|
श्रीमद् भगवद्गीता कर्मयोगः
धृतराष्ट्र उवाच - अन्वय : व्याख्या : हे संजय ! सं कोपं जयतीति संजयः तत्संबुद्धौ । सः कोपे चारणे ख्यात इत्येकाक्षरः । मामकाः मम इमे मामकाः दुर्योधनादयः च पांडवाः पंडोः अपत्यानि पुमांसः पांडवाः धर्मक्षेत्रे धर्मरूपं च तत् क्षेत्रं भूमिः धर्मक्षेत्रं तस्मिन् कुरुक्षेत्रे कुरोः कुरुराज्ञः क्षेत्रं तस्मिन् समवेताः संतः मिलिताः संतः किं अकुर्वत किं कृतवंतः । कथंभूताः मामकाः पांडवाश्च । युयुत्सवः योद्धुं इच्छन्ति ते युयुत्सवः ॥ १ ॥ अर्थ : धृतराष्ट्र म्हणाला - संजया, धर्मक्षेत्र असे जे प्रसिद्ध कुरुक्षेत्र, त्यांत युद्धाच्या इच्छेनें जमलेले माझे दुर्योधनादि पुत्र व पांडूचे युधिष्ठिरादि पुत्र यांनी काय केले ? परशुरामाच्या ऋचीकादि पूर्वजांच्या वराने परशुरामानें क्षत्रियांच्या रक्तानें भरलेले पांच डोह 'स्यमंतपंचक' या नांवानें प्रसिद्ध झाले. त्यामुळे 'कुरुक्षेत्र' ही पुण्यभूमि आहे, अशी तिची प्रसिद्धि झाली. जाबाल उपनिषदांमध्येंही कुरुक्षेत्राला 'देवयजन' म्हटलेले आहे. चांगल्या शेतांत पेरलेले धान्य जसे चांगले उगवते व त्वांत चांगले फलही उत्पन्न होते, त्याप्रमाणे कुरूक्षेत्रांत केलेले धर्माचरण अधिक फल देते. म्हणून त्याला ' धर्मक्षेत्र' असे म्हटले आहे. अशा त्या धर्मक्षेत्रांत क्षत्रियधर्माला अनुसरून युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या कौरव-पांडवांनी काय केले ? असा धृतराष्ट्राच्या या प्रश्नाचा आशय आहे. ॥ १ ॥ विवरण :
सञ्जय उवाच - अन्वय : व्याख्या : तदा मीलनसमये राजा दुर्योधनः दुःखेन कष्टेन युध्यतेऽसौ दुर्योधनः आचार्यं द्रोणाचार्यं उपसंगम्य समीपं गत्वा वचनं वक्ष्यमाणं वाक्यं उवाच उक्तवान् । किं कृत्वा पांडवानीकं पांडवानां अनीकं सैन्यं पांडवानीकं दृष्ट्वा अवलोक्य । कथंभूतं पांडवानीकम् । व्यूढं व्यूहरचनया स्थितम् ॥ २ ॥ अर्थ : संजय - राजा, त्यावेळी पांडवांचे सैन्य व्यूहरचना करून उभे आहे, असे पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यापाशी गेला व असे वचन बोलला- ॥ २ ॥ विवरण :
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् । अन्वय : व्याख्या : हे आचार्य हे द्रोणाचार्य ! त्वं पांडुपुत्राणां पांडोः पुत्राः पांडुपुत्राः तेषां पांडवानां एतां पुरोवर्तिनीं चमूं सेनां पश्य अवलोकय । कथंभूतां चमूम् । महतीं विस्तृताम् । पुनः कथंभूतां चमूम् । द्रुपदपुत्रेण द्रुपदस्य पुत्रः सुतः तेन धृष्टद्युम्नेन व्यूढां व्यूहरचनया अधिष्ठितम् । कथंभूतेन द्रुपदपुत्रेण तव शिष्येण । पुनः कथंभूतेन । धीमता धीर्विद्यते यस्य सः धीमान् तेन धीमता बुद्धिमता ॥ ३ ॥ अर्थ : हे आचार्य, तुमच्या बुद्धिमान् शिष्यानें म्हणजे द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नानें व्यूहरचना केलेली पांडुपुत्रांची ही मोठी सेना पहा. ॥ ३ ॥ विवरण :
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि । अन्वय :
व्याख्या : अत्र शूरा इति । अत्र अस्यां सेनायां बहवः शूराः सन्ति । कथंभूताः शूराः । महेष्वासाः महांतः इष्वासाः धनूंषि येषां ते । पुनः कथंभूताः शूराः । युधि संग्रामे भीमार्जुनसमाः भीमश्च अर्जुनश्च भीमार्जुनौ भीमार्जुनाभ्यां समाः तुल्याः । बहवः के । युयुधानः सात्यकिः चेत्यपरं विराटः चेत्यपरं द्रुपदः । कथंभूतः द्रुपदः । महारथः महान् रथो यस्य सः ॥ ४ ॥ अर्थ : या सैन्यांत शूर, मोठमोठीं धनुष्यें धारण करणारे, युद्धांत भीमार्जुनासारखे पराक्रमी, असे अनेक वीर आहेत. त्यांतील कित्येकांची नांवेंही सांगतो. यादव सात्यकि, राजा विराट, महारथ द्रुपद, पराक्रमी धृष्टकेतु, चेकितान व काशिराज, नरश्रेष्ठ पुरुजित, कुंतिभोज व शैष्य, पराक्रमी युधामन्यु, वीर्यवान् उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यु व द्रौपदीचे प्रतिविंध्यादि पांच पुज, हे महावीर आहेत. ते सर्वच महारथ आहेत. ॥ ४-६ ॥ विवरण :
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम । अन्वय :
व्याख्या : हे द्विजोत्तम ! द्विजानां ब्राह्मणानां मध्ये उत्तम द्विजोत्तमः तत्संबुद्धौ हे द्विजोत्तम हे आचार्य ! अस्माकं ये वीरां विशिष्टाः विशेषेण शिष्टाः संति तान् वीरान् अहं ते तुभ्यं संज्ञार्थं संज्ञायै इति संज्ञार्थं ज्ञानाय ब्रवीमि । त्वं तान् वीरान् निबोध बुद्ध्यस्व । कथंभूताः विशिष्ठाः । ये मम सैन्यस्य नायकाः नेतारः ॥ ७ ॥ अर्थ : आता आमच्या सेन्यांत जे श्रेष्ठ व माझ्या सैन्याचे नायक असे जे वीर आहेत, त्यांचींही नांवे मी तुला सांगतों. हे द्विजश्रेष्ठा, आपल्याला कळण्यासाठी मी त्यांतील कांहींची नांवे सांगत आहे. आपल्याला ते वीर माहित नाहींत, म्हणून सांगतो, असे नाहीं, तर पांडवांप्रमाणे आपल्या पक्षांतही केवढाले लोकोत्तर वीर आहेत, त्यांचे आपल्याला स्मरण व्हावे, म्हणून सांगत आहें. स्वतः आपण, इच्छामरणी भीष्म, वासवी शक्तीनें युक्त असलेला कर्ण, संग्रामांत विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, तसाच सौमदत्ति व दुसरेही अनेक वीर आपस्मा सैन्यात आहेत. त्या सर्वांनी माझ्यासाठीं आपल्या जीविताचा त्याग करण्याचा निश्चय केला आहे. ते सर्व युद्धामध्ये विशारद असून अनेकप्रकारचीं शस्त्रें हींच त्यांच्यापाशी शत्रूवर प्रहार करण्याचीं साधने आहेत. ॥ ७-९ ॥ विवरण :
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् । अन्वय : व्याख्या : अपर्याप्तमिति । तत् तथाभूतैः वीरैः युक्तमपि अस्माकं बलं सैन्यं अपर्याप्तं न भवति तत् अपर्याप्तं तैः पांडवैः सह योद्धुं अस्मर्थं भाति । इदं तु एतेषां पांडवानां बलं सैन्यं अपर्याप्तं समर्थं भाति । कथंभूतं बलम् । भीष्माभिरक्षितं भीष्मेण अभिरक्षितं संरक्षितम् । पुनः कथंभूतं बलम् । भीमाभिरक्षितं भीमेन अभिरक्षितं संरक्षितम् ॥ १० ॥ अर्थ : याप्रमाणें आम्हांकडे आपल्यासारखे मोठमोठे वीर आहेत. आमचे सैन्य अकरा अक्षौहिणी आहे. भीष्मासारख्या अनुभवी वीराने त्याचे रक्षण केले आहे, म्हणून आमचे सैन्य संख्या, पराक्रम आणि अनुभवी सेनापति, यांच्या योगानें अजिंक्य झाले आहे. पण पांडवांचे सैन्य सात अक्षौहिणीच आहे. त्यांच्याकडे सात्यकीसारखे वीर जरी असले, तरी ते सर्व तरुण आहेत, त्यांना अशा मोठ्या संग्रामाचा अनुभव नाहीं. त्यांच्या सैन्याचा रक्षकही भीम आहे. त्वामुळे सर्वप्रकारे त्यांचे सैन्य सुजेय आहे. ॥ १० ॥ विवरण :
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः । अन्वय : व्याख्या : सर्व एव संपूर्णा एव भवंतः यूयं सर्वेषु संपूर्णेषु अयनेषु व्यूहप्रवेशमार्गेषु यथाभागं विभक्तां स्वां स्वां रणभूमिं अपरित्यज्य अत्यक्त्वा अवस्थिताः सन्तः भीष्ममेव अभिरक्षन्तु संरक्षन्तु । हि इति निश्चयेन । भीष्मबलेनैव अस्माकं जीवनं भविष्यति ॥ ११ ॥ अर्थ : यास्तव आपण सर्वच आपापल्या नियत स्थानांत स्थित होऊन आपापला भाग न सोडतां केवल भीष्माचेंच दक्षतेनें रक्षण करा. ॥ ११ ॥ विवरण :
तस्य सञ्जनयन्हर्षं कुरुवृद्धः पितामहः । अन्वय : व्याख्या : सर्वेषां कौरवेषां पितामहः भीष्मः तस्य दुर्योधनस्य हर्षं जनयन् जनयति निर्माणयतीति जनयन् सन् उच्चैः महान्तं सिंहनादं इव नादः सिंहनादः तं विनद्य कृत्वा शंखं दध्मौ वादितवान् । कथंभूतः पितामहः । कुरुवृद्धः कुरूणां वृद्धः । पुनः कथंभूतः पितामहः । प्रतापवान् प्रतापः विद्यते यस्य सः प्रतापवान् ॥ १२ ॥ अर्थ : संजय म्हणाला - दुयोंधनाचें हे भाषण होतांच त्याला प्रोत्साहन देणार्या कुरुवृद्ध पितामह प्रतापी भीष्माने मोठ्याने सिंहनाद केला व आपला शंख वाजविला. ॥ १२ ॥ विवरण :
ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः । अन्वय : व्याख्या : ततस्तदनन्तरं भीष्मशंखशब्दश्रवणानंतरं शंखाः चेत्यपरं भेर्यः च पणवानकगुमुखाः पणवाश्च आनकाश्च गोमुखाश्च पणवानकगोमुखाः वाद्यविशेषाः सहसैव तत्क्षणमेव अभ्यहन्यंत वादिताः । स शब्दः भीष्मशंखशब्दः तुमलः महान् अभवत् जातः ॥ १३ ॥ अर्थ : भीष्माने शंख वाजविताच सर्व बाजूंनी शंख, नगारे, बोल, मृदंग, खंजिर्या इत्यादि रणवाद्यें वाजू लागली. त्यामुळे वाद्यांचा फार मोठा नाद झाला. तो ध्वनि अतिशय भयंकर होता. पण त्याच्या योगाने पांडवांची हृदये भीतीने कंपित झालीं नाहींत. ॥ १३ ॥ विवरण :
ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ । अन्वय : व्याख्या : ततस्तदनंतरं भीष्मशंखादिवाद्यश्रवणानंतरम् । तौ द्वौ दिव्यौ दीप्तिमंतौ शंखौ प्रदध्मतुः प्रकर्षेण वादयामासतुः । तौ कौ । माधवः मायाः लक्ष्म्याः धवः श्रीकृष्णः चेत्यपरं पांडवः पंडोः पुत्रः पांडवः अर्जुनः । कथंभूतौ तौ । महति श्रेष्ठे स्यंदने रथे स्थितौ । कथंभूते स्यंदने । श्वेतैः शुभ्रैः हयैः अश्वैः युक्ते ॥ १४ ॥ अर्थ : त्यानंतर शुभ्र अश्व जोडलेल्या फार मोठ्या रथावर स्थित झालेला माधव व अर्जुन यांनीं आपापले दिव्य शंख वाजविले. ॥ १४ ॥ विवरण :
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः । अन्वय :
व्याख्या : हृषीकेशः हृषीकाणां इद्रियाणां ईशः हृषीकेशः श्रीकृष्णः । पांचजन्यं पंचजननामकस्य दैत्यस्य देहात् उत्पन्नः पांचजन्यः तं पाचजन्यनामानं शंखं वादयामास । धनंजयः धनं जयतीति धनंजयः अर्जुनः देवदत्तं देवेन अग्निना दत्तः तं देवदत्तनामानं शंखं वादयामास । वृकोदरः वृकनामानिः वृकः उदरे यस्य सः । यद्वा । वृक इव उदरं यस्य सः वृकोदरः भीमः पौंड्रंऽ पौंड्रनामानं महाशंखं महांश्चासौ शंखश्च महाशंखः तं प्रदध्मौ प्रकर्षेण वादयामास । कथंभूतः वृकोदरः। भीमकर्मा भीमं भयंकरं कर्म यस्य सः भीमकर्मा ॥ १५ ॥ अर्थ : हृषीकेशानें पांचजन्य, धनंजयाने देवदत्त, व भयंकर कर्में करणार्या वृकोदरानें आपला 'पौण्ड्र' नांवाचा महाशंख वाजविला. कुंतिपुत्र राजा युधिष्ठिराने 'अनंतविजय', माद्रिपुत्र नकुल व सहदेव यांनीं क्रमानें 'सुबोध' व ’मणिपुष्पक' हे शंख वाजविले. महाधनुर्धर काश्य, महारथ शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, अजिंक्य सात्यकि,द्रुपद, द्रौपदीचे पुत्र, महाबाहु सौभद्र या सर्वांनी सर्वतः आपापले पृथक् पृथक् शंख वाजविले. ॥ १५-१८ ॥ विवरण :
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् । अन्वय : व्याख्या : सः प्रसिद्धघोषः शंखनादः धृतराष्ट्रस्य अपत्यानि पुमांसः धार्त्तराष्ट्राः तेषां धार्त्तराष्ट्राणां दुर्योधनादीनां हृदयानि व्यदारयत् विदारितवान् । कथंभूतः घोषः । तुमुलः .संकुलः । पुनः कथंभूत घोषः । नभः आकाशं चेत्यपरं पृथिवीं व्यनुनादयन् व्यनुनादयतीति व्यनुनादयन् । व्यनुनादयति प्रतिध्वनिभिः आपूरयति ॥ १९ ॥ अर्थ : तेव्हां हे महाराज, काय सांगूं ! पांडवसैन्यांतील वीरांच्या या तुमुल शंखध्वनीने धृतराष्ट्रपुत्रांचीं हृदये विदीर्ण झाली. त्या ध्वनीनें आकाश व पृथ्वी यांना दुमदुमून सोडले. ॥ १९ ॥ विवरण :
अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः । अन्वय :
व्याख्या : हे महीपते ! मह्याः पृथिव्याः पतिः महीपतिः तत्सबुद्धौ हे महीपते हे धृतराष्ट्र ! अथ अथेत्यनंतरं शंखशब्दश्रवणानंतरं तदा युद्धसमये पांडवः अर्जुनः धनुः गांडीवं उद्यम्य उद्धृत्य हृषीकेशं हृषीकाणां ईशः हृषीकेशः तं श्रीकृष्णं इदं वक्ष्यमाणं वाक्यं वचनं आह वदति । किं कृत्वा । व्यवस्थितान् युद्धोद्योगे स्थितान् धार्त्तराष्ट्रान् दुर्योधनादीन् दृष्ट्वा अवलोक्य । कस्मिन् सति । शस्त्रसंपाते शस्त्राणां सम्यक् पातः पतनं शस्त्रसंपातः तस्मिन् प्रवृत्ते सति प्राप्ते सति । कथंभूतः पांडवः । कपिध्वजः कपिः ध्वजे यस्य सः कपिध्वजः । कपिः हनुमान् ॥ २० ॥ अर्थ : त्यानंतर कौरवादि धृतराष्ट्रपुत्र निर्भयपणे युद्धार्थ सज होऊन उभे राहिले आहेत, व आतां शस्त्रप्रहार प्रवृत्त होण्याचा प्रसंग प्राप्त झाला आहे, हें पाहून कपिध्वज पांडवाने आपले गांडीव धनुष्य उचलले आणि हे राजा, अर्जुनाने त्यावेळीं हृषीकेशाला म्हटलें - हें अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर. युद्धाच्या इच्छेने जे हे राजे येथे उपस्थित झाले आहेत, त्यांचे मी निरीक्षण करीपर्यंत माझा रथ तेथेंच स्थिर उभा राहूं दे. या समरांगणांत मला कोणाकोणाशी युद्ध करावयाचे आहे, ते मी पहातों. युद्धांत या दुर्बुद्धि धार्तराष्ट्राचें प्रिय करण्याच्या इच्छेनें जे हे येथे आले आहेत, त्या युद्ध करणार्या वीरांना मी पहातों. ॥ २०-२३ ॥ विवरण :
सञ्जय उवाच - अन्वय : व्याख्या : हे भारत हे धृतराष्ट्र ! हृषीकेशः हृषीकाणां ईशः स्वामी एवं पूर्वोक्तप्रकारेण गुडाकेशेन गुडाकायाः निद्रायाः ईशः गुडाकेशः तेन जितनिद्रेणार्जुनेन उक्तः सन् भाषितः सन् उभयोः सेनयोः चेत्यपरं सर्वेषां सुपर्णानां महीक्षितां राज्ञां चेत्यपर भीष्मद्रोणप्रमखतः भीष्मश्च द्रोणश्च भीष्मद्रोणौ भीष्मद्रोणयोः प्रमुखतः संमुखे रथोत्तमं सर्वेषां रथानां उत्तमः रथोत्तमः तं स्थापयित्वा इति एवं उवाच उक्तवान् । इतीति किम् । हे पार्थ हे अर्जुन ! त्वं एतान् कुरुन् कुरुवंशोद्भवान् राज्ञः पश्य अवलोकय । कथंभूतान् कुरून् । समवेतान् युद्धं कर्तुं एकत्र मिलितान् ॥ २४-२५ ॥ अर्थ : संजय - महाराज धृतराष्ट्रा, अर्जुनानें हृषीकेशाला असे सांगितलें असणं त्या महात्म्याने त्याचा उत्तम रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये भीष्म, द्रोण व सर्व राजे यांच्या समोर उभा केला आणि ''हे अर्जुना, युद्धासाठीं जमलेल्या या सर्व कौरवांना तूं पाहून घे'' असे म्हटले. ॥ २४-२५ ॥ विवरण :
तत्रापश्यत्स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् । अन्वय :
व्याख्या : पार्थः अर्जुनः तत्र रणभूमौ तान् अपश्यत् । तान् कान् । पितॄन् पितृव्यान् अथ तदनंतरं पितामहान् भीष्मादीन् च आचार्यान् द्रोणादीन् मातुलान् शल्यादीन् भ्रातॄन् दुर्योधनादीन् पुत्रान् पौत्रान् दुर्योधनादीनां पुत्रपौत्रान् सखीन् मित्राणि । कथंभूतान् तान् । स्थितान् युद्धाय कृतनिश्चयान् ॥ २६ ॥ अर्थ : तेव्हा अर्जुनानें त्या दोन्ही सैन्यामध्ये स्थित असलेल्या भूरिश्रवाप्रभृति पितृव्यांस, भीष्मादि पितामहांस, द्रोणाचार्यादि आचार्यांस, शल्यादि मातुलांस, भीम, दुर्योधनादि भ्रात्यांस, अभिमन्यु, लक्ष्मण प्रभृति पुत्रांस, पौत्रांस, अश्वत्थामाप्रभृति मित्रांस, द्रुपदादि श्वशुरांस, कृतवर्मा, भगदत्त इत्यादि इतर निरपेक्ष उपकार करणार्या सुहृदांस पाहिले आणि रणांगणांत प्राणत्याग करण्यास सज्ज होऊन उपस्थित झालेल्या त्या सर्व आप्तांस पाहून त्याला मोठी दया आली. परम दयेने युक्त होऊन तो कुंतीचा पुत्र विषाद पावला व दीन वचनाने असे बोलला - ॥ २६-२७ ॥ विवरण :
कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत । अन्वय :
व्याख्या : हे कृष्ण ! अहं इमं पुरोवर्तिनं स्वजनं बंधुवर्गं दृष्ट्वा अवलोक्य भ्रमामीति शेषः भ्रमं प्राप्नोस्मि । कथंभूतं स्वजनम् । युयुत्सुं योद्धुं इच्छतीति युयुत्सुः तम् । पुनः कथंभूतं स्वजनम् । समुपस्थितं सम्यक् उपस्थितं प्राप्तम् । भ्रममाह । मम गात्राणि हंद्रियाणि सीदन्ति विशीर्यंते चेत्यपरं मुखं परिशुष्यति शुष्कं भवति ॥ २८ ॥ अर्थ : अर्जुन -हे कृष्णा, युद्ध करण्याच्या इच्छेने रणांगणांत उपस्थित झालेल्या या स्वजनांस पाहून माझी सर्व गात्रे निर्बल होत आहेत. मुख शुष्क होत आहे. माझा देह कापूं लागला आहे. अंगावर रोमांच उभे रहात आहेत. हातांतून गांडीव गळत आहे. माझी त्वचा संतापाने दग्ध होत आहे. मी आतां स्थिर उभा रहाण्यास समर्थ नाहीं. माझे मन जद्यकाय भ्रमण पावत आहे. हे केशवा, मी अशुभ चिन्हे पहात आहें व संग्रामांत स्वजनांना मारून परिणामी हित होईल, असे मला वाटत नाहीं. हे कृष्णा, मी विजयाची इच्छा करीत नाहीं. राज्याची किंवा सुखाची इच्छा करीत नाहीं. हे गोविंदा, आम्हांला राज्य, भोग व जीवित यांचा काय उपयोग ! ॥ २८-३२ ॥ विवरण :
येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च । अन्वय :
व्याख्या : इमे परोवर्तिनः ते बंधुवर्गाः प्राणान् चेत्यपरं धनानि त्यक्त्वा मृत्युं स्वीकृत्य युद्धे अवस्थिताः स्थिताः । ते के । आचार्याः द्रोणाचार्यादयः चेत्यपरं पितरः भूरिश्रवादयः चेत्यपरं पुत्राः तथैव पितामहाः भीष्मादयः ॥ ३३ ॥ अर्थ : ज्यांच्यासाठी राज्य, भोग व सुख यांचीं आकांक्षा करावयाची ते हे आमचे आचार्य, पितर, पुत्र, पितामह, मातुल, श्वशुर, पौत्र, शालक व संबंधी या युद्धांत प्राण व धन यांचा त्याग करून उपस्थित झाले आहेत. ॥ ३३-३४ ॥ विवरण :
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन । अन्वय :
व्याख्या : हे जनार्दन ! जनान् दुष्टजनान् अर्दयति पीडयति इति जनार्दनः तत्संबुद्धौ । अहं त्रैलोक्यराज्यस्यापि त्रैलोक्यस्य राज्यं त्रैलोक्यराज्यं तस्य हेतोः एतान् बधुवर्गान् हन्तुं नेच्छामि महीकृते महीमात्रप्रात्यर्थं किं नु हन्तुं इच्छामि ? अपि तु नेच्छामि । धार्त्तराष्ट्रान् धृतराष्ट्रस्यपुत्राः धार्त्तराष्ट्राः तान् दुर्योधनादीन् निहत्य हत्वा नः अस्मान् का प्रीतिः संतोषः स्यात् ? अपि तु न स्यादेव ॥ । ३५ ॥ अर्थ : पण हे मधुसूदना, मी त्रैलोक्याच्या राज्यासाठींही यांना मारण्याची इच्छा करीत नाहीं. मग केवल पृथ्वीच्या राज्यासाठीं त्यांचा घात करीन, हे कसे शक्य आहे ! शिवाय या धृतराष्ट्रपुश्रांना मारून आमचें काय प्रिय होणार ग! उलट या आततायी धृतराष्ट्रपुत्रांना मारून आम्हांला पापच लागेल ! ( हे आततायी आहेत यांत संशय नाहीं. कारण आग लावणारा, विष घालणारा, हातांत शस्त्र घेऊन मारावयास धावून येणारा, धन, क्षत्रे व स्त्री यांचा अपहार करणारा, असे सहा प्रकारचे आततायी असतात. कौरवांनी आमचे हे सहाही अपराध केले आहेत. वारणावतांतील जतुगृहांत यांनीं आम्हाला जाळण्याचा यत्न केला. भीमाकडून विषान्न भक्षण करविलें व आतां हातांत शस्त्र घेऊन युद्धाला सज्ज झाले आहेत. व द्यूर्तात आमच्या खांडवप्रस्थांतील राज्याचा, क्षेत्राचा व द्रौपदीचा अपहार केला. तथापि त्यांना मारल्यास आम्हांला दोष लागेल.) म्हणून या आततायींचाही वध करणे आम्हांला योग्य नाहीं. कारण ते आमचे बांधव आहेत आणि हे माधवा, आम्ही स्वजनांना मारून सुखी कसे होऊं ! ॥ ३५-३७ ॥ विवरण :
यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः । अन्वय :
व्याख्या : कुलक्षयकृतं कुलक्षयेण कृतः कुलक्षयकृतः तं दोषं चेत्यपरं मित्रद्रोहे मित्राणां द्रोहः मित्रद्रोहः तस्मिन् पातकं यद्यपि न पश्यंति । अस्माभिः अस्मात् युद्धात् पापात् दोषात् निवर्तितुं कथं न ज्ञेयं परावृत्तौ बुद्धिः कर्त्तव्या ॥ ३८ ॥ अर्थ : वस्तुत: हा विचार त्यांच्याही मनांत यावयास पाहिजे होता, पण त्यांचे चित्त लोभाने विवेकशून्य झालें आहे. त्यामुळें ते कुलक्षयामुळें लागणारा दोष व मित्रद्रोहामुळें लागणारे पातक या थोर परिणामाकडे जरी पहात नसले तरी कुलक्षयकृत दोष व मित्रद्रोहजन्य पातक यांस जाणणारे आम्हीं या पापा- पासून निवृत्त व्हावे, हें कसे बरे न जाणावें ! ॥ ३८-३९ ॥ विवरण :
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः । अन्वय :
व्याख्या : हे कृष्ण ! कुलस्त्रियः कुलवत्यः स्त्रियः अधर्माभिभवात् अधर्मस्य अभिभवः अधर्माभिभवः तस्मात् प्रदुष्यन्ति दूषिताः भवन्ति ॥ ४० ॥ अर्थ : कुलक्षय झाला असतां सनातन कुलधर्म नाश पावतात. धर्म नष्ट झाला असतां अधर्म सर्वही कुलाला व्यापतो, अधर्मानें पराभूत झालेल्या कुळातील कुलस्त्रिया दूषित होतात. हे वार्ष्णेय कृष्णा, स्त्रिया दूषित झाल्या असतां वर्ण- संकर होतो, संकर कुलघातक्यांच्या व त्या कुलाच्याही नरकाला कारण होतो. त्यांच्या श्राद्धादि पिंडक्रिया व उदकादि तर्पणक्रिया लुप्त झाल्या असतां त्यांचे पितर अधोगतीस जातात. ॥ ४०-४२ ॥ विवरण :
दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः । अन्वय :
व्याख्या : कुलघ्नानां कुलघातकानां एतैः कथितैः दोषैः जातिधर्माः जातेः धर्माः वर्णधर्माः चेत्यपरं शाश्वताः परंपरया प्राप्ताः कुलधर्माः कुलस्य धर्माः उत्साद्यन्ते लुप्यन्ते । चकारात् आश्रमधर्मादयः लुप्यन्ते । कथंभूतैः दोषैः । वर्णसंकरकारकैः वर्णानां संकरः वर्णसंकरः वर्णसंकरं कर्वन्ति ते वर्णसंकरकारकाः तैः ॥ ४३ ॥ अर्थ : हे कृष्णा, कुलघ्नांच्या या वर्णसंकरकारक दोषांनी दीर्घ कालापासून चालत आलेले जातिधर्म व कुलधर्म विनाश पावतात आणि ज्यांचे कुलधर्म विनाश पावले आहेत, अशा मनुष्यांचा वास निश्चयाने नरकांत होतो, असे आम्हीं तज्ज्ञांच्या तोंडून ऐकले आहे. ॥ ४३-४४ ॥ विवरण :
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् । अन्वय :
व्याख्या : अहो इत्याश्चर्ये । बत इति खेदे । वयं यत् एतत् कुलक्षयरूपं महत्पापं महत् स्वजनवधरूपं च तत्पापं च महत्पापं कर्त्तुं व्यवसिताः निश्चयं कृतवन्तः । कथंभूताः वयम् । राज्यसुखलोभेन राज्यं च सुखं च राज्यसुखे राज्यसुखयोः लोभः राज्यसुखलोभः तेन स्वजनं बंधुवर्गं हन्तुं उद्यताः उत्कर्षेण यत्नं कुर्वन्तः ॥ ४५ ॥ अर्थ : अरेरे, आम्ही राज्य व सुख यांच्या लोभाने स्वजनांचा वध व महत्पाप करण्यास उद्युक्त झालों आहों, ही मोठी खेदाची गोष्ट आहे. यास्तव हातांत शस्त्रे घेतलेले धृतराष्ट्राचे पुत्र शस्त्ररहित असलेल्या व त्यांचा प्रतीकार न करणार्या मला जरी समरांगणांत मारतील, तरी तें मोठे कल्याणावहच होईल. ॥ ४५-४६ ॥ विवरण :
सञ्जय उवाच - अन्वय :
व्याख्या : हे धृतराष्ट्र ! अर्जुनः संख्ये संग्रामे एवं पूर्वोक्तप्रकारेण श्रीकृष्णं उक्त्वा रथोपस्थे रथस्य उपस्थं उपरिभागः रथोपस्थं तस्मिन् रथोपस्थे उपाविशत् उपविवेश । किं कृत्वा । सशरं शरेण सहितं सशरं शरेण बाणेन सहितं युक्तं चापं गांडीवं उत्सृज्य त्यक्त्वा । कथंभूतः अर्जुनः । शोक- संविग्नमानसः शोकेन संविग्नं मानसं यस्य सः शोकसंविग्नमानसः । संविग्नं प्रकंपितम् मानसं हृदयम् ॥ ४७ ॥
अर्थ : संजय - राजा, समरांगणांत कृष्णाला असे बोलून आणि शरांसह धनुष्याचा त्याग करून, ज्याचे मन शोकानें उद्विग्न झालें आहे, असा अर्जुन रथांत जाऊन बसला. ॥ ४७ ॥ विवरण : ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ |