|
श्रीमद् भगवद्गीता साङ्ख्ययोगः पहिल्या अध्यायात गीतेच्या उपदेशाची प्रस्तावना म्हणून दोन्ही सैन्यांतील जे महारथी आहेत त्यांचे व शंखध्वनीचे वर्णन करून, कृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा केला असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोन्ही सैन्यांतील स्वजनसमूह पाहून, शोक व मोहामुळे अर्जुन युद्धापासून निऋत्त होऊन शस्त्रास्त्रे टाकून विषाद करीत बसला, असे सांगून अध्याची समाप्ती केली होती. अशा स्थितीत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास काय सांगितले व कशाप्रकारे त्याला युद्धासाठी प्रवृत्त केले, हे सर्व सांगण्याची गरज असल्यामुळे, संजय अर्जुनाच्या स्थितीचे वर्णन करीत, दुसर्या अध्यायाचा प्रारंभ करीत आहे -
सञ्जय उवाच - अन्वय - तथा कृपया आविष्टं - तशा प्रकारे करुणेने व्याप्त - अश्रुपूर्णाकुलेक्षणं - ज्याचे डोळे अश्रूपूर्व व व्याकुळ झाले आहेत - च विषीदन्तं तं - आणि शोकयुक्त अशा त्या अर्जुनाला - मधुसूदनः इदं वाक्यं उवाच - भगवान मधुसूदन हे वचन बोलले ॥ १ ॥ व्याख्या : हे धृतराष्ट्र ! मधुसूदनः मधुं मधुनामानं दैत्यं सूदयतीति मधुसूदनः श्रीकृष्णः तं अर्जुनं प्रति इदं वक्ष्यमाणं वाक्यं उवाच उक्तवान् । कथंभूतं तम् । कृपया दयया आविष्टं व्याप्तम् । पुनः कथंभूतं तम् । अश्रुपूर्णाकुलेक्षणं अश्रुभिः पूर्णे आकुले व्याकुले ईक्षणे नेत्रे यस्य सः अश्रुपूर्णाकुलेक्षणः तम् । पुनः कथंभूतं तम् । तया उक्तप्रकारेण विषीदंतं विषीदतीति विषीदन् तम् ॥ १ ॥ अर्थ : संजय म्हणाला - राजा, पहिल्या अध्यायांत वर्णन केल्याप्रमाणे अर्जुन कृपायुक्त झाला, त्याचे नेत्र अश्रूंनी भरून आले त्यामुळे ते आकुल झाले. (१) विवरण :
श्रीभगवानुवाच -
अन्वय -
अर्जुन ! विषमे इदं कश्मलं - हे अर्जुना ! अयोग्य वेळी हा मोह - कुतः त्वा समुपस्थितम् ? - तुला कोणत्या कारणाने झाला - यतः - कारण - अनार्यजुष्टं अस्वर्ग्यं च अकीर्तिकरं अस्ति हा श्रेष्ठ पुरुषांकडून आचरलेला नव्हे, स्वर्ग प्राप्त करून देणारा नव्हे आणि कीर्ति देणारा पण नव्हे. ॥ २ ॥
व्याख्या :
हे अर्जुन ! कुतः हेतोः इदं कश्मलं मोहः त्वा त्वां विषमे संग्रामे समुपस्थितं प्राप्तः । कथंभूतं कश्मलम् । अनार्यजुष्टं आर्यैः जुष्टं न भवति तत् अनार्यजुष्टं आर्यैः श्रेष्ठपुरुषैः जुष्टं सेवितं न भवति । पुनः कथंभूतं कश्मलम् । अस्वर्ग्यं स्वर्गाय योग्यं न भवति तत् अस्वर्ग्यं अधर्म्यम् । पुनः कथंभूतं कश्मलम् । अकीर्तिकरं अकीर्तिं करोति तत् अकीर्तिकरं अयशस्करम् ॥ २ ॥ अर्थ : पण अशा रीतीने खेद करीत असलेल्या त्याला भगवान मधुसूदन म्हणाले - हे अर्जुना, या कठीण प्रसंगी तुला श्रेष्ठांनी न अंगिकारलेले व अकीर्ति करणारे हे पाप कोठून प्राप्त झाले ! तुझ्या मनांत ही दुर्बुद्धि कोठून उत्पन्न झाली ? अरे बाबा, असा दुर्बल होऊं नको. हे क्लैब्य तुला शोभत नाही, यास्तव हे शत्रूंना ताप देणार्या अर्जुना, हृदयाचे हे क्षुद्र दुर्बलत्व टाकून तू उठ. (२-३) विवरण : भगवंतांनी असे सांगितल्यावर, गुरुजनांच्या बरोबर होणारे युद्ध अनुचित असल्याचे प्रतिपादन करून, अर्जुन पुढील दोन श्लोकांत आपला निश्चय प्रकट करीत आहे -
अर्जुन उवाच - अन्वय - हे मधुसूदन ! सङ्ख्ये भीष्मं च द्रोणं - हे मधुसूदना ! रणभूमीवर भीष्म व द्रोण - अहं इषुभिः कथं प्रतियोत्स्यामि - मी बाणांनी कसाब रे त्यांचे विरुद्ध लढू ? - यतः अरिसूदन ! तौ पूजार्हौ स्थः - कारण हे अरिसूदना ! ते दोघे तर पूजनीय आहेत. ॥ ४ ॥ व्याख्या : हे मधुसूदन हे मधुदैत्यारिसूदन ! अहं संख्ये संग्रामे भीष्मं पितामहः चेत्यपरं द्रोणं गुरुं इषुभिः बाणैः कथं योत्स्यामि कथं युद्धं करोमि ? अपि तु न करिष्यामि ! कथंभुतौ भीष्मद्रोणौ पूजार्हौ पूजायां अर्हौ योग्यौ स्तः ॥ ४ ॥ अर्थ : अर्जुन म्हणाला - हे मधुसूदना, मी संग्रामांत भीष्म व द्रोण यांच्याशी बाणांनी कसा बरे युद्ध करूं ! कारण हे अरिसूदना, ते दोघेही पूजा करण्यास योग्य आहेत. (४) विवरण :
गुरूनहत्वा हि महानुभावान् अन्वय - महानुभावान् गुरून् अहत्त्वा - महानुभाव गुरुजनांना मारण्याऐवजी - इह लोके भैक्ष्यं अपि भोक्तुं श्रेयः - या जगात भिक्षा मागून सुद्धा खाणे हे कल्याणकारक आहे असे मला वाटते - हि गुरून् हत्वापि इह - कारण, गुरुजनांना मारून या जगात - रुधिरप्रदिग्धान् अर्थकामान् - रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप - भोगान् एव तु भुञ्जीय -भोगच मला भोगायचे ना ! ॥ ५ ॥ व्याख्या : अहं गुरून् द्रोणादीन् अहत्वा ’परलोके विरुद्धः गुरुवधः अस्ति’ तं गुरुवधं अकृत्वा इह अस्मिन् लोके भैक्षमपि भिक्षायाः अन्नं भैक्षं भोक्तुं भक्षितुं श्रेयः उचितं योग्योस्मि । अहं गुरून् द्रोणादीन् हत्वा इहैव लोके रुधिरप्रदिग्धान् रुधिरेण प्रदिग्धाः प्रकर्षेण लिप्ताः रुधिरप्रदिग्धाः तान् भोगान् राज्यभोगान् भुंजीय अश्नीयाम् । हि इति निश्चयेन । कथंभूतान् गुरून् । महानुभावान् महांतः श्रेष्ठाः अनुभावाः सामर्थ्यानि येषां ते महानुभावाः तान् । पुनः कथंभूतान् गुरून् । अर्थकामान् अर्थेषु द्रव्येषु कामो इच्छा येषां ते अर्थकामाः तान् ॥ ५ ॥ अर्थ : हे कृष्णा ! या प्रभावशाली गुरूंना न मारल्यामुळे आम्हांला या लोकी भिक्षान्न खाण्याचा प्रसंग आला, तरी ते श्रेयस्कर आहे, पण याच्या उलट या गुरूंना मारल्यास केवळ याच लोकीं त्यांच्या रक्ताने माखल्याप्रमाणें निंद्य असलेले अर्थ व काम हेच भोग मी भोगीन. (५) विवरण : अशा प्रकारे आपला निश्चय प्रकट केल्यावरही जेव्हा अर्जुनाचे समाधान झाले नाही आणि त्याला आपल्या निश्चयाबद्दल शंका वाटू लागली, म्हणून तो म्हणाला -
न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो- अन्वय - एतत् च न विद्म, - आम्हालात तर हे सुद्धा कळत नाही - यत् कतरत् नः गरीयः, - की युद्ध करणे वा न करणे यातील कोणते आमच्यासाठी श्रेष्ठ आहे - वा वयं जयेम वा ते नः जयेयुः - तसेच आम्ही विजयी होऊ अथवा ते आम्हाला जिंकतील - यान् हत्वा न जिजीविषामः - शिवाय ज्यांना मारून आम्ही जगू इच्छित नाही - ते धार्तराष्ट्राः प्रमुखे अवस्थिताः - ते हे आत्मीय असणारे धृतराष्ट्राचे पुत्रच आमच्यापुढे युद्धाला उभे आहेत. ॥ ६ ॥ व्याख्या : तथापि एवं सत्यपि अस्माकं जयं वा पराजयः भवेत् इति न ज्ञायते ! हे कृष्ण ! एतत् द्वयोः जयपराजयोः मध्ये नः अस्माकं कतरत् किं नाम गरीयः अधिकतरं भवति । यद्वा वयं एतान् धार्तराष्ट्रान् जयेम जेष्यामः । यदि वा अथवा ते धार्तराष्ट्राः नः अस्मान् जयेयुः जेष्यंति इति एवं वयं न विद्मः न जानीमः । किं च वयं यानेव धार्तराष्ट्रानेव हत्वा न जिजीविषामः जीवितुं नेच्छामः । कथंभूताः धार्त्तराष्ट्राः । प्रमुखे संमुखे अवस्थिताः स्थिताः ॥ ६ ॥ अर्थ : आम्हा पांडवांना युद्ध करणे व भिक्षान्न खाणॆ यांतील कोणते श्रेष्ठ आहे, ते कळत नाही. म्हणजे आमचा त्याविषयीं निश्चय होत नाही. तसेच या संग्रामांत ते आम्हांला जिंकतील किंवा आम्ही त्यांना जिंकू हेही आम्हांला ठाऊक नाही. शिवाय ज्या दुर्योधनादि बंधूंना मारून आम्हाला जिवंत रहाण्याची इच्छा होणार नाही, तेच हे धृतराष्त्रपुत्र् आमच्या समोर युद्धाला उभे राहिले आहेत. (६) विवरण : अशाप्रकारे कर्तव्याबद्दल निर्णय करण्याविषयी आपली असन्=मर्थता दाखविल्यावर अर्जुन भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन आपले निश्चित कर्तव्य काय आहे, हे सांगण्याची विनंती करीत आहे -
कार्पण्यदोषोपहतस्वभावः अन्वय - कार्पण्यदोष उपहतस्वभावः - कारुण्यरूपी कातरतेच्या दोषामुळे ज्याचा स्वभाव नाहीसा झाला आहे -च - आणि -धर्मसम्मूढचेताः - धर्माच्या बाबतीत ज्याचे चित्त मोहित झाले आहे असा मी - त्वां पृच्छामि, -त्म्हाला विचारतो -यत् - जे साधन -निश्चितं - निश्चितपणाने -श्रेयः स्यात - कल्याणकारक असेल - तत् मे ब्रूहि - ते तुम्ही मला सांगा - यत् - कारण - अहं ते शिष्यः, - मी तुमचा शिष्य आहे - अतः - म्हणून - त्वां प्रपन्नं - तुम्हांला शरणा आलेल्या अशा -मां शाधि - मला उपदेश करा. ॥ ७ ॥ व्याख्या : हे भगवन् ! अहं त्वां पृच्छामि अतः हेतोः मे मम यत् निश्चितं श्रेयः कल्याणं स्यात् तत् श्रेयः त्वं ब्रूहि । किं च अहं ते तव शिष्य शिषितुं शिक्षितुं योग्यः शिष्यः अस्मि । अतः हेतोः त्वं मां शाधि शिक्षय । कथंभूतं माम् । त्वां प्रपन्नं शरणागतम् । कथंभूतः अहम् । कार्पण्यदोषोपहतस्वभावः कार्पण्यं च दोषश्च कार्पण्यदोषौ कार्पण्यदोषाभ्यां उपहतः स्वभावो यस्य सः ’एतान् हत्वा कथं जीविष्याम इति कार्पण्यम्’ दोषः स्वकुलक्षयः ताभ्यां उपहतः अभिभूतः स्वभावः शौर्यादिलक्षणस्वभावः । पुनः कथंभूतः अहम् । धर्मसंमूढचेताः ’युद्धं त्यक्त्वा भिक्षाटनमपि क्षत्रियस्य धर्मो वा अधर्मः’ इत्येवंरूपे धर्मे संमूढं संदिग्धं चेतः अंतःकरणं यस्य सः ॥ ७ ॥ अर्थ : हे भगवन्, आत्म्याचे स्वरूप न जाणणे या दोषामुळे माझा क्षात्रधर्म नष्ट झाला आहे व त्यामुळेंच मी स्वधर्माविषयी विवेकशून्य झालो आहे. यास्तव माझे निश्चित श्रेय ज्यामुळे होईल, तेच कर्तव्य तूं मला सांग. मी तुझा शिष्य आहे व तुला शरण आलो आहे, यास्तव मला श्रेयाचा उपदेश कर. (७) विवरण : अशा प्रकारे उपदेश करण्यासाठी भगवंतांना विनंती करून अर्जुन आता विनंतीचा हेतू सांगत आपले विचार व्यक्त करीत आहे -
न हि प्रपश्यामि ममापनुद्याद् अन्वय - हि - कारण -भूमौ - भूमंडलाचे - असपत्नं - निष्कंटक - ऋद्धं - धन धान्य संपन्न - राज्यं -राज्य - च सुराणां - तसेच देवांचे - आधिपत्यं - स्वामित्व - अवाप्यपि, - मिळून सुद्धा - यत मम इंद्रियाणां - जो उपाय माझ्या इंद्रियांना - उच्छोषणं शोकं - सुकवून टाकणारा शोक - अप्नुद्यात् - दूर करू शकेल - तत् उपाय - असा उपाय - न प्रपश्यामि - मला दिसत नाही. ॥ ८ ॥ व्याख्या : हे भगवन् ! यत् कर्म मदीयं मम अयं मदीयः तं शोकं अपनुद्यात् अपनयेत् तत् कर्म अहं न प्रपश्यामि । यद्यपि अहं भुमौ पृथिव्यां ऋद्धं समृद्धं राज्यं अवाप्य प्राप्य चेत्यपरं सुराणां देवानां आधिपत्यमपि ऐंद्रं पदमपि अवाप्य प्राप्य मम शोकापनोदनोपायं शोकस्य अपनोदनं दूरीकरणं शोकापनोदनं शोकापनोदनस्य उपायः शोकापनोदनोपायः तं न प्रपश्यामि । हि इति निश्चयेन । कथंभूतं शोकम् । इंद्रियाणां उच्छोषणं उत् शोषयतीति उच्छोषणः तं उत् उत्कषेण शोषयति शुष्कं करोति । कथंभूतं राज्यम् । असपत्नं न विद्यते सपत्नां श्त्रवः यस्मिन् तत् असपत्नम् ॥ ८ ॥ अर्थ : मला या भूलोकांतील निष्कंटक व समृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचेही राज्य प्राप्त झाले, तरी त्याच्या योगानेंही माझ्या इंद्रियांना शुष्क नरणारा हा शोक निवृत्त होईल, असे मला वाटत नाही. यास्तव तूं मला शोकाचा नाश होण्यासाठी मोक्षसाधनाचा उपदेश कर. (८) विवरण : अर्जुन गप्प झाल्यावर श्रीकृष्णांनी काय केले, अशी जिज्ञासा धृतराष्ट्राने दाखविल्यावर संजय म्हणतो -
सञ्जय उवाच -
अन्वय -
हे परन्तप ! - हे राजा ! - गुडाकेशः - निद्रेला जिंकणार्या अर्जुनाने - हृषीकेशं, - अंतर्यामी श्रीकृष्णाला - एवं उक्त्वा - असे सांगून - तथापि न योत्स्ये - मी युद्ध करणार नाही - इति ह गोविंदं - असे स्पष्टपणे गोविंदाला - उक्त्वा तूष्णीम् बभूव - म्हणून मग तो गप्प बसला. ॥ ९ ॥
व्याख्या :
हे धृत्रराष्ट्र ! हे परंतप ! परान् शत्रून् तापयति संतापयतीति परंतपः अर्जुनः गोविंदं गां वेदलक्षणां वाणीं विंदतीति गोविंदः तं एवं ’अहं संख्ये संग्रामे भीष्मद्रोणौ बाणैः कथं योत्स्यामि’ इति युद्धायोग्यतां युद्धस्य अयोग्यता युद्धायोग्यता तां उक्त्वा तदनंतरं अहं न योत्स्ये इति एवं उक्त्वा तूष्णीं बभूव ह । कथं भूतं गोविंदम् । हृषीकेशं हृषीकाणां इंद्रियाणां ईशः हृषीकेशः तम् । कथंभूतः परंतपः । गुडाकेशः गुडाकायाः निद्रायाः ईशः स्वामी गुडाकेशः जितनिद्रः ॥ ९ ॥ अर्थ : संजय म्हणाला - राजा, अर्जुन हृषेकेशाला असे बोलून ’काही झालें तरी मी युद्ध करणार नाही’ असे त्याला सांगून स्वस्थ बसला. तेव्हा, हे धृतराष्ट्र महाराज, हृषीकेश दोन्ही सैन्याच्या मध्यभागी स्थित होऊन याप्रमाणें खेद करणार्या अर्जुनाला असे बोलला - (९-१०) विवरण :
श्रीभगवानुवाच - अन्वय - अर्जुन ! - हे अर्जुना ! - अशोच्यान् त्वं - तूं शोक करण्यास योग्य नसणार्या माणसांसाठी - अन्वशोचः च - शोक करीत आहेस आणि - प्रज्ञावादान् भाषसे, - पंडितांप्रमाणे वचने बोलत आहेस - परंतु गत आसून् च - परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी - अगतासून् - ज्यांचे प्राण गेलेले नाहीत त्यांच्यासाठीसुद्धा - पण्डिताः न अनुशोचति - पंडित लोक शोक करीत नाहीत. ॥ ११ ॥ व्याख्या : हे अर्जुन ! त्वं अशोच्यान् शोचितुं योग्याः शोच्याः न शोच्याः अशोच्याः तान् शोकानर्हान् बंधून् अन्वशोच्यः अनुलक्षेण सोचितवान् असि । चेत्यपरं प्रज्ञावादान् प्रज्ञावतां वादां प्रज्ञावादाः तान् प्रज्ञावतां पंडितानां वादाः शब्दाः भाषसे त्वं पंडितः नासि । पंडिताः ज्ञानिनः गतासून् यथाः असवः प्राणाः येषां ते गतासवः तान् गतासून् गतप्राणा बंधून् । चेत्यपरं अगतासून् जीवतः बंधून् नानुशोचंति ॥ ११ ॥ अर्थ : श्रीभगवान म्हणाले - हे अर्जुना, तूं शोक करण्यास योग्य नसलेल्या भीष्म-द्रोणांसाठी शोक केला आहेस व गोष्टी तर बुद्धिमानांच्या सांगतोस. पण बाबारे, जे पंडित, म्हणजे आत्मज्ञानी नाहीत. भीष्मादिक सद्वर्तनशील आहेत. त्यामुळे मरणोत्तर त्यांचा उत्कर्षच होणार हे निर्विवाद आहे. ज्यांचा उत्कत्ष होतो, ते केव्हांही शोच्य नसतात. शिवाय ते परमार्थ आत्मरूपाने नित्य आहेत. त्यामुळे त्यांचा नाशच संभवत नाही. या दृष्टीनेंही ते अशोच्य आहेत. पण अशा अशोच्य असलेल्या भीष्मादिकांविषयींही माझ्यामुळे हे सर्व मरत आहेत, पण त्यांचा वियोग झाल्यावर ’मी राज्यसुखादिकांस घेऊन काय करणार !’ (१-३२,३३) असा त्यांच्याविषयीं शोक केलास व इकडे तर मोठ्या तत्त्ववेत्त्याच्या गोष्टी (१-४०,४५) सांगत आहेस. म्हणजे एखाद्या वेड्याप्रमाणे तू आपल्या ठिकाणीं मूढत्व व पांडित्य असे परस्परविरोधी भाव दाखवीत आहेस. पण आत्मज्ञानी पंडित मेलेल्या व जिवंत असलेल्या लोकांविषयीं शोक करीत नाहींत. मेलेल्याविषयीं शोक प्रसिद्ध आहे आणि मूर्ख, अज्ञ, दुराचारी इत्यादि आप्त जिवंत असतांनाही शोच्य होतात, हेंही सर्वत्र प्रसिद्ध आहे; पण आत्मज्ञानी त्यांतील कोणाविषयींच कधींही शोक करीत नाहीत. (११) विवरण :
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः । अन्वय - जातु अहं न आसम्, - कोणत्याही काळी मी नव्हतो, - त्वं न आसीः, - वा तू नव्हतास - अथवा इमे जनाधिपाः न आसन् - अथवा हे राजेलोक नव्हते - इति तु न एव च - असे तर मुळीच नाही, तसेच - अतः परं वयं - यापुढे आपण - सर्वे न भविष्यामः - सर्वजण असणार नाही - एवं न एव - असेही नाही. ॥ १२ ॥ व्याख्या : यथा अहं परमेश्वरः जातु कदाचित् ’लीलाविग्रहस्य लीलया विग्रहो देहः यस्यः सः लीलाविग्रहः तस्य मम आविर्भावे चेत्यपरं तिरोभावेपि’ नासं इति न अपि तु न आसम् । तथा त्वमपि आसीः । इमे जनाधिपाः जनानां अधिपाः जनाधिपाः राजानः नासन् इति न अपि तु आसन् । तथा अतः परं इतः उपरि वयं सर्वे न भविष्यामः इति न अपि तु भविष्यामः स्थास्याम एव । जन्ममरणशून्यत्वात् ॥ १२ ॥ अर्थ : भीष्मादि अशोच्य कां ! तर ते नित्य आहेत म्हणून. फार काय पण मी, तूं व हे राजे या जन्माच्यापूर्वीं नव्हतो असे नाही व मेल्यावर नसूं असेंही नाही. तर आम्ही आत्मरूपानें तिन्ही काळीं नित्यच आहों. आता आत्मा नित्य कसा याविषयी दृष्टांत. (१२) विवरण : भगवंत आत्म्याच्या नित्यतेचे प्रतिपादन करून आता त्याच्या निर्विकारतेचे प्रतिपादन करीत आत्म्यासाठी शोक करणे अनुचित असल्याचे उदाहरण देऊन सांगतात -
देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा । अन्वय - यथा देहिनः - ज्याप्रमाणे जीवात्म्याला - अस्मिन् देहे - या देहात - कौमारं यौवनं च - बालपण तारुण्य आणि - जरा प्राप्यते, - वार्धक्य येते - तथा देहान्तर प्राप्तिः - त्याप्रमाणे दुसरे शरीत मिळते - तत्र - त्याबाबतीत - धीरः न मुह्यति - धैर्यवान माणून मोहित होत नाहीत. ॥ १३ ॥ व्याख्या : यथा देहिनः देहोस्यास्तीति देही तस्य देहिनः देहाभिमानिनः जीवस्य अस्मिन् देहे स्थूलदेहे कौमारं चेत्यपरं यौवनं तारुण्यं चेत्यपरं जरा भवति । तथा देहनाशे सति देहाभिमानिनः जीवस्य देहांतरप्राप्तिः अन्यः देहः इति देहांतरं देहांतरस्य प्राप्तिः देहांतरप्राप्तिः भवति । अतः हेतोः धीरः धीमान् तत्र देहनाशोत्पत्त्योः न मुह्यति मोहं न प्राप्नोति आत्मा मृतः चेत्यपरं जातः इति न मन्यते ॥ १३ ॥ अर्थ : देहाला ’हा मी’ किंवा ’हा माझा’ असे जो समजओ तो देही, अशा देहाभिमानी आत्म्याला याच देहांत बाल्यावस्था, तारुण्य व वृद्धावस्था अशा तीन परस्परविरुद्ध अवस्था जशा प्राप्त होतात, त्यांतेल एका अवस्थेचा नाश झाला असतां आत्म्याचा नाश, किंवा दुसर्या अवस्थेचा आरंभ झाला असतां आत्म्याचा आरंभ-जन्म असा होत नाही, तर स्वतःच्या सत्-चित् सुखरूपानें निर्विकार असलेल्या आत्म्यालाच जशी दुसरी, तिसरी अवस्था प्राप्त होते, तशीच त्या निर्विकार असलेल्या आत्म्याला दुसरी देहाची प्राप्ति होते. मनुष्य लहानाचा मोठा झाला व मोठ्याचा म्हातारा जरी झाला तरी त्याच्या आत्मसरूपांत कांहीच फरक पडत नाही, हे प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे पूर्वदेह सोडून दुसरा देह घेतांना त्याच्या स्वरूपांत यत्किंचितही फरक पडत नाही. याप्रमाणें आत्मा निर्विकार व नित्य असल्यामुळे आत्मज्ञानी पुरुषशरीराबरोबर आत्मा मरतो असे समजून मोहित होत नाही. (१३) विवरण : पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी आत्म्याची नित्यता व निर्विकारता यांचे प्रतिपादन केले. हे ऐकून असे वाटते की आत्मा नित्य निर्विकार असला, तरी बंधु-बांधवांच्या वियोगाने प्रत्यक्ष दुःखाचा अनुभव येतो मग शोक होणारच ना ? यावर संयोग-वियोग इत्यादि अनित्य असल्याचे सांगून ते सहन करण्याची आज्ञा देतात -
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः । अन्वय - कौन्तेय ! - हे कुन्तीपुत्रा ! - शीतोष्ण सुखदुःखदा - थंडी, उष्णता व सुख दुःख देणारे - मात्रास्पर्शाः तु - इंद्रिये आणि विषयांचे संयोग तर - आगमापायिनः च - उत्पत्ति-विनाशशील आणि - अनित्याः अस्ति - अनित्य आहेत - अतः भारत ! - म्हणून हे भारता ! - तान् तितिक्षस्व - त्यांना तू सहन कर. ॥ १४ ॥ व्याख्या : हे कौन्तेय हे भारत ! मात्रास्पर्शाः मात्राणां इंद्रियवृत्तीनां स्पर्शाः विषयसंबंधाः मात्रास्पर्शाः शीतोष्णसुखदुःखदाः शीतं च उष्णं च सुखं च दुःखं च शीतोष्णदुखदुःखानि शीतोष्णसुखदुःखानि ददति ते तथोक्ताः संतीति शेषः । कथंभूताः मात्रास्पर्शाः । आगमापायिनः उत्पत्तिविनाशवंतः । पुनः कथंभूताः मात्रास्पर्शाः । अनित्याः अस्थिराः त्वं तान् सुखदुःखादिप्रदान् इंद्रियाणां विषयसंबंधान् तितिक्षस्व विवेकेन सहस्व । कौंतेय ! भारत ! इति संबोधनद्वयेन उभयकुलविशुद्धस्य तव अज्ञानं अनुचितं इति भावः ॥ १४ ॥ अर्थ : पण आत्मा नित्य आहे असे जरी कळले तरी शीतोष्णादिकांमुळे होणारा लौकिक मोह व शोक यांचे निवारण होत नाही अशी शंका अर्जुन यावर घेईल, असे समजून भगवान म्हणाले - हे अर्जुना, इंद्रियांचे विषयांशी होणारे संबंध किंवा इंद्रियें व विषय हे दोन्ही शीतोष्णाच्या द्वारा सुखदुःखादि देणारे आहेत. इंद्रियांच्या द्वारा विषय सुख-दुःख देतात, हे प्रसिद्ध आहे. सुख व दुःख हे अंतःकरणाचे धर्म आहेत. उत्पन्न होऊन विनाश पावणें हेंच अनित्यत्वाचे लक्षण आहे. याप्रमाणें सुख-दुःख हे क्षेत्रधर्म असल्यामुळे व अनित्य असल्यामुळे अनुकूल प्रतिकूलतेच्या द्वारा सुख-दुःख देणार्या मात्रास्पर्शांत तूं सहन कर. त्यांची जरी प्राप्ति झाली तरी तूं हर्ष किंवा विषाद मानूं नकोस. यांना सहन करणें, यावांचून दुसरा उपाय नाही. (१४) विवरण : हे सर्व सहन करण्यामुळे काय लाभ होईल, यावर भगवंत म्हणतात -
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ । अन्वय - हे पुरुषर्षभ ! - हे पुरुषश्रेष्ठा ! - सम सुखदुःखं - सुखदुःखाला समान मानणार्या - यं धीरं पुरुषं - ज्या धीर पुरुषाला - एते हे इंद्रियांचे विषयांशी संयोग - न व्यथयन्ति, - व्याकुळ करीत नाहीत - सः अमृतत्त्वाय कल्पते - तो पुरुष मोक्षाला योग्य ठरतो. ॥ १५ ॥ व्याख्या : हे पुरुषर्षभ हे पुरुषश्रेष्ठ ! एते मात्रास्पर्शाः यं पुरुषं न व्यथयंति न पीडयंति हीति निश्चयेन । सः पुरुषः अमृतत्वाय मोक्षाय कल्पते योग्यो भवति । कथंभूतं पुरुषम् । समदुःखसुखं समे दुःखसुखे यस्य सः समदुःखसुखः तम् । पुनः कथंभूतं पुरुषम् । धीरं धियं ईरतीति धीरः तं धियं बुद्धिं ईरति चिदाभासद्वारा धीसाक्षिणं प्रेरयति ॥ १५ ॥ अर्थ : अर्जुना, सुख व दुःख यांना समान लेखणार्या, म्हणजे सुख प्राप्त झाले असतां हर्ष न मानणार्या व दुःख प्राप्त झाले असतां विषाद न मानणार्या ज्या नित्यानित्य विवेकी व विरक्त पुरुषाला हे शीतोष्णादिक किंवा शीतोष्ण देणारे मात्रास्पर्श पीडा देत नाहींत, तो मोक्षाचा अधिकारी होतो. याहि कारणाने शोक व मोह न करतां शीतोष्णादिकांस सहन करणें उचित होय. (१५) विवरण : नित्य व अनित्य वस्तूंच्या विवेचनाची रीत सांगण्यासाठी दोन्हींची लक्षणे सांगतात -
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः । अन्वय - असत् भावः न विद्यते - असत् वस्तूला अस्तित्व नसते - तु सतः - आणि सत् वस्तूचा - अभावः न विद्यते, - अभाव असत नाही - एवं - अशाप्रकारे - अनयोः उभयोः अपि - या दोहोंचेही - अन्तः - तत्त्वः - तत्त्वदर्शिभिः दृष्टः - तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिलेले आहे. ॥ १६ ॥ व्याख्या : असतः अविद्यमानस्य शीतोष्णादेः भावः सत्ता आत्मनि न विद्यते तथा सतः सत्स्वभावस्य आत्मनः अभावः विनाशः न विद्यते । एवं अनयोः उभयोः सदसतोः अंतः निर्णयः तत्त्वदर्शिभिः तत्त्वं वस्तु दर्शयंति ते तत्त्वदर्शिनः तैः दृष्टः अवलोकितः ॥ १६ ॥ अर्थ : अविद्यमान शीतोष्णादिकांचे अस्तित्व संभवत नाहीं व विद्यमान आत्म्याचा अभाव संभवत नाही. या दोन्ही गोष्टींचा निर्णय तत्तववेत्यांनी साक्षात् अनुभविला आहे. शिवाय पदार्थाच्या स्वतूपांत जो बदल होतो, त्याला विकार असे म्हणतात आणि विकार एकाच स्वरूपांत कधीं रहात नाही. तेव्हां क्षणोक्षणीं बदलणार्या वस्तूला सत् कसें म्हणता येईल ! आणि जी सत् नसलेली वस्तू तिला विद्यमान कोण म्हणेल ! शीतोष्ण, सुख-दुःख, इत्यादि द्वंद्वे क्षणोक्षणी बदलणारी आहेत. पण सद्६रूप आत्मा केव्हांही नाही, असे होत नाही. देहादिकांचा अभाव होणे हा आत्म्याचा अभाव नव्हे व देह जरी विद्यमान असल्यासारखा भासतो, तरी तो वस्तुतः विद्यमान नाहींच. कारण तो विकार पावणारा आहे. हा सत् व असत् यांचा निर्णय तत्त्ववेत्त्यांना करता येतो. ते कधींही न बदलणार्या चैतन्यात्म्याला असत् समजत नाहीत व क्षणोक्षणीं बदलणार्या आनात्मवस्तूला सत् समजत नाहींत. (१६) विवरण :
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् । अन्वय - येन - ज्याने - इदं सर्वं - हे संपूर्ण जगत् (दृष्य वर्ग) -ततम् व्याप्तम् - व्यापून टाकले आहे तत् तु - ते तर - अविनाशी अस्ति - अविनाशी आहे - इति विद्धि - असे तू जाण - अस्य अव्ययस्य - या अविनाशीचा - विनाशं कर्तुं - विनाश कराण्यास - कश्चित् न अर्हति - कोणीही समर्थ नाही.॥ १७ ॥ व्याख्या : येन सद्रूपेण वस्तुना सर्वं संपूर्णं इदं दृश्यजातं साक्षित्वेन देहादिकं ततं व्याप्तम् । हे अर्जुन ! त्वं तत्तु आत्मस्वरूपं तु अविनाशि न विद्यते विनाशो यस्य तत् अविनाशि विद्धि जानीहि । कश्चित् विषयः इंद्रियसंनिकर्षादिरूपो हेतुर्वा अस्य स्फुरणरूपस्य वस्तुनः विनाशं नाशं कर्तुं नार्हति न योग्यो भवति । कथंभूतस्य अस्य । अव्ययस्य न विद्यते व्ययो नाशो यस्य तत् अव्ययं तस्य अव्ययस्य ॥ १७ ॥ अर्थ : हे अर्जुना, असें जे सत् तत्त्व तेंच ब्रह्म आहे. त्याने या सर्व असत् वस्तूंना व्यापले आहे, म्हणून ते अविनाशी आहे, असे तूं समज. विनाश न पावणें हा त्याचा स्वभावच आहे. शिवाय या ’सत्’ संज्ञक आत्म्याचा विनाश करण्यास ईश्वरही समर्थ नाही. कारण तो सर्वांशी अविरुद्ध आहे व ज्या दोन पदार्थांत विरोध असतो, त्यांतील बलवान दुर्बलाचा नाश करतो, असा अनुभव आहे. हे अविनाशी तत्त्व सर्वांचा आत्मा असल्यामुळेंच याचा नाश करण्यास कोणी समर्थ होत नाही. आता असत् काय तेंही सांगतो. (१७) विवरण : अशा प्रकारे सत् तत्त्वाचे स्पष्टीकरण झाल्यानंतर पूर्वी सांगितलेली असत् वस्तू काय आहे, या जिज्ञासेविषयी भगवंत म्हणतात -
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः । अन्वय - अस्य अनाशिनः - या नाशरहित - अप्रमेयस्य - अप्रमेय - नित्यस्य - नित्यस्वरूप अशा - शरीरिणः - जीवात्म्यांचे - इमे देहा - हे सर्व देह - अन्तवन्तः उक्ताः, - नाशवंत आहेत असे म्हटले गेले आहेत - तस्मात् - म्हणून - भारत युध्यस्व - हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. ॥ १८ ॥ व्याख्या : नित्यस्य सर्वदैकरूपस्य शरीरिणः शरीरं अस्यास्तीति शरीरी तस्य शरीरिणः देहाभिमानिनः जीवस्य इमे सुखदुःखादिधर्मकाः देहाः तत्त्वदर्शिभिः तत्त्वज्ञैः उक्ताः आत्मनः विनाशो नास्ति सुखदुःखादिसंबंधः नैव तस्मात् मोहजं शोकं त्यक्त्वा युद्ध्यस्व धर्म्यं मा त्याक्षीः । कथंभूतस्य शरीरिणः । अनाशिनः नाशो यस्यास्तीति नाशी न नाशी अनाशी तस्य नाशरहितस्य । पुनः कथंभूतस्य शरीरिणः । अप्रमेयस्य अपरिच्छिन्नस्य । कथंभूताः देहाः । अंतवंतः अंतः नाशः विद्यते येषां ते अंतवंतः ॥ १८ ॥ अर्थ : या पूर्वोक्त नित्य, अविनाशी, अप्रमेय, शरीरी आत्म्याचे हे प्रत्यक्ष असलेले देह विनाशी आहेत. यास्तव, भीष्मादिकांच्या आत्म्याचा नाश होणें अशक्य असल्यामुळें व देह चिरकाल स्थित होण्याचा असंभव असल्यामुळें तूं प्राप्त युद्ध कर. भीष्मादिकांच्या आत्म्याविषयीं शोक करूं नको व देहासाठींही विषाद पावूं नको. असे असल्यामुळे या युद्धांत भीष्मादिक माझ्या हातून मारले जाणार, मी त्यांचा हिंसक होणार, असें जे तुला वाटत आहे तो भ्रम आहे. आता एक श्रुतिवचन दाखवितात. (१८) विवरण : पुढील श्लोकांकधून आत्म्यास मारणारा किंवा मरणारा असे मानणे हे अज्ञान होय. पण आत्मा मारला जात नाही याचे कारण काय ? भगवंत आत्म्यामध्ये सर्व प्रकारच्या विकारांचा अभाव असल्याचे सांगत त्याच्या स्वरूपाचे प्रतिपादन करीत आहेत -
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्
अन्वय -
एनं हन्तारं - हा आत्मा मरणारा आहे - इति यः वेत्ति, - असे जो कोणी समजतो - च एनं हतं यः मन्यते, - तसेच हा मेला असे जो कोणी मानतो - तौ उभौ न विजानितः - ते दोघे नाणत नाहीत - यतः - कारण - अयं न हन्ति - हा आत्मा वस्तुतः कुणालाही मारत नाही - च न हन्यते - तसेच मारलाही जात नाही. ॥ १९ ॥
व्याख्या :
यः पुरुषः एनं आत्मानं हंतारं हंतीति हंता तं वेत्ति यः पुरुषः एनं आत्मानं हतं मृतं मन्यते तौ उभौ देहाभिनानेन एनं अविकारिणं आत्मानं न विजानीतः विवेकेन न जानीतः । अयं आत्मा न हंति न ह्न्यते ॥ १९ ॥ अर्थ : जो अज्ञ या प्राकृत आत्म्याला हननक्रिया करणारा समजतो व जो आत्मा हननक्रियेचा विषय होतो असें जाणतो, म्हणजे आत्मा हननक्रियेचा कर्ता व कर्म होतो, असें जो जाणतो; ते दोघीही आत्मस्वरूपाचे अनभिज्ञ आहेत. कारण तो कोणाचे हनन करीत नाहीं व कोणाकडूनही हनन केला जात नाही. देहाने दुसर्याला मारले म्हणजे मी याला मारले व दुसर्याने याच्या देहाला मारले म्हणजे मलाच यानें मारले असे जे समजतात, ते दोघेही आत्म्याचें निर्विकार स्वरूप जाणत नाहींत. ज्याअर्थीं तो निर्विकार आहे, त्याअर्थीं ’मी हंता आहे’ इत्यादि ज्ञान, हे अज्ञान आहे. कारण तो निर्विकार असल्यामुळेंच कोणत्याही क्रियेचा कर्ता किंवा कर्म होत नाही. प्रत्येक लौकिक वस्तूला अवश्य होणारे जन्मादि सहा विकार आत्म्याला होत नाहीत. कारण तो केव्हांही उत्पन्न होत नाही. म्हणून अज आहे. मरत नाही म्हणून नित्य आहे. तो नसून उत्पन्न होणारा किंवा असून नाश पावणारा नाही. तो शाश्वत व पुराण असून हन्यमान शरीराबरोबर हत होत नाही. म्हणजे तो कोणत्याही विक्रियेचा विशय होत नाही. यांतील पहिला मंत्राने आत्मा कोणत्याही कर्माचा कर्ता व कर्म होत नाही, असे सांगून दुसर्या मंत्रांत ’आत्मा निर्विकार आहे’ याशिषयी हेतु सांगितला. आता त्याचाच उपसंहार करतात. (१९-२०) विवरण : आता सांगतात की आत्मा कोणास का मारत नाही ?
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् । अन्वय - पार्थ - हे पृथापुत्र अर्जुना - एनं - हा आत्मा - अविनाशिनं - नाशरहित - नित्यं - नित्य - अजं च - अजन्मा आणि - अव्ययं - अव्यय आहे असे - यः पुरुषः वेद - जो कोणी पुरुष जाणतो - सः - तो - कं कथं घातयति - कुणाला कसे बरे ठार करवील - तथा कं कथं हन्ति - तसेच कुणाला कसे बरे मारील. ॥ २१ ॥ व्याख्या : हे पार्थ ! पृथायाः कुंतेः अपत्यं पुमान् पार्थः तत्संबुद्धौ हे पार्थ हे अर्जुन ! यः पुरुषः एनं आत्मानं वेद जानाति सः पुरुषः कं हंति वा कथः हंति । एवंभूतस्य आत्मनः वधे साधनाभावात् साधनस्य अभावः साधनाभावः तत्मात् । तथा स्वयं प्रयोजको भूत्वा अन्येन पुरुषेण कं घातयति वा कथं घातयति । कथंभूतं एनं । अविनाशिनं नाशरहितम् । पुनः कथंभूतम् । नित्यं वृद्धिशून्यम् । पुनः कथंभूतम् । अजं जन्ममरणशून्यम् । पुनः कथंभूतम् । अव्ययं न विद्यते व्ययो क्षयः यस्य सः अव्ययः तं क्षयशून्यम् ॥ २१ ॥ अर्थ : जो मरणरहित, विपरिणामरहित, अज, अव्यव आत्म्याला जाणतो, तो आत्मज्ञानी पुरुष कोणाला कसा मारणार व दुसर्याकडून तरी कोणाला कसा मारविणार ! तो कधीच कोणाला मारत नाही व मारवीत नाही. (२१) विवरण : आत्म्याचा एका शरीराशी संबंध सुटून दुसर्या शरीराशी संबंध जडतो, त्यात त्याला अत्यंत कष्ट होतात, म्हणून त्याच्यासाठी शोक करणे अयोग्य कसे ? त्यावर भगवंत म्हणतात -
वासांसि जीर्णानि यथा विहाय अन्वय - यथा नरः - जसा पुरुष - जीर्णानि वासांसि विहाय - जुनी वस्त्रे टाकून देऊन - अपराणि नवानि गृह्णाति - दुसरी नवी वस्त्रे घेतो - तथा - त्याप्रमाणेच - देही - जीवात्मा - जीर्णानि शरीराणि - जुनी शरीरे - विहाय - टाकून देऊन - अन्यानि - दुसर्या - नवानि संयाति - नवीन शरीरांत जातो. ॥ २२ ॥ व्याख्या : यथा नरः जनः जीर्णानि वासांसि वस्त्राणि विहाय त्यक्त्वा अपराणि अन्यानि नवानि नूतनानि गृह्णाति । तथा देही देहः अस्यास्तीति देही देहाभिमानी जीवः जीर्णानि वयसा तपसा वा कृशानि शरीराणि भीष्मादिशरीराणि विहाय त्यक्त्वा नवानि नूतनानि अन्यानि देवादिशरीराणि संयाति सम्यक् गर्भवासादि क्लेशव्यतिरेकेण प्राप्नोति ॥ २२ ॥ अर्थ : आता आत्मा अविनाशी, निर्विकार इत्यादि कसा ? एक दृष्टांत सांगतो. ज्याप्रमाणें पुरुष जुनीं वस्त्रें टाकून नवी वस्त्रें धारण करतो, पण त्यामुळें त्याच्यामध्यें कोण्अत्याही प्रकारचा विकार - बदल झालेला दिसत नाही, त्याचप्रमाणे जराजर्जर झालेले शरीर टाकून दुसरे नवे शरीर धारण करणार्या आत्म्यामध्येंही कांहा विकार होत नाही. तो आपल्या अविकृत स्वरूपानेंच नवीन शरीरास प्राप्त होतो. (२२) विवरण : पुढील तीन श्लोकात अन्य प्रकाराने आत्म्याची नित्यता, निराकारता आणि निर्विकारता यांचे प्रतिपादन करीत त्याच्य अविनाशाच्या शंकेने शोक करणे अनुचित असल्याचे सिद्ध करतात -
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
अन्वय -
एनम् - या आत्म्याला - शस्त्राणि न छिन्दन्ति - शत्रे कापू शकत नाहीत - एनम् - या आत्म्याला - पावकः न दहति - अग्नी जाळू शकत नाही - एनम् - या आत्म्याला - आपः - पाणी - न क्लेदयन्ति - भिजवू शकत नाही - च एनम् - तसेच या आत्म्याला - मारुतः - वारा - न शोषयति - वाळवू शकत नाही. ॥ २३ ॥
व्याख्या :
शस्त्राणि अतितीक्ष्णानि खड्गादीनि एनं आत्मानं न छिंदंति द्विधा कर्तुं न शक्नुवंति । पावकः अग्निः एनं आत्मानं न दहति भस्मीकर्तुं न शक्नोति । तथा आपः उदकानि एनं आत्मानं न क्लेदयंति आद्रीकर्तुं न शक्नुवंति । चेत्यपरं मारुतः वायुः एनं आत्मानं न शोषयति नीरसं कर्तुं न शक्नोति ॥ २३ ॥ अर्थ : कारण आम्याला शस्त्रें तोडीत नाहींत, म्हणजे ओऋथ्वीचा त्याच्यावर परिणाम होत नाही. त्याचप्रमाणें आप, तेज व वायुनेंही क्रमानें क्लेदन, दहन व शोषण हा परिणाम करूं शकत नाहीत. कारण तो भूतांचा अविषय आहे, त्यामुळें अविक्रिय आहे. म्हणूनच हा आत्मा अच्छेद्य, अदाय, अक्लेद्य व अशोच्य आहे. म्हणजे शत्रानें त्याचा छेद् होत नाही, अग्नीनें दाह होत नाही, पाण्याने तो कुजत नाही व वायूने शुष्क होत नाही. म्हणूनच तो नित्य, आकाशादि सर्वांना व्यापणारा, स्थिर व अचल आहे. त्यामुळेंच चिरकालीन आहे. एखाद्या कारणापासून कार्यरूपाने नवीन उत्पन्न झालेला नाही. (२३-२४) विवरण :
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते । अन्वय - अयं अव्यक्तः - हा आत्मा अव्यक्त आहे - अयं अचिन्त्यः - हा आत्मा अचिंत्य आहे - च अयं अविकार्यः उच्यते - तसेच हा आत्मा विकाररहित आहे असे म्हटले जाते. - तस्मात् एनं - म्हणून या आत्म्याला - एवं - अशा प्रकारे - विदित्वा - जाणून - अनुशोचितुम् - शोक करण्यास - न अर्हसि - तू योग्य नाहीस, म्हणजे तुला शोक करणे उचित नाही. ॥ २५ ॥ व्याख्या : हे पार्थ ! तत्त्वज्ञैः अयं आत्मा अव्यक्तः न व्यक्तो स्पष्टः अव्यक्तः चक्षुरादीनां अस्पष्टः चेत्यपरं अचिंत्यः चिंतितुं योग्यः न भवतीति अचिंत्यः मनसोप्यगोचरः । किं च अविकार्यः कर्मेंद्रियाणामपि अगोचरः उच्यते कथ्यते । तस्मात् कारणात् त्वं एवं एनं आत्मानं विदित्वा ज्ञात्वा अनु अनुलक्षेण शोचितुं नार्हसि न योग्यो भवसि ॥ २५ ॥ अर्थ : तसाच तो अव्यय व अव्यक्त असल्यामुळे अचिंत्य आहे. म्हणून या आत्म्याला तो अशा स्वरूपाचा आहे हें जाणून भीष्मादिकांविषयीं शोक करणें तुला योग्य नाही. अर्जुनाचा शोक घालविण्यासाठी ’अशोच्यान्’ या श्लोकापासून भगवंतांनी त्याला आत्मोपदेश केला आणि येथे ’तुला शोक करणें उचित नाहीं’ असे म्हणून उपसंहार केला आहे. या उपक्रम-उपसंहारावरून आत्मज्ञानानें शोक-मोहात्मक संसारबीजाची निवृत्ति करणें हाच सर्व गीतेचा आणि या प्रकरणाचा प्रतिपाद्य विषय ठरतो. आतां आत्म्या अनित्य आहे, असे जरी मानले तरी शोक करणें करणें अयोग्य कसे ते सांगतात. (२५) विवरण : आता दोन श्लोकांत आत्म्यास औपचारिकरीत्या जन्मणारा-मरणारा मानल्यावरही त्याच्यासाठी शोक करणे अनुचित आहे, असे सांगतात -
अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् । अन्वय - अथ च एनं - परंतु जर हा आत्मा - नित्यजातम् - नेहमी जन्माला येणारा - वा नित्यं मृतं - तसेच सदा मरणारा आहे - त्वं मन्यसे - असे तू मानत असशील - तथापि - तरीसुद्धा - महाबाहो - हे महाबाहो, - एवं शोचितुम् - अशा प्रकारे शोक करण्यास - न अर्हसि - तू योग्य नाहीस. ॥ २६ ॥ व्याख्या : अथेति पक्षांतरे ! हे महाबाहो ! महांतौ शत्रुविदारकौ बाहू हस्तौ यस्य सः महाबाहूः तत्संबुद्धौ । त्वं एनं आत्मानं नित्यजातं नित्यं जातः नित्यजातः तं वा अथवा नित्यं मृतं मन्यसे तथापि एवं सत्यपि त्वं एनं आत्मानं शोचितुं नार्हसि न योग्यो भवसि ॥ २६ ॥ अर्थ : प्रत्येक देह उत्पन्न झाला कीं, ’हा अमुक जन्मास आला’ व प्रत्येक देह मेला कीं ’हा मृत झाला’ असें व्यवहारांत म्हणतात. या लोकप्रसिद्दीला अनुसरून आत्माच प्रत्येक देहाबरोबर उत्पन्न होतो व प्रत्येक देहाबरोबर मरतो, असें जरी तूं मानलेस व तसें मानूनच ’अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम्’ (१.४५) असे म्हटलेंस तरी उत्पन्न होणार्या प्रत्येकाला नाश व नाश पावणार्या प्रत्येकाला पुनः जन्म हे विकार अवश्य होणारे असल्यामुळे तुला असा शोक करणें शोभत नाहीं. (२६) विवरण :
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च । अन्वय - हि - कारण - जातस्य - जन्मास आलेल्याला - मृत्युः ध्रुवः - मृत्यु निश्चित आहे - च मृतस्य - तसेच मेलेल्याला - जन्म ध्रुवम् - जन्म निश्चित आहे - तस्मात् - म्हणूनही - अपरिहार्ये अर्थे - उपाय नसलेल्या गोष्टीच्या बाबतीत - त्वं शोचितुम् - अशा प्रकारे शोक करण्यास - न अर्हसि - तू योग्य नाहीस. ॥ २७ ॥ व्याख्या : हि यस्मात् कारणात् जातस्य उत्पन्नस्य ’स्वारंभककर्मक्षये स्वारभकं च तत् कर्म च स्वारंभककर्म स्वारंभककर्मणः क्षयः स्वारंभककर्मक्षयः तस्मिन्’ मृत्युः ध्रुवः निश्चितः अस्ति । चेत्यपरं मृतस्य देहकृतेन कर्मणा जन्म ध्रुवं निश्चितं अस्ति । तस्मात् कारणात् त्वं विद्वान् अवश्यंभाविनि अर्थे जन्ममरणलक्षणार्थे शोचितुं नार्हसि न योग्यो भवसि । कथंभूते अर्थे । अपरिहार्ये परिहारितुं दूरीकर्तुं योग्यो न भवतीति अपरिहार्यः तस्मिन् ॥ २७ ॥ अर्थ : कारण, जो जन्माला आला, त्याचा मृत्यु निश्चित आहे आणि मेलेल्या आत्म्याचा जन्म निश्चित आने. आत्मा देहाबरोबर उत्पन्न होतो, असे मानले तर त्याला मरणांवाचून गत्यंतर नाही. तो कांही घटकांनी, दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी योगांनी किंवा कल्पांनी अवश्य नाश पावतोच. त्याचप्रमाणें जो मेला आहे, तो आपले बीज मागे ठेऊनच मेलेला असतो. त्याला स्थूल आकार जरी नष्ट झाला, तरी सूक्ष जीवनशक्ति नष्ट होत नाही. त्यामुळें त्या वीजापासून योग्य वेळीं पुनः त्याचा जन्म होतो. म्हणून जन्मलेल्याचे मरण व मेलेल्याचा पुनः जन्म टाळतां येत नाही. यास्तव अशा अपरिहार्य गोष्टींविषयीं तूं शोक करूं नको. ज्याला कांही उपायच नाही, त्याविषयी शोक करणें केव्हांही योग्य नव्हे. म्हणून आत्म्याला उद्देशून शोक करणें जसे योग्य नाही, त्याचप्रमाणे शरीरेंद्रियसंघातरूप भूतांना उद्देशूनही शोक करणें योग्य नव्हे, असे सांगतात. (२७) विवरण : प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टिकोनातूनही शोक करता येत नाही -
अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत । अन्वय - भारत - हे अर्जुना ! - भूतानि - सर्व प्राणी - अव्यक्तादीनि - जन्मापूर्वी अप्रगट होते - च अव्यक्तनिधनानि एव - आणि मेल्यानंतरही अप्रगट होणारे असतात - केवलम् व्यक्तमध्यानि - केवळ मध्ये प्रगट आहेत - अथ तत्र का परिदेवना - मग अशा स्थितीत काय शोक करायचा आहे. ॥ २८ ॥ व्याख्या : हे भारत हे अर्जुन ! अव्यक्तमेव प्रधानमेव आदि उत्पत्तिस्थानं येषां तानि अव्यक्तादीनि भूतानि शरीराणि संति । तथा व्यक्तमध्यानि व्यक्तं स्पष्टं मध्यं जन्ममरणस्थितिलक्षणं येषां तानि शरीराणि संति । किं च अव्यक्तनिधनान्येव अव्यक्ते प्रधाने निधनं लयः येषां तानि अव्यक्तनिधनानि भूतानि शरीराणि संति । तत्र भूतेषु का परिदेवना कः शोकनिमित्तो विलापः अस्ति ? अपि तु नास्त्येव ॥ २८ ॥ अर्थ : हे अर्जुना, भूतें म्हणजे श्रीरेंद्रियांचा समुदाय, प्रत्यक्ष दिसणारी प्राणिशरीरें उत्पत्तीच्या पूर्वीं उपलब्ध होत नाहींत. म्हणून उत्पत्तीच्या पूर्वींची त्यांची अवस्था अव्यक्त असते. उत्पत्तीपासून मरणापर्यंत जी अवस्था तिला मध्य म्हणतात. ती व्यक्त असते. म्हणजे भूतांना व्यावहारिक सत्यत्व असते. मरणानंतरही जन्माच्या पूर्वीं जी अव्यक्त अवस्था असते, तिलाच ते प्राप्त होतात. तेव्हां पूर्वी अदृष्ट, मध्यें दृष्ट व शेवटीं पुनः सर्वथा नष्ट, याप्रमाणें भांतीचा विषय होणार्या पुत्र-मित्रादि भूतांविषयीं विलाप करण्यांत काय अर्थ आहे ! आत्मा दुर्ज्!जेय आहे, म्हणून त्याच्याविषयीं सर्वांनाच भ्रम होतो. पण तो दुर्ज्ञेय कसा ? - पुढे सांगतात. (२८) विवरण : आत्मतत्त्वाचे दर्शन, वर्णन व श्रवण यांच्या अलौकिकतेचे आणि दुर्लभतेचे निरूपण करतात -
आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेन- अन्वय - कश्चित् - कोणी महापुरुषच - एनं आश्चर्यवत् पश्यति - आश्चर्याप्रमाणे पाहतो - च तथा एव - आणि त्याचप्रमाणे - अन्यः - दुसरा एखादा पहापुरुषच - आश्चर्यवत् - आश्चर्याप्रमाणे - एनं वदति - याचे वर्णन करतो - च अन्यः - दुसरा कोणी अधिकारी पुरुषच - एनं आश्चर्यवत् श्रृणोति - याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो - च कश्चित् श्रुत्वा अपि - आणि कोणी कोणी तर ऐकून सुद्धा - एनं न वेद - याला जाणतच नाहीत. ॥ २९ ॥ व्याख्या : कश्चित् पुरुषः एनं आत्मानं 'शास्त्राचार्योपदेशाभ्यां शास्त्रं च आचार्योपदेशश्च शास्त्राचार्योपदेशौ ताभ्यां' आश्चर्यवत् पश्यति । तथैव अन्यः अन्यपुरुषः एनं आत्मानं आश्चर्यवत् वदति । चेत्यपरं अन्यः पुरुषः एनं आत्मानं आश्चर्यवत् शृणोति । कश्चित् विपरीतभावनाभिभूतः पुरुषः एनं आत्मानं श्रुत्वापि न वेद ॥ २९ ॥ अर्थ : कोणी एखादा आश्चर्याप्रमाणें या आत्म्याला पाहतो, म्हणजे जसे एखादे आश्चर्य पहावे तसें तो त्याला पाहतो. तसाच दुसरा कोणी एखाद्या आश्चर्याप्रमाणेंच आत्म्याविषयीं बोलतो. कोणी एखादाच श्रोता एखादें आश्चर्य जसें ऐकावें, त्याप्रमाणें आत्म्याचे श्रवण करतो आणि कोणी तर त्याचें श्रवण करूनही त्याला जाणत नाही. म्हणजे आत्म्याचे दर्शन जसे दुर्लभ आहे, तसाच त्याचा द्रष्टाही दुर्लभ आहे. त्याच्याविषयीं बोलणेंही दुर्लभ व उपदेशकर्ताही दुर्लभ. आत्मश्रवणही दुर्लभ व श्रोताही दुर्लभ आणि कदाचित् तें सर्वही हरी सुलभ झाले, तरी ज्याला त्याचा साक्षात्कार झाला आहे, असा पुरुष तर त्या सर्वांहून दुर्लभ आहे.(२९) विवरण : सांख्ययोगाच्या प्रकरणाचा उपसंहार -
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत । अन्वय - भारत - हे अर्जुना ! +सर्वस्य देहे - सर्वांच्या देहांमध्ये - अयं देही - हा आत्मा - नित्यं अवध्य - नेहमीच अवध्य आहे - तस्मात् - म्हणून - सर्वाणि भूतानि - सर्व प्राण्यांच्यासाठी - त्वं शोचितुम् न अर्हसि - तू शोक करण्यास योग्य नाहीस. ॥ ३० ॥ व्याख्या : हे भारत हे अर्जुन ! सर्वस्य प्राणिमात्रस्य देहे वध्यमानदेहे अयं देही देहाभिमानी जीवः नित्यं निश्चयेन अवध्यः वधितुं योग्यः वध्यः वध्यो न भवतीति अवध्यः अस्ति । तस्मात् कारणात् त्वं विद्वान् सर्वाणि संपूर्णानि भूतानि जीवान् शोचितुं नार्हसि न योग्यो भवसि ॥ ३० ॥
अर्थ :
याप्रमाणें आत्मा नित्य व निरवयव असल्यामुळे कोणत्याही अवस्थेंत अवध्यच आहे. तो सर्वव्यापी असल्यामुळे स्थावरादि सर्व प्राण्यांच्या शरीरांत जरी असला व सर्व प्राण्यांची शरीरें मारली जात असलीं तरी हा आत्मा त्याबरोबर वधास पात्र होत नाही. यास्तव भीष्मादि कोणत्याही प्राण्याला उद्देशून शोक करणें तुला योग्य नाही. विवरण : येथपर्यंत भगवंतांनी सांख्य-योगाप्रमाणे अनेक तर्हेच्या युक्तींनी नित्य, शुद्ध, बुद्ध, सम, निर्विकार आणि अकर्त्या आत्म्याचे एकत्व, नित्यत्व, अविनाशित्व इत्यादींचे प्रतिपादन करून व शरीरे विनाशशील असल्याचे सांगून आत्म्यासाठी, शरीरांच्यासाठी अथवा शरीर आणि आत्म्याच्या वियोगासाठी शोक करणे हे अनुचित असल्याचे सिद्ध केले. त्याचबरोबर प्रसंगावशात आत्मा हा जन्मणारा-मरणारा असे मानल्यावरही, शोक करण्याचे अनौचित्य प्रतिपादित केले आणि अर्जुनास युद्ध करण्याची आज्ञा केली. आता पुढील सात श्लोकांत क्षात्रधर्माप्रमाणे शोक करणे अनुचित सिद्ध करून भगवंत अर्जुनास युद्धासाठी उत्साहित करीत आहेत. श्लोकांत क्षात्रधर्माप्रमाणे शोक करणे अनुचित सिद्ध करून भगवंत अर्जुनास युद्धासाठी उत्साहित करीत आहेत -
स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि । अन्वय - च स्वधर्मम् - तसेच स्वतःचा धर्म अवेक्ष्य अपि - लक्षात सुद्धा - विकंपितुम् - भय बाळगण्यास - न अर्हसि - तू योग्य नाहीस - हि - कारण - क्षत्रियस्य - क्षत्रियाच्या बाबतीत - धर्मात् युद्धात् - धर्मयुद्धापेक्षा वरचढ - अन्यत् - दुसरे कोणतेही - श्रेयः न विद्यते - कल्याणकारी कर्तव्य नसते. ॥ ३१ ॥ व्याख्या : त्वं स्वधर्मं क्षत्रियधर्मं अवेक्ष्य शास्त्रेण अवलोक्य विकंपितुं 'धर्माधर्मभ्रांत्या धर्मश्च अधर्मश्च धर्माधर्मौ धर्माधर्मयोः भ्रांतिः तया' निवर्त्तितुं नार्हसि न योग्यो भवसि । क्षत्रियस्य धर्म्यात् धर्मरूपात् युद्धात् अन्यत् अन्यं श्रेयः कल्याणं न विद्यते । हि इति निश्चयेन ॥ ३१ ॥ अर्थ : अर्जुना, तूं आपल्या स्वधर्माकडे जरी दृष्टी दिलीस तरी तुला असे व्याकुळ होणे योग्य नाही. स्वधर्म सोडून त्यापासून चलित होणे, तुला उचित नव्हे, कारण क्षत्रियाला अशा धर्म्ययुद्धाहून अन्य कांही श्रेयस्कर नाही. (३१) विवरण :
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् । अन्वय - पार्थ - हे पार्था ! - यदृच्छया - आपोआप - उपपन्नम् च - प्राप्त झालेले आणि - अपावृतम् स्वर्गदारम् - उघडलेले स्वर्गाचे द्वारच असे - ईदृशम् युद्धम् - अशाप्रकारचे युद्ध - सुखिनः क्षत्रियाः लभन्ते - भाग्यवान क्षत्रियांनाच प्राप्त होते. ॥ ३२ ॥ व्याख्या : किंच हे पार्थ ! सुखिनः सुखं येषामस्ति ते सुखिनः सभाग्याः क्षत्रियाः राजानः ईदृशं भीष्मद्रोणादिवीरप्रतियोगिकं युद्धं लभंते प्राप्नुवंति । यद्वा ये राजनः ईदृशं एवंविधं युद्धं लभंते ते राजानः सुखिनः सभाग्याः स्युः । कथंभूतं युद्धम् । यदृच्छया अप्रार्थितेन उपपन्नं प्राप्तम् । पुनः कथंभूतं युद्धम् । स्वर्गदारं स्वर्गस्य द्वारम् । कथंभूतं स्वर्गद्वारम् । अपावृतं निरावरणम् ॥ ३२ ॥ अर्थ : शिवाय हे यदृच्छेने उघदलेले स्वर्गदार तुम्हांला प्राप्त झालेले आहे. इच्छा किंवा प्रार्थना क करतां प्राप्त झालेले हे युद्ध म्हणजे हे उघडलेले स्वर्गदारच होय. अशा प्रकारचे हे युद्ध ज्या क्षत्रियांना न मागतां प्राप्त होते, ते खरोखर मोठे भाग्यवान होत. (३२) विवरण : अशा प्रकारे धर्ममय युद्ध करण्यामध्ये लाभ आहे असे दाखवून आता ते न करण्यामधील हानी भगवंत दाखवीत आहेत. ते अर्जुनाला युद्धासाठी उत्साहित करीत आहेत -
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि । अन्वय - अथ - परंतु - चेत् त्वं - जर तू - इमं धर्म्यं संग्रामम् - हे धर्मयुक्त युद्ध - न करिष्यसि - करणार नशशील - ततः - तर मग - स्वधर्मम् च - स्वतःचा धर्म आणि - कीर्तिम् हित्वा - कीर्ति यांना गमावून - पापं अवाप्स्यसि - तू पापच प्राप्त करशील. ॥ ३३ ॥ व्याख्या : अथेति पक्षांतरे । त्वं वीरः इमं भीष्मद्रोणादिवीरपुरुषप्रतियोगिकं संग्रामं युद्धं न करिष्यसि चेत् ततः तर्हि त्वं स्वधर्मं स्वस्य धर्मः स्वधर्मः तं क्षात्रधर्मं चेत्यपरं कीर्तिं हित्वा त्यक्त्वा पापं अवाप्स्यसि । कथंभूतं संग्रामम् । धर्म्यं धर्मरूपं प्राप्स्यसि ॥ ३३ ॥ अर्थ : पण असे असतांना तूं या अनायासाने प्राप्त झालेल्या धर्मयुद्धापासून जर परत फिरशील, म्हणजे हा धर्म्य-संग्राम करणार नाहींस, तर तूं स्वधर्माला मुकशील. हा मोठा धनुर्धर व शूर आहे, अशी लोकांत पसरलेली तुझी इईर्ति नाहीशी होईल व तुला पाप लागेल. क्षत्रिय असून स्वधर्मरूपी युद्ध सोडल्यास तुला पारलौकिक प्रत्यवाय तर लागेलच, पण त्याशिवाय शिष्टनिंदारूप ऐहिक प्रत्यवायही प्राप्त होईल, असे भगवंत सांगतात. (३३) विवरण :
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् । अन्वय - च भूतानि - तसेच सर्व लोक - अव्ययाम् - पुष्कळ काळ टिकणारी - ते अकीर्तिम् अपि - तुझी अपकीर्ती सुद्धा - कथयिष्यन्ति - सांगत सुटशील - च सम्भावितस्य - आणि माननीय पुरुषासाठी - अकीर्तिः - अपकीर्ति ही - मरणात् अतिरिच्यते - मरणापेक्षा अधिक दुःसह असते. ॥ ३४ ॥ व्याख्या : हे अर्जुन ! भूतानि देवर्षिमनुष्यादीनि ते तव अकीर्तिं अयं अर्जुनः धर्मात्मा न शूरः न एवंरूपां दुष्कीर्तिं कथयिष्यंति कथाप्रसंगेन वर्णयिष्यंति । कथंभूतां अकीर्तिम् । अव्ययां न विद्यते व्ययो नाशः यस्याः सा अव्यया तां अव्ययां दीर्घकालाम् । किं च संभावितस्य बहुगुणैः युक्तस्य अकीर्तिः अपकीर्तिः मरणात् अतिरिच्यते अधिका भवति ॥ ३४ ॥ अर्थ : सर्व लोक दीर्घकाल तुझी अकीर्ति सांगतील आणि हे अर्जुना, मान्यवर पुरुषाची अकीर्ति त्याला मरणाहूनही दुःसह होते. या आणखी एका कारणानेंही तुला युद्ध केले पाहिजे. ते म्हणजे - (३४) विवरण :
भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः । अन्वय - च येषाम् - आणि ज्यांच्या दृष्टीने - त्वं बहुमतः भूत्वा - पूर्वी तू अतिशय माननीय होऊन - इदानीं लाघवम् यास्यसि - आता क्षुद्रतेप्रत जाशील - ते महारथाः - ते महारथी लोक - त्वं भयात् - तू घाबरून - र्॒अणात् उपरतम् - युद्धातून मागे फिरलास - इति मंस्यन्ते - असे मानतील. ॥ ३५ ॥ व्याख्या : किंच महारथाः भीष्मद्रोणदुर्योधनादयः त्वां रणात् संग्रामात् भयात् कर्णादीनां भयेन उपरतं परावृत्तं इति एवं मंस्यंते मन्येरन् । ततस्तदनंतरं अपकीर्तिश्रवणानंतरं त्वं दुःखं अवाप्स्यसि । किं च येषां भीष्मादीनां त्वं प्राक् पूर्वं बहुमतः बहुमान्यः अभूः जातः तेषां भीष्मादीनां त्वं तादृशो भूत्वा लाघवं लघुतां यास्यसि प्राप्स्यसि ॥ ३५ ॥ अर्थ : तूं प्राण्यांची हिंसा होऊं नये, म्हणून दयेनें जरी युद्धापासून निवृत्त झालास, तरी तुझे दुर्योधनादि शत्रु ’अरे हा कर्णादिकांना भ्याला, म्हणून युद्धापासून परत फिरला’ असे म्हणून तुझा उपहास करतील. पण ज्या दुर्योधनादिकाअंना तूं पूर्वी मोठा शूर, योद्धा, खरा क्षत्रिय म्हणून मान्य झालास, त्यांच्याच तिरस्काराला पात्र होशील. (३५) विवरण :
अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः । अन्वय - तव अहिताः - तुझे वैरी लोक - तव सामर्थ्यम् निन्दतः - तुझ्या सामर्त्याची निंदा करीत - बहून् अवाच्यवादान् - पुष्कळ सांगण्यासारखी नसणारी वचने - च वदन्ति - सुद्धा बोलतील - ततः दुःखतरम् नु किम् - त्यापेक्षा अधिक दुःखदायक आणखी काय असेल बरे ? ॥ ३६ ॥ व्याख्या : चेत्यपरं हे अर्जुन ! तव अहिताः न हिताः अहिताः दुर्योधनादयः शत्रवः बहून् अनेकप्रकारान् अवाच्यवादान् वक्तुं योग्याः वाच्याः न वाच्याः अवाच्याः अनिर्वचनीयाः अवाच्याश्च ते वादाः श्ब्दाश्च अवाच्यवादाः तान् अवाच्यवादान् षंढतिलादिरुपशब्दान् वदिष्यंति । कथंभूताः अहिताः । तव सामर्थ्यं स्तुतियोग्यपराक्रमं निंदंतः निंदंति ते निंदंतः ततस्तस्मात् निंदाश्रवणापेक्षया दुःखतरं अतिशयेन दुःखं इति दुःखतरं किं नु ॥ ३६ ॥ अर्थ : अरे, अरे ते तुझे शत्रु तुझ्या पूर्व पराक्र्माची निंदा करीत होत्साते, अनेक अवाच्य, म्हणजे बोलूं नये असे शब्द बोलतील. त्याहून अधिक दुःखकर असे काय बरे आहे. अहो पण युद्धांत गुरूंची हिंसा केल्यास दुसरे लोक निंदा करणार व युद्धापासून परावृत्त झाल्यास शत्रू निंदा करणार, एकूंण निंदा होणारच असे तुला वाटत असेल तर तसे नाही. कारण - (३६) विवरण : वरील बरीच कारणे दाखवून, युद्ध न करण्यात अनेक प्रकारची हानी असल्याचे वर्णन केल्यानंतर भगवंत युद्ध करण्यामध्ये दोन्ही तर्हेचे लाभ असल्याचे दाखवीत अर्जुनाला युद्धासाठी तयार होण्याची आज्ञा देत आहेत -
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् । अन्वय - वा त्वम् हतः - अथवा तू युद्धात मारला जाऊन - स्वर्गम् प्राप्स्यसि - स्वर्ग प्राप्त करून घेशील - वा युद्धे जित्वा - अथवा युद्धात जिंकून - महीम् भोक्ष्यसे - पृथ्वीचे राज्य भोगशील - तस्मात् कौन्तेय - म्हणून हे कौन्तेय - युद्धाय - युद्ध करण्याचा - कृतनिश्चय उत्तिष्ठ - निश्चय करून उठून उभा रहा. ॥ ३७ ॥ व्याख्या : हे कौन्तेय त्वं संग्रामे हतः सन् मृतः सन् स्वर्गं प्राप्स्यसि अथवा युद्धे शत्रून् जित्वा महीं पृथिवीं भोक्ष्यसे तस्मात् उभयपक्षयोरपि लाभात् कृतनिश्चयः सन् कृतः निश्चयो येन सः युद्धाय युद्धं कर्तुं उतिष्ठ ॥ ३७ ॥ अर्थ : तूं युद्धांत शत्रूकडून मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील व कर्णादि शूरांना जिंकलेस तर पृथ्वीचा उपभोग घेशील. म्हणजे जय किंवा पराजय, यांतीला कांही जरी झाले तरी लाभच आहे. जयाविषयी जरी संशय असला तरी लाभाविषयी संशय नाही, असा निश्चय करून तूं युद्धार्थ ऊठ. पण स्वधर्म म्हणून युद्ध करीत असतांना तूं हा उपदेश लक्षांत ठेव. (३७) विवरण : अर्जुनाने आधीच सांगितले होते की कुलाचा नाश करून या लोकीचे वा स्वर्गलोकीचे राज्याची त्याला इच्छा नाही. त्याने कशाप्रकारे युद्ध करायला हवे ही गोष्ट पुढे सांगतात -
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । अन्वय - यजाजयौ - जय व पराजय - लाभालाभौ - लाभ हानि - च सुखदुःखे - आणि सुख व दुःख यांना - समे कृत्वा - समान मानून - ततः - त्यानंतर - युद्धाय युज्यस्व - युद्ध करण्यासाठी - एवं प्रापम् अवाप्स्यसि - अशाप्रकारे युद्ध केल्यामुळे पाप तुला लागणार नाही. ॥ ३८ ॥ व्याख्या : त्वं सुखदुःखे सुखं च दुःखं च सुखदुःखे समे समाने कृत्वा चेत्यपरं लाभालाभौ लाभश्च अलाभश्च लाभालाभौ समौ समानौ कृत्वा चेत्यपरं जयाजयौ जयः पराजयः च अजयः जयाजयौ समौ कृत्वा युद्धाय युद्धं कर्तुं युज्यस्व युक्तो भव । ततस्तदनंतरं सुखाभिलाषत्यागानंतरं एवं स्वधर्मबुद्ध्या युध्यमानः सन् पापं नावाप्स्यसि न प्राप्स्यसि ॥ ३८ ॥ अर्थ : सुखदुःख, लाभ-अलाभ, जय-पराजय यांना तुल्य मानून तूं युद्ध कर. (३८) विवरण : येथवर भगवंतांनी सांख्ययोग सिद्धांताद्वारे व क्षात्र धर्माच्या दृष्टीने युद्धाचे औचित्य सिद्ध करून, अर्जुनास समतापूर्वक युद्ध करण्याची आज्ञा केली. आता कर्मयोगाच्या सिद्धांताद्वारे युद्धाचे औचित्य सांगण्यासाठी भगवान कर्मयोगाच्या वर्णाची प्रस्तावना करीत आहेत -
एषा तेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां श्रृणु । अन्वय - पार्थ - हे पार्था ! - एषा बुद्धिः - ही बुद्धी - मया ते - मी तुझ्यासाठी - सांख्ये अभिहिता - ज्ञानयोगाच्या बाबतीत सांगितली - तु योगे - आणि आता कर्मयोगाच्या बाबतीतील - इमाम् श्रृणु - ही बुद्धी तू ऐक - यया बुद्ध्या युक्तः - ज्या बुद्धीने युक्त झालेला असा तू - कर्मबंधम् प्रहास्यसि - कर्मांच्या बंधनाला चांगल्या प्रकारे टाकशील, म्हणजे तू कर्मबंधनाला संपूर्णपणे नष्ट करून टाकशील. ॥ ३९ ॥ व्याख्या : हे पार्थ हे अर्जुन ! मया ते तुभ्यं सांख्ये आत्मतत्त्वे प्रकाशमाने एषा बुद्धिः अभिहिता कथिता । अंतःकरणशुद्धिद्वारा आत्मतत्त्वप्रकाशार्थं योगे कर्मयोगे त्वं इमां बुद्धिं शृणु । यया बुद्ध्या युक्तः सन् परमेश्वरार्पितकर्मयोगेन शुद्धांतःकरणः सन् कर्मबंधं कर्मणः बंधः कर्मबंधः तं कर्मरूपं बंधं प्रहास्यसि त्यक्ष्यसि ॥ ३९ ॥ अर्थ : अर्जुना ! ही मी तुला परमार्थवस्तुविवेकाविषयी बुद्धि सांगितली, म्हणजे शोकमोहादि अनर्थरूप संसाराच्या निवृत्तीचे कारण जे आत्मज्ञान ते सांगितले. आता योगबुद्धि म्हणजे त्या आत्मज्ञानप्राप्तीच्या उपायाचे ज्ञान तूं ऐक. फलाची आसल्ति न ठेवतां सुख-दुःखादि द्वंद्वत्यागपूर्वक ईश्वराच्या आराधनेसाथी केलेला जो कर्मयोग व त्यामुळे प्राप्त होणारा जो समाधियोग त्याविषयींचा उपदेश तूं ऐक. त्या बुद्धियोगानें युक्त झालास म्हणजे तूं धर्म-अधर्मादि कर्मबंधनाचा त्याग करशील. (३९) विवरण : अशा प्रकारे कर्मयोगाच्या वर्णनाची प्रस्तावना करून, भगवंत त्याचे रहस्यपूर्ण महत्त्व सांगतात -
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते । अन्वय - इह अभिक्रमनाशः न अस्ति - या कर्मयोगामध्ये आरंभाचा म्हणजे बीजाचा नाश होत नाही - च प्रत्यवायः न विद्यते - तसेच विपर्यस्त फलरूप दोषसुद्धा असत नाही - अस्य धर्मस्य - या कर्मयोगरूपी धर्माचे - स्वल्पम् अपि - थोडे साधन सुद्धा - महतः भयात् त्रायते - महान् जन्ममृत्य्रूपी भयापासून रक्षण करए. ॥ ४० ॥ व्याख्या : इह निष्काम कर्मयोगे अभिक्रमनाशः अभिक्रमस्य प्रारंभस्य नाशः अभिक्रमनाशः निष्फलत्वं नास्ति । प्रत्यवायः वैगुण्यं न विद्यते ईश्वरोद्देशेनेति भावः । किं च अस्य प्रसिद्धस्य धर्मस्य निष्कामकर्मयोगस्य स्वल्पमपि आरंभमात्रमपि महतः अपारात् भयात् संसारभयात् त्रायते भगवत्प्रसादसंपादनेन अनुष्ठातारं रक्षति ॥ ४० ॥ अर्थ : अर्जुना या मोक्षरूप कर्मानुष्ठानांत आरंभिलेल्या कर्माचा नाश होत नाही. त्यांत कांही दोषही उत्पन्न होत नाही. या कर्मानुष्ठानाचे थोडेसेंही अनुष्ठान फार मोथ्या जन्म-मरणादिरूप संसारभयापासून रक्षण करते. (४०) विवरण : कर्मयोगाचे महत्त्व सांगून आता त्याचा आचरण-विधी सांगण्यासाठी प्रथम कर्मयोगामध्ये अत्यंत आवश्यक अशी जी सिद्ध कर्मयोग्याची निश्चयात्मक स्थायी अशी समबुद्धी आहे तिचे, आणि कर्मयोगामध्ये बाधक अशा ज्या सकाम मनुष्याच्या भिन्न-भिन्न बुद्धी आहेत, त्यांतील अंतर सांगतात -
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन । अन्वय - कुरुनन्दन - हे अर्जुना - इह - या कर्मयोगामध्ये - व्यवसायित्मा बुद्धिः - निश्चयात्मिका बुद्धी - एका भवति - एकच आहे - परंतु अव्यवसायिनाम् - परंतु अस्थिर विचार असनार्या विवेकहीन सकाम मनुष्याच्या बुद्धी - बहुशाखाः - पुक्ष्कळ - च अनम्ताः सन्ति - आणि अनेक असतात. ॥ ४१ ॥ व्याख्या : हे कुरुनंदन ! इह ईश्वराराधनलक्षणे कर्मयोगे व्यवसायात्मिका 'परमेश्वरभक्त्यैव ध्रुवं तरिष्यामि' इति निश्चयात्मिका एका एकनिष्ठा बुद्धिः भवति । अव्यवसायिनां बहिर्मुखानां कामिनां बुद्धयः कामानां आनंत्यात् अनंताः न विद्यते अंतो यासां ताः अनंताः चेत्यपरं कर्मफलगुणफलादिभेदात् बहुशाखाः बहवः शाखाः यासां ताः । भवंति इति शेषः ॥ ४१ ॥ अर्थ : अर्जुना, ही जी सांगितलेली सांख्यबुद्धि आणि पुधे सांगावयाची योगबुद्धि, तीच एक या मोक्षमार्गांत निश्चयस्वभावाची बुद्धि आहे. कारण ती वेदरूप सम्यक् प्रमाणापासून उत्पन्न झालेली आहे. इतर अविवेकी लोकांच्या बुद्धि अनंत व अनेक प्रकारच्या असतात. (४१) विवरण : कर्मयोगासाठी अवश्य धारण करण्याजोग्या निश्चयात्मिका बुद्धीचे आणि त्याग करण्याजोग्या सकाम मनुष्यांच्या बुद्धीचे स्वरूप सांगून आता तीन श्लोकांत सकाम भाव हा त्याज्य असल्याचे सांगण्यासाठी सकाम मनुष्यांचे स्वभाव, सिद्धांत आणि आचार-व्यवहार यांचे वर्णन करतात -
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः । अन्वय - पार्थ - हे अर्जुना ! - कामात्मानः - जे भोगात तन्मय झालेले असतात - वेदवादरताः - करणार्या वेदवाक्यांमध्ये ज्यांची प्रीती आहे - स्वर्गपराः - ज्यांच्या बुद्धीला स्वर्गच परम प्राप्य वस्तू वाटतो - च स्वर्गात् अधिकम् - आणि स्वर्गापेक्षा - अन्यत् न अस्ति - दुसरी कोणतीही वस्तूच नाही - इति वादिनः - असे जे म्हणतात - ते अविपश्चितः - ते अविवेकी लोक - इमाम् - अशाप्रकारची - याम् पुष्पिताम् - जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभेने युक्त - वाचम् प्रवदन्ति - वाणी उच्चारतात - यां वाचम् जन्मकर्मफलप्रदाम् - जी वाणी जन्मरूपी कर्मफळ देणारी - भोगेश्वर्यगतिं प्रति - भोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसाठी - क्रियाविशेषबहुलाम् - पुष्कळशा क्रियांचे वराणन करणारी आहे - तया - त्या वाणीमुळे - अपहृतचेतसाम् - ज्यांची मने हरण केली गेली आहेत - भोगैश्वर्यप्रसक्ताम् - जे भोग आणि ऐश्वर्य यांमध्ये अत्यंत आसक्त आहेत - तेषां पुरुषाणाम् - त्या पुरुषांची - समाधी - परमात्म्याच्या ठिकाणी - व्यवसायात्मिका - निश्चयात्मिका - बुद्धिः न विधीयते - बुद्धी ही स्थिर असत नाही. ॥ ४२-४४ ॥ व्याख्या : हे पार्थ ! अविपश्चितः ज्ञानशून्याः मूढा इत्यर्थः । यां प्रसिद्धां इमां अध्ययनविध्युपात्तत्वेन अध्ययनविधिना प्राप्तज्ञानेन प्रसिद्धां वाचं स्वर्गादिफलश्रुतिं वदंति । कथंभूताः अविपश्चितः । वेदवादरताः वेदे वादाः अर्थवादाः वेदवादाः वेदवादेषु रूढाः 'अक्षय्यं ह वै चातुर्मास्ययाजिनः सुकृतं भवति' इति रताः । पुनः कथंभूताः । अविपश्चितः अतःपरं अन्यत् ईश्वरतत्त्वं प्राप्यं नास्ति इति एवंवादिनः वदंति ते वादिनः वादशीलाः । कथंभूतां वाचम् । पुष्पितां पुष्पाणि संजातानि यस्यां सा पुष्पिता तां विषलतावत् आपतरमणीयाम् ॥ ४२ ॥ पुनः कथंभूताः अविपश्चितः । कामात्मानः अत एव स्वर्गपराः कामेषु मनोरथेषु आत्मा चित्तं येषां ते कामार्मानः कामाकुलचित्ताः अतः हेतोः स्वर्गपराः स्वर्ग एव परः पुरुषार्थो येषां ते । कथंभूतां वाचम् । जन्मकर्मफलप्रदां जन्म च कर्माणि च जन्मकर्माणि जन्मकर्मणां फलानि जन्मकर्मफलानि जन्मकर्मफलानि प्रददातीति जन्मकर्मफलप्रदा ताम् । पुनः कथंभूताः वाचम् । भोगैश्वर्यगतिंप्रति भोगः विषयभोगः च ऐश्वर्यं संपत्तिः भोगैश्वर्ये भोगैश्वर्ययोः गतिः प्राप्तिः भोगैश्वर्यगतिः तांप्रति क्रियाविशेषबहुलां क्रियायाः कर्मणः विशेषाः अतिशयाः क्रियाविशेषाः क्रियाविशेषाः बहुलाः यस्यां सा क्रियाविशेषबहुला ताम् ॥ ४३ ॥ तया पुष्पितया वाचा अपहृतचेतसां अपहृतं आकृष्टं चेतो अंतःकरणं येषां ते अपहृतचेतसः तेषां पुंसां इति शेषः । व्यवसायात्मिका 'परमेश्वरभक्त्यैव ध्रुवं तरिष्यामि इति निश्चयात्मिका' बुद्धिः समाधौ समा बुद्धिः धीयते यस्मिन्निति समाधिः तस्मिन् परमेश्वरैकाग्र्ये न विधीयते नोत्पद्यते । कथंभूतानां पुंसाम् । भोगैश्वर्यप्रसक्तानां भोगः विषयः च ऐश्वर्यं संपत्तिः भोगैश्वर्ये बोगैश्वर्ययोः प्रसक्ताः भोगैश्वर्यप्रसक्ताः तेषाम् ॥ ४४ ॥ अर्थ : अर्जुना, वेदांचे जे रमणीय अर्थवाद त्यांत आसक्त असलेले, स्वर्गादि फळ देणार्या कर्माहून अन्य कांही नाही असे बोलणारे, कामस्वभाव, स्वर्गाला श्रेष्ठ पुरुषार्थ समजणारे अविवेकी लोक फुललेल्या वृक्षाप्रमाणे शोभणारी, जन्मरूप कर्मफल देणारी, भोग व ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे प्रकाशन करणारी जी वाणी बोलतात, ती त्यांचे चित्त हरण करते व त्या वाणीनें ज्याचे चित्त हरण केले आहे, अशा त्या भोग-ऐश्वर्य यांत आसक्त झालेल्या अविवेक्यांच्या अंतःकरणांत सांख्ययोगविषयक बुद्धि उत्पन्न होत नाही. (४२-४४) विवरण : भोग व ऐश्वर्य यांच्यामध्ये आसक्त असणार्या सकाम माणसांमध्ये निश्चयात्मिका बुद्धी नसल्याचे सांगून आता कर्मयोगाचा उपदेश देण्याच्या उद्देशाने प्रथमतः भगवंत अर्जुनास भोग आणि ऐश्वर्य यांच्या आसक्तीतून मुक्त होऊन समभावाने संपन्न होण्यासाठी सांगतात -
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन । अन्वय - अर्जुन - हे अर्जुना ! - वेदाः त्रैगुण्यविषयाः - वेद हे तीन गुणांचे कार्य-रूप असे सर्व भोग व त्यांची साधने यांचे प्रतिपादन करणारे आहेत - अतः - म्हणून - निस्त्रैगुण्यः - ते भोग व त्यांची साधने यांमध्ये आसक्तिरहित - निर्द्वंद्वः - हर्ष शोक इत्यादी द्वंद्वांनी रहित - नित्यसत्त्वस्थः - नित्यवस्तू अशा परमात्म्याचे ठिकाणी स्थित - निर्योगक्षेमः - योग आणि क्षेम यांची इच्छा न करणारा - च आत्मवान् भव - आणि ज्याचे अंतःकरण स्वाधीन आहे असा तू हो ॥ ४५ ॥ व्याख्या : हे अर्जुन ! त्रैगुण्यविषयाः त्रैगुण्याः सकामाः विषयाः येषां ते तथोक्ताः वेदाः विषयाणां कर्मफलसंबंधप्रतिपादकाः संति । त्वं तु निस्त्रैगुण्यः निष्कामः भव । तत्रोपायमाह तत्र निष्कामे उपायं अहं वदामि । निर्द्वंद्वः निर्गतानि द्वंद्वानि सुखदुःखशीतोष्णादीनि यस्य सः भव । किं च नित्यसत्त्वस्थः नित्यं च तत् सत्त्वं शुद्धसत्त्वं च नित्यसत्त्वं नित्यसत्त्वे तिष्ठतीति तथोक्तः । किं च निर्योगक्षेमः योगः अप्राप्तस्वीकारः च क्षेम प्राप्तपालनं योगक्षमौ निर्गतौ योगक्षेमौ यस्य सः तथोक्तः । किं च आत्मवान् आत्मा विद्यते यस्य सः आत्मवान् अप्रमत्तः भव ॥ ४५ ॥ अर्थ : अर्जुना, कर्मकांडरूप वेदाचा प्रतिपाद्य विषय त्रैगुण्य, म्हणजे संसार आहे. यास्तव त्याचे परिमार्जन करण्यासाठी विवेक सिद्ध व्हावा म्हणून तूं काय करावेस ते ऐक. वेदाचा विषय संसार आहे, यास्तव विवेकबुद्धिरहित सकाम पुरुषाला ’संसार’ हेंच फळ मिळावे हे न्यायप्राप्तच आहे. म्हणून तूं निष्काम, निर्द्वंद्व, म्हणजे शीतोष्ण, सुख-दुःख, लाभालाभ इत्यादि द्वंद्वांनी रहित, नित्य सत्त्वगुणी, योग-क्षेमाची चिंता न करणारा व आत्मस्वरूपाविषयी सावधान हो. स्वधर्माचे अनुष्ठान करीत असतांना त्यामुळेंच चित्तशुद्धि होऊन मुमुक्षुत्व बाणावे, म्हणून तुला हा उपदेश केला आहे. त्याप्रमाणें तूं स्वधर्माचरण केलेंस म्हणजे चित्तशुद्धि, मुमुक्षुत्व इत्यादि ज्ञानाधिकारी पुरुषाला अवश्य असलेले गुण तुम्ह्यामध्यें येतील. (४५) विवरण : सर्व वेद गुणांच्या कार्याचे प्रतिपादन करणारे आहेत. तू तिन्ही गुणांचे जे कार्यरूप आहेत त्या सर्व भोगांपासून व त्यांच्या साधनांपासून आसक्तिरहित हो. आता त्याच्या फलस्वरूप अशा ब्रह्मज्ञानाचे महत्त्व भगवान सांततात -
यावानर्थ उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके । अन्वय - सर्वतः - सर्व बाजूंनी - संप्लुतोदके प्राप्ते सति - परिपूर्ण असा जलाशय प्राप्त झाला असताना - उदपाने - लहानशा जलाशनात माणसाचे - यावान् अर्थः अस्ति - जितके प्रयोजन असते - विजानतः - ब्रह्माला तत्त्वतः - ब्राह्मणस्य - ब्रह्मज्ञान्याचे - सर्वेषु वेदेषु - समस्त वेदांमध्ये - तावान अर्थः अस्ति - तितकेच प्रयोजन असते. ॥ ४६ ॥ व्याख्या : हे पार्थ उदपाने उदं उदकं पीयते यस्मिन्निति उदपानं तस्मिन् उदपाने वापीकूपतडागाअदिस्वल्पोदके यावान् स्नानपानादिः अर्थः प्रयोजनं भवति तावान् स्नानपानादिः सर्वः अर्थोपि सर्वतः सर्वस्मिन् संप्लुतोदके संप्लुतं पूर्णं उदकं यस्मिन् सः संप्लुतोदकः तस्मिन् महाह्रदे यथा भवति । एवंप्रकारेण यावान् तत्तत्कर्मफलरूपः अर्थः कार्यं सर्वेषु संपूर्णेषु वेदेषु भवति तावान् सर्वोपि अर्थः कार्यं विजानतः विशेषेण आत्मतत्त्वं जानातीति विजानन् तस्य व्यवसायात्मिकाबुद्धियुक्तस्य ब्राह्मणस्य ब्रह्मनिष्ठस्य भवत्येव भवति इति शेषः ॥ ४६ ॥ अर्थ : ’वेदोक्त कर्मांची जी अनंत फलें आहेत, त्यांची जर अपेक्षा करावयाची नाही, तर ती ईश्वरासाठी तरी कां करावयाची’ म्हणून विचारशील तर सांगतो - विहीर, तळीं इत्यादि मर्यादित जलांनी युक्त असलेल्या अनेक जलाशयांत मिळून लोकांचा जेवढा कार्यभाग होतो, तेवढा तो सर्व, पाण्याने सर्व बाजूंनी तुडुंब भरलेल्या मोठ्या सागरांत होतो. लहान, लहान अशा अनेक जलाशयांचें प्रयोजन एका फार मोठ्या जलाशयांत अंतर्भूत होते, हे प्रसिद्धच आहे. त्याचप्रमाणे वेदोक्त सर्वकर्माचें जें फल आहे, ते सर्व तत्त्वज्ञानी संन्यासी ब्राह्मणाच्या ज्ञानफलांत अंतर्भूत होते. कारण ज्ञानाचे फल जलाने तुडुंब भरलेल्या मोठ्या जलाशयासारखे आहे आणि फार मोठे फल मिळाले असतां क्षुद्र फलांची अपेक्षा रहात नाही, हेंही प्रसिद्ध आहे. पण कर्ममार्ग व्यर्थ-निरुपयोगी नाही. तो ज्ञानाचा अधिकार देणारा आहे. यास्तव ज्ञाननिष्ठेचा अधिकार प्राप्त होईपर्यंत कर्माधिकारी पुरुषानें कर्मच करावे. ते विहिर, तळें इत्यादि मर्यादित जलासारखे अल्पफल देणारे जरी असलें, तरी ज्ञानाधिकार प्राप्त होईपर्यंत ते सोडूं नये. (४६) विवरण : समबुद्धिरूप कर्मयोगाचे व त्याच्या फलाचे महत्त्व सांगून, पुढील दोन श्लोकांत भगवंत कर्मयोगाचे स्वरूप सांगताना, अर्जुनास कर्मयोगामध्ये स्थित होऊन कर्म करण्यास सांगतात -
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । अन्वय - कर्मणि एव ते अधिकारः - कर्म करण्याविषयीच तुला अधिकार आहे - फलेषु कचाचन मा - त्यांच्या फळांवर कधीही नाही - कर्मफलहेतुः मा भूः - म्हणून तू कर्मांच्या फळांचा हेतू होऊ नकोस - अकर्मणि - तसेच कर्म न करण्याबाबत - ते संगः मा अस्तु - तुझी आसक्ति असता कामा नये. ॥ ४७ ॥ व्याख्या : हे अर्जुन ! ते तव शुद्धांतःकरणस्य तत्त्वज्ञानार्थिनः कर्मण्येव अंतःकरणशोधके अधिकारः मया इदं कर्त्तव्यं इति बोधः अस्तु । कदाचन कस्यांचित् अवस्थायां फलेषु कर्मफलेषु बंधहेतुषु अधिकारः कामः मास्तु । त्वं कर्मफहेतुः कर्मणः फलं कर्मफलं कर्मफले हेतुःकारणं यस्य सः मा भूः । अत एव कर्मफलं बंधकं भविष्यति इति भयात् अकर्मणि कर्माकरणे ते तव संगः निष्ठा मास्तु ॥ ४७ ॥ अर्थ : याप्रमाणे आत्मज्ञानफल जरी फर मोठें मोक्षफल देणारे असले तरी तुझा अधिकार कर्मामध्येंच आहे, ज्ञानांत नाही. तूं कर्माधिकारी आहेस, ज्ञानाधिकारी नाहीस. पण कर्में करीत असलेल्याही तुझा फलामध्यें अधिकार नाही. कर्म करतांना, त्यापूर्वी व ते केल्यावरही तुला कर्मफलाचा अधिकार नाही. कर्मफलाविषयी अभिलाष धरून तूं त्याचा हेतु होऊं नकोस व "कर्माच्या फलाची इच्छा जर करावयाची नाही, तर क्लेशकर कर्म तरी कां करावें !" अए म्हणून तें न करण्याविषयींही तूं आसक्ति ठेवूं नको. कारण निष्कामकर्म चित्तशुद्धीच्या द्वारा ज्ञाननिष्ठेचा अधिकार प्राप्त करून देत असते. म्हणून तूं फलाभिलाष न धरतां कर्म कर. ॥ ४७ ॥ विवरण : कर्मांच्या फलाचे कारण बनू नये आणि कर्म करण्याची आसक्तीही नसावी, मग कर्म कसे करावे ? ते सांगतात -
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय । अन्वय - धनञ्जय - हे धनंजया ! - सङ्गम् त्यक्त्वा - आसक्ती सोडून देऊन - च सिद्धि-असिद्ध्योः - सिद्धी आणि असिद्धी यांचे बाबतीत - समः भूत्वा - -समान बुद्धी बाळगून - योगस्थः - योगामध्ये स्थित होऊन - कर्माणि कुरु - तू कर्तव्य कर्मे कर - समत्वं योगः उच्यते - समत्वालाच योग असे म्हटले आहे. ॥ ४८ ॥ व्याख्या : हे धनंजय ! त्वं योगस्थः सन् योगे परमेश्वरैकपरतायां तिष्ठतीति योगस्थः सन् संगं फलाभिलाषं कर्तृत्वाभिनिवेशं त्यक्त्वा कर्माणि कुरु । संगत्यागे संगस्य त्यागः संगत्यागः तस्मिन् उपायं अहं वदामि । किं कृत्वा । सिद्ध्यसिद्ध्योः सिद्धिश्च लाभः असिद्धिश्च अलाभः सिद्ध्यसिद्धी तयोः समो भूत्वा केवलं ईश्वार्पणेनैव कर्म कुरु । सद्भिः समत्वमेव योगः उच्यते ॥ ४८ ॥ अर्थ : जर फलासाठी कर्म करूं नये, तर ते कसे करावें ! म्हणून विचारशील तर सांगतो = हे धनंजया, तूं योगामध्ये स्थित होऊन कर्मफलाविषयींची आसक्ति सोडून केवल ईश्वरार्थ व त्यांतही ईश्वर मजवर प्रसन्न होवो, अशी आसक्ति न ठेवतां विहित कर्में कर. चित्तशुद्धीपासून झालेली ज्ञानप्राप्तिरूप सिद्धि व चित्ताच्या अशुद्धीपासून झालेली ज्ञानाची अप्राप्तिरूप असिद्धि यांना तुल्य मानणे हाच तो योग होय. या योगामध्यें स्थित होऊन, या योगामध्यें निष्ठा ठेवून तूं ईश्वरार्थ कर्में कर. ॥ ४८ ॥ विवरण : कर्मयोगाची प्रक्रिया सांगून
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय । अन्वय - बुद्दियोगात् - या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा - कर्म दूरेण अवरम् - सकाम कर्म हे अत्यंत खालच्या श्रेणीचे आहे - अतः धनञ्जय - म्हणून हे धनंजया ! - बुद्धौ शरणं अनिविच्छ - समत्वबुद्धीमध्येच तू रक्षणाचा उपाय शोध, म्हणजे बुद्धियोगाचा आश्रय घे - हि फलहेतवः - कारण फळाचा हेतू बनणारे लोक - कृपणाः सन्ति - अत्यंत दीन असतात. ॥ ४९ ॥ व्याख्या : हे धनंजय ! बुद्धियोगात् बुद्ध्या व्यवसायात्मिकया योगः कर्मयोगः बुद्धियोगः तस्मात् तेन कर्म काम्यं कर्म दूरेण अवरं अत्यंतं अपकृष्टम् । हि यस्मात् त्वं बुद्धौ ज्ञाने शरणं आश्रयं कर्मयोगं अनिविच्छ अनुतिष्ठ । यद्वा बुद्धौ शरणं त्रातारं ईश्वरं अन्विच्छ आश्रय । कृपणाः दीनाः नराः फलहेतवः फलेषु हेतुर्येषां ते फलहेतवः सकामाः संति ॥ ४९ ॥ अर्थ : हे धनंजया ! गुद्धियोगाहून, म्हणजे समत्वबुद्धियुक्त कर्माहून अथवा ज्ञानयोगाहून फलाच्या इच्छेनें केलेले कर्म अत्यंत निकृष्ट आहे. यास्तव तूं बुद्धींत, म्हणजे ज्ञानांत आश्रय मिळविण्याची इच्छा कर. परमार्थज्ञानशरण हो. कारण फलाच्या तृष्णेने कर्मफलाचे हेतु होणारे कर्मठ कृपण, अज्ञ आहेत. ॥ ४९ ॥ विवरण : अर्जुनास समतेचा आश्रय घेण्याबद्दल आज्ञा देऊन, आता दोन श्लोकांत त्या समतारूप बुद्धीने युक्त महापुरुषांची प्रशंसा करीत, भगवंत अर्जुनास कर्मयोगाचे अनुष्ठान करण्यासाठी पुन्हा आज्ञा देत, त्याचे फल सांगत आहेत -
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते । अन्वय - बुद्धियुक्तः - समबुद्धीने युक्त असा पुरुष - इह उभे सुकृतदुष्कृते - याच लोकात पुण्य आणि पाप या दोहोंचाही - जहाति - त्याग करतो, म्हणजे त्यातून मुक्त होतो. - तस्मात् योगाय युज्यस्व - म्हणून समत्वरूप योगाला तू लागून रहा - योगः कर्मसु कौशलम् - हा समत्वरूप योगच कर्मांतील कौशल्य आहे, म्हणजे कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. ॥ ५० ॥ व्याख्या : हे पार्थ ! बुद्धियुक्तः बुद्ध्या युक्तः बुद्धियुक्तः योगयुक्तः इह जन्मनि उभे द्वे सुकृतदुष्कृते सुकृतं स्वर्गादिप्रापकं च दुष्कृतं निरयप्रापकं सुकृतदुष्कृते जहाति परमेश्वरप्रसादेन त्यजति । तस्मात् त्वं योगाय समत्वबुद्धियोगाय युज्यस्व घटस्व युक्तो भव । योगः समत्वबुद्धियोगः कर्मसु कौशलं कुशलस्य कल्याणस्य भावः कौशलं बंधकानां ईश्वराराधनेन मोक्षपर्यवसायित्वम् ॥ ५० ॥ अर्थ : समत्वबुद्धीने युक्त असलेला पुरुष चित्तशुद्धि, ज्ञानप्राप्ति, या परंपरेने शुभ कर्मापासून उत्पन्न होणारे पुण्य व अशुभ कर्मापासून उत्पन्न होणारे पाप ही दोन्ही येथल्या येथेंच टाकतो. त्याला त्यांचा लेप लागत नाही. समत्वबुद्धीनें चित्तशुद्धि होते, चित्तशुद्धीनंतर ज्ञानप्राप्ति होते. मी अकर्ता, अभोक्ता, नित्य, निर्विकार आहे, असे आत्मज्ञान होते. ते झाल्यामुळेच पुण्य-पापांचा क्षय होतो, पण नुसत्या समत्वबुद्धीने पुण्य-पापक्षय संभवत नाही. तथापि तूं प्रथम समत्वबुद्धियोगासाठींच यत्न कर. त्यांत आपले मन स्थिर कर. कारण कर्त्याला पुण्य-पापांनी बद्ध करणे हा कर्मांचा जरी स्वभावच असला तरी समत्वबुद्धियोग हेंच त्या कर्मांतील कुशलत्व आहे. कारण त्यामुळे कर्माचा स्वभाव बदलतो आणि असा स्वभावही बदलून सोडणें हेंच कर्मांतील कौशल्य आहे. म्हणून तूं समत्वबुद्धियुक्त हो. ॥ ५० ॥ विवरण :
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः । अन्वय - हि बुद्धियुक्ताः - कारण समबुद्धीने युक्त असे - मनीषिणः - ज्ञानी लोक हे - कर्मजम् - कर्मापासून उत्पन्न होणार्या - फलम् त्यक्त्वा - फळाचा त्याग करून - जन्मबन्धविनिर्मुक्ताः - जन्मरूपी बंधनातून मुक्त होऊन, +अनामयम् पदम् गच्छन्ति - निर्विकार असे परमपद प्राप्त करून घेतात. ॥ ५१ ॥ व्याख्या : मनीषिणः मनसः अंतःकरणस्य ईषिणः नियामकाः ज्ञानिनः कर्मजं कर्मणः जातं फलं काम्यकर्मफलं त्यक्त्वा अनाभयं सर्वोपद्रवरहितं पदं विष्णोः पदं मोक्षाख्यं गच्छंति । हि निश्चयेन । कथंभूताः मनीषिणः । बुद्धियुक्ताः बुद्ध्या निश्चयात्मिकया युक्ताः । पुनः कथंभूताः मनीषिणः । जन्मबंधविनिर्मुक्ताः जन्मरूपश्चासौ बंधश्च जन्मबंधः जन्मबंधेन विनिर्मुक्ताः ॥ ५१ ॥ अर्थ : देवादिकांचा देह हा इष्ट देह; पश्वादिकांचा देह हा अनिष्ट देह व मनुष्यदेह हा मिश्र देह होय. त्यांची प्राप्ति होणें हेच कर्मापासून मिळणारे फल आहे. पण पूर्वोक्त समत्वबुद्धियुक्त पुरुष चित्तशुद्धीच्या द्वारा ज्ञानी होऊन ज्ञानाच्या बलानेंच त्याचा परित्याग करतात. याप्रमाणे जन्मरूप बंधांतून आपल्याला सोडवून जीवन्मुक्त झालेले ते ज्ञानी प्रारब्धकर्माचा क्षय होतांच विदेहमोक्षाला प्राप्त होतात. ॥ ५१ ॥ विवरण : भगवंतांनी कर्मयोगाच्या आचरणाने अनामय पदाचा लाभ सांगितला आहे. त्यावर अर्जुनास वाटेल की अनामय परमपदाची प्राप्ती मला केव्हा व कशी होईल ? म्हणून भगवंत पुढील दोन श्लोकांत म्हणतात -
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति । अन्वय - यदा ते बुद्धिः - जेव्हां तुझी बुद्धी - मोहकलिलम् - मोहरूपी दलदल - व्यतितरिष्यति - चांगल्या प्रकारे पार करून जाईल - तदा श्रुतस्य च श्रोतव्यस्य - तेव्हां ऐकलेल्या आणि ऐकिवात येणार्या इह-परलोकातील सर्व भोगांच्या बाबतीत - निर्वेदम् गन्तासि - तुला वैराग्य प्राप्त होईल. ॥ ५२ ॥ व्याख्या : हे पार्थ ! यदा परमेश्वराराधने क्रियमाणे सति तत्प्रसादेन ते तव बुद्धिः निश्चयात्मिका मोहकलिलं मोह एव देहादिषु आत्मबुद्धिरेव कलिलं गहनं मोहकलिलं देहाभिमानलक्षणं मोहमयं गहनं दुर्गं व्यतितरिष्यति विशेषेण तरिष्यति तदा तस्मिन् काले त्वं श्रुत्रस्य कर्मफलस्य अर्थस्य निर्वेदं वैराग्यं गंतासि प्राप्स्यसि । कथंभूतस्य श्रुतस्य । श्रोतव्यस्य श्रोतुं योग्यं श्रोतव्यं तस्य ॥ ५२ ॥ अर्थ : आता योगानुष्ठानामुळे झालेली जी चित्तशुद्धि, तिच्यापासून होणारे हे ज्ञान केव्हां होते, म्हणून विचारशील तर सांगतो - जेव्हां तुझी बुद्धि अविवेकरूप दोषांचे अतिक्रमण करील, म्हणजे शुद्ध होईल, तेव्हां अध्यात्मशास्त्रार्थरिक्त इतर शास्त्रांचे श्रोतव्य व श्रुत या दोन्हीविषयी तूम् विरक्त होशील. जे ऐकले आहे व जे ऐकावयाचें आहे, ती दोन्ही व्यर्थ आहेत, असे तुला वाटेल, अध्यात्मशास्त्राचा मात्र तुला असा कंटाळा येणार नाही. ॥ ५२ ॥ विवरण :
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला । अन्वय - श्रुतिविप्रतिपन्ना ते बुद्धिः - तर्हेतर्हेची वचने ऐल्यामुळे विचलित झालेली तुझी बुद्धी - यदा समाधौ - जेव्हां परमात्म्याचे ठिकाणीं - निश्चला च अचला स्थास्यति - अचल व स्थिर राहील - तदा योगम् अवाप्स्यसि - तेव्हा तुला योगाची प्राप्ती होईल, म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल. ॥ ५३ ॥ व्याख्या : यदाकाले ते तव बुद्धिः निश्चयात्मिका समाधौ चित्तं समाधीयते यस्मिन्निति समाधिः तस्मिन् समाधौ परमेश्वरे निश्चलाः विषयांतरैः अनाकृष्टा अत एव अचला न चला अचला अभ्यासपटुत्वेन ईश्वरे स्थिरा सती स्थास्यति तदा काले त्वं योगं योगफलं तत्त्वज्ञानं अवाप्स्यसि प्राप्स्यसि । कथंभूता बुद्धिः । श्रुतिविप्रतिपन्ना श्रुतिभिः नानालौकिकवैदिकार्थश्रवणैः विप्रतिपन्ना इतः पूर्वं विक्षिप्ता ॥ ५३ ॥ अर्थ : कर्मयोगाचे फल असा जो परमार्थयोग तो केव्हां प्राप्त होईल असे विचारशील तर सांगतो - अनेक साध्य-साधनसंबंध दाखविणार्या श्रवनांनी विक्षिप्त झालेली तुही बुद्धि जेव्हा विक्षेपरहित होईल व विकल्पशून्य होऊन आत्म्यामध्यें स्थिर होईल, त्यावेळी मुख्य योगाला तूं प्राप्त होशील. [मोहरूपी चित्तमल नाहीसा होऊन पूर्वोक्त विवेकादिकांनी युक्त झालेली तुझी बुद्धि आत्म्यामध्यें जेव्हा स्थिर होईल, तेव्हा तो अज्ञानरूप परमार्थयोग सिद्ध होईल. हे अर्जुनाच्या पूर्वोक्त प्रश्नाचे उत्तर आहे.] ॥ ५३ ॥ विवरण : भगवंतांनी सांगितले की जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी दलदलीतून सर्वथा पलीकडे जाईल आणि तू या लोकीच्या आणि परलोकीच्या समस्त भोगांपासून विरक्त होशील आणि जेव्हा तुझी बुद्धी परमात्म्यामध्ये निश्चल होऊन राहील, तेव्हा तू परमात्म्यास प्राप्त करून घेशील. यावर परमात्म्यास प्राक्त करून घेतलेल्या स्थितप्रज्ञ सिद्धयोग्याची लक्षणे आणि आचरण काय हे जाणण्याच्या इच्छेने अर्जुन विचारतो -
अर्जुन उवाच - अन्वय - केशव - हे केशवा - समाधिस्थस्य, स्थितप्रज्ञास्य भाषा का - परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या स्थिरबुद्धी अशा पुरुषाचे लक्षण काय - स्थितधीः किम् प्रभाषेत - तो स्थिरबुद्धी पुरुष कसे बोलत असतो - किम् आसीत् - कसा बसतो - किम् व्रजेत - कसा चालतो ॥ ५४ ॥ व्याख्या : हे केशव ! स्वाभाविके समाधौ स्थितप्रज्ञस्य स्थिता निश्चला प्रज्ञा अहं ब्रह्मास्मीति बुद्धिः यस्य सः स्थितप्रज्ञः तस्य भाषा भाष्यते अनया सा भाषा लक्षणं का अस्ति ? तस्य स्थितप्रज्ञस्य समाधिः कः अस्ति ? स्थितधीः स्थिता निश्चला धीर्यस्य सः किं प्रभाषेत किं भाषणं कुर्यात् ? किमासीत किं आसनं कुर्यात् ? किं व्रजेत किं व्रजनं कुर्यात् ? केन लक्षणेन स्थितप्रज्ञः उच्यते ? ॥ ५४ ॥ अर्थ : संन्याश्यांची ज्ञाननिष्ठा व तिच्या प्राप्तीचे कथन हे प्रश्नाचे बीज मिळतांच ज्याला समाधिप्रज्ञा प्राप्त झाली आहे, त्या पुरुषाचे लक्षण जाणण्याच्या इच्छेनें अर्जुन म्हणाला - हे केशवा, आत्मनिष्ठ स्थितप्रज्ञाचें लक्षण काय आहे ! स्थितप्रज्ञ काय बोलतो ! तो कसा राहतो ! व व्यवहार कसा करतो ! या श्लोकांत अर्जुनाने समाधिस्थ स्थितप्रज्ञाचे लक्षण विचारले आहे. समाधि म्हणजे स्वाभाविक चित्तसमाधान. आत्मसाक्षात्कार झाल्यामुळे स्वाभाविक चित्तसमाधानवान् स्थितप्रज्ञाचे म्हणजे ’मीच ब्रह्म आहे’ अशी ज्याची प्रज्ञा स्थिर झाली आहे, तो ज्ञाननिष्ठाचे कल्षण काय आहे. लोक त्याच्याविषयी काय बोलतात, तो स्वतः काय बोलतो व व्यवहारांत कसा वागतो ! ॥ ५४ ॥ विवरण : स्थितप्रज्ञाविषयी अर्जुनाने चार गोष्टी विचारल्या, आणि त्या चार गोष्टींचे उत्तर भगवंतांनी अध्याय समाप्तीपर्यंत दिलेले आहेत
श्रीभगवानुवाच - अन्वय - पार्थ - हे अर्जुना ! - यदा अयं पुरुषः - जेव्हा हा पुरुष - मनोगताम् सर्वान् कामान् - मनातील संपूर्ण कामनांचा - प्रजहाति - पूर्णपणे त्याग करतो - च आत्मना आत्मनि एव - आणि आत्म्याने आत्म्यामध्येच संतुष्ट होऊन राहतो - तदा स्थितप्रज्ञः उच्यते - तेव्हा तो पुरुष स्थितप्रज्ञः म्हटला जातो. ॥ ५५ ॥ व्याख्या : हे पार्थ ! यः कश्चित् पुरुषः यदा काले सर्वान् समग्रान् कामान् मनोरथान् प्रजहाति प्रकर्षेण त्यजति । कथंभूतान् कामान् । मनोगतान् मनसि अंतःकरणे गताः प्राप्ताः मनोगताः तान् । किं च आत्मन्येव स्वस्मिन्नेव परमानंदरूपे आत्मना स्वयमेव तुष्टः सन् आत्मारामः सन् यदा क्षुद्रविषयाभिलाषान् त्यजति तदा तेन लक्षणेन मुनिः स्थितप्रज्ञः उच्यते ॥ ५५ ॥ अर्थ : मुमुक्षूची यत्नसाध्य साधनें व ज्ञाननिष्ठाची स्वाभाविक लक्षणें सांगण्यासाठी श्रीकृष्ण म्हणाले - हे अर्जुना, पुरुष आपल्या मनांतील सर्व कामांस सर्वथा जेव्हां सोडतो आणि आत्म्यामध्येंच आत्मस्वरूपाने संतुष्ट झालेला असतो, तेव्हां तो स्थितप्रज्ञ म्हटला जातो. मनांतील सर्व इच्छांचा त्यांच्या वासनांसह त्याग करून आपल्या अंतर्यामीच्या स्वरूपांत दुसर्या कोनत्याही आनात्मपदार्थाच्या लाभाची अपेक्षा न करतां त्या आत्मस्वरूपानेंच जो संतुष्ट असतो तो स्थितप्रज्ञ होय. स्थितप्रज्ञांचे हे मुख्य लक्षण आहे. ॥ ५५ ॥ विवरण : भगवंत पुढील दोन श्लोकांत ’स्थितप्रज्ञ कसा बोलतो’ याचे उत्तर देतात -
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । अन्वय - दुःखेषु अनुद्विग्नमनाः - दुःखांची प्राप्ती झाली असता ज्याचे मनांत उद्वेग येत नाही - सुखेषु विगतस्पृहः - सुखांची प्राप्ती झाली तरी जो सर्वथा निस्पृह आतो - तथा वीतरागभयक्रोधः - तसेच ज्याची आसक्ती, भय व क्रोध हे नष्ट झाले आहेस असा - मुनिः शितधीः उच्यते - मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो. ॥ ५६ ॥ व्याख्या : कींच सः मुनिः मननशीलः मुनिः स्थितधीः स्थिता ब्रह्मास्मीति निश्चयात्मिका धीः बुद्धिः यस्य सः स्थितधीः स्थितप्रज्ञः उच्यते । स कः । यः दुःखेष्वपि अनेकदुःखेष्वपि अनुद्विग्नमनाः अनुद्विग्नः अक्षुभितं मनो यस्य सः । पुनः स कः । सुखेषु अनेकसुखेषु विगतस्पृहः विगता गता स्पृहा इच्छा यस्य सः । पुनः स कः । वीररागभयक्रोधः रागः प्रीतिश्च भयं च क्रोधः रामगभयक्रोधाः वीताः निर्गताः रागभयक्रोधाः यस्मात् सः वीतरागभयक्रोधः ॥ ५६ ॥ अर्थ : मुमुक्षुचे दुसरे कर्तव्य व विद्वानाचे दुसरे लक्षण सांगण्यासाठी भगवान म्हणतात - जो पुरुष आध्यात्मिकादि दुःखें प्राप्त झाली असतां उद्विग्न होत नाही, नानाप्रकारची सुखे प्राप्त झाली असतांही त्यांबरोबर ज्याची तृष्णा वाढत नाही, म्हणजे त्यांच्याविषयीं जो निरिच्छ असतो, ज्याचे राग, भय व क्रोध निवृत्त झालेले असतात, तो स्थितप्रज्ञ मुनि म्हटला जातो. दुःखाने उद्विग्न न होणारा, सुखाविषयीं तृष्णा वाढूं न देणारा आणि आसक्ति, भय, क्रोध यांनी रहित असलेला जो पुरुष तो स्थितप्रज्ञ मुनि होय. मुनि, म्हणजे आत्मवेत्ता संन्यासी, वरील अवस्था जेव्हां प्राप्त होते, तेव्हां त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. ॥ ५६ ॥ विवरण :
यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् । अन्वय - यो सर्वत्र अनभिस्नेहः - -जो पुरुष सर्वत्र स्नेहरहित असून - तत् तत् शुभाशुभम् - त्या त्या शुभ किंवा अशुभ वस्तु - प्राप्य न अभिनन्दति - प्राप्त झाल्यावर प्रसन्नही होत नाही - तथा ने द्वेष्टि - तसेच द्वेष करीत नाही - तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता - त्याची बुद्धी स्थिर आहे. ॥ ५७ ॥ व्याख्या : कथं अप्रभाष्यते अस्योत्तरम् । यः मुनिः सर्वत्र पुत्रमित्रादिषु अनभिस्नेहः सन् स्नेहशून्यः सन् तत्तत्प्रारब्धकर्म परिप्रापितं शुभाशुभं शुभं च अशुभं च शुभाशुभे शुभाशुभयोः समहारः शुभाशुभं शुभं अनुकूलं प्राप्य नाभिनंदति न प्रशंसति अशुभं प्रतिकूलं प्राप्य न द्वेष्टि न निंदति । तस्य मुनेः प्रज्ञा परमात्मतत्त्वविषया प्रतिष्ठिता फलपर्यवसायिनी अस्ति सः स्थितप्रज्ञः ॥ ५७ ॥ अर्थ : मुमुक्षुचें तिसरे कर्तव्य व विद्वानाचे तिसरे लक्षण जो देह-जीवितादिकांविषयींही अत्यंत प्रीतिरहित असतो, ते ते शुभ व अशुभ, यांस प्राप्त होऊन त्यांतील शुभप्राप्तीचे अभिनंदन व अशुभप्राप्तीचा द्वेष करीत नाही. त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित आहे, तोच स्थितप्रज्ञ होय. ॥ ५७ ॥ विवरण : ’स्थितप्रज्ञ कसा बसतो ?’ भगवंत म्हणतात, इंद्रिये ही सर्वस्य त्याच्या ताब्यात असणे, आसक्तिरहित होऊन इंद्रिये आपापल्या विषयांतून उपरत होणे म्हणजेच स्थितप्रज्ञाचे बसणे होय -
यदा संहरते चायं कूर्मोङ्गानीव सर्वशः । अन्वय - च कूर्मः - आणि कासव - सर्वशः अङ्गानि इव - सर्व बाजूंनी आपले अवयव ज्याप्रमाणे आत ओढून घेते त्याप्रमाणे - यदा अयम् - जेव्हा हा पुरुष - इन्द्रियेभ्यः - इंद्रियांच्या विषयांपासून - इन्द्रियाणि सर्वशः संहरते - आपली इंद्रिये सर्व प्रकाराने आवरून घेतो - तदा तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता - तेव्हा त्याची बुद्धी स्थिर आहे असे समजावे. ॥ ५८ ॥ व्याख्या : किंच यदा यस्मिन् काले अयं योगी इंद्रियार्थेभ्यः इंद्रियाणां अर्थाः इंद्रियार्थाः तेभ्यः शब्दादिविषयेभ्यः सकाशात् इंद्रियाणि संहरते संहरति । यथा कूर्मः अंगानि करचरणादीनि सर्वशः स्वभावेनैव आकर्षति तद्वत् तस्य मुनेः प्रज्ञा बुद्धिः प्रतिष्ठिता प्रतिष्ठा संजाता यस्याः सा तथोक्ता अस्ति ॥ ५८ ॥ अर्थ : जिज्ञासूचे चवथे कर्तव्य व ज्ञान्याचे चवथे लक्षण - कांसव आपले अवयव जसे एकदम आंवरून घेतो, तसा हा पुरुष जेव्हां विषयांपासून इंद्रियें सर्वप्रकारें परतवून घेतो, तेव्हां त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झाली आहे, असे समजावे. इंद्रियांना विषयांपासून विमुख करणें हें प्रज्ञास्थैर्याचे लक्षण आहे. ॥ ५८ ॥ विवरण : इतर प्रकारे केल्या जाणार्या इंद्रियसंयमापेक्षा स्थितप्रज्ञाच्या इंद्रियसंयमाचा वेगळेपणा दाखवितात -
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः । अन्वय - निराहारस्य देहिनः - इंद्रियांच्या द्वारा विषयांचे ग्रहण न करणार्या पुरुषांच्या बाबतीत - वुषया विनिवर्तन्ते - केवळ विषयच निवृत्त होतात - किन्तु रसवर्ज्यम् (न) - परंतु विषयातील आसक्ती निवृत्त होत नाही. - परं दृष्ट्वा अस्य रसः अपि निवर्तते - परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यामुळे या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीसुद्धा संपूर्णपणे निवृत्त होते. ॥ ५९ ॥ व्याख्या : निराहारस्य इंद्रियैः विषयाणां आहरणं ग्रहणं आहारः निर्गतः आहारो यस्य सः निराहारः तस्य निराहारस्य इंद्रियैः विषयग्रहणं अकुर्वतः देहिनः देहो अस्यास्तीति देही तस्य देहाभिमानिनः अज्ञस्य विषयाः शब्दादिविषयाः विनिवर्तंते परावृताः भवंति । किं तु रसवर्जं विषयतृष्णा न निवर्त्तते । किं तु अस्य स्थितप्रज्ञस्य रसोपि विषयभिलाषोपि परं परमात्मानं दृष्ट्वा निवर्त्तते नश्यति ॥ ५९ ॥ अर्थ : जो विषयांचे आहरण करूं शकत नाही, अनुभव घेऊं शकत नाही, अशा उपाशी किंवा अशक्त प्राण्यापासूनही शब्द-स्पर्शादि विषय प्रीतीवांचून निवृत्त होतात. विषयासक्तीसह निवृत्त होत नाहींत. पण या स्थितप्रज्ञाचा तो विषयासक्तिरूप रसही परमार्थतत्त्वाचा अनुभव घेऊन निवृत्त होतो. विषयांचे सेवन करावयाचे नाही, अशा हठाने जे इंद्रियांना विषयांपासून परतवितात किंवा इंद्रियांचा हठाने निरोध केल्यामुळे विषय् त्यांच्यापासून निवृत्त होतात, ती इंद्रियें किंवा ते विषय विषयप्रीतिसह निवृत्त होत नाहींत. तर विषयवासना मनांत जशीच्या तशी ठेवूनच निवृत्त होतात. विषयवासनेसह निवृत्त होत नाहीत. पण रस म्हणजे विषयप्रीति. परब्रह्माला साक्षात् जाणल्याने ’मीच ते आहे’ असा अनुभव घेऊन त्यांतच स्थिर झाल्याने ती विषयप्रीतीही निवृत्त होते. ॥ ५९ ॥ विवरण : आसक्तीचा नाश आणि इंद्रियसंयन न झाल्यास काय हानी होते ? यावर साधकाचे कर्तव्य सांगताना पुन्हा स्थितप्रज्ञ अवस्थेचे कारण इंद्रियसंयम आहे असे सांगतात -
यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः । अन्वय - कौन्तेय - हे अर्जुना ! - हि प्रमाथीनि - पण आसक्तीचा नाश न झाल्यामुळे विक्षुब्ध करण्याचा स्वभाव असणारी - इन्द्रियाणि - ही इंद्रिये - यततः - प्रयत्न करणार्या - विपश्चितः पुरुषस्य - बुद्धिमान पुरुषाचे - मनः अपि - मन सुद्धा - प्रभम् हरन्ति - जबरदस्तीने हरण करून घेतात. ॥ ६० ॥ अतः तानि सर्वाणि संयम्य - म्हणून ती सर्व इंद्रिये वश करून घेऊन - साधकः युक्तः - साधकाने चित्त स्थिर करून - मत्परः आसीत - माझा आधार घेऊन ध्यानाला बसावे - हि यस्य - कारण ज्या पुरुषाची - इन्द्रियाणि वशे - ही इंद्रिये त्याला वश असतात - तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता - त्याची बुद्धी स्थिर होऊन राहते. ॥ ६१ ॥ व्याख्या : हे कौन्तेय ! विपश्चितः विवेकिनः पुरुषस्य इंद्रियाणि मनः प्रसभं बलात्कारेण हरंति । कथंभूतानि इम्द्रियाणि । प्रमाथीनि प्रकर्षेण मथनशीलानि प्रमाथीनि । कथंभूतस्य पुरुषस्य । यततः यततीति यतन् तस्य मोक्षे प्रयतमानस्य ॥ ६० ॥ युक्तः योगी सर्वाणि ज्ञानकर्मसाधनभूतानि तानि इंद्रियाणि संयम्य मत्परः सन् अहमेव सर्वात्मा वासुदेव एव परो श्रेष्ठः यस्य सः मत्परः आसीत । यस्य मुनेः वशे वशवर्तीनि इंद्रियाणि संति । हि इति निश्चयेन । तस्य मुनेः प्रज्ञा बुद्धिः प्रतिष्ठिता अस्ति ॥ ६१ ॥ अर्थ : सम्यग्दर्शनरूप प्रज्ञास्थैर्य करण्याची इच्छा करणाराने प्रथ इंद्रियांना आपल्या स्वाधीन ठेवावे. तसे न केल्यास कोणता दोष घडतो, ते सांगण्यासाठी भगवान म्हणतात - हे कौंतेया, यत्न करणार्याही बुद्धिमान् पुरुषाची व्याकुल करणारी इंद्रिये त्याच्या मनाला हरण करतात. यास्तव त्या सर्व इंद्रियांचे संयमन करून त्यांना आपल्या वश ठेवून शांतचित्त व मत्पर होऊन म्हणजे ’मीच श्रेष्ठ आहे, मजहून अन्य कोणी श्रेष्ठ नाहीं’ असे समजून स्थिर रहावे. कारण इंद्रियें ज्याच्या स्वाधीन असतात, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित असते. प्रज्ञास्थैर्याची इच्छा करणार्या पुरुषाने प्रथम जितेंद्रिय व्हावे. कारण इंद्रियांना स्वाधीन न ठेवल्यास वारंवार विषयांतील दोषांचे चिंतन करणार्या विद्वान् पुरुषाचीही इंद्रिये त्याच्या विवेक-विज्ञानयुक्त मनालासुद्धां बलात्काराने विषयांकडे ओढून नेतात. कारण पुरुषाला विषयांसाठी व्याकुल करणें हा त्यांचा स्वभावच आहे. म्हणून प्रथम इंद्रियांचे संयमन करून, शांत होऊन मी सर्वांतर्यामी जो वासुदेव तत्पर होऊन, तोच ’मी, त्याहून निराळा नव्हे’ असा निश्चय करून रहावे. परमात्म्याहून मी अन्य नाही, असे निरंतर अनुसंधान, किंवा विषय-दोषांच्या चिंतनाचा अभ्यास, यामुळे ज्याची इंद्रियें वश झालेलीं असतात, तोच स्थितप्रज्ञ होय. ॥ ६०-६१ ॥ विवरण : मनाबरोबर इंद्रिये वश न केल्यास आणि भगवत्परायण न झाल्यास काय हानी होते हे पुढील दोन श्लोकांत सांगतात -
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते । अन्वय - विषयान् ध्यायतः पुंसः - विषयांचे चिंतन करणार्या पुरुषाची - तेषु सङ्गः उपजायते - त्या विषयांमध्ये आसक्ती उत्पन्न होते - सङ्गात् कामः संजायते - त्या आसक्तीमुळे त्या विषयांची कामना निर्माण होते - च कामात् क्रोधः अभिजायते - आणि कामनेमध्ये विघ्न आल्यास क्रोध उत्पन्न होतो. ॥ ६२ ॥ क्रोधात् सम्मोहः भवति - क्रोध आला की अत्यंत मूढ भाव उत्पन्न होतो - सम्मोहात् स्मृतिविभ्रमः - मूढभावामुळे स्मृतीमध्ये भ्रम होतो - स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः - स्मृतीमध्ये भ्रम निर्माण झाल्यामुळे बुद्धीचा नाश, म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो - च बुद्धिनाशात सः पुरुषः प्रणश्यति - आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे तो पुरुष आपल्या स्थितीपासून च्युत होतो. ॥ ६३ ॥ व्याख्या : गुणबुद्ध्या विषयान् ध्यायतः ध्यायतीति ध्यायन् तस्य पुंसः पुरुषस्य तेषु विषयेषु संगः आसक्तिः उपजायते भवति । संगात् आसक्त्या कामः विषयेषु अधिकतृष्णा संजायते उत्पन्ना भवति । कामात् विषयाणां अलाभात् क्रोधः ज्वलनात्मा अभिजायते भवति ॥ ६२ ॥ किं च क्रोधात् संमोहः कार्याकार्यविवेकाभावः भवति । संमोहात् कार्याकार्यविवेकाभावात् स्मृतिविभ्रमः स्मृतेः शस्त्राचार्योपदिष्टार्थानुसंधानस्य विभ्रमः विभ्रंशः भवति । स्मृति भ्रंशात् शस्त्राचार्योपदिष्टार्थानुसंधाननाशात् बुद्धिनाशः बुद्धेः चेतनायाः नाशः भवति । बुद्धिनाशात्चेतनाभ्रंशात् प्रणश्यति मृततुल्यो भवति ॥ ६३ ॥ अर्थ : सर्व अनर्थांचे मूळ विषयचिंतनांत आहे. ते कसें ? विषयांचे ध्यान-चिंतन करणार्या पुरुषाची त्या विषयांच्या ठिकाणी प्रीति-आसक्ति उत्पन्न होते. तीव्र विषयाशक्तीमुळे त्यांची इच्छा होते. विषयेच्छेपासून क्रोध उत्पन्न होणें स्वाभाविक आहे. त्या क्रोधापासून कार्य व अकार्य याविषयींचा अविवेके उत्पन्न होतो. त्या अविवेकापासून स्मृतिभ्रंश होतो, म्हणजे शास्त्रादिकांच्या उपदेशाची आठवण नाहीशी होते. स्मृतिभ्रंशापासून बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धिभ्रंश झाल्यामुळे तो पुरुषच नाश पावतो. तो पुरुषार्थाचा अधिकारी राहात नाही. ॥ ६२-६३ ॥ विवरण : आता ’स्थितप्रज्ञ योगी कसा चालतो’ हे सांगताना मन व इंद्रिये वश असलेल्या साधकाचे विषयांमध्ये वावरण्याचे प्रकार व त्याचे फल सांगतात -
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् । अन्वय - तु विधेयात्मा - परंतु ज्याने अंतःकरण स्वाधीन करून घेतले आसे असा साधक - आत्मवश्यैः - स्वतःला वश असणार्या - रागद्वेषवियुक्तैः इन्द्रियैः - राग व द्वेष यांनी रहित असणार्या अशा इंद्रियांच्या द्वारा - विषयान् चरन् - विषयांमध्ये वावर करीत असतांही - प्रसाधम् अधिगच्छति - अंतःकरणाची आध्यात्मिक प्रसन्नता प्राप्त करून घेतो ॥ ६४ ॥ व्याख्या : स्थितप्रज्ञत्वं कथं भवति । मुनिः रागद्वेषवियुक्तैः रागः प्रीतिः च द्वेषः दर्पः रागद्वेषौ रागद्वेषाभ्यां वियुक्तानि रहितानि रागद्वेषवियुक्तानि तैः इंद्रियैः विषयान् श्रोत्रादिभिः शब्दादीन् चरन् सन् चरतीति चरन् उपभुंजानः सन् प्रसादं शांतिं अधिगच्छति प्राप्नोति । कथंभूतः मुनिः । विधेयात्मा विधेयः वशवर्त्ती आत्मा मनो यस्य सः । कथंभूतैः इंद्रियैः । आत्मवश्यैः आत्मनः मनसः वश्यानि आत्मवश्यानि तैः ॥ ६४ ॥ अर्थ : पण याच्या उलट राग-द्वेषरहित व स्वतःच्या स्वाधीन असलेल्या इंद्रियांनी विषयांचा अनुभव घेणारा विधेयात्मा, म्हणजे ज्याचे अंतःकरण त्याच्या इच्छेप्रमाणें चालते, तो पुरुष चित्ताच्या स्वास्थ्यास प्राप्त होतो. कर्म व ज्ञान यांचे जे अधिकारी असतात, त्यांतील मुमुक्षु राग-द्वेषरहित व स्वाधीन ठेवलेल्या इंद्रियांनी अंतःकरणालाही आपल्या इच्छेच्या विरुद्ध वागूं न देतां शरीर जिवंत राहण्यास अगदी अवश्य तेवढ्याच विषयांचा उपभोग घेतो. त्यामुळे त्याच्या चित्ताला स्वास्थ्य मिळतें. इंद्रियें व अंतःकरण या दोहोंनाही आपल्या स्वाधीन ठेवल्यामुळे त्याची प्रवृत्ति अनियमानें होऊं शकत नाही, तर ती नियमानेंच होते. त्यामुळे त्याचे चित्त अत्यंत निर्मल-प्रसन्न होते. ॥ ६४ ॥ विवरण :
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते । अन्वय - प्रसादे - अंतःकरणातील प्रसन्नता झाल्यावर - अस्य - याच्या - सर्वदुःखानाम् - संपूर्ण दुःखांचा - हानिः उपजायते - अभाव होऊन जातो - च प्रसन्नचेतसः - आणि प्रसन्नचित्त असणार्या कर्मयोग्याची बुद्धिः - आशु हि पर्यवतिष्ठते - लवकरच सर्व बाजूंनी निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. ॥ ६५ ॥ व्याख्या : प्रसादे सति स्वस्थांतःकरणे सति अस्य मुनेः सर्वदुःखानां सर्वाणि च तानि दुःखानि च सर्वदुःखानि तेषां सर्वदुःखानां अज्ञानविलसितानां हानिः नाशः उपजायते भवति । हि यस्मात् कारणात् प्रसन्नचेतसः प्रसन्नं चेतो यस्य सः प्रसन्नचेताः तस्य मुनेः आशु शीघ्रं बुद्धिः ब्रह्मात्मैक्याकारा परि समंताद्भागे अवतिष्ठते स्थिरा भवति ॥ ६५ ॥ अर्थ : आणि असे चित्तस्वास्थ्य प्राप्त झाले असतां त्याच्या सर्व आध्यात्मिकादि विविध दुःखांचा नाश होतो व ज्याअर्थीं शांतचित्त पुरुषाची बुद्धि-चित्त सर्व बाजूंनी सत्वर स्थिर होते, त्याअर्थीं राग-द्वेषरहित इंद्रियांनी अनिषिद्ध व अगदी अवश्य तितक्याच विषयांचा अनुभव घ्यावा. त्यांचेच सेवन करावे. निषिद्ध व अनावश्यक विषयांचे सेवन कधींही करूं नये. ॥ ६५ ॥ विवरण : ज्याने मन व इंद्रिये जिंकलेली नाहीत, अशा विषयासक्त मनुष्याच्या ठायी सुख-शांततेचा अभाव होतो, असे दाखवून विषयांच्या संगतीने साधकाची बुद्धी विचलित होते, हा प्रकार भगवंत सांगत आहेत -
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना । अन्वय - अयुक्तस्य - ह्याने मन व इंद्रिये जिंकलेली नाहीत अशा पुरुषांच्या ठिकाणी - बुद्धिः न अस्ति - निश्चयात्मिका बुद्धी असत नाही - च अयुक्तस्य - आणि अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात - भावना न - भावना सुद्धा असत नाही - अभावयतः शान्तिः न - भावनाहीन मनुष्याला शांती मिळत नाही - च अशान्तस्य सुखं कुतः भविष्यति - आणि शांतिरहित मनुष्याला सुख कोठून प्राप्त होणार ? ॥ ६६ ॥ व्याख्या : अयुक्तस्य अवशीकृतेन्द्रियस्य बुद्धिः शास्त्राचार्योपदेशाभ्यां आत्मविषया बुद्धिः नास्ति नोत्पद्यते । चेत्यपरं अयुक्तस्य अनितेन्द्रियस्य भावना ध्यानं नास्ति नोत्पद्यते । किं च अभावयतः आत्मध्यानं अकुर्वतः शांतिः आत्मनि चित्तोपरतिः नास्ति । अशांतस्य आत्मपराङ्मुखस्य सुखं मोक्षानंदः कुतः ? ॥ ६६ ॥ अर्थ : अर्जुना, ज्याचें चित्त स्थिर झालेले नसते, त्याला आत्म्याविषयींची बुद्धि नसते. तसेंच ज्याचे चित्त प्रसन्न असते, त्याला आत्मज्ञानाविषयींचा अभिनिवेश नसतो. सतत आत्मानुसंधान, ’मीच ब्रह्म’ ही बुद्धि नसते. आणि तशी बुद्धि न करणाराला चित्ताची स्वस्थता नसते. ज्याचे चित्त शांत, म्हणजे स्वस्थ झालेले नाही, त्याला सुखच कोठचे ! ज्याचे चित्त विक्षिप्त असते, संकल्प, विकल्प, संशय, विपरीत भावना, इत्यादि दोषांनी युक्त असते, त्याला आत्म्याविषयीं बुद्धिच होत नाही. तसल्या विक्षिप्त चित्त पुरुषाकडून आत्मानुसंधान-सतत चिंतनही होत नाही. दीर्घकाल - वर्षेंच्या वर्षे आत्म्याचे सतत स्मरण न करणाराला शांति प्राप्त होत नाही. त्या त्या अनर्थांची निवृत्ति होत नाही आणि ती न झाल्यामुळे संसारसागराम्तच निमग्न झालेल्या अशान्त पुरुषाला सुख कोठून होणार ! कारण इंद्रियांना विषयेच्छारहित करणे हेच सुख आहे. विषयतृष्णा वाढविणें किंवा तिला चित्तांत राःऊं देणे हे सुख नव्हे, कारण तृष्णा असेपर्यंत सुखाचा लेशही अनुभवास येत नाही. असा अनुभव पदोपदीं येतो व शास्त्रही तसेंच सांगते. ॥ ६६ ॥ विवरण :
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते । अन्वय - हि इव अम्भसि नावम् - ज्याप्रमाणे पाण्यात चालणार्या नावेला - वायुः हरति - वायू हा हरण करून नेतो - चरताम् इन्द्रियाणाम् - त्याप्रमाणे विषयांमध्ये वावरणार्या इंद्रियांपैकी - मनः यत् अनु विधीयते - मन ज्या इंद्रियांच्या बरोबर राहते - तत् अस्य प्रज्ञाम् हरति - ते एकच इंद्रिय या अयुक्त प्पुरुषाच्या बुद्धीला हरण करून घेते. ॥ ६७ ॥ व्याख्या : चरतां चरंति स्वैरं विषयेषु चरंति तानि चरंति तेषां चरतां अवशीकृतानां इंद्रियाणां मध्ये यत् एकं इंद्रियं मनः अंतःकरणं अनुलक्षीकृत्य विधीयते प्रेर्यते तत् मनोयुक्तं एकं इंद्रियं अस्य साधकस्य प्रज्ञां आत्मविषयां बुद्धिं हरति एकमपि इंद्रियं प्रज्ञां हरति किमुत सर्वाणि हरंति इति वक्तव्यम् ? अत्र दृष्टांतः । यथा प्रमत्तस्य कर्णधारस्य नावं नौकां वायुः अंभसि समुद्रे सर्वतः परिभ्रमयति तद्वत् ॥ ६७ ॥ अर्थ : असमाहित पुरुषाला आत्म्याविषयींची बुद्धि कां होत नाही ? म्हणून विचारशील तर सांगतो - आपल्याला विषयामध्ये प्रवृत्त होणार्या इंद्रियांच्या मागोमाग जे मन जाते, ते या साधकाच्या प्रज्ञेला - आत्मा व अनात्मा यांच्या विवेकांवांचून उत्पन्न झालेल्या बुद्धीला हरण करते. जलामध्ये वायु जसा नौकेला अमार्गाने नेतो, त्याप्रमाणे तें मन इंद्रियांना अमार्गाने जावयास लावते. म्हणून अयुक्ताला आत्मसाक्षात्कारूप बुद्धि होत नाही. ॥ ६७ ॥ विवरण : अयुक्त पुरुषाची बुद्धी विचलित होण्याचा प्रकार सांगून आता पुन्हा स्थितप्रज्ञ अवस्थेच्या प्राप्तीसाठी सर्व प्रकारे इंद्रियसंयमाची विशेष आवश्यकता असल्याचे सिद्ध करून, स्थितप्रज्ञ पुरुषाची अवस्था भगवंत वर्णन करतात -
तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः । अन्वय - तस्मात् महाबाहो - म्हणून हे अर्जुना ! - यस्य इन्द्रियाणि - ज्या पुरुषाची इंद्रिये - इन्द्रियार्थेभ्यः - इंद्रियांच्या विषयांपासून - सर्वशः निगृहितानि - सर्वप्रकारांनी निगृहीत केलेली असतात - तस्य प्रज्ञा प्रतिषिठिता - त्या प्रुरुषाची बुद्धी स्तिर असते. ॥ ६८ ॥ व्याख्या : हे महाबाहो ! हे सर्वशत्रुनिवारण ! तस्मात् कारणात् यस्य साधकस्य सर्वशः सर्वाणि इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः इंद्रियाणां अर्थाः इंद्रियार्थाः तेभ्यः शब्दादिविषयेभ्यः निगृहीतानि वशवर्तीनि संति तस्य सिद्धस्य साधकस्य च प्रज्ञा बुद्धिः प्रतिष्ठिता अस्ति ॥ ६८ ॥ अर्थ : म्हणून हे महाबाहो अर्जुना ! ज्या पुरुषाची इंद्रिये विषयांपासून सर्व प्रकारे निग्रह करून ठेवलेली असतात, त्याची आत्मानात्म विवेकजन्य बुद्धि प्रतिष्ठित झालेली असते. ६० व्या श्लोकात इंद्रिये मनाला विषयासक्त करून पुरुषाचा घात करतात, ते सांगण्यास आरंभ करून ६२ व्या श्लोकापासूनपुढील श्लोकांनी त्याविषयी उपपत्ति सांगितली व या श्लोकांत त्याच विषयाचा उपसंहार सांगितला. ॥ ६८ ॥ विवरण : एकीकडे विषयासक्त असा सामान्य मनुष्य आणि दुसरीकडे मन-इंद्रिये यांचा संयम करूनपरमात्म्यास प्राप्त करून घेतलेला स्थिरबुद्धी संयमी महापुरुष या दोघांमध्ये काय फरक आहे, ही गोष्ट रात्र व दिवस यांच्या दृष्टीने समजावून सांगून भगवंत त्यांच्या स्वाभाविक स्थितीचे वर्णन करतात -
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । अन्वय - सर्वभूतानाम् - संपूर्ण प्राण्यांच्या संदर्भात - या निशा - जी रात्रीप्रमाणे असते - तस्याम् - अशा त्या नित्य ज्ञानस्वरूप परमानंदांच्या प्राप्तीचे ठिकाणी - संयमी - स्थितप्रज्ञ योगी - च यस्याम् - आणि ज्या नाशवम्त सांसारिक सुखाच्या बाबतीत - भूतानि जाग्रति - सर्व प्राणी जागे असतात - सा पश्यतः - ती परमात्मतत्त्व जाणणार्या - मुनेः निशा - मुनीला रात्रीप्रमाणे असते. ॥ ६९ ॥ व्याख्या : या वेदांतवाक्यजनितसाक्षात्काररूपा अहं ब्रह्मास्मीति बुद्धिः सर्वभूतानां सर्वाणि च तानि भूतानि च सर्वभूतानि तेषां अज्ञानिनां निशा निशेव निशा अस्ति तस्यां ब्रह्मविद्यालक्षणायां सर्वभूतनिशायां संयमी जितेंद्रियः स्थितप्रज्ञः जागर्ति अज्ञाननिद्रायाः प्रबुद्धः सन् सावधानो वर्त्तते यस्यां विषयनिष्ठायां भूतानि जाग्रति प्रतिबुद्ध्यंते सा विषयनिष्ठा पश्यतः पश्यतीति पश्यन् तस्य आत्मतत्त्वं पश्यतः मुनेः स्थितप्रज्ञस्य निशा रात्रिः अस्ति तस्यां दर्शनादिव्यापारः तस्य नास्ति ॥ ६९ ॥ अर्थ : सर्व लौकिक-वैदिक व्यवहार हे अविद्येचे कार्य आहे व अविद्येचा विद्येशी विरोध आहे. त्यामुळे ज्ञानी पुरुषाची अविद्या निवृत्त होतांच त्याच्या व्यवहाराची निवृत्ति होते. ती कशी, - सर्व भूतांची जी रात्र तिथे परमार्थदर्शन, तिच्यामध्यें संयमवान्, जितेंद्रिय योगी म्हणजेच स्थितप्रज्ञ जागतो. आणि ज्या व्यवहारदशेंत सर्व भूतें जागतात-दक्ष असतात, ती व्यवहा अवस्था ही ज्ञानी मुनीचा रात्र असते. आत्मज्ञान ही सर्व भूतांची रात्र, पण त्यांत ज्ञानी जागतो व व्यवहारदशा हा सर्व भूतांचा दिवस, ती ज्ञानीपुरुषाची रात्र आहे. ॥ ६९ ॥ विवरण : रात्रीच्या रूपकानंतर आता समुद्राची उपमा देऊन सांगतात की ज्ञानी पुरुष परमशांती प्राप्त करून घेतो, परंतु भोगांची कामना करणार्या अज्ञानी मनुष्यास शांती लाभत नाही -
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं- अन्वय - आपूर्यमाणम् - सर्व बाजूंनी परिपूर्ण - अचलप्रतिष्ठम् - अचल प्रतिष्ठा असणार्या अशा - समुद्रम् - समुद्रात - यद्वत् आपः प्रविशन्ति - ज्याप्रमाणे नाना नद्यांचे पाणी त्याला विचलित न करता सामावून जाते - तद्वत् - त्याप्रमाणेच - सर्व कामाः - सर्व भोग - यम् प्रविशन्ति - ज्या स्थितप्रज्ञ पुरुषाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकार त्याचे ठिकाणी उत्पन्न न करता सामावून जातात - सः शान्तिम् आप्नोति - तोच स्थितप्रज्ञ पुरुष परम शांति प्राप्त करून घेतो - न कामकामी - याउलट भोगांची इच्छा करणारा शांती प्राप्त करून घेत नाही. ॥ ७० ॥ व्याख्या : यद्वत् यथाप्रकारेण आपः वृष्ट्यादिप्रभवाणि उदकानि आपूर्यमाणं सर्वाभिः नदीभिः आपूर्यमाणं समुद्रं प्रविशंति । कथंभूतं समुद्रम् । अचलप्रतिष्ठं अचला प्रतिष्ठा यस्य सः अचलप्रतिष्ठः तं अनतिक्रांतमर्यादं तद्वत् तथाप्रकारेण सर्वे संपूर्णाः कामाः विषयाः यं अंतर्दृष्टिं मुनिं भोगैः अविक्रियमाणमेव प्रारब्धकर्मभिः आक्षिप्ताः संतः प्रविशंति सः मुनिः शांतिं कैवल्यं प्राप्नोति । कामकामी तु कामेषु विषयेषु कामो अभिलाषः यस्यास्तीति कामकामी विषयाभिलाषी शांतिं कैवल्यं न प्राप्नोति । कथंभूतं मुनिम् । अचलप्रतिष्ठं अचला प्रतिष्ठा स्थितिः यस्य सः अचलप्रतिष्ठः तम् ॥ ७० ॥ अर्थ : अर्जुना, निष्काम स्थितप्रज्ञ यतीलाच मोक्ष प्राप्त होतो. सकाम पुरुषाला नाही. हा सिद्धान्त मी तुला दृष्टांताने स्पष्टकरून सांगतो - पाण्यानें चोहोंकडून सतत भरल्या जाणार्या, तथापि आपली मर्यादा न सोडणार्या समुद्रामध्यें जसे अनेक नद्यांचें जल प्रवेश करते, तथापि समुद्र स्वरूपांतच स्थित असतो, त्याप्रमाणे सर्व काम ज्या पुरुषामध्यें त्याला विकारयुक्त न करतां प्रवेश करतात, तोच शांतीला प्राप्त होतो. विषयांची इच्छा करणारा पुरुष शांतीला प्राप्त होत नाही. हजारो नद्यांचे जल चहूंकडून प्रतिक्षणीं समुद्रास येऊन मिळत असते, पण त्याच्या उदकरूप नियत स्वरूपांत थोडासाही न्यूनाधिक भाव झालेला दिसत नाही. त्याचे स्थिति एकरूपच असते. त्याचप्रमाणे सर्व विषय विद्वानाच्या अगदी समीप असले, तरी त्यांविषयींच्या इच्छा त्याच्या अंतःकरणांत लीन होतात. त्या त्याच्यामध्यें कोणताही विकार उत्पन्न करीत नाहींत. अशा विषयांविषयीं अत्यंत विरक्त झालेल्या निष्काम ज्ञानी पुरुषालाच मोक्षरूप शांति प्राप्त होते. विषयासक्त सकाम पुरुषाला ती प्राप्त होत नाहीं. ॥ ७० ॥ विवरण : आता अर्जुनाच्या चवथ्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवंत स्थितप्रज्ञ पुरुषाच्या आचरणाचे प्रकार सांगतात -
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः । अन्वय - सर्वान् कामान् विहाय - संपूर्ण कामनांचा त्याग करून - यः पुमान् - जो पुरुष - निर्ममः निरहङ्कारः च - ममतारहित, अहंकाररहित आणि - निस्पृहः चरति - स्पृहारहित होऊन वावरत असतो - सः शान्तिम् अधिगच्छन्ति - तोच पुरुष शांतीप्रत प्राप्त होतो (म्हणजे शांती प्राप्त करून घेतो) ॥ ७१ ॥ व्याख्या : यः प्रारब्धभोगी पुमान् पुरुषः सर्वान् प्राप्तान् कामान् विषयान् विहाय त्यक्त्वा अप्राप्तेषु निस्पृहः सन् निर्गता स्पृहा इच्छा यस्य सः निस्पृहः सन् चरति प्रारब्धवशेन भोगान् भुंक्ते सः पुमान् शांतिं कैवल्यं अधिगच्छति प्राप्नोति । कथंभूतः पुमान् । निरहंकारः निर्गतः गतः अहंकारो यस्य सः अहंकारशून्यः आत एव निर्ममः कौपीनाच्छादनादौ ममताशून्यः ॥ ७१ ॥ अर्थ : अर्जुना, ज्याअर्थीं असा अबाधित नियमच आहे, त्याअर्थीं जो पुरुष संन्यासी सर्व कामनांचा निःषेष त्याग करून केवल जीवनाला अवश्य तेवढीच चेष्टा करतो, शरीर जीवंत रहाण्यास अवश्य तेवढेंच कर्म करतो व एकाच जागीं राहिल्यास त्या स्थलादिकांवर आसक्ति जडेल म्हणून एकाच नियत स्थानी न राहतां सदा सर्वदा कर्यटन करतो आणि जो निर्मम व निरहंकार असतो, म्हणजे ज्याला शरीराच्या केवल जीवनास अत्यंत अवश्य असलेल्या परिग्रहाविषयींही ’हा माझा’ असा अभिनिवेश नसतो, तसेंच जो ’मी मोठा विद्वान आहे; अशा प्रकारच्या विद्यत्वाविषयींच्या आत्मसंभावनेनें रहित असतो,, तो स्थितप्रज्ञ ब्रह्मवेत्ता सर्व सम्सारदुःखांचा क्षय हेंच जिचे स्वरूप आहे, अशा ’निर्वाण’ संज्ञक शांतीला प्राप्त होतो. मोक्षाची इच्छा करण्यार्या संन्याशाची सर्व कामत्याग, निःस्पृहता, निर्ममता, निरहंकार, जितेंद्रियत्व इत्यादि विशेषणें यत्नसाध्य असून ’कैवल्य’ हे त्याचे फल आहे. ॥ ७१ ॥ विवरण : स्थितप्रज्ञ पुरुषाच्या स्थितीचे महत्त्व सांगत भगवंत अध्यायाचा उपसंहार करतात -
एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति । अन्वय - पार्थ - हे अर्जुना ! - एषा ब्राह्मी स्थितिः - ब्रह्माला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. - एनाम् प्राप्य - ही स्थिती प्राप्त झाल्यावर - योगी कदापि न विमुह्यति - योगी कधीही मोहित होत नाही - च अन्तकाले अपि - आणि अंतकाळी सुद्धा - अस्याम् स्थित्वा - या ब्रह्मी स्थितीत स्थिर होऊन - सः ब्रह्मनिर्वाणम् ऋच्छति - तो ब्रह्मानंदाप्रत जातो (म्हणजे ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो) ॥ ७२ ॥ व्याख्या : हे पार्थ ! एषा स्थितप्रज्ञलक्षणनिमित्तेन कथिता ब्राह्मी ब्रह्मविषया स्थितिः निष्ठा अस्ति । परमेश्वराराधनेन विशुद्धांतःकरणः पुमान् एनां स्थितिं प्राप्य न विमुह्यति पुनः संसारमोहं न प्राप्नोति । पुमान् अस्यां स्थितौ अंतकापेलि अंत्ये वयस्यपि 'अयं मधुसूदनाभिप्रायः' - स्थित्वा ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मणि निर्वाणं लयं ब्रह्मनिर्वाणं मोक्षं ऋच्छति प्राप्नोति । यः पुमान् बाल्यमारभ्य अस्यां स्थितौ स्थित्वा ब्रह्मनिर्वाणं प्राप्नोति इति किं पुनर्वक्तव्यम् ॥ ७२ ॥ अर्थ : अर्जुना, ही जी वर सांगितलेली स्थितप्रज्ञता हीच ब्राह्मी स्थिति आहे. या स्थितीला प्राप्त होऊन मनुष्य मोहित होत नाही. या स्थितींत अंत्य वयामध्येंही स्थित होऊन मनुष्य मोक्षास प्राप्त होतो. या अध्यायांत शोक-मोहांची साक्षात् निवृत्ति करणारी ज्ञाननिष्ठा प्राधान्यानें व उपायभूत कर्मनिष्ठा गौणत्वानें सांगितली आहे. म्हणून या अध्यायाला ’सांख्ययोग’ असे नांव दिले आहे. ॥ ७२ ॥ विवरण : ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु |