|
श्रीमद् भगवद्गीता अक्षरब्रह्मयोगः अर्जुनाचे ब्रह्मादिकांविषयीं प्रश्न व भगवानांची उत्तरे.
अर्जुन उवाच - अन्वय : हे पुरुषोत्तम - हे पुरुषोत्तमा कृष्णा - तत् ब्रह्म किं ? - ते ब्रह्म काय आहे ? सोपाधिक का निरुपाधिक ? - अध्यात्मं किं ? - या शरीरात अध्यात्म काय आहे ? - कर्म किं ? - कर्म काय आहे ? च - अधिभूतं किं प्रोक्तम् ? - आणि अधिभूत म्ह० भूतांतील तत्त्व काय सांगितले आहे ? - अधिदैवं किं उच्यते ? - अधिदैव कशाला म्हणतात ? - मधुसूदन - हे मधुसूदना ! - अत्र अधियज्ञः कः ? - यांतील अधियज्ञ कोणता ? - कथं - त्याचे चिंतन कसे करावे ? - अस्मिन् देहे ? - तो या देहांत आहे की कोठे ? - च प्रयाणकाले - आणि मरणाच्यावेळी - नियतात्मभिः कथं ज्ञेयः असि - शांतचित्त पुरुषाकडून तूं कसा जाणण्यास योग्य आहेस १-२
व्याख्या : पूर्वाध्यायांते श्रीमद्भगवता उक्तानां ब्रह्माध्यात्मादिसप्तानां पदार्थानां तत्त्वं जिज्ञासुः अर्जुनः उवाच किं तद्ब्रह्मेति द्वाभ्याम् ! हे पुरुषोत्तम ! पुरुषाभ्यां क्षराक्षराभ्यां उत्तमः धिकतमः तत्संबुद्धौ यद्वा उद्गतं तमः अज्ञानं यस्मात्सः उत्तमः पुरौ शरीरे शेरत इति पुरुषाः जीवाः पुरुषेभ्यः उत्तमः विलक्षणः तत्संबुद्धौ हे पुरुषोत्तम हे सर्वज्ञ ! तत् ज्ञेयत्वेन उक्तं ब्रह्म सोपाधिकं वा निरुपाधिकं किं कथ्यते चेत्यपरं अध्यात्मं आत्मानं देहं अधिकृत्य अधिष्ठानं कृत्वा तिष्ठति तत् अध्यात्मं किं श्रोदींद्रियग्रामः वा प्रत्यक्चैतन्यं कथ्यते । तथा कर्म अखिलं यज्ञरूपं वा अन्यत् अस्ति किम् ? अधिभूतं भूतं पृथिव्यादिपंचभूतं अधिकृत्य अधिष्ठानं कृत्वा वर्तते इति अधिभूतं किंवा समस्तमेव कार्यजातं किं प्रोक्तम् ? तथा अधिदैवं देवताविषयं वा अनुध्यानं वा सर्वदैवतेषु आदित्यमंडलादिषु अविच्छिन्नं सघनं चैतन्यं किं उच्यते ? ॥ १ ॥ अर्थ : अर्जुन - हे पुरुषोत्तमा, तें ब्रह्म काय आहे ? सोपाधिक कीं निरुपाधिक ? या शरीरांत रहाणारे अध्यात्म काय आहे ? कर्म काय आहे आणि अधिभूत म्ह० भूतांतील तत्त्व काय सांगितले आहे ? अधिदैव कशाला म्हणतात ? हे मधुसूदना, यामध्यें अधियज्ञ कोणता ? त्याचें चिंतन कसें करावे ? तो या देहांत आहे कीं कोठे ? आणि मरणाच्या वेळीं शांतचित्त पुरुषांकडून तूं कसा जाणण्यास योग्य आहेस ? विवरण :
श्रीभगवानुवाच - अन्वय : परमं अक्षरं ब्रह्म - जे निरतिशय तत्त्व तेंच ब्रह्म आहे - स्वभावः अध्यात्मं - त्या परम अक्षर ब्रह्माचाच प्रत्येक देहांतील प्रत्यगात्मभाव हेंच अध्यात्म तत्त्व आहे - भूतभावोद्भवकरः - भूतांचा सद्भाव उत्पन्न करणारा - विसर्गः कर्म संज्ञितः - देवतांना उद्देशून चरु-पुरोडाशादि द्रव्यांचा त्याग, त्यालाच कर्म ही संज्ञा आहे. ३ व्याख्या : प्रश्नक्रमेण श्रीभगवान् उत्तरं ददाति । त्वं अक्षरं न क्षरति न नश्यति तत् अक्षरं जगतः मूलकारणं चैतन्यं ब्रह्म विद्धि । कथंभूतं ब्रह्म । परमं सदैव एकरूपत्वात् सर्वोत्कृष्टं स्वभावः स्वस्यैव ब्रह्मण एव अंशतः जीवरूपेण भवनं स्वभावः अध्यात्मं आत्मानं देहद्वयं भोक्तृभोगायतनत्वेन अधिकृत्य वर्तते तत् अध्यात्मं उच्यते अध्यात्मशब्देन कथ्यते । विसर्गः - 'अग्नौ प्रास्ताऽऽहुतिः सम्यक् आदित्यं उपतिष्ठते । आदित्यात् जायते वृष्टिः वृष्टेः अन्नं अन्नात् प्रजाः भवंति' - इति क्रमेण विसर्गः कर्मसंज्ञितः कर्म इति संज्ञा नाम संजाता यस्य सः कर्मसंज्ञितः देवतोद्देशेन द्रव्यत्यागरूपः यज्ञः उचते । कथंभूतः विसर्गः । भूतभावोद्भवकरः भूतानां जरायुजाण्डजस्वेदजोद्भिज्जानां भावः अविद्यमानानामपि विद्यमानत्वं भूतभावः भूतभावस्य उद्भवः उत्पत्तिः भूतभावोद्भवः भूतभावोद्भवं करोतीति तथोक्तः ॥ ३ ॥ अर्थ : या प्रश्नांचा क्रमाने निर्णय करण्यासाठी श्रीकृष्ण म्हणाले - जे निरतिशय अविनाशी तत्त्व तेच ब्रह्म आहे. त्या परम अक्षर ब्रह्माचाच प्रत्येक देहातील प्रत्यगात्मभाव स्वभाव, हेंच अध्यात्म होय. देहापासून साक्षी परब्रह्मापर्यंत उत्तरोत्तर आंत आंत असलेले जें जीवात्म तत्त्व तेंच. अध्यात्म' या शब्दानें सांगितलें जाते. परब्रह्मच देहादिकांत प्रवेश करून जीवात्मत्वाचाचा अनुभव घेतें. याविषयी 'तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत्' त्याला उत्पन्न करून त्यांसच मागून प्रविष्ट झाले, अशी तैत्तिरीय श्रुति प्रमाण आहे. भूतांची उत्पत्ति करणारा जो देवतोद्देशानें चरूपुरोडाशांदिकांचा त्याग हेंच कर्म आहे. [ द्रव्य-त्यागरूप यज्ञ हेंच कर्म, याच बीजभूत कर्मसंज्ञक यज्ञापासून वृष्ट्यादिकांच्या क्रमाने चराचर भूतें-प्राणीशरीरें उत्पन्न होतात. ] विवरण :
अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्च अधिदैवतम् । अन्वय : क्षरः भावः अधिभूतं - विनाशी भाव सर्व भूतांतील, प्राण्यांतील तत्त्व आहे. - च पुरुषः अधिदैवतं - आणि सर्वांच्या शरीरांत राहणारा पुरुष, हेच अधिदैवत-देवांतील तत्त्व आहे - हे देहभृतां वर - हे देह धारण करणारांतील श्रेष्ठ अर्जुना ! - अत्र देहे अधियज्ञः अहं एव - या देहांत अधियज्ञ म्ह० यज्ञाभिमानी देवता मीच आहे. ४ व्याख्या : किं च क्षरः क्षरति प्रतिक्षणं क्षरति नश्यतीति क्षरः भावः यत्किंचित् जन्मवद्वस्तु कार्यकारणरूपः सर्वोपि पदार्थः अधिभूतं भूतानि पृथिव्यादीनि च प्राणिमात्राणि अधिकृत्य भवति तत् अधिभूतं उच्यते । चेत्यपरं पुरुषः पूर्णत्वात् पुरुषः सूर्यः आत्मा जगतः स्थावरस्य पुरुषो हिरण्यगर्भः अधिदैवतं दैवतानि आदित्यानि अधिकृत्य चक्षुरादीनींद्रियाणि अनुगृह्णातीति अधिदैवतं उच्यते । अत्र अस्मिन् देहे मनुष्यदेहे आत्मा अंत्तर्यामित्वेन वर्तमानः अधियज्ञः सर्वयज्ञाधिष्ठाता सर्वयज्ञफलदाता सर्वयज्ञाभिमानिनी विष्ण्वाख्यदेवता अहमेव वासुदेवः यज्ञरूपेण वर्ते । हे देहभृतांवर ! सर्वप्राणिनां श्रेष्ठ ! अनेन संबोधनेन त्वमेवं ज्ञातुं अर्हसि । मनुष्यदेहे वर्तमानानां इदमेव ज्ञातुं उचितमिति भावः ॥ ४ ॥ अर्थ : आणखी तीन प्रश्नांची उत्तरे-विनाशीभाव हे सर्व भूतांतील- प्राण्यांतील तत्त्व आहे. सर्वांच्या शरीरांत रहाणारा पुरुष हेंच देवांतील तत्त्व आहे. हे देहवानांतील श्रेष्ठ अर्जुना, या देहांत अधियज्ञ-यज्ञाभिमानिनी देवता मीच आहे. [ सर्व कार्यससूह हेंच अधिभूत होय. ज्याने हें सर्व परिपूर्ण आहे किंवा शरीराख्य पुरांत जो रहातो, तो पुरुष. अर्थात् विराट्-शरीरास प्राप्त होऊन आदित्यमण्डलादि देवतांमध्यें - आंत राहिलेला - हिरण्यगर्भ - लिंगात्मा व्यष्टींच्या इंदियांवर अनुग्रह करणारा, हा येथील 'पुरुष' शब्दाचा अर्थ आहे. तो पुरुषच अधिदैवत आहे. अधियज्ञ - सर्व यज्ञांची अभिमानिनी देवता. कारण याविषयी 'यज्ञ हाच विष्णू आहे' ही श्रुति प्रमाण आहे. परादेवताच अधियज्ञ शब्दाने सांगितली जाते. ती परा देवता 'विष्णुच मी आहे' - ती परब्रह्माहून भिन्न नाहीं, तर अत्यंत अभिन्न आहे. या शास्त्रीय व्यवहारभूमींतील या देहांत जो यज्ञ आहे, त्याचा मी अधियज्ञ आहे. म्ह० मीच या देहांतील यज्ञाभिमानिनी देवता आहे. तात्पर्य अध्यात्मादि पूर्वोक्त पांची पदार्थ यज्ञमय आहेत असे विद्वान् पहातो. ] विवरण : भगवच्चिंतन करणारा भगवानालाच प्राप्त होतो.
अन्तकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् । अन्वय : च अन्तकाले मां एव स्मर - आणि मरणसमयी माझेच स्मरण करणारा असा होत्साता - कलेवरं मुक्त्वा - शरीराचा त्याग करून - यः प्रयाति - जो जातो - सः मद्भावं याति - तो मद्भावास, वैष्णवतत्त्वास प्राप्त होतो - अत्र संशयः न अस्ति - यांत कांही संशय नाही. ५ व्याख्या : अंतकाले मरणकाले मामेव भगवंतं वासुदेवं अधियज्ञं सगुणं वा निर्गुणं स्मरन् सदा चिंतयन् यः मद्भक्तः कलेवरं इदं स्थूलशरीरं त्यक्त्वा प्रयाति प्रकर्षेण सर्वजीववैलक्षण्येन अर्चिरादिमार्गेण याति गच्छति सः मद्भक्तः मद्भावं मम भावं मद्भावः तं मद्रूपतां याति मया सह ऐक्यभावं प्राप्नोतो । अयं अर्थवादः न मंतव्यः । अत्र मदुक्ते विषये अयं अर्थवादः इति संशयः नास्ति । किं तु वास्तवोयमर्थः ॥ ५ ॥ अर्थ : आतां शेवटल्या सातव्या प्रश्नाचे उत्तर - आणि मरणसमयीं माझेंच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जो जातो, तो मद्भावास - वैष्णवतत्त्वास प्राप्त होतो, यांत संशय नाहीं. विवरण :
अंतकालीं भगवानाचें ध्यान करणाऱ्या पुरुषाला भगवत्प्राप्ति होते, हा केवल माझ्यापुरताच नियम नाहीं, तर-
यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम् । अन्वय : वा कौन्तेय - अथवा हे अर्जुना ! - यं यं अपि भावं स्मरन् - ज्या ज्या पदार्थाचे स्मरण करीत - अन्ते कलेवरं त्यजति - अंतसमयी शरीराला सोडतो - तं तं एव - त्या त्या पदार्थालाच - सदा तद्भावभावितः एति - सर्वदा त्या पदार्थाच्या वासनेचा अभ्यास केलेला पुरुष प्राप्त होतो. ६ व्याख्या : हे कौंतेय ! पितृष्वसुः पुत्रत्वेन स्नेहातिशयं सूचयति । हे कुंतिपुत्र ! न केवलं मां अनुस्मरन् मद्भावं यातीति नियमः किं तर्हि पुरुषः यं यं भावं मानुषं वा अन्यं वा निकृष्टं भावं वा वासनाविशेषं वा देवताविशेषं अन्यदपि यत्किंचित् स्मरन् स्मरतीति स्मरन्सन् चिंतयन्सन् अंते प्राणवियोगकाले कलेवरं स्थूलदेहं त्यजति सः पुरुषः तं तं भावं पूर्वोक्तं देवातादिरूपं याति प्राप्नोति । अंतकाले तद्भावस्मरणे को हेतुः ? अहमेव । कथंभूतः पुरुषः । सदा सर्वदा तद्भावभावितः तस्मिन् देवताविशेषादौ भावः भावना वासना तद्भावः तद्भावेन तच्चिंतनवासितांतःकरणेन भावितः संभावितः तद्भावभावितः ॥ ६ ॥ अर्थ : अर्जुना, पुरुष अन्तसमयीं ज्या ज्या पदार्थाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, तो त्या त्या पदार्थाच्या वासनेचा दीर्घ अभ्यास केलेला पुरुष त्या त्या पदार्थालाच प्राप्त होतो. [ जन्मभर जी वासना अभ्यासाने दृढ केलेली असेल, तीच त्याला मरणसमयीं आठवते. अन्तसमयी शरीरेंद्रियादि जरी व्याकुल होत असली, तरी दीर्घ अभ्यासानें त्यावेळीं भगवानाचे स्मरण जसे होऊं शकतें, तसेंच तें इतर स्मृत पदार्थाचेंही होतें. ] विवरण :
तस्मात्सर्वेषु कालेषु मां अनुस्मर युध्य च । अन्वय : तस्मात् सर्वेषु कालेषु - म्हणून सर्वकाली, अहोरात्र - मां अनुस्मर च युद्ध - मला आठव/माझे स्मरण कर आणि युद्ध कर. - मयि अर्पितमनोबुद्धिः - ज्याने माझ्या ठिकाणी मन व बुद्धि अर्पिली आहेत असा तूं - असंशयः मां एव एष्यसि - मलाच प्राप्त होशील यांत अजिबात संशय नाही. ७ व्याख्या : हे सखे ! मां स्मरन् कलेवरं त्यक्त्वा यः पुरुषः मद्भावं याति अत्र संशयः नास्ति इति कथितम् । तस्मात् स्मरणात् त्वं सर्वेषु कालेषु सर्वासु अवस्थासु मां सगुणं ईश्वरं वा सर्वसाक्षिणं अनुस्मर अनुलक्ष्येण चिंतनं कुरु । यदि अंतःकरणाशुद्धित्वात् निरंतरं अनुस्मर्तुं न शक्नोषि न समर्थोसि तर्हि अंतःकरणशुद्धये युद्ध्य च अंतःकरणशुद्ध्यर्थं युद्धादिकं स्वधर्मं कुरु । एवं च नित्यनैमित्तिकानुष्ठानेन अशुद्धिक्षयात् त्वं मयि भगवति वासुदेवे अंतर्यामिणि अर्पितमनोबुद्धिः सन् मनश्च बुद्धिश्च मनोबुद्धी अर्पिते मनोबुद्धी येन सः अर्पितमनोबुद्धिः चिंताविषयं संकल्पात्मकांतःकरणवृत्तिरूपं मनः अंतर्याम्य अहं तेन यथानियुक्तोस्मि तथा करोमि इति निश्चयात्मिका बुद्धिः मां भगवंतं वासुदेवमेव एवंक्रमेण एष्यसि प्राप्स्यसि । असंशयः अत्र त्वया संशयः न कर्तव्यः ॥ ७ ॥ अर्थ : ज्याअर्थी याप्रमाणें अंत्यवासना दुसऱ्या देहाच्या प्राप्तीचे कारण आहे, त्याअर्थी, सर्वकालीं - अहो-रात्र माझें स्मरण कर आणि युद्ध कर. म्हणजे सर्वकाली मोठ्या आदराने निरंतर भगवदनुसंधान करीत असतानांच त्याच्याबरोबर युद्ध या स्वधर्माचे आचरण कर. त्यामुळे माझ्या ठिकाणींच ज्याने आपले मन व बुद्धि अर्पिली आहे, असा तूं मलाच प्राप्त होशील, यांत संशय नाहीं. विवरण : योगधारणापूर्वक एकाक्षर ब्रह्माची प्राप्ति करून घेण्याचा उपाय.
अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना । अन्वय : हे पार्थ - हे अर्जुना ! - अभ्यासयोगयुक्तेन - चित्ताला माझ्या ठिकाणी स्थिर करण्याचा वारंवार प्रयत्न करणें, याच अभ्यासरूप योगानें म्ह० उपायाने युक्त असलेल्या व - नान्यगामिना चेतसा - मला सोडून दुसरर्या कोणत्याही विषयाकडे न जाणार्या अशा चित्तानें - अनुचिन्तयन् - पुरुषाचे ध्यान करणारा भक्त - परमं दिव्यं पुरुषं याति - निरतिशय, सूर्यमंडलांत व्यक्त होणार्या पुरुषाला प्राप्त होतो. ८ व्याख्या : हे पार्थः यः पुरुषः चेतसा चिंतनात्मकांतःकरणवृत्तिना अभ्यासपाटवेन परमं उत्कृष्टं पुरुषं पूर्णं दिव्यं दिवि द्योतनात्मनि आदित्ये भवः दिव्यः तं दिव्यं द्योतनात्मकं स्वयंप्रकाशं अनु निरंतरं चिंतयन् सन् अंतःकरणवृत्त्या शास्त्राचार्योपदेशं ध्यायन् सन् प्रयाणकाले तमेव याति प्राप्नोति । कथंभूतेन चेतसा । अभ्यासयोगयुक्तेन अभ्यास एव प्रत्ययावृत्तिरेव योगः अभ्यासयोगः तेन युक्तं समाहितम् । पुनः कथंभूतेन चेतसा । नान्यगामिना न विद्यते अन्यत्र गंतुं शीलं यस्य तत् नान्यगामि तेन नान्यगामिना ॥ ८ ॥ अर्थ : हे अर्जुना, चित्ताला माझ्या ठिकाणी स्थिर करण्याचा वारंवार प्रयत्न करणें, याच अभ्यासरूपयोगानें - उपायाने युक्त असलेल्या व मला सोडून दुसऱ्या कोणत्याही विषयाकडे न जाणाऱ्या अशा चित्ताने परम पुरुषाचे ध्यान करणारा भक्त निरतिशय व सूर्यमंडळांत व्यक्त होणाऱ्या पुरुषाला प्राप्त होतो. [ पूर्वश्लोकांत सांगितल्याप्रमाणें अनुष्ठान करणारा पुरुष अंतकाळीं भगवानाला प्राप्त होतो. याविषयी स्थिर चित्ताने भगवानाचे चिंतन करणें हें कारण सांगितले आहे. ] विवरण :
कविं पुराणं अनुशासितारं अन्वय : यः कविं पुराणं अनुशासितारं - जो कोणी सर्वज्ञ, नित्य, सर्व जगाचा शास्ता, - अणोः अणीयांसं - सूक्षाहून अति सूक्ष्म अशा - सर्वस्य धातारं - सर्व कर्माचे फल सर्व प्राण्यांना देणारा - अचिंत्यरूपं - ज्याचे रूप अचिंत्य आहे - आदित्यवर्णं - सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे ज्याचा नित्य चैतन्यप्रकाश आहे व जो - तमसः परस्तात् - अज्ञानलक्षण मोहान्धकाराच्या पलीकडे आहे, अशा माझे, ईश्वराचे मरणसमयी - अनुस्मरेत् - ध्यान करतो तो त्यालाच प्राप्त होतो. ९ व्याख्या : कविं सर्वज्ञं 'यः सर्वज्ञः सर्ववित्' इति श्रुतेः । पुराणं पुरापि नवः पुराणः तं पुराणं चिरंतनं अनुशासितारं अनुलक्षेण शास्तीति अनुशासिता तं अनुशासितारं सर्वेषां नियंतारं अणोः सूक्ष्मादपि अणीयांसं अतिशयेन अणुः इति अणीयान् तं अणीयांसं अतिसूक्ष्मतरं सर्वस्य स्थावरजंगमस्य धातारं निर्माणकं अचिंत्यरूपं चिंतयितुं योग्यं चिंत्यं चिंत्यं रूपं यस्य सः चिंत्यरूपः चिंत्यरूपः न भवतीति अचिंत्यरूपः तं वाङ्मनसयोः अगोचररूपं आदित्यवर्णं आदित्य इव वर्णः प्रकाशः यस्य सः आदित्यवर्णः तम् । सूर्यः यथा स्वमंडलं प्रकाशयन् सन् त्रैलोक्यमपि प्रकाशयति तद्वत् अयमपि ब्रह्मांडं अंतर्बहिः प्रकाशयति सूर्यमपि प्रकाशयति तमसः अज्ञानात् परस्तात् विलक्षणम् यः पुरुषः उक्तलक्षणं परमात्मानं अनुस्मरेत् सः पुरुषः तं पुरुषं दिव्यं स्वयं प्रकाशमानं उपैति प्राप्नोति [इति द्वितीयेनान्वयः] ॥ ९ ॥ अर्थ : कोणत्या विशेषणांनी विशिष्ट अशा पुरुषाचे अनुचिंतन करणारा त्याला प्राप्त होतो, तें सांगतो - कोणी सर्वज्ञ, नित्य, सर्व जगाचा शास्ता, सूक्ष्माहून असि सूक्ष्म, सर्व प्राण्यांना कर्माचे फल देणारा, ज्याचे रूप अचिंत्य आहे, सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे ज्याचा नित्य चैतन्य प्रकाश आहे व जो अज्ञानलक्षण मोहान्धकाराच्या पलीकडे आहे, अशा मज ईश्वराचे मरणसमयी ध्यान करतो, तो त्या मलाच प्राप्त होतो. [ मूळ कारण अज्ञान व त्याचे कार्य, या दोहोंच्या पलीकडे असलेल्या त्यांचा ज्यांना स्पर्शही झालेला नाहीं, अशा अर्थात् कवि, पुराण, इत्यादि विशेषणांनीं विशिष्ट अशा प्रकारचा सतत स्मरण करणारा त्या पूर्वोक्त दिव्य पुरुषाला प्राप्त होतो. ] विवरण :
प्रयाणकाले मनसाऽचलेन अन्वय : प्रयाणकाले भक्त्या - मरणसमयी भक्तीने - च योगबलेन एव युक्तः - आणि चित्ताचे समाधान याच बलानें युक्त होऊन - भ्रुवोः मध्ये प्राणं - भुवयांच्या मध्ये प्राणाला - सम्यक् आवेश्य - सावधानपणाने स्थापून - यः अचलेन मनसा (अनुस्मरेत्) - जो अचल मनाने अनुचिंतन करतो - सः तं परं दिव्यं पुरुषः उपैति - तो त्या श्रेष्ठ दिव्य पुरुषाला प्राप्त होतो. १० व्याख्या : किं च यः पुरुषः भक्त्या प्रेम्णा युक्ताः सन् संयुक्तः सन् प्रयाणकाले मरणावसरे अचलेन अचंचलेन मनसा मत्स्मरणसंलग्नचेतसा भ्रुवोर्मध्ये नासामूले आज्ञाचक्रे प्राणं पंचवृत्तिकं वायुं सम्यक् उत्तमप्रकारेण आवेश्य आ समंतात् आकृष्य प्रवेश्य संस्थाप्य वा मां परमेश्वरं अनुस्मरन् सः पुरुषः प्रसिद्धं परं परमं उत्कृष्टं पुरुषं पूर्णं दिव्यं स्वयंप्रकाशं उपैति सामीप्येन तादात्म्यं प्राप्नोति । कथंभूतेन मनसा । योगबलेन योग एव चित्तवृत्तिनिरोध एव बलं यस्य तत् योगबलं तेन ॥ १० ॥ अर्थ : मरणसमयीं भक्तींने व चित्ताचें समाधान याच बलाने युक्त होऊन भुवयांच्या मध्ये प्राणाला सावधानपणानें स्थापून जो भक्त अचल मनानें पूर्वोक्त पुरुषाचे चिंतन करतो, तो त्या श्रेष्ठ दिव्य पुरुषाला प्राप्त होतो. [ मरणाच्या वेळीं भगवानाच्या चिंतनांविषयी फारच प्रयत्न केला पाहिजे. यास्तव त्यावेळीं भगवदनु-स्मरणापासून न ढळणाच्या मनाने विषयचिंतन सोडून ईशचिंतन करावे. परमात्म्याविषयी परम प्रेमाने युक्त व्हावे व आत्मस्वरूपांत चित्ताचे जें स्थैर्य त्याच बलाने ईशस्मरणास समर्थ व्हावे. चित्त स्वभावतःच विषयांकडे धांवत असतें, म्हणून त्याला विषयविमुख करून कमलाकार हदयांत-परमात्म्याच्या स्थानांत मोठ्या यत्नाने स्थिर करावे. त्यानंतर 'इडा व पिंगला' या नांवाच्या उजवीकडील व डावीकडील अशा ज्या दोन नाड्या बाहेर निघाल्या आहेत, त्यांचा निरोध करावा. नंतर त्याच हृदयाच्या अग्रापासून वर जाण्याचे जिचें शील आहे, अशा सुषुम्ना नाडीने हदयांतील प्राणाला वर चढवून कंठात लोंबणाऱ्या मांसखंडाच्या द्वारा दोन भुवयांच्या मध्यें त्याचा प्रवेश करवावा. म्हणजे सावधानपणानें ब्रह्मरंध्रातून बाहेर पडून 'कविं पुराणं०' इत्यादि विशेषणांनीं विशिष्ट अशा परम पुरुषास तो योगी प्राप्त होतो. याप्रमाणे भगवानांचे अनुस्मरण सफल असल्यामुळें याही आणखी एका कारणानें ते अवश्य करावे. ] विवरण :
यदक्षरं वेदविदो वदन्ति अन्वय : वेदविदः यत् अक्षरं वदन्ति - वेदार्थ जाणणारे ज्याला अविनाशी म्हणतात - वीतरागाः यतयः यत् विशन्ति - ज्यांचा राग, आसक्ति नाहीशी झाली आहे असे यति ज्यांत प्रवेश करतात - यत् इच्छन्तः ब्रह्मचर्यं चरन्ति - ज्याला जाणण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्यव्रत पाळतात - तत् पदं ते संगहेण प्रवक्ष्ये - ते अक्षरसंज्ञक पद तुला संक्षेपाने मी सांगेन. ११ व्याख्या : वेदविदः वेदं वेदार्थं विदंति ते वेदविदः वेदार्थज्ञाः गृहस्थाः तमेव परमं दिव्यं पुरुषं यत् प्रसिद्धं अक्षरं ब्रह्मेति वदंति । वीतरागाः वीतः गतः रागो विषयप्रीतिः येभ्यस्ते वीतरागाः ईषणात्रव्युत्थायिनः यतंते ते यतयः प्रयत्नशीलाः संन्यासिनः यत् पदं विशंति प्रविशंति सायुज्यं गच्छंति । नैष्ठिकाः यदिच्छंतः संतः यस्य पदस्य प्राप्तिं इच्छंतः संतः गुरुकुले ब्रह्मचर्यं नैष्ठिकव्रतं चरंति आचरंति । अहं ते तुभ्यं तत् प्रसिद्धं पदं पद्यते गम्यते इति पदं स्वरूपं संगहेण संक्षेपेण प्रवक्ष्ये वक्ष्यामि तत्प्राप्त्युपायं कथयिष्यामि । कथं मया ज्ञेयं इति व्याकुलो मा भूत् ॥ ११ ॥ अर्थ : वेदार्थ जाणणारे ज्याला अविनाशी म्हणतात, ज्यांचा राग-आसक्ति नाहींशी झाली आहे, असे विरक्त यति ज्यांत प्रवेश करतात व ज्याला जाणण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्यवत (गुरूपाशीं राहून) पाळतात, तें अक्षरसंज्ञक पद तुला संक्षेपाने मी सांगेन. [ वेदार्थवेत्ते अर्थात् आत्म्यज्ञानी ब्राह्मण ज्या अक्षराचे 'अस्थूल, अनणु' इत्यादि निषेधमुखानें वर्णन करतात, निष्काम-विरक्त यति-संन्यासी ज्ञानप्राप्ति होतांच ज्यात प्रवेश करतात व ज्याला जाणण्याच्या इच्छेने गुरुसमीप राहून जिज्ञासु ब्रह्मचर्यवत पाळतात, तें प्राप्त करून घेण्यास योग्य असलेलें पद मी तुला संक्षेपतः सांगतो ] विवरण :
प्रश्नोपनिषदांत व काठकोपनिषदांत 'स यो ह वै०' व 'सर्वे वेदाः०' इत्यादि वचनांनी मंद-मध्यम बुद्धीच्या अधिकाऱ्यांसाठी ब्रह्मज्ञानाचे साधन या रूपाने ओंकाराची उपासना सांगितली आहे. ओंकार हें ब्रह्माचे नांव आहे, या रूपाने किंवा प्रतिमेप्रमाणे तो ज्याचे प्रतीक आहे, त्याची उपासना उक्त असून तिचे कालांतरीं मुक्ति मिळणें हें फल सांगितलें आहे. तसेंच येथेहि 'कविं पुराणं०' 'यदक्षरं०' या वचनांनी सांगितलेल्या पर ब्रह्माचे 'ओंकारोपासन' व प्रसंगप्राप्त गति इत्यादि सांगावे, यांसाठीं या अध्यायाचा पुढील भाग आरंभिला आहे.
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
अन्वय : सर्वद्वाराणि संयम्य - ज्ञानाच्या सर्व द्वारांचा संयम करून - च मनः हृदि निरुध्य - आणि मनाला हृदयकमलांत, हृदयांतच अडवून धरून - आत्मनः प्राणं - आपल्या प्राणवायूलाही सुषुम्ना नाडीच्या द्वारा - मूर्ध्नि आधाय योगधारणां आस्थितः - योगधारणा धरण्यास प्रवृत्त झालेला जो पुरुष, तशीच धारणा करीत असतांना १२
व्याख्या : यः पुरुष सर्वद्वाराणि सर्वाणि च तानि द्वाराणि च सर्वद्वाराणि शब्दादिप्रवेशमार्गाणि श्रोत्रादींद्रियाणि संयम्य स्वस्वविषयेभ्यः परावृत्य चेत्यपरं मनं संकल्पविकल्पात्मक चित्तवृत्तिवासनारूपं हृदि हृदये निरुध्य रोधयित्वा अभ्यासवैरागाभ्यां निर्वृत्तिकतां आपाद्य अंतः विषयचिंतां अकृत्वा किंच मूर्धि भ्रुवोर्मध्ये ब्रह्मरंध्रे आत्मनः स्वस्य प्राणं मुखनासिकासंचारिणं वायुं आध्याय संस्थाप्य तदुपरि गुरूपदिष्टमार्गेण आवेश्य योगधारणां योगेन आसनादिमियमेन धारणा तां आत्मविषय समाधिरूपां धारणां आस्थितः सन् आश्रितः सन् ॥ १२ ॥ अर्थ : श्रोत्रादि सर्व ज्ञानद्वारांचें संयमन करून, मनाचा हृदयांत निरोध करून, वायूलाही सर्व बाजूंनी निरुद्ध करून व त्याला हृदयांत स्थिर करून हृदयांतून निघालेल्या सुषुम्ना नाडीने कंठ, भूमध्य, ललाट या क्रमाने प्राणांचे मूर्ध्नस्थांनीं आधान करून योगधारणेवर आरूढ झालेला जो योगी 'ॐ' या एकाक्षर ब्रह्माचा उच्चार करीत व त्याचा अर्थ जो मी त्याचें अनुस्मरण करीत शरीर सोडून जातो, तो सर्वोत्तम गतीला प्राप्त होतो. विवरण : भगवच्चिंतन करणारांना परमसिद्धि मिळते. 'अहो, पण ज्यांना वायूचा निरोध करतां येत नाहीं, त्यांना असें स्वेच्छा मरण येणे शक्य नाहीं. तेव्हां अशा लोकांना परमगति कशी मिळणार ?' म्हणून विचारशील तर सांगतों-
अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः । अन्वय : हे पार्थ - हे अर्जुना ! - यः अनन्यचेताः - जो ईश्वरावांचून दुसर्या कोणत्याही विषयांत चित्त न ठेवणारा साधक - नित्यशः सततं मां स्मरति - रोज रोज, प्रतिदिवशी, निरंतर मला स्मरतो, माझे चिंतन करतो - तस्य नित्ययुक्तस्य योगिनः - त्या सदा शांतचित्त योग्याला - अहं सुलभः - मी सुलभ आहे. १४ व्याख्या : हे अर्जुन ! निरंतरं मां स्मरन् देहावसाने मां याति इति किं चित्रम् ? यतः जीवतोपि निरंतरं मां स्मरतः तस्य अहं स्वरूपत्वेन सुलभोस्मि इत्यभिप्रायेणाह । अनन्येति । यः पुरुषः अनन्यचेताः सन् नास्ति अन्यस्मिन् मदन्य चेतः अंतःकरणं यस्य सः तथोक्तः सततं आदेहपातपर्यंतं नित्यशः निरंतरं मां परमात्मानं स्मरति तस्य प्रसिद्धस्य योगिनः मां आत्मत्वेन स्मरतः अहं सुलभः सुखेन अनायासेन लब्धुं योग्यः अस्मि । कथंभूतस्य योगिनः । नित्ययुक्तस्य नित्यं नित्यस्वरूपे युक्त तस्य नित्ययुक्तस्य सदा समाहितचेतसः यः जीवन् सन् सर्वं अनात्मत्वेन ज्ञात्वा मां परमात्मानं स्मरन् सन् मद्रूपो भवति प्रारब्धवशात् मृते सति मां प्राप्नोति इति किमु वक्तव्यम् ? । हे पार्थ ! अहं तव अतिसुलभः अस्मि त्वं मा भैषीः ॥ १४ ॥ अर्थ : ईश्वरावाचून दुसऱ्या कोणत्याही विषयांत चित्त न ठेवणारा जो साधक प्रतिदिवशीं निरंतर माझे चिंतन करतो, त्या सदा शांतचित्त योग्याला मी सुलभ आहें. [ अनन्य चित्त योगी सतत व सर्वदा मज परमेश्वराला जि नित्यशः स्मरतो. सहा महिने किंवा वर्षभर नव्हे, तर यावज्जीव-मरेपर्यत निरंतर जो माझें स्मरण करतो, त्य १ योग्याला मी सुलभ - अनायासाने प्राप्त होण्यासारखा आहें. यास्तव अनन्यचित्त होऊन माझ्या ठिकाणीं सदा समाहित व्हावे. ] विवरण :
मां उपेत्य पुनर्जन्म दुःखालयं अशाश्वतम् । अन्वय : परमां संसिद्धिं गताः महात्मानः - मोक्ष नांवाच्या श्रेष्ठ सिद्धिला प्राप्त झालेले महात्मे - मां उपेत्य - मला प्राप्त होऊन - अशाश्वतं दुःखालयं - अनित्य व दुःखाचे आगर अशा - पुनर्जन्म न आप्नुवन्ति - पुनर्जन्मास प्राप्त होत नाहीत. १५ व्याख्या : महात्मानः महति ब्रह्मणि आत्मा मनो येषां ते महात्मानः यद्वा महान् व्यापकः आत्मा येषां ते अथवा मदेकचित्तत्वात् महान् अपरिमितः आत्मा चित्तं येषां ते महात्मानः वाक्यार्थज्ञानसंपन्नाः मां परमात्मानं उपेत्य जीवंतो मदैक्यं प्राप्य पुनः जन्म मातृपितृमलजन्यं नाप्नुवंति न प्राप्नुवंति । किं तु परमां उत्कृष्टां संसिद्धिं पुनरावृत्तिरहितां मोक्षाख्यां गताः प्राप्ताः अथवा ये संसिद्धिं गताः ते पुनः जन्म न प्राप्नुवंति । किं कृत्वा । मां परमात्मानं उपेत्य इत्यन्वयः । कथंभूतं जन्म । दुःखालयं दुःखानां सर्वेषां दुःखनां आलयं स्थानम् । पुनः कथंभूतं जन्म । अशाश्वतं शाश्वतं न भवति तत् अशाश्वतं प्रतिक्षणध्वंसि ॥ १५ ॥ अर्थ : मी सुलभ झाल्यामुळें 'मोक्ष' - संज्ञक श्रेष्ठ सिद्धीला प्राप्त झालेले महात्मे माझ्या स्वरूपास प्राप्त होऊन सर्व दुःखाचे आगर-घर व अस्थिर अशा पुनर्जन्मास प्राप्त होत नाहींत. विवरण :
आब्रह्मभुवनात् लोकाः पुनः आवर्तिनोऽर्जुन । अन्वय : हे पार्थ - हे अर्जुना ! - आब्रह्मभुवनात् लोकाः - ब्रह्मलोकापर्यंत, ब्रह्मलोकासह सर्वलोक - पुनरावर्तिनः - पुनः आवर्तन पावणारे, पुनरावृत्ति, पुनः जन्म घेणारे, पुनः उत्पन्न होणारे आहेत - तु कौन्तेय मां उपेत्य - परंतु हे कुंतिपुत्रा, मला प्राप्त झाल्यावर - पुनर्जन्म न विद्यते - पुनः जन्म नाही. १६ व्याख्या : हे अर्जुन ! आ ब्रह्मभुवनात् भवंति भूतानि यस्मिन्निति भुवनं ब्रह्मणः भुवनं सत्यलोकः ब्रह्मभुवनं भ्रहमभुवनं अभिव्याप्य इति आब्रह्मभुवनं तस्मात् लोकाः सर्वे प्राणिनं पुनरावर्तिनः पुनः पुनः आवर्तनशीलाः पुनरावर्तिनः संसरणभाजः संति । ब्रह्मलोकस्यापि विनाशित्वात् । तत्रस्थानां अनुत्पन्नज्ञानानां अवश्यंभावि पुनर्जन्म । ये पुरुषाः एवं क्रममुक्तिफलाभिः उपासनाभिः ब्रह्मलोकं प्राप्ताः तेषामेव तत्रोत्पन्नज्ञानानां ब्रह्मणा सह मोक्षः अन्येषां नास्त्येव । हे कौंतेय ! मां परमात्मानं उपेत्य तु प्राप्य तु पुनः जन्म न विद्यते नास्ति । हे अर्जुन ! हे कौंतेय ! इति संबोधनद्वयेन स्वरूपतः कारणतः ज्ञानसंपत्तेः शुद्धिः सूचिता ॥ १६ ॥ अर्थ : 'पण ईश्वरावाचून दुसऱ्या श्रेष्ठ फळाला प्राप्त झालेले पुरुष पुनर्जन्म कां घेतात ?' म्हणून विचारशील तर सांगतो - अर्जुना, ब्रह्मभुवनासह सर्व लोक पुनः पुनः नाश पावून उत्पन्न होणारे आहेत. परंतु हे कुंतीपुत्रा ! मला प्राप्त होऊन पुनर्जन्म घ्यावा लागत नाहीं. विवरण : ब्रह्मलोकान्त सर्व फले अनित्य असल्याचें कारण 'पण ब्रह्मलोकासह सर्व लोक पुनरावर्ती कां आहेत ? व तेथें गेलेल्या लोकांना पुनः पुनः जन्म कां घ्यावा लागतो ?' म्हणून विचारशील तर ते प्रहलोकान्त सर्व लोक कालाने परिच्छिन्न आहेत, म्हणून पुनः पुनः त्यांची आवृत्ति होते. ते कालाने परिच्छिन्न कसे आहेत, तेंच आतां सांगतों-
सहस्रयुगपर्यन्तं अहर्यद् ब्रह्मणो विदुः । अन्वय : ते अहोरात्रविदः जनाः - दिवस व रात्र जाणणारे ते प्रसिद्ध जन - यत् ब्रह्मणः अहः - जो ब्रह्मदेवाचा दिवस - तत् सहस्रयुगपर्यन्तं - तो एक सहस्र युगांनी संपणारा - च रात्रिं युगसहस्रान्तां विदुः - व रात्र सहस्र युगांनी संपणारी आहे असे जाणतात. १७ व्याख्या : ये जनाः ब्रह्मणः हिरण्यगर्भस्य प्रजापतेः यत् प्रसिद्धं अहः दिनं मनुष्यपरिमाणेन सहस्रयुगपर्यंतं सहस्रं युगानि चतुर्युगानि सहस्रयुगानि सहस्रयुगानि पर्यंतः अवसानं यस्य तत् सहस्रयुगपर्यंतं विदुः जानंति । 'चतुर्युगसहस्रं तु ब्रह्मणो दिनमुच्यते' - इति पौराणिकं वचनम् । तथा ब्रह्मणः प्रजापतेः रात्रिं युगसहस्रांतां युगानां चतुर्युगानां सहस्रं युगसहस्रं युगसहस्रं अंतः पर्यवसानं यस्याः सा तां विदुः जानंति । ते जनाः महर्लोकादिवासिनं भृग्वादयः अहोरात्र विदः अहश्च तात्रिश्च अहोरात्रं अहोरात्र विदंति ते अहोरात्रविदः संति । चिरकालं लोकं ब्रह्मलोकं प्राप्य पुनः आ वर्तंते ब्रह्मलोकव्यतिरिक्ताः जनाः पुनः आवर्तंते इति किमु वक्तव्यम् ? ॥ १७ ॥ अर्थ : दिवस व रात्र यांना जाणणारे ते प्रसिद्ध लोक ब्रह्मदेवाचा जो दिवस तो एक सहस्त्र युगांनी व त्याची रात्रही तितक्याच युगांनी समाप्त होणारी आहे असे सांगतात. [ ब्रह्मदेवाच्या दिवसाचे प्रमाण आमचीं एक सहस्त्र चतुर्युगें किंवा देवांची एक सहस्त्र युगे हें आहे व रात्रीचेंही प्रमाण तितकेच आहे, असें कालवेत्ते जाणतात. आमचीं कृत, त्रेता, द्वापर व कलि या चार युगांचे मिळून देवांचे एक युग होते. म्हणून देवांची एक सहस्त्र युगे म्हणजे मानवांची एक सहस्त्र चतुर्युगें होत. याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या आयुष्याचे प्रमाणही कालपरिच्छिन्न असल्यामुळें त्याचा नाश होतो व त्याच्या बरोबर तेथील लोकांची पुनरावृत्ति होते. ] विवरण :
अव्यक्तात् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्ति अहरागमे । अन्वय : अहरागमे - ब्रह्मदेवाचा दिवस उगवला असतां - अव्यक्तात् - ब्रह्मदेवाच्या स्वापावस्थेपासून (सुषुप्तावस्था) - सर्वां व्यक्तयः प्रभवन्ति - स्थावरजंगमरूप सर्व प्रजा अभिव्यक्त होतात. - रात्र्यागमेब्रह्मदेवाची रात्र झाली असतां - तत्र एव अव्यक्तसंज्ञके प्रलीयन्ते - त्याच अव्यक्त नांवाच्या स्वापावस्थेत प्रलीन होतात. १८ व्याख्या : अहरागमे अह्नः दिवसस्य आगमः प्रादुर्भावः अहरागमः तस्मिन् अहरागमे ब्रह्मलोके दिनप्रादुर्भावे प्रजापतेः प्रबोधसमये अव्यक्तात् न व्यक्तं अव्यक्तं तस्मात् अव्यक्तात् मूलकारणात् श्रीनारायणाख्यात् मत्तः सर्वाः संपूर्णाः व्यक्तव्यः हिरण्यगर्भादिमूर्तयः प्रभवंति प्रादुर्भवंति व्यवहारक्षमतया अभिव्यज्यंते । पुनश्च रात्र्यागमे रात्रेः आगमः प्राप्तिः रात्र्यागमः तस्मिन् रात्र्यागमे स्थित्यवसाने ब्रह्मणः स्वापकाले पूर्वोक्ताः सर्वाः व्यक्तव्यः हिरण्यगर्भादिमूर्तयः तत्रैव तस्मिन्नेव अव्यक्तसंज्ञके श्रीमन्नारायणे मयि प्रलीयंते लीनाः भवंति । ब्रह्मलोके सूर्योदयास्तमयाभावेपि दिनरात्राभिधानं ज्ञेयम् ॥ १८ ॥ अर्थ : 'ब्रह्मदेवाच्या दिवसा व रात्रीं काय होतें' म्हणून विचारशील तर सांगतों - प्रजापति जागा झाला असतां त्याच्या दिवसाचा आरंभ होतो, तेव्हां त्याच्या स्वापावस्थेपासून स्थावर-जंगमरूप सर्व प्रजा अभिव्यक्त होतात. तो निजला म्हणजे त्याची रात्र सुरू होते व तत्क्षणी दिवसाच्या आरंभी उत्पन्न झालेले सर्व प्राणी त्याच्या त्याच स्वापावस्थेत लीन होतात. विवरण :
'अकृत-अभ्यागम व कृतविप्रणाश' या दोषांच्या परिहारासाठीं बंध-मोक्ष शास्त्राची प्रवृत्ति व्यर्थ नाहीं, हे प्रदर्शित करण्यासाठीं व अविद्यादि दोषांमुळे पुनः पुनः जन्म घेऊन मरणे या संसाराविषयीं वैराग्य यावें म्हणून भगवान् म्हणतात-
भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते । अन्वय : हे पार्थ - हे अर्जुना ! - सः एव अयं भूतग्रामः - तोच हा भूतसमुदाय, प्राण्यांचा समूह - भूत्वा भूत्वा - पुनः पुनः उत्पन्न होऊन - रात्र्यागमे - ब्रह्मदेवाची रात्र झाली असतां - अवशः प्रलीयते - परतंत्र होऊन, कर्माधीन होऊन प्रलीन होतो - अहरागमे प्रभवति - व ब्रह्मदेवाचा दिवस उगवला असतां, प्रजापति जागा झाला असतां, कर्माधीन होऊनच तो प्राणिसमूह उत्पन्न होतो. १९ व्याख्या : यः भूतसमूहः पूर्वं रात्र्यागमे अव्यक्तसंज्ञके श्रीनारायणे विलीनो जनः स एव पूर्वस्मिन् कल्पे स्थितः अयं एतस्मिन् कल्पे जायमानोपि न तु प्रतिकल्पं अन्यः अन्यः भूतग्रामः भूतानां चराचरप्राणिनां ग्रामः समूहः भूतग्रामः स्थावरजंगमलक्षणः भूतसमुदायः अहरागमे अह्नः दिवसस्य आगमः प्राप्तिः तस्मिन् अहरागमे भूत्वाभूत्वा उत्पद्य उत्पद्य पुनः कर्मक्षये अवशः सन् प्रलयाधीनः सन् रात्र्यागमे रात्रेः आगमः प्राप्तिः रात्र्यागमः तस्मिन् प्रलीयते लीनो भवति पुनरपि अहरागमे प्रभवति उत्पन्नो भवति । घटीयंत्रवत् अजस्रं उत्पत्तिप्रलयौ अनुभवति । ते इह व्याघ्रो वा सिंहो वा वृको वा वराहो वा कीटो वा पतंगो वा दंशो वा मशको वा यद्यद्भवति तदा तथैव भवंति । 'सूर्याचंद्रमसौ धाता यथापूर्वमकल्पयत् । दिवं च पृथिवीं चांतरिक्षम्' - इति श्रुतेः ॥ १९ ॥ अर्थ : हे पार्था, तोच हा भूतसमुदाय-पूर्वकल्पांतील तोच हा स्थावरजंगमरूप भूतसमूह प्रजापतीच्या दिवसाचा आरंभ होतांच पुनः पुनः उत्पन्न होऊन त्याची रात्र सुरू होतांच पुनः पुनः लीन होतो. रात्र होतांच प्रलयाचा अनुभव घेणाऱ्या व दिवसाचा आरंभ होतांच जन्म घेणाऱ्या प्राणिमूहाला एकसारखेच कर्मपारतंत्र्य आहे. विवरण :
परस्तस्मात् तु भावोऽन्यो अव्यक्तो अव्यक्तात् सनातनः । अन्वय : तु तस्मात् अव्यक्तात् - परंतु त्या अव्यक्ताहून - परः अन्यः अव्यक्तः - निराळा, अगदी विलक्षण, इंद्रियांचा विषय न होणारा - सनातनः यः भावः - नित्य असा जो भाव आहे - सः सर्वेषु भूतेषु नश्यत्सु - तो सर्व भूतें नाश पावत असतांही - न विनश्यति - स्वतः नाश पावत नाही. - यः अव्यक्तः अक्षरः इति उक्तः - जो हा अव्यक्त व अक्षर म्हणून म्हटलेला भाव - तं परमां गतिं आहु - त्यालाच परम गति म्हणतात - यं प्राप्य न निवर्तन्ते - ज्या भावाला प्राप्त झाल्यावर पुनः संसारमार्गात परत येत नाहीत - तत् मम परमं धाम - ते माझे परम स्थान, परम पद आहे. २०-२१
व्याख्या : तस्मात् चराचरस्थूलप्रपंचकारणभूतात् अव्याकृतात् हिरण्यगर्भाख्यात् परः व्यतिरिक्तः वा श्रेष्ठः अन्यः विलक्षणः अव्यक्तः केनापि प्रकारेण व्यक्तः स्पष्टः न भवतीति अव्यक्तः रूपादिहीनतया चक्षुराद्यगोचरः अस्पष्टः भावः सद्रूपता सनातनः चिरंतनः एतादृशः यः भावः । अस्ति इति शेषः । सः भावः हिरण्यगर्भ इव सर्वेषु समग्रेषु भूतेषु चराचरभूतेषु नश्यत्सु सत्सु न विनश्यति उत्पद्यमानेष्वपि नोत्पद्यते हिरण्यगर्भस्य तु कार्यस्य भूताबिमानित्वात् उत्पत्तिविनाशाभ्यां युक्तत्वं उत्पत्तिविनाशौ न तु परमेश्वरस्य ॥ २० ॥ अर्थ : पण त्या अव्यक्ताहून निराळा, अगदीं विलक्षण, इंद्रियांचा विषय न होणारा व नित्य, असा जो भाव आहे तो, सर्व भूते नाश पावत असतांनाही नाश पावत नाहीं. जो हा अव्यक्त व अक्षर म्हणून म्हटलेला भाव, त्यालाच परमा गति म्हणतात. ज्या भावाला प्राप्त होऊन हे सर्व जीव पुनः संसारमार्गांत परत येत नाहींत, तें माझे परम स्थान-परम पद आहे. [ विनाश पावणारा प्रत्येक विकार पुरुषापर्यंत विनाश पावतो. 'अक्षर' संक्षक पुरुष मात्र विनाश पावत नाहीं. कारण त्याच्या विनाशाचे कांहीं निमित्तच संभवत नाहीं. विवरण : परमगतिरूप ईश्वर अनन्यभक्तीने सुलभ होतो.
पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया । अन्वय : हे पार्थ - हे अर्जुना ! - यस्य अन्तःस्थानि भूतानि - ज्याच्या आंत ही सर्व भूतें आहेत - येन इदं सर्वं ततं - ज्याने हे सर्व व्यापले आहे - सः परं पुरुषः - तो परम पुरुष - अनन्यया भक्त्या तु लभ्य - अनन्य भक्तीनेच प्राप्त होण्याजोगा आहे. २२ हे पार्थ ! सः प्रसिद्धः परः अक्षरात् परः पुरुषः सर्वस्मात् पुरा आस इति पुरुषः परमात्मा अहमेव अनन्यया न विद्यते अन्यो यस्यां सा अनन्या तया अननन्यया अव्यभिचारिण्या प्रेमलक्षणया भक्त्या भजनेन लभ्यः लब्धुं योग्यः लभ्यः भवामि । तत्त्वमस्यादिवाक्य श्रवणानंतरं भजनविरोधभयेऽत्र वाच्यार्थद्वयत्यागपुरःसरं एकाकीभाव भजनेन अहं लभ्यः इति तात्पर्यम् । यस्य परमात्मानः मम अंतस्थानि अंतः अभ्यंतरे तिष्ठंति तानि यत्सत्तायां वर्तमानानि भूतानि आकाशादीनि स्थावरांतानि संति येन सच्चिद्रूपेण मया सर्वं अव्यक्तादिस्थावरांते इदं परोक्षापरोक्षविषयं ततं व्याप्तम् रज्ज्वादिना सर्पादिवत् ॥ २२ ॥ अर्थ : हे अर्जुना, ज्याच्या आंत ही सर्व भूते आहेत व ज्याने हें सर्व व्यापिले आहे, तो परम पुरुष अनन्य भक्तीनेंच प्राप्त होण्याजोगा आहे. [ आकाशाने जसे घटादिक व्यापलेले असतें, त्याप्रमाणें पुरुषाने हें सर्व व्यापले आहे व ज्याच्यामध्ये ही सर्व कार्यरूप भूतें रहातात, तो श्रेष्ठ पुरुष ज्ञानलक्षण आत्मविषयक अनन्य भक्तीनेच प्राप्त होतो. विवरण : शुक्ल-कृष्णगति व त्याचें फल. प्रणवामध्ये ज्यांनीं आपली ब्रह्मबुद्धि स्थिर केली आहे, त्यामुळें जे कालांतरी - कल्पांतीही मुक्तीला पात्र आहेत, त्यांना उत्तर मार्ग सांगावा व त्या मार्गाच्या स्तुतीसाठी दक्षिण मार्गाचाही उपन्यास करावा, म्हणून भगवान् म्हणतात-
यत्र काले तु अनावृत्तिं आवृत्तिं चैव योगिनः । अन्वय : तु भरतर्षभ - हे अर्जुना ! - योगिनः यत्र काले प्रयाताः - योगी व कर्मी ज्यावेळी मरून गेले असतां - अनावृत्तिं च एव आवृत्तिं यान्ति - मोक्षाला आणि पुनर्जन्माला प्राप्त होतात - तं कालं वक्षामि - तो काल मी तुला सांगतो. २३ व्याख्या : प्राणोत्क्रमणानंतरं यत्र यस्मिन् काले कालभिमानिनीदेवतोपलक्षिते मार्गे प्रयाताः गताः योगिनः चेत्यपरं उपासकाः चेत्यपरं कर्मिणः अनावृत्तिं अपरावृत्तिं चेत्यपरं आवृत्तिं परावृत्तिं यांति गच्छंति । देवयानमार्गे उत्तरायणे प्रयाताः उपासकाः अनावृत्तिं यांति पितृयानमार्गे दक्षिणायने प्रयाताः कर्मिणः आवृत्तिं यांति । तथापि एवं सत्यपि पितृयानमार्गे गताः आवर्तंत एव । केपि क्रममुक्तिभाजः देवयानमार्गे गता यदि तर्हि केचित् आवर्तंते भोगांते क्रमेण मुच्यंते । हे भरतर्षभ ! अहं तं देवयानपितृयानकालं कालाभिमानिनीदेवतोपलक्षितं मार्गं वक्ष्यामि कथयामि ॥ २३ ॥ अर्थ : हे कौंतेया, ज्या काली मृत झालेले योगी-ध्यायी-उपासक अनावृत्तीला म्ह० अपुनर्जन्माला प्राप्त होतात व ज्या कालीं मृत झालेले कर्मी आवृत्तीला-पुनर्जमाला प्राप्त होतात, तो काल मी तुला सांगेन. विवरण :
अग्निर्जोतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् । अन्वय : अग्निः ज्योतिः - ’अग्नि’ या नांवाची कालाभिमानिनी देवता, ’ज्योति’ या नांवाचा कालाभिमानिनी देवता - अहः शुक्लः - दिवसाची अभिमानिनी देवता व शुक्लपक्षाभिमानिनी देवता - षण्मासाः उत्तरायणं - उत्तरायणाच्या सहा महिन्यांची देवता, या देवतां ज्यांत आहेत - तत्र प्रयाताः - त्या मार्गांत शरीर सोडलेले, मेलेले - ब्रह्मविदः जनाः - ब्रह्मोपासक, ब्रह्माचे ध्यान करणारे जन क्रमाने - ब्रह्म गच्छन्ति - ब्रह्माला प्राप्त होतात. २४ व्याख्या : अग्निज्योतिः शब्दाभ्यां अर्चिरभिमानिनी देवता लक्ष्यते । अहः इति दिवसाभिमानिनी देवता लक्ष्यते । शुक्लः इति शुक्लपक्षाभिमानिनी देवता लक्ष्यते । उत्तरायणं उत्तरायणरूपाः षण्मासाः इति उत्तरायणाभिमानिनी देवता लक्ष्यते । एतच्च अन्यासामपि श्रुत्युक्तानां संवत्सरदेवलोकादि देवतानां उपलक्षणार्थं एवंभूतः यः मार्गः वर्तते तत्र तस्मिन् देवतायानमार्गे प्रयाताः गताः ब्रह्मविदः सगुणब्रह्मोपासकाः जनाः भगवदुपासकाः ब्रह्म सगुणं ब्रह्म गच्छंति प्राप्नुवंति यथाक्रमेण अतिवाहिकाभिः देवताभिः उत्तरोत्तरं नीताः संतः ब्रह्मलोकं प्राप्नुवंति । न पुनर्यांति इति अपुनरावृत्तिः दर्शिता ॥ २४ ॥ अर्थ : 'अग्नि' या नांवाची कालाभिमानिनी देवता, 'ज्योतिः' या नांवाची कालाभिमाजिनी देवता, दिवसाची अभिमानिनी देवता, शुकुपक्षाभिमानिनी देवता, उत्तरायणाच्या सहा महिन्यांच्या अभिमानिनी देवता, या आतिवाहिक देवता ज्या मार्गात आहेत, त्या मार्गात शरीर सोडलेमे-मृत झालेले ब्रह्मोपासक-ब्रह्माचे ध्यान करणारे जन क्रमाने ब्रह्माला प्राप्त होतात. विवरण :
धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् । अन्वय : धूमः रात्रिः तथा कृष्णः - धूमाभिमानिनी देवता, रात्रीचे देवता तथा त्याचप्रमाणे कृष्णपक्षाची देवता - षट् मासाः दक्षिणायनं - दक्षिणायनाच्या सहा महिन्यांची देवता - प्रयातः योगी - मरून गेलेले कर्मठ - चंद्रमसं ज्योतिः - चंद्रांतील ज्योतीला, कर्मफलाला - प्राप्य निवर्तते - प्राप्त होऊन त्याचा भोगाने क्षय होतांच तेथून परत येतो. २५ व्याख्या : धूमशब्देन कर्मोपलक्षितं धूमः धूमाभिमानिनी देवता लक्ष्यते । रात्रिः रात्र्यभिमानिनी देवता लक्ष्यते । तथा कृष्णः कृष्णपक्षः कृष्णपक्षाभिमानिनी देवता लक्ष्यते । दक्षिणायनं दक्षिणायनरूपाः षण्मासाः षण्मासाभिमानिन्यः तिस्रः देवता लक्ष्यंते । एताभिः देवताभिः मार्गः उपलक्षितः तत्र तस्मिन् पितृयानमार्गे प्रयातः सन् मृतः सन् योगी कर्मयोगी चांद्रमसं ज्योतिः तदुपलक्षितं स्वर्गलोकं वा पितृलोकं 'कर्मणा पितृलोक' इति श्रुतेः । प्राप्य तत्र श्रौतस्मार्तकर्मफलं भुक्त्वा निवर्तते पुनः मृत्युलोकं प्राप्नोति । उपासकानां अपुनरावृत्तिः कर्मिणां पुनरावृत्तिः अर्थात् तदुभयरहितानां क्षुद्रयोनिप्राप्तिः दर्शिता ॥ २५ ॥ अर्थ : धूमाभिमानिनी देवता, रात्रीची देवता, त्याचप्रमाणे कृष्णपक्षाची देवता, दक्षिणायनाच्या सहा महिन्यांची देवता, या देवता ज्या मार्गांतून वाहून नेणाऱ्या आहेत, त्या मार्गांत मरून गेलेला कर्मठ, चंद्रांतील ज्योतीला - कर्मफलाला प्राप्त होऊन त्याचा भोगाने क्षय होतांच तेधून परत येतो. [ ज्या मार्गांत संज्ञाशून्य मृतांना वाहून नेणाऱ्या अग्न्यादि देवता असतात, त्या मार्गांत मृत झालेले ब्रह्मोपासक क्रमाने ब्रह्माला प्राप्त होतात आणि ज्या दक्षिण मार्गात त्यांना वाहून नेणाऱ्या धूमाद्यभिमानिनी देवता असतात, त्यांत मृत झालेले कर्मी चंद्रलोकाला प्राप्त होऊन कर्मफळ भोगक्षयानंतर अवशिष्ट कर्माने पुनः संसारांत परत येतात. ] विवरण :
शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते । अन्वय : जगतः एते शुक्ल-कृष्णे गती - ज्ञान कर्माधिकृत जनांच्या या दोन प्रकाश-अप्रकाशरूप गती - शाश्वते मते - नित्य मानलेल्या आहेत - एकया अनावृत्तिं याति - यांतील एका गतीने योगी, ध्यानी क्रममुक्तीला प्राप्त होतो व - अन्यया पुनः आवर्तते - दुसर्या गतीने कर्मी पुनः परत येतो. २६ व्याख्या : उक्तौ मार्गौ उपसंहरति । एते इदानीं कथिते शुक्लकृष्णे शुक्ला प्रकाशमयत्वेन अर्चिरादिगतिः च कृष्णा तमोमयत्वेन धूमादिगतिः शुक्लकृष्णे देवयानपितृयानलक्षणे गती गम्येते इति गती मार्गौ जगतः ज्ञानकर्माधिकारिणः जन्ममरणे गच्छतः प्राणिनः शाश्वते यावत् साक्षात्कारं वर्तमाने मते मम चेत्यपरं वेदस्य मान्ये आस्ताम् । संसारस्य अनादित्वात् । तयोः मार्गयोः मध्ये पुरुषः एकया देवयानमार्गेण अनावृत्तिं मोक्षं याति गच्छति । अन्यया तद्विलक्षणेन धूममार्गेण पितृयानेन पुनः आवर्तते जन्म प्राप्नोति ॥ २६ ॥ अर्थ : ज्ञानकर्माधिकृत जनांच्या या प्रकाश - अप्रकाशरूप दोन गति - मार्ग नित्य मानलेले आहेत. यातील एका गतीने योगी-ध्यायी क्रममुक्तीला प्राप्त होतो व दुसऱ्या गतीने कर्मी संसारांत पुनः परत येतो-पुनर्जम घेतो. [ विद्या प्राप्त्वामुळे म्ह० उपासनेने - देवताज्ञानाने प्राप्त होण्यास योग्य असल्यामुळें व अग्नि, ज्योति, दिवस इत्यादि प्रकाशानें उपलक्षित झाल्यामुळे देवयान गति 'शुक्ला' आहे व ज्ञानप्रकाशकत्वाच्या अभावामुळे म्ह० धूमादि अप्रकाशानें उपलक्षित व अविद्याप्राप्य-कर्मानें प्राप्त होण्यास योग्य असल्यामुळे पितृयाण गति 'कृष्णा' आहे. शास्त्रानें ज्यांना ज्ञानाचा किंवा कर्माचा अधिकार दिला आहे, त्यांच्या या दोन शाश्वत गति आहेत. त्या दोन गतींतील एका -शुक्लगतीने पुरुष अनावृत्तीला म्ह० क्रममुक्तीला प्राप्त होतो व इतर म्ह० कृष्णगतीने चंद्रलोकांतील भोक्तव्य पुण्य कर्माचा क्षय झाला असतां अवशिष्ट राहिलेल्या कर्मानें येथे जन्म घेण्यासाठी परत येतो. ] विवरण :
नैते सृती पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन । अन्वय : हे पार्थ - हे अर्जुना ! - एते सृती जानन् - हे दोन मार जाणणारा - कश्चन योगी म मुह्यति - कोणीही योगी मोहित होत नाही - तस्मात् हे अर्जुन - म्हणून हे पार्था ! - सर्वेषु कालेषु योगयुक्तः भव - सर्व काली तूं समाहित चित्त हो. २७ व्याख्या : हे पार्थ ! कश्चन कश्चिदपि योगी ध्याननिष्ठः एते उक्तलक्षणे सृती मार्गौ जानन् सन् जानातीति जानन् क्रमेण एका मोक्षाय अपरा संसाराय इति जानन् न मुह्यति न मोहं प्राप्नोति केवलं धूमादिमार्गप्रापकं कर्म न करोति । हे अर्जुन ! त्वं तस्मात् योगस्य अपुनरावृत्तिफलत्वात् सर्वेषु सर्वासु कालेषु अवस्थासु योगयुक्तः योगेन मदैक्येन युक्तः संबद्धः योगयुक्तः समाहितचित्तः भव अपुनरावृत्तये स्थिरो भव ॥ २७ ॥ अर्थ : हे अर्जुना, हे दोन मार्ग जाणणारा कोणीही योगी मोहित होत नाहीं. म्हणून सू सर्वकालीं समाहित चित्त हो. [ या दोन गतींना उपास्यत्व आहे. हें सूचविण्यासाठीं त्यांच्या विज्ञानाची येथें स्तुति केली आहे. या गतींचेंही ध्यान करणारा ध्याननिष्ठ मोगी मोहित होत नाहीं. म्ह० दक्षिणमार्ग देणारे केवल कर्म आपले कर्तव्य आहे, असे समजत नाहीं. योग-ध्यान क्रममुक्ति हें फल देणारें असल्यामुळें तें नित्य कर्तव्य आहे. असें सिद्ध झालें असतां भगवान् म्हणतात - 'अर्जुना, तूं सर्वकालीं समाहित चित्त हो.' ] विवरण :
वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव अन्वय : योगी इदं विदित्वा - ध्यान-उपासना करणारा पुरुष या अध्यायांत सात प्रश्नांचा निर्णय करून जे कांही सांगितले आहे तें जाणून - वेदेषु यज्ञेषु तपःसु - वेदाध्ययनांत यज्ञानुष्ठानांत, तपश्चर्येत् - च एव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टं - आणि दानांत जे पुण्यफल सांगितले आहे - तत् सर्वं अत्येति च - ते सर्व उल्लंघन करून जातो आणि - आद्यं परं स्थानं उपैति - अगदीं मूळ कारणरूप ब्रह्मपदाला प्राप्त होतो. २८ व्याख्या : वेदेषु दर्भपवित्रपाणित्वप्राङ्मुखत्वगुर्वधीनत्वादिभिः सम्यक् अधीतेषु यज्ञेषु अंगोपांगसाहित्येन श्रद्धया सम्यक् अनुष्ठितेषु तपःसु शास्त्रोक्तेषु मनोबुद्ध्याद्यैकाग्र्येण श्रद्धया सुतप्तेषु चेत्यपरं दानेषु तुलापुरुषादि देशे काले च पात्रे श्रद्धयासम्यक् दत्तेषु यत् प्रसिद्धं पुण्यफलं पुण्यस्य धर्मस्य फलं स्वर्गराज्यादिफलं पुण्यफलं प्रदिष्टं शास्त्रेण कथितं योगी योगो मदैक्यं यस्यास्तीति योगी ध्याननिष्ठः इदं पूर्वोक्त सप्तप्रश्नद्वारेणोक्तं विदित्वा सम्यगनुष्ठानपर्यंतं ज्ञात्वा तत् प्रसिद्धं सर्वं संपूर्णं अत्येति अतिक्रम्य गच्छति । किं च आद्यं सर्वेषां कारणानां कारणं अत एव परं उत्कृष्टं स्थानं सर्वाधिष्ठानं उपैति प्रतिपद्यते । ब्रह्मैव प्राप्नोतीत्यर्थः ॥ २८ ॥ अर्थ : ध्यान-उपासना करणारा पुरुष या अध्यायांत सात प्रश्राचा निर्णय करून जें कांहीं सांगितले आहे, जें जाणून वेदाध्ययन, यज्ञानुष्ठान, तपश्चर्या आणि दान यांत जें पुण्यफल सांगितलें आहे. त्या सर्वांचे उलंधन करून जातो आणि अगदीं मूळ कारणरूप ब्रह्मपदाला प्राप्त होतो. उत्तम प्रकारे म्ह० हातांत पविश्रके घालून, पूर्वाभिमुख बसून, नियमपूर्वक अध्ययन केलेल्या वेदांमध्ये, अंगोपांगांसह अनुष्ठिलेल्या यज्ञामध्ये, मन, बुद्धि इत्यादिकांच्या ऐकाग्र्यपूर्वक आचरलेल्या तपांमध्ये आणि यथाशास्त्र देश-काल-पात्र पाहून दिलेल्या दानांमध्णयें शास्त्राने जें पुण्यफल सांगितले आहे, त्याहून अधिक फल योग्यास प्राप्त होतें. या अध्यायांत अर्जुनाच्या सात प्रश्नांचें उत्तर देऊन व योगमार्गाचे दिग्दर्शन करून तत्पदार्थाचें ध्येय या रूपाने व्याख्यान केलें. ] विवरण :
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ |