श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
दशमः स्कन्धः
पञ्चमोऽध्यायः


श्रीविष्णुना देवेभ्यो वरप्रदानम्

सूत उवाच
ते गत्वा देवदेवेशं रमानाथं जगद्‌गुरुम् ।
विष्णुं कमलपत्राक्षं ददृशुः प्रभयान्वितम् ॥ १ ॥
स्तोत्रेण तुष्टुवुर्भक्त्या गद्‌गदस्वरसत्कृताः ।
देवा ऊचुः
जय विष्णो रमेशाद्य महापुरुष पूर्वज ॥ २ ॥
दैत्यारे कामजनक सर्वकामफलप्रद ।
महावराह गोविन्द महायज्ञस्वरूपक ॥ ३ ॥
महाविष्णो ध्रुवेशाद्य जगदुत्पत्तिकारण ।
मत्स्यावतारे वेदानामुद्धाराधाररूपक ॥ ४ ॥
सत्यव्रत धराधीश मत्स्यरूपाय ते नमः ।
जयाकूपार दैत्यारे सुरकार्यसमर्पक ॥ ५ ॥
अमृताप्तिकरेशान कूर्मरूपाय ते नमः ।
जयादिदैत्यनाशार्थमादिसूकररूपधृक् ॥ ६ ॥
मह्युद्धारकृतोद्योगकोलरूपाय ते नमः ।
नारसिंहं वपुः कृत्वा महादैत्यं ददार यः ॥ ७ ॥
करजैर्वरदृप्ताङ्‌गं तस्मै नृहरये नमः ।
वामनं रूपमास्थाय त्रैलोक्यैश्वर्यमोहितम् ॥ ८ ॥
बलिं सञ्छलयामास तस्मै वामनरूपिणे ।
दुष्टक्षत्रविनाशाय सहस्रकरशत्रवे ॥ ९ ॥
रेणुकागर्भजाताय जामदग्न्याय ते नमः ।
दुष्टराक्षसपौलस्त्यशिरश्छेदपटीयसे ॥ १० ॥
श्रीमद्दाशरथे तुभ्यं नमोऽनन्तक्रमाय च ।
कंसदुर्योधनाद्यैश्च दैत्यैः पृथ्वीशलाञ्छनैः ॥ ११ ॥
भाराक्रान्तां महीं योऽसावुज्जहार महाविभुः ।
धर्मं संस्थापयामास पापं कृत्वा सुदूरतः ॥ १२ ॥
तस्मै कृष्णाय देवाय नमोऽस्तु बहुधा विभो ।
दुष्टयज्ञविघाताय पशुहिंसानिवृत्तये ॥ १३ ॥
बौद्धरूपं दधौ योऽसौ तस्मै देवाय ते नमः ।
म्लेच्छप्रायेऽखिले लोके दुष्टराजन्यपीडिते ॥ १४ ॥
कल्किरूपं समादध्यौ देवदेवाय ते नमः ।
दशावतारास्ते देव भक्तानां रक्षणाय वै ॥ १५ ॥
दुष्टदैत्यविघाताय तस्मात्त्वं सर्वदुःखहृत् ।
जय भक्तार्तिनाशाय धृतं नारीजलात्मसु ॥ १६ ॥
रूपं येन त्वया देव कोऽन्यस्त्वत्तो दयानिधिः ।
इत्येवं देवदेवेशं स्तुत्वा श्रीपीतवाससम् ॥ १७ ॥
प्रणेमुर्भक्तिसहिताः साष्टाङ्‌गं विबुधर्षभाः ।
तेषां स्तवं समाकर्ण्य देवः श्रीपुरुषोत्तमः ॥ १८ ॥
उवाच विबुधान्सर्वान् हर्षयच्छ्रीगदाधरः ।
श्रीभगवानुवाच -
प्रसन्‍नोऽस्मि स्तवेनाहं देवास्तापं विमुञ्चथ ॥ १९ ॥
भवतां नाशयिष्यामि दुःखं परमदुःसहम् ।
वृणुध्वं च वरं मत्तो देवाः परमदुर्लभम् ॥ २० ॥
ददामि परमप्रीतः स्तवस्यास्य प्रसादतः ।
य एतत्पठते स्तोत्रं कल्य उत्थाय मानवः ॥ २१ ॥
मयि भक्तिं परां कृत्वा न तं शोकः स्पृशेत्कदा ।
अलक्ष्मीः कालकर्णी च नाक्रामेत्तद्‌‍गृहं सुराः ॥ २२ ॥
नोपसर्गा न वेताला न ग्रहा ब्रह्मराक्षसाः ।
न रोगा वातिकाः पैत्ताः श्लेष्मसम्भविनस्तथा ॥ २३ ॥
नाकालमरणं तस्य कदापि च भविष्यति ।
सन्ततिश्चिरकालस्था भोगाः सर्वे सुखादयः ॥ २४ ॥
सम्भविष्यन्ति तन्मर्त्यगृहे यः स्तोत्रपाठकः ।
किं पुनर्बहुनोक्तेन स्तोत्रं सर्वार्थसाधकम् ॥ २५ ॥
एतस्य पठनानॄणां भुक्तिमुक्ती न दूरतः ।
देवा भवत्सु यद्दुःखं कथ्यतां तदसंशयम् ॥ २६ ॥
नाशयामि न सन्देहश्चात्र कार्योऽणुरेव च ।
एवं श्रीभगवद्वाक्यं श्रुत्वा सर्वे दिवौकसः ।
प्रसन्‍नमनसः सर्वे पुनरूचुर्वृषाकपिम् ॥ २७ ॥


विष्णूचे वचन

सर्व देव त्या सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूकडे गेले. देवांनी त्यांचे स्तवन केले. देव म्हणाले, ''हे विष्णो, कर्मफल देणार्‍या, हे सनातना, हे आद्य, हे वेदांचा उद्धार करणार्‍या, हे आधारा, हे सत्यव्रतधारका, तुला नमस्कार असो. हे दयासागरा, तुझा जयजयकार असो. हे पृथ्वीचा उद्धार करणार्‍या तुला प्रणाम असो. हे नृसिंहरूपधारी, तुला नमस्कार असो. हे वामनरूपा, तुझा विजय असो. हे सहस्रार्जूननाशका, तुला वंदन असो. हे जमदग्नीसुता तुला नमस्कार असो. हे पुलस्त्यसुत राक्षसाचा शिरच्छेद करणार्‍या, हे अनंतसामर्थ्यशाली दाशरथी रामा, तुला नमस्कार असो. हे कंस, दुर्योधनामुळे झालेले भुभार नाहीसा करणार्‍या कृष्णदेवा, तुला नमस्कार असो. हे बौद्धरूपा, तुला प्रणाम असो. हे कल्किरूपधारका, तुला नमस्कार असो. हे देवा, तू भक्तरक्षणासाठी दहा अवतार
घेतलेस. खरोखरच तुझ्यावाचून दुसरा दयानिधी कोण आहे ?'' असे म्हणून सर्व देवांनी विष्णूची स्तुती केली. तेव्हा प्रसन्‍न होऊन तो भगवान म्हणाला, ''हे देवांनो, मी तुमचे दुःख नष्ट करीन. तुम्ही वर मागा. माझे स्तोत्र म्हणणारा शोकमुक्त होतो. दारिद्र्य व दुःख त्याच्या गृहापर्यंत येत नाही. हे देवांनो, मदभक्ताला भूत, पिशाच वगैरे कोणत्याही व्याधी उपद्रव देत नाहीत. पित्तजन्य, कफजन्य रोग त्याला होत नाही. तो अकाली मृत्यू पावत नाही. तो दीर्घायुषी होऊन पुत्रपौत्रादि सुख भोगतो. पण आता फार सांगून काय करायचे आहे ? हे स्तोत्र पठण केल्यास मुक्ती मिळते. म्हणून तुम्ही निशंक होऊन काय कार्य आहे ते सांगा. मी तुमच्या दुःखाचा नाश करीन याबद्दल अणुमात्र संशय बाळगू नका.'' हे ऐकून सर्व देव संतुष्ट झाले.इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादप्तसाहस्र्यां संहितायां
दशमस्कन्धे श्रीविष्णुना देवेभ्यो वरप्रदानं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥

अध्याय पाचवा समाप्त

GO TOP