संपूर्णोऽयं ग्रंथः


श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
द्वादशः स्कन्धः
चतुर्दशोऽध्यायः


श्रीमद्देवीभागवतमहापुराण-श्रवणफलवर्णनम्

सूत उवाच
अर्धश्लोकात्मकं यत्तु देवीवक्त्राब्जनिर्गतम् ।
श्रीमद्‍भागवतं नाम वेदसिद्धान्तबोधकम् ॥ १ ॥
उपदिष्टं विष्णुवे यद्वटपत्रनिवासिने ।
शतकोटिप्रविस्तीर्णं तत्कृतं ब्रह्मणा पुरा ॥ २ ॥
तत्सारमेकतः कृत्वा व्यासेन शुकहेतवे ।
अष्टादशसहस्रं तु द्वादशस्कन्धसंयुतम् ॥ ३ ॥
देवीभागवतं नाम पुराणं ग्रथितं पुरा ।
अद्यापि देवलोके तद्‌बहुविस्तीर्णमस्ति हि ॥ ४ ॥
नानेन सदृशं पुण्यं पवित्रं पापनाशनम् ।
पदे पदेऽश्वमेधस्य फलमाप्नोति मानवः ॥ ५ ॥
पौराणिकं पूजयित्वा वस्त्राद्याभरणादिभिः ।
व्यासबुद्ध्या तन्मुखात्तु श्रुत्वैतत्समुपोषितः ॥ ६ ॥
लिखित्वा निजहस्तेन लेखकेनाथवा मुने ।
प्रौष्ठपद्यां पौर्णमास्यां हेमसिंहसमन्वितम् ॥ ७ ॥
दद्यात्पौराणिकायाथ दक्षिणां च पयस्विनीम् ।
सालङ्‌कृतां सवत्सां च कपिलां हेममालिनीम् ॥ ८ ॥
भोजयेद्ब्राह्मणानन्तेऽप्यध्यायपरिसम्मितान् ।
सुवासिनीस्तावतीश्च कुमारीर्बटुकैः सह ॥ ९ ॥
देवीबुद्ध्या पूजयेत्तान्वसनाभरणादिभिः ।
पायसान्‍नवरेणापि गन्धस्रक्कुसुमादिभिः ॥ १० ॥
पुराणदानेनैतेन भूदानस्य फलं लभेत् ।
इहलोके सुखी भूत्वाप्यन्ते देवीपुरं व्रजेत् ॥ ११ ॥
नित्यं यः शृणुयाद्‍भक्त्या देवीभागवतं परम् ।
न तस्य दुर्लभं किञ्चित्कदाचित्क्वचिदस्ति हि ॥ १२ ॥
अपुत्रो लभते पुत्रान्धनार्थी धनमाप्नुयात् ।
विद्यार्थी प्राप्नुयाद्विद्यां कीर्तिमण्डितभूतलः ॥ १३ ॥
वन्ध्या वा काकवन्ध्या वा मृतवन्ध्या च याङ्‌गना ।
श्रवणादस्य तद्दोषान्‍निवर्तेत न संशयः ॥ १४ ॥
यद्‌गेहे पुस्तकं चैतत्पूजितं यदि तिष्ठति ।
तद्‌गेहं न त्यजेन्‍नित्यं रमा चैव सरस्वती ॥ १५ ॥
नेक्षन्ते तत्र वेतालडाकिनीराक्षसादयः ।
ज्वरितं तु नरं स्पृष्ट्वा पठेदेतत्समाहितः ॥ १६ ॥
मण्डलान्‍नाशमाप्नोति ज्वरो दाहसमन्वितः ।
शतावृत्त्यास्य पठनात्क्षयरोगो विनश्यति ॥ १७ ॥
प्रतिसन्ध्यं पठेद्यस्तु सन्ध्यां कृत्वा समाहितः ।
एकैकमस्य चाध्यायं स नरो ज्ञानवान्भवेत् ॥ १८ ॥
शकुनांश्चैव वीक्षेत कार्याकार्येषु चैव हि ।
तत्प्रकारः पुरस्तात्तु कथितोऽस्ति मया मुने ॥ १९ ॥
नवरात्रे पठेन्‍नित्यं शारदीयेऽतिभक्तितः ।
तस्याम्बिका तु सन्तुष्टा ददातीच्छाधिकं फलम् ॥ २० ॥
वैष्णवैश्चैव शैवैश्च रमोमा प्रीयते सदा ।
सौरैश्च गाणपत्यैश्च स्वेष्टशक्तेश्च तुष्टये ॥ २१ ॥
पठितव्यं प्रयत्‍नेन नवरात्रचतुष्टये ।
वैदिकैर्निजगायत्रीप्रीतये नित्यशो मुने ॥ २२ ॥
पठितव्यं प्रयत्‍नेन विरोधो नात्र कस्यचित् ।
उपासना तु सर्वेषां शक्तियुक्तास्ति सर्वदा ॥ २३ ॥
तच्छक्तेरेव तोषार्थं पठितव्यं सदा द्विजैः ।
स्त्रीशूद्रो न पठेदेतत्कदापि च विमोहितः ॥ २४ ॥
शृणुयाद्‌द्विजवक्त्रात्तु नित्यमेवेति च स्थितिः ।
किं पुनर्बहुनोक्तेन सारं वक्ष्यामि तत्त्वतः ॥ २५ ॥
वेदसारमिदं पुण्यं पुराणं द्विजसत्तमाः ।
वेदपाठसमं पाठे श्रवणे च तथैव हि ॥ २६ ॥
सच्चिदानन्दरूपां तां गायत्रीप्रतिपादिताम् ।
नमामि ह्रींमयीं देवीं धियो यो नः प्रचोदयात् ॥ २७ ॥
इति सूतवचः श्रुत्वा नैमिषीयास्तपोधनाः ।
पूजयामासुरत्युच्चैः सूतं पौराणिकोत्तमम् ॥ २८ ॥
प्रसन्‍नहृदयाः सर्वे देवीपादाम्बुजार्चकाः ।
निर्वृतिं परमां प्राप्ताः पुराणस्य प्रभावतः ॥ २९ ॥
नमश्चक्रुः पुनः सूतं क्षमाप्य च मुहुर्मुहुः ।
संसारवारिधेस्तात प्लवोऽस्माकं त्वमेव हि ॥ ३० ॥
इति स मुनिवराणामग्रतः श्रावयित्वा
     सकलनिगमगुह्यं दौर्गमेतत्पुराणम् ।
नतमथ मुनिसङ्‌घं वर्धयित्वाऽऽशिषाम्बा-
     चरणकमलभृङ्‌गो निर्जगामाथ सूतः ॥ ३१ ॥


उपसंहार

सूत म्हणाले, 'हे मुनीहो, वेदांचा अर्थ सांगणारे श्लोकात्मक श्रीमद्‌भागवत पुराण देवीच्या मुखकमलातून बाहेर पडले. वटपत्रावर शयन करणार्‍या विष्णूस त्याचा प्रथम उपदेश झाला. त्याचाच ब्रह्मदेवाने शंभर कोटी विस्तार केला. शुकाचार्यासाठी व्यासांनी त्याचेच सार काढून अठरा हजार श्लोकांचे बारा स्कंध असलेले देवीभागवत पुराण रचले. ते मूळ शंभर कोटींचे पुराण देवलोकात अद्याप आहे. व्यासानी पुराण शुकास सांगितले तेव्हाच मीही श्रवण केले. तेच मी तुम्हाला सांगितले. यासारखे दुसरे पुण्यकारक काही नाही. ते अश्वमेधाचे फल देते.
वस्त्रे, आभरणे यांनी पौराणिकाचे पूजन करावे. त्यालाच व्यास कल्पून स्वतः उपोषित राहावे व त्याच्या मुखाने हे श्रवण करावे. नंतर आपल्या हाताने हे पुराण लिहून अथवा कोणाकडून लिहून घेऊन भाद्रपद पौर्णिमेस ते सुवर्णसिंहासनासह पौराणिकास द्यावे. नंतर दक्षिणा व सालंकृत सवत्स अशी कपिला गाय त्याला अर्पण करावी. समाप्तीनंतर जेवढे अध्याय आहेत तेवढ्या ब्राह्मण, सुवासिनी, बरटू इत्यादींना भोजन घालावे. त्यांच्या ठिकाणी देवीची भावना करून वस्त्रे, अलंकार वगैरेंनी त्यांची पूजा करावी. त्यामुळे भूमिदानाचे फल मिळते व दाता शेवटी देवीपुरास जातो. पुत्रेच्छूला पुत्रलाभ, धनेच्छूला धनलाभ, विद्यार्थ्याला विद्या प्राप्त होते. मृतवंध्या व वंध्या यांचे दोषही याच्या श्रवणाने नाहीसे होतात. ज्याच्याजवळ हे पुस्तक असते त्याची नित्य पूजा होते. त्याच्या गृही रमा व सरस्वती नित्य वास करतात. वेताळ, राक्षसी, डाकिनी, ज्वर यांपासून तो मुक्त होतो. या पुराणाची शंभर आवृत्ती केल्यास क्षयरोग
नष्ट होतो. संध्या केल्यावर एकेका अध्यायाचे पठण केल्यास मनुष्य ज्ञानी होतो.
हे मुने, संकट प्रसंगी पुराणाच्या योगाने शकुन पाहावे. शरद्ॠतूतील नवरात्रात भक्तिपूर्वक पाठ करावा. म्हणजे जगदंबिका प्रसन्‍न होऊन इच्छित फल देते.
वैष्णव, शैव, सूर्योपासक, गाणपत्य यांनीही रमा व उमा यांच्यासाठी या पुराणाचा नवरात्रात पाठ करावा. गायत्रीप्रीत्यर्थही पाठ करावा. सर्वांची उपासना सर्व देवतांसाठी शक्तीयुक्तच असते. म्हणून शक्तीच्या संतोषासाठी हे पुराण पठण करावे. शूद्र व स्त्रिया यांनी याचे पठण करू नये. त्यांनी ते द्विजमुखाने श्रवण करावे. आता मी याचे सार सांगतो. हे पुण्यकारक पुराण वेदाचे सार आहे. हे मुनिजनहो, आता गायत्रीने प्रतिपादिलेल्या सच्चिदानंद ऱ्हींमयी अशा देवीस मी नमस्कार करतो. ती परमपुरुषरूप देवी आमच्या बुद्धीस प्रेरणा करो.'
हे सूताचे वचन ऐकून तपरूपी धन जवळ असलेल्या, नैमिषारण्यात वास करणार्‍या शौनकादि ऋषींनी त्या सूताचे आदराने पूजन केले. तेव्हा प्रसन्‍नमुख होऊन देवीच्या पदकमलाचे पूजन झाले. त्या पुराणाच्या श्रवणाने सर्वांना परम शांती लाभली. नंतर क्षमा मागून त्यांनी सूतास वंदन केले. ते म्हणाले, खरोखरच तूच या संसारसमुद्रातून आम्हाला तारणारा आहेस. अशारीतीने गुह्य असे पुराण सांगून व नम्र झालेल्या युनींना आशीर्वाद देऊन श्रीअंबेच्या चरण कमलाचे ठिकाणी आसक्त असलेला तो पुराणिक सूत जगदंबेचेच चिंतन करीत तेधून निघून गेला.इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां द्वादशस्कन्धे
श्रीमद्देवीभागवतमहापुराण-श्रवणफलवर्णनं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
अध्याय चवदावा समाप्त
॥ द्वादशः स्कन्धः समाप्तः ॥
॥ श्रीमद्देवीभागवतमहापुराण संपूर्णम् ॥
[संपूर्णोऽयं ग्रन्थः]


GO TOP