श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
षष्ठः स्कन्धः
अष्टमोऽध्यायः


इन्द्राण्या शक्रदर्शनम्

व्यास उवाच
नहुषस्त्वथ तां श्रुत्वा गुरोस्तु शरणं गताम् ।
चुक्रोध स्मरबाणार्तस्तमाङ्‌गिरसमाशु वै ॥ १ ॥
देवानाहाङ्‌गिरासूनुर्हन्तव्योऽयं मया किल ।
इतीन्द्राणीं गृहे मूढो रक्षतीति मया श्रुतम् ॥ २ ॥
इति तं कुपितं दृष्ट्वा देवाः सर्षिपुरोगमाः ।
अब्रुवन्नहुषं घोरं सामपूर्वं वचस्तदा ॥ ३ ॥
क्रोधं संहर राजेन्द्र त्यज पापमतिं प्रभो ।
निन्दन्ति धर्मशास्त्रेषु परदाराभिमर्शनम् ॥ ४ ॥
शक्रपत्‍नी सदा साध्वी जीवमाने पतौ पुनः ।
कथमन्ये पतिं कुर्यात्सुभगातिपतिव्रता ॥ ५ ॥
त्रिलोकीशस्त्वमधुना शास्ता धर्मस्य वै विभो ।
त्वादृशोऽधर्ममातिष्ठेत्तदा नश्येत्प्रजा ध्रुवम् ॥ ६ ॥
सर्वथा प्रभुणा कार्यं शिष्टाचारस्य रक्षणम् ।
वारमुख्याश्च शतशो वर्तन्तेऽत्र शचीसमाः ॥ ७ ॥
रतिस्तु कारणं प्रोक्तं शृङ्गारस्य महात्मभिः ।
रसहानिर्बलात्कारे कृते सति तु जायते ॥ ८ ॥
उभयोः सदृशं प्रेम यदि पार्थिवसत्तम ।
तदा वै सुखसम्पत्तिरुभयोरुपजायते ॥ ९ ॥
तस्माद्‌भावमिमं मुञ्च परदाराभिमर्शने ।
सद्‌भावं कुरु देवेन्द्र पदं प्राप्तोऽस्यनुत्तमम् ॥ १० ॥
ऋद्धिक्षयस्तु पापेन पुण्येनातिविवर्धनम् ।
तस्मात्पापं परित्यज्य सन्मतिं कुरु पार्थिव ॥ ११ ॥
नहुष उवाच
गौतमस्य यदा भुक्ता दाराः शक्रेण देवताः ।
वाचस्पतेस्तु सोमेन क्व यूयं संस्थितास्तदा ॥ १२ ॥
परोपदेशे कुशला प्रभवन्ति नराः किल ।
कर्ता चैवोपदेष्टा च दुर्लभः पुरुषो भवेत् ॥ १३ ॥
मामागच्छतु सा देवी हितं स्यादद्‌भुतं हि वः ।
एतस्याः परमं देवाः सुखमेव भविष्यति ॥ १४ ॥
अन्यथा न हि तुष्येऽहं सत्यमेतद्‌ब्रवीमि वः ।
विनयाद्वा बलाद्वापि तामाशु प्रापयन्त्विह ॥ १५ ॥
इति तस्य वचः श्रुत्वा देवाश्च मुनयस्तथा ।
तमूचुश्चातिसन्त्रस्ता नहुषं मदनातुरम् ॥ १६ ॥
इन्द्राणीमानयिष्यामः सामपूर्वं तवान्तिकम् ।
इत्युक्त्वा ते तदा जग्मुर्बृहस्पतिनिकेतनम् ॥ १७ ॥
व्यास उवाच
ते गत्वाङ्‌गिरसः पुत्रं प्रोचुः प्राञ्जलयः सुराः ।
जानीमः शरणं प्राप्तामिन्द्राणीं तव वेश्मनि ॥ १८ ॥
सा देया नहुषायाद्य वासवोऽसौ कृतो यतः ।
वृणोत्वियं वरारोहा पतित्वे वरवर्णिनी ॥ १९ ॥
बृहस्पतिः सुरानाह तच्छ्रुत्वा दारुणं वचः ।
नाहं त्यक्ष्ये तु पौलोमीं सतीं च शरणागताम् ॥ २० ॥
देवा ऊचुः
उपायोऽन्यः प्रकर्तव्यो येन सोऽद्य प्रसीदति ।
अन्यथा कोपसंयुक्तो दुराराध्यो भविष्यति ॥ २१ ॥
गुरुरुवाच
तत्र गत्वा शची भूपं प्रलोभ्य वचसा भृशम् ।
करोतु समयं बाला पतिं ज्ञात्वा मृतं भजे ॥ २२ ॥
इन्द्रे जीवति मे कान्ते कथमन्यं करोम्यहम् ।
अन्वेषणार्थं गन्तव्यं मया तस्य महात्मनः ॥ २३ ॥
इति सा समयं कृत्वा वञ्चयित्वा च भूपतिम् ।
भर्तुरानयने यत्‍नं करोतु मम वाक्यतः ॥ २४ ॥
इति सञ्चिन्त्य मे सर्वे बृहस्पतिपुरोगमाः ।
नहुषं सहिता जग्मुरिन्द्रपत्‍न्या दिवौकसः ॥ २५ ॥
तानागतान्ममीक्ष्याह तदा कृत्रिमवासवः ।
जहर्ष च मुदायुक्तस्तां वीक्ष्य मुदितोऽब्रवीत् ॥ २६ ॥
अद्यास्मि वासवः कान्ते भज मां चारुलोचने ।
पतित्वे सर्वलोकस्य पूज्योऽहं विहितः सुरैः ॥ २७ ॥
इत्युक्ता सा नृपं प्राह वेपमाना त्रपायुता ।
वरमिच्छाम्यहं राजंस्त्वत्तः प्राप्तं सुरेश्वर ॥ २८ ॥
किञ्चित्कालं प्रतीक्षस्व यावत्कुर्वे विनिर्णयम् ।
इन्द्रोऽस्तीति न वास्तीति सन्देहो मे हृदि स्थितः ॥ २९ ॥
ततस्त्वां समुपस्थास्ये कृत्वा निश्चयमात्मनि ।
तावत्क्षमस्व राजेन्द्र सत्यमेतद्‌ब्रवीमि ते ॥ ३० ॥
न हि विज्ञायते शक्रो नष्टः किं वा क्व वा गतः ।
एवमुक्तः स चेन्द्राण्या नहुषः प्रीतिमानभूत् ॥ ३१ ॥
व्यसर्जयत्स तां देवीं तथेत्युक्त्वा मुदान्वितः ।
सा विसृष्टा नृपेणाशु गत्वा प्राह सुरान्सती ॥ ३२ ॥
इन्द्रस्यागमने यत्‍नं कुरुताद्य कृतोद्यमाः ।
श्रुत्वा तद्वचनं देवा इन्द्राण्या रसवच्छुचि ॥ ३३ ॥
मन्त्रयामासुरेकाग्राः शक्रार्थं नृपसत्तम ।
ते गत्वा वैष्णवं धाम तुष्टुवुः परमेश्वरम् ॥ ३४ ॥
आदिदेवं जगन्नाथं शरणागतवत्सलम् ।
ऊचुश्चैनं समुद्विग्ना वाक्यं वाक्यविशारदाः ॥ ३५ ॥
देवदेव सुरपतिर्ब्रह्महत्याप्रपीडितः ।
अदृश्यः सर्वभूतानां क्वापि तिष्ठति वासवः ॥ ३६ ॥
त्वद्धिया निहते विप्रे ब्रह्महत्या कुतः प्रभो ।
त्वं गतिस्तस्य भगवन्नस्माकं च तथैव हि ॥ ३७ ॥
त्राहि नः परमापन्नान्मोक्षं तस्य विनिर्दिश ।
देवानां वचनं श्रुत्वा कातरं विष्णुरब्रवीत् ॥ ३८ ॥
यजतामश्वमेधेन शक्रपापनिवृत्तये ।
पुण्येन हयमेधेन पावितः पाकशासनः ॥ ३९ ॥
पुनरेष्यति देवानामिन्द्रत्वमकुतोभयः ।
हयमेधेन सन्तुष्टा देवी श्रीजगदम्बिका ॥ ४० ॥
ब्रह्महत्यादिपापानि नाशयिष्यत्यसंशयम् ।
यस्याः स्मरणमात्रेण पापजालं विनश्यति ॥ ४१ ॥
किं पुनर्वाजिमेधेन तत्प्रीत्यर्थं कृतेन च ।
इन्द्राणी कुरुतान्नित्यं भगवत्याः प्रपूजनम् ॥ ४२ ॥
आराधनं शिवायास्तु सुखकारि भविष्यति ।
नहुषोऽपि जगन्मातुर्मायया मोहितः किल ॥ ४३ ॥
विनाशं स्वकृतेनाशु गमिष्यत्येनसा सुराः ।
पावितश्चाश्वमेधेन तुराषाडपि वैभवम् ॥ ४४ ॥
प्राप्स्यत्यचिरकालेन स्वमासनमनुत्तमम् ।
ते तु श्रुत्वा शुभां वाणीं विष्णोरमिततेजसः ॥ ४५ ॥
जग्मुस्तं देशमनिशं यत्रास्ते पाकशासनः ।
तमाश्वास्य सुराः शक्रं बृहस्पतिपुरोगमाः ॥ ४६ ॥
कारयामासुरखिलं हयमेधं महाक्रतुम् ।
विभज्य ब्रह्महत्यां तु वृक्षेषु च नदीषु च ॥ ४७ ॥
पर्वतेषु पृथिव्यां च स्त्रीषु चैवाक्षिपद्विभुः ।
तां विसृज्य च भूतेषु विपापः पाकशासनः ॥ ४८ ॥
विज्वरः समभूद्‌भूयः कालाकाङ्क्षी स्थितो जले ।
अदृश्यः सर्वभूतानां पद्मनाले व्यतिष्ठत ॥ ४९ ॥
देवास्तु निर्गताः स्थाने कृत्वा कार्यं तदद्‌भुतम् ।
पौलोमी तु गुरुं प्राह दुःखिता विरहाकुला ॥ ५० ॥
कृतयज्ञोऽपि मे भर्ता किमदृश्यः पुरन्दरः ।
कथं द्रक्ष्ये प्रियं स्वामिंस्तमुपायं वदस्व मे ॥ ५१ ॥
बृहस्पतिरुवाच
त्वमाराधय पौलोमि देवीं भगवतीं शिवाम् ।
दर्शयिष्यति ते नाथं देवी विगतकल्मषम् ॥ ५२ ॥
आराधिता जगद्धात्री नहुषं वारयिष्यति ।
मोहयित्वा नृपं स्थानात्पातयिष्यति चाम्बिका ॥ ५३ ॥
इत्युक्ता सा तदा तेन पुलोमतनया नृप ।
जग्राह मन्त्रं विधिवद्‌गुरोर्देव्याः ससाधनम् ॥ ५४ ॥
विद्यां प्राप्य गुरोर्देवी देवीं श्रीभुवनेश्वरीम् ।
सम्यगाराधयामास बलिपुष्पार्चनैः शुभै ॥ ५५ ॥
त्यक्तान्यभोगसम्भारा तापसीवेषधारिणी ।
चकार पूजनं देव्याः प्रियदर्शनलालसा ॥ ५६ ॥
कालेन कियता तुष्टा प्रत्यक्षं दर्शनं ददौ ।
सौम्यरूपधरा देवी वरदा हंसवाहिनी ॥ ५७ ॥
सूर्यकोटिप्रतीकाशा चन्द्रकोटिसुशीतला ।
विद्युत्कोटिसमानाभा चतुर्वेदसमन्विता ॥ ५८ ॥
पाशांकुशाभयवरान्दधती निजबाहुभिः ।
आपादलम्बिनीं स्वच्छां मुक्तामालां च बिभ्रती ॥ ५९ ॥
प्रसन्तस्मेरवदना लोचनत्रयभूषिता ।
आब्रह्मकीटजननी करुणामृतसागरा ॥ ६० ॥
अनन्तकोटिब्रह्माण्डनायिका परमेश्वरी ।
सौम्यानन्तरसैर्युक्तस्तनद्वयविराजिता ॥ ६१ ॥
सर्वेश्वरी च सर्वज्ञा कूटस्थाक्षररूपिणी ।
तामुवाच प्रसन्ना सा शक्रपत्‍नीं कृतोद्यमाम् ॥ ६२ ॥
मेघगम्भीरशब्देन मुदमाददती भृशम् ।
देव्युवाच
वरं वरय सुश्रोणि वाञ्छितं शक्रवल्लभे ॥ ६३ ॥
ददाम्यद्य प्रसन्नास्मि पूजिता सुभृशं त्वया ।
वरदाहं समायाता दर्शनं सहजं न मे ॥ ६४ ॥
अनेककोटिजन्मोत्थपुण्यपुञ्जैर्हि लभ्यते ।
इत्युक्ता सा तदा देवी तामाह प्रणता पुरः ॥ ६५ ॥
शक्रपत्‍नी भगवतीं प्रसन्नां परमेश्वरीम् ।
वाञ्छामि दर्शनं मातः पत्युः परमदुर्लभम् ॥ ६६ ॥
नहुषाद्‌भयनाशं च स्वपदप्रापणं तथा ।
देव्युवाच
गच्छ त्वमनया दूत्या सार्धं श्रीमानसं सरः ॥ ६७ ॥
यत्र मे मूर्तिरचला विश्वकामाभिधा मता ।
तत्र पश्यसि शक्रं त्वं दुःखितं भयविह्वलम् ॥ ६८ ॥
मोहयिष्यामि राजानं कालेन कियता पुनः ।
स्वस्था भव विशालाक्षि करोमि तव चेप्सितम् ॥ ६९ ॥
भ्रंशयिष्यामि भूपालं मोहितं त्रिदशासनात् ।
व्यास उवाच
देवीदूती तां गृहीत्वा शक्रपत्‍नीं त्वरान्विता ॥ ७० ॥
प्रापयामास सान्निध्यं स्वपत्युः परमेश्वरीम् ।
सा दृष्ट्वा तं पतिं बाला सुरेशं गुप्तसंस्थितम् ।
मुदिताभूद्वरं वीक्ष्य बहुकालाभिवाञ्छितम् ॥ ७१ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्या संहितायां
षष्ठस्कन्धे इन्द्राण्या शक्रदर्शनं नामाष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥


नहुषाला इंद्रपत्नीची अभिलाषा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

गुरूने शचीला संरक्षण दिल्यामुळे नहुष राजा गुरूवर क्रुद्ध झाला. तो म्हणाला, "हे देवहो, मी गुरूचा वध करीन. कारण तो आपल्या घरात इंद्राणीचे रक्षण करीत आहे.''

क्रुद्ध झालेल्या नहुषाला पाहून देव ऋषींना घेऊन नहुषाकडे गेले व त्याला म्हणाले, ''राजेंद्रा, पापबुद्धी धरू नकोस. धर्माप्रमाणे परस्त्रीगमन हे निंद्य आहे. पती जिवंत असताना ती साध्वी पतिव्रता दूसरा पती वरणार नाही. तू धर्म सोडल्यास प्रजेचा नाश होईल. सर्वेश्वराने शिष्टाचारच पाळला पाहिजे. स्वर्गात शचीपेक्षाही सुंदर किती तरी वेश्या आहेत. त्यांचा स्वीकार कर. बलात्काराने रसभंग होतो.

हे नृपश्रेष्ठा, रतिक्रीडेसाठी दोघांचेही प्रेम असणे आवश्यक आहे तरच सुख मिळते. म्हणून तू सद्‍बुद्धी धर. तुला इंद्रपद प्राप्त झाले आहे तेव्हा पापवासना न धरता सदाचारी हो."

नहुष म्हणाला, ''हे देवांनो, इंद्राने गौतम स्त्रीचा, चंद्राने गुरुपत्नीचा उपभोग घेतला, तेव्हा धर्म कोठे गेला होता ? शब्दपांडित्याने दुसर्‍याला उपदेश करणारे पुष्कळ असतात. पण स्वत: तसे वागत नाही. तेव्हा इंद्राणीने माझ्याकडे यावे म्हणजे तिलाही सुख प्राप्त होईल. मला तिच्याशिवाय सुख वाटणार नाही. तेव्हा तिला इकडे घेऊन या."

तेव्हा अत्यंत त्रस्त झालेले देव त्या मदन व्याकुळ राजाला म्हणाले, सामपूर्वक आम्ही तिला इकडे आणतो.

असे सांगून देव बृहस्पतीच्या घरी गेले. ते म्हणाले, "हे गुरो, इंद्राणी आपल्या घरी आहे असे कळले. तिला आपण नहुषाचे स्वाधीन करा. त्याला सर्वांनी इंद्र केले आहे म्हणून त्या स्त्रीने त्याला पती करावे.''

बृहस्पती म्हणाला, "हे देवांनो, शरण आलेल्या इंद्राणीचा त्याग मी करणार नाही.''

देव म्हणाले, "मग नहुषाला प्रसन्न करण्याचा दुसरा उपाय सांगा. तो क्रुद्ध झाल्यास परिस्थिती कठीण होईल.''

बृहस्पती म्हणाले, ''इंद्राणीने राजाकडे जाऊन कपटाने म्हणावे, "माझा पती मृत झाल्याचे समजल्यास मी आपणाला पती करीन. कारण पती जिवंत असल्यास मी आपणाला पती कसे करावे ? म्हणून मी आता त्याचा शोध करते." असे सांगून राजापासून निघून जावे. नंतर पतीला आणण्याचा तिने प्रयत्न करावा.

असा विचार ठरल्यावर इंद्राणी व गुरू यांसह सर्व देव नहुषाकडे आले. ते येत असलेले पाहून राजाला आनंद झाला. तो इंद्राणीला म्हणाला, "कांते, सांप्रत मीच इंद्र आहे. माझा स्वीकार कर."

तेव्हा बृहस्पतीने सांगितल्याप्रमाणे इंद्राणी लाजत म्हणाली, ''हे राजा, माझा पती जिवंत आहे किंवा नाही याचा निर्णय होईपर्यंत आपण थांबावे. नंतर निश्चयाने मी आपला स्वीकार करीन. आपण तोपर्यंत मला क्षमा करा."

नहुष आनंदाने म्हणाला, ''बरे तर.''

नंतर इंद्राणी सत्वर देवांकडे गेली. ती म्हणाली, "हे देवांनो, इंद्राला लवकर शोधून आणा.''

तेव्हा सर्व देव इंद्राविषयी विचार करू लागले. वैकुंठाला जाऊन सर्वांनी जगन्नाथाचे स्तवन केले. ते त्या जगन्नाथाला म्हणाले, "हे सुरेश्वरा, ब्रह्महत्येने त्रस्त होऊन इंद्र गुप्ततेने वास्तव्य करीत आहे. हे भगवान, तुम्ही त्या इंद्राचे व आमचे रक्षण करणारे आहात. तेव्हा ब्रह्महत्येपासून इंद्राची मुक्ती कशी होईल ते सांगा.''

विष्णू म्हणाला, ''हे देवांनो, अश्वमेधयज्ञाने इंद्राच्या पापाचा नाश होईल. देवी जगदंबा संतुष्ट झाल्यावर सर्व पापे नाहीशी होतात. तिच्यासाठी हा यज्ञ करा. इंद्राणीला भगवतीचे पूजन करण्यास सांगा. तसेच शिवाची आराधना करा.

जगन्मातेच्या मायेने नहुष मोहित होऊन त्याच्या हातून घडलेल्या पापामुळे त्याचा नाश होईल. इंद्राला पुनः स्वस्थानाची प्राप्ती होईल.''

विष्णूने सांगितल्याप्रमाणे सर्व जेथे इंद्र राहात होता तेथे गेले. नंतर त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ देवांनी करविला. विष्णूने इंद्राच्या ब्रह्महत्येचे विभाग केले. ते वृक्ष, नद्या, पर्वत, पृथ्वी, स्त्रिया यांच्या ठिकाणी विभागून दिले.

इंद्राचा पापनाश झाल्याने तो निश्चिंत झाला, पण कालाची मार्गप्रतीक्षा करीत तो कमलाच्या नालातच राहिला.

असे हे अद्‌भुत कार्य करून देव परतले, विरहव्याकुळ इंद्राणी एकदा गुरूला म्हणाली, ''हे प्रभो, अश्वमेधानंतरही माझा पती मला का दिसत नाही ? त्याच्या भेटीसाठी काही तरी उपाय सांगा.''

बृहस्पती म्हणाले, ''हे इंद्राणी, तू भगवती शिवेची आराधना कर. ती देवी तुझ्या पापमुक्त पतीशी तुझी भेट घडवून देईल. तीच नहुषाचेही निवारण करून राजाला स्थानभ्रष्ट करील.''

त्यानंतर इंद्राणीने परिपूर्ण व विधियुक्त अशी देवी अंबिकेची आराधना केली. सर्व भोगांचा व सुखसाधनांचा त्याग करून तिने तामस वेष धारण केला. अत्यंत नम्र भावनेने पतिदर्शनासाठी तिने देवीची पूजा केली.

काही काल लोटल्यानंतर संतुष्ट झालेल्या देवीने इंद्राणीला दर्शन दिले. ती वरदायिनी हंसारूढ होऊन सौम्य रूपाने तेथे आली. विविध आयुधे तिने घेतली होती. विविध अलंकारांनी ती युक्त होती. तिने परिधान केलेली सुंदर मौक्तिकमाला पायापर्यंत रुळत होती.

ती प्रसन्न, हास्यमुद्रेने भूषित होती. ती अनंतकोटीब्रह्मांडनायिका परमेश्वरी अनंत रसांनी युक्त असलेल्या स्तनांनी झळकत होती. ती सर्वेश्वरी, सर्वज्ञ, कूटस्थ देवी अधर स्वरूपिणी होती.

मेघतुल्य गंभीर स्वरात ती देवी इंद्राणीला म्हणाली, "हे सुंदरी, वर माग. तुझ्या पूजनामुळे मी प्रसन्न झाले आहे. कोटयावधी जन्मांतील संचित पुण्याच्या प्रभावानेच माझे दर्शन होते."

इंद्रपत्नी नम्रपणाने म्हणाली, ''हे माते, मी पतीच्या दर्शनाची इच्छा करीत आहे. तसे नहुषापासून माझे रक्षण व्हावे. माझ्या पतीला पूर्वीचे स्थान प्राप्त करून दे.''

देवी म्हणाली, ''हे इंद्राणी, माझ्या दूतीला तू बरोबर ने व तू मानस सरोवरावर जा. तेथे विश्वकामा या नावाची माझी स्थिर मूर्ती आहे. तेथे दुःखी व भयग्रस्त इंद्राला पाहशील. मी इकडे नहुषाला मोहवश करते. हे विशालनयने, मी तुझी इच्छा पूर्ण करीन.''

नंतर देवीच्या सांगण्याप्रमाणे इंद्रपत्नी दूतीला बरोबर घेऊन तिकडे गेली. तिथे बर्‍याच काळानंतर तिने आपल्या पतीला अवलोकन केले. पतिदर्शनाने व आपले वांच्छित पूर्ण होणार या आशेने तिला आनंद झाला.अध्याय आठवा समाप्त


GO TOP