श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
षष्ठः स्कन्धः
एकविंशोऽध्यायः


राजपुत्र्याः एकावल्याः वर्णनम्

व्यास उवाच
जातकर्मादिसंस्कारांश्चकार नृपतिस्तदा ।
दिने दिने जगामाशु वृद्धिं बालः सुलालितः ॥ १ ॥
नृपः संसारजं प्राप्य सुखं पुत्रसभुद्‌भवम् ।
ऋणत्रयविमोक्षं च मेने तेन महात्मना ॥ २ ॥
षष्ठेऽन्नप्राशनं तस्य कृत्वा मासि यथाविधि ।
तृतीयेऽथ तथा वर्षे चूडाकरणमुत्तमम् ॥ ३ ॥
चकार ब्राह्मणान् द्रव्यैः सम्पूज्य विविधैर्धनैः ।
गोभिश्च विविधैर्दानैर्याचकानितरानपि ॥ ४ ॥
वर्षे चैकादशे तस्य मौञ्जीबन्धनकर्म वै ।
कारयित्वा धनुर्वेदमध्यापयत पार्थिवः ॥ ५ ॥
अधीतवेदं पुत्रं तं राजधर्मविशारदम् ।
दृष्ट्वा तस्याभिषेकाय मतिं चक्रे जनाधिपः ॥ ६ ॥
पुष्यार्कयोगसंयुक्ते दिवसे नृपसत्तमः ।
कारयामास सम्भारानभिषेकार्थमादरात् ॥ ७ ॥
द्विजानाहूय वेदज्ञान् सर्वशास्त्रविचक्षणान् ।
अभिषेकं चकारासौ विधिवत् स्वात्मजस्य ह ॥ ८ ॥
जलमानीय तीर्थेभ्यः सागरेभ्यश्च पार्थिवः ।
स्वयं चकार विथिवदभिषेकं शुभे दिने ॥ ९ ॥
धनं दत्त्वाथ विप्रेभ्यो राज्यं पुत्रे निवेश्य सः ।
जगाम वनमेवाशु स्वर्गकामः स भूपतिः ॥ १० ॥
एकवीरं नृपं कृत्वा सम्मान्य सचिवानथ ।
भार्यया सह भूपालः प्रविवेश वनं वशी ॥ ११ ॥
मैनाकशिखरे राजा कृत्वा तार्तीयमाश्रमम् ।
नित्यं पत्रफलाहारश्चिन्तयामास पार्वतीम् ॥ १२ ॥
एवं स नृपतिः कृत्वा दिष्टान्ते सह भार्यया ।
मृतोऽसौ वासवं लोकं गतः पुण्येन कर्मणा ॥ १३ ॥
इन्द्रलोकं पिता प्राप्त इति श्रुत्वाथ हैहयः ।
चकार वेदनिर्दिष्टं कर्म चैवौर्ध्वदैहिकम् ॥ १४ ॥
कृत्वोत्तराः क्रियाः सर्वाः पितुः पार्थिवनन्दनः ।
राज्यं चकार मेधावी पित्रा दत्तं सुसम्मतम् ॥ १५ ॥
एकवीरोऽथ धर्मज्ञः प्राप्य राज्यमनुत्तमम् ।
बुभुजे विविधान् भोगान्सचिवैश्च सुमानितः ॥ १६ ॥
एकस्मिन् दिवसे राजा मन्त्रिपुत्रैः समन्वितः ।
जगाम जाह्नवीतीरे हयारूढः प्रतापवान् ॥ १७ ॥
सम्पश्यन् पादपान् रम्यान् कोकिलालापसंयुतान् ।
पुष्पितान् फलसंयुक्तान् षट्पदालिविराजितान् ॥ १८ ॥
मुनीनामाश्रमान्दिव्यान् वेदध्वनिनिनादितान् ।
होमधूमावृताकाशान् मृगशावसमावृतान् ॥ १९ ॥
केदाराञ्छालिसम्पक्वान् गोपिकाभिः सुरक्षितान् ।
प्रफुल्लपङ्कजारामान्निकुञ्जांश्च मनोरमान् ॥ २० ॥
प्रेक्षमाणः प्रियालांस्तु चम्पकान् पनसद्रुमान् ।
बकुलांस्तिलकान्नीपान्मन्दारांश्च प्रफुल्लितान् ॥ २१ ॥
शालांस्तालांस्तमालांश्च जम्बूचूतकदम्बकान् ।
स गच्छञ्जाह्नवीतोये प्रफुल्लं शतपत्रकम् ॥ २२ ॥
पङ्कजं चातिगन्धाढ्यमपश्यदवनीपतिः ।
दक्षिणे जलजस्याथ पार्श्वे कमललोचनाम् ॥ २३ ॥
कनकाभां सुकेशीं च कम्बुग्रीवां कृशोदरीम् ।
बिम्बोष्ठी सुन्दरीं किञ्चित्समुद्यत्सुपयोधराम् ॥ २४ ॥
सुनासां चारुसर्वाङ्गीमपश्यत् कन्यकां नृपः ।
रुदतीं तां सखीं त्यक्त्वा विह्वलां दुःखपीडिताम् ॥ २५ ॥
साश्रुनेत्रां क्रन्दमानां विजने कुररीमिव ।
संवीक्ष्य राजा पप्रच्छ कन्यकां शोककारणम् ॥ २६ ॥
सुनसे ब्रूहि कासि त्वं कस्य पुत्री शुभानने ।
गन्धर्वी देवकन्याथ कथं रोदिषि सुन्दरि ॥ २७ ॥
कथमेकाकिनी बाले त्यक्ता केन पिकस्वरे ।
पतिस्ते क्व गतः कान्ते पिता वा ब्रूहि साम्प्रतम् ॥ २८ ॥
किं ते दुःखमरालभ्रु कथयाद्य ममान्तिके ।
करोमि दुःखनाशं ते सर्वथैव कृशोदरि ॥ २९ ॥
न राज्ये मम तन्वङ्‌गि पीडां कोऽपि करोत्यलम् ।
न भयं चौरजं कान्ते न राक्षसभयं तथा ॥ ३० ॥
मयि शासति भूपाले नोत्पाता दारुणा भुवि ।
भयं न व्याघ्रसिंहेभ्यो न भयं कस्यचिद्‌भवेत् ॥ ३१ ॥
वद वामोरु कस्मात्त्वं विलापं जाह्नवीतटे ।
करोषि त्राणहीनात्र किं ते दुःखं वदस्व मे ॥ ३२ ॥
हन्म्यहं दुःखमत्युग्रं प्राणिनां पृथिवीतले ।
दैवं च मानुषं कान्ते व्रतमेतन्ममाद्‌भुतम् ॥ ३३ ॥
विशाललोचने ब्रूहि करोमि तव चिन्तितम् ।
इत्युक्ते वचने राज्ञा श्रुत्वोवाच मृदुस्वना ॥ ३४ ॥
शृणु राजेन्द्र वक्ष्यामि मम शोकस्य कारणम् ।
विपत्तिरहितः प्राणी कथं रुदति भूपते ॥ ३५ ॥
प्रब्रवीमि महाबाहो यदर्थं रुदती त्वहम् ।
तव राज्यादन्यदेशे राजा परमधार्मिकः ॥ ३६ ॥
रैभ्यो नाम महाराजः सन्तानरहितो भृशम् ।
तस्य भार्या सुविख्याता रुक्मरेखेति नामतः ॥ ३७ ॥
सुरूपा चतुरा साध्वी सर्वलक्षणसंयुता ।
अपुत्रा दुःखिता कान्तमित्युवाच पुनः पुनः ॥ ३८ ॥
किं जीवितेन मे नाथ धिग्वृथा जीवितं मम ।
वन्ध्यायाः सुखहीनाया ह्यपुत्राया धरातले ॥ ३९ ॥
इत्येवं भार्यया भूपः प्रेरितो मखमुत्तमम् ।
चकार ब्राह्मणांस्तज्ज्ञानाहूय विधिवत्तदा ॥ ४० ॥
पुत्रकामो धनं भूरि ददावथ यथोदितम् ।
हूयमाने घृतेऽत्यर्थं पावकादतिसुप्रभात् ॥ ४१ ॥
आविर्बभूव चार्वङ्गी कन्यका शुभलक्षणा ।
बिम्बोष्ठी सुदती सुभ्रूः पूर्णचन्द्रनिभानना ॥ ४२ ॥
कनकाभा सुकेशान्ता रक्तपाणितला मृदुः ।
सुरक्तनयना तन्वी रक्तपादतला भृशम् ॥ ४३ ॥
हुताशनात्समुद्‌भूता होत्रा सा स्वीकृता तदा ।
होता प्रोवाच राजानं गृहीत्वा तां सुमध्यमाम् ॥ ४४ ॥
राजन् पुत्रीं गृहाणेमां सर्वलक्षणसंयुताम् ।
एकावलीव सम्भूता हूयमानाद्धुताशनात् ॥ ४५ ॥
नाम्ना चैकावली लोके ख्याता पुत्री भविष्यति ।
सुखितो भव भूपाल पुत्र्या पुत्रसमानया ॥ ४६ ॥
सन्तोषं कुरु राजेन्द्र दत्ता देवेन विष्णुना ।
होतुर्वाक्यं नृपः श्रुत्वा दृष्ट्वा तां कन्यकां शुभाम् ॥ ४७ ॥
जग्राह परमप्रीतो होत्रा दत्तां सुसम्मताम् ।
गृहीत्वा नृपतिस्तां तु ददौ पत्‍न्यै वराननाम् ॥ ४८ ॥
आभाष्य रुक्मरेखायै गृहाण सुभगे सुताम् ।
सा तां कमलपत्राक्षीं प्राप्य कन्यां मनोरमाम् ॥ ४९ ॥
जहर्ष मुदिता राज्ञी पुत्रं प्राप्य यथासुखम् ।
चकार मङ्गलं कर्म जातकर्मादिकं शुभम् ॥ ५० ॥
पुत्रजन्मसमुत्थं यत्तत्सर्वं विधिवत्ततः ।
समाप्य च मखं राजा द्विजेभ्यो दक्षिणां शुभाम् ॥ ५१ ॥
दत्त्वा विसृज्य विप्रेन्द्रान् मुदं प्राप महीपतिः ।
दिने दिनेऽसितापाङ्गी पुत्रवृद्ध्या भृशं बभौ ॥ ५२ ॥
मुदं च परमां प्राप नृपभार्या सुतान्विता ।
उत्सवस्तद्दिने तस्य प्रवृत्तः सुतजन्मजः ॥ ५३ ॥
पुत्री पुत्रसमात्यर्थं बभूव वल्लभा किल ।
राज्ञो मन्त्रिसुता चाहं सुबुद्धे मन्मथाकृते ॥ ५४ ॥
यशोवती च मे नाम समानं वय आवयोः ।
वयस्याहं कृता राज्ञा क्रीडनाय तया सह ॥ ५५ ॥
सदा सहचरी जाता प्रेमयुक्ता दिवानिशम् ।
एकावली गन्धवन्ति यत्र पद्मानि पश्यति ॥ ५६ ॥
तत्र सा रमते बाला नान्यत्र सुखमाप्नुयात् ।
सुदूरे जाह्नवीतीरे भवन्ति कमलान्यपि ॥ ५७ ॥
रममाणा तत्र याता मत्समेता सखीयुता ।
मया निवेदितं राजन् पुत्री ते कमलाकरान् ॥ ५८ ॥
प्रेक्षमाणातिदूरे सा प्रयाति निर्जने वने ।
निषेधिताथ पित्रासौ गृहे कृत्वा जलाशयान् ॥ ५९ ॥
कमलान् वापयित्वाथ पुष्पितान् भ्रमरावृतान् ।
तथापि निर्ययौ बाला कमलासक्तचेतना ॥ ६० ॥
तदा राज्ञा रक्षपालाः प्रेरिताः शस्त्रपाणयः ।
एवं रक्षायुता तन्वी मत्समेता सखीयुता ।
क्रीडार्थं जाह्नवीतोये नित्यमायाति याति च ॥ ६१ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्या संहितायां
षष्ठस्कन्धे राजपुत्र्याः एकावल्याः वर्णनं नामैकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥


एकवीराची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

पुत्राचे जातकर्म केल्यावर राजा सुखाने त्या पुत्रासह राहू लागला. त्याला तिन्हीही ऋणातून मुक्तता झाल्याचा आनंद झाला होता. सहाव्या महिन्यात पुत्राचा अन्नप्राशन संस्कार, तिसर्‍या वर्षी चूडाकरण संस्कार राजाने यथासांग केले. त्यावेळी राजाने विपुल दानधर्म केला. अकराव्या वर्षी त्याचा उपनयन संस्कार करण्यात आला. राजाने त्या पुत्राला धनुर्वेदाचे शिक्षण दिले.

त्यानंतर त्याला राज्याभिषेक करण्याचे राजाने ठरविले. पुष्य नक्षत्र व रविवार असा मुहूर्त पाहून राजाने राज्याभिषेकाची तयारी केली. वेदशास्त्र ब्राह्मणांकरवी राजाने त्या पुत्राला राज्याभिषेक केला. उत्तम तीर्थाचे उदक त्यासाठी राजाने आणविले होते. नंतर राजाने ब्राह्मणांना विपुल दक्षिणा दिल्या. पुत्राच्या हाती सर्व राज्यकारभार सोपवून राजा भार्येसह स्वर्गप्राप्तीसाठी वनात गेला.

राजा वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करून मैनाक पर्वतावर गेला. कंदमुळांवर उपजीविका करून त्याने पार्वतीची आराधना करण्यास प्रारंभ केला. शेवटी मृत्यूनंतर स्वत:च्या पुण्याईने राजा भार्येसह इंद्रलोकी गेला.

राजा इंद्रलोकी गेल्याचे कळताच एकवीराने त्याचा और्ध्वदेहिक संस्कार केला. धार्मिकतेने राज्य करीत असताना विविध विषयांचा उपभोग घेतला. एकदा तो आपल्या मंत्र्यासह मृगयेसाठी जान्हवीच्या तीरावर गेला. त्या रम्य वनात होम वगैरे होत असलेले आश्रम राजाला दिसले. तसेच भाताच्या पिकाचे रक्षण करणार्‍या गोपाल स्त्रिया तेथे होत्या. ते विविध कमले उमललेले सुंदर उपवन पाहून त्याला आनंद झाला.

तेथे एके ठिकाणी गंगेच्या प्रवाहात शेकडो पाकळ्यांनी युक्त असे फुललेले कमल त्याला दिसले. त्या कमलाजवळ एक सुंदर कमलाक्षी स्त्री होती. सुवर्णाप्रमाणे कांती असलेली, सुंदर केसांची, शंखाप्रमाणे कंठ असलेली, कृशोदरी, उन्नत स्तनांची, सुंदर नासिकेची अशी ती सुंदरी दुःखाने विव्हल होऊन रडत होती. ते पाहून राजा तिच्याजवळ गेला व म्हणाला, "हे सुंदरी, तू कोण आहेस ? तू का दुःख करीत आहेस ? तुला येथे कोणी आणून टाकले ? हे सुभ्रू, हे तन्वंगी, माझ्या राज्यात दुसर्‍याला पीडा देणारे कोण आहे ? चोर, राक्षस यांपासूनही कुणाला भय नाही. तसेच उग्र श्वापदापासून भीती नाही. असे असताना तू का बरे दुःख करीत आहेस ? दुसर्‍यांचे दुःख हरण करण्याचे व्रत मी घेतले आहे. म्हणून तू तुझे दुःख सोड. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.''

राजाचे बोलणे ऐकून ती सुंदरी म्हणाली, "हे नृपश्रेष्ठा, दुःखाशिवाय कोण रडत बसेल ? दुसर्‍या एका राज्यात रम्य नावाचा एक धार्मिक राजा आहे. त्याला रुक्मिरेखा नावाची सुस्वरूप सर्वलक्षणसंपन्न भार्या आहे. पण पुत्रसंतान नसल्याने ते दांपत्य अत्यंत दुःखी आहे. त्यामुळे राणी राजाला वारंवार म्हणते, "हे नाथ, वांझ व निपुत्रिक अवस्थेत जगून माझा काय उपयोग ?''

राणीचे हे भाषण ऐकून राजाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला. त्याने विपुल दक्षिणांनी ब्राह्मणांना संतुष्ट केले. तेव्हा अज्य होमाचेवेळी अग्नीपासून एक सुलक्षणा कन्या उत्पन्न झाली. ती सुवर्णकांतीने युक्त होती, तिचे ओठ तोंडल्याप्रमाणे होते, तिच्या भिवया मनोहर होत्या. हाताचे तळवे आरक्त होते. शरीर मृदू होते. सुंदर नेत्रांची अशी मनोहर कन्या होती.

होत्याने अग्नीपासून तिचा स्वीकार केला व तो राजाला म्हणाला, ''हे राजा, सर्वलक्षणसंपन्न असलेल्या कन्येचा तू स्वीकार कर. ही एकावलीप्रमाणे अग्नीचे हवन चालू असता उत्पन्न झाली म्हणून ही एकावली या नावाने विख्यात होईल.

हे भूपाला, हिला स्वतःच्या कन्येप्रमाणे सांभाळून तू संतुष्ट हो. प्रत्यक्ष विष्णूनेच ही कन्या तुला दिली आहे असे समज."

होत्याचे ते बोलणे ऐकताच राजा संतुष्ट झाला. त्याने कन्येचा स्वीकार केला. राजा आपल्या पत्नीला म्हणाला, ''हे प्रिये, या कन्येचा स्वीकार कर.''

ती कमलनेत्र कन्या प्राप्त झाल्यावर राणीलाही फार आनंद झाला. जातकर्मादि विधी करून राजाने नामकरण केले. ब्राह्मणांना विपुल दक्षणा दिल्या. त्या कन्येचा जन्मदिवस राजा दरवर्षी उत्साहाने साजरा करीत असे. ती सुलक्षणी कन्या सर्वांना अत्यंत प्रिय झाली.

हे राजा, मी त्या राजाच्या मंत्र्याची कन्या असून माझे नाव यशोवती आहे. मी त्या राजकन्येची प्रिय मैत्रिण आहे. सुगंधी कमले जेव्हा तिच्या दृष्टीस पडतात तेव्हा ती तल्लीन होते. तिला इतर कोठेही सुख लाभत नाही. त्या जान्हवी तीरावर फुले विपुल आहेत. तेव्हा ती बाला मला व इतर सख्यांना घेऊन जाऊ लागली.

त्यावेळी मी त्या राजाला सांगितले, ''हे राजा, आपली कन्या सुंदर कमलांसाठी दूर निर्जन सरोवराकडे जात असते.''

त्यानंतर राजाने आपल्या मंदिरातच एक सुंदर उपवन तयार केले. त्यात सुंदर कमले लावली. पण कमलांवर फारच प्रेम असल्याने ती नित्य बाहेर जाऊ लागली. तेव्हा हे अवलोकन केल्यावर राजाने हत्यारबंद शिपायांना तिच्याबरोबर जाण्यास सांगतिले.

अशारीतीने तिच्या रक्षणासाठी राजाने योग्य सिद्धता करून ठेवली. तेव्हा ती राजकन्या रोज त्या जान्हवी तीरावर जाऊ लागली.



अध्याय एकविसावा समाप्त


GO TOP