श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
प्रथमोऽध्यायः


योगमायाप्रभाववर्णनम्

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

ऋषय ऊचुः
भवता कथितं सूत महदाख्यानमुत्तमम् ।
कृष्णस्य चरितं दिव्यं सर्वपातकनाशनम् ॥ १ ॥
सन्देहोऽत्र महाभाग वासुदेवकथानके ।
जायते नः प्रोच्यमाने विस्तरेण महामते ॥ २ ॥
वने गत्वा तपस्तप्तं वासुदेवेन दुष्करम् ।
विष्णोरंशावतारेण शिवस्याराधनं कृतम् ॥ ३ ॥
वरप्रदानं देव्या च पार्वत्या यत्कृतं पुनः ।
जगन्मातुश्च पूर्णायाः श्रीदेव्या अंशभूतया ॥ ४ ॥
ईश्वरेणापि कृष्णेन कुतस्तौ सम्प्रपूजितौ ।
न्यूनता वा किमस्त्वस्य तदेवं संशयो मम ॥ ५ ॥
सूत उवाच
शृणुध्वं कारणं तत्र मया व्यासश्रुतञ्च यत् ।
प्रब्रवीमि महाभागाः कथां कृष्णगुणान्विताम् ॥ ६ ॥
वृत्तान्तं व्यासतः श्रुत्वा वैराटीसुतजस्तदा ।
पुनः पप्रच्छ मेधावी सन्देहं परमं गतः ॥ ७ ॥
जनमेजय उवाच
सम्यक्सत्यवतीसूनो श्रुतं परमकारणम् ।
तथापि मनसो वृत्तिः संशयं न विमुञ्चति ॥ ८ ॥
कृष्णेनाराधितः शम्भुस्तपस्तप्त्वातिदारुणम् ।
विस्मयोऽयं महाभाग देवदेवेन विष्णुना ॥ ९ ॥
यः सर्वात्मापि सर्वेशः सर्वसिद्धिप्रदः प्रभुः ।
स कथं कृतवान्घोरं तपः प्राकृतवद्धरिः ॥ १० ॥
जगत्कर्तुं क्षमः कृष्णस्तथा पालयितुं क्षमः ।
संहर्तुमपि कस्मात्स दारुणं तप आचरत् ॥ ११ ॥
व्यास उवाच
सत्यमुक्तं त्वया राजन् वासुदेवो जनार्दनः ।
क्षमः सर्वेषु कार्येषु देवानां दैत्यसूदनः ॥ १२ ॥
तथापि मानुषं देहमाश्रितः परमेश्वरः ।
कृतवान्मानुषान्भावान्वर्णाश्रमसमाश्रितान् ॥ १३ ॥
वृद्धानां पूजनं चैव गुरुपादाभिवन्दनम् ।
ब्राह्मणानां तथा सेवा देवताराधनं तथा ॥ १४ ॥
शोके शोकाभियोगश्च हर्षे हर्षसमुन्नतिः ।
दैन्यं नानापवादाश्च स्त्रीषु कामोपसेवनम् ॥ १५ ॥
कामः क्रोधस्तथा लोभः काले काले भवन्ति हि ।
तथा गुणमये देहे निर्गुणत्वं कथं भवेत् ॥ १६ ॥
सौबलीशापजाद्दोषात्तथा ब्राह्मणशापजात् ।
निधनं यादवानां तु कृष्णदेहस्य मोचनम् ॥ १७ ॥
हरणं लुण्ठनं तद्वत्तत्पत्‍नीनां नराधिप ।
अर्जुनस्यास्त्रमोक्षे च क्लीबत्वं तस्करेषु च ॥ १८ ॥
अज्ञत्वं हरणे गेहात्तत्प्रद्युम्नानिरुद्धयोः ।
एवं मानुषदेहेऽस्मिन्मानुषं खलु चेष्टितम् ॥ १९ ॥
विष्णोरंशावतारेऽस्मिन्नारायणमुनेस्तथा ।
अंशजे वासुदेवेऽत्र किं चित्रं शिवसेवने ॥ २० ॥
स हि सर्वेश्वरो देवो विष्णोरपि च कारणम् ।
सुषुप्तस्थाननाथः स विष्णुना च प्रपूजितः ॥ २१ ॥
तदंशभूताः कृष्णाद्यास्तैः कथं न स पूज्यते ।
अकारो भगवान्ब्रह्माप्युकारः स्याद्धरिः स्वयम् ॥ २२ ॥
मकारो भगवान् रुद्रोऽप्यर्धमात्रा महेश्वरी ।
उत्तरोत्तरभावेनाप्युत्तमत्वं स्मृतं बुधैः ॥ २३ ॥
अतः सर्वेषु शास्त्रेषु देवी सर्वोत्तमा स्मृता ।
अर्धमात्रास्थिता नित्या यानुच्चार्या विशेषतः ॥ २४ ॥
विष्णोरप्यथिको रुद्रो विष्णुस्तु ब्रह्मणोऽधिकः ।
तस्मान्न संशयः कार्यः कृष्णेन शिवपूजने ॥ २५ ॥
इच्छया ब्रह्मणो वक्त्राद्वरदानार्थमुद्‌बभौ ।
मूलरुद्रस्यांशभूतो रुद्रनामा द्वितीयकः ॥ २६ ॥
सोऽपि पूज्योऽस्ति सर्वेषां मूलरुद्रस्य का कथा ।
देवीतत्त्वस्य सान्निध्यादुत्तमत्वं स्मृतं शिवे ॥ २७ ॥
अवतारा हरेरेवं प्रभवन्ति युगे युगे ।
योगमायाप्रभावेण नात्र कार्या विचारणा ॥ २८ ॥
या नेत्रपक्ष्मपरिसञ्चलनेन सम्य-
     ग्‌विश्वं सृजत्यवति हन्ति निगूढभावा ।
सैषा करोति सततं द्रुहिणाच्युतेशान्
     नानावतारकलने परिभूयमानान् ॥ २९ ॥
सूतीगृहाद्‌व्रजनमप्यनया नियुक्तं
     संगोपितश्च भवने पशुपालराज्ञः ।
सम्प्रापितश्च मधुरां विनियोजितश्च
     श्रीद्वारकाप्रणयने ननु भीतचित्तः ॥ ३० ॥
निर्माय षोडशसहस्रशतार्धकास्ता
     नार्योऽष्टसम्मततराः स्वकलासमुत्थाः ।
तासां विलासवशगं तु विधाय कामं
     दासीकृतो हि भगवाननयाप्यनन्तः ॥ ३१ ॥
एकापि बन्धनविधौ युवती समर्था
     पुंसो यथा सुदृढलोहमयं तु दाम ।
किं नाम षोडशसहस्रशतार्धकाश्च
     तं स्वीकृतं शुकमिवातिनिबन्धयन्ति ॥ ३२ ॥
सात्राजितीवशगतेन मुदान्वितेन
     प्राप्तं सुरेन्द्रभवनं हरिणा तदानीम् ।
कृत्वा मृधं मघवता विहृतस्तरूणा-
     मीशः प्रियासदनभूषणतां य आप ॥ ३३ ॥
यो भीमजां हि हृतवाञ्छिशुपालकादी-
     ञ्जित्वा विधिं निखिलधर्मकृतो विधित्सुः ।
जग्राह तां निजबलेन च धर्मपत्‍नीं
     कोऽसौ विधिः परकलत्रहृतौ विजातः ॥ ३४ ॥
अहङ्कारवशः प्राणी करोति च शुभाशुभम् ।
विमूढो मोहजालेन तत्कृतेनातिपातिना ॥ ३५ ॥
अहङ्काराद्धि सञ्जातमिदं स्थावरजङ्गमम् ।
मूलाद्धरिहरादीनामुग्रात्प्रकृतिसम्भवात् ॥ ३६ ॥
अहङ्कारपरित्यक्तो यदा भवति पद्मजः ।
तदा विमुक्तो भवति नोचेत्संसारकर्मकृत् ॥ ३७ ॥
तन्मुक्तस्तु विमुक्तो हि बद्धस्तद्वशतां गतः ।
न नारी न धनं गेहं न पुत्रा न सहोदराः ॥ ३८ ॥
बन्धनं प्राणिनां राजन्नहङ्कारस्तु बन्धकः ।
अहं कर्ता मया चेदं कृतं कार्यं बलीयसा ॥ ३९ ॥
करिष्यामि करोम्येवं स्वयं बध्नाति प्राणभृत् ।
कारणेन विना कार्यं न सम्भवति कर्हिचित् ॥ ४० ॥
यथा न दृश्यते जातो मृत्पिण्डेन विना घटः ।
विष्णुः पालयिता विश्वस्याहङ्कारसमन्वितः ॥ ४१ ॥
अन्यथा सर्वदा चिन्ताम्बुधौ मग्नः कथं भवेत् ।
अहङ्कारविमुक्तस्तु यदा भवति मानवः ॥ ४२ ॥
अवतारप्रवाहेषु कथं मज्जेच्छुभाशयः ।
मोहमूलमहङ्कारः संसारस्तत्समुद्‌भवः ॥ ४३ ॥
अहङ्कारविहीनानां न मोहो न च संसृतिः ।
त्रिविधः पुरुषः प्रोक्तः सात्त्विको राजसस्तथा ॥ ४४ ॥
तामसस्तु महाराज ब्रह्मविष्णुशिवादिषु ।
त्रिविधस्त्रिषु राजेन्द्र काजेशादिषु सर्वदा ॥ ४५ ॥
अहङ्कारः सदा प्रोक्तो मुनिभिस्तत्त्वदर्शिभिः ।
अहङ्कारेण तेनैव बद्धा एते न संशयः ॥ ४६ ॥
मायाविमोहिता मन्दाः प्रवदन्ति मनीषिणः ।
करोति स्वेच्छया विष्णुरवताराननेकशः ॥ ४७ ॥
मन्दोऽपि दुःखगहने गर्भवासेऽतिसङ्कटे ।
न करोति मतिं विद्वान्कथं कुर्यात्स चक्रभृत् ॥ ४८ ॥
कौसल्यादेवकीगर्भे विष्ठामलसमाकुले ।
स्वेच्छया प्रवदन्त्यद्धा गतो हि मधुसूदनः ॥ ४९ ॥
वैकुण्ठसदनं त्यक्त्वा गर्भवासे सुखं नु किम् ।
चिन्ताकोटिसमुत्थाने दुःखदे विषसम्मिते ॥ ५० ॥
तपस्तप्त्वा क्रतून्कृत्वा दत्त्वा दानान्यनेकशः ।
न वाञ्छन्ति यतो लोका गर्भवासं सुदुःखदम् ॥ ५१ ॥
स कथं भगवान्विष्णुः स्ववशश्चेज्जनार्दनः ।
गर्भवासरुचिर्भूयाद्‌भवेत्स्ववशता यदि ॥ ५२ ॥
जानीहि त्वं महाराज योगमायावशे जगत् ।
ब्रह्मादिस्तम्बपर्यन्तं देवमानुषतिर्यगम् ॥ ५३ ॥
मायातन्त्रीनिबद्धा ये ब्रह्मविष्णुहरादयः ।
भ्रमन्ति बन्धमायान्ति लीलया चोर्णनाभवत् ॥ ५४ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
पञ्चमस्कन्धे योगमायाप्रभाववर्णनं नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥


रुद्राचे महत्त्व -

ऋषी म्हणाले, "हे सूता, सर्व पापांचे नाश करणारे आणि दिव्य असे श्रीकृष्ण चरित्र तू आम्हाला सांगितलेस. परंतु वासुदेवाची कथा तू आम्हाला विस्तारपूर्वक न सांगितल्यामुळे आम्हाला फारच संशय येत आहे की विष्णूचा अवतार वासुदेव याने वनात जाऊन दारुण तप करून शिवाची आराधना केली. त्यायोगे शिवाने प्रसन्न होऊन श्रीकृष्णाला वर दिला. सर्वत्र संचार करणारी जगन्माता देवी ही पार्वतीच्या रूपात अवतीर्ण होऊन तिनेही वासुदेवाला वर दिला हे खरे. पण श्रीकृष्ण हे स्वत: देवच असूनसुद्धा त्यांनी शिव- पार्वतीची आराधना का केली ? श्रीकृष्णाला कोणती कमतरता होती ? हे सूता, ह्मा शंकाचे निरसन करा."

तेव्हा सूत म्हणाले, "हे महर्षीनो, व्यासांकडून मी जे ऐकले आहे ते आता विस्तारपूर्वक तुम्हाला सांगतो. ते तुम्ही चित्त देऊन ऐका. पूर्वी महाबुद्धी जनमेजयाने ही कथा व्यासांकडून ऐकल्यावर त्यालाही असाच संभ्रम पडला. जनमेजय म्हणाला, " हे महर्षे, श्रीकृष्णाचे चरित्र आपण मला ऐकवलेत. पण माझ्या मनात संशय निर्माण झाला. विष्णुरूप श्रीकृष्णाने शिवाची आराधना केली हे महाश्चर्यच आहे. सर्वात्मा, सर्वेश्वर, सर्वसिद्धिदायक असा जो श्रीहरी त्याने मानवाप्रमाणे पुत्रप्राप्तीकरता एवढी महान तपश्चर्या का करावी ? जगाची निर्मिती, पोषण आणि नाश हे करण्यास जो समर्थ आहे त्याने तपश्चर्या केली हे नवलच नाही का ?'

व्यास म्हणाले, "हे राजा, तू म्हणतोस ते खरे. दैत्यांचा संहार करणारा वासुदेव हा सर्वशक्तिशाली आहे. पण त्याने मनुष्यदेहाचा आश्रय केल्यामुळे मानवाला योग्य अशी सर्व वर्णाश्रमधर्मासंबंधीची कृत्ये त्यालाही करावी लागली. वृद्धांचा आदर, गुरूचे पदवंदन, ब्राह्मणांची सेवा, परमेश्वराची आराधना, शोक - हर्ष या भावनांचा स्वीकार, दैन्य, रतिक्रीडा या सर्व गोष्टी केवळ मानवी देह धारण केला म्हणून त्यांना कराव्या लागल्या. हे राजा, काम, क्रोध, लोभ ह्मा भावना मनुष्याच्या ठिकाणी पदोपदी संभवतात. मानव हा निर्गुणी असणार नाही.

गांधारी व ब्राह्मण यांच्या शापामुळे यादवकुळाचा नाश झाला. श्रीकृष्णाचा देहपात घडला. त्याच्या स्त्रियांचा अपहार होऊन त्या चारित्र्यभ्रष्ट झाल्या. चोरांवर अस्त्र सोडते वेळी अर्जुनाच्या ठिकाणी अबलत्व प्रकट झाले. अनिरुद्ध व प्रद्युम्न यांचे घरातून हरण झाले. तरीही श्रीकृष्णाला अज्ञान राहिले असे का ? तर भगवंतांनी मानवदेह धारण केल्यामुळे मानवदेहाचे सर्व गुणधर्म त्यांच्या ठिकाणी प्राप्त झाले. तेव्हा वासुदेवाने केलेल्या शिवाराधनेबद्दल आश्चर्य का वाटावे ? शिवदेव हा विष्णूचेही कारण असून तो सुषुप्तिस्थानाधिपती असल्याने विष्णूने त्याचे पूजन केले. सर्व देवच सुषुप्तिस्थानाधिपतीचे अंश आहे. म्हणून ते शिवाचे पूजन करतात.

भगवान ब्रह्मा हा अकार, श्रीहरी हा उकार व भगवान रुद्र मकार असून महेश्वरीदेवी ही अर्ध मात्रा आहे. ज्ञानी ह्यामध्येच श्रेष्ठत्व मानतात तात्पर्य, सर्व शास्त्रांत ती अव्यक्त असल्याने तिचा स्पष्ट उच्चार करता येत नाही. विष्णूपेक्षा रुद्र अधिक असून ब्रह्मदेवापेक्षा विष्णु अधिक आहे. म्हणून श्रीकृष्णांनी शिवपूजा केली. म्हणून कोणालाही संभ्रम पडण्याचे कारण नाही.

ब्रह्मदेवाच्या मुखापासून केवळ वरदानाकरता निर्माण झालेला मूळ रुद्राचा अंश, जो दुसरा रुद्र, तो सुद्धा अत्यंत पूजनीय आहे. शिवाय देवीतत्त्वाचे सान्निध्य असल्याने शिवाच्या ठिकाणी उत्तमत्व आहे. योगामायेच्या प्रभावाने हरीचे अनेक अवतार होतात. गूढरूपाने वावरत असलेली देवी क्षणामध्ये जगाची उत्पत्ती, स्थिती, लय करीत असते. ती देवीच ब्रह्मा, विष्णु व महेश यांना नेहमी उत्पन्न करीत रहाते. अशा वेगवेगळ्या अवतारप्रसंगी केवळ देह धारण करीत असल्याने त्यांना दु:ख जेरीस आणतात.

प्रत्यक्ष बंदीवासातून गोकुळापर्यंत श्रीकृष्णाची सुटकाही देवीनेच योजली होती. तिनेच त्याचे नंदाच्या घरी रक्षण केले व मथुरेतही पोहोचविले. वास्तविक मनातून भयभीत झालेल्या श्रीकृष्णाला द्वारकेला नेण्याची देवीनेच प्रेरणा दिली. स्वत:च्या अंशातून अष्टनायिका निर्माण केल्या आणि सोळाहजार पन्नास राजस्त्रिया उत्पन्न करून श्रीकृष्णाला या सर्वांच्या विलासात मग्न केले. त्याला स्त्रियांचा दास केले.

केवळ सत्यभामेवरील अतिप्रेमामुळे श्रीकृष्णाने प्रत्यक्ष इंद्राशी युद्ध करून सर्वश्रेष्ठ असा पारिजात वृक्ष आणला, क्षात्रधर्म प्रकट करण्यासाठी विवाहाचे निमित्त करून शिशुपालाचा पराजय केला. रुक्मिणीचे हरण केले. तिचा धर्मपत्‍नी म्हणून स्वीकार केला. तात्यर्य, प्राणी अहंकाराधीन असल्याने सर्व प्रकाराची शुभाशुभ कर्मे करतो. अहंकाराने उत्पन्न झालेल्या मोहजालात तो पूर्णपणे गुरफटलेला असतो.

हे सर्व चराचर जग प्रकृतिजन्य अहंकारापासूनच निर्माण झाले आहे. ब्रह्मदेवही प्रत्यक्ष अहंकाराचा त्याग करतो तेव्हाच संसारिक कर्मापासून मुक्त होतो. थोडक्यात, अहंकारापासून अलिप्त असलेला पुरुष मुक्त होय. अहंकाराधीन असलेला पुरुष बद्ध होय. नारी, धन, गृह, पुत्र सहोदर ही मानवप्राण्याची प्रत्यक्ष बंधने नाहीत तर अहंकार हेच प्रमुख बंधन आहे. मी कर्ता, मी बलाढ्य, मीच केले, मीच पुढेही करीन अशाप्रकारे प्राणी अहंकारबद्ध असतो. जसे मातीच्या गोळ्याशिवाय घट उत्पन्न होत नाही तसेच कारणाशिवाय कार्य संभवत नाही. स्वत: विष्णूही अहंकाराने बद्ध असल्यानेच विश्वाचे पालन करीत आहे. म्हणूनच तर तो सदासर्वकाळ चिंतासमुद्रात मग्न होऊन राहिला आहे. जर पुरुष अहंकारमुक्त झाला असता तर त्याचे अंत:करण शुद्ध झाले असते. अवताररूपी प्रवाहामध्ये तो गटांगळ्या खात राहिला नसता. म्हणून अहंकार हेच मोहाचे मूळ आहे. संसाराची उत्पत्तीही त्यापासूनच आहे. अहंकारमुक्त पुरुषांना मोह व संसार नाही.

ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या ठिकाणी सात्त्विक, राजस व तामस असा तीन प्रकारचा अहंकार आहे. तत्त्ववेत्त्या मुनींच्या मते ब्रह्मा, विष्णु, महेश हे या तीन प्रकारच्या अहंकारांनी बद्ध आहेत. विष्णु स्वेच्छेने अनेक अवतार धारण करीत असतो. असे मायेने मोहित झालेले मूढ पंडित म्हणतात. वास्तविक दुःखमय व संकटरूप असलेल्या गर्भवासाची इच्छा समंजस पुरुषाला होत नाही. मग भगवान विष्णूला का बरे होणार ? कौसल्येच्या व देवकीच्या विष्ठा व मूत्रयुक्त गर्भाशयामध्ये मधुसूदन स्वेच्छेने का गेला, असा त्यांना प्रश्न पडतो. वैकुंठ सोडून दु:खदायक व विषतुल्य अशा चिंताग्रस्त स्थान असलेल्या गर्भवासामध्ये वास्तव्य करण्यात कोणते सुख आहे ?

सामान्य लोकदेखील तपश्चर्या व ऋतू करून अनेक दाने देतात व दुःखदायक गर्भवासातून मुक्त होण्याची इच्छा करतात. मग स्वतंत्र असलेल्या भगवान विष्णूला गर्भवास कसा प्रिय झाला ? देव, मानव हे योगमायेच्या आधीन आहेत. ब्रह्मा, विष्णु, शिव हे देवदेखील मायेच्या दावणीत जखडले आहेत. कोळ्याप्रमाणे ते अगदी लीलया भ्रमण करतात व बद्ध होतात."


अध्याय पहिला समाप्त

GO TOP