श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
प्रथमः स्कन्धः
त्रयोदशोऽध्यायः

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


पुरूरवस उर्वश्याश्च चरित्रवर्णनम्

सूत उवाच
सुद्युने तु दिवं याते राज्यं चक्रे पुरूरवाः ।
सगुणश्च सुरूपश्च प्रजारञ्जनतत्परः ॥ १ ॥
प्रतिष्ठाने पुरे रम्ये राज्यं सर्वनमस्कृतम् ।
चकार सर्वधर्मज्ञः प्रजारक्षणतत्परः ॥ २ ॥
मन्त्रः सुगुप्तस्तस्यासीत्परत्राभिज्ञता तथा ।
सदैवोत्साहशक्तिश्च प्रभुशक्तिस्तथोत्तमा ॥ ३ ॥
सामदानादयः सर्वे वशगास्तस्य भूपतेः ।
वर्णाश्रमान्स्वधर्मस्थान्कुर्वन् राज्यं शशास ह ॥ ४ ॥
यज्ञांश्च विविधांश्चक्रे स राजा बहुदक्षिणान् ।
दानानि च पवित्राणि ददावथ नराधिपः ॥ ५ ॥
तस्य रूपगुणौदार्यशीलद्रविणविक्रमान् ।
श्रुत्वोर्वशी वशीभूता चकमे तं नराधिपम् ॥ ६ ॥
ब्रह्मशापाभितप्ता सा मानुषं लोकमास्थिता ।
गुणिनं तं नृपं मत्वा वरयामास मानिनी ॥ ७ ॥
समयं चेदृशं कृत्वा स्थिता तत्र वराङ्गना ।
एतावुरणकौ राजन्न्यस्तौ रक्षस्व मानद ॥ ८ ॥
घृतं मे भक्षणं नित्यं नान्यत्किञ्चिन्नृपाशनम् ।
नेक्षे त्वां च महाराज नग्नमन्यत्र मैथुनात् ॥ ९ ॥
भाषाबन्धस्त्वयं राजन् यदि भग्नो भविष्यति ।
तदा त्यक्त्वा गमिष्यामि सत्यमेतद्‌ब्रवीम्यहम् ॥ १० ॥
अङ्गीकृतं च तद्‌राज्ञा कामिन्या भाषितं तु यत् ।
स्थिता भाषणबन्धेन शापानुगहकाम्यया ॥ ११ ॥
रेमे तदा स भूपालो लीनो वर्षगणान्बहून् ।
धर्मकर्मादिकं त्यक्त्वा चोर्वश्या मदमोहितः ॥ १२ ॥
एकचित्तस्तु सञ्जातस्तन्मनस्को महीपतिः ।
न शशाक तया हीनः क्षणमप्यतिमोहितः ॥ १३ ॥
एवं वर्षगणान्ते तु स्वर्गस्थः पाकशासनः ।
उर्वशीं नागतां दृष्ट्वा गन्धर्वानाह देवराट् ॥ १४ ॥
उर्वशीमानयध्वं भो गन्धर्वाः सर्व एव हि ।
हृत्वोरणौ गृहात्तस्य भूपतेः समये किल ॥ १५ ॥
उर्वशीरहितं स्थानं मदीयं नातिशोभते ।
येन केनाप्युपायेन तामानयत कामिनीम् ॥ १६ ॥
इत्युक्तास्तेऽथ गन्धर्वा विश्वावसुपुरोगमाः ।
ततो गत्वा महागाढे तमसि प्रत्युपस्थिते ॥ १७ ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

जह्रुस्तावुरणौ देवा रममाणं विलोक्य तम् ।
चक्रन्दतुस्तदा तौ तु ह्रियमाणौ विहायसा ॥ १८ ॥
उर्वशी तदुपाकर्ण्य क्रन्दितं सुतयोरिव ।
कुपितोवाच राजानं समयोऽयं कृतो मया ॥ १९ ॥
नष्टाहं तव विश्वासाद्धृतौ चोरैर्ममोरणौ ।
राजन्पुत्रसमावेतौ त्वं किं शेषे स्त्रिया समः ॥ २० ॥
हतास्म्यहं कुनाथेन नपुंसा वीरमानिना ।
उरणौ मे गतौ चाद्य सदा प्राणप्रियौ मम ॥ २१ ॥
एवं विलप्यमानां तां दृष्ट्वा राजा विमोहितः ।
नग्न एव ययौ तूर्णं पृष्ठतः पृथिवीपतिः ॥ २२ ॥
विद्युत्प्रकाशिता तत्र गन्धर्वैर्नृपवेश्मनि ।
नग्नभूतस्तया दृष्टो भूपतिर्गन्तुकामया ॥ २३ ॥
त्यक्त्वोरणौ गताः सर्वे गन्धर्वाः पथि पार्थिवः ।
नग्नो जग्राह तौ श्रान्तो जगाम स्वगृहं प्रति ॥ २४ ॥
तदोर्वशीं गतां दृष्ट्वा विललापातिदुःखितः ।
नग्नं वीक्ष्य पतिं नारी गता सा वरवर्णिनी ॥ २५ ॥
क्रन्दन्स देशदेशेषु बभ्राम नृपतिः स्वयम् ।
तच्चित्तो विह्वलः शोचन्विवशः काममोहितः ॥ २६ ॥
भ्रमन्वै सकलां पृथ्वीं कुरुक्षेत्रे ददर्श ताम् ।
दृष्ट्वा संहृष्टवदनः प्राह सूक्तं नृपोत्तमः ॥ २७ ॥
अये जाये तिष्ठ तिष्ठ घोरे न त्यक्तुमर्हसि ।
मां त्वं त्वन्मनसं कान्तं वशगं चाप्यनागसम् ॥ २८ ॥
स देहोऽयं पतत्यत्र देवि दूरं हृतस्त्वया ।
खादन्त्येनं वृकाः काकास्त्वया त्यक्तं वरोरु यत् ॥ २९ ॥
एवं विलपमानं तं राजानं प्राह चोर्वशी ।
दुःखितं कृपणं श्रान्तं कामार्तं विवशं भृशम् ॥ ३० ॥
उर्वश्युवाच
मूर्खोऽसि नृपशार्दूल ज्ञानं कुत्र गतं तव ।
क्वापि सख्यं न च स्त्रीणां वृकाणामिव पार्थिव ॥ ३१ ॥
न विश्वासो हि कर्तव्यः स्त्रीषु चौरेषु पार्थिवैः ।
गृहं गच्छ सुखं भुंक्ष्व मा विषादे मनः कृथाः ॥ ३२ ॥
इत्येवं बोधितो राजा न विवेदातिमोहितः ।
दुःखं च परमं प्राप्तः स्वैरिणीस्नेहयन्त्रितः ॥ ३३ ॥
सूत उवाच
इति सर्वं समाख्यातमुर्वशीचरितं महत् ।
वेदे विस्तरितं चैतत्संक्षेपात्कथितं मया ॥ ३४ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां सहितायां प्रथमस्कन्धे
पुरूरवस उर्वश्याश्च चरित्रवर्णनं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥


पुरुरवा ऊर्वशीसाठी वेडा होतो

सुद्युम्नाला स्वर्गप्राप्ती झाल्यावर गुणी व रुपवान, प्रजाहितदक्ष राजा पुरुरव्याने प्रतिष्ठान नगरामध्ये धर्माप्रमाणे आचरण करुन उत्कृष्ट राज्य केले. त्याची मसलत अत्यंत गुप्त राहात असे. पण त्याला मात्र इतर राजांची मसलत समजत असे.तो सदा उत्साही असे. उत्कृष्ट प्रभुशक्तीही त्याचे ठिकाणी होती. सामादानादि उपायात तो निपुण होता. ब्राह्मणादि वर्णाची व ब्रह्मचार्यादि आश्रमाची ती योग्य काळजी वहात असे. विपुल दक्षिणांनी संपन्न असे,नाना प्रकारचे यज्ञ त्याने केले व सर्वप्रकारची उत्कृष्ट दाने सुद्धा दिली. त्याचे रुप, गुण, औदार्य, शील, वैभव, श्रवण करुन उर्वशीला त्याची इच्छा होऊन ती त्याच्या आधीन झाली. ब्रह्मशापामुळे दु:खीत झालेली ती मनुष्यलोकी आली व त्या गुणी राजाला अभिमानी उर्वशीने वरले व एक श्रेष्ठ करार करुन ती त्याचेपाशी राहिली. तो करार असा, ती म्हणाली, हे राजा, हे दोन मेंढे मी तुझ्यापाशी ठेवले आहेत. ह्यांचे तू रक्षण कर. मला धृताशिवाय काहीही खायचे नाही. तसेच हे राजा मैथुनाशिवाय मी तुला कधीही नग्न अवलोकन करणार नाही. हे महाराज हा करार जेव्हा मोडेल त्याच क्षणी मी तुझा त्याग करीन.

राजाने उर्वशीचा हा करार मान्य केला. शापमुक्ति मिळावी म्हणून उर्वशीने हा करार केला होता. तेव्हा राजा आपले धर्म-कर्म सोडून मोहावश होऊन नित्य तिच्याशी एकांतात क्रीडा करीत अनेक वर्षे राहिला. त्याच्या मनात सतत तिचाच विचार राहात असे. इतरत्र त्याचे लक्ष लागेना. तिचा क्षणभरही वियोग त्याला सहन होईना.

अशाप्रकारे अनेक वर्षे लोटल्यावर स्वर्गातील गंधर्वाना इंद्र म्हणाला -"संधी साधून तुम्ही राजाच्या घरातून ते मेष हरण करा व उर्वशीला येथे घेऊन या. कारण उर्वशीशिवाय हे माझे स्थान चांगले शोभत नाही. म्हणून कोणत्याही उपायांनी त्या कामिनीला येथे आणा.

इंद्राची आज्ञा ऐकून ते विश्वावसु प्रभृति गंधर्व गहन काळोख पडल्यावर आणि राजा क्रीडेत मग्न आहे असे जाणून त्या मेंढ्यांना नेऊ लागले. आकाश मार्गाने ते जात असता ते मेंढे ओरडू लागले. ते ओरडणे ऐकून उर्वशी क्रुद्ध झाली व म्हणाली- राजा माझा करार संपला. पुत्राप्रमाणे मानलेल्या मेंढ्यांना विश्वासावर ठेवूनही चोरांनी चोरुन नेल्यामुळे माझा घात झाला. प्राणाप्रमाणे प्रिय असलेले माझे मेंढे गेले. अशाप्रकारे ती विलाप करु लागली. तेव्हा मोहावश झालेला राजा नग्नावस्थेतच त्या मेंढ्यांच्या मागोमाग जाऊ लागला, तेव्हा मेंढे सोडून गंधर्व चालते झाले. नग्न राजाने मेंढे धरुन तो त्यांना घेऊन स्वगृही परतला. परंतु गंधर्वांनी राजवाड्यात विद्युल्लतेचा प्रकाश पाडल्यामुळे राजाला नग्न अवस्थेत उर्वशीने पाहिले व ती निघून गेली त्यामुळे राजा अतीच दु:खी झाला. तो राजा विलाप करीत इतस्तत: भटकू लागला. उर्वशीच्या आधीन झालेला राजा कामविव्हल झाला होता. सर्व पृथ्वीवर हिंडत असता कुरुक्षेत्रामध्ये उर्वशी त्याला दिसली. तेव्हा प्रफुल्लित होऊन राजा मधुर शब्दांनी म्हणाला- हे प्रिये, निर्दय स्त्रिये थांब. कारण माझा त्याग करणे तुला योग्य नाही. मी निरपराधी असून तुझ्या आधीन आहे. माझे मनही तुझ्यात गुंतले आहे. हे देवी ज्या देहाचा तू पूर्वी उपभोग घेतलास तो देह इथे पडणार. तू टाकलेल्या या शरीराचा कावळे व लांडगे आस्वाद घेतील. अशाप्रकारे दीन, व्याकुळ व मदनविव्हल राजाचे विलाप ऐकून उर्वशी म्हणाली- हे नृपश्रेष्ठा, तू मूर्ख आहेस, तुझे ज्ञान कोठे आहे? राजा स्वैरिणी स्त्रियांचे भर्त्यावर प्रेम नसते. राजाने चोर व स्त्रिया यावर विश्वास ठेवू नये. तू घरी जाऊन आपल्या ऐश्वर्याचा उपभोग घे. झाल्या गोष्टी बद्दल खेद करु नकोस."

अशाप्रकारे ऊर्वशीने उपदेश केल्यावरही राजाला उमज पडेना. त्या स्वैरिणी स्त्रीवर प्रेमाने जखडून गेल्यामुळे त्याला अत्यंत दु:ख झाले.अध्याय तेरावा समाप्त

GO TOP