमम् ॥ ४ ॥
वर्णयस्व कृपासिन्धो येनाप्नोति सुखं महत् ।
श्रीनारायण उवाच
आकर्णय महर्षे त्वं चरितं पापनाशनम् ॥ ५ ॥
भक्तानां भक्तिजननं महासम्पत्तिकारकम् ।
जगद्योनिर्महातेजा ब्रह्मा लोकपितामहः ॥ ६ ॥
आविरासीन्नाभिपद्माद्देवदेवस्य चक्रिणः ।
स चतुर्मुख आसाद्य प्रादुर्भावं महामते ॥ ७ ॥
मनुं स्वायम्भुवं नाम जनयामास मानसात् ।
स मानसो मनुः पुत्रो ब्रह्मणः परमेष्ठिनः ॥ ८ ॥
शतरूपां च तत्पत्‍नीं जज्ञे धर्मस्वरूपिणीम् ।
स मनुः क्षीरसिन्धोश्च तीरे परमपावने ॥ ९ ॥
देवीमाराधयामास महाभाग्यफलप्रदाम् ।
मूर्तिं च मृण्मयीं तस्या विधाय पृथिवीपतिः ॥ १० ॥
उपासते स्म तां देवीं वाग्भवं स जपन् रहः ।
निराहारो जितश्वासो नियमव्रतकर्शितः ॥ ११ ॥
एकपादेन सन्तिष्ठन् धरायामनिशं स्थिरः ।
शतवर्षं जितः कामः क्रोधस्तेन महात्मना ॥ १२ ॥
भेजे स्थावरतां देव्याश्चरणौ चिन्तयन् हृदि ।
तस्य तत्तपसा देवी प्रादुर्भूता जगन्मयी ॥ १३ ॥
उवाच वचनं दिव्यं वरं वरय भूमिप ।
तत आनन्दजनकं श्रुत्वा वाक्यं महीपतिः ॥ १४ ॥
वरयामास तान् हृत्स्थान् वरानमरदुर्लभान् ।
मनुरुवाच
जय देवि विशालाक्षि जय सर्वान्तरस्थिते ॥ १५ ॥
मान्ये पूज्ये जगद्धात्रि सर्वमङ्‌गलमङ्‌गले ।
त्वत्कटाक्षावलोकेन पद्मभूः सृजते जगत् ॥ १६ ॥
वैकुण्ठः पालयत्येव हरः संहरते क्षणात् ।
शचीपतिस्त्रिलोक्याश्च शासको भवदाज्ञया ॥ १७ ॥
प्राणिनः शिक्षयत्येव दण्डेन च परेतराट् ।
यादसामधिपः पाशी पालनं मादृशामपि ॥ १८ ॥
कुरुते स कुबेरोऽपि निधीनां पतिरव्ययः ।
हुतभुङ्‌नैर्ऋतो वायुरीशानः शेष एव च ॥ १९ ॥
त्वदंशसम्भवा एव त्वच्छक्तिपरिबृंहिताः ।
अथापि यदि मे देवि वरो देयोऽस्ति साम्प्रतम् ॥ २० ॥
तदा प्रह्वाः सर्गकार्ये विघ्ना नश्यन्तु मे शिवे ।
वाग्भवस्यापि मन्त्रस्य ये केचिदुपसेविनः ॥ २१ ॥
तेषां सिद्धिः सत्वरापि कार्याणां जायतामपि ।
ये संवादमिमं देवि पठन्ति श्रावयन्ति च ॥ २२ ॥
तेषां लोके भुक्तिमुक्ती सुलभे भवतां शिवे ।
जातिस्मरत्वं भवतु वक्तृत्वं सौष्ठवं तथा ॥ २३ ॥
ज्ञानसिद्धिः कर्ममार्गसंसिद्धिरपि चास्तु हि ।
पुत्रपौत्रसमृद्धिश्च जायेदित्येव मे वचः ॥ २४ ॥


मनूची तपश्चर्या

नारद म्हणाले, हे नारायणा, ''ती देवी प्रत्येक मन्वंतरात कोणत्या स्वरूपात जगाचा आकार प्रादुर्भुत करते ? इहलोकी तिचे पूजन व स्तुती कोणी केली ? ते सुखावह चरित्र मला सांगा.'' श्री नारायण म्हणाले, ''हे ब्रह्मर्षे, आता ते पापनाशक चरित्र मी तुला सांगतो. विष्णूच्या नाभिकमलापासून पितामह प्रकट झाला. नंतर त्याने स्वायंभुव मनूला निर्माण केले. नंतर ब्रह्मदेवाने शतरूपाला उत्पन्न केले. मनूने क्षीरसागराच्या काठी देवीची आराधना केली. त्याने देवीची मृण्मय मूर्ती स्थापून तिची सेवा केली. त्याने एकांतात वाग्भव मंत्राचा जप केला. निराहार राहून व श्वासाचा निरोध करून एका पायावर उभे राहून त्याने षड्‌रिपूंना जिंकून शंभर वर्षे तप केले. पाषाणवत् स्थिर राहून त्याने देवीची उपासना केली. तेव्हा ती जगन्माता देवी प्रकट झाली. ती म्हणाली, ''वर माग.''
तेव्हा मनू म्हणाला, हे विशालाक्षी, तुझा जयजयकार असो. हे सर्वांतर्यामी, तुला नमस्कार असो. हे पूजनीय जगज्जननी, तुझ्या कृपाकटाक्षानेच ब्रह्मदेव जग उत्पन्न करतो, विष्णु पालन करतो व शिव त्याचा संहार करतो. शचीपती त्रैलोक्याचे राज्य करतो. यम दंडाने प्राण्यांना शिक्षा करतो. वरुण जलचरांचे पालन करतो. कुबेर निधीचे रक्षण करतो. अग्नी, नैर्ऋत, वायु, ईशान, शेष इत्यादी तुझ्याच अंशापासून निर्माण झाले आहेत व तुझ्या शक्तीमुळेच ते शक्तिमान होतात. म्हणून हे वरदायिनी, माझ्या सर्व कार्यातील विघ्ने नष्ट होतील असे कर. तसेच तुझा वाग्भव मंत्र जपणार्‍याचे मनोरथ पूर्ण होवो. तसेच ह्या संवादाचे पठण करणारास इहलोकी सुख लाभून मुक्ती मिळो. त्यांना पूर्व जन्माचे स्मरण राहो. ते उत्तम वक्तृत्व करोत. ज्ञान व कर्म यांची सिद्धी प्राप्त होवो. तसेच त्यांच्या पुत्रपौत्रांची वृद्धी होवो. हे देवी, असा मला वर दे.''इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
दशमस्कन्धे मनुकृतं देवीस्तवनं नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥

अध्याय पहिला समाप्त

GO TOP