श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
दशमः स्कन्धः
सप्तमोऽध्यायः


विन्ध्यवृद्ध्यवरोधवर्णनम्

सूत उवाच
इति वाक्यं समाकर्ण्य विबुधानां द्विजोत्तमः ।
करिष्ये कार्यमेतद्वः प्रत्युवाच ततो मुनिः ॥ १ ॥
अङ्‌गीकृते तदा कार्ये मुनिना कुम्भजन्मना ।
देवाः प्रमुदिताः सर्वे बभूबुर्द्विजसत्तमाः ॥ २ ॥
ते देवाः स्वानि धिष्ण्यानि भेजिरे मुनिवाक्यतः ।
पत्‍नीं मुनिवरः श्रीमानुवाच नृपकन्यकाम् ॥ ३ ॥
अये नृपसुते प्राप्तो विघ्नोऽनर्थस्य कारकः ।
भानुमार्गनिरोधेन कृतो विन्ध्यमहीभृता ॥ ४ ॥
आज्ञातं कारणं तच्च स्मृतं वाक्यं पुरातनम् ।
काशीमुद्दिश्य यद्‌गीतं मुनिभिस्तत्त्वदर्शिभिः ॥ ५ ॥
अविमुक्तं न मोक्तव्यं सर्वथैव मुमुक्षुभिः ।
किन्तु विघ्ना भविष्यन्ति काश्यां निवसतां सताम् ॥ ६ ॥
सोऽन्तरायो मया प्राप्तः काश्यां निवसता प्रिये ।
इत्येवमुक्त्वा भार्यां तां मुनिः परमतापनः ॥ ७ ॥
मणिकर्ण्यां समाप्लुत्य दृष्ट्वा विश्वेश्वरं विभुम् ।
दण्डपाणिं समभ्यर्च्य कालराजं समागतः ॥ ८ ॥
कालराज महाबाहो भक्तानां भयहारक ।
कथं दूरयसे पुर्याः काशीपुर्यास्त्वमीश्वरः ॥ ९ ॥
त्वं काशीवासविघ्नानां नाशको भक्तरक्षकः ।
मां किं दूरयसे स्वामिन् भक्तार्तिविनिवारक ॥ १० ॥
परापवादो नोक्तो मे न पैशुन्यं न चानृतम् ।
केन कर्मविपाकेन काश्या दूरं करोषि माम् ॥ ११ ॥
एवं प्रार्थ्य च तं कालनाथं कुम्भोद्‍भवो मुनिः ।
जगाम साक्षिविघ्नेशं सर्वविघ्ननिवारणम् ॥ १२ ॥
तं दृष्ट्वाभ्यर्च्य सम्प्रार्थ्य ततः पुर्या विनिर्गतः ।
लोपामुद्रापतिः श्रीमानगस्त्यो दक्षिणां दिशम् ॥ १३ ॥
काशीविरहसन्तप्तो महाभाग्यनिधिर्मुनिः ।
संस्मृत्यानुक्षणं काशीं जगाम सह भार्यया ॥ १४ ॥
तपोयानमिवारुह्य निमिषार्धेन वै मुनिः ।
अग्रे ददर्श तं विन्ध्यं रुद्धाम्बरमथोन्नतम् ॥ १५ ॥
चकम्पे चाचलस्तूर्णं दृष्ट्वैवाग्रे स्थितं मुनिम् ।
गिरिः खर्वतरो भूत्वा विवक्षुरवनीमिव ॥ १६ ॥
दण्डवत्पतितो भूमौ साष्टाङ्‌गं भक्तिभावितः ।
तं दृष्ट्वा नम्रशिखरं विन्ध्यं नाम महागिरिम् ॥ १७ ॥
प्रसन्नवदनोऽगस्त्यो मुनिर्विन्ध्यमथाब्रवीत् ।
वत्सैवं तिष्ठ तावत्त्वं यावदागम्यते मया ॥ १८ ॥
अशक्तोऽहं गण्डशैलारोहणे तव पुत्रक ।
एवमुक्त्वा मुनिर्याम्यदिशं प्रति गमोत्सुकः ॥ १९ ॥
आरुह्य तस्य शिखराण्यवारुहदनुक्रमात् ।
गतो याम्यदिशं चापि श्रीशैलं प्रेक्ष्य वर्त्मनि ॥ २० ॥
मलयाचलमासाद्य तत्राश्रमपरोऽभवत् ।
सापि देवी तत्र विन्ध्यमागता मनुपूजिता ॥ २१ ॥
लोकेषु प्रथिता विन्ध्यवासिनीति च शौनक ।
सूत उवाच
एतच्चरित्रं परमं शत्रुनाशनमुत्तमम् ॥ २२ ॥
अगस्त्यविन्ध्यनगयोराख्यानं पापनाशनम् ।
राज्ञां विजयदं तच्च द्विजानां ज्ञानवर्धनम् ॥ २३ ॥
वैश्यानां धान्यधनदं शूद्राणां सुखदं तथा ।
धर्मार्थी धर्ममाप्नोति धनार्थी धनमाप्नुयात् ॥ २४ ॥
कामानवाप्नुयात्कामी भक्त्या चास्य सकृच्छ्रवात् ।
एवं स्वायम्भुवमनुर्देवीमाराध्य भक्तितः ॥ २५ ॥
लेभे राज्यं धरायाश्च निजमन्वन्तराश्रयम् ।
इत्येतद्वर्णितं सौम्य मया मन्वन्तराश्रितम् ।
आद्यं चरित्रं श्रीदेव्याः किं पुनः कथयामि ते ॥ २६ ॥


विंध्याचे निवारण-

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

देवांचे ते भाषण ऐकून तो श्रेष्ठ मुनी म्हणाला, " मी तुमचे कार्य करीन." हे वाक्य ऐकून सर्व देव संतुष्ट झाले व स्वस्थानी गेले. नंतर आपल्या राजकन्यापत्नीस तो ऋषी म्हणाला, हे राजकन्ये, एक विघ्न उत्पन्न झाले आहे. विंध्याने सूर्याचा मार्ग रोखला आहे. पण त्याचे कारण समजत नाही. तत्त्वदर्शी मुनींनी काशीला उद्देशून बोललेले मात्र मला स्मरत आहे." मुक्त झाल्यावाचून मुमुक्षुंनी काशी क्षेत्र सोडू नये. पण येथे रहाणार्‍यास विघ्ने येत असतात. हे प्रिये, सांप्रत मला विघ्न आले आहे." असे सांगून त्या ऋषीने मणिकर्णिकेत स्नान केले. विश्वेश्वराचे दर्शन घेतले. दंडपाणीचे पूजन करून तो कालराजाप्रत आला. तो म्हणाला, "हे कालभैरवा, हे भयनाश करणार्‍या, आज मला दूर का लोटीत आहेस ? तू भक्तरक्षक व विनाशक आहेस ना ? हे स्वामिन्, मी कोणला निंदिले नाही. कुणाबद्दल क्षुद्रभाव धरला नाही. खोटे बोललो नाही. मग कोणत्या कर्मामुळे तू मला काशीपासून दूर लोटीत आहेस ?"

अशारीतीने त्या मुनीने कालनाथाचे स्तवन केले. नंतर तो दक्षिणेस जाण्यास निघाला. तो काशीचे स्मरण करीत आपल्या भार्येसह लवकरच विंध्यापुढे येऊन उभा राहिला. त्या मुनीस पाहताच तो पर्वत थरथर कापू लागला. तो पर्वत अत्यंत नम्रतेने वाकला. दंडाप्रमाणे भूमीवर पडून त्याने मुनीस साष्टांग नमस्कार केला. तेव्हा ते प्रसन्नमुख मुनी म्हणाले, ' 'हे वत्सा, मी परत येईपर्यंत तू असाच रहा. कारण तुझ्या प्रचंड शील उल्लंघन करून जाण्यास मी असमर्थ आहे. "

असे म्हणून तो मुनी त्याच्या शिखरावर चढला व दक्षिण बाजूने खाली उतरला. नंतर श्रीशैलाचे दर्शन घेऊन तो पुढे गेला. मलयाचलावर आश्रम करून तो तेथेच राहू लागला. ती विंध्याचलावर आलेली देवीही सर्वांना पूज्य झाली. ती विंध्यवासिनी म्हणून प्रसिद्ध आहे. हे अगस्त्य व विंध्य यांचे आख्यान पापनाशक विजय प्राप्त करून देणारे, ज्ञानवृद्धी करणारे, धन-धान्य, विपुलता देणारे, सुखद असे आहे. हे भक्तीपूर्वक एकदा जरी श्रवण केले तरी सर्व मनोरथ पूर्ण होतात. स्वायंभुव मनुनेही देवीची आराधना केल्यावर त्याला पृथ्वीचे राज्य मिळाले.

याप्रमाणे मी तुला मन्वंतरासंबंधीचे देवीचे आख्यान सांगितले. आता आणखी काय सांगू ?इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
दशमस्कन्धे विन्ध्यवृद्ध्यवरोधवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥

अध्याय सातवा समाप्त

GO TOP