श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
द्वाविंशोऽध्यायः


कालीशङ्‌खचूडयुद्धवर्णनम्

श्रीनारायण उवाच
शिवं प्रणम्य शिरसा दानवेन्द्रः प्रतापवान् ।
समारुरोह यानं च सहामात्यैः स सत्वरः ॥ १ ॥
शिवः स्वसैन्यं देवांश्च प्रेरयामास सत्वरम् ।
दानवेन्द्रः ससैन्यश्च युद्धारम्भे बभूव ह ॥ २ ॥
स्वयं महेन्द्रो युयुधे सार्धं च वृषपर्वणा ।
भास्करो युयुधे विप्रचित्तिना सह सत्वरः ॥ ३ ॥
दम्भेन सह चन्द्रश्च चकार परमं रणम् ।
कालस्वरेण कालश्च गोकर्णेन हुताशनः ॥ ४ ॥
कुबेरः कालकेयेन विश्वकर्मा मयेन च ।
भयङ्‌करेण मृत्युश्च संहारेण यमस्तथा ॥ ५ ॥
विकङ्‌कणेन वरुणश्चञ्चलेन समीरणः ।
बुधश्च घृतपृष्ठेन रक्ताक्षेण शनैश्चरः ॥ ६ ॥
जयन्तो रत्‍नसारेण वसवो वर्चसां गणैः ।
अश्विनौ च दीप्तिमता धूम्रेण नलकूबरः ॥ ७ ॥
धुरन्धरेण धर्मश्च उषाक्षेण च मङ्‌गलः ।
शोभाकरेण वै भानुः पिठरेण च मन्मथः ॥ ८ ॥
गोधामुखेन चूर्णेन खड्गेन च ध्वजेन च ।
काञ्चीमुखेन पिण्डेन धूमेण सह नन्दिना ॥ ९ ॥
विश्वेन च पलाशेनादित्याद्या युयुधुः परे ।
एकादश च रुद्रा वै एकादशभयङ्‌करैः ॥ १० ॥
महामारी च युयुधे चोग्रचण्डादिभिः सह ।
नन्दीश्वरादयः सर्वे दानवानां गणैः सह ॥ ११ ॥
युयुधुश्च महायुद्धे प्रलयेऽपि भयङ्‌करे ।
वटमूले च शम्भुश्च तस्थौ काल्या सुतेन च ॥ १२ ॥
सर्वे च युयुधुः सैन्यसमूहाः सततं मुने ।
रत्‍नसिंहासने रम्ये कोटिभिर्दानवैः सह ॥ १३ ॥
उवास शङ्‌खचूडश्च रत्‍नभूषणभूषितः ।
शङ्‌करस्य च ये योधा दानवैश्च पराजिताः ॥ १४ ॥
देवाश्च दुद्रुवुः सर्वे भीताश्च क्षतविग्रहाः ।
चकार कोपं स्कन्दश्च देवेभ्यश्चाभयं ददौ ॥ १५ ॥
बलं च स्वर्गणानां च वर्धयामास तेजसा ।
सोऽयमेकश्च युयुधे दानवानां गणैः सह ॥ १६ ॥
अक्षौहिणीनां शतकं समरे च जघान सः ।
असुरान्पातयामास काली कमललोचना ॥ १७ ॥
पपौ रक्तं दानवानामतिकुद्धा ततः परम् ।
दशलक्षगजेन्द्राणां शतलक्षं च कोटिशः ॥ १८ ॥
समादायैकहस्तेन मुखे चिक्षेप लीलया ।
कबन्धानां सहस्रं च ननर्त समरे मुने ॥ १९ ॥
स्कन्दस्य शरजालेन दानवाः क्षतविग्रहाः ।
भीताश्च दुद्रुवुः सर्वे महारणपराक्रमाः ॥ २० ॥
वृषपर्वा विप्रचित्तिर्दम्भश्चापि विकङ्‌कणः ।
स्कन्देन सार्धं युयुधुस्ते सर्वे विक्रमेण च ॥ २१ ॥
महामारी च युयुधे न बभूव पराङ्‌मुखी ।
बभूवुस्ते च संक्षुब्धाः स्कन्दस्य शक्तिपीडिताः ॥ २२ ॥
न दुद्रुवुर्भयात्स्वर्गे पुष्पवृष्टिर्बभूव ह ।
स्कन्दस्य समरं दृष्ट्वा महारौद्रं समुल्बणम् ॥ २३ ॥
दानवानां क्षयकरं यथा प्राकृतिको लयः ।
राजा विमानमारुह्य चकार बाणवर्षणम् ॥ २४ ॥
नृपस्य शरवृष्टिश्च घनस्य वर्षणं यथा ।
महाघोरान्धकारश्च वह्न्युत्थानं बभूव च ॥ २५ ॥
देवाः प्रदुद्रुवुः सर्वेऽप्यन्ये नन्दीश्वरादयः ।
एक एव कार्तिकेयस्तस्थौ समरमूर्धनि ॥ २६ ॥
पर्वतानां च सर्पाणां शिलानां शाखिनां तथा ।
नृपश्चकार वृष्टिं च दुर्वारां च भयङ्‌करीम् ॥ २७ ॥
नृपस्य शरवृष्ट्या च प्रहितः शिवनन्दनः ।
नीहारेण च सान्द्रेण प्रहितो भास्करो यथा ॥ २८ ॥
धनुश्चिच्छेद स्कन्दस्य दुर्वहं च भयङ्‌करः ।
बभञ्ज च रथं दिव्यं चिच्छेद रथपीठकान् ॥ २९ ॥
मयूरं जर्जरीभूतं दिव्यास्त्रेण चकार सः ।
शक्तिं चिक्षेप सूर्याभां तस्य वक्षस्य घातिनीम् ॥ ३० ॥
क्षणं मूर्च्छां च सम्प्राप बभूव चेतनः पुनः ।
गृहीत्वा तद्धनुर्दिव्यं यद्दत्तं विष्णुना पुरा ॥ ३१ ॥
रत्‍नेन्द्रसारनिर्माणयानमारुह्य कार्तिकः ।
शस्त्रास्त्रं च गृहीत्वा च चकार रणमुल्बणम् ॥ ३२ ॥
सर्पांश्च पर्वतांश्चैव वृक्षांश्च प्रस्तरांस्तथा ।
सर्वांश्चिच्छेद कोपेन दिव्यास्त्रेण शिवात्मजः ॥ ३३ ॥
वह्निं निर्वापयामास पार्जन्येन प्रतापवान् ।
रथं धनुश्च चिच्छेद शङ्‌खचूडस्य लीलया ॥ ३४ ॥
सन्नाहं सारथिं चैव किरीटं मुकुटोज्ज्वलम् ।
चिक्षेप शक्तिं शुक्लाभां दानवेन्द्रस्य वक्षसि ॥ ३५ ॥
मूर्च्छां सम्प्राप्य राजा च चेतनश्च बभूव ह ।
आरुरोह यानमन्यद्धनुर्जग्राह सत्वरः ॥ ३६ ॥
चकार शरजालं च मायया मायिनां वरः ।
गुहं चच्छाद समरे शरजालेन नारद ॥ ३७ ॥
जग्राह शक्तिमव्यग्रां शतसूर्यसमप्रभाम् ।
प्रलयाग्निशिखारूपां विष्णोश्च तेजसाऽऽवृताम् ॥ ३८ ॥
चिक्षेप तां च कोपेन महावेगेन कार्तिके ।
पपात शक्तिस्तद्‌गात्रे वह्निराशिरिवोज्ज्वला ॥ ३९ ॥
मूर्च्छां सम्प्राप शक्त्या च कार्तिकेयो महाबलः ।
काली गृहीत्वा तं क्रोडे निनाय शिवसनिधौ ॥ ४० ॥
शिवस्तं चापि ज्ञानेन जीवयामास लीलया ।
ददौ बलमनन्तं च समुत्तस्थौ प्रतापवान् ॥ ४१ ॥
काली जगाम समरं रक्षितुं कार्तिकस्य या ।
वीरास्तामनुजग्मुश्च ते च नन्दीश्वरादयः ॥ ४२ ॥
सर्वे देवाश्च गन्धर्वा यक्षराक्षसकिन्नराः ।
वाद्यभाण्डाश्च बहुशः शतशो मधुवाहकाः ॥ ४३ ॥
सा च गत्वाथ संग्रामं सिंहनादं चकार च ।
देव्याश्च सिंहनादेन प्रापुर्मूर्च्छां च दानवाः ॥ ४४ ॥
अट्टाट्टहासमशिवं चकार च पुनः पुनः ।
दृष्ट्वा पपौ च माध्वीकं ननर्त रणमूर्धनि ॥ ४५ ॥
उग्रदंष्ट्रा चोग्रदण्डा कोटवी च पपौ मधु ।
योगिनीडाकिनीनां च गणाः सुरगणादयः ॥ ४६ ॥
दृष्ट्वा कालीं शङ्‌खचूडः शीघ्रमाजौ समाययौ ।
दानवाश्च भयं प्रापू राजा तेभ्योऽभयं ददौ ॥ ४७ ॥
काली चिक्षेप वह्निं च प्रलयाग्निशिखोपमम् ।
राजा निर्वापयामास पार्जन्येन च लीलया ॥ ४८ ॥
चिक्षेप वारुणं सा च तीव्रं च महदद्‍भुतम् ।
गान्धर्वेण च चिच्छेद दानवेन्द्रश्च लीलया ॥ ४९ ॥
माहेश्वरं प्रचिक्षेप काली वह्निशिखोपमम् ।
राजा जघान तं शीघ्रं वैष्णवेन च लीलया ॥ ५० ॥
नारायणास्त्रं सा देवी चिक्षेप मन्त्रपूर्वकम् ।
राजा ननाम तद्‌ दृष्ट्वा चावरुह्य रथादसौ ॥ ५१ ॥
ऊर्ध्वं जगाम तच्चास्त्रं प्रलयाग्निशिखोपमम् ।
पपात शङ्‌खचूडश्च भक्त्या तं दण्डवद्‌भुवि ॥ ५२ ॥
ब्रह्मास्त्रं सा च चिक्षेप यत्‍नतो मन्त्रपूर्वकम् ।
ब्रह्मास्त्रेण महाराजो निर्वापं च चकार सः ॥ ५३ ॥
तदा चिक्षेप दिव्यास्त्रं सा देवी मन्त्रपूर्वकम् ।
राजा दिव्यास्त्रजालेन तन्निर्वाणं चकार च ॥ ५४ ॥
तदा चिक्षेप शक्तिं च यत्‍नतो योजनायताम् ।
राजा दिव्यास्त्रजालेन शतखण्डां चकार ह ॥ ५५ ॥
जग्राह मन्त्रपूतं च देवी पाशुपतं रुषा ।
निक्षेपणं निरोद्धुं च वाग्बभूवाशरीरिणी ॥ ५६ ॥
मृत्युः पाशुपते नास्ति नृपस्य च महात्मनः ।
यावदस्ति च मन्त्रस्य कवचं च हरेरिति ॥ ५७ ॥
यावत्सतीत्वमस्त्येव सत्याश्च नृपयोषितः ।
तावदस्य जरामृत्युर्नास्तीति ब्रह्मणो वचः ॥ ५८ ॥
इत्याकर्ण्य भद्रकाली न तच्चिक्षेप शस्त्रकम् ।
शतलक्षं दानवानां जग्रास लीलया क्षुधा ॥ ५९ ॥
ग्रस्तुं जगाम वेगेन शङ्‌खचूडं भयङ्‌करी ।
दिव्यास्त्रेण सुतीक्ष्णेन वारयामास दानवः ॥ ६० ॥
खड्गं चिक्षेप सा देवी ग्रीष्मसूर्योपमं यथा ।
दिव्यास्त्रेण दानवेन्द्रः शतखण्डं चकार सः ॥ ६१ ॥
पुनर्ग्रस्तुं महादेवी वेगेन च जगाम तम् ।
सर्वसिद्धेश्वरः श्रीमान्ववृधे दानवेश्वरः ॥ ६२ ॥
वेगेन मुष्टिना काली कोपयुक्ता भयङ्‌करी ।
बभञ्ज च रथं तस्य जघान सारथिं सती ॥ ६३ ॥
सा च शूलं प्रचिक्षेप प्रलयाग्निशिखोपमम् ।
वामहस्तेन जग्राह शङ्‌खचूडः स्वलीलया ॥ ६४ ॥
मुष्ट्या जघान तं देवी महाकोपेन वेगतः ।
बभ्राम च तया दैत्यः क्षणं मूर्च्छामवाप च ॥ ६५ ॥
क्षणेन चेतनां प्राप्य समुत्तस्थौ प्रतापवान् ।
न चकार बाहुयुद्धं देव्या सह ननाम ताम् ॥ ६६ ॥
देव्याश्चास्त्रं स चिच्छेद जग्राह च स्वतेजसा ।
नास्त्रं चिक्षेप तां भक्तो मातृभक्त्या तु वैष्णवः ॥ ६७ ॥
गृहीत्वा दानवं देवी भ्रामयित्वा पुनः पुनः ।
ऊर्ध्वं च प्रापयामास महावेगेन कोपिता ॥ ६८ ॥
ऊर्ध्वात्पपात वेगेन शङ्‌खचूडः प्रतापवान् ।
निपत्य च समुत्तस्थौ प्रणम्य भद्रकालिकाम् ॥ ६९ ॥
रत्‍नेन्द्रसारनिर्माणं विमानं सुमनोहरम् ।
आरुरोह हर्षयुक्तो न विश्रान्तो महारणे ॥ ७० ॥
दानवानां च क्षतजं सा देवी च पपौ क्षुधा ।
पीत्वा भुक्त्वा भद्रकाली जगाम शङ्करान्तिकम् ॥ ७१ ॥
उवाच रणवृत्तान्तं पौर्वापर्यं यथाक्रमम् ।
श्रुत्वा जहास शम्भुश्च दानवानां विनाशनम् ॥ ७२ ॥
लक्षं च दानवेन्द्राणामवशिष्टं रणेऽधुना ।
भुञ्जन्त्या निर्गतं वक्त्रात्तदन्यं भुक्तमीश्वर ॥ ७३ ॥
संग्रामे दानवेन्द्रं च हन्तुं पाशुपतेन वै ।
अवध्यस्तव राजेति वाग्बभूवाशरीरिणी ॥ ७४ ॥
राजेन्द्रश्च महाज्ञानी महाबलपराक्रमः ।
न च चिक्षेप मय्यस्त्रं चिच्छेद मम सायकम् ॥ ७५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे नारायणनारदसवादे
कालीशङ्‌खचूडयुद्धवर्णनं नाम द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥


भद्रकाली व स्कंद यांचा शंखचूडाबरोबर संग्राम -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

त्या दानवेश्वर शंखचूडाने शंकराला भक्तिपूर्वक प्रणिपात केला. आपल्या यानात बसून तो सत्वर निघून गेला. शंकराने आपल्या सैन्यात सावधानतेची प्रेरणा दिली. इकडे तो व नवश्रेष्ठही युद्धास सज्ज झाला. स्वतः शंकर वृषपर्वासह युद्ध करू लागले. भास्करही विप्रचीतीसह लढू लागला.

दंभ व चंद्र, कालेश्वर व काल, अग्नी व गोकर्ण, कुबेर व कालकेय, विश्वकर्मा व मय, मृत्यु व भयंकर, यम व संहार, वरुण व विकंकण, वायू व चंचल, बुध व धृतपृष्ठ, शनैश्वर, रक्ताक्षी, जयंत व रत्नसार, वसू व वर्चसांचे गण, अश्विनीकुमार व दीप्तीमान, नलकुबेर व धूम्र, धर्म व धुरंधर मंगळ व उषाक्षी, भानू व शोभाकर, मन्मथ व पीठर हे एकमेकांशी युद्ध करू लागले.

तसेच गोधामुख, चूर्ण, खड्‌ग, ध्वज, कांचिमुख, पिंड, धूम्र, नंदी, विश्व, पलाश, यांच्याशी आदित्य वगैरे युद्ध करू लागले. अकरा महाभयंकर राक्षस व अकरा रुद्र यांचा घनघोर संग्राम झाला. दोन्हीही सैन्ये एकमेकांना भिडली. शंकर, काली, स्कंद मात्र वटवृक्षाखाली बसले होते. हे युद्ध नित्य चालू होते. शंखचूड रत्नांच्या सिंहासनावर बसला होता. अखेर शंकराच्या बाजूकडील सर्व देवयोद्ध्यांचा दानवांनी पराजय केला. ते भीतीने सर्वत्र पळू लागले.

ते पाहून स्कंद क्रुद्ध झाला. देवांना अभय देऊन तो स्वतः एकटा सर्व दानवांशी युद्ध करू लागला. त्याने शंभर अक्षौहिणी सैन्याचा वध केला. कालीनेही अनेक राक्षसांचा निःपात केला. क्रुद्ध होऊन तिने दानवांचे रक्त प्राशन केले. कोटयावधी प्रचंड हत्ती तिने हातात उचलून तोंडात टाकले. स्कंदाच्या शरवृष्टीमुळे दानव अत्यंत जखमी व मृत झाले. ते सर्व पराक्रमी वीर रणातून पळून गेले. फक्त वृषपर्वा, विप्रचित्ती, दंभ, विकंकण एवढेच स्कंदाशी बरोबरीने युद्ध करू लागले. पण स्कंदाच्या शक्तीमुळे तेही पीडित झाले. तरीही ते रणातून पळाले नाहीत. सर्वांवर आकाशातून पुष्पवृष्टी झाली.

स्कंदाचे युद्ध जणू काय प्रकृतीलयाप्रमाणेच झाले. तेव्हा स्वतः राजा शंखचूड विमानात बसून बाणांचा वर्षाव करू लागला. महाभयंकर संग्राम झाला. सर्वजण पाताळात पळाले. एकटा कार्तिकेय रणांगणात उभा होता. शंखचूडाने पर्वत, शिला, सर्प, वृक्ष यांची वृष्टी केली. त्या वर्षावामुळे सूर्य आच्छादला गेला. शरवृष्टीमुळे तो शिवपुत्र स्कंदही आच्छादून गेला.

राजाने स्कंदाचे भयंकर धनुष्य तोडले, रथ मोडला, दिव्य अस्त्राने त्याने मयुराला जर्जर केले आणि स्कंदाचा नाश करण्यासाठी शंखचूडाने दिव्य शक्ती सोडली. त्या प्रहाराने स्कंद क्षणैक मूर्च्छित झाला. पुन्हा सावध होऊन त्याने विष्णूने दिलेले धनुष्य घेतले. तो सर्वोत्तम विमानात आरूढ झाला आणि भयंकर शस्त्रास्त्रे घेऊन तो कार्तिकस्वामी युद्ध करू लागला.

राजाने सोडलेल्या पर्वतादि सर्व अस्त्रांचे स्कंदाने चूर्ण केले. पर्जन्यास्त्राने अग्नी शांत केला. त्याने सहज शंखचूडाचा रथ व धनुष्य तोडून टाकले. एक शुभ पण तेजस्वी शक्ती त्याने दानवेंद्रावर फेकली. शंखचूड मूर्च्छित झाला. सत्वर सावध होऊन त्याने
दुसरे धनुष्य घेतले. राजाने मायेच्या बलावर शरांचे जाळे पसरले. त्यामुळे त्याने शत्रूला झाकून टाकले व एक प्रचंड शक्ती त्याने वेगाने कार्तिकेयावर फेकली. त्यामुळे महाबलाढय स्कंद मूर्च्छित झाला. कालीने त्याला शंकराजवळ आणून ठेवले. शंकराने ज्ञानबलाने त्याला सावध करून अनंत शक्तीचे बल दिले. काली रक्षणार्थ रणात गेली. सर्व देव वगैरे वाद्ये घेऊन त्याच्या मागून चालले होते. कालीने युद्धभूमीवर सिंहनाद केला. देवीच्या या भयंकर सिंहनादामुळे दानवांना मूर्च्छा आली. मद्यपान करून ती देवी रणात नाचली.

तिच्या दाढा उग्र होत्या. दंड भयंकर होते. तिच्याबरोबर योगिनी, डाकिनीही रणात आल्या. ते पाहून दानव घाबरले. पण शंखचूडाने त्यांना अभय देऊन स्थिर रहाण्यास सांगितले. कालीने अनेक अग्निशिखा फेकल्या. राजाने पर्जन्यास्त्राने सर्व शांत केले. तिने वरुणास्त्र सोडले. गंधर्वास्त्राने राजाने त्याचा छेद केला. तिने माहेश्वरास्त्र दानवेंद्रावर सोडले. वैष्णवास्त्र सोडून राजाने त्याचे नियमन केले.

देवीने मंत्रोक्त असे नारायणास्त्र सोडले. ते पाहून राजाने रथावरून उतरून नम्रतेने नमस्कार केला. अग्निशिखेप्रमाणे ते अस्त्र वर गेले. शंखचूड भक्तिभावाने भूमीवर आडवा पडला. त्यावेळी देवीने मंत्र म्हणून ब्रह्मास्त्र सोडले, पण राजाने त्याचेही निराकरण केले. तेव्हा संतप्त होऊन देवीने पाशुपत अस्त्र हातात घेताच आकाशवाणी झाली.

"हा राजा महात्मा असल्याने, हरीच्या मंत्राचे कवच असल्यामुळे, त्याला पाशुपतास्त्रापासून भय नाही. कारण राजाच्या पत्नीचे सतीत्व अबाधित आहे. म्हणून तोपर्यंत राजाला मृत्यू येणार नाही."

ते ऐकून भद्रकालीने अस्त्र सोडले नाही. पण क्षुधित झाल्याने तिने दहा हजार दानव खाल्ले. ती दानवेंद्राला खाण्यास सिद्ध झाली, पण शंखचूड मायेने वृद्धिंगत झाल्याने ते साध्य झाले नाही. तेव्हा वेगाने मुष्टिप्रहार करून तिने त्याचा रथ मोडला, सारथ्याचा वध केला, अग्नीप्रमाणे भासणारा शूल तिने त्याच्यावर फेकला. पण शंखचूडाने तो सहज डाव्या हातात झेलला. त्यामुळे क्रुद्ध होऊन तिने प्रचंड मुष्टीप्रहार केला. त्यायोगे त्या दैत्याला क्षणभर भोवळ आली. पण लगेच सावरून तो उभा राहिला. त्याने देवीला नमस्कार केला. स्वतेजाने त्याने तिचे अस्त्र ग्रहण केले. केवळ मातृभक्तीमुळे त्याने तिच्यावर शस्त्र टाकले नाही.

अखेर देवीने त्या दानवाला एकाएकी उचलून वर फेकले. पण तेथून खाली पडल्यावरही त्याने देवीला पुन्हा नमस्कार केला. हसतमुखाने तो दिव्य विमानात आरूढ झाला. पण तो थकला नाही. भूक लागल्यामुळे भद्रकाली देवीने दानवांचे रक्त प्राशन केले. नंतर ती शंकराजवळ गेली. रणातील सर्व घटना तिने शंकराला कथन केल्या. ती म्हणाली, "आकाशवाणी झाल्यामुळे राजाचा मृत्यू माझ्याकडून होणार नाही, हे मला समजले. पण राजा महापराक्रमी, धर्मवेत्ता आहे. त्याने माझ्या अस्त्रांचे निवारण केले, पण स्वतः मजवर बाण टाकले नाहीत."


अध्याय बाविसावा समाप्त

GO TOP