|
श्रीमद् भगवद्गीता राजविद्याराजगुह्ययोगः गुह्यतमज्ञान सांगण्याची प्रतिज्ञा व त्या ज्ञानाची प्रशंसा.
श्रीभगवानुवाच - अन्वय : तु इदं गुह्यतमं विज्ञानसहितं ज्ञानं - आतां हे अतिशय गुह्य अनुभवासह आत्मज्ञान - अनसूयवे ते प्रवक्ष्यामि - माझ्या गुणांमध्ये दोषदृष्टि न ठेवणार्या तुला सांगेन - यत् ज्ञात्वा अशुभात् मोक्षसे - जे ज्ञान जाणून झाले असतां अशुभ संसारापासून तूं मुक्त होशील. १ व्याख्या : हे अर्जुन ! अहं ते तुभ्यं पूर्वाध्याये उक्तं एव इदं तु वक्ष्यमाणं अधुना प्रोच्यमानं ज्ञानं शब्दप्रमाणकं ब्रह्म तत्त्वविषयकं साक्षान् मोक्षं प्रति साधनकं प्रवक्ष्यामि प्रकर्षेण वक्षामि । ज्ञानेन इहैव साक्षात्कारं प्राप्य विमुक्तः सन् जीवन्मुक्तः सन् प्रारब्धकर्मक्षये विदेहकैवल्यं प्राप्नोति । कथंभूतं ज्ञानम् । गुह्यतमं अतिशयेन गुह्यं इति गुह्यतमं अत्यंत गोपनीयम् । पुनः कथंबुहूतं ज्ञानम् । विज्ञानसहितं विज्ञानेन अनुभवेन सहितं युक्तं त्वं यत् ज्ञानं ज्ञात्वा प्राप्य साक्षात्कृत्य अशुभात् संसारदुःखात् मोक्ष्यसे मुक्तो भविष्यसि । कथंभूताय ते । अनसूयवे न विद्यते असूया मयि दोषारोपणं यस्य सः अनसूयुः तस्मै पुनः पुनः स्वमाहात्म्यं एव उपदिशति एवं परमकारुणिके मयि दोषदृष्टिरहिताय ॥ १ ॥ अर्थ : श्रीभगवान् म्हणाले-आतां गुणांमध्ये दोषदृष्टि न ठेवणाऱ्या तुला मी हे अतिशय गुह्य अनुभवासह आत्मज्ञान सांगतो. तें ज्ञान झाले असतां तूं या अशुभ संसारापासून मुक्त होशील. विवरण : गुह्यतमज्ञान.
राजविद्या राजगुह्यं पवित्रं इदमुत्तमम् । अन्वय : राजविद्या राजगुह्यं - हे ज्ञान विद्यांचा राजा, गुह्यांचा राजा - पवित्रं इदं उत्तमं - अत्यंत पावन असे हे उत्तम ज्ञान आहे - प्रत्यक्षावगमं धर्म्यं - याचे ज्ञान-अनुभव प्रत्यक्ष येतो हे धर्माला धरून आहे. - कर्तुं सुखदं अव्ययम् - हे संपादम करण्यास सुलभ व अव्यय आहे. कर्माच्या फलाप्रमाणें याचें फल क्षीण होत नाही. २ व्याख्या : किंच । पुनः कथंभूतं ज्ञानम् । राजविद्या सर्वासां विद्यानां राजा इति राजविद्या । पुनः कथंभूतम् । राजगुह्यं सर्वेषां गुह्यानां राजा इति राजगुह्यं अनेकजन्मसुकृतसाध्यं पवित्रं पवेः मृत्योः त्रायते संरक्षते इति पवित्रं जन्मार्नितसंचितशोधकं इदं अनेक जन्मसहस्रसंचितानां सर्वेषामपि पापानां स्थूलसूक्ष्मावस्थानां तत्कारणस्य अज्ञानस्य सद्य एव उच्छेदकम् । पुनः कथंभूतम् । उत्तमं उद्गतं तमः गुणत्रयं यस्मात् तत् उत्तमं संसारदोषशोधकत्वेन सर्वोत्कृष्टम् । पुनः कथंभूतम् । प्रत्यक्षावगमं अवगम्यते अनेनेति अवगमः प्रत्यक्षः अवगमः साक्षिप्रत्ययः यस्मिन् तत् । पुनः कथंभूतम् । धर्म्यं विषयेंद्रियाधिष्ठानत्वेन तत्प्रकाशकत्वेन अर्तमानम् । पुनः कथंभूतम् । कर्तुं साक्षात्कर्तुं सुसुखं अनायासेनैवं अनुभवसिद्धम् । पुनः कथंभूतम् । अव्ययं अस्य फलतः व्ययो नास्ति इति अव्ययं अक्षयफलम् ॥ २ ॥ अर्थ : हे ज्ञान सर्व विद्यांचा व सर्व गुह्यांचा राजा व अत्यंत पावन आहे. याचा अनुभव प्रत्यक्ष येतो. हें धर्माला धरून आहे. हें संपादन करण्यास सुलभ व अव्यय आहे. कर्माच्या फलाप्रमाणें याचे फल क्षीण होत नाहीं. [ ही ब्रह्मविद्या सर्व विद्यांमध्ये अतिशय देदीप्यमान होते, हें प्रसिद्ध आहे. सर्वांपेक्षां ब्रह्मज्ञांचा आदर लौकिकातही फार होत असतो, हें सर्वानुभूत आहे. हें अतिशय गुह्य व सर्व पावन वस्तूंमध्ये अत्यंत उत्कृष्ट शुद्धिकारण आहे. ज्याअर्थी अनेक सहस्त्र जन्मांमध्यें संचय केलेक्याही धर्माधर्मादि कर्माला ब्रह्मज्ञान एका क्षणांत समूल भस्म करते, त्याअर्थी त्याचें पवित्रत्व काय सांगावे ! हें ब्रह्मज्ञान प्रत्यक्षावगम आहे म्ह० सुखादिकांप्रमाणें स्वानुभव हेंच त्याविषयी प्रमाण आहे. किंवा ज्याचा अवगम-फल प्रत्यक्ष आहे, स्वगाप्रमाणें परोक्ष नाही, तें प्रत्यक्षावगम ज्ञान होय. या धर्म्य व सुलभ ज्ञानाचा फलद्वाराही व्यय होत नाहीं. म्हणून तें अव्यय आहे. विवरण :
अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप । अन्वय : परंतप - हे अर्जुना ! - अस्य धर्मस्य अशद्दधानाः पुरुषाः - या आत्मज्ञानरूप धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष - मां अप्राप्य मृत्युसंसारवर्मनि निवर्तन्ते - मला प्राप्त न होऊन मृत्युयुक्त संसारमार्गात निवृत्त होतात. संसारमार्गांत फिरून येतात. ३ व्याख्या : हे परंतप ! परं अहंकाररूपं अनादिशत्रुं तापयति दूरीकरोतीति परंतपः तत्संबुधौ हे अर्जुन ! अस्य प्रत्यक्षत्वेन वर्त्तमानस्य धर्मस्य आत्मज्ञानलक्षणस्य अश्रद्दधानाः श्रद्दधानाः भक्तियिक्ताः न भवंति ते अश्रद्दधानाः अस्मिन् धर्मे श्रद्धारहिताः पुरुषाः पुरीषवत् शरीरस्थाः मां स्वरूपभूतं वासुदेवं अप्राप्य (किं वक्तव्यं मत्प्राप्ति उपायं अपि अप्राप्य) मृत्युसंसारवर्त्मनि मृत्युयुक्तचासौ संसारश्च मृत्युसंसारः मृत्युसंसार एव वर्त्म मार्गः तस्मिन् निवर्त्तंते नितरां वत्तंते वर्तनं कुर्वंति आत्मानं विस्मृत्य अनेकविधं संसारं अनुभवंति । सर्वदा जननमरणप्रबंधेन नारकीतिर्यगादि योनिषु एव भ्रमंति इति अर्थः ॥ ३ ॥ अर्थ : हे अर्जुना, या आत्मज्ञानरूप धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष मला प्राप्त न होऊन मृत्युयुक्त संसारमार्गांत निवृत्त होतात-संसारमार्गात परत येतात. [ अश्रद्धालु, अनात्मज्ञ, मूढ, ज्ञानप्राप्तीचा उपाय अशी जी भक्ति तिलाही प्राप्त न होतां मृत्युयुक्त संसारमार्गात निश्चयानें फिरत रहातात. या लोकांत अश्रद्धालु पुरुषांच्या या निंदेने या आत्मज्ञानाख्य धर्मा वर श्रद्धा ठेवणाऱ्या तन्निष्ठ पुरुषांना परम पदाची प्राप्ति होते. अशा स्तुतीने अर्जुनाला ज्ञानाभिमुख करून भगवान् यापुढें गुह्य ज्ञानाच्या उपदेशालाच आरंभ करीत आहेत. ] विवरण :
मया ततमिदं सर्वं जगद् अव्यक्तमूर्तिना । अन्वय : मया अव्यक्तमूर्तिना - ज्याचे स्वरूप व्यक्त नाही अशा मी - इदं सर्व जगत् ततं - हे सर्व जगत् व्यापले आहे. - सर्वभूतानि मत्स्थानि - सर्व भूतें माझ्यामध्यें स्थित आहे - च अहं तेषु न अवस्थितः - पण मी त्या भूतांमध्ये अवस्थित नाही. मी त्या भूतांत राहिलेलो नाही. - भूतानि मत्स्थानि न च - सर्व प्राणी वस्तुतः माझ्यामध्यें नाहींत - मे ऐश्वरं योगं पश्य - माझे ईश्वरसंबंधी स्वरूप पहा. - भूतभृत् च भूतस्थः न - मी सर्व भूतांचे धारण-पोषण करणारा आहे, पण भूतांत राहिलेलो नाही. - मम आत्मा भूतभावनः - माझें स्वरूप सर्व भूतांना उत्पन्न करणारे आहे. ४-५
व्याख्या : तदेवं वक्तव्यतया प्रस्तुतस्य ज्ञानस्य स्तुत्या श्रोतारं अभिमुखीकृत्य तदेव ज्ञानं कथयति । मया ततमिति । मया कारण्भूतेन सत्यज्ञानानंतमूर्त्तिना इदं साक्षिप्रत्यक्षं सर्वं दृष्टश्रुतं जगत् गच्छतीति जगत् जंगमधर्मं चराचरविश्वं नश्वरं स्वसत्तास्फुरणाभ्यां ततं व्याप्तम् । अन्यदपि ममैश्वरं श्रृणु । कथंभूतेन मया । अव्यक्तमूर्त्तिना अव्यक्ता अतिंद्रिया मूर्त्तिः स्वरूपं यस्य सः तेन निर्विशेषस्वरूपेण सर्वभूतानि सर्वाणि च तानि भूतानि अव्यक्तादीनि स्थावरांतानि मत्स्थानि मयि कारणभूते तिष्ठंति तानि तथोक्तानि संति । चेत्यपरं अहं तेषु भूतेषु न अवस्थितः न तिष्ठामि असंगत्वात् ॥ ४ ॥ अर्थ : ज्याचे स्वरूप व्यक्त नाहीं, अशा मीं हें सर्व जगत् व्यापले आहे. सर्व भूते माझ्या मध्ये स्थिर आहेत. पण मी त्या भूतांमध्येच अवस्थित नाहीं. सर्व प्राणीही वस्तुतः माझ्यामध्यें नाहींत. माझें ईश्वरसंबंधी स्वरूप पहा. मी सर्व भूतांचें धारण पोपण करणारा आहे, पण भूतांत राहीलेलों नाहीं. माझें स्वरूप सर्व भूतांना उत्पन्न करणारे आहे. [ जो पदार्थ इंद्रियांचा विषय होत नाहीं. त्याला. 'अव्यक्त' म्हणतात. अशा अव्यक्त स्वरूप असलेल्या मीं सर्व जगाला व्यापिलें आहे. सर्व भूते मजमध्ये स्थित आहेत - मी त्यांचा आत्मा आहे व मजमुळे तीं आत्मवान् झालीं आहेत. पण मी असंग असल्यामुळें त्यांच्यामध्यें स्थित नाहीं. ''अहो पण, परमेश्वर जरी सर्व भूतांमध्ये अवस्थित नसला, तरी भूते त्याच्यामध्ये आहेत, तेव्हां त्याला असंगत्व कसें ?'' म्हणून विचारशील तर सांगतों - वस्तुतः भूते माझ्यामध्यें स्थित नाहींत. माझें तात्त्विक स्वरूप पहा. म्हणजे मी भूतांला धारण करणारा आहे, पण भूतांमध्ये स्थित नाहीं, हें तुला कळेल. माझा आत्मा भूतांच्या उत्पत्तीचें निमित्त आहे. ] विवरण :
यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् । अन्वय : यथा सर्वगतः महान् वायुः - ज्याप्रमाणे सर्व जागी जाणारा मोठा वायु - नित्यं आकाशस्थितः - नेहमी आकाशांत असतो - तथा सर्वाणि भूतानि - त्याप्रमाणे सर्व भूतें - मत्स्थानि इति उपधारय - माझ्यामध्यें स्थित आहेत असा निश्चय कर. ६ व्याख्या : यथैव असंगस्वभावे आकाशस्थितः आकाशे स्थितः वायुः वातीति वायुः पवनः नित्यं सर्वदा उत्पत्तिस्थितिसंहारकालेषु सर्वदा चलनस्वभावः अत एव सर्वत्रगः सर्वत्र सर्वस्थलेषु गच्छतीति सर्वत्रगः । सर्वगः अस्तीति शेषः । पुनः कथंभूतः वायुः । महान् महाभूतात्मकः एतादृशोपि वायुः कदाचिदपि आकाशेन सह न संसृज्यते न संगच्छते तथैव असंगस्वभावे मयि संश्लेषं संयोगराहित्येन विना सर्वाणि संपूर्णानि भूतानि आकाशादीनि मत्स्थानि मयि तिष्ठंति तानि मत्स्थानि संति । इति एवं प्रकारेण त्वं उपधारय जानीहि । विचार्य इति शेषः । अधिष्ठानव्यतिरेकेण अध्यस्ताभावात् अनन्यत्वं उक्तम् ॥ ६ ॥ अर्थ : सर्वत्र गमन करणारा व त्यामुळेंच महत्परिमाणाचा वायु सदा-उचत्पत्ति-स्थिति-लयकाली जसा आकाशांत त्याला कोणत्याही प्रकारे संश्लेष न करतां रहातो, त्याप्रमाणें आकाशादि महाभूते आकाशासारख्या पूर्ण असंग प्रत्यगात्म्यामध्ये संश्लेषावाचून स्थित आहेत, असा तूं नि निश्चय कर. विवरण :
सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् । अन्वय : कौन्तेय - हे कुन्तिपुत्रा अर्जुना ! - कल्पक्षये सर्वभूतानि - कल्पाचा क्षय झाला असतां, सर्व भूतें - मामिकां प्रकृतिं यान्ति - माझ्या अपरा प्रकृतीला प्राप्त होतात. - पुनः कल्पादौ - पण पुनः कल्पाच्या आरंभी - अहं तानि विसृजामि - मी त्याच भूतांना उत्पन्न करतो. ७ व्याख्या : हे कौन्तेय ! सर्वभूतानि सर्वाणि च तानि भूतानि च सर्वभूतानि ब्रह्मादिस्तंबप्र्यंतानि कल्पक्षये कल्पस्य क्षयः नाशः तस्मिन् कल्पक्षये प्रलयकाले मामिकां मम इयं मामिका तां मदीयशक्तिरूपां प्रकृतिं प्रकर्षेण कृतिः प्रयत्नविशेषः सर्गादिजननानुकूलसामर्थ्यं यस्याः सा तां प्रकृतिं त्रिगुणात्मिकां मायां स्वकारणभूतां यांति । तत्रैव सूक्ष्मरूपेण लीयंते इत्यर्थः । पुनश्च कल्पादौ कल्पस्य आदिः प्रथमं कल्पादिः तस्मिन् सर्गकाले तत्तत्कर्मसापेक्षः अहं सर्वज्ञः सर्वशक्तिः ईश्वरः तानि सर्वभूतानि विसृजामि विविधं यथा कर्म यथा श्रुतं तथा सृजामि प्रकृतौ अविभागापन्नानि विभागेन व्यनज्मि प्रकटयामि ॥ ७ ॥ अर्थ : हे कुंतीपुत्रा अर्जुना, कल्पाचा क्षय झाला असतां - प्रलय समयीं सर्व भूतें माझ्या अधीन असलेल्या त्रिगुणात्मिका अपर प्रकृतीला प्राप्त होतात आणि पुनः उत्पत्तिकाल प्राप्त होतांच - कलपाच्या आरंभी मी त्यांना उत्पन्न करतो. विवरण :
प्रकृतिं स्वां अवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः । अन्वय : स्वां प्रकृति अवष्टभ्य - आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून - प्रकृतेः वशात् अवशं - स्वभावशात् परतंत्र झालेल्या - इमं कृत्स्नं भूतग्रामं - या सर्व भूतसमूहास - पुनः पुनः विसृजामि - पुनः पुनः मी उत्पन्न करतो. ८ व्याख्या : अहं निमित्त उपादान कारणभूतः स्वां स्वकीयां प्रकृतिं मायाख्यां अनिर्वचनीयां कार्यजननानुकूलशक्तिं अवष्टभ्य पुरस्कृत्य सत्तास्फूर्तिभ्यां दृढीकृत्य इमं प्रत्यक्षदृष्टं कृत्स्नं समग्रं भूतग्रामं भूतानां ग्रामः समुदायः तं भूतग्रामं प्रलये लीनं चतुर्विधं भूतसमुदायं कर्मादिपरवशं पुनः पुनः तत्तत्सर्गकाले विसृजामि विशेषेण विविधप्रकारेण निर्माणं करोमि । स्वसत्तारूपां प्रकृतिं कारणत्वेन पुरस्कृत्य स्वरूपेण निमित्तोहं भूतग्रामं विसृजामीत्यर्थः । कथंभूतं भूतग्रामम् । प्रकृतेः प्राचीनकर्मसंस्कारस्य वशात् तद्वशवर्तित्वात् अवशं अस्वाधीनं प्राचीनकर्मसंस्काराधीनम् ॥ ८ ॥ अर्थ : आपल्या अविद्यारूप प्रकृतीला स्वाधीन करून स्वभाववशात् परतंत्र झालेल्या या सर्व वर्तमानकालीन् भूतसमूहास मीं पुनः पुनः उत्पन्न करतो. [ अर्थात हा संसार अनादि आहे. स्वभाववशात् अविद्या, अस्मिता, इत्यादि दोषांनी त्या भूतसमुदायाला अस्वतंत्र केलें आहे. ] विवरण : ''तर मग उत्तम-अधम, सुखी-दुःखी, श्रीमान्-दरिद्री इत्यादि विषम भूतसमुदायाला उत्पन्न करणार्या त्या तुज ईश्वराचा त्यापासून उद्भवणाऱ्या धर्माधर्माशीं संबंध होईल -तूं तन्निमित्त धर्माधर्माने लिप्त होशील'' असें जर म्हणशील तर सांगतो - ''तर मग उत्तम-अधम, सुखी-दुःखी, श्रीमान्-दरिद्री इत्यादि विषम भूतसमुदायाला उत्पन्न करणार्या त्या तुज ईश्वराचा त्यापासून उद्भवणाऱ्या धर्माधर्माशीं संबंध होईल -तूं तन्निमित्त धर्माधर्माने लिप्त होशील'' असें जर म्हणशील तर सांगतो -
न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय । अन्वय : च धनंजय - आणि हे अर्जुना ! - तानि कर्माणि - ती कर्मे - उदासीनवत् आसीनं - उदासीनाप्रमाणे असणार्या - तेषु कर्मसु असक्तं - त्या कर्माच्या फलाची इच्छा न ठेवणार्या - मां न निबध्नन्ति - मला बद्ध करीत नाहीत. ९ व्याख्या : हे धनंजय ! धनंजयतीति धनंजयः तत्संबुद्धौ हे धनंजय ! युधिष्ठिरराजसूयार्थं सर्वान् राज्ञः जित्वा धनं आहृतवान् इति महान् प्रभावः सूचितः । तानि सृष्ट्यादीनि कर्माणि कर्तव्यानि मां सर्वातीतं सर्वकारणं न निबध्नंति बंधनं नापादयंति । यथा राजामात्यादिवासनानुसारेण इंद्रजालदीनि स्वनिर्मातारं न निबध्नंति तद्वत् । कथंभूतम् माम् । उदासीनवत् उदासीनेन तुल्यं उदीसीनवत् उदासीनमिव आसीनं स्थितम् । पुनः कथंभूतम् माम् । तेषु प्रसिद्धेषु कर्मसु सृष्ट्यादिकार्येषु असक्तं अहं करोमि इति अभिमानलक्षणेन संगेन रहितम् । यथागृही गृहं प्राप्तं अतिथिकर्मादीनि स्वनिमित्तानि प्राप्तानि आतिथ्यादि गृहकार्याणि न निबध्नंति तद्वत् । जीवस्तु साहंकारेण करोति तेन तस्य बंधः मम अत्र निरहंकारत्वात् कर्मबंधो नास्ति इति ज्ञेयम् ॥ ९ ॥ अर्थ : धनंजया, विषम सृष्टि उत्पन्न केल्यामुळें उद्भवणारी शुभाशुभ कर्में मज ईश्वला बद्ध करीत नाहींत. कारण मला कर्तृत्वाभिमान नसतो व फलासक्तिही असते. तर तीं कर्मे करीत असतांनाही मी उदासीनाप्रमाणे राहतो. [ मजप्रमाणेंच दुसराही जो कोणी आसक्तिरहित असतो, तोही तसाच कर्मांनी बद्ध होत नाहीं. अध्याय ४-१४ पहा.) विवरण :
'मी या भूतसमूहास उत्पन्न करतो' व 'उदासीनाप्रमाणे असणाऱ्या मला तीं कर्मे बद्ध करीत नाहींत' हे म्हणणे विरुद्ध आहे. असें कोणी समजेल म्हणून भगवान् म्हणतात-
मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् । अन्वय : मया अध्यक्षेण - केवल ज्ञानस्वरूप अशा मज अध्यक्षामुळे, माझ्या निमित्ताने - प्रकृतिः - माझी त्रिगुणात्मक माया - सचराचरं सूयते - सचराचर जगाला उत्पन्न करते - कौन्तेय - हे कुन्तिपुत्रा - अनेन हेतुना जगत् विपरिवर्तते - या अध्यक्षत्वाच्या निमित्ताने सर्व सृष्टि प्रवृत्त होते. १० व्याख्या : मया सर्वतः दृश्यमात्रस्वरूपेण अध्यक्षेण अधिष्ठात्रा निमित्तेन प्रकृतिः मदीया माया त्रिगुणात्मिका सचराचरं चराचराभ्यां सहितं सचराचरं स्थावरजंगमं विश्वं सूयते जनयति । हे कौंतेय ! हेतुना निमित्तेन अनेन अध्यक्षत्वेन जगत् स्थावरजंगमात्मकं विश्वं विपरिवर्तते विविधाकारेण देवमनुष्यतिर्यगादिरूपेण प्रतिकल्पं आवर्तते जन्ममरणे अनुभवति ॥ १० ॥ अर्थ : केवल ज्ञानस्वरूप अशा मज अध्यक्षामुळें माझी त्रिगुणात्मिका माया सचराचर जगाला उत्पन्न करते. हे कुंतीपुत्रा, या अध्यक्षत्वाच्या निमित्तानेंच सर्व सृष्टि पुनः पुनः प्रवृत्त होते. [ केवल ज्ञानस्वरूप व अविक्रिय आत्मा अशा मज अध्यक्षाच्या सत्तेने माझी अविद्यारूप प्रकृति जगाला प्रसवते. माझ्या अध्यक्षत्वामुळेंच हे सर्व व्यक्ताव्यक्त रूप जगत् सृष्टि-स्थिति व संहार या अवस्थांमध्ये विशेष प्रकारे परिवर्तन पावत असतें. ] विवरण :
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् । अन्वय : मूढाः मम भूतमहेश्वरं परं भावं - अविवेकी लोक माझ्या सर्व भूतांचा महान् ईश्चर अशा श्रेष्ठ भावास - अजानन्तः - न जाणणारे असे होऊन - मानुषीं तनुं आश्रितं मां अवजानन्ति - मनुष्याची अनु धारण केलेल्या मला तुच्छ लेखतात, माझी अवज्ञा करतात. ११ व्याख्या : मूढाः अविवेकिनः मूर्खाः जनाः मां परमात्मानं अपरिच्छिन्नं अवजानंति अवमन्यंते साक्षात् ईश्वरोयं इति नाद्रियंते । किंतु निंदंति । कथंभूतम् माम् । मानुषीं मनुष्यस्य इयं मानुषी तां तनुं शरीरं आश्रितं अधिष्ठितम् । अयं मनुष्यः इति भ्रांत्या आच्छादितांतःकरणाः मम सत्यज्ञानानंतादि लक्षणस्य परं सर्वोत्कृष्टं भावं पारमार्थिकं तत्त्वं सत्तां अजानंतः सतः अवजानंतः संतः मां परमात्मानं नाद्रियंते निंदंति । कथंभूतम् भावम् । भूतमहेश्वरं महांश्चासौ ईश्वरस्य महेश्वरः भूतानां आकाशादीनां महेश्वरः तं कारणम् ॥ ११ ॥ अर्थ : माझ्या अत्यंत श्रेष्ठ भावास - परमतत्वास - सर्व भूतांच्या महेश्वरास म्ह० स्वात्म्याला न जाणणारे, अविवेकी मनुष्याची तनु धारण करणाऱ्या मला तुच्छ लेखतात व माझी अवज्ञा करतात. मनुष्यशरीरानें व्यवहार करीत असलेल्या भगवानांचा अनादर करणें किंवा निंदा करणें, हेंच अवज्ञान; वारंवार भगवन्निंदा किंवा भगवदअनादर केल्यामुळें त्यांना मोठे पाप लागते व त्या पापाच्या प्रभावाने त्यांच्या बुद्धि प्रतिबद्ध होतात. ] विवरण :
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः । अन्वय : मोघाशाः मोघकर्माणः - त्यांच्या सर्व आशा व्यर्थ होतात, त्यांचे सर्व कर्मेंही व्यर्थ होतात - मोघज्ञाजाः विचेतसः - त्याचें ज्ञानही निष्फल असते, ते विवेकशून होतात - च एव राक्षसीं आसुरीं - राक्षसांच्या व असुरांच्या - मोहिनीं प्रकृतिं श्रिताः - मोह पाडणार्या प्रकृतीचा आश्रय केलेले असतात. १२ व्याख्या : कथंभूताः मूढाः । मोघाशाः सर्वरूपं मां अवज्ञाय मत्तः अन्यं देवतांतरं मह्यं ईप्सितं फलं दास्यति इति मोघाः निष्फलाः आशाः येषां ते मोघाशाः अत एव मां अंतर्यामिणं विस्मृत्य साहंकारेण मोघकर्माणः मोघानि संसारारंभकत्वात् निष्फलानि कर्माणि नित्यनैमित्तिकादीनि येषां ते मोघकर्माणः अत एव मोघज्ञानाः एकमेवाद्वितीयं ब्रह्म इति एकत्वज्ञानं अनादृत्य मोघं निष्फलं ज्ञानं नानाकुतर्काश्रितं शास्त्रज्ञानं येषां ते मोघज्ञानाः अत एव विचेतसः सात्विकज्ञान शून्यत्वात् विक्षिप्तचित्ताः पिशाचतुल्या इत्यर्थः । अत एव राक्षसीं राक्षसानां देहाहंकारेण स्वात्मानं तिरस्कुर्वतां इयं राक्षसी तां तामसीं हिंसाप्रचुरां चेति अपरं आसुरीं असुराणां शरीरमेव स्वीकृत्य नानाविषयैः तल्लालनं कुर्वतां इयं आसुरी तां कामदर्पादिबहुलां चेत्यपरं मोहिनीं मोहानां आत्मपर विवेकभावशून्यानां इयं मोहिनी तां कुंभकर्णनिद्रातुल्यां केवलां तामसीं बुद्धिभ्रंशकरीं प्रकृतिं स्वभावं श्रिताः आश्रित्य स्थिताः । 'त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः । कामः क्रोधस्तथा लोभः; इत्युक्त नरकद्वारभागितया नरकयातनामेव सततं अनुभवंतीति अर्थः । तेषां जीवितेन सर्वोपि व्यवहारः निष्फल इति भावः ॥ १२ ॥ अर्थ : त्यांच्या सर्व आशा व्यर्थ होतात. त्यांची सर्व कर्मेंही व्यर्थ होतात. त्यांचे ज्ञानही निष्फल असतें. ते विवेकशून्य होतात आणि ते राक्षसांच्या व असुरांच्या मोह पाडणाऱ्या प्रकृतीचा आश्रय केलेले असतात. [ ईश्वराची निंदा व भगवद्द्रोह करणाऱ्या त्यांची कोणतीही इच्छा नित्य फल देण्यास समर्थ होत नाहीं - त्यांची नित्य नैमित्तिक कर्मेही निष्फल होतात. शास्त्रार्थ ज्ञानही फुकट जातें. त्यांच्या ठिकाणी विवेकाचाही अभाव असतो. भगवानाचा तिरस्कार किंवा अनादर करणार्या मानवांच्या इच्छाही फुकट जातात. इतकेंच नव्हे तर, मरणोत्तर त्यांना अतिशय क्रूर योनि प्राप्त होते. ] विवरण : पुण्यवान् महात्मेच मला भजतात, असें सांगून त्यांच्या भजनाचा प्रकार.
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः । अन्वय : ततु पार्थ - पण हे अर्जुना ! - दैवीं प्रकृतिं आश्रिताः - दैवी प्रकृतीचा अश्रय केलेले - महात्मानः मां अव्ययं भूतादिं - महात्मे मला नित्य, भूतांचे कारण - ज्ञात्वा अनन्यचेतसः भजन्ति - जाणून अनन्यचित्त होऊन भजतात. १३ व्याख्या : हे पार्थ ! महात्मानः महति अपरिच्छिन्ने मयि आत्मा चित्तं येषां ते महात्मानः अथवा महान् अनेकजन्मसु कृतसुकृतैः संस्कृतः आत्मा चित्तं येषां ते महात्मानः अक्षुद्रचित्ताः अनन्यमनसः संतः मद्व्यतिरेकेण न अन्यस्मिन् मनो येषां ते अनन्यमनसः भूतादिं सर्व जगत्कारणं अव्ययं अविनाशिनं मां ईश्वरं ज्ञात्वा साक्षात्कृत्य भजंति सेवंते । आत्मना सह सर्वं वासुदेव इति उपासंत इत्यर्थः । कथंभूताः महात्मानः । दैवीं देवस्य स्वयंप्रकाशस्य विष्णोः इयं दैवी तां दैवीं प्राप्त्युपायभूतां प्रकृतिं स्वभावं आश्रिता अधिष्ठिताः ॥ १३ ॥ अर्थ : पण हे पार्था, शम, दया, श्रद्धा इत्यादि दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे मी 'भूतांचें नित्य कारण आहें,' असें जाणून व अनन्यचित्त होऊन मला भजतात. ह[ पूर्वोक्त आसुरी प्रकृतीच्या लोकाहून दैवी प्रकृतीचे महात्मे आकाशादि भूतांचा व भौतिक प्राण्यांचा आदि-कारण व अविनाशी अशा मला जाणून माझें भजन करतात. ] विवरण :
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः । अन्वय : सततं मां कीर्तयन्तः - अहोरात्र माझें कीर्तन-नामस्मरण करणारे - च यतन्तः - आणि इंद्रियनिग्रह, शम-दम इत्यादि धर्मांनी यत्न करणारे - दृढव्रताः - ज्यांचे अचांचल्य हेच व्रत आहे, किंवा ज्यांचे ब्रह्मचर्यादि व शमादि व्रत दृढ आहे ते दृढव्रत - च मां नमस्यन्तः - आणि मला नमस्कार करणारे - भक्त्या नित्ययुक्ताः उपासते - परमप्रेमानें नित्ययुक्त होऊन उपासना करतात. १४ व्याख्या : केचन सततं निरंतरं मां सर्वात्मानं कीर्तयंतः संतः कीर्तयंति ते कीर्तयंतः यथा घटकुंडलादीनां मृत्सुवर्णादिवत् सर्वं ब्रह्मादिस्तंबपर्यंतं अंतर्बहिर्व्याप्य श्रीभगवान् नारायणः वासुदेवः परमात्मा व्यवस्थितः इति कीर्तनं कुर्वन्तः संतः उपासते भजंति । अपरे मां सर्वात्मकं शास्त्रेण ज्ञात्वा साक्षात्कारायैव यतंतः संतः यतंति ते यतंतः प्रयत्नं कुर्वंतः संतः भजंति । किंच केचन दृढव्रताः संतः दृढं सर्वात्मको वासुदेव इति यथाश्रुतमेव दृढं व्रतं मानसनियमो येषां ते दृढव्रताः उपासते । किंच केचन मां हृदयस्थं अनुभूय भक्त्या साधनभक्तिसंस्कारप्रेम्णा नमस्यंतः संतः नमस्यंति ते नमस्यंतः यथा उच्चैः पतितं जलं निम्नप्रदेशं लुंठति यथा सफलवृक्षः मूलपर्यंतं नम्रो भवति तथा सर्वभूतानि नमस्कुर्वंतः संतः उपासते भजंति । अन्ये नित्ययुक्ताः संतः नित्ये नित्यस्वरूपे युक्ताः नित्ययुक्ताः द्वैतप्रत्ययतिरस्कारेण अद्वैतप्रत्ययस्वीकारेण समाहिताः भूत्वा उपासते भजंति ॥ १४ ॥ अर्थ : अहोरात्र माझें कीर्तन-नामस्मरण, वेदान्तश्रवण, प्रणव जप करणारे आणि इंद्रियनिग्रह शम, दम, दया, अहिंसा इत्यादि धर्माने यत्न करणारे, ज्यांचे ब्रह्मचर्यादि, नियतव्रत अचल आहे आणि परम प्रेमाने मलाच नमस्कार करणारे माझे भक्त नित्य समाहित होऊन माझेंच चिंतन करतात. [ या लोकांत पूर्वोक्त श्लोकांत वर्णिलेला भजनाचा प्रकारच सांगितला आहे. ] विवरण :
ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मां उपासते । अन्वय : च अपि अन्ये - पण कांही उत्तम अधिकारी - ज्ञानयज्ञेन यजन्तः - भगवन्ताविषयीचे ज्ञान हाच यज्ञ त्याने पूजा करणारे - मां एकत्वेन उपासते - मला एकच परब्रह्म आहे अशा ज्ञानाने उपासतात. - पृथक्त्वेन - कोणी सूर्य, चंद्र इत्यादि भेदाने माझी उपासना करतात - विश्वतोमुखं - व कोणी तोच भगवान सर्वतोमुख आहे, विश्वरूप आहे, असे समजून त्या विश्वरूपाला - बहुधा - अनेक प्रकारांनी उपासतात. १५ व्याख्या : किंच अन्ये ज्ञाननिष्ठाः ज्ञानयज्ञेन ज्ञानमेव यज्ञः ज्ञानयज्ञः तेन ज्ञानयज्ञेन वासुदेवः सर्वमिति सर्वात्मत्व दर्शनज्ञानेन मां सर्वांतयामिणं यजंत संतः यजंति ते यजंतः उपासते भजंति । यथा यज्ञपुरुषे हविरादिहुतं सत् तद्रूपमेव भवति तथा ज्ञानरूपे मयि सर्वं दृश्यजातं अंतर्भावितं सत् मद्रूपं भवति । केचन एकत्वेन गुरुमुखात् तत्त्वमस्यादि वाक्यश्रवणानंतरं वाक्यार्थज्ञानेन उपासते उप सामीप्येन आसते आसनं कुर्वंति । तद्रूपेण तिष्ठंतीत्यर्थः । केचित् असंभावना विपरीतभावनाभ्यां मध्यमप्रज्ञाः पृथक्त्वेन ब्रह्माहमस्मीति उपासते उपासनं कुर्वंति । अन्ये बहुधा बहुप्रकारेण विश्वतोमुखं सर्वतोमुखं सर्वरूपं मां उपासते । भावयंति इत्यर्थः ॥ १५ ॥ अर्थ : कांहीं उत्तम अधिकारी भगवानाविषयींचें ज्ञान-हाच यज्ञ, त्यानें मला एकच परब्रह्म आहे, अशा ज्ञानानें उपासितात. कोणी-मध्यम अधिकारी सूर्य, चंद्र इत्यादि भेदाने माझी उपासना करतात आणि कित्येक सामान्य अधिकारी तोच भगवान् सर्वतोमुख-विश्वरूप आहे, असें समजून त्या विश्वरूपाला अनेक प्रकारे उपासितात. [ परमार्थदर्शन हाच येथील ज्ञानयज्ञ आहे. उत्तम अधिकारी ज्ञाननिष्ठ दुसऱ्या उपासनेचा परित्याग करून एकच परब्रह्म आहे, अशा परमार्थ ज्ञानाने माझी उपासना करतात. मध्यम अधिकारी तोच भगवान् विष्णु, आदित्य इत्यादि रूपाने अवस्थित आहे, अशी भेदोपासना करतात व अधम अधिकारी तोच सर्वरूपानें अवस्थित आहे, असे जाणून बहुप्रकारे त्याची उपासना करतात. ] विवरण : भगवानाचे सर्वात्मकत्व.
अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहं अहमौषधम् । अन्वय : अहः क्रतुः - की क्रतु - यज्ञ म्हणजे एक प्रकारचे वेदोक्त कर्म आहे - अहं यज्ञः - मी वैश्वदेवादि स्मार्त कर्म आहे - अहं स्वधा - मी पितरांना दिलेले अन्न आहे - अहं औषधं - मी तांदुळ, गहू इत्यादि धान्य ज्यांपासून होते त्या औषधि आहे - मन्त्रः अहं - मी मंत्र आहे - अहं एव आज्यं - मीच आज्य म्ह० घृतादि हवि आहे - अहं अग्निः - मीच अग्नि आहे - अहं हुतं - मीच हवनकर्म आहे. १६ व्याख्या : उक्तं विश्वतोमुखत्वं स्पष्टयति अहमिति चतुर्भिः । अहं वासुदेवः क्रतुः श्रौतोग्निष्टोमादिः । अस्मि इति शेषः । इति केचन भावयंति इति सर्वत्रानुषंगः । अहं वासुदेवः यज्ञः स्मार्तः पंचयज्ञादिः यद्वा क्रतुः सयूपः यज्ञः अयूपः अहं वासुदेवः स्वधा पितॄनुद्दिश्य श्राद्धादिः अस्मि । अहं वासुदेवः औषधं व्रीहियवादिप्रभवं अन्नं अस्मि । अहं वासुदेवः मंत्रः कर्मोपयुक्तः याज्या पुरोनुवाक्यादिः अस्मि । अहमेव आज्यं होमसाधनं अस्मि । अहं अग्निः हवनीयादिः होमाधिकरणं अस्मि । अहं वासुदेवः हुतं आज्यादिहोमः अस्मि । एतत्सर्वं अहमेवेत्यर्थः । क्रियाकारकं फलजातं किमपि भगवदतिरिक्तं नास्ति ॥ १६ ॥ अर्थ : 'पण बहुप्रकारांनी केलेली उपासना तुझीच उपासना कशी होते ?' म्हणून विचारशील तर सांगतो - मी क्रतु श्रौतकर्माचा एक प्रकार आहे. स्मार्त यज्ञ मीच आहे. तसेंच स्वधा-पितरांना जें दिलें जातें, तें अन्न मी आहे, मीच औषध आहे. ज्या मंत्राने पितरांना व देवतांना हवि दिला जातो, तो मंत्र मीच आहे. मीच आज्य-हवि आहें. ज्यात होम केला जातो, तो अग्नि मीच आणि मीच हूत-हवनकर्म आहे [ क्रियाकारकफलजात भगवानाहून भिन्न नाहीं. हा या सर्व श्लोकाचा भावार्थ आहे. ] विवरण :
पिताहं अस्य जगतो माता धाता पितामहः । अन्वय : अहं अस्य जगतः - मी या जगाचा - पिता, माता, धाता - जनक आहे, जननी आहे, प्राण्यांना कर्मफल देणारा आहे - पितामहः - पित्याचा पिता आहे - वेद्यं - ब्रह्मादि ज्ञेय वस्तु मी आहे - पवित्रं - पावन करणारे यज्ञ-यागादि पुण्यकर्म मी आहे - ओंकार - प्रणव मी आहे - ऋक् साम च यजुः एव - ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद मी आहे. १७ व्याख्या : अस्य विद्यमानस्य जगतः विश्वस्य अहं वासुदेवः पिता जनकः अस्मि । अहं माता जननी च अस्मि । अहं धाता कर्मफलनिर्माता पोषयिता वा अस्मि । अहं पितामहः पितुः पिता अस्मि । अहं वेद्यं वेदितुं ज्ञातुं योग्यं वेद्यं ज्ञेयमात्रं अस्मि । अहं पवित्रं पूयते अनेनेति पवित्रं पावनं शुद्धिहेतुर्गंगास्नानं गायत्रीजपादि अस्मि । अहं ॐकारः प्रणवः वेदमूलं अस्मि । अहं वासुदेवः ऋक् ऋग्वेदः देत्यपरं सामवेदः च यजुः यजुर्वेदः एवकारात् अथर्वांगिरसोपि गृह्यंते अहं सर्वमस्मि ॥ १७ ॥ अर्थ : मी या जगाचा जनक आहे. जननी आहे. प्राण्यांना कर्मफल देणारा धाता आहें. पित्याचा पिता आहे. ब्रह्मादि ज्ञेय वस्तु मी आहे. पावन करणारे यक्ष-यागादि पुण्यकर्म मी आहें. प्रणव मी आहे. ऋग्वेद सामवेद व यजुर्वेद मी आहे. [ अर्थात् भगवान् सर्वात्मक आहे, असें यावरून अनुमान करावें ] विवरण :
गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् । अन्वय : गतिः - कर्माचे फल मी आहे - भर्ता - कर्मफल देऊन पोषण करणारा मी आहे - प्रभुः - सर्वांची स्वामी मी आहे - साक्षी - प्राण्यांनी केलेले व न केलेले पुण्यपापादि पाहणारा मी आहे - निवासः - सर्व प्राण्यांचे निवासस्थान मी आहे - शरणं - रोगादिकांच्या योगाने आर्त होऊन शरण आलेल्या भक्तांची पीडा नाहीशी करणारा मी आहे - सुहृद् - उलट उपकाराची अपेक्षा न करता उपकार करणारा मी आहे - प्रभवः - जगाचा उत्पादक - प्रलयः - जगाचा संहार करणारा - स्थानं - जगाची स्थिति करणारा - निधानं - कर्मफलांचा निधि - अव्ययं बीजं - व जगाचे अक्ष बीज मी आहे. १८ व्याख्या : अहं गतिः गम्यते प्राप्यते इति गतिः फलं अस्मि । अहं भर्ता पालयिता अस्मि । अहं प्रभुः स्वामी मदीयः अयं इति स्वीकर्ता । अहं साक्षी सर्वशुभाशुभद्रष्टा । अहं निवासः निवसंति यस्मिन्निति निवासः प्राणिनां भोगस्थानम् । अहं शरणं शीर्यते क्षीयते दुःखमस्मिन्निति शरणं प्रपन्नर्तिहृत् सुहृत् प्रत्युपकारानपेक्षः सन् उपकारी अहं । प्रभवः प्रकर्षेण भवति यस्मादिति प्रभवः चराचरस्रष्टा । अहं प्रलयः प्रकर्षेण लीयंते अनेनेति प्रलयः संहर्ता । अहं स्थानं तिष्ठति अस्मिन्निति स्थानं स्थितिः । अहं निधानं निधीयते यस्मिन्निति निधानं प्रलयस्थानम् । अहं बीजं चराचरणकारणम् । अहं अव्ययं व्यवरहितम् । अविनाशीत्यर्थः ॥ १८ ॥ अर्थ : गति-कर्माचें फल मी आहे. कर्मफल देऊन पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, प्राण्यांनीं केलेले व न केले पुण्य-पापादि पहाणारा, सर्व भूतांचे निवासस्थान, रोगादिकांच्या योगाने आर्त होऊन शरण आलेल्या भक्तांची पीडा नाहींशी करणारा, प्रत्युपकाराची अपेक्षा न करतां उपकार करणारा मी आहें. जगाचा उत्पादक, त्याचा संहार करणारा व स्थिति करणारा, कर्मफलांचा निधि व जगाचे अक्षय बीज मी आहे. विवरण :
तपाम्यहमहं वर्षं निगृह्णामि उत्सृजामि च । अन्वय : अहं तपामि - मी सूर्यरूपानें ताप देतो, तापतो - अहं वर्षं निगृह्णामि - मी पावसाचा निग्रह करतो - च उत्सृजामि - व मी वृष्टी म्ह० पाऊस पाडतो. - अर्जुन - हे अर्जुना, - अमृतं च एव मृत्युः - देवांचे अमृत व मर्त्याचा मृत्यू मी आहे - च सत् च असत् - आणि कार्य म्ह० नामरूपांनी व्यक्त होणारे सर्व व कारण म्ह० नामरूपांनी व्यक्त न होणारे मी आहे. १९ व्याख्या : किंच हे अर्जुन ! अहं तपामि ग्रीष्मकाले सूर्यात्मना जगतः संतापं करोमि । अहं वर्षं वृष्टिं निगृह्णामि आकर्षामि । कदाचित्तु अहं वर्षं वृष्टिं उत्सृजामि विमुंचामि । किंच अहं अमृतं देवानां सर्वप्राणिनां जीवनं चेत्यपरं अहं मृत्युः मर्त्यानां सर्वप्राणिनां विनाशः अस्मि च अहं सत् स्थूलं दृश्यं कार्यजातं असत् सूक्ष्मं अदृश्यं कारणं अस्मि । एतत् सर्वं अहमेव इति मत्वा मामेव बहुधा उपासते ॥ १९ ॥ अर्थ : मी सूर्यरूपानें ताप देतो; वृष्टीचा निग्रह व उत्सर्ग मीच करतो. अर्जुना, मीच देवांचे अमृत व मर्त्यांचा मृत्यु आहे. तसेंच सत्-कार्य-नामरूपांनी व्यक्त होणारें सर्व आणि असत्-कारण-नामरूपांनी व्यक्त न होणारे सर्व मी आहे. [ भगवान् जर अत्यंत असत् असता तर कार्य-कारणांची कल्पनाच झाली नसती. कारण कोणतीही कल्पना अधिष्ठानावांचून होऊं शकत नाहीं. त्याचप्रमाणें कार्याचे सत्व व कारणाचे असत्त्व मानतां येत नाहीं. असो. या वर सांगितलेल्या ज्ञानयज्ञांनी भगवत्सेवा करणारांना सद्योमुक्ति किंवा क्रममुक्ति हे फल मिळते. ] विवरण : केवल कर्मठांची निंदा.
त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा अन्वय : त्रैविद्याः - ऋग्वेद, सामवेद व यजुर्वेद या तीन वेदांचे अध्ययन करणारे, त्यांत सांगितलेली कर्में करणारे - सोमपाः पूतपापाः - सोमपान करणारे व त्यामुळे निष्पाप झालेले - मां यज्ञैः दृष्ट्वा - मला, माझी यज्ञांच्या योगाने पूजा करून - स्वर्गतिं प्रार्थयन्ते - स्वर्गगतीची प्रार्थना करतात. - ते पुण्यं सुरेन्द्रलोकं आसाध्य - ते त्रैविद्य पवित्र इंद्रलोकास प्राप्त होऊन - दिवि दिव्यान् देवभोगान् अश्नन्ति - स्वर्गांत, अलौकिक देवभोगांस उपभोगतात. २० व्याख्या : एकत्वेन वा पृथ्क्त्वेन ये पुरुषाः मां परमेश्वरं श्रीवासुदेवं न भजंति तेषां पुरुषाणां पुनः पुनः जन्ममरणप्रवाहः भवति इति आह द्वाभ्याम् । तिस्रः विद्याः ऋग्यजुःसामलक्षणा विद्याः येषां ते त्रिविधाः त्रिविद्या एव त्रैविद्याः अथवा तिस्रः विद्याः अधीयते जानंति ते त्रैविद्याः । वेदत्रयोक्तकर्मतत्परा इत्यर्थः । इंद्रादिरूपेण मां वासुदेवं अवजानंतः संतः अवजानंति अपमानयंति ते अवजानंतः अज्ञानेन देवतांतरोद्देशेन मामेव यज्ञैः वेदत्रयविहितैः यज्ञैः इष्ट्वा पूजयित्वा स्वर्गतिं स्वर्गस्य गतिः फलं स्वर्गतिः तां अंतवत् स्वर्गफलं प्रार्थयंते इच्छंति । कथंभूताः त्रिविद्याः । सोमपाः सोमं यज्ञं संपाद्य तच्छेषं सोमं पिबंति ते सोमपाः अत एव पूतपापाः तेनैव सोमपानेन पूतं पापं येषां ते पूतपापाः शोधितैकमनसः । ते त्रैविद्याः पुण्यं पुण्यफलसाध्यं सुरेंद्रलोकं सुराणां देवानां इंद्रः सुरेंद्रः तस्य इंद्रस्य लोकः तं सुरेंद्रलोकं इंद्रलोकं आसाद्य प्राप्य दिवि स्वर्गलोके देवभोगान् देवानां भोगाः देवभोगाः तान् देवभोगान् अश्नंति भुंजंति । कथंभूतान् देवभोगान् । दिव्यान् दिवि स्वर्गलोके भवाः दिव्याः तान् ॥ २० ॥ अर्थ : पण याच्या उलट ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद यांचे अध्ययन करणारे, त्यांत सांगितलेलीं कर्मे करणारे, सोमपान करणारे, जे विषयेच्छु अज्ञ, ते यज्ञांच्या योगानें माझी पूजा करून स्वर्गगतीची प्रार्थना करतात. त्यामुळे ते त्रैविद्य पवित्र इंद्रलोकास प्राप्त होऊन स्वर्गातील अलौकिक देवभोगास उपभोगतात. [ सकाम पुरुष यज्ञादि कर्माच्या योगाने स्वर्गास प्राप्त होऊन तेथील विपयोपभोग घेतात. ] विवरण :
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं अन्वय : ते तं विशालं स्वर्गलोकं भुक्त्वा - ते सर्व वैदिक कर्मी त्या विस्तीर्ण स्वर्गलोकास भोगून - पुण्ये क्षीणे - पुण्य क्षीण झाले असतां - मर्त्यलोकं विशन्ति - मर्त्यलोकांत शिरतात. - एवं त्रैधर्म्यं अनुप्रपन्नाः - या प्रमाणे वैदिक कर्ममार्गास अनुसरणारे - कामकामाः - विषयांची कामना करणारे सकाम पुरुष - गतागतं लभन्ते - ये-जा या अवस्थेस प्राप्त होतात. २१ व्याख्या : ते वेदत्रयविहितकर्मपराः इंद्रादिदेवतायाजकाः तं प्रसिद्धं स्वर्गलोकं तत्रत्यं दिव्यभोगजन्यं सुखं भुंक्त्वा अनुभूय पुण्ये पुण्यकर्मणि क्षीणे सति नश्यति सति स्वर्गलोकात् च्युताः संतः भ्रष्टाः संतः मर्त्यलोकं मर्त्यानां मनुष्याणां लोकः तं मर्त्यलोकं भूप्रदेशं विशंति प्रविशंति । एवं पुनरपि पूर्वसंस्कारयोगेन ते इंद्रादिदेवतायाजकाः त्रयीधर्मं वेदत्रयीविहितं कर्म अनुप्रपन्नाः संतः अनुयुक्ताः संतः गतागतं यातायातं वारंवारं स्वर्गं गत्वा पुनः मर्त्यलोकं प्रत्यागमनं लभंते प्राप्नुवंति । कथंभूताः ते । कामकामाः कामान् दिव्यभोगान् कामयंते प्रार्थयंति ते कामकामाः । कथंभूतं स्वर्गलोकम् । विशालं विपुलं मामेव देवतारूपिणं संतं विस्मृत्य तुच्छफलाशया देवतांतरं परमार्थं उद्दिश्य इष्ट्वा गमनागमनाभ्यां क्लिश्यंति न तु मां प्राप्नुवंति हा कष्टं इति भगवान् आक्रोशति ॥ २१ ॥ अर्थ : ते सर्व वैदिक कर्मी त्या विस्तीर्ण स्वर्गलोकास भोगून पुण्य क्षीण झालें असतां मर्त्यलोकांत प्रवेश करतात. याप्रमाणे वैदिक कर्ममार्गास अनुसरणारे, विषयांची इच्छा करणारे सकाम पुरुष 'जा व ये' या अवस्थेस प्राप्त होतात. विवरण : अनन्यभक्तांचा योग-क्षेम वाहण्याची प्रतिज्ञा. पण त्याच्या उलट जे निष्काम सम्यग्दर्शननिष्ठ असतात, त्यांचा योगक्षेम कसा चालतो तेंच सांगतो-
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । अन्वय : अनन्याः चिन्तयन्तः - परम देव जो नारायण, त्याच्याशी एकरूप होऊन चिंतन करणारे - ये जनाः मां पर्युपासते - जे लोक मला सर्व र्पकार उपासतात - तेषां नित्यभियुक्तानां - त्या सतत ध्यान करीत असलेल्या विरक्तांचा - योगक्षेमं अहं वहामि - योगक्षेम मी वाहतो. २२ व्याख्या : मद्भक्तास्तु मयि अनन्यत्वेन वर्तमानाः संतः प्रयासं विना अभ्युदयं चपरं निःश्रेयसं फलं प्राप्नुवंति इति आह । ये पुण्यकर्माणः जनाः सफलजन्मानः अनन्याः संतः नास्ति अन्यं मद्व्यतिरिक्तं देवतांतरं येषां ते अनन्याः मां सर्वाधिष्ठानं वासुदेवं पर्युपासते परि आसमंतात् सर्वांतर्यामिणं उपासते सेवंते । अहं वासुदेवः तेषां सफलजन्मनां नित्याभियुक्तानां नित्यं सर्वकालं अभियुक्ताः मदेकनिष्ठाः तेषां नित्याभियुक्तानां सर्वदा मच्चित्तानां योगक्षेमं योगश्च क्षेमं च योगक्षेमे योगक्षेमयोः समाहारः योगक्षेमं योगः अभ्युदयः क्षेमं निःश्रेयसं मोक्षरूपम् । यद्वा योगः अप्राप्तप्राप्तिः क्षेमं प्राप्तपरिपालनं तदुभयं तेषां अहं वहामि प्रापयामि । कथंभूताः जनाः । मां वासुदेवं चिंतयंतः चिंतयंति ते चिंतयंतः सर्वकालं मत्स्मरणं कुर्वंतः तैः अप्रार्थितमपि सर्वं ऐहामुष्मिकं संपाद्य । संरक्षामीत्यर्थः ॥ २२ ॥ अर्थ : परम देव जो मी नारायण त्याच्याशी एकरूप होऊन चिंतन करणारे जे लोक मला सर्वप्रकारे उपासितात, त्या सतत ध्यान करीत असलेल्या विरक्तांचा योगक्षेम मी वाहतो. [ मी सर्वात्मा वासुदेव आहे. माझ्याहून दुसरे कांहीं नाहीं, असे जाणून त्याच प्रत्यक् स्वरूपाचे सतत ध्यान करणारे जे मुख्य अधिकारी संन्यासी माझी उपासना करतात, मला सर्वतः अखंड आत्मरूपाने पाहतात, त्या परमार्थदर्शी-नित्यज्ञाननिष्ठांचा योग-अप्राप्य वस्तूंची प्राप्ति करून देणे व क्षेम - त्याचे रक्षण करणे, ही दोन्ही मीं करतो. ] विवरण : मीच भजनादिकांचा विषय व फलदाता आहें.
येऽप्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः । अन्वय : ये अन्यदेवताभक्ताः अपि - जे इतर देवतांचे भक्तही - श्रद्धया अन्विताः यजन्ते - श्रद्धेने युक्त होऊन त्या अन्य देवतांची पूजा करतात - ते अपि कौन्तेय - हे कुन्तिपुत्रा, ते सुद्धा - मां एव अविधिपूर्वकं यजन्ति - अज्ञानाने माझेच पूजन करतात. २३ व्याख्या : हे कौंतेय ! ये ये इंद्रादिदेवतायाजकाः अन्यदेवताभक्ता अपि अन्याश्च ता देवताश्च अन्यदेवताः अन्यदेवतानां भक्ताः श्रद्धयान्विताः संतः श्रद्धया भक्त्या अन्विताः संतः युक्ताः संतः यजंते पूजयंति ते इंद्रादिदेवतायाजकाः मामेव सर्वांतर्यामिणं वासुदेवमेव यज्ञेन यजंति पूजयंति इति सत्यम् । किंतु अविधिपूर्वकं यथास्यात्तथा विधिपूर्वकं न भवति यस्मिन् कर्मणि यथा भवति तथा अविधिपूर्वकं मोक्षप्रापकं विधिं विना यजंते । अतः हेतोः ते पुनरावर्तंत इत्यर्थः ॥ २३ ॥ अर्थ : 'पण अन्य देवताही जर तूंच आहेस, तर त्या देवतांचे भक्तही तुझीच पूजा करतात, असें म्हटले पाहिजे,' म्हणून म्हणशील तर तें खरे आहे. तुझे दुसऱ्या देवतांचे भक्तही श्रद्धेने युक्त होऊन त्या अन्य देवतांची पूजा करतात, ते सुद्धां, हे कौंतेया, माझेंच अज्ञानाने पूजन करतात. [ जे अन्य देवतांचे भक्त आस्तिक्यबुद्धीनें अन्य देवतांची पूजा करतात, तेही अज्ञानपूर्वक माझेंच पूजन करतात, हाच माझे भक्त व इतर देवतांचे भक्त यांच्या पूजेतील फरक आहे. ] विवरण : उपासनेप्रमाणें फल.
अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च । अन्वय : हि अहं सर्वयज्ञानां - कारण मी सर्व यज्ञांचा - भोक्ता च प्रभुः एव च - देवतारूपाने भोक्ता व प्रभुच आहे. - तु ते मां - पण अन्य देवतांचे भक्त - मां तत्त्वेन न अभिजानन्ति - मला अशा तात्त्विक रूपाने जाणत नाहीत - अतः च्यवन्ति - म्हणून मुख्य फलापासून च्युत होतात. २४ व्याख्या : अहमेव स्वदुपदेष्टा वासुदेव एव सर्व यज्ञानां सर्वे च ते यज्ञाश्च सर्वयज्ञाः तेषां सर्वयज्ञानां श्रौतस्मार्तकर्मणां तत्तद्देवतारूपेण भोक्ता भुनक्ति इति भोक्ता भुनक्ति हविर्भागान् भक्षयतिइति तथोक्तः अस्मि । चेत्यपरं अहमेव त्वदुपदेष्टा प्रभुः सर्वयज्ञफलदाता अस्मि । हि इति निश्चयेन । एवं प्रकारेण ये पुरुषाः मां वासुदेवं नाभिजानंति न मन्यंते अतः अस्मात् ममाज्ञानात् हेतोः ते अन्यथादर्शिनः पुरुषाः तत्त्वेन निश्चयेन च्यवन्ति स्वार्थात् भ्रष्टाः भवंति जन्ममरणद्वारा संसरंति । न तु मां प्राप्नुवंतीत्यर्थः ॥ २४ ॥ अर्थ : त्यांच्या अविधिपूर्वक यजनाचें कारण विचारशील तर सांगतो - मी सर्व यज्ञांचा देवतारूपानें भोक्ता व प्रभुच आहे. पण ते अन्य देवतांचे भक्त मला अशा तात्त्विक रूपाने जाणत नाहींत. म्हणून मुख्य फलापासून च्युत होतात. [ मी श्रौतस्मार्त यज्ञांचा 'देवतांचा आत्मा' या रूपाने भोक्ता व 'अंतर्यामी ' या रूपाने प्रभु आहे, मीच यज्ञांचा स्वामी आहें, या देहांत अधियज्ञ मीच आहे. असें ८ व्या अध्यायाच्या ४ थ्या लोकांत सांगितलेंच आहे. पण मीच यज्ञाचा भोक्ता व प्रभु असतांना मला लोक पूर्णपणें जाणत नाहींत - माझे तात्त्विक स्वरूप जाणत नाहींत, म्हणून ते अविधिपूर्वक यज्ञ करून त्या यज्ञाच्या मुख्य फलापासून च्युत होतात. ] विवरण :
यान्ति देवव्रता देवान् पितृन् यान्ति पितृव्रताः । अन्वय : देवव्रताः देवान् यान्ति - देवांमध्ये ज्याचे व्रत, नियम किंवा भक्ति असते ते देवांस प्राप्त होतात. - पितृव्रताः पितॄन् यान्ति - पितृभक्त पितरांस प्राप्त होतात - भूतेज्या भूतानि यान्ति - भूतांची पूजा करणारे विनायक, मातृगण इत्यादि भूतगणांस प्राप्त होतात - मद्याजिनः अपि मां यान्ति - व माझी पूजा करणारे मलाच प्राप्त होतात. २५ व्याख्या : देवव्रताः देवानां इंद्रादीनां व्रतं भजननियमः येषां ते देवव्रताः देवान् इंद्रादीन् यांति प्राप्नुवंति । पितृव्रताः पितॄणां व्रतं श्राद्धादिनियमः येषां ते पितृव्रताः पितॄन् अर्यमादीन् यांति प्राप्नुवंति । भूतेज्याः भूतेषु विनायकमातृकादिषु इज्या पूजा येषां ते भूतेज्याः भूतानि विनायकमातृकादीनि यांति प्राप्नुवंति । एवं देवादीन् आगमापायधर्मकान् ये भजंति ते तान् प्राप्य तयैव संसरंति । ये अनेकजन्म सुकृताप्तचरमजन्मानः मद्याजिनः मां यष्टुं शीलं येषां ते मद्याजिनः मद्भक्ताः मां अक्षयपरमानंदरूपं सत्यज्ञानादिलक्षणं यांति प्राप्नुवंति । सैंधवजलवत् । यथा सैंधवं जलं प्राप्य तद्रूपं भवति तथा मां प्राप्य तद्रूपाः भवंति । कारणे कार्यलयः न तु कार्ये कार्यलयः । इति कृत्वा मां प्राप्य मयि लीनाः भवंति ॥ २५ ॥ अर्थ : देवांमध्ये ज्यांचे व्रत, नियम किंवा भक्ति असते, ते देवास प्राप्त होतात. पितृभक्त पितरांस प्राप्त होतात. भूतांची पूजा करणारे विनायक, मातृगण, इत्यादि भूतगणांस प्राप्त होतात व माझी पूजा करणारेही मलाच प्राप्त होतास. [ पितृभक्त म्हणजे श्राद्धादि क्रियांमध्ये तत्पर असलेले पितृभक्त अग्निस्वाहादि पितरांस प्राप्त होतात. देवतादिकांचें व माझे पूजन करण्यांत आयास जरी एक सारखाच असला तरी अज्ञानामुळे ते मलाच भजत नाहींत. त्यामुळे ते अल्प फलास प्राप्त होतात, असा याचा भावार्थ. ] विवरण : भगवानाच्या आराधनेची सुकरता, तिचा प्रकार, माझ्या भक्तांना मोक्ष हें अनंत फल मिळतें, इतकेंच नव्हे, तर माझें आराधन अतिशय सुकरही आहे, कारण-
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । अन्वय : यः मे पत्रं पुष्पं फलं तोयं भक्त्या प्रयच्छति - जो मला पान फूल फळ जल भक्तीने देतो - तस्य प्रयतात्मनः भक्त्युपहृतं - त्या शुद्धचित्त पुरुषाचे भक्तीने अर्पण केलेले - तत् अहं अश्नामि - ते पत्र पुष्पादिक मी स्वीकारतो. २६ व्याख्या : ननु - प्रभूतवित्तसाध्यैः यज्ञैः क्षययुक्तान् देवान् इष्ट्वा तदनुरूपं फलं प्राप्नुवंति । अक्षयफललाभाय तव यजने प्रभूतवित्तं अपेक्षितं स्यात् । दरिद्रस्य त्वत्प्राप्तिः अनायासेन कथं स्यात् । प्रेममात्रं अपेक्षितमस्ति इत्याशंक्याह । यः अनन्य मद्भक्तः पत्रं पुष्पं फलं तोयं उदकं भक्त्या प्रेम्णा मे मह्यं लक्ष्मीकलत्राय प्रयच्छति समर्पयति । मम तु प्रेममात्रं अपेक्षितं पत्राद्यपेक्षैव नास्ति । किं तु तदनुरोधेन तस्य यत्किंचित् भक्त्युपहृतं भक्त्या प्रेम्णा उपहृतं समर्पितं अहं मुखं प्रसार्य अश्नामि भुंजामि । ननु - पत्रं शिरसि धार्यं पुष्पं अवघ्राणयोग्यं कथमश्नासि तत्राह । प्रयतात्मनः शुद्धचित्तस्य विचार्यमाणे सति पत्रादिकं भक्षणार्हं न भवति । तथापि प्रयतात्मनः निरंतरं मद्रूपं मम स्वरूपं भावयतः पत्रादिकमपि अश्नामि भुंजामि ॥ २६ ॥ अर्थ : जो मला पान, फूल, फल, जल इत्यादि अति क्षुद्र पदार्थही देतो, त्या शुद्धचित्त पुरुषाचे भक्तीने अर्पण केलेले तें पत्र-पुष्पादि मी स्वीकारतो. [ ज्याअर्थी हा भक्त हे पुष्पादि मला भक्तीने अर्पित आहे, त्याअर्थी हा शुद्ध-चित्त तपस्वी माझी आराधना करीत आहे, असा मी निश्चय करतो व त्याला तसें फल देतो. ] विवरण :
यत् करोषि यत् अश्नासि यज्जुहोषि ददासि यत् । अन्वय : कौन्तेय, यत् करोषि - हे अर्जुना, तूं जे करतोस - यत् अश्नासि - जे खातोस - यत् जुहोषि - जे हवन करतोस - यत् ददासि - जे दान देतोस - यत् तपस्यसि - जे तप करतोस - तत् मदर्पणं कुरुष्व - ते सर्व मला अर्पण कर. २७ व्याख्या : हे भगवन ! अहमपि उक्तप्रेमभक्तसदृशः केनोपायेन भवामि इत्याकांक्षायां अतीव सुगमोपायमाह । हे कौंतेय ! त्वं प्रेमभक्तः भवितुं इच्छसि चेत् तर्हि यत् करोषि यत् स्वाभाविकं वा वैदिकं कर्म करोषि निवर्तयसि यत् किमपि अश्नासि भक्षयसि अथवा सर्वान् विषयान् सेवसे । यत् अग्नौ होमादिकं जुहोषि करोषि यत् ददासि स्त्रीपुत्रादिभ्यः अन्नवस्त्रादिकं प्रयच्छसि यत् तपस्यसि तपः स्वधर्मादिकं कृच्छ्र्चांद्रायणादिकं करिष्यसि तत् उक्तं अनुक्तलक्षणं सर्वं मदर्पणं मयि वासुदेवे अर्पणं समर्पणं यथा भवति तथा कुरुष्व ॥ २७ ॥ अर्थ : हे अर्जुना, ज्याअर्थी माझें आराधन असें सुकर आहे, त्याअर्थी तूं जें करतोस, जें खातोस, जें हवन करतोस, जें दान देतोस, जें तप करतोस, ते मला समर्पण कर. [ तूं जें स्वाभाविक गमनादि व भोजनादि कर्म करशील व जें शास्त्रीय श्रौत-स्मार्त कर्म, दान व तप करशील तें सर्व मला अर्पण कर. ] विवरण : अर्जुनाला ईश्वराराधनेनेंच तूं मुक्त होशील असा उपदेश.
शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः । अन्वय : एवं - याप्रमाणे तूं करूं लागलास म्हणजे - शुभाशुभफलैः - शुभ व अशुभ फले देणार्या - कर्मबंधनैः मोक्ष्यसे - कर्मरूप बंधनांकडून मुक्त केला जाशील व - संन्यासयोगयुक्तात्मा - ज्याचे अन्तःकरण संन्यासयोगाने युक्त आहे असा तूं - विमुक्तः उपैष्यसि - अगदी मुक्त होऊन मला प्राप्त होशील. २८ व्याख्या : एवं उक्तप्रकारेण क्रियमाणे सति त्वं शुभाशुभफलैः शुभानि कल्याणरूपाणि च अशुभानि अकल्याणरूपाणि शुभाशुभानि फलानि येषां तानि शुभाशुभफलानि तैः कर्मबंधनैः कर्माण्येव बंधनानि कर्मबंधनानि तैः कर्मबंधनैः जन्ममरणसंसरणद्वारा घटीयंत्रवत् बंधनैः मोक्ष्यसे विमुक्तो भविष्यसि । न तु एतावदेव । किं तु ततोप्यधिकमस्तीत्याह । त्वं विमुक्तः सन् जीवन्मुक्तः सन् क्रियमाणैः कर्मभिः असंस्पृष्टः सन् मां वासुदेवं उपैष्यसि मद्रूपेण अवशिष्यसि । कथंभूतः त्वम् । संन्यासयोगयुक्तात्मा संन्यास एव कर्माभिनिवेशफलत्याग एव योगः संन्यासयोगः संन्यासयोगेन युक्तः मयि समाहिताः आत्मा अंतःकरणं यस्य सः संन्यासयोगयुक्तात्मा ॥ २८ ॥ अर्थ : याप्रमाणे तूं करूं लागलास म्हणजे शुभ व अशुभ फल देणाऱ्या कर्मरूप बंधनाकडून मुक्त केला जाशील व ज्याचे अंतःकरण संन्यास व योग यांनी युक्त आहे, असा तूं सर्वथा मुक्त होऊन मला प्राप्त होशील. [ सर्व मदर्पण करणें हा संन्यासही आहे व कर्मानुष्ठानामुळें योगही आहे. यास्तव ज्याचे चित्त संन्यास व योग यांनी युक्त झाले आहे, असा तूं जीवन्मुक्तीचा अनुभव घेऊन मरणानंतर मला प्राप्त होशील. ] विवरण : भगवानांचें सर्वत्र समत्व. 'तर मग तू रागद्वेषवान् आहेस, कारण आपल्या भक्तांवर मात्र अनुग्रह करतोस व इतरांवर करीत नाहींस' असा जर मला दोष देशील तर तो युक्त नाहीं, कारण -
समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः । अन्वय : समः - मी सर्वभूतांमध्ये सम आहे - मे द्वेष्यः न - माझा कोणी द्वेष्य-द्वेषमात्र-शत्रु नाही - प्रियः न - व प्रिय नाही. - तु ये मां भक्त्या भजन्ति - पण जे मला भक्तीने भजतात - ते मयि - ते माझ्यामध्ये-मजपाशी स्वभावतःच असतात - च अहं अपि तेषु - आणि मीही त्यांच्यामध्ये स्वभावतःच असतो. २९ व्याख्या : यदि भक्तेभ्य एव मोक्षं ददासि नाभक्तेभ्यः तर्हि तवापि किं रागद्वेषादिकृतं वैषम्यमस्ति ? नेत्याह । हे पार्थ ! अहं सर्वभूतेषु सर्वाणि च तानि भूतानि च सर्वभूतानि तेषु सर्वभूतेषु ब्रह्मादिमशकांतेषु समः समानः अस्मि । समत्वेन मे मम द्वेष्यः द्वेष्टुं योग्यः द्वेष्यः द्वेषविषयः नास्ति चेत्यपरं प्रियः प्रीतिविषयोपि नास्ति । किं तर्हि तत्राह । ये सभाग्याः मां अक्षयपरमानंदरूपं भक्त्या प्रेम्णा भजंति ते सभाग्याः मयि सर्वाधिष्ठाने वर्तंते । जले तरंगा इव । तेषु सभाग्येषु अहमपि वर्ते । तरंगेषु जलमिव । यथा सर्वत्र समः कल्पवृक्षः कल्पनायोगेन तथा तथा फलति तथा अहमपि अंतर्यामितया सर्वेषु भूतेषु समः सन् तत्तत्प्रार्थनानुसारेण फलवैषम्यं करोमि । एवं सति मम वैषम्यगंधोपि नास्तीति भावः ॥ २९ ॥ अर्थ : मी सर्व भूतांमध्ये सम-तुल्य आहे. मला कोणी द्वेष्य म्ह० द्वेषास योग्य किंवा प्रियही नाही. तर जे मला भक्तीनें भजतात ते स्वभावतःच मजमध्यें असतात आणि मीही स्वभावतःच त्यांच्यामध्यें असतो. [ मी अग्नितुल्य आहे. अग्नि जसा दूर असलेल्यांचें शीत घालवीत नाही - त्यांच्या थंडीचे निवारण करीत नाही, तर तो त्याच्या समीप बसणाराचेंच शीत घालवितो. तसाच मी भक्तांवर अनुग्रह करतो. इतरांवर करीत नाही. जे मज ईश्वराला भजतात, ते माझ्यामध्येंच स्वभावतःच राहतात. माझ्या प्रीतीमुळें मजमध्यें रहात नाहींत आणि त्यांच्या ठिकाणींही मी स्वभावतःच राहतो. इतर अभक्तांमध्यें रहात नाहीं. स्वभावतःच हे होत असल्यामुळे मी अभक्तांमध्यें रहात नाही, एवढ्यावरून त्यांच्याशी माझा द्वेष आहे असें होत नाहीं. जे वर्णाश्रमधर्माच्या योगानें माझें भजन करतात, ते त्याच भजनाच्या अचिंत्य माहात्म्यानें शुद्धचित्त होऊन माझ्या समीप राहतात. त्यांचे चित्त माझ्या अभिव्यक्तीला योग्य होते. त्यामुळे मीही स्वभावतःच त्यांच्या समीप राहून त्यांच्यावर अनुग्रह करतो. जसें सूर्याचें तेज व्यापक - सर्वत्र पसरलेलें जरी असलें तरी तें स्वच्छ आरशांतच प्रतिबिंबित होते, त्याचप्रमाणें ज्यांचे चित्त भक्तीनें अत्यंत शुद्ध झालेलें असतें त्यांच्यामध्येंच मी प्रकट होतो. ] विवरण : भक्तीचे माहात्म्य व मत्पर होण्याचा उपदेश.
अपि चेत् सुदुराचारो भजते मां अनन्यभाक् । अन्वय : अपि चेत् सुदुराचारः - कदाचित् अतिशय निंद्य आचरण करणारा एखादा - अनन्यभाक् मां भजते - अनन्य भक्त होऊन मला भजूं लागला तर - सः साधुः एव मन्तव्यः - तो सदाचरणसंपन्नच आहे असे मानावे - हि सः सम्यक् व्यवसितः - कारण तो चांगल्या प्रकारे निश्चिंत झालेला असतो. ३० व्याख्या : हे कौंतेय ! श्रुणु । ये पुण्यकर्माणः अनन्यत्वेन भजंति ते मां प्राप्नुवंति इति न चित्रम् । किं तु पूर्वं दुराचारोपि अनन्यभाक् सन् मां भजते सोपि मुक्तो भवति इत्याशयेन आह । सुदुराचारोपि सुतरां अत्यंतं दुष्टः महापापोपलक्षणः आचारः क्रिया यस्य सः दुराचारः अनन्यभाक् मां सन् दुराचारं विहाय मां विना अन्यं न भजतीति अनन्यभाक् मां परमात्मानं भजते चेत् तर्हि सः सुदुराचारः साधुरेव वेदांगत्वेन यज्ञादि अनुष्ठानेनैव मंतव्यः ज्ञातव्यः । पंडितैरिति शेषः । हि यस्मात् फलसाम्यात् हेतोः सः सुदुराचारः सम्यग्व्यवसितः सम्यक् शोभनं व्यवसितं निश्चयः यस्य सः सम्यग्व्यवसितः अस्ति । अनेकासह्यदुःखदं दुराचारं विहाय परमानंदे मद्भजने प्रवृत्तत्वात् शोभनाध्यवसायवान् इत्यर्थः ॥ ३० ॥ अर्थ : हे अर्जुना, माझ्या भक्तीचे माहात्म्य तुला सांगू ? जरी कदाचित् अतिशय निंद्य आचरण करणारा एखादा अनन्य भक्त होऊन मला भजूं लागला, तरी तो सदाचारसंपन्न आहे, असें मानावें. कारण तो चांगल्या प्रकारे निश्चित झालेला असतो. [ एखादा अत्यंत दुराचारी असलेलाही मनुष्य जर माझी अनन्य भक्ति करूं लागला तर तो साधुच होय. कारण माझी भक्ति करणे हा त्यानें फारच उत्तम निश्चय केलेला असतो. ] विवरण :
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति । अन्वय : सः क्षिप्रं धर्मात्मा भवति - तो सत्वर धार्मिक होतो आणि - शश्वत् शान्तिं निगच्छति - नित्य शांतीला प्राप्त होतो. - कौन्तेय, मे भक्तः न प्रणश्यति - हे अर्जुना, माझा भक्त कधीही नाश पावत नाही - प्रतिजानीहि - हे पक्के जाण. ३१ व्याख्या : साधुत्वमेव प्रकटयति । सः दुराचारः मां परमेश्वरं भजन् सन् क्षिप्रं शीघ्रं धर्मात्मा धर्मस्वरूपः भवति तदनु शीघ्रं शश्वत् शाश्वतीं शांतिं सर्वोपरमलक्षणां मद्रूपेण अवस्थितिं निगच्छति नितरां प्राप्नोति । त्वमपि इदानीं भीष्मादिवधं कुर्वन् सन् मयि अनन्यतया नाशं न प्राप्स्यसि किंच कुतर्काः कर्कशवादिनः एतत् न मन्येरन् इति शंकाव्याकुलं अर्जुनं प्रोत्साहयति । हे कौन्तेय ! त्वं पटहकोलाहलादि महाघोषपूर्वकं विवदमानानां सभां गत्वा बाहुं उत्क्षिप्य निःशंकं प्रतिजानीहि प्रतिज्ञां कुरु । अथवा हे कौंतेय ! त्वं ब्रह्मादिलोकपालानां सभासु गत्वा उच्चैः स्वरेण प्रौढवादेन सर्वेषु शृण्वत्सु सत्सु प्रतिजानीहि एवं प्रतिज्ञां कुरु । कथमिति मे मम परमेश्वरस्य दुराचारयुक्तोपि अनन्यभक्तः न प्रणश्यति नानाविधदुःखसंकुलं संसारं न प्राप्नोति । अपि तु कृतार्थ एव भवति ॥ ३१ ॥ अर्थ : बाह्य दुराचारता सोडून मनांत असा उत्तम निश्चय केल्याने तो सत्वर धर्मात्मा होतो आणि नित्य शांतीला प्राप्त होतो. हे अर्जुना, माझा भक्त केव्हांही नाश पावत नाहीं, अशी तूं प्रतिज्ञा कर. [ माझा भक्त दुराचारी जरी असला, तरी तो सत्वर धर्मचित्त होतो. दुराचरणापासून नित्य निवृत्त होतो. यास्तव तुला माझ्या भक्ताविषयी कोठे बोलण्याचा प्रसंग आल्यास तो कधींही नाश पावत नाहीं, असें तूं प्रतिज्ञेने सांगत जा. ] विवरण :
आणखी याही एका कारणानें माझी भक्ति करावी, असें भगवान् सांगतात-
मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः । अन्वय : हि पार्थ - कारण हे अर्जुना, - मां व्यपाश्रित्य - मला आश्रयरूपाने स्वीकारून - स्त्रियः वैश्याः तथा शूद्राः - स्त्रिया, वैश्य तसेच शूद्र - ये पापयोनयः अपि स्युः - असे जे पापजातीत उत्पन्न झालेले असतात - ते अपि परां गतिं यान्ति - तेसुद्धां परम गतीला जातात. ३२ व्याख्या : आचारभ्रष्टं मद्भक्तिः पवित्रीकरोति इति अत्र किं चित्रम् ? यतः हेतोः मद्भक्तिः दुष्टकुलान् अनधिकारिणोपि संसारात् मोचयतीत्याह । हे पार्थ ! ये दुराचारेण प्रसिद्धाः पापयोनयः पाममेव योनिः कारणं येषां ते पापयोनयः निकृष्टजन्मानः अंत्यजादयः स्युः भवेयुः तेपि पापयोनयोपि मां सर्वात्मानं व्यपाश्रित्य सर्वभावेन आश्रित्य परां सर्वोत्कृष्टां गतिं गम्यते प्राप्यते इति गतिः तां गतिं मत्प्राप्तिं यांति प्राप्नुवंति । ते के । स्त्रियः अध्ययनसंस्कारशून्याः तथा वैश्याः केवलं कृषिवाणिज्यादिरताः तथा शूद्राः विषयिणः उदरंभराः परां गतिं यांति । इति निश्चयेन ॥ ३२ ॥ अर्थ : कारण हे अर्जुना, मला आश्रय या रूपाने स्वीकारून स्त्रिया, वैश्य, त्याचप्रमाणे शूद्र, असे जे पापयोनींत उत्पन्न झालेले असतात, ते सुद्धा क्रमानें परम गतीला प्राप्त होतात. विवरण :
किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा । अन्वय : पुनः पुण्याः ब्राह्मणाः - मग पुण्ययोनीत जन्मलेले ब्राह्मण - तथा भक्ताः राजर्षयः किं - त्याचप्रमाणे भक्त राजर्षि-ज्ञानी क्षत्रिय श्रेष्ठ गतीला जातील हे काय सांगावे लागते का ? - इमं अनित्यं असुखं लोकं - यास्तव या अनित्य व सुखरहित लोकास - प्राप्य मां भजस्व - प्राप्त होऊन मला भज. ३३ व्याख्या : पापयोनयोपि मां प्राप्नुवंति उत सुकृतिनः मां यांति इति किमु वक्तव्यम् ? इत्याह । पुण्याः पुण्यकर्माणः द्विजोत्तमाः तथापि एवं सत्यपि भक्ताः स्वधर्मानुष्ठानेन मद्भजकाः तथा राजर्षयः राजानश्च ते ऋषयश्च राजर्षयः सूक्ष्मार्थदर्शिनः त्वत्सदृशाः क्षत्रियवर्याः परां सर्वोत्कृष्टां गतिं मत्प्राप्तिं यांति इति किमु वक्तव्यम् ? त्वमपि एवं कुरु इत्याह । हे पार्थ ! त्वं इमं प्रत्यक्षं लोकं लोक्यते स्वात्मानं लोक्यते अनेनेति लोकः तं लोकं नृदेहं सर्वपुरुषार्थसाधकं प्राप्य केनापि भाग्योदयेन प्रयत्नं विना लब्ध्वा मां अंतर्यामिणं भजस्व निरंतरं सेवस्व । कथंभूतं लोकम् । अनित्यं न नित्यः अनित्यः तं अनित्यं अध्रुवं क्षणिकम् । पुनः कथंभूतं लोकम् । असुखं नास्ति सुखं यस्य सः असुखः तं असुखं सुखरहितम् ॥ ३३ ॥ अर्थ : आणि पापी व पापयोनि मानव जर भक्तींने मुक्त होतात, तर मग पुण्ययोनींत उत्पन्न झालेले ब्राह्मण, तसेच भक्त राजर्षि-ज्ञानी क्षत्रिय श्रेष्ठ गतीला जातील, हें काय सांगावे ! यास्तव या अनित्य व सुखरहित लोकास प्राप्त होऊन तूं माझें भजन कर. [ पापी व स्त्रिया वगैरे जर भक्तीने परम गतीला प्राप्त होतात, तर मग पुण्यामुळेच उत्तम जन्म पावलेल्या ब्राह्मणांना व क्षत्रियांना सर्वोत्तम गति प्राप्त होईल, याविषयी शंकाच नको. पश्वादि शरीरांत भगवद्भजनाची योग्यताच नाहीं, म्हणून मानुषत्वास प्राप्त झालेल्या जीवांनी ईश्वराच्या ध्यानादिकांविषयीं अवश्य यत्न करावा. विवरण :
आतां 'भक्ति कशी करावी ' म्हणून विचारशील तर सांगतो-
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु । अन्वय : मन्मना भव - माझ्या ठिकाणींच ज्याचे मन आहे असा तूं हो - मद्भक्तः भव - माझाच भक्त हो - मद्याजी भव - माझीच पूजा करण्याचे ज्याचें शील आहे असा हो - मां नमस्कुरु मला नमस्कार कर - एवं युक्त्वा - याप्रमाणे भगवानांचे ठिकाणी चित्ताला समाहित करून, शांतचित्त करून - मत्परायणः - मत्परायण झालेला तूं - आत्मानं मां एव एष्यसि - मत्परायण झालेला तूं सर्वांचा आत्मा असा जो मी ईश्वर त्याला प्राप्त होशील. ३४ व्याख्या : भजनप्रकारं कृपया स्वयमेव दर्शयति । हे पार्थ ! त्वं मन्मनाः मय्येव मनः संकल्पात्मकं यस्य सः मन्मनाः भव । किंच त्वं मद्भक्तः मम भक्तः मद्भक्तः सर्वेंद्रियव्यापारैः मद्भजनपरः भव । त्वं मद्याजी ब्रह्मार्पणप्रकारेण सर्वात्मकं मां अनुसंधाय यजनशीलः मद्याजी भव । त्वं मां सर्वरूपिणं सुवर्णकुंडलवत् बहिः अन्तः वर्तमानं नमस्कुरु । एवं कृते सति किं स्यात् तत्राह । हे कौंतेय ! त्वं मत्परायणः सन् अहमेव परं श्रेष्ठं अयनं आश्रयो यस्य सः मत्परायणः एवं उक्तप्रकारेण आत्मानं मनः युक्त्वा मयि स्थिरीकृत्य मामेव परमानंदरूपमेव एष्यसि प्राप्स्यसि नात्र संदेह इत्यर्थः ॥ ३४ ॥ अर्थ : अर्जुना, माझ्या ठिकाणींच ज्याचे मन आहे, असा तूं हो. माझा भक्त हो. माझीच पूजा करण्याचें ज्याचे शील आहे, असा हो. मला नमस्कार कर, या प्रमाणें भगवानाच्या ठिकाणी चित्ताला समाहित-शांत-स्थिर करून मत्परायण झालेला तूं सर्वांचा आत्मा असा जो मी-ईश्वर त्याला प्राप्त होशील. [ तूं 'मन्मनाः मद्भक्तः' इत्यादि झालास म्हणजे मज सर्वात्म्यालाच प्राप्त होशील. या प्रमाणें या अध्यायांत म ध्यमाधिकाऱ्याचे ध्येय सांगून अधमाधिकाऱ्यांनाही मी आराधना करण्यास योग्य आहें, असें वर्णन केलें. आपल्या पारमार्थिक प्रत्यक्स्वरूपाने आपणाला साक्षात् जाणणे, हें ज्ञानच परमेश्वराचे परम आराधन आहे, असेही सुचविले. अर्थात् तत्पदवाच्य सोपाधिक ब्रह्म व तत्पदलक्ष्य निरुपाधिक ब्रह्म यांचें येथें व्याख्यान केलें आहे. ] विवरण :
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ |