श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
एकादशः स्कन्धः
अष्टमोऽध्यायः


भूतशुद्धिवर्णनम्

श्रीनारायण उवाच
भूतशुद्धिप्रकारं च कथयामि महामुने ।
मूलाधारात्समुत्थाय कुण्डलीं परदेवताम् ॥ १ ॥
सुषुम्णामार्गमाश्रित्य ब्रह्मरन्ध्रगतां स्मरेत् ।
जीवं ब्रह्मणि संयोज्य हंसमन्त्रेण साधकः ॥ २ ॥
पादादिजानुपर्यन्तं चतुष्कोणं सवज्रकम् ।
लं बीजाख्यं स्वर्णवर्णं स्मरेदवनिमण्डलम् ॥ ३ ॥
जान्वाद्यानाभिचन्द्रार्धनिभं पद्मद्वयाङ्‌कितम् ।
वं बीजयुक्तं श्वेताभमम्भसो मण्डलं स्मरेत् ॥ ४ ॥
नाभेर्हृदयपर्यन्तं त्रिकोणं स्वस्तिकान्वितम् ।
रं बीजेन युतं रक्तं स्मरेत्पावकमण्डलम् ॥ ५ ॥
हृदो भूमध्यपर्यन्तं वृत्तं षड्‌बिन्दुलाञ्छितम् ।
यं बीजयुक्तं धूम्राभं नभस्वन्मण्डलं स्मरेत् ॥ ६ ॥
आब्रह्मरन्ध्रं भ्रूमध्याद्‌वृत्तं स्वच्छं मनोहरम् ।
हं बीजयुक्तमाकाशमण्डलं च विचिन्तयेत् ॥ ७ ॥
एवं भूतानि सञ्चिन्त्य प्रत्येकं संविलापयेत् ।
भुवं जले जलं वह्नौ वह्निं वायौ नभस्यमुम् ॥ ८ ॥
विलाप्य खमहङ्‌कारे महत्तत्त्वेऽप्यहङ्‌कृतिम् ।
महान्तं प्रकृतौ मायामात्मनि प्रविलापयेत् ॥ ९ ॥
शुद्धसंविन्मयो भूत्वा चिन्तयेत्पापपूरुषम् ।
वामकुक्षिस्थितं कृष्णमङ्‌गुष्ठपरिमाणकम् ॥ १० ॥
ब्रह्महत्याशिरोयुक्तं कनकस्तेयबाहुकम् ।
मदिरापानहृदयं गुरुतल्पकटीयुतम् ॥ ११ ॥
तत्संसर्गिपदद्वन्द्वमुपपातकमस्तकम् ।
खड्गचर्मधरं कृष्णमधोवक्त्रं सुदुःसहम् ॥ १२ ॥
वायुबीजं स्मरन्वायुं सम्पूर्यैनं विशोषयेत् ।
स्वशरीरयुतं मन्त्रो वह्निबीजेन निर्दहेत् ॥ १३ ॥
कुम्भके परिजप्तेन ततः पापनरोद्‍भवम् ।
बहिर्भस्म समुत्सार्य वायुबीजेन रेचयेत् ॥ १४ ॥
सुधाबीजेन देहोत्थं भस्म संप्लावयेत्सुधीः ।
भूबीजेन घनीकृत्य भस्म तत्कनकाण्डवत् ॥ १५ ॥
विशुद्धमुकुराकारं जपन्बीजं विहायसः ।
मूर्धादिपादपर्यन्तान्यङ्‌गानि रचयेत्सुधीः ॥ १६ ॥
आकाशादीनि भूतानि पुनरुत्पादयेच्चितः ।
सोऽहं मन्त्रेण चात्मानमानयेद्धृदयाम्बुजे ॥ १७ ॥
कुण्डलीजीवमादाय परसङ्‌गात्सुधामयम् ।
संस्थाप्य हृदयाम्भोजे मूलाधारगतां स्मरेत् ॥ १८ ॥
रक्ताम्भोधिस्थपोतोल्लसदरुण-
     सरोजाधिरूढा कराब्जैः
शूलं कोदण्डमिक्षूद्‍भवमणिगुण-
     मप्यङ्‌कुशं पञ्चबाणान् ।
बिभ्राणासृक्कपालं त्रिनयन-
     लसिता पीनवक्षोरुहाढ्या
देवी बालार्कवर्णा भवतु
     सुखकरी प्राणशक्तिः परा नः ॥ १९ ॥
एवं ध्यात्वा प्राणशक्तिं परमात्मस्वरूपिणीम् ।
विभूतिधारणं कार्यं सर्वाधिकृतिसिद्धये ॥ २० ॥
विभूतेर्विस्तरं वक्ष्ये धारणे च महाफलम् ।
श्रुतिस्मृतिप्रमाणोक्तं भस्मधारणमुत्तमम् ॥ २१ ॥


पापपुरुषाची कल्पना

श्रीनारायणमुनी म्हणाले, ''हे महामुने, आता भूत शुद्धीचा प्रकार ऐक. परदेवता जी कुंडलिनी तिला मूलाधारापासून उठवून ती सुषुम्नानाडीच्या मार्गात ब्रह्मरंध्रात गेली आहे असे समजावे. हंस मंत्राने जीवास ब्रह्मात मिळवावे. पायापासून गुडघ्यापर्यंत चौकोनी, छत्तीस आकड्यांच्या आकृतीने युक्त, लं या बीजाने पूर्ण व सुवर्ण वर्णाचे अवनी मंडल आहे अशी भावना करावी.'' गुडघ्यापासून नाभीपर्यंत अर्धचंद्राकृती ज्याच्या दोन्ही टोकावर दोन कमले आहेत आणि ज्यामध्ये व हे बीज आहे असे शुभ उदकमंडल असल्याची कल्पना करावी. नाभीपासून हृदयापर्यंत त्रिकोणी, स्वस्तिकाने युक्त रं या बीजाने युक्त, लाल अग्निमंडल असल्याचे समजावे. हृदयापासून भिवयांपर्यंत वर्तुलाकृती, सहा बिंदूंच्या चिन्हांनी युक्त यं या बीजाने युक्त धूमवर्णाचे वायुमंडल आहे असे कल्पावे. भिवयांच्या मध्यप्रदेशापासून ब्रह्मरंध्रापर्यंत वर्तुलाकृती, मनोहर, हं या बीजाने युक्त आकाशमंडल असल्याचे चिंतन करावे. नंतर प्रत्येक मंडलाचा लय करावा. भूमीचा जलात, जल अग्नीत, अग्नी वायूत, वायू आकाशात, असा लय करावा. आकाशाचा अहंकारात, अहंकाराचा महतत्त्वात, महत्तत्त्वाचा प्रकृतीमध्ये व प्रकृतीचा आत्मतत्त्वात लय करावा. शुद्ध संविन्मय होऊन डाव्या कुशीत असलेला अंगुष्ठ परिमाण व कृष्णवर्ण अशा पापपुरुषाचे चिंतन करावे. ब्रह्महत्यारूप मस्तक, सुवर्णचोरी हे बाहु, मदिरापान हे हृदय, गुरूस्त्री ही कटी
त्यांचे पादयुगुल, उपपातक हे दुसरे मस्तक असा व ढाल तलवार धारण केलेला, मस्तक खाली लोंबत असलेला अशा दुष्ट पापपुरुषास वायुबीज यं याचे स्मरण करीत प्राणायामाने त्याचा देह शुष्क करावा. नंतर शरीरयुक्त पुरुषास कुंभकामध्ये अत्यंत तापविलेल्या वं या बीजाने जाळून टाकावे. नंतर वायूबीजाचा उच्चार करावा व पापपुरुषाचे भस्म बाहेर टाकावे. नंतर रेचक प्राणायाम करावा. नंतर वं या सुधाबीजात ते भस्म भिजवावे. भूबीजाने ते अंड्याप्रमाणे घट्ट करावे. आकाशाच्या हं या बीजाचा जप करीत त्याचा आरशाप्रमाणे आकार झाल्याची कल्पना करावी व मस्तकापासून पायापर्यंत अंगाची रचना करावी. आकाशादि सर्व भूतांची पुन्हा चैतन्यापासून उत्पत्ती करावी. सोहं मंत्राने आत्म्यास हृदयकमलात आणावे. नंतर अमृतमय जीवास हृदयात स्थापन करावे; कुंडलिनी मूलाधारात गेल्याची भावना करावी. शोणसमुद्रातील नौकेत उत्पन्‍न झालेले लाल कमल, त्यात आरूढ झालेली, हस्त कमलांनी युक्त, रक्तवर्णी कपाल, शूल, इक्षु, धनु, पाश, अंकुश, पाच बाण यांचे धारण करणारी, त्रिनेत्रांनी युक्त, पुष्ट स्तनांची, बालसूर्याप्रमाणे कांती असलेली, अशी जी श्रेष्ठ देवी प्राणशक्ती ती आम्हास सुखकर होवो असे परमात्मस्वरूपिणी प्राणशक्तीचे ध्यान करावे व सर्व अधिकार प्राप्त होण्यासाठी भस्म धारण करावे. भस्माचा विस्तार व त्यापासून प्राप्त होणारे फल सांगतो. हे श्रुतीपुराणात सांगितलेले आहे.इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां एकादशस्कन्धे भूतशुद्धिवर्णनं नामाष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥

अध्याय आठवा समाप्त

GO TOP