श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
एकादशः स्कन्धः
एकोनविंशोऽध्यायः


मध्याह्नसंध्यावर्णनम्

श्रीनारायण उवाच
अथातः श्रूयतां ब्रह्मन् सन्ध्यां माध्याह्निकीं शुभाम् ।
यदनुष्ठानतोऽपूर्वं जायतेऽत्युत्तमं फलम् ॥ १ ॥
सावित्रीं युवतीं श्वेतवर्णां चैव त्रिलोचनाम् ।
वरदां चाक्षमालाढ्यां त्रिशूलाभयहस्तकाम् ॥ २ ॥
वृषारूढां यजुर्वेदसंहितां रुद्रदेवताम् ।
तमोगुणयुतां चैव भुवर्लोकव्यवस्थिताम् ॥ ३ ॥
आदित्यमार्गसंचारकर्त्रीं मायां नमाम्यहम् ।
आदिदेवीमथ ध्यात्वाऽऽचमनादि च पूर्ववत् ॥ ४ ॥
अथ चार्घ्यप्रकरणं पुष्पाणि चिनुयात्ततः ।
तदलाभे बिल्वपत्रं तोयेन मिश्रयेत्ततः ॥ ५ ॥
ऊर्ध्वं च सूर्याभिमुखं क्षिप्त्वार्घ्यं प्रतिपादयेत् ।
प्रातःसन्ध्यादिवत्सर्वमुपसंहारपूर्वकम् ॥ ६ ॥
मध्याह्ने केचिदिच्छन्ति सावित्रीं तु तदित्यृचम् ।
असम्प्रदायं तत्कर्म कार्यहानिस्तु जायते ॥ ७ ॥
कारणं सन्ध्ययोश्चात्र मन्देहा नाम राक्षसाः ।
भक्षितुं सूर्यमिच्छन्ति कारणं श्रुतिचोदितम् ॥ ८ ॥
अतस्तु कारणाद्विप्रः सन्ध्यां कुर्यात्प्रयत्‍नतः ।
सन्ध्ययोरुभयोर्नित्यं गायत्र्या प्रणवेन च ॥ ९ ॥
अम्भस्तु प्रक्षिपेत्तेन नान्यथा श्रुतिघातकः ।
आकृष्णेनेति मन्त्रेण पुष्पैर्वाम्बुविमिश्रितम् ॥ १० ॥
अलाभे बिल्वदूर्वादिपत्रेणोक्तेन पूर्वकम् ।
अर्ध्यं दद्यात्प्रयत्‍नेन साङ्‌गं सन्ध्याफलं लभेत् ॥ ११ ॥
अत्रैव तर्पणं वक्ष्ये शृणु देवर्षिसत्तम ।
भुवः पुनः पूरुषं तु तर्पयामि नमो नमः ॥ १२ ॥
यजुर्वेदं तर्पयामि मण्डलं तर्पयामि च ।
हिरण्यगर्भं च तथान्तरात्मानं तथैव च ॥ १३ ॥
सावित्रीं च ततो देवमातरं साङ्‌कृतिं तथा ।
सन्ध्यां तथैव युवतीं रुद्राणीं नीमृजां तथा ॥ १४ ॥
सर्वार्थानां सिद्धिकरीं सर्वमन्त्रार्थसिद्धिदाम् ।
भूर्भुवः स्वः पूरुषं तु इति मध्याह्नतर्पणम् ॥ १५ ॥
उदुत्यमिति सूक्तेन सूर्योपस्थानमेव च ।
चित्रं देवानामिति च सूर्योपस्थानमाचरेत् ॥ १६ ॥
ततो जपं प्रकुर्वीत मन्त्रसाधनतत्परः ।
जपस्यापि प्रकारं तु वक्ष्यामि शृणु नारद ॥ १७ ॥
कृत्वोत्तानौ करौ प्रातः सायं चाधः करौ तथा ।
मध्याह्ने हृदयस्थौ तु कृत्वा जपमुदीरयेत् ॥ १८ ॥
पर्वद्वयमनामिक्याः कनिष्ठादिक्रमेण तु ।
तर्जनीमूलपर्यन्तं करमाला प्रकीर्तिता ॥ १९ ॥
गोघ्नः पितृघ्नो मातृघ्नो भ्रूणहा गुरुतल्पगः ।
ब्रह्मस्वक्षेत्रहारी च यश्च विप्रः सुरां पिबेत् ॥ २० ॥
स गायत्र्या सहस्रेण पूतो भवति मानवः ।
मानसं वाचिकं पापं विषयेन्द्रियसङ्‌गजम् ॥ २१ ॥
तत्किल्बिषं नाशयति त्रीणि जन्मानि मानवः ।
गायत्रीं यो न जानाति वृथा तस्य परिश्रमः ॥ २२ ॥
पठेच्च चतुरो वेदान् गायत्रीं चैकतो जपेत् ।
वेदानां चावृतेस्तद्वद्‌गायत्रीजप उत्तमः ॥ २३ ॥
इति मध्याह्नसन्ध्यायाः प्रकारः कीर्तितो मया ।
अतः परं प्रवक्ष्यामि ब्रह्मयज्ञविधिक्रमम् ॥ २४ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां एकादशस्कन्धे
मध्याह्नसंध्यावर्णनं नामैकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥


मध्यान्ह संध्या

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारायण म्हणाले, ''हे नारदा, आता मध्यान्हीची शुभ संध्या ऐक. त्याच्या अनुष्ठानामुळे उत्तम फल मिळते.''

'' जी युवती श्वेतवर्णा, त्रिनेत्रा, वरदा, अक्षमाला, त्रिशूला, अभयमुद्रा यांनी युक्त आहे व बैलावर आरूढ झालेली आहे, जी यजुर्वेद संहितारूप आहे, रुद्र हीच जिची देवता आहे, जी तमोगुणयुक्त भूवर्लोकात राहिली आहे, आदित्यमार्गात जी संचार करते, अशा मायेस मी नमस्कार करतो.'' असे देवीचे ध्यान करून पूर्वीप्रमाणे आचमने घ्यावीत नंतर अर्ध्य द्यावेत.

यासाठी पुष्पे गोळा करावीत किंवा पाण्यात बिल्वपत्रे मिसळावीत. सूर्याकडे तोंड करून उदक फेकावे. उरलेले सर्व संस्कार प्रातःसंध्येप्रमाणेच करावेत. मध्यान्ह समयी तत्सवितुः ऋचा कोणी सावित्री म्हणून घेतात. पण ते संप्रदायास सोडून आहे. त्यामुळे कार्यनाश होतो. दोन्ही संध्या करण्याचे कारण मंदेहा नावाच्या राक्षसास दग्ध करण्यासाठी आहेत. अकृष्णेन या मंत्राने पुष्पमिप्रिव्रत जल घेऊन अर्ध्य द्यावेत. पुष्पे न मिळाल्यास बेल दुर्वा यांनी जलाने अर्ध्य द्यावेत म्हणजे सांग फल मिळते. आता यावेळेचे तर्पण ऐक.

'ॐ भुवः मी पुरुषास तर्पण करतो. नमोनमः युजुर्वेदास तृप्त करतो, मंडलास तृप्त करतो, हिरण्यगर्भ व अंतरात्म्यास तृप्त करतो. सावित्री, देवमाता, सांकृती, संध्या, युक्ती, रुद्राणी यांना मी तृप्त करतो. सर्वसिद्धी देणारी, सर्व मंत्रसार्थसिद्धी देणारी जी देवी तिला मी तृप्त करतो.

भुर्भुवः स्वःअसे म्हणून पुरुषास तृप्त करून मध्यान्ह तर्पण करावे. उदुत्यं या मंत्राने व चित्र देवता यां मंत्राने सूर्योपस्थान करावे. नंतर जप करावा. अनामिकेची दोन पर्वे, कनिष्ठिका पर्वाने क्रमवार तर्जनीच्या मूळ पेरापर्यंत करमाला सांगितली आहे.

गायीची हिंसा करणारा, पितृहत्या करणारा, मातृवध, भ्रूणहत्या करणारा, गुरुस्त्रीशी गमन करणारा, ब्राह्मणाचे द्रव्य हरण करणारा, सुरापान करणारा हे सर्व पापी गायत्रीच्या हजार मंत्राने शुद्ध होतात. काया, वाचा, मनेकरून तीन जन्मात केलेली पापे या जपामुळे नष्ट होतात. चार वेदांचे पठण करीत असताना गायत्रीचा जप करावा. वेदांच्या पारायणांपेक्षा गायत्री जप श्रेष्ठ होय. याप्रमाणे मध्यान्ह संध्येचा प्रकार सांगितला. आता ब्रह्मयज्ञविधीचा क्रम ऐक.अध्याय एकोणिसावा समाप्त

GO TOP