॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ आदिमायागीता ॥

॥ अथ प्रथमोऽध्यायः - अध्याय पहिला ॥

कूर्म उवाच -
एवं सृष्ट्‍वा मरीच्यादीन्देवदेवः पितामहः ।
सहैव मानसैः पुत्रैस्तताप परमं तपः ॥१॥
कूर्म म्हणाले, अशा प्रकारे मरीच्यादि नऊ प्रजापतींची निर्मिती करून पितामह ब्रह्मदेवाने आपल्या मानसपुत्रांसह घोर तप केले. (१)

तस्यैव तपतो वक्राद्‌रुद्रः कालाग्निसम्भवः ।
त्रिशूलपाणिरीशानः प्रादुरासीत्‌त्रिलोचनः ॥२॥
तप करतांना त्याच्या मुखातून प्रलयाग्नीतून उत्पन्न झालेला, त्रिशूलधारी, त्रिनेत्र असा ईशान-रुद्र प्रकटला. (२)

अर्धनारीनरवपुः दुष्प्रेक्ष्योऽतिभयंकरः ।
विभजात्मानमित्युक्त्वा ब्रह्मा चान्तर्दधे भयात् ॥३॥
त्याचे अर्धे शरीर पुरुष व अर्धे स्त्री असे असून तो अत्यंत भीतिप्रद होता. त्याच्याकडे पाहाणे कठिण होते. 'स्वत:चे भाग कर' असे म्हणून ब्रह्मा घाबरून लुप्त झाला. (३)

तथोक्तोऽसौ द्विधा स्त्रीत्वं पुरुषत्वं तथाकरोत् ।
बिभेद पुरुषत्वञ्च दशधा चैकधा पुनः ॥४॥
ब्रह्मदेवाने असे म्हणताच त्याने आपले पुरुष व स्त्री असे दोन भाग केले. आणि पुनः त्या पुरुषाचे दहा+एक असे भाग केले. (४)

एकादशैते कथिता रुद्रास्त्रिभुवनेश्वराः ।
कपालीशादयो विप्रा देवकार्ये नियोजिताः ॥५॥
(हेच पुढे एकादश रुद्र म्हटले गेले.) त्रिभुवनांचे ईश्वर असलेल्या या अकरा रुद्रांना कपालीश इत्यादी म्हणतात. हे ब्राह्मणांनो, त्यांची देवाच्या कामासाठी नेमणूक झाली. (५)

सौम्यासौम्यैस्तथा शान्ताशान्तैः स्त्रीत्वञ्च स प्रभुः ।
बिभेद बहुधा देवः स्वरूपैरसितैः सितैः ॥६॥
या प्रभूने स्त्रीरूपाचे मृदू-भयंकर, शांत-अशांत, पांढरा-काळा अशा (परस्पर विरोधी) रीतीने अनेक विभाग केले. (६)

ता वै विभूतयो विप्रा विश्रुताः शक्तयो भुवि ।
लक्ष्म्यादयो यद्‌वपुषा विश्वं व्याप्नोति शांकरी ॥७॥
हे ब्राह्मणांनो, या विभूतींनाच लोक लक्ष्मी इत्यादी शक्ती म्हणतात. ईश्वराच्या या लक्ष्मी इत्यादी देहांद्वारे ही शांकरी विश्व व्यापते. (७)

विभज्य पुनरीशानी स्वात्मांशमकरोद् विभोः ।
महादेवनियोगेन पितामहमुपस्थिता ॥८॥
हे ब्राह्मणानो ! आपल्या अंशाचे विभाग केल्यानंतर शंकराच्या आज्ञेने ईशानी ब्रह्मदेवाजवळ उभी राहिली. (८)

तामाह भगवान् ब्रह्मा दक्षस्य दुहिता भव ।
सापि तस्य नियोगेन प्रादुरासीत्प्रजापतेः ॥९॥
'दक्षाची कन्या हो' असा ब्रह्मदेवाने तिला आदेश दिला. त्याप्रमाणे ती नंतर दक्ष प्रजापतीपासून उत्पन्न झाली. (९)

नियोगाद्‌ब्रह्मणो देवी ददौ रुद्राय तां सतीम् ।
दाक्षीं रुद्रोऽपि जग्राह स्वकीयामेव शूलभृत् ॥१०॥
ब्रह्मदेवाच्या आज्ञेने दक्ष प्रजापतीने आपली कन्या सती हिला शंकरास अर्पण केले. शूलधारी शंकराने दक्षकन्येचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला. (१०)

प्रजापतिविनिर्देशात्कालेन परमेश्वरी ।
विभज्य पुनरीशानी आत्मानं शंकराद्विभोः ॥११॥
प्रजापतीच्या आज्ञेने देवी ईशानी (सती) हिने काही कालानंतर आपणास शंकरापासून विभक्त केले. (११)

मेनायामभवत्पुत्री तदा हिमवंतः सती ।
स चापि पर्वतवरो ददौ रुद्राय पार्वतीम् ॥१२॥
हिमालय आणि मेना या पतिपत्नीपासून ती सती पुन: कन्यारूपाने जन्मली. त्या नगाधिराजाने कन्या पार्वतीस शिवाला अर्पण केली. (१२)

हिताय सर्वदेवानां त्रैलोक्यस्यात्मनो द्विजाः ।
सैषा माहेश्वरी देवी शंकरार्धशरीरिणी ॥१३॥
हे विप्रांनो ! स्वत:च्या, त्रिभुवनाच्या आणि सर्व देवांच्या हितासाठी ही देवी शिवाची अर्धांगी झाली. (१३)

शिवा सती हैमवती सुरासुरनमस्कृता ।
तस्याः प्रभावमतुलं सर्वे देवाः सवासवाः ॥१४॥
विदन्ति मुनयो वेत्ति शंकरो वा स्वयं हरिः ।
एतद्वः कथितं विप्राः पुत्रत्वं परमेष्ठिनः ॥१५॥
देवासुरांनी वंदन केलेली, पूर्वजन्मीची सती आणि आताची पार्वती अशी आहे. तिचा महिमा अतुलनीय आहे असे इंद्रादिदेवांसह मुनिजन तसेच शंकर किंवा स्वतः विष्णूही जाणतात. अशा प्रकारे हे ब्राह्मणांनो, परमेष्ठीचे पुत्रत्व सांगितले आहे. (१४-१५)

ब्रह्मणः पद्मयोनित्वं शङ्‌करस्यामितौजसः ॥१६॥
त्याचप्रमाणे ब्रह्मा कमळापासून उत्पन्न झाला व शिवाचा पराक्रम अपरिमेय आहे असे सांगितले, (१६)

इति आदिमायागीतायां प्रथमोऽध्यायः ॥१॥
आदिमायागीतेचा पहिला अध्याय समाप्त.



GO TOP