श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
षष्ठः स्कन्धः
विंशोऽध्यायः


एकवीराख्यानवर्णनम्

जनमेजय उवाच
संशयोऽयं महानत्र जातमात्रः शिशुस्तथा ।
मुक्तः केन गृहीतोऽसावेकाकी विजने वने ॥ १ ॥
का गतिस्तस्य बालस्य जाता सत्यवतीसुत ।
व्याघ्रसिंहादिभिर्हिंस्रैर्गृहीतो नातिबालकः ॥ २ ॥
व्यास उवाच
लक्ष्मीनारायणौ तस्मात्स्थानाच्च चलितौ यदा ।
तदैव तत्र चम्पाख्यः प्राप्तो विद्याधरः किल ॥ ३ ॥
विमानवरमारूढः कामिन्या सहितो नृप ।
मदनालसया कामं क्रीडमानो यदृच्छया ॥ ४ ॥
विलोक्य तं शिशुं भूमावेकाकिनमनुत्तमम् ।
देवपुत्रप्रतीकाशं रममाणं यथासुखम् ॥ ५ ॥
विमानात्तरसोत्तीर्य चम्पकस्तं शिशु जवात् ।
जग्राह च मुदं प्राप निधिं प्राप्य यथाधनः ॥ ६ ॥
गृहीत्वा चम्पकः प्रादाद्देव्यै तं मदनोपमम् ।
मदनालसायै तं बालं जातमात्रं मनोहरम् ॥ ७ ॥
सा गृहीत्वा शिशुं प्रेम्णा सरोमाञ्चा सविस्मया ।
मुखं चुचुम्ब बालस्य कृत्वा तु हृदये भृशम् ॥ ८ ॥
आलिङ्‌गितश्चुम्बितश्च तयासौ प्रीतिपूर्वकम् ।
उत्सङ्गे च कृतस्तन्व्या पुत्रभावेन भारत ॥ ९ ॥
कृत्वाङ्के तौ समारूढौ विमानं दम्पती मुदा ।
पतिं पप्रच्छ चार्वङ्गी प्रहस्य मदनालसा ॥ १० ॥
कस्यायं बालकः कान्त त्यक्तः केन च कानने ।
पुत्रोऽयं मम देवेन दत्तस्त्र्यम्बकपाणिना ॥ ११ ॥
चम्पक उवाच
प्रिये गत्वाद्य पृच्छेयं शक्रं सर्वज्ञमाशु वै ।
देवो वा दानवो वापि गन्धर्वो वा शिशुः किल ॥ १२ ॥
तेनाज्ञप्तः करिष्यामि पुत्रं प्राप्तं वनादमुम् ।
अपृष्ट्वा नैव कर्तव्यं कार्यं किञ्चिन्मया ध्रुवम् ॥ १३ ॥
इत्युक्त्वा तां गृहीत्वा तं विमानेनाथ चम्पकः ।
ययौ शक्रपुरं तूर्णं हर्षेणोत्फुल्ललोचनः ॥ १४ ॥
प्रणम्य पादयोः प्रीत्या चम्पकस्तु शचीपतिम् ।
निवेद्य बालकं प्राह कृताञ्जलिपुटः स्थितः ॥ १५ ॥
देवदेव मया लब्धस्तीर्थे परमपावने ।
कालिन्दीतमसासङ्गे बालकोऽयं स्मरप्रभः ॥ १६ ॥
कस्यायं बालकः कान्तः कथं त्यक्तः शचीपते ।
आज्ञा चेत्तव देवेश कुर्वेऽहं बालकं सुतम् ॥ १७ ॥
अतीव सुन्दरो बालः प्रियाया वल्लभः सुतः ।
कृत्रिमस्तु सुतः प्रोक्तो धर्मशास्त्रेषु सर्वथा ॥ १८ ॥
इन्द्र उवाच
पुत्रोऽयं वासुदेवस्य वाजिरूपधरस्य ह ।
हैहयोऽयं महाभाग लक्ष्म्यां जातः परन्तपः ॥ १९ ॥
उत्पादितो भगवता कार्यार्थं किल बालकः ।
दातुं नृपतये नूनं ययातितनयाय च ॥ २० ॥
हरिणा प्रेरितः सोऽद्य राजा परमधार्मिकः ।
आगमिष्यति पुत्रार्थं तीर्थे तस्मिन्मनोरमे ॥ २१ ॥
तावत्त्वं गच्छ तत्रैव गृहीत्वा बालकं शुभम् ।
यावन्न याति नृपतिर्ग्रहीतुं हरिणेरितः ॥ २२ ॥
गत्वा तत्र विमुञ्चैनं विलम्बं मा कृथा वर ।
अदृष्ट्वा बालकं राजा दुःखितश्च भविष्यति ॥ २३ ॥
तस्माच्चम्पक मुञ्चैनं राजा प्राप्नोतु पुत्रकम् ।
एकवीरेति नाम्नायं ख्यातः स्यात् पृथिवीतले ॥ २४ ॥

व्यास उवाच
इति तस्य वचः श्रुत्वा चम्पकस्त्वरयान्वितः ।
जगाम पुत्रमादाय स्थले तस्मिन्महीपते ॥ २५ ॥
मुमोच बालकं तत्र यत्र पूर्वं स्थितो ह्यभूत् ।
आरुह्य स्वविमानं तु ययौ स्वाश्रममण्डलम् ॥ २६ ॥
तदैव कमलाकान्तो लक्ष्म्या सह जगद्‌गुरुः ।
विमानवरमारूढो जगाम नृपतिं प्रति ॥ २७ ॥
दृष्टस्तदा तेन नृपेण विष्णुः
    समुत्तरंस्तत्र विमानमुख्यात् ।
जहर्ष राजा हरिदर्शनेन
    पपात भूमौ खलु दण्डवच्च ॥ २८ ॥
उत्तिष्ठ वत्सेति हरिः पतन्त-
    माश्वासयद्‌भूमिगतं स्वभक्तम् ।
सोऽप्युत्सुको वासुदेवं पुरःस्थं
    तुष्टाव भक्त्या मुखरीकृतोऽथ ॥ २९ ॥
देवाधिदेवाखिललोकनाथ
    कृपानिधे लोकगुरो रमेश ।
मन्दस्य मे ते किल दर्शनं य-
    त्सुदुर्लभं योगिजनैरलभ्यम् ॥ ३० ॥
ये निःस्पृहास्ते विषयैरपेता-
    स्तेषां त्वदीयं खलु दर्शनं स्यात् ।
आशापरोऽहं भगवन्ननन्त
    योग्यो न ते दर्शने देवदेव ॥ ३१ ॥
इति स्तुतस्तेन नृपेण विष्णु-
    स्तमाह वाक्येन सुधामयेन ।
वृणीष्व राजन् मनसेप्सितं ते
    ददामि तुष्टस्तपसा तवेति ॥ ३२ ॥
ततो नृपस्तं प्रणिपत्य पादयोः
    प्रोवाच विष्णुं पुरतः स्थितं च ।
तपस्तु तप्तं हि मया सुतार्थे
    पुत्रं ददस्वात्मसमं मुरारे ॥ ३३ ॥
श्रुत्वा नृपप्रार्थितमादिदेव-
    स्तमाह राजानममोघवाक्यम् ।
ययातिसूनो व्रज तत्र तीर्थे
    कलिन्दकन्यातमसाप्रसङ्गे ॥ ३४ ॥
मयाद्य पुत्रस्तु यथेप्सितस्ते
    तत्रैव मुक्तोऽस्त्यमितप्रभावः ।
लक्ष्म्याः प्रसूतो मम वीर्यजश्च
    कृतस्तवार्थेऽथ गृहाण राजन् ॥ ३५ ॥
श्रुत्वा हरेर्वाक्यमतीव मृष्टं
    सन्तुष्टचित्तः प्रबभूव राजा ।
हरिस्तु दत्त्वेति वरं जगाम
    वैकुण्ठलोकं रमया युतश्च ॥ ३६ ॥
गते हरौ सोऽथ ययातिसूनु-
    र्ययावनुद्धातरथेन राजा ।
प्रेमान्वितस्तत्र सुतोऽस्ति यत्र
    वचो निशम्येति जनार्दनस्य ॥ ३७ ॥
स तत्र गत्वातिमनोहरं तं
    ददर्श बालं भुवि खेलमानम् ।
मुखे निवेश्यैककरेण कृत्वा
    श्लक्ष्णं पदाङ्गुष्ठमनन्यसत्त्वः ॥ ३८ ॥
तं वीक्ष्य पुत्रं मदनस्वरूपं
    नारायणांशं कमलाप्रसूतम् ।
हरिप्रभावं हरिवर्मनामा
    हर्षप्रफुल्लाननपङ्कजोऽभूत् ॥ ३९ ॥
गृह्णन् सुवेगात् करपङ्कजाभ्यां
    बभूव प्रेमार्णवमग्नदेहः ।
मूर्धन्युपाघ्राय मुदान्वितोऽसौ
    ननन्द राजा सुतमालिलिङ्ग ॥ ४० ॥
मुखं समीक्ष्यातिमनोहरं त-
    मुवाच नेत्राम्बुनिरुद्धकण्ठः ।
दत्तोऽसि देवेन जनार्दनेन
    मात्रा हि पुत्रावमदुःखभीतेः ॥ ४१ ॥
तप्तं मया पुत्र तपस्तवार्थे
    सुदुष्करं वर्षशतं च पूर्णम् ।
तेनैव तुष्टेन रमाप्रियेण
    दत्तोऽसि संसारसुखोदयाय ॥ ४२ ॥
माता रमा त्वां तनुजं मदर्थे
    त्यक्त्वा गता सा हरिणा समेता ।
धन्या तु सा या प्रहसन्तमङ्के
    कृत्वा सुतं त्वां मुदितानना स्यात् ॥ ४३ ॥
त्वमेव संसारसमुद्रनौका-
    रूपः कृतः पुत्र लक्ष्मीधरेण ।
इत्येवमुक्त्वा नृपतिः सुतं तं
    मुदा समादाय ययौ गृहाय ॥ ४४ ॥
पुरीसमीपे नृपमागतं त-
    माकर्ण्य सर्वे सचिवास्तु राज्ञः ।
ययुः समीपं नृपतेश्च लोकाः
    सोपायनास्ते सपुरोहिताश्च ॥ ४५ ॥
बन्दीजना गायनकाश्च सूताः
    समाययुः सम्मुखमाशु राज्ञः ।
नृपः पुरं प्राप्य पुरः समागतं
    जनं समाश्वास्य वाक्यैश्च दृष्ट्या ॥ ४६ ॥
सम्पूजितः पौरजनेन राजा
    विवेश पुत्रेण युतो नगर्याम् ।
मार्गेषु लाजैः कुसुमैः समन्ता-
    द्विकीर्यमाणो नृपतिर्जगाम ॥ ४७ ॥
गृहं समृद्धं सचिवैः समेतः
    सुतं समादाय मुदा कराभ्याम् ।
राज्ये ददौ चाथ सुतं मनोज्ञं
    सद्यःप्रसूतं च मनोभवाभम् ॥ ४८ ॥
राज्ञी गृहीत्वाभिनवं तनूजं
    पप्रच्छ राजानमनिन्दिता सा ।
राजन् कुतश्चैव सुतः सुजन्मा
    प्राप्तस्त्वया मन्मथतुल्यरूपः ॥ ४९ ॥
केनैष दत्तः कथयाशु कान्त
    चेतो मदीयं प्रहृतं सुतेन ।
नृपस्तदोवाच मुदान्वितोऽसौ
    प्रिये रमेशेन सुतो हि मह्यम् ॥ ५० ॥
लोलाक्षि दत्तः कमलासमुत्थो
    जनार्दनांशोऽयमहीनसत्त्वः ।
सा तं गृहीत्वा मुदमाप राज्ञी
    राजा चकारोत्सवमद्‌भुतं च ॥ ५१ ॥
ददौ च दानं किल याचकेभ्यो
    गीतानि वाद्यानि बहूनि नेदुः ।
कृत्वोत्सवं भूपतिरात्मजस्य
    नामैकवीरेति चकार विश्रुतम् ॥ ५२ ॥
सुखं च सम्प्राप्य मुदान्वितोऽसौ
    ननन्द देवाधिपतुल्यवीर्यः ।
पुत्रं हरे रूपगुणानुरूपं
    सम्प्राप्य वंशस्य ऋणाच्च मुक्तः ॥ ५३ ॥
इति सकलसुराणामीश्वरेणार्पितं तं
    सकलगुणगणाढ्यं पुत्रमासाद्य राजा ।
विविधसुखविनोदैर्भार्यया सेव्यमानो
    व्यहरत निजगेहे शक्रतुल्यप्रतापः ॥ ५४ ॥
इति श्रीमद्देवीभागवतेमहापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
षष्ठस्कन्धे एकवीराख्यानवर्णनं नाम विंशोऽध्यायः ॥ २० ॥


अश्विनीरूपी लक्ष्मीला पुत्रप्राप्ती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

जनमेजय म्हणाला, ''हे भगवान, त्या निर्जन वनात वाघ - सिंहादि हिंस्र पशूंपासून त्या बालकाचे रक्षण कुणी केले ? त्याचे पुढे काय झाले ?''

व्यास म्हणाले, ''हे राजा, लक्ष्मीनारायण तेधून निघून गेल्यावर चंपक नावाचा विद्याधर तेथे आला. तो आपल्या मदनालसा नावाच्या स्त्रीसह तेथे क्रीडा करीत होता. त्याने तो अनुपम देवपुत्र अवलोकन केला. त्याने विमानातून खाली उतरून त्या भूमीवर पडलेल्या पुत्राला हातात घेतले. त्याला फार आनंद झाला होता.

चंपकने तो बालक आपल्या पत्नीला दिला. तिनेही विस्मित होऊन त्याचा स्वीकार केला. त्या बालकाला पोटाशी धरून तिने त्याची चुंबने घेतली. तो आपलाच पुत्र आहे असा विचार करून ते दोघेही विमानात आरूढ झाले. तेव्हा मदनालसा म्हणाली, ''हे कांत, या बालकाला येथे कोणी टाकले ? मला वाटते, त्या भगवान शंकरानेच हा बालक आपल्याला दिला आहे.''

चंपक म्हणाला, ''मी इंद्रालाच जाऊन विचारतो की हा बालक देव, दानव, गंधर्व यांपैकी कोण आहे ? त्यानंतर मी त्याच्या अनुज्ञेने याला पुत्रवत सांभाळीन.''

असे म्हणून चंपक त्या बालकासह इंद्राकडे गेला व हात जोडून त्याला म्हणाला, "हे देवाधिपते, कालिंदी व तमसा याच्या संगमाच्या पवित्र ठिकाणी हा बालक मला सापडला आहे, पण त्याच्याबद्दल मला अधिक काही समजले नाही. आपली अनुज्ञा असल्यास मी याला धर्मशास्त्रानुसार आपला पुत्र करीन."

इंद्र म्हणाला, ''हे चंपका, हा पुत्र अश्वरूप धारण करणार्‍या वासुदेवाचा आहे. ययातीच्या तुर्वसू नावाच्या पुत्राला अर्पण करण्याकरता हा पुत्र उत्पन्न केला आहे. हरीची आजच त्याला तशी प्रेरणा होईल. म्हणून तू या बालकाला सत्वर घेऊन जा. तेथे या बालकाला सोडून दे. कारण तेथे बालक नाही असे दिसताच त्याला दुःख होईल. हा बालक एकवीर या नावाने विख्यात होईल.''

हे ऐकताच चंपकने त्या बालकाला सत्वर येथे नेऊन सोडले व तो स्वस्थानी निघून गेला. इकडे लक्ष्मीसह विष्णू राजाकडे गेले. राजाने विष्णूला साष्टांग नमस्कार घातला. विष्णूने राजाला अभय दिले. त्याने वासुदेवाचे स्तवन केले. राजा तुर्वसू म्हणाला, "हे देवाधिदेवा, हे कृपानिधे, आज आपले दुर्लभ दर्शन मला लाभले, पण हे देवा, मी अपेक्षा करणारा असल्याने आपल्या दर्शनास योग्य नाही."

विष्णू प्रसन्न होऊन म्हणाले, ''हे राजा, तू वर माग. तुझी इच्छा मी पूर्ण करीन."

हे ऐकून राजा विष्णूला म्हणाला, ''हे मुरारे, पुत्रासाठी मी तप केले. म्हणून मला पुत्राची अपेक्षा आहे.''

विष्णू म्हणाले, ''हे ययातीपुत्रा, कालिंदी व तमसेच्या संगमावर मी तुझ्यासाठी एका पुत्राला सोडले आहे. माझ्यापासून तो लक्ष्मीला प्राप्त झाला. म्हणून तू त्या तेजस्वी पुत्राचा स्वीकार कर."

असे सांगून ते वैकुंठाला निघून गेले. इकडे तुर्वसू हरीच्या सांगण्यावरून रथारूढ होऊन त्या ठिकाणी गेला. तेथे भूमीवर खेळत असलेल्या बालकाला पाहून राजाला आनंद झाला. तो बालक एक अंगठा तोंडात धरून आनंदाने क्रीडा करीत होता. हरिवर्म्याला अतिशयच आनंद झाला.

राजाने आवेगाने त्याला हृदयाशी धरून त्याचे मस्तक हुंगले, आनंदाश्रूंनी त्याचा कंठ भरून आला. राजा म्हणाला, ''हे पुत्रा, तुझा लाभ झाल्यामुळे माझे पुनामक नरकापासूनचे भय आता नाहीसे झाले. तुझी माता भगवती लक्ष्मी तुला येथे सोडून गेली. श्रीधराने माझ्यासाठीच तुला उत्पन्न केले आहे."

असे म्हणून राजा त्या पुत्राला घेऊन स्वगृही निघून गेला. राजा नगराजवळ आल्यावर राजाचे मंत्री, पुरोहित, सेवक लोक नजराणे घेऊन राजाला सामोरे आले. नागरिकांनी राजाचा सत्कार केला. राजावर पुष्पे, लाह्या यांची वृष्टी केली. नंतर राजाने आनंदाने त्या पुत्राला घेऊन राजवाडयात प्रवेश केला. आपल्या स्वरूपसुंदर राणीला तो पुत्र त्याने अर्पण केला. तेव्हा राणी म्हणाली, ''महाराज, हा स्वरूपसुंदर पुत्र आपणाला कोठे मिळाला ? खरोखर या पुत्राने माझे मन हरण केले आहे.''

राजा म्हणाला, ''हे प्रिये, हा पुत्र जनार्दनाचा अंश असून त्यानेच हा मला दिला आहे. हा लक्ष्मीचे ठिकाणी उत्पन्न झाला आहे."

राणीने त्या पुत्राचा स्वीकार केला. राजाने मोठा उत्सव केला व विधीपूर्वक त्याचे नाव एकवीर ठेवले. रूपाने व गुणाने हा पुत्र श्रेष्ठ होता. राणीनेही अत्यंत मनापासून त्या पुत्राचा सांभाळ केला.अध्याय विसावा समाप्त


GO TOP