श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
दशमः स्कन्धः
चतुर्थोऽध्यायः


रुद्रप्रार्थनम्

सूत उवाच
ततः सर्वे सुरगणा महेन्द्रप्रमुखास्तदा ।
पद्मयोनिं पुरस्कृत्य रुद्रं शरणमन्वयुः ॥ १ ॥
उपतस्थुः प्रणतिभिः स्तोत्रैश्चारुविभूतिभिः ।
देवदेवं गिरिशयं शशिलोलितशेखरम् ॥ २ ॥
देववा ऊचुः
जय देव गणाध्यक्ष उमालालितपङ्‌कज ।
अष्टसिद्धिविभूतीनां दात्रे भक्तजनाय ते ॥ ३ ॥
महामायाविलसितस्थानाय परमात्मने ।
वृषाङ्‌कायामरेशाय कैलासस्थितिशालिने ॥ ४ ॥
अहिर्बुध्न्याय मान्याय मनवे मानदायिने ।
अजाय बहुरूपाय स्वात्मारामाय शम्भवे ॥ ५ ॥
गणनाथाय देवाय गिरिशाय नमोऽस्तु ते ।
महाविभूतिदात्रे ते महाविष्णुस्तुताय च ॥ ६ ॥
विष्णुहृत्कञ्जवासाय महायोगरताय च ।
योगगम्याय योगाय योगिनां पतये नमः ॥ ७ ॥
योगीशाय नमस्तुभ्यं योगानां फलदायिने ।
दीनदानपरायापि दयासागरमूर्तये ॥ ८ ॥
आर्तिप्रशमनायोग्रवीर्याय गुणमूर्तये ।
वृषध्वजाय कालाय कालकालाय ते नमः ॥ ९ ॥
सूत उवाच
एवं स्तुतः स देवेशो यज्ञभुग्भिर्वृषध्वजः ।
प्राह गम्भीरया वाचा प्रहसन्विबुधर्षभान् ॥ १० ॥
श्रीभगवानुवाच
प्रसन्नोऽहं दिविषदः स्तोत्रेणोत्तमपूरुषाः ।
मनोरथं पूरयामि सर्वेषां देवतर्षभाः ॥ ११ ॥
देवा ऊचुः
सर्वदेवेश गिरिश शशिमौलिविराजित ।
आर्तानां शङ्‌करस्त्वं च शं विधेहि महाबल ॥ १२ ॥
पर्वतो विन्ध्यनामास्ति मेरुद्वेष्टा महोन्नतः ।
भानुमार्गनिरोद्धा हि सर्वेषां दुःखदोऽनघ ॥ १३ ॥
तदवृद्धिं स्तम्भयेशान सर्वकल्याणकृद्‍भव ।
भानुसञ्चाररोधेन कालज्ञानं कथं भवेत् ॥ १४ ॥
नष्टे स्वाहास्वधाकारे लोके कः शरणं भवेत् ।
अस्माकं च भयार्तानां भवानेव हि दृश्यते ॥ १५ ॥
दुःखनाशकरो देव प्रसीद गिरिजापते ।
श्रीशिव उवाच
नास्माकं शक्तिरस्तीह तद्‌वृद्धिस्तम्भने सुराः ॥ १६ ॥
इममेवं वदिष्यामो भगवन्तं रमाधवम् ।
सोऽस्माकं प्रभुरात्मा च पूज्यः कारणरूपधृक् ॥ १७ ॥
गोविन्दो भगवान्विष्णुः सर्वकारणकारणः ।
तं गत्वा कथयिष्यामः स दुःखान्तो भविष्यति ॥ १८ ॥
इत्येवमाकर्ण्य गिरीशभाषितं
     देवाश्च सेन्द्राः सपयोजसम्भवाः ।
रुद्रं पुरस्कृत्य च वेपमाना
     वैकुण्ठलोकं प्रतिजग्मुरञ्जसा ॥ १९ ॥


देवांचे दुःख

तेव्हा सर्व देव ब्रह्मदेवाला पुढे करून रुद्रास शरण गेले. स्तोत्र, नमस्कार वगैर उपचारांनी ते त्याची सेवा करू लागले. देव म्हणाले, हे देवा, तुझा जयजयकार असो, तू गणांचा स्वामी असून प्रत्यक्ष उमा तुझी सेवा करीत आहे. तू भक्तांना अष्टसिद्धी देतोस. तू महामायेचे विलास स्थान असून तुला कैलासावर राहणे प्रिय असते. तुझे नाव अहिर्बुध्न असून तू मान्य आहे. मनूही ज्याला मान देतो- ज्याला जन्म नाही, जो अनेक रूपांनी क्रीडा करतो, अशा इंद्रियगणांच्या स्वामी, तुला नमस्कार असो. तूच योगाचे फल देतोस. तूच दीनांना दान देतोस. तू दयासागर असून विपत्तींचा नाश करतोस. तूच अग्नवीर्य व गुणमूर्ती आहेस. म्हणून वृषद्धज, काल, अशा तुला नमस्कार असो.'' अशारीतीने देवांनी स्तवन केल्यावर तो श्रेष्ठ प्रभू प्रसन्न होऊन म्हणाला, ''हे देवहो, मी तुमची इच्छा पूर्ण
करीन.'' देव म्हणाले, ''हे देवेश्वरा, हे चंद्रशेखरा, तू आर्तांचे कल्याण करतोस. आम्हास तू सुख दे. मेरूच्या द्वेषाने विंध्य वृद्धिंगत झाला आहे. त्याने सूर्याचा मार्ग अडविल्यामुळे सर्वजण चिंतेत पडले आहेत. तू त्याची वाढ थांबव. त्यामुळे सर्वांचे कल्याण होईल. सूर्याच्या गतीशिवाय कालज्ञान होणार नाही. म्हणून हे गिरिजापते, तू प्रसन्न हो.'' श्रीभगवान म्हणाले, ''हे देवांनो, विंध्याची वृद्धी कुंठित करणे मला अशक्य आहे. म्हणून आपण त्या भगवान रमामाधवाला शरण जाऊ. तोच सर्वांचा नियंता आहे. तो गोविंदच सर्वांचे कारण आहे. म्हणून त्यालाच आपण सर्व घटना निवेदन करू. तो आपल्या दुःखाचा परिहार करील.'' असे म्हणून इंद्र, ब्रह्मदेव व इतर देवांसह शंकर सत्वर वैकुंठाकडे गेले.इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
दशमस्कन्धे रुद्रप्रार्थनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥

अध्याय चवथा समाप्त

GO TOP