|
श्रीमद् भगवद्गीता मोक्षसंन्यासयोगः
१ अर्जुनाचा त्याग व संन्यास यांविषयी प्रश्न व भगवानांचे त्याविषयी सविस्तर उत्तर.
सर्वच गीताशास्त्राचा अर्थ या अध्यायात संक्षेपतः व सर्व वेदार्थाचा उपसंहार करावा, म्हणून हा अध्याय आरंभिला आहे. कारण मागच्या सर्व अध्यायांमध्ये सांगितलेला अर्थ या अध्यायात ज्ञात होतो. याप्रमाणे सर्व गीतार्थ व सर्व उपनिषदर्थ यांच्या उपसंहारार्थ जरी हा अध्याय असला, तरी त्याच्या आरंभी संन्यास व त्याग या शब्दांच्याच अर्थातील फरक जाणण्याच्या इच्छेने -
अर्जुन उवाच - हे महाबाहो, हृषीकेश, केशिनिषूदन ! - हे महाबाहो, अंतर्यामी, वासुदेवा ! - संन्यासस्य च त्यागस्य तत्त्वम् - संन्यास आणि त्याग यांचे तत्त्व - पृथक् वेदितुम् इच्छामि - पृथक् पृथक् पणे जाणून घेण्याची मला इच्छा आहे. ॥ १ ॥ व्याख्या : श्री । न्यासत्यागविभागेन सर्वगीतार्थसंग्रहम् । स्पष्टं अष्टादशे प्राह परमार्थविनिर्णये । कर्मसंन्यासस्य तदनुष्ठानस्य च अविरोधप्रकारं बुभुत्सः अर्जुनः उवाच । संन्यासस्येति । हे हृषिकेश । हृषीकाणां इंद्रियाणां ईशः स्वामी तत्संबुद्धौ हे हृषीकेश । हे सर्वेंद्रियनियामक । हे केशिनिषूदन । केशिं केशिनामानं हयाकृतिदैत्यं निषूदयति नाशयतीति केशिनिषूदनः तत्संबुद्धौ हे केशिनिषूदन ! हे महाबाहो ! अहं संन्यासस्य चेत्यपरं त्यागस्य तत्त्वं स्वरूपं पृथक् विवेकेन वेदितुं ज्ञातुं इच्छामि । त्वं मां कृपया कथय इति शेषः । सर्वशास्त्रार्थे उक्ते सति त्यागसंन्यासतत्त्वजिज्ञासया प्रश्नकरणे त्वमेव हेतुः इति मनसि निधाय हृषीकेशेति संबोधनाभिप्रायः । विभागेन इदं उत्तरं त्वमेव वक्तुं समर्थः असि कर्कडिकाफलवत् । यथा केशिनाम्नः महतः हयाकृते मुखे बाहुं प्रवेश्य तत्क्षणमेव विवृद्धेन तेनैव बाहुना कर्कटिकाफलवत् त विदार्य निषूदितवान् भागशः द्विधा कृतवान् । तथा त्यागसंन्यासौ विभागेन दर्शनीयौ इति अभिप्रायेण केशिनिषूदनेति संबोधनाभिप्रायः । महाबाहो इति शत्रुनिवारणेन भक्तस्वीकरणसामर्थ्यं दर्शितम् । इति संबोधनाभिप्रायः । इति अनेन अलम् । ॥ १ ॥
अर्जुन म्हणाला - हे महापराक्रमी कृष्णा, मी ‘संन्यास’ या शब्दाच्या अर्थाचे तत्त्व - यथार्थ स्वरूप जाणण्याची इच्छा करितो आणि हे इंद्रियांच्या ईशा, हे केशिदैत्याला मारणार्या कृष्णा, त्याग या शब्दाच्या अर्थाचे तत्त्व अगदी निराळे-पृथक्पणे जाणू इच्छितो. विवरण :
पूर्वीच्या अध्यायांमध्ये ठिकठिकाणी ज्यांचा निर्देश केला आहे अशा ‘संन्यास व त्याग’ या शब्दांचा अर्थ अगदी स्पष्टपणे कोठेच सांगितलेला नाही. म्हणून त्या शब्दांचा पृथगर्थ जाणण्याच्या इच्छेने प्रश्न करणार्या अर्जुनाला त्याचा निर्णय सांगण्यासाठी -
श्रीभगवानुवाच - काम्यानाम् कर्मणाम् न्यासम् - काम्य कर्मांच्या त्यागाला - संन्यासं इति कवयः विदुः - संन्यास असे काही पंडितजन मानतात - तथा इतरे विचक्षणा - तसेच इतर विचारकुशल पुरुष - सर्वकर्मफलत्यागं त्यागं इति प्राहुः - सर्व कर्मांच्या फळाच्या त्यागालाच त्याग असे म्हणतात. ॥ २ ॥ व्याख्या : सर्व अर्जुनाभिप्रायं ज्ञात्वा उत्तरं श्रीभगवानुवाच इत्याह । काम्यानामिति । हे पार्थ ! कवयः कवयंति ते कवयः क्रांतदर्शिनः निष्कर्षार्थतत्त्वज्ञाः काम्यानि कामयंति मनोरथान् संपादयंति तानि काम्यानि तेषां काम्यानां स्वर्गप्राप्तिसाधनानां कर्मणां ’पुत्रकामः यजेत्, स्वर्गकामः यजेत्’ इत्यादिकर्मणां न्यासं स्वरूपेण त्यागं संन्यासं विदुः जानंति । तथा विचक्षणाः ते एव संदिग्धार्थनिर्णयनिपुणाः सर्वकर्मफलत्यागं सर्वाणि समस्तानि च तानि कर्माणि नित्यनैमित्तिकानि सर्वकर्माणि सर्वकर्मणां फलानि सर्वकर्मफलानि सर्वकर्मफलानां त्यागः सर्वकर्मफत्यागः तं त्यागं प्राहुः कथयंति । न तु स्वरूपतः कर्मत्यागं वदंति ॥ २ ॥ श्रीकृष्ण म्हणाले - काही विद्वान् स्वर्गादि फलाच्या उद्देशाने विहित असलेल्या अश्वमेधादि काम्य-कर्माचा त्याग करणे यालाच संन्यास समजतात. दुसरे कित्येक विद्वान् नित्य-नैमित्तिक सर्व कर्मांच्या फलाचा त्याग करणे याला त्याग म्हणतात. [अर्थात ‘संन्यास व त्याग’ या दोन शब्दांच्या अर्थामध्ये अवान्तर भेद जरी असला तरी आत्यंतिक भेद नाही. नित्य-नैमित्तिक कर्माचे फलच नाही, असे कित्येक म्हणतात. पण भगवंतांनी नित्यकर्माचेहि फल मानलेले आहे.] विवरण :
‘काम्य कर्मांचा त्याग करुन नित्य-नैमित्तिक कर्मे फलाभिलाष सोडून करावी’ हा पूर्वोक्त पक्ष, प्रतिपक्षाचे निरसन करून दृढ करण्यासाठी वाद्यांचा आणखी मतभेद सांगतात -
त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः । कर्म दोषवत् अतः त्याज्यम् - कर्ममात्र हे दोषयुक्त आहे म्हणून ते त्याग करण्यासच योग्य आहे - इति एके मनिषिणः प्राहुः - असे काही विद्वान म्हणतात - च यज्ञदानतपःकर्म न त्याज्यम् - आणि यज्ञ दान आणि तपरूप कर्म हे मात्र त्याग करण्यास योग्य नाही - इति अपरे प्राहुः - असे इतर विद्वान म्हणतात. ॥ ३ ॥ व्याख्या : एवं त्यागे संन्यासस्वरूपं प्रदर्श्य केचन नित्यनैमित्तिककर्मत्यागयोः विवदंति । स्वाभिप्रायेण तन्निर्णयादौ मतभेदं उपन्यस्यति । त्याज्यमिति । एके सांख्याः प्रकृतिपुरुषविभागज्ञाः दोषवत् दोषेण तुल्यं दोषवत् जन्ममरणहेतुभूतं यथा दोषः त्यज्यते तद्वत् नित्यनैमित्तिकं कर्म त्याज्यं इति प्राहुः । कथंभूताः एके । मनीषिणः मनसः अंतःकरणस्य ईषिणः नियामिकाः मनिषिणः कर्मणि कृते सति हिंसायां अवश्यंभावित्वात् । अपरे मिमांसकाः यज्ञदानतपःकर्म यज्ञश्च दानं च तपश्च यज्ञदानतपांसि यज्ञदानतपस्सु यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं इति एवं प्रकारेण वदंति तेषां अयं अभिप्रायः ॥ ३ ॥
काही विद्वान् ‘दोषयुक्त सर्वच कर्म त्याग करण्यास योग्य आहे’ असे म्हणतात. सर्वच कर्म बंधाला कारण होत असल्यामुळे दोषयुक्त आहे किंवा सांख्यादिकांच्या मताचा आश्रय केलेले पंडित ‘रागादि दोष जसा सोडला जातो, त्याप्रमाणे कर्म सोडावे’ असे म्हणतात. त्या कर्माधिकारी पुरुषांविषयीच ‘यज्ञ, दान व तप या नित्य-नैमित्तिक कर्मांचा त्याग करु नये’ असे कित्येक म्हणतात. या २ र्या व ३ र्या श्लोकांत सांगितलेले हे सर्व विकल्प कर्माधिकारी गृहस्थासाठीच आहेत. पुत्रादि एषणात्रयाविषयी विरक्त होऊन संन्यास करणार्या ज्ञाननिष्ठांसाठी हे विकल्प नाहीत. कारण संन्याश्यांची ज्ञाननिष्ठा ज्ञानयोगाने अगदी निराळी सांगितली आहे. विवरण :
निश्चयं श्रृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम । हे पुरुषव्याघ्र, भरतसत्तम ! तत्र त्यागे मे निश्चयं श्रृणु - हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना ! संन्यास आणि त्याग या दोहोंपैकी’त्याग’ संबंधीत माझा निश्चय तू ऐक - हि त्यागः त्रिविधः संप्रकीर्तितः - कारण, त्याग हा (सात्विक, रजस व तामस या) तीन प्रकारचा म्हणून सांगितला गेला आहे. ॥ ४ ॥ व्याख्या : एवं परमतं अनुद्य त्यागे स्वमतं वदन् प्रथमं श्रोतारं संमुखी करोति । निश्चयमिति । हे भरतसत्तम ! भरतेषु भरतराजेषु सत्तमः श्रेष्ठः भरतसत्तमः तत्संबुद्धौ हे भरतसत्तमः ! त्वं तत्र तस्मिन्निति तत्र त्यागे विषये निश्चयं निर्णयं मे मत्तः श्रृणु इति किं गोप्यमिव वदसि इत्याशंक्य त्यागेपि सूक्ष्मतया दुर्विज्ञेयः त्रिविधप्रकारः त्यागः अस्ति इति अभिप्रायेणाह । हे पुरुषव्याघ्र ! पुरुषेषु नरेषु व्याघ्रः श्रेष्ठ तत्संबुद्धौ हे पुरुषव्याघ्र हे नरश्रेष्ठ ! हि यस्मात् कारणात् त्यागः त्रिविधः त्रिप्रकारः संप्रकीर्तितः सम्यक् कथितः । विद्वद्भिः इति शेषः ॥ ४ ॥
हे भरतश्रेष्ठा अर्जुना, गौणसंन्यासाविषयी असे हे विकल्प रूढ असल्यामुळे माझ्या सांगण्यावरून तू त्याग व संन्यास यांच्या विकल्पाविषयी निश्चय ऐक. कारण हे पुरुषश्रेष्ठा, तो त्याग तामसादि प्रकारांनी तीन प्रकारचा सांगितलेला आहे. [अनात्मज्ञ कर्माधिकार्याचा संन्यास व त्याग तामसादि भेदाने तीन प्रकारचा संभवतो व परमार्थदर्शी पुरुषाच्या त्यागाचा असा त्रिविध भेद संभवत नाही. म्हणून त्याचा निर्णय करणे फारच कठीण झाले आहे, त्यामुळे या त्यागाविषयीचा निर्णय सांगण्यास माझ्यावाचून दुसरा कोणी समर्थ नाही. म्हणून तू खर्या शास्त्रार्थाविषयीचा निर्णय माझ्याच तोंडून ऐक.] विवरण :
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् । यज्ञदानतपःकर्म न त्याज्यम् - यज्ञ, दान आणि तपरूप कर्म हे टाकण्यास योग्य नाहीच - तत् एव कार्यम् - याउलट ते तर अवश्यपणे कर्तव्य आहे - यतः यज्ञः दानं च तपः एव मनिषिणां पावनानि - कारण, यज्ञ, दान आणि तप ही तिन्ही कर्मे बुद्धिमान पुरुषांना पवित्र करणारी आहेत. ॥ ५ ॥ व्याख्या : एवं श्रोतारं अभिमुखीकृत्य स्वमतं दर्शयति । यज्ञदानेति । हे पार्थ ! यज्ञदानतपःकर्म यज्ञश्च दानं च तपश्च यज्ञदानतपांसि यज्ञदानतपस्सु कर्म क्रिया यज्ञदानतपःकर्म । मुमुक्षुभिः इति शेषः । न त्याज्यं किन्तु तत् यज्ञदानतपःकर्म कार्यमेव कर्तव्यमेव । मुमुक्षुणापि विदुषा चित्तशुद्धिपर्यंतं आवश्यकं यज्ञादिकं कर्तव्यमित्याह । मनीषिणां मनीषा आत्मज्ञानेच्छा येषामस्ति ते मनीषिणः तेषां मनीषिणां मुमुक्षुणां एतानि पावनानि पावयंति तानि पावनानि चित्तशुद्धिकराणि यावत् चित्तशुद्धिपर्यंतं कर्तव्यानि संति । एतानि कानि । यज्ञः पंचमहायज्ञादिः चेत्यपरं दानं अन्नदानादि चेत्यपरं तपः कृच्छ्रचांद्रायणादि ॥ ५ ॥
यज्ञ, दान व तप असे हे त्रिविध कर्म कधीहि टाकू नये, तर ते अवश्य करावेच. कारण ती तीन कर्मे फलाची इच्छा न करणार्यांना पावन करणारी आहेत. [फलाची इच्छा न करता त्यांचे अनुष्ठान करणार्यांची चित्तशुद्धी होते.] विवरण :
एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च । अतः हे पार्थ ! एतानि तु अन्यानि अपि कर्माणि - म्हणून हे पार्था ! ही यज्ञ, दान व तपरूप कर्मे तशीच इतरही कर्तव्य कर्मे - सङ्गं च फलानि त्यक्त्वा कर्तव्यानि - ही आसक्ती आणि फळे यांचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत - इति मे निश्चितं उत्तमं मतम् - हे माझे निश्चितपणे उत्तम मत आहे. ॥ ६ ॥ व्याख्या : येन प्रकारेण कृतानि एतानि कर्माणि पावनानि भवंति तं प्रकारं दर्शयन् सन् आह । एतानीति । हे पार्थ ! एतान्यपि यज्ञदानादीन्यपि कर्माणि क्रियां कर्तव्यानि कर्तुं योग्यानि कर्तव्यानि संति । किं कृत्वा संगं कर्तृत्वाभिनिवेशं चेत्यपरं फलानि अदृष्टजनकानि त्यक्त्वा विहाय केवलं ईश्वरस्य आराधनतया कर्तव्यानीत्यर्थः । इति एवं प्रकारेण निश्चितं मतम् । उत्तमं उत् उद्गतं तमः तमोगुणः यस्मात् तत् उत्तमम् ॥ ६ ॥ पण हे अर्जुना, ही त्रिविध कर्मेहि कर्माविषयींच्या आसक्तीला सोडून व त्यांच्या फलाचा परित्याग करून करावी, असे माझे निश्चित व उत्तम मत आहे. [‘त्याविषयीचा माझा निश्चय ऐक’ अशी प्रतिज्ञा करून ‘पावनत्व’ हा त्याचा हेतू सांगून ‘ही कर्मे सुद्धा संग व फल सोडून करावी, असे हे निश्चित व उत्तम मत आहे,’ असा येथे उपसंहार केला आहे.] विवरण :
नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते । तु नियतस्य कर्मणः संन्यासः न उपपद्यते - परंतु शास्त्राने नेमलेल्या कर्मांचा स्वरूपतः त्याग उचित नाही - अतः मोहात् तस्य परित्यागः - म्हणून मोहामुळे त्याचा त्याग हा - तामसः परिकीर्तितः - तामस त्याग म्हटला गेला आहे. ॥ ७ ॥ व्याख्या : ’त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तित’ इत्युक्तं त्यागत्रैविध्यं इदानीं दर्शयन् प्रथमं तामसं त्यागमाह । नियतस्येति । हे पार्थः नियतस्य वेदप्रतिपादितस्य नित्यस्य कर्मणः कर्तुं योग्यं कर्म तस्य कर्मणः नित्यानुष्ठानस्य संन्यासः सम्यक् न्यासः त्यागः संन्यासः नोपपद्यते न योग्यो भवति । चित्तशुद्धिद्वारा ज्ञानोत्पत्तिहेतुकत्वात् नित्यस्य त्यागो अनुचित इति भावः । तस्य नित्यस्य कर्मणः परित्यागः मोहात् अविवेकेन अथवा औत्कंठ्येन कृतश्चेत् तर्हि शिष्टैः तामसः तमसः अयं तामसः त्यागः परिकीर्तितः कथितः । उभयलोकविघातकत्वात् स त्यागः कृत इत्यर्थः ॥ ७ ॥
नित्य कर्मे अवश्य केली पाहिजेत, हे याप्रमाणे सिद्ध झाल्यामुळे अज्ञ अधिकारी मुमुक्षूच्या नित्य कर्मांचा परित्याग तर उत्पन्नच होत नाही. कारण ती कर्मे अज्ञ पुरुषाला पावन करणारी आहेत. पण हे ज्ञान नसल्यामुळे नियत कर्मांचा परित्याग करणे, हा तामस त्याग सांगितला आहे. [नियतकर्म व त्याचा त्याग ही दोन्ही परस्पर विरूद्धच आहेत.] विवरण :
दुःखं इत्येव यत्कर्म कायक्लेश भयात् त्यजेत् । यत् कर्म तत् दुःखं एव इति - जे काही कर्म आहे ते सर्व दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी - कायक्लेश भयात् त्यजेत् - शारीरिक क्लेशाच्या भयाने कर्तव्य कर्मांचा त्याग करेल - तर्हि एतादृशम् राजसं त्यागं कृत्वा त्यागफलं न एव लभेत् - तर असला राजस त्याग करून त्या माणसाला कोणत्याही प्रकारे त्यागाचे फळ मिळणार नाही. ॥ ८ ॥ व्याख्या : राजसं त्यागमाह । दुःखमिति । पुमान् इति शेषः । इति एवं प्रकारेण कायक्लेशभयात् कायस्य शरीरस्य क्लेशः कायक्लेशः कायक्लेशस्य भयं कायक्लेशभयं तस्मात् यत् नित्यं कर्म नित्यानुष्ठानं त्यजेत् ज्ञानवादं आश्रित्य परित्यजेत् । इतीति किम् । दुःख प्रातःस्नानादौ शीतानिमित्तं दुःखं भवति यः कर्ता राजसं त्यागं कृत्वा विरोचनसिद्धांतेन शरीरमेव आत्मानं मन्यमानः सन् तमेव नानाविषयभोगैः संपूजयन् सन् कर्मत्यागेन वर्तेन सः राजसत्यागी तं राजसं त्यागं कृत्वापि त्यागफलं त्यागस्य फलं त्यागफलं नैव लभेत् न प्राप्नुयात् । यथा ग्रीष्मे मध्याह्ने अध्वनि वस्त्रादिसामग्रीभाराक्रांतः पुरुषः मार्गे एव सामग्रीं विहाय गतः त्यागफलं ऐहिकामुष्मिके न प्राप्नोति । तथा अयमपि कायक्लेशभयात् तूष्णीं नित्यं कर्म त्यक्त्वा वर्तमानः सन् उभयलोकविधुरः भवतीत्यर्थः ॥ ८ ॥
शरीरेंद्रियांना क्लेश होतात, या भीतीने नित्य कर्म दु:खद आहे, असे मानून त्यांचा त्याग करणे हा ‘राजस त्याग’ होय. त्यामुळे ज्ञानपूर्वक केलेला जो ‘सर्वकर्मत्याग’ त्याचे ‘मोक्ष’ हे फल त्याला प्राप्त होत नाही. [तर त्या राजस त्यागाला अनुरूप असे ‘नरक’ हेच फल त्याला मिळते.] विवरण :
कार्यं इत्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन । हे अर्जुन ! यत् नियतं कर्म कार्यं एव इति - जे शास्त्रविहित कर्म करणे हेच कर्तव्य आहे या भावनेने - सङ्गं च फलं त्यक्त्वा क्रियते - व आसक्ति आणि फळ यांचा त्याग करून केले जाते - सः एव त्यागः सात्विकः मतः - तोच त्याग सात्विक त्याग मानला गेला आहे. ॥ ९ ॥ व्याख्या : सात्त्विकत्यागमाह । कार्यमिति । हे अर्जुन ! यत् प्रसिद्धं कर्म वेदप्रतिपादितं कर्म कार्यं कर्तुं योग्यं कार्यं वर्णाश्रमप्राप्तं अस्ति इति शेषः । इति एवं बुद्ध्या तत् प्रसिद्धं कर्म पुरुषेण इति शेषः । क्रियते । कथंभूतं कर्म । नियतं नित्यम् । किं कृत्वा । संगं कर्तृत्वाभिनिवेशं चेत्यपरं फलं पितृलोकफलं त्यक्त्वा यद्यपि नित्यस्य कर्मणः फलं नास्ति तथापि साधारणकर्मणा पितृलोकोस्ति । पितृलोकफलं चित्तशुद्धिद्वारा इति वेदवचनं ज्ञानफलं श्रूयते तदपि त्यक्त्वा सः प्रसिद्धः त्यागः कर्तृत्वाभिनिवेशफलाभिलाषत्यागः सात्त्विकः सत्त्वगुणात्मकः । मम मह्यं इति शेषः मतः मान्यः । अस्ति इति शेषः ॥ ९ ॥ हे अर्जुना, ’हे नित्यकर्म मला अवश्य कर्तव्य आहे’, असे समजूनच त्याच्या स्वरूपाविषयीची आसक्ति व फल सोडून ते करणे हा सात्विक त्याग मानलेला आहे. [नित्य कर्मातील संग व फल यांचा परित्याग करणे, हाच सात्विक त्याग म्हणून भगवानांना अभिमत आहे. या सात्विक त्यागात, राजस व तामस त्यागाप्रमाणे, साक्षात् कर्मत्याग नाही. तर नुसता फलत्याग आहे व त्यालाच संन्यास म्हटले आहे. अर्थात् ही फलत्यागाची स्तुती आहे. त्यावाचून कर्मानुष्ठानाला त्याग म्हणणे संभवत नाही.] विवरण :
२. अज्ञकृत कर्मयोग तसेच विद्वत्कृत ज्ञानयोग, व त्यांचे प्रयोजन.
पण जो अधिकारी-कर्मठ संग व फलेच्छा टाकून नित्य कर्माचे आचरण करितो, त्याचे फलेच्छा व कर्मासक्ति या योगाने कलुषित केले न जाणारे व नित्य कर्माच्या योगाने संस्कार केले जाणारे अंत:करण विशेष प्रकारे शुद्ध होते. शुद्ध चित्त आत्म्याचे आलोचन करण्यास समर्थ होते. याप्रमाणे नित्य कर्माच्या अनुष्ठानाने ज्याचे अंत:करण अत्यंत शुद्ध झाले आहे आणि जो आत्माभिमुख झाला आहे, त्यालाच श्रवणादिकांच्या द्वारा आत्मनिष्ठा कशी प्राप्त होते, ते सांगावे म्हणून भगवान् म्हणतात -
न द्वेष्टि अकुशलं कर्म कुशले न अनुषज्जते । यः पुरुषः अकुशलं कर्म न द्वेष्टि - जो पुरुष अकुशल अशा कर्मांचा द्वेष करीत नाही - च कुशले न अनुषज्जते - आणि कुशल कर्मामध्ये आसक्त होत नाही - सः सत्त्वसमाविष्टः छिन्नसंशयः मेधावी च त्यागी - तो शुद्ध सत्त्वगुणाने युक्त असा हा पुरुष संशयरहित, बुद्धिमान आणि खरा त्यागी होय. ॥ १० ॥ व्याख्या : एवंभूतसात्त्विकत्यागपरिनिष्ठितस्य लक्षणमाह । न द्वेष्टीति । त्यागी त्यागोस्यास्तीति त्यागी सात्त्विकत्यागवान् अकुशलं न विद्यते कुशलं शरीरसुखं यस्मिन् तत् अकुशलं शिशिरे प्रातःस्नानादिकं कर्म काम्यं कर्म न द्वेष्टि किंतु न्यायार्जितस्य धनस्य सद्वियोगबुद्ध्या परमेश्वरोद्देशेन अनुतिष्ठति । चेत्यपरं कुशले सुखकरे कर्मणि उष्णकाले मध्याह्नस्नानादौ नानुषज्जते न सक्तो भवति । किंतु ईश्वरे भारं आरोप्य तदर्पणं यथा भवति तथा करोति । कथंभूतः त्यागी । सत्त्वसमाविष्टः सत्त्वेन सत्त्वगुणेन समाविष्टः स्थितः सत्त्वसमाविष्टः । पुनः कथंभूतः । छिन्नसंशयः छिन्नः नष्टः संशयः इदं शास्त्रतात्पर्यं भवति वा न भवति इति संदेहः यस्य सः छिन्नसंशयः ॥ १० ॥ ‘काम्यकर्म जन्मरूप संसारबंधाला कारण होते, तेव्हा त्याचे अनुष्ठान करून काय करावयाचे आहे ?’ असे म्हणून पुरुष काम्यकर्मांचा द्वेष करीत नाही व नित्य कर्म चित्तशुद्धि, ज्ञानोत्पत्ति व ज्ञाननिष्ठा यांच्या द्वारा मोक्षाचे कारण होते, अशा भावनेने त्यात मुळीच आसक्त होत नाही. तर तो त्यागी-कर्मासक्ति व त्याचे फल, यांचा त्याग करून नित्य कर्माचे अनुष्ठान करणारा, म्हणून सत्त्वसमाविष्ट म्ह० आत्मा व अनात्मा यांच्या विवेकज्ञानाला कारण होणार्या शुद्धचित्ताने युक्त, त्यामुळे मेधावी म्ह० आत्मयज्ञरूप प्रज्ञेने युक्त आणि मेधावित्वामुळेच सर्वसंशयशून्य असा होतो. आत्मस्वरूपावस्थान हेच सर्वोत्तम मोक्षसाधन आहे, दुसरे काही नाही. अशा निश्चयाने त्याचे सर्व संशय गेलेले असतात. [जो अधिकारी पुरुष त्यागी, सत्वसमाविष्ट, मेधावी व छिन्नसंशय असतो, तो अकुशल कर्माचा द्वेष करीत नाही व कुशल कर्मामध्ये आसक्त होत नाही. उलट निष्क्रिय व निर्विकार आत्म्यालाच आत्मत्वाने जाणून सर्व कर्मांचा मनाने त्याग करून स्वत: काहीच न करणारा व न करविणारा असा, शरीरात राहून नैष्कर्मरूप ज्ञाननिष्ठेचा अनुभव घेतो, असे पूर्वोक्त कर्मयोगाचे प्रयोजन या श्लोकाने सांगितले आहे. ‘त्यागी०’ इत्यादि चार विशेषणांना उत्तरोत्तर विशेषणाचे कारणत्व आहे व काम्यकर्मांचा द्वेष न करणे व नित्य-नैमित्तिक कर्मात आसक्त न होणे, हे त्याचे प्रयोजन आहे.] विवरण :
३ अज्ञ कर्मठांचा सर्वकर्मत्याग संभवत नाही व सर्वकर्मत्यागाचे फल. पण ‘देहच मी’ अशी ज्याची भावना असते, तो ‘मीच कर्ता’ असे निश्चयाने जाणतो. अशा अज्ञ देहात्मवादी मनुष्याचा सर्वकर्मत्याग सर्वथा अशक्य आहे, त्याचा कर्मफलत्यागाने विहित कर्मानुष्ठानातच अधिकार आहे. कर्माचा त्याग करण्याचा त्याला अधिकार नाही, हे या पुढील श्लोकात सांगतात -
न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः । हि कर्माणि अशेषतः त्यक्तुं - कारण सर्व कर्मांचा पूर्णपणे त्याग करणे - देहभृता न शक्यम् - कोणत्याही देहधारी माणसाला शक्य नाही - तस्मात् यः कर्मफलत्यागी - म्हणून जो कर्मफलांचा त्याग करणारा आहे - सः त्यागी इति अभिधीयते - तोच त्यागी आहे असे म्हटले जाते. ॥ ११ ॥ व्याख्या : देहाभिमानवता अशेषकर्म त्यक्तुं अशक्यं इति अभिप्रायेण कर्मफलत्यागिनं स्तौति । न हीति । देहभृता देहं बिभर्तीति देहभृत् ते देहभृता देहाभिमानवता अशेषतः निरवशेषेण आत्मज्ञानं विना इति शेषः कर्माणि नित्यनैमित्तिकानि यथाधिकारप्राप्तानि त्यक्तुं परिहातुं न शक्यं न योग्यं भवति । यावत् देहबुद्धेः अस्ति तावत् प्राप्तकर्माकरणे दोषः अस्ति । ननु-भोजने कृते सति तृप्तिरिव कर्मणि कृते सति फलं सादेव इत्याशंक्याह । यः पुरुषः तु कर्मफलत्यागी कर्मणां फलानि कर्मफलानि कर्मफलानां त्यागः अस्यास्तीति कर्मफलत्यागी । भवति इति शेषः । सः पुरुषः त्यागी त्यक्तुं कर्मफलं त्यक्तुं शीलं यस्य सः त्यागी इति एवं प्रकारेण पंडितैः इति शेषः अभिधीयते कथ्यते ॥ ११ ॥
‘देहच मी’ असा ज्याला अभिमान असतो, तो देहभृत् होय. अशा पुरुषाकडून कर्मे निःशेष टाकली जाणे शक्य नाही, पण जो अज्ञ कर्माधिकारी नित्य कर्मे करीत असताना फलेच्छाचा त्याग करतो, तो ‘त्यागी’ असे म्हटला जातो. [विवेकी देहभृत् म्हटला जात नाही. कारण ‘वेदाविनाशिनं नित्यं०’ (२-२१) इत्यादि श्लोकांनी कर्तृत्वाधिकार व तत्पूर्वक कर्मानुष्ठान यांपासून त्याला निवृत्त केले आहे. यास्तव ज्ञानी देहधारण जरी करीत असला, तरी त्याला ‘देहच मी’ असा अभिमान नसल्यामुळे, देहभृताकडून-देहाभिमानी अज्ञाकडून कर्मे निःशेष टाकली जात नाहीत. म्हणून जो अज्ञ कर्माधिकारी नित्य कर्मे करीत असताना त्यांच्या फलेच्छांचा त्याग करितो, तो ‘त्यागी’ होय. तो वस्तुतः कर्मानुष्ठान जरी करीत असला, तरी ‘फलत्याग’ या गुणामुळे त्याच्या फलत्यागाची स्तुति करण्याच्या आशयाने भगवान् त्याला ‘त्यागी’ म्हणतात. खरा सर्वकर्मत्याग परमार्थदर्शी, विवेक-वैराग्यादिमान् व अदेहभृत् म्ह० देहाभिमानशून्य ज्ञानीच करू शकतो - त्यालाच सर्वकर्मसंन्यास करता येतो.] विवरण :
सर्वकर्मपरित्यागापासून कोणते फल प्राप्त होते, ते सांगतात -
अनिष्टं इष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् । कर्मणः इष्टं अनिष्टं च मिश्रं इति - कर्मांचे तर चांगले, वाईट व मिश्र असे - त्रिविधं फलं अत्यागिनां - तीन प्रकारचे फळ हे कर्म फलाचा त्याग न करणार्या पुरुषांच्या बाबतीत - प्रेत्य अवश्यं भवति, - मेल्यानंतर अवश्य प्राप्त होते - किंतु संन्यासिनां कर्मफलं क्वचित् न भवति - परंतु कर्मफळांचा त्याग करून टाकणार्या माणसांचे कर्मफळ हे कोणत्याही काळी भोग देणारे होत नाही. ॥ १२ ॥ व्याख्या : एवंभूतस्य कर्मफलत्यागस्य फलमाह । अनिष्टमिति । हे पार्थ ! अत्यागिनां कर्मफलं न त्यजंति ते अत्यागिनः तेषां अत्यागिनां सकामानां कर्मणः पापपुण्यमिश्रितस्य कर्मणः त्रिविधं त्रिप्रकारं फलं प्रेत्य परलोके भवति । किं तत् त्रिविधम् । अनिष्टं तामसस्य कर्मणः फलं नरकसंबंधि, चेत्यपरं इष्टं सात्त्विकस्य कर्मणः फलं देवसंबंधि, चेत्यपरं मिश्रं राजसस्य कर्मणः फलं मनुष्यसंबंधि यदा विधिप्राप्तानि कर्माणि ईश्वरार्पितानि न फलंति तदा विधिना न्यस्तकर्मणां कर्मफलं न भवतीति किमु वक्तव्यम् ? इति अभिप्रायेणाह । संन्यासिनां तु विधिना त्यक्तकर्मफलानां तु क्वचिदपि त्रिविधं कर्मफलं न भवति ईश्वरार्पणेन कृतस्य कर्मणः त्रिविधमपि कर्मफलं न भवतीत्यर्थः ॥ १२ ॥ नरक-पश्वादि तिर्यक् इत्यादि योनि प्राप्त होणे हे अनिष्ट, देवादि-योनि प्राप्तिरूप होणे इष्ट व मनुष्ययोनिप्राप्तिरूप मिश्र-इष्टानिष्ट, असे धर्माधर्मरूप कर्माचे त्रिविध फल त्याग न करणार्यांना मेल्यावर प्राप्त होते. पण परमार्थ संन्याश्यांना मात्र तसे फल कधीच प्राप्त होत नाही. [पूर्वोक्त स्वरूपाचे त्रिविध फल जे अत्यागी-अज्ञ-कर्मी-अमुख्य संन्यासी असतात, त्यांनाच मरणोत्तर मिळते.] विवरण :
४ कर्माचे पाच हेतु, दुर्मतित्व, सुमतित्व, त्रिविध कर्मचोदना व कर्मसंग्रह.
अज्ञानामुळे आत्म्यावर क्रिया-कारक व फल यांचा आरोप केला जातो, त्यामुळे आत्मा सर्व क्रिया-कारक-फलशून्य, सच्चिद्घनस्वरूप आहे, असे जाणणार्या ज्ञानी पुरुषाचाच सर्वकर्मसंन्यास संभवतो. अधिष्ठानादि क्रिया करणारी कारकेंच मी-शरीरादिकच मी असे समजणार्या अज्ञाचा सर्वकर्मसंन्यास संभवतच नाही, असे भगवान् पुढील चार श्लोकांनी दाखवितात -
पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे । हे महाबाहो ! सर्वकर्मणां सिद्धये - हे महाबाहो ! सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी - एतानि पंच कारणानि - हे पाच हेतू - कृतान्ते सांख्ये प्रोक्तानि, - कर्मांचा अंत करण्याचा उपाय सांगणार्या सांख्यशास्त्रात सांगितले गेले आहेत - तानि मे निबोध - ते मजकडून चांगल्याप्रकारे जाणून घे. ॥ १३ ॥ व्याख्या : ननु- कर्म कुर्वतः कर्मफलं कथं न भवेत् इत्याशंक्य संगत्यागिनः निरहंकारस्य सतः कर्मफलेन लेपो नास्ति इति उपपादितुं आह । पंचैतानि इति पंचभिः । हे महाबाहो ! महांतौ देवब्राह्मणपूजकौ बाहू हस्तौ यस्य सः महाबाहूः तत्संबुद्धौ हे महाबाहो ! सर्वकर्मणां स्वभावशास्त्रप्राप्तानां सिद्धये निष्पत्तये एतानि अनंतरश्लोके वक्ष्यमाणानि पंच पंचसंख्याकानि कारणानि कर्मप्रवर्तकवचनानि संति । त्वं मे मत्तः निबोध जानीहि । कथंभूतानि कारणानि । सांख्ये सम्यक् ख्यायते ज्ञायते आत्मा अनेनेति सांख्यं यद्वा संख्यायंते गण्यंते तत्त्वानि यस्मिन् तत् सांख्यं तस्मिन् सांख्ये कृतस्य कर्मणः अंतः परिसमाप्तिः यस्मिन् तत् कृतांतं यद्वा कृतः अंतः निर्णयः यस्मिन् तत् कृतांतं तस्मिन् कृतांते वेदांतसिद्धांते ॥ १३ ॥
हे महापराक्रमी अर्जुना, सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी मी सांगत असलेली पाच कारणे-क्रिया करणारी साधने तू लक्षपूर्वक ऐक. कर्माची ज्यांत परिसमाप्ति होते, त्या सांख्य-वेदान्तशास्त्रात ही पाच कारणे सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी सांगितली आहेत. [त्यांना जाणणे अत्यंत अवश्य आहे. हे अर्जुनाच्या मनावर ठसविण्यासाठी भगवानांनी या उत्तरार्धाने त्यांची स्तुति केली आहे. कर्माची ज्यांत परिसमाप्ति होते, ते सांख्य म्ह० वेदान्त होय. विवरण :
आता ती पाच कारणे कोणती ते सांगतात -
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् । अत्र अधिष्ठानं च कर्ता - या संबंधी, म्हणजे कर्माच्या सिद्धीच्या संदर्भात अधिष्ठान आणि कर्ता - च पृथग्विधम् करणम् - तसेच भिन्नभिन्न प्रकारची करणे - च विविधाः पृथक् चेष्टा - तसेच नाना प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया - च तथा, एव पंचमम् दैवम् - आणि तसेच पाचवा हेतू दैव आहे. ॥ १४ ॥ व्याख्या : एवं पंच कर्मकारणानि हेतून् दर्शयति । अधिष्ठानमिति । एतानि कानि । अधिष्ठानं कर्माधारं शरीरं तथा कर्ता करोतीति कर्ता चिज्जडग्रंथिः अहंकारः चेत्यपरं पृथग्विधं पृथक् भिन्ना विधा चेष्टा तस्य तत् पृथग्विधं अनेकव्यापारं करणं बाह्यांतःकरणसमूहं चेत्यपरं पृथक् कार्येण स्वरूपेण विविधाः अनेकप्रकारकाः चेष्टाः प्राणापानादीनां व्यापाराः चेत्यपरं अत्र एतेषु पंचमं कारणं देवं सर्वेंद्रियानुग्राहकम् । एतानि पंच कारणानि सर्वकर्मसिद्धये भवन्तु न तु अन्यानि इत्यर्थः ॥ १४ ॥
अधिष्ठान म्ह० इच्छा, द्वेष, सुख, दुःख, ज्ञान इत्यादिकांच्या अभिव्यक्तीचा आश्रय-शरीर; २ तसाच उपाधिलक्षण-अंतःकरणरूप उपाधि, हाच ज्याचा स्वभाव आहे, असा भोक्ता; ३ पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, मन व बुद्धि असे नाना प्रकारचे इंद्रियजात; ४ वायूच्या श्वासोच्छ्वासादि विविध चेष्टा-क्रिया; ५ चक्षुरादि इंद्रियांवर अनुग्रह करणारे आदित्यादि देवताजात-दैव, अशी पाच कारणे सर्व कर्मांच्या निष्पत्तीसाठी वेदान्त शास्त्रात सांगितली आहेत. विवरण :
आता ही पाच कारणे सर्व कर्मांच्या सिद्धिसाठी कशी आहेत, ते सांगतात -
शरीर वाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः । शरीरवाङ्मनोभिः न्याय्यम् वा विपरीतं वा - मन, शरीर आणि वाणी यांचेद्वारा शास्त्रानुकूल अथवा त्याच्या विपरीत - यत् कर्म नरः प्रारभते - जे कोणतेही कर्म मनुष्य करतो - तस्य एते पंच हेतवः - त्याचीही पाच कारणे आहेत. ॥ १५ ॥ व्याख्या : पूर्वं सामान्यतः सर्वकर्मणां सिद्धये पंच कारणानि इत्युक्तम् । इदानीं सामान्यकर्मशब्दं त्रिधा राशीकृत्य तस्यापि अमी पंच हेतवः संति इति अनुवदति । शरीरेति । हे पार्थ ! नरः साधारणपुरुषः शरीरवाङ्मनोभिः शरीरं देहः च वाक् वाणी च मनः अंतःकरणं शरीरवाङ्मनांसि तै शरीरवाङ्मनोभिः यत् प्रसिद्धं न्यायं न्यायात् न्यायेन वा अनपेतं युक्तं न्याय्यं धर्मरूपं वा अथवा विपरीतं अधर्मरूपं कर्म प्रारभते प्रकर्षेण करोति तस्य कर्मणः एक्ते उक्ताः पंच अधिष्ठानादयः हेतवः कारणानि संति एतैर्विना किमपि कर्म न सिद्ध्यतीत्यर्थः ॥ १५ ॥
पुरुष शरीर, वाणी व मन या तीन साधनांनी जी शास्त्रीय-विहित-धर्म्य किंवा निषिद्ध-अधर्म्य कर्मे आरंभितो, किंवा डोळ्यांची उघड-झाप, श्वासोच्छ्वास, पहाणे, ऐकणे इत्यादि स्वाभाविक कर्मे करतो, त्या सर्वांची ही अधिष्ठानादि पाच कारणे आहेत. [कारण स्वाभाविक कर्मेहि पूर्वी केलेल्या धर्माधर्माचेच कार्य आहे. यास्तव न्याय्य व विपरीत यांच्या बरोबर त्यांचेहि ग्रहण करणे योग्यच आहे.] विवरण :
याप्रमाणे अधिष्ठानादिकांना क्रिया-कर्तृत्व आहे, असे सांगून अज्ञ त्यामध्ये आत्मदृष्टि ठेवतो, या गोष्टीचा अनुवाद करितात -
तत्रैवं सति कर्तारं आत्मानं केवलं तु यः । तु एवं सति, - परंतु असे असतानाही - यः अकृतबुद्धित्वात् - जो पुरुष अशुद्ध बुद्धी असल्यामुळे - तत्र केवलं आत्मानं कर्तारं पश्यति, - त्या विषयाचे बाबतीत, म्हणजे कर्म होण्याचे बाबतीत केवळ शुद्धस्वरूप अशा आत्म्याला कर्ता असे मानतो - सः दुर्मतिः न पश्यति - तो मलिन बुद्धी असणारा अज्ञानी यथार्थपणे समजत नाही. ॥ १६ ॥ व्याख्या : ततः किमित्यत आह । तत्रेति । तत्र तस्मिन् इति तत्र तस्मिन् सर्वस्मिन् कर्मणि एते पंच हेतवः संति इति एवं सति यः साधारणपुरुषः केवलं अधिष्ठानादिसंसर्गशून्यं आत्मानं परमात्मानं कर्तारं करोतीति कर्ता तं कर्तारं पश्यति अवलोकयति सः प्रसिद्धः दुर्मतिः दुष्टाः मतिः बुद्धिः यस्य सः अथवा दुःखरूपे अनात्मनि देहे मतिः अहंबुद्धिः यस्य सः दुर्मतिः बहिर्दृष्टिः अकृतबुद्धित्वात् अकृता शास्त्राचार्योपदेशाभ्यां असंस्कृता बुद्धिर्यस्य सः अकृतबुद्धिः अकृतबुद्धेः भावः अकृतबुद्धित्वं तस्मात् अकृतबुद्धित्वात् हेतोः न पश्यति सम्यक् न पश्यति ॥ १६ ॥
याप्रमाणे अधिष्ठानादि पाच हेतूंनी कोणतेहि कर्म घडत असताना, त्या अधिष्ठानादिकांमध्ये अज्ञानाने आत्म्याचा आरोप करून अधिष्ठानादिकांकडून केल्या जाणार्या कर्मांचा मीच कर्ता आहे, असे जो समजतो, तो दुर्बुद्धी होय. शुद्ध, निर्विकार व निष्क्रिय आत्म्यालाच जो अविद्वान् वेदान्तपूर्वक आचार्यांचा उपदेश व तदनुसारी न्याय, यांच्या योगाने बुद्धीला संस्कार झालेले नसल्यामुळेच कर्ता मानतो, तो मूढ बुद्धी होय. [असंस्कृत बुद्धित्वामुळेच तो ‘निर्विकारत्व’ हे आत्म्याचे तत्त्व आणि अविद्याकृत अधिष्ठानादिकांकडून निष्पन्न होणे, आत्म्याशी त्याचा काही संबंध नसणे, हे कर्माचे तत्त्व जाणत नाही. त्यामुळेच त्याची मति जन्म-मरणांच्या प्राप्तीला कारण होणारी असते. हेच त्याचे दुर्मतित्व होय. ज्याप्रमाणे अज्ञ पुरुष ‘ढग धावत असताना चंद्र धावत आहे’ असे समजतो किंवा पालखी, मेणा, रथ इत्यादि वाहनात बसलेला मनुष्य, त्यांचे वाहक-भोयी, अश्व धावत असताना ‘मीच धावत आहे’ असा अविवेकामुळे अभिमान धरतो, त्याप्रमाणे अधिष्ठानादिक-शरीरेंद्रियादिक क्रिया करीत असताना त्यातील आत्माच क्रिया करणारा आहे, असे जो समजतो, तो दुर्मति होय. असा याचा भावार्थ.] विवरण :
‘आत्म्याला कर्ता मानणारा विपरितदृष्टि पुरुष जर दुर्मति तर सुमति कोण ?’ असे अर्जुन विचारील, म्हणून भगवान् ‘जो सम्यक्-यथार्थ जाणतो तो सुमति’ असे उत्तर सांगतात -
यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते । यस्यः अंतःकरणे अहंकृतः भावः न - ज्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये मी कर्ता आहे असा भाव नाही - तथा यस्य बुद्धीः न लिप्यते, - तसेच ज्याची बुद्धी ही सांसारिक पदार्थ व कर्मे यामध्ये लिप्त होत नाही - सः इमान् लोकान् हत्वा अपि न हन्ति - तो पुरुष या सर्व लोकांना मारूनसुद्धा वास्तवामध्ये तो मारतही नाही - च न निबध्यते - आणि पापाने बद्धही होत नाही. ॥ १७ ॥ व्याख्या : कस्तर्हिसुमतिः यस्य कर्मलेपो नास्ति इत्युक्तं इत्यपेक्षायामाह । यस्येति । हे पार्थ ! यस्य पुरुषस्य अहंकृतः अहमिति कर्ता अहंकृतः भावः अभिप्रायः नास्ति यद्वा अहंकृतः अहं करोतीति अहंकृत् तस्य अहंकृतः अहंकारस्य भावः कर्तृत्वाभिनिवेशः यस्य पुरुषस्य नास्ति अत एव हेतोः यस्य पुरुषस्य बुद्धिः न लिप्यते इष्टानिष्टबुद्ध्या कर्मसु न सज्जते । अतः हेतोः एवंभूतः देहादिव्यतिरिक्तात्मदर्शी सः पुरुषः इमान् लोकान् सर्वानपि प्राणिनः लोकदृष्ट्या हत्वापि न हंति न मारयति तत्फलैः हननफलैः न निबध्यते न बंधं प्राप्नोति । राज्याधिकारित्वात् राजन्यवंशोत्पन्नस्य अर्जुनस्य अयं उपदेशः । उत्पन्नात्मसाक्षात्कारेपि जनकादयः यथापराधं प्रांतदंडेषु दोषाधिकारिणः न भवंति इति तात्पर्यम् ॥ १७ ॥
शास्त्र, शास्त्रानुसार आचार्योपदेश व तदनुसार न्याय यांनी ज्याच्या अंतःकरणाला संस्कार झालेला आहे, अशा ज्याला अहंकृतभाव-‘मी करतो’ हा अभिमान नसतो, तर आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाने कल्पिलेले हे अधिष्ठानादिकच सर्व कर्मांचे कर्ते आहेत, मी नव्हे; मी त्यांच्या व्यापारांचा साक्षिभूत केवल निरूपाधिक, ज्ञान-क्रिया-शक्ति रहित, जन्मादि-विक्रियाशून्य आहे, असे जाणतो व ज्याची उपाधिभूत बुद्धि ‘मी हे केले त्यामुळे नरकाला जाईन’ अशा पश्चातापाने युक्त होत नाही, तो सर्व प्राण्यांना मारूनसुद्धा मारीत नाही, हननक्रिया करीत नाही व त्याचा अधर्मफलाशी संबंध होत नाही, [शास्त्राच्या आरंभी ‘हा मारीत नाही व मारला जात नाही. (२-१९)’ अशी प्रतिज्ञा करून ‘न जायते म्रियते०’ (२-२०) इत्यादि हेतूबोधक वचनांनी आत्म्याचे अविक्रियत्व सांगून ‘वेदाविनाशिनं०’ (२-२१) या वचनाने विद्वानाच्या कर्माधिकाराची निवृत्ति सांगितली. मध्ये ठिकठिकाणी प्रसंग आणून तिचाच विस्तार केला आणि आता येथे शास्त्रार्थाचा उपसंहार केला जात आहे. कर्म शरीरादिकांकडून होते, ते आत्म्याचे नव्हे. अविद्वानालाच कर्माचा अधिकार आहे. कारण त्याला देहाभिमान असल्यामुळेच त्याच्या त्यागाचा असंभव आहे. पण विद्वानाच्या ठिकाणी देहाभिमान नसल्यामुळे त्याच्या कर्माधिकाराची निवृत्ति होते. या गीताशास्त्राच्या संक्षिप्त अर्थाचा येथे उपसंहार केला आहे आणि हा गीतार्थ म्ह० वेदार्थच असल्यामुळे तोच सर्वथा ग्राह्य आहे.] विवरण :
ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना । परिज्ञाता ज्ञानं च ज्ञेयं त्रिविधा कर्मचोदना - ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय अशी ही तीन प्रकारची कर्माला प्रेरणा आहे - कर्ता कर्म करणं इति - तसेच कर्ता, करण आणि क्रिया असा - त्रिविधः कर्मसंग्रहः - तीन प्रकारचा कर्मसंग्रह आहे (कर्मसाधन आहे). ॥ १८ ॥ व्याख्या : सर्वैरपि प्रकारैः आत्मा हननक्रियायाः कर्ता न भवति इति उपपादितम् । इदानीं आत्मनः तत्संबंधः कर्मसंबंधः नास्ति इति अभिप्रायेणाह । ज्ञानमिति । हे पार्थ ! त्रिविधा त्रिप्रकारा कर्मचोदना चोद्यते प्रवर्त्यते अनया सा चोदना कर्मणां चोदना प्रेरणा कर्मचोदना अस्ति । का सा त्रिविधा । ज्ञानं स्वस्य इष्टतमकर्मसाधनं इदमेव इति निश्चयः चेत्यपरं ज्ञेयं इष्टसाधनज्ञानकर्म चेत्यपरं परिज्ञाता इत्थंभूतज्ञानज्ञेयाश्रयः । किंच त्रिविधः त्रिप्रकारकः कर्मसंग्रहः कर्म संगृह्यते अनेनेति कर्मसंग्रहः अस्ति । कोसौ त्रिविधः । करणं साधनतमं द्रव्यं चेत्यपरं कर्म कर्तुः इष्टतमं कर्म चेत्यपरं कर्ता कर्मनिवर्तकः ॥ १८ ॥ सर्व विषयांविषयींचे सर्व प्रकारचे ज्ञान, सर्व प्रकारचे ज्ञेय-जाणण्यास योग्य असलेले पदार्थ व उपाधिलक्षण अविद्याकल्पित मिथ्या भोक्ता, असे हे त्रय सर्व कर्मांचे प्रवर्तक आहे, तसेच ज्याच्या योगाने कर्म केले जाते, ते श्रोत्रादि बाह्य व बुद्ध्यादि अंतस्थ इंद्रियजात, कर्त्याला प्राप्त करून घेण्यास अत्यंत इष्ट असलेले वस्तुजात व करणांकडून व्यापार करविणारा उपाधिलक्षण कर्ता, असा हा त्रिविध कर्मसंग्रह आहे. [ज्ञानादि तीन कारणे एकत्र जमली असता सर्व कर्मांचा आरंभ होतो व करणादि तीन कारकांच्या आश्रयाने कर्म शिल्लक रहाते.] विवरण :
५ ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृति व सुख यांचे त्रैविध्य व संसारातील प्रत्येक पदार्थाचे त्रैविध्य.
सर्व क्रिया, कारक व फल यांना गुणात्मकत्व असल्यामुळे सत्त्वादि तीन गुणांनी क्रियादिकांचा त्रिविध भेद सांगावा म्हणून पुढील प्रकरण आरंभितात -
ज्ञानं कर्म च कर्ताच त्रिधैव गुणभेदतः । गुणसङ्ख्याने ज्ञानं च कर्म च कर्ता - गुणांची संख्या निरूपण करणार्या सांख्यशास्त्रामध्ये ज्ञान, कर्म आणि कर्ता - गुणभेदतः त्रिधा एव प्रोच्यते, - गुणांच्या भेदामुळे तीन तीन प्रकारांचेच आहेत असे सांगितले गेले आहे - तानि अपि यथावत् मत्तः श्रृणु - ते सुद्धा माझ्याकडून चांगल्याप्रकारे ऐक. ॥ १९ ॥ व्याख्या : चोदनासंग्रहयोः ज्ञानकर्मकर्तॄणां प्राधान्यात् तेषां ज्ञानकर्मकर्तॄणां गुणभेदेन त्रैविध्यं आह । ज्ञानमिति । गुणसंख्याने गुणाः सत्त्वादयः सम्यक् ख्यायंते प्रकाश्यंते यस्मिन्निति गुणसंख्यानं तस्मिन् गुणसंख्याने सांख्यशास्त्रे ज्ञानं प्रकृतिपुरुषवैलक्षण्यद्योतकं शास्त्रं चेत्यपरं कर्म कर्तुः इष्टतमा क्रिया चेत्यपरं कर्ता कर्मनिवर्तकः गुणभेदतः गुणानां सत्त्वादिगुणानां भेदः गुणभेदः गुणभेदादिति गुणभेदतः गुणभेदेन त्रिधैव त्रिप्रकारमेव प्रोच्यते प्रकर्षेण उच्यते । हे पार्थ ! तं तानि ज्ञानादिनि यथावत् यथागुणभेदेन श्रृणु अवधारय । मत्त इति शेषः ॥ १९ ॥
गुणांची गणना ज्यांत केली आहे, त्या कपिलाच्या सांख्यशास्त्रात ज्ञान, कर्म-क्रिया व कर्ता हे सत्त्वादि गुणांच्या भेदामुळे तीन प्रकारचे सांगितले जातात. यास्तव त्या ज्ञानादिकांचे तीन प्रकार तू यथाशास्त्र ऐक. [ते गुणसंख्यान-सांख्यशास्त्रहि परमार्थ ब्रह्मात्मैकत्व विषयांमध्ये जरी विरूद्ध आहे, तरी गुण व भोक्ते यांविषयी प्रमाणच आहे व एका शास्त्राच्या सिद्धान्ताशी विरूद्ध नसलेल्या दुसर्या शास्त्राच्या सिद्धान्ताचा प्रमाणत्वाने उल्लेख करणे, यांत दोष काहीच नाही. उलट गुण आहे. त्यामुळे स्वसिद्धान्ताला अधिक बळकटी येते. यास्तव त्या ज्ञानादिकांचे त्रिविध भेदहि तू ऐक.] विवरण :
अगोदर ज्ञानाचा त्रिविध भेद सांगण्यासाठी पुढील श्लोक आरंभितात -
सर्वभूतेषु येनैकं भावं अव्ययमीक्षते । विभक्तेषु सर्वभूतेषु - निरनिराळ्या असणार्या सर्व भूतांमध्ये - एकं अव्ययं भावं अविभक्तं - एक अविनाशी परमात्म-भाव हाच विभागरहित असा (म्हणजे समभावाने स्थित असा) - येन ईक्षते - ज्या ज्ञानामुळे मनुष्य पाहतो - तत् ज्ञानं सात्विकं विद्धि - ते ज्ञान सात्त्विक आहे असे तू जाण. ॥ २० ॥ व्याख्या : तत्रादौ ज्ञानत्रैविध्यं वदन् सन् प्रथमं सात्विकज्ञानं आह । सर्वभूतेष्विति । हे पार्थ ! पुरुषः इति शेषः । येन ज्ञानेन सर्वभूतेषु ब्रह्मादिस्थावरांतेषु भावं तद्रूपं ईक्षते पश्यति त्वं तत् प्रसिद्धं ज्ञानं सात्विकं सत्त्वस्य सत्त्वगुणस्य इदं सात्त्विकं विद्धि जानीहि । कथंभूतं भावम् । एकं जात्यादिसंबंधरहितम् । पुनः कथंभूतम् । अव्ययं न विद्यते व्ययो नाशः यस्य सः अव्ययः तं अव्ययं विकाररहितम् । पुनः कथंभूतम् । अविभक्तं विभक्तः भिन्नः न भवतीति अविभक्तः तं अविभक्तं अनुस्यूतम् । कथंभूतेषु सर्वभूतेषु । विभक्तेषु विभागेन वर्तमानेषु ॥ २० ॥
पुरुष ज्या ज्ञानाने अगदी भिन्न भिन्न असलेल्या अव्यक्तापासून स्थावरापर्यंत शरीरेंद्रियसंघातरूप सर्व भूतांमध्ये एक अभिन्न आत्मवस्तु पाहतो, ते अद्वैत आत्मदर्शन सात्त्विक ज्ञान आहे, असे तू जाण. [भिन्न भिन्न असंख्य शरीरात एक कूटस्थ नित्य आत्म्याला पहाणे हेच सम्यग्दर्शन आहे. त्यामुळेच संसारनिवृत्ति होते.] विवरण :
पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नानाभावान् पृथग्विधान् । तु यत् ज्ञानं मनुष्यः सर्वेषु भूतेषु - परंतु ज्या ज्ञानाद्वारा मनुष्य सर्व भूतांमध्ये - पृथ्ग्विधान् नानाभावान् पृथक्त्वेन वेत्ति, - भिन्न भिन्न प्रकारच्या नाना भावांना वेगवेगळेपणाने जाणतो - तत् ज्ञानं राजसं विद्धि - ते ज्ञान राजस आहे हे तूं निश्चितपणे जाण. ॥ २१ ॥ व्याख्या : इदानीं राजसं ज्ञानं आह । पृथ्क्त्वेनेति । यत् प्रसिद्धं ज्ञानं ज्ञायते तत् ज्ञानं सर्वेषु समस्तेषु भूतेषु ब्रह्मादिस्थावरांतेषु पृथ्ग्विधान् पृथक् भिन्नाः विधाः प्रकाराः येषां पृथग्विधाः तान पृथग्विधान् । सुखदुःखादिरूपेण विलक्षणान् नानाभावान् अनेकसद्भावान् क्षेत्रज्ञस्वरूपान् पृथक्त्वेन पृथ्क्भावः पृथक्त्वं भिन्नत्वेन वेत्ति जानाति । हे पार्थ ! त्वं तत् प्रसिद्धं ज्ञानं राजसं रजसः रजोगुणस्य इदं राजसं विद्धि जानीहि ॥ २१ ॥
परंतु पुरुष ज्या ज्ञानाने सर्व भूतांमध्ये निरनिराळ्या स्वरूपाच्या नानाभावांस-अनेक आत्म्यास पहातो, त्या ज्ञानाला तू राजस जाण. [ते ज्ञान रजोगुणापासून झालेले आहे, असे तू समज. येथे मूळ श्लोकांत ‘यज्ज्ञानं नानाभावान् वेत्ति’ असे म्हटले आहे. पण ज्ञान स्वतः जाणू शकत नाही. म्हणून पुरुष ज्या ज्ञानाने नानाभावांस पहातो, असा त्याचा अर्थ केला आहे.] विवरण :
यत्तु कृत्स्नवत् एकस्मिन् कार्ये सक्तं अहैतुकम् । तु यत् एकस्मिन् कार्ये - परंतु ज्या ज्ञानामुळे एकाच कार्यरूप शरीरातच - कृत्स्नवत् सक्तं - सर्व काही असल्याप्रमाणे आसक्त असते - च यत् अहैतुकं अतत्त्वार्थवत् च अल्पं - तसेच युक्तिरहित, तात्त्विक अर्थाने रहित आणि तुच्छ असते - - तत् ज्ञानं तामसं उदाहृतम् - ते ज्ञान तामस असे म्हटले गेले आहे. ॥ २२ ॥ व्याख्या : तामसं ज्ञानं आह । यत्त्विति । हे पार्थ ! यत् ज्ञानं एकस्मिन् कार्ये एकस्यां प्रार्थिवप्रतिमादौ कृत्स्नवत् कृत्स्नेन संपूर्णेन तुल्यं कृत्स्नवत् । यथा वेदांतिनां ब्रह्मैव एकं पूर्णं तथा प्रतिमादिकं परिपूर्णं अस्ति नान्यत् किंचिद्देववतांतरं इत्यर्थः । कथंभूतं ज्ञानम् । असक्तं अभिनिवेशयुक्तम् । पुनः कथंभूतम् । अहैतुकं हेतुकं न भवति तत् अहैतुकं युक्तिरहितम् । पुनः कथंभूतम् । अतत्वार्थवत् तत्त्वानां अर्थः तत्त्वार्थः तत्त्वार्थेन तुल्यं तत्त्वार्थवत्, तत्त्वार्थवत् न भवति तत् अतत्त्वार्थवत् परमार्थगंधशून्यम् । पुनः कथंभूतम् । अल्पं क्षुद्रविषयनिष्ठं तुच्छम् । पंडितैः इति शेषः । तत् ज्ञानं तामसं तमसः तमोगुणस्य इदं तामसं तमोगुणसंबंधि उदाहृतं उच्चरितम् ॥ २२ ॥
पण जे ज्ञान एका कार्यामध्ये म्ह० देहामध्ये किंवा बाह्य प्रतिमेमध्ये सर्व ज्ञानाप्रमाणे आसक्त असलेले-आत्मा किंवा ईश्वर काय तो एवढाच, याच्या पलीकडे नाही, असे एका कार्यामध्ये आसक्त असलेले, समस्तविषयक, युक्तिशून्य, तत्त्वार्थरहित व त्यामुळेच अगदी अल्प ज्ञान, ते तामस असे म्हटले आहे. [दिगंबर जैनादिकांचा शरीरानुवर्ती व शरीराचे जे प्रमाण, त्याच प्रमाणाचा जीव, किंवा केवल पाषाण, काष्ठ, हेच ज्याचे स्वरूप आहे, असा ईश्वर आहे. इत्यादि जे युक्तिशून्य, तत्त्वार्थरहित, अल्पविषय व अल्पफल ज्ञान ते तामस होय. अविवेकी प्राण्यांचे ज्ञान अशाच प्रकारचे असते.] विवरण :
आता कर्माचे त्रिविधत्व सांगण्यास आरंभ करून त्यातील सात्त्विक कर्म कोणते ते सांगतात -
नियतं सङ्गरहितं अरागद्वेषतः कृतम् । नियतं च संगरहितं यत् कर्म - शात्रविधीने नियत केलेले आणि कर्तेपणाच्या अभिमानाने रहित जे कर्म - अफलप्रेप्सुना अरागद्वेषतः कृतम् - फळांची अपेक्षा नसणार्या पुरुषांकडून तसेच त्यासंबंधी राग व द्वेष यांचे विना केले गेलेले आहे - तत् सात्विकं उच्यते - ते कर्म सात्त्विक असे म्हटले जाते. ॥ २३ ॥ व्याख्या : इदानीं कर्मत्रैविध्यं अनुवदन् सन् प्रथमं सात्त्विकं कर्म आह । नियतमिति । हे पार्थ ! अफलप्रेसुना फलं प्राप्तुं इच्छतीति फलप्रेप्सुः फलप्रेप्सुः न भवतीति अफलप्रेप्सुः तेन अफलप्रेप्सुना फलेच्छारहितेन यत् उक्तलक्षणं कर्म कृतं तत् प्रसिद्धं कर्म सात्त्विकं सत्त्वस्य सत्त्वगुणस्य इदं सात्त्विकं उच्यते कथ्यते । कथंभूतं कर्म । नियतं नित्यत्वेन युक्तम् । पुनः कथंभूतम् । संगरहितं संगेन कर्तृत्वाभिनिवेशनेन रहितं शून्य संगरहितम् । पुनः कथंभूतम् । अरागद्वेषतः रागः पुत्रादि प्रीत्यनुबंधः च द्वेषः परकर्मोत्कर्षासहनं रागद्वेषौ रागद्वेषौ न भवतः तौ अरागद्वेषौ अरागद्वेषाभ्यां इति अरागद्वेषतः कृतम् ॥ २३ ॥
‘या कर्माचे फल मला मिळावे’ अशी इच्छा न करणार्या पुरुषांकडून जे नित्य आसक्तिरहित व राग-द्वेषप्रेरित न होता केलेले कर्म, ते सात्त्विक कर्म म्हटले जाते. विवरण :
यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः । तु यत् कर्म बहुलायासं, - परंतु जे कर्म फार परिश्रमाने युक्त असते - पुनः कामेप्सुना वा साहंकारेण क्रियते - तसेच भोगासक्ती असणार्या पुरुषाकडून किंवा अहंकारयुक्त पुरुषाकडून केले जाते - तत् राजसं उदाहृतम् - ते कर्म राजस असे म्हटले गेले आहे. ॥ २४ ॥ व्याख्या : राजसं कर्म आह । यत्त्विति । हे पार्थ कामेप्सुना कामं इच्छित मनोरथं प्राप्तुं इच्छतीति कामेप्सुः तेन कामेप्सुना कर्मफलप्रेप्सुना यत् प्रसिद्धं कर्म वा अथवा साहंकारेण अहंकारेण सहितं साहंकारं तेन साहंकारेण अहं ब्राह्मणः मया इदं कर्म कर्त्त्वव्य अनेन कर्मणा अहं दीक्षितः भविष्यामि इत्यभिनिवेशेन क्रियते तत् कर्म राजसं रजसः रजोगुणस्य इदं राजसं उदाहृतं कथितम् । बुधैः इति शेषः । कथंभूतं कर्म । पुनः भूयः बहुलायासं बहुलः विपुलः आयासः क्लेशः यस्मिन् तत् बहुलायासम् ॥ २४ ॥
पण याच्या उलट या कर्माचे फल आपल्याला मिळावे अशी इच्छा करणार्या पुरुषाकडून, किंवा ‘मी’ अशा अहंकाराने युक्त असलेल्या पुरुषाकडून पुष्कळ आयासाने जे कर्म केले जाते त्याला ‘राजस कर्म’ म्हणतात. विवरण :
अनुबन्धं क्षयं हिंसां अनवेक्ष्य च पौरुषम् । अनुबंन्धं क्षयं हिंसां च पौरुषं अनवेक्ष्य - परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य या सर्वांचा विचार न करता - यत् कर्म मोहात् आरभ्यते, - जे कर्म केवळ अज्ञानाने केले जाते - तत् कर्म तामसं उच्यते - ते कर्म तामस कर्म म्हटले जाते. ॥ २५ ॥ व्याख्या : तामसं कर्म आह । अनुबंधमिति । पुरुषेण इति शेषः । यत् प्रसिद्धं कर्म मोहात् केवलं अविवेकेन आरभ्यते क्रियते किं कृत्वा अनुबंधं अनु अनुलक्ष्येण बद्ध्यत इति अनुबंधः तं अनुबंधं प्रश्चाद्भाविशुभाशुभं चेत्यपरं क्षयं शरीरवित्तव्ययं चेत्यपरं हिंसां परपीडां चेत्यपरं पौरुषं स्वसामर्थ्यं अनवेक्ष्य नावलोक्य तत् कर्म तामसं तमसः तमोगुणस्य इदं तामसं उदाहृतं कथितम् । पंडितैः इति शेषः । तेन कर्मणा इह परत्र सुखं नास्ति ॥ २५ ॥
कर्म केल्यावर त्याच्यापासून होणारा जो परिणाम, तो अनुबंध, ते करीत असताना होणारा शक्तिक्षय व धनक्षय, त्या कर्मामुळे होणारी हिंसा-प्राणिपीडा व ‘मी हे कर्म करू शकतो’ अशा प्रकारचे आत्मसामर्थ्य, यांचा विचार न करता जे कर्म अविवेकाने आरंभिले जाते, त्याला तामस म्हटले आहे.
आता यापुढील तीन श्लोकांनी क्रमाने सात्त्विक, राजस व तामस कर्ता सांगतात - विवरण :
मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साह समन्वितः । मुक्तसंगः - संग-रहित - अनहंवादी - अहंकारयुक्त वचन न बोलणारा - धृति उत्साह समन्वितः - धैर्य व उत्साह यांनी युक्त - सिद्धि असिद्ध्योः निर्विकारः - कार्याची सिद्धी वा असिद्धी या बाबतील हर्ष, शोक इत्यादि विकारांनी रहित - सः कर्ता सात्विकः उच्यते - असा कर्ता सात्विक म्हटला जातो. ॥ २६ ॥ व्याख्या : इदानीं कर्तृत्रैविध्यं वदन् सन् प्रथमं सात्त्विकं कर्तारं आह । मुक्तसंग इति । हे पार्थ ! ज्ञानिभिः इति शेषः । सात्त्विकः सत्त्वगुणात्मकः कर्ता कर्मकर्ता उच्यते कथ्यते । कथंभूतः कर्ता । मुक्तसंग मुक्तः त्यक्तः संगः कर्तृत्वाभिमानः येन सं मुक्तसंगः । पुनः कथंभूतः । अनहंवादी अहंकारेण गर्वोक्त्या वदतीति अहंवादी अहंवादी न भवतीति अनहंवादी गर्वोक्तिशून्यः । पुनः कथंभूतः धृति-उत्साहसमन्वितः धृतिः स्वधर्मानुष्ठाने वैकल्यराहित्येन धैर्यं च उत्साहः स्वधर्मानुष्ठान हर्षोद्यमः धृत्युत्साहौ धृत्युत्साहाभ्यां समन्वितः युक्तः कर्मसमाप्तिः च असिद्धिः केनचित् प्रतिबंधने असमाप्तिः सिद्ध्यसिद्धी तयोः सिद्ध्यसिद्ध्योः निर्विकारः हर्षविशादशून्यः ॥ २६ ॥
ज्याने फलासक्तिचा त्याग केला आहे, ‘मी’ असे म्हणण्याचे ज्याचे शील नाही, जो धैर्य व उद्यम यांनी युक्त आहे आणि केल्या जाणार्या कर्मांची फलसिद्धि होणे ही सिद्धि व फल न मिळणे ही असिद्धि, यांविषयी जो निर्विकार असतो, त्याला सात्त्विक कर्ता म्हणतात. [जो केवल शास्त्रप्रमाणानेच प्रेरित झालेला असतो आणि फलासक्ति व कर्मासक्ति यांनी प्रेरित झालेला नसतो, तो निर्विकार होय.] विवरण :
रागी कर्मफलप्रेप्सुः लुब्धो हिंसात्मको अशुचिः । यः कर्ता रागी कर्मफलप्रेप्सुः - जो कर्ता आसक्तीने युक्त आहे व कर्माच्या फळाची इच्छा करणारा - च लुब्धः तथा हिंसात्मकः, - तसेच लोभी आणि दुसर्यांना कष्ट देण्याचा स्वभाव असलेला, - अशुचिः च हर्षशोकान्वितः - अशुद्ध आचरण असलेला तसेच हर्ष व शोक यांनी लिप्त आहे - सः राजसः परिकीर्तितः - असा कर्ता राजस कर्ता म्हटला जातो. ॥ २७ ॥ व्याख्या : राजसं कर्तारं आह । रागी इति । हे पार्थ ! ज्ञानिभिः राजसः रजोगुणात्मकः कर्ता कर्मकर्ता परिकीर्तितः कथितः । कथंभूतः कर्ता । रागी पुत्रादिकुशलनिमित्ते कर्मणि रागो विद्यते यस्य सः रागी । पुनः कथंभूतः सः । कर्मफलप्रेप्सुः कर्मणां फलं प्राप्तुं इच्छतीति कर्मफलप्रेप्सुः परलोके फलाभिलाषी । पुनः कथंभूतः सः । लुब्धः आरब्धे कर्मणि यथोचित धनत्यागं अकृत्वा परस्वाभिलाषी । पुनः कथंभूतः सः । हिंसात्मकः अविधिना पशुमारकस्वभावः । पुनः कथंभूतः सः । अशुचिः यथोक्तशौचशून्यः । पुनः कथंभूत सः । हर्षशोकन्वितः हर्षः लाभजनितः च शोकः अलाभजनितः हर्षशोकौ हर्षशोकाभ्यां अन्वितः युक्तः हर्षशोकान्वितः ॥ २७ ॥
पण याच्या उलट ज्याला कर्मासक्ति आहे, कर्माचे फल मिळावे, अशी इच्छा आहे, परद्रव्याविषयी तृष्णा आहे व जो योग्य स्थानी-सत्पात्री आपल्या द्रव्याचा त्याग करीत नाही, दुसर्याला पीडा देण्याचाच ज्याचा स्वभाव आहे, जो द्विविध शौचरहित आहे, जो इष्टप्राप्ती झाली असता हर्ष मानतो व अनिष्टप्राप्ती किंवा इष्टवियोग झाला असता शोक करतो, तो ‘राजस कर्ता’ म्हटला आहे. विवरण :
अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोऽलसः । अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठः नैष्कृतिकः - अयुक्त, असंस्कृत, घमेंडी धूर्त आणि इतरांच्या उपजीविकेचा नाश करणारा - च विषादी अलसः च दीर्घसूत्री, - तसेच शोक करणारा, आळशी आणि दीर्घसूत्री - सः कर्ता तामसः उच्यते - असा कर्ता तामस कर्ता म्हटला जातो. ॥ २८ ॥ व्याख्या : तामसं कर्तारं आह । अयुक्त इति । हे पार्थ ! ज्ञानिभिः इति शेषः । तामसः तमोगुणात्मकः कर्ता कर्मकर्ता उच्यते कथ्यते । कथंभूतः कर्ता । अयुक्तः न युक्तः योग्यः अयुक्तः अनवहितांतःकरणः । पुनः कथंभूतः । प्राकृतः विवेकशून्यः शास्त्रसंस्कारशून्यः । पुनः कथंभूतः । स्तब्धः वृक्ष इव अनम्रः किंच शठः स्वसामर्थ्यवंचकः । पुनः कथंभूतः । नैष्कृतिकः निष्ठुरस्वभावः । पुनः कथंभूतः । अलसः स्वजीवनहेतुभूतेपि उद्योगरहितः । पुनः कथंभूतः । विषादी विषादः खेदः यस्यास्तीति विषादी स्वस्थावस्थायामपि आक्रोशशोकस्वभावः । पुनः कथंभूतः । दीर्घसूत्री दीर्घं सूत्रं कर्तव्यं यस्यास्तीति दीर्घसूत्री अद्य वा श्वः शीघ्रं कर्तव्यं तत् कर्तव्यं मासे पक्षे अयने करोति इति दीर्घकालविधायी ॥ २८ ॥
ज्याचे चित्त समाहित नसते, जो अत्यंत असंस्कृत-मूर्खासारखा असतो, कोणापुढेहि नम्र न होणारा, मोठा मायावी, दुसर्याच्या वृत्तीचा छेद करणारा, आळशी, आपल्या कर्तव्यातहि प्रवृत्त न होणारा, नेहमी उद्विग्न असलेला व अतिशय चेंगट-एका दिवसात होणार्या कामाला एक महिना लावणारा, तो तामसकर्ता म्हटला जातो. विवरण :
बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं श्रृणु । हे धनंजय ! मया अशेषेण पृथक्त्वेन प्रोच्यतां - हे धनंजय ! आता माझ्याकडून संपूर्णपणे, विभागपूर्वक सांगितले जाणारे - गुणतः बुद्धेः च धृतेः एव - गुणानुसार होणारे बुद्धीचे आणि धृतीचेसुद्धा - त्रिविधं भेदं श्रृणु - तीन प्रकारचे भेद तू ऐक. ॥ २९ ॥ व्याख्या : इदानीं बुद्धेः त्रैविध्यं दर्शयति । बुद्धेरिति । हे धनंजय ! धनं आत्मधनं जयतीति धनंजयः तत्संबुद्धौ हे धनंजय हे अर्जुन ! त्वं बुद्धेः निश्चयात्मिकायाः बुद्धेः चेत्यपरं धृते धारणायाः गुणतः गुणेभ्यः इति गुणतः सत्त्वादिगुणेभ्यः त्रिविधं त्रिप्रकारकं भेदं श्रृणु अवधारय । कथंभूतं भेदम् । पृथ्क्त्वेन सत्त्वादिभिन्नभावेन मया प्रोच्यमानं प्रोच्यतेसौ प्रोच्यमानः तं प्रोच्यमानं कथ्यमानम् । कथंभूतेन पृथक्त्वेन अशेषेण समग्रेण गुणभेदेन त्रिधा भवति तमवधारयेत्यर्थः ॥ २९ ॥
हे पार्था, माझ्याकडून निःशेषतः सांगितल्या जाणार्या व गुणांमुळे होणार्या बुद्धिच्या आणि धृतीच्या तीन प्रकारच्या भेदाला तू विवेकतः ऐक. [ अर्जुनाने दिग्विजयाच्या वेळी मनुष्यांचे व देवांचे पुष्कळ धन जिंकले होते, म्हणून त्याला धनंजय म्हटले आहे. या श्लोकांत बुद्धि व धृति यांचे भेद सांगण्याची प्रतिज्ञा केली आहे.] विवरण :
यापुढील तीन श्लोकांत क्रमाने त्रिविध बुद्धि सांगतात -
प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये । हे पार्थ ! प्रवृत्तिं च निवृत्तीं, - हे पार्था ! प्रवृत्ति-मार्ग आणि निवृत्ति-मार्ग - कार्याकार्ये, भयाभये - कर्तव्य आणि अकर्तव्य, भय व अभय, - च बंधं च मोक्षं या वेत्ति, - तसेच बंधन आणि मोक्ष हे सर्व जी बुद्धी यथार्थपणे जाणते - सा बुद्धिः सात्विकी - ती बुद्धी सात्त्विक होय. ॥ ३० ॥ व्याख्या : एवं बुद्धिधृत्योः त्रिविधं भेदं प्रतिज्ञाय आदौ बुद्धित्रैविध्यं वदन् सन् प्रथमं सात्त्विकीं बुद्धिं दर्शयति । प्रवृत्तिमिति । हे पार्थ ! या प्रसिद्धा बुद्धिः निश्चयात्मिका-प्रवृत्तिं धर्मप्रवृत्तिं अथवा संसारहेतुभूतं प्रवृत्तिमार्गं चेत्यपरं कार्याकार्ये कार्यं इदं योग्यं च अकार्यं इदं अयोग्यं कार्याकार्ये कर्तव्याकर्तव्ये चेत्यपरं भयाभये भयं लोकशास्त्रदंडत्रासः च अभयं लोकशास्त्रदंडत्रासराहित्यं भयाभये चेत्यपरं बंधं अनेककर्मभिः बंधनं चेत्यपरं मोक्षं अनेकसंसारेभ्यो विमोक्षणं वेत्ति जानाति सा प्रसिद्धा बुद्धिः सात्त्विकी सत्त्वगुणात्मिका । भवेत् इति शेषः ॥ ३० ॥
हे अर्जुना, जी बुद्धि प्रवृत्ति म्ह० प्रवर्तन-बंधाला कारण होणारा कर्ममार्ग व निवृत्ति म्ह० मोक्षाला कारण होणारा संन्यासमार्ग, विहित कर्तव्य व निषिद्ध अकर्तव्य, भय व अभय म्ह० अनिष्टसाधन व इष्टसाधन, कारणांसह बंध व मोक्ष यांस जाणते, ती सात्त्विकी बुद्धि होय. [याच वाक्यांत बंध व मोक्ष यांचा उल्लेख असल्यामुळे प्रवृत्ति-कर्ममार्ग व निवृत्ति-संन्यासमार्ग असाच अर्थ केला पाहिजे. वर (श्लोक २०-२२) ज्ञानाचे तीन भेद सांगितले आहेत, पण ते ज्ञान ही बुद्धीची-अंतःकरणाची एक वृत्ति आहे व येथे बुद्धिचे तीन भेद सांगत आहेत. ही बुद्धि म्ह० अनेक वृत्तींचा आश्रय असे अंतःकरणच होय. पुढे सांगितलेली धृतिहि या अंतःकरणाची एक वृत्तिच आहे.] विवरण :
यया धर्मं अधर्मं च कार्यं च अकार्यमेव च । हे पार्थ ! धर्मं च अधर्मं - हे पार्था ! धर्म आणि अधर्म - च कार्यं च अकार्यं - तसेच कर्तव्य आणि अकर्तव्य - एव यया पुरुषः अयथावत् प्रजानाति, - ज्या बुद्धीचे द्वारा पुरुष यथार्थपणे जाणत नाही - सा बुद्धिः राजसी - त्या बुद्धीला राजस बुद्धी म्हणतात. ॥ ३१ ॥ व्याख्या : राजसीं बुद्धिं आह । ययेति । हे पार्थ ! पुरुषः इति शेषः । यया बुद्ध्या धर्मं धर्मरूपं कर्म चेत्यपरं अधर्मं अधर्मरूप कर्म चेत्यपरं कार्यं कर्तुं योग्यं कार्यं कर्तव्यं चेत्यपरं अकार्यं कर्तुं योग्यं न भवति तत् अयथावत् संशयास्पदत्वेन प्रजानाति प्रकर्षेण जानाति सा प्रसिद्धा बुद्धिः राजसी रजोगुणात्मिका भ्वेत । धर्माधर्मौ सात्त्विकीबुद्धिवत् राज विजानाति । अत्र को विशेषः ? राजसी कदाचित् अर्थलाभौ भवति धर्मं करोति । कदाचित् अधर्मेण अर्थलाभः भवति अधर्मं करोति । तथा सात्त्विकी न । राजस्यां संशयबाहुल्यात् ॥ ३१ ॥
हे अर्जुना, पुरुष ज्या बुद्धिच्या योगाने धर्म, अधर्म आणि कर्तव्य व अकर्तव्य यांस सर्व प्रकारे निर्णय रूपाने नव्हे, तर अनिर्णय रूपाने जाणतो, ती बुद्धि ‘राजसी’ होय. विवरण :
अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता । हे पार्थ ! तमसा आवृता या - हे अर्जुना ! तमोगुणाने व्याप्त झाल्यामुळे जी बुद्धी - अधर्मं धर्मं इति मन्यते, - अधर्मालाही हा धर्म आहे असे मानते - च सर्वार्थान् विपरीतान् मन्यते, - तसेच सर्व पदार्थांनाही विपरीत अर्थाने जाणते - सा बुद्धिः तामसी - त्या बुद्धीला तामस बुद्धी असे म्हणतात. ॥ ३२ ॥ व्याख्या : तामसीं बुद्धिं आह । अधर्ममिति । हे पार्थ ! या बुद्धिः अधर्मं न धर्मः अधर्मः तं अधर्मं धर्मं मन्यते आत्मज्ञानं विना विना यथा गृअस्थाश्रमोचितं पंचाग्निधारा संपातसहनोदकवासादिकं स्वस्य धर्मं मन्यते किं च आत्मज्ञानं विना यथा संन्यासाश्रमोचित काषायवस्त्रधारणं कौपीन परिवर्तनभिक्षादिकं धर्मं मन्यते तद्वत् इत्यर्थः । चेत्यपरं या बुद्धिः सर्वार्थान् लौकिकपदार्थान् निषिद्धान् विपरीतान् योग्यान् मन्यते । यद्वा ये योग्यां पदार्थाः संति ते पदार्थाः निषिद्धां भवंति । हे पार्थ ! सा बुद्धिः तामसी तमोगुणात्मिका पंडितैः ज्ञेया । कथंभूता बुद्धिः । तमसा तमोगुणेन आवृता व्याप्ता ॥ ३२ ॥
जी अविवेकाने आवृत्त झालेली बुद्धि अधर्माला धर्म समजते, किंबहुना कार्य, अकार्य इत्यादि सर्वच ज्ञेय पदार्थांना विपरीत-अगदी उलट समजते, ती तामसी बुद्धि होय. विवरण :
आता धृतीचेच तीन भेद सांगतात -
धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः । हे पार्थ ! यया अव्यभिचारिण्या धृत्या पुरुषः - हे पार्था ! ज्या अव्यभिचारिणी अशा धारणा शक्तिमुळे पुरुष - योगेन मनःप्राणेन्द्रियक्रियाः धारयते, - ध्यानयोगाच्या द्वारा मन, प्राण आणि इंद्रिये यांच्या क्रिया चारण करतो - सा धृतिः सात्विकी - ती धृती सात्त्विकी होय. ॥ ३३ ॥ व्याख्या : इदानीं प्रतिज्ञातं धृतित्रयं दर्शयन् सन् प्रथमं सात्त्विकीं धृतिमाह । धृत्त्या ययेति । हे पार्थ ! पुरुषः इति शेशः । यया प्रसिद्धया धृत्या धारणया मनःप्राणेंद्रियक्रियाः मनः कामक्रोधादिशक्तिः च प्राणः प्रवृत्तकर्म जननाकूलाशक्तिः च इंद्रियाणि इंद्रिय व्यापारशक्तयः मनःप्राणेंद्रियाणि मनःप्राणेंद्रियाणां क्रियाः स्वाभाविकप्रवृत्तयः मनःप्राणेंद्रियक्रियाः धारयते धारणं करोति सा प्रसिद्धा धृतिः धारणा सात्विकी सत्त्वगुणात्मिका ज्ञेया । कथंभूतया धृत्या । योगेन चित्तवृत्तिनिरोधेन अव्यभिचारिण्या व्यभिचरति सा व्यभिचारिणी व्यभिचारिणी न भवति सा अव्यभिचारिणी तथा अव्यभिचारिण्या रजस्तमःकार्य विषयैः अनाकृष्टरूपया ॥ ३३ ॥
समाधियोगाशी अव्यभिचारिणी-ब्रह्मामध्ये जे चित्ताचे ऐकाग्र्य त्याला क्षणभरहि न सोडणारी जी धृति, तिच्या योगाने पुरुष मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रियांना अशास्त्रीय मार्गाने होणार्या प्रवृत्तीपासून धारण करितो, त्या धृतीला सात्त्विकी धृति म्हणतात. [धृति म्ह० मानसयत्न, तिच्याकडून धारण केले जाणारे लोक शास्त्राचे उल्लंघन करीत नाहीत. त्यांचे सर्व वर्तन शास्त्रानुसार होते.] विवरण :
यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन । तु पार्थ, अर्जुन, यया धृत्या फलाकांक्षी - परंतु हे पार्थ ! ज्या धारण शक्तीच्याद्वारा फळाची इच्छा करणारा मनुष्य - प्रसंगेन धर्मकामार्थान् धारयते, - अत्यंत आसक्तीने धर्म, अर्थ आणि काम यांना धारण करतो - सा धृतिः राजसी - ती धारण शक्ती राजसी आहे. ॥ ३४ ॥ व्याख्या : राजसीं धृतिं आह । हे पार्थ ! पुरुषं इति शेषः । यया प्रसिद्धया धृत्या धारणया धर्मकामार्थान् धर्मश्च कामश्च अर्थश्च धर्मकामार्थाः आन् धर्मकामार्थान् त्रिवर्गभूतान् । पुरुषार्थत्वेन इति शेषः । पुरुषार्थस्य भावं पुरुषार्थत्वं तेन पुरुषार्थत्वेन धारयते धारणं करोति । हे पार्थ सा प्रसिद्धा धृतिः धारणा राजसी रजसः रजोगुणस्य इयं राजसी रजोगुणात्मिका ज्ञेया । कथंभूता धृतिः । प्रसंगेन धर्मकामार्थातिसक्त्या फलाकांक्षी फलं आकांक्षते इच्छते सा फलाकांक्षी ॥ ३४ ॥
परंतु हे अर्जुना, पुरुष ज्या धृतीच्या योगाने धर्म, काम व अर्थ, यांना धारण करितो, ते तीन पुरुषार्थ नित्यकर्तव्यरूप आहेत, असा आपल्या मनात निश्चय करतो व ज्या ज्या धर्मादिकांच्या धारणेचा प्रसंग असतो, त्या त्या प्रसंगाने फलाची आकांक्षा करितो, ती धृति राजसी होय. विवरण :
यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च । हे पार्थ ! यया धृत्या दुर्मेधाः - हे पार्था ! ज्या धारण शक्तीचेद्वारा दुष्ट बुद्धी असणारा मनुष्य - स्वप्नं भयं शोकं च विषादं - निद्रा, भय, चिंता आणि दुःख - तथा मदं एव न विमुंचति, - तसेच उन्मत्तपणा यांनाही सोडत नाही (म्हणजे धारण करून राहतो) - सा धृतिः तामसी - ती धारण शक्ती तामसी होय. ॥ ३५ ॥ व्याख्या : इदानीं तामसीं धृतिं आह । ययेति । हे पार्थ ! दुर्मेधाः दुष्टा निषिद्धाचरणनिष्ठा मेधा बुद्धिर्यस्य सः दुर्मेधाः पुरुषः यया धृत्या स्वप्नं निद्रां अथवा स्पनं मनोरथंचेत्यपरं भयं त्रासं चेत्यपरं शोकं गतस्यानुचिंतनं चेत्यपरं विषादं खेदं अन्येन अपकृते सति दुःखं चेत्यपरं मदं धनादितया उन्मादं एवं कदापि न विमुंचति न त्यजति सा प्रसिद्धा धृतिः धारणा तामसी तमोगुणस्य इयं तामसी तमोगुणात्मिका ज्ञेया । यया धृत्या सर्वार्थात् भ्रश्यति ॥ ३५ ॥
दुर्बुद्धि पुरुष ज्या धृतीच्या योगाने निद्रा, भय-त्रास, शोक, इष्टवियोगजन्य संताप, विषाद-निरुत्साह, विषयसेवन हाच मोठा पुरुषार्थ आहे, असा दुरभिमान, यांना सोडीत नाही ती तामसी धृति होय. विवरण :
सत्त्वादि गुणांच्या योगाने होणारा क्रिया व कारके यांचा त्रिविध भेद सांगितला. आता फलाचा-सुखाचा त्रिविध भेद सांगतात –
सुखं त्विदानीं त्रिविधं श्रृणु मे भरतर्षभ । भरतर्षभ ! इदानीं त्रिविधं सुखं तु मे श्रृणु, - हे भरतश्रेष्ठा ! आता तू माझ्याकडून सुखसुद्धा तीन प्रकारचे असते ते ऐक - यत्र अभ्यासात रमते - ज्या सुखामध्ये भजन, ध्यान व सेवा इत्यादींच्या अभ्यासामुळे चित्त रमून जाते - च यस्मात् सः दुःखान्तं निगच्छति; - आणि ज्या सुखामुळे तो दुःखांच्या अंताप्रत प्राप्त होतो; ॥ ३६ ॥ व्याख्या : प्रसंगात् सुखस्यापि त्रैविध्यं अर्धेन प्रतिजानीते । सुखमिति । हे भरतर्षभ । भरतेषु भरतराजेषु ऋषभः श्रेष्ठः भरतर्षभः तत्सम्बुद्धौ हे भरतर्षभ ! त्वं इदानीं गुणभेदेन त्रिविधं त्रिप्रकारं सुखं मे मम वचनात् श्रृणु एवं सुखत्रैविध्यं प्रतिज्ञाय सार्धेन सात्त्विकं सुखं दर्शयति । अभ्यासादिति । पुरुषः यत्र यस्मिन् सुखे अभ्यासात अतिपरिचयात् रमते यथा शात्रेण अतिपरिचयेन तत् सुखं प्रतिपद्य प्राप्य विश्रांतिं आप्नोति तथा अधात्मशास्त्रपरिचयात् स्वात्मनि आनंदरूपे रमते न तु विषयेंद्रियसंयोगजन्ये विषयसुखे चेत्यपरं यस्मिन् सुखे रममाणः सन् दुःखान्तं दुःखस्य त्रिविधतापस्य अंतः नाशः दुःखांतः तं दुःखांतं निगच्छति नितरां प्राप्नोति ॥ ३६ ॥
हे भरतश्रेष्ठा, पण आता प्राणी ज्या सुखानुभवांत अभ्यासामुळे-परिचयामुळे रममाण होतो, व दुःखाच्या शांतीला निश्चयाने प्राप्त होतो ते त्रिविध सुख माझ्या तोंडून तू ऐक. विवरण :
यत्तत् अग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम् । यत् - ते असे सुख आहे - तत् अग्रे यदि विषं इव - जे आरंभकाळी जरी विषाप्रमाणे वाटते - तथापि परिणामे अमृतोपमं - तरी परिणामी अमृततुल्य असते - अतः - म्हणून - तत् आत्मबुद्धिप्रसादहं सुखं - ते सुख परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसन्नतेने उत्पन्न होणारे सुख - सात्विकं प्रोक्तम् - सात्विक सुख म्हटले जाते. ॥ ३७ ॥ व्याख्या : विषयसुख तात्कालिक रतिजनकं न भवति इति उक्तं तर्हि तत् कथं इत्यपेक्षायां तद्विनष्टि । यत्तदग्र इति । हे पार्थ ! यत्तत् किमपि सुखं अग्रे सुखसुखप्राप्तिसाधनकाले प्रथमं विषमिव विषप्रवृत्तिहेतुभूतं तिक्तनिंबादिरसपानवत् दुःखजनकम् । भवति इति शेषः । परिणामे परिणामकाले आरोग्यादिवत् अमृतोपमं अमृतं उपमा उपमानं यस्य तत् अमृतोपमं अमृततुल्यं भवति तत् सुखं सात्त्विकं सत्त्वस्य सत्त्वगुणस्य इदिअं सात्त्विकं सत्त्वगुणात्मकम् । ज्ञानिभिः इति शेषः । प्रोक्तं उच्चारितम् । कथंभूतं सुखम् । आत्मबुद्धिप्रसादजं आत्मनि परमेश्वरे बुद्धिः आत्मबुद्धिः आत्मबुद्धेः प्रसादः रजस्तमोमलत्यागेन अभिमुखता आत्मबुद्धिप्रसादः आत्मबुद्धिप्रसादात् जातं आत्मबुद्धिप्रसादजम् ॥ ३७ ॥
जे सुख ज्ञान-वैराग्य-ध्यान-समाधि यांच्या आरंभाच्या वेळी अत्यंत आयासपूर्वक संपादन करावे लागत असल्यामुळे विषाप्रमाणे दुःखात्मक असते, पण परिणामी-ज्ञान-वैराग्यादिकांच्या परिपाकावस्थेत त्यांच्या परिपक्वतेमुळेच होत असल्यामुळे अमृतासारखेच असते, ते आत्मविषयक बुद्धिच्या प्रसादापासून झालेले सुख सात्त्विक होय. [आत्मा जिचा विषय आहे, ती आत्मविषयक बुद्धि, किंवा आत्मा हेच जिचे आलंबन आहे, ती आत्मबुद्धि. तिच्या निर्मूलतेमुळे किंवा ज्ञानाच्या आधिक्यामुळे उत्पन्न झाल्या कारणाने ते सुख सात्त्विक होय.] विवरण :
विषयेन्द्रियसंयोगात् यत्तत् अग्रे अमृतोपमम् । व इंद्रिये यांच्या संयोगामुळे - यत् सुखं उत्पद्यते - जे सुख उत्पन्न होते - तत् अग्रे अमृतोपमं - ते सुख प्रथम भोगकाळी अमृततुल्य वाटत असले तरीसुद्धा - तथा परिणामे विषं इव; - परिणामी विषाप्रत् असते - अतः तत् राजसम् - म्हणुन ते सुख राजस सुख म्हटले जाते. ॥ ३८ ॥ व्याख्या : राजसं सुखं आह । विषयेति । हे पार्थ ! यत् तत् किमपि स्त्रीसंगादिसुखं विषयेंद्रियसंयोगात् विषयाः शब्दस्पर्शरूपरसगंधविषयाः च इंद्रियाणि त्वक् श्रोत्रादीनि विषयेंद्रियाणि विषयेंद्रियाणां संयोगः संबंधः विषयेंद्रियसंयोगः तस्मात् विषयेंद्रिसंयोगात् अग्रे प्रथमक्षणे अमृतोपमं अमृतं उपमा उपमानं यस्य तत् अमृतोपमम् । भवति इति शेषः । परिणामे परिणामकाले विषमिव जन्ममरणद्वारा आत्ममारकमिव भवति तत् प्रसिद्धं सुखं विषयसुखं राजसं रजसः रजोगुणस्य इदं राजसं स्मृतम् । मन्वादिभिः इति शेषः ॥ ३८ ॥
जे सुख विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून होते आणि पहिल्या क्षणी अमृतासारखे व परिणामी-त्यांच्या उपभोगाचा विपरिणाम झाला असतां विषासारखे वाटते, ते सुख राजस म्हटले जाते. [कारण ते शरीर सामर्थ्य, पराक्रमामुळे प्राप्त होणारे यश, शरीरसौंदर्य, बुद्धिची ग्रहणशक्ति, धारणाशक्ति, धन, उत्साह यांच्या क्षयाला व अधर्म व त्यापासून उत्पन्न झालेले नरकादिक यांना कारण होते.] विवरण :
यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः । यत् सुखं अग्रे च अनुबंधे च - जे सुख भोगकाळी तसेच परिणामीसुद्धा - आत्मनः मोहनम्, - आत्म्याला मोहित करणारे आहे - तत् निद्रा आलस्य प्रमादोत्थम् - ते निद्रा, आळस व प्रमाद यांपासून उत्पन्न होणारे असल्यामुळे - तामसं उदाहृतम् - तामस म्हटले गेले आहे. ॥ ३९ ॥ व्याख्या : तामसं सुखं आह । यदग्र इति । हे अर्जुन । यत् प्रसिद्धं सुखं अग्रे प्रथमक्षणे चेत्यपरं अनुबंधे पश्चात्भाविनि काले आत्मनः अंतःकरण्यस्य मोहनं मोहयति तत् मोहनं मोहकरम् । अस्ति इति शेषः । तदेव मोहकरत्वं दर्शयति । कथंभूतं सुखम् । निद्रालस्यप्रमादोत्थं निद्रा सुषुप्तिः च आलस्यं गात्रश्रांतता हेतुभूता तआंद्रा च प्रमादः कर्तव्यार्थानुसंधान राहित्यं निद्रालस्यप्रमाहाः निद्रालस्यप्रमादेभ्यः उत्तिष्ठति तत् निद्रालस्यप्रमादोत्थं तत् सुखं तामसं तमोगुणात्मकं उदाहृतं उच्चारितम् । मन्वादिभिः इति शेषः ॥ ३९ ॥ जे सुख आरंभी व त्या सुखाचा उपभोग घेऊन झाल्यानंतर आत्म्याला-जीवाला मोह पाडते आणि निद्रा, आलस्य व प्रमाद यांपासून उत्पन्न होते, ते तामस सुख म्हटले आहे. विवरण :
याप्रमाणे क्रिया-कारक-फलरूप संसाराचे सात्त्विकादि भेदाने प्रत्येकी त्रिविधत्व सांगून संसारामध्ये अंतर्भूत होणारे एखादे तरी काही त्रिगुणाने रहित असेल, अशी कोणी शंका घेईल म्हणून व प्रकरणाच्या उपसंहारार्थ हा श्लोक आरंभिला जातो -
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः । पृथिव्यां वा दिवि वा देवेषु, - पृथ्वीवर किंवा आकाशात अथवा देवतांमध्ये - पुनः तत् सत्त्वं न अस्ति, - तसेच यांच्याशिवाय आणखी कोठेही असे कोणतेही प्राणी व पदार्थ नाही - यत् प्रकृतिजैः - की जे प्रकृतीपासून उत्पन्न होणार्या - एभिः त्रिभिः गुणैः मुक्तम् स्यात् - या तीन गुणांनी रहित असेल. ॥ ४० ॥ व्याख्या : उपलक्षणेन सर्वस्यापि त्रिविध्यं उक्तम् । इदानीं प्रकरणार्थं उपसंहरति । न तदस्ति इति । हे पार्थ ! यत् प्रसिद्धं सत्त्वं प्रांइजातं एभिः प्रस्तुतैः त्रिभिः गुणैः सत्त्वादिगुणैः मुक्तं हीनं गुणैः अव्याप्तं स्यात् भवेत् । तत् गुणहीनं सत्त्वं प्राणिजातं पृथिव्यां भूमौ वा अथवा दिवि स्वर्गे अथवा देवेषु देवलोकेषे नास्ति न विद्यते । कथंभूतैः गुणैः । प्रकृतिजैः प्रकृतेः मायायाः जाताः प्रकृतिजां तैः प्रकृतिजैः प्रकृतिकार्यभूतैः वर्तमानसृष्टेः प्राक् न भूतं इदानीं नास्ति पुनः इत ऊर्ध्वं भाविनि सर्गे न भवेदित्यर्थः ॥ ४० ॥
पृथ्वीमध्ये मनुष्यादि प्राणीजात किंवा अप्राणिजात अर्थात् चराचर किंवा स्वर्गात देवामध्ये, प्रकृतीपासून झालेल्या या सत्त्वादि तीन गुणांनी रहित असे कोणतेच सत्त्व नाही. [आब्रह्म-स्तंबपर्यंत भूतांतील एकहि प्राणी-वस्तु गुणरहित नाही.] विवरण :
६ ब्राह्मणादिकांचे धर्म.
१९ व्या श्लोकापासून ४० व्या श्लोकापर्यंत सर्व संसार क्रिया-कारक-फलरूप आणि त्रिगुणात्मक आहे. तो अविद्याकल्पित आहे. तो समूळ अविद्येसह अनर्थरूप आहे, असे सांगितले. अर्थात् तो अनेकरूप, आत्म्याहून विलक्षण व अविद्याकल्पित असल्यामुळे अविद्येसह मिथ्या आहे. त्यामुळेच त्याज्य आहे. १५ व्या अध्यायांत वृक्षरूपकल्पनेनेहि त्याचेच वर्णन केले आहे व ‘दृढ असंग शस्त्राने त्याला तोडून परमपदाला जाणावे’ असेहि त्या संसाराच्या नाशाचे कारण सांगितले आहे. तेव्हा अशा या अनर्थकर संसाराची निवृत्ति कशी होईल, ते सांगावे. म्हणजे स्वधर्मानुष्ठानाने चित्तशुद्धीच्या द्वारा तत्त्वज्ञान होऊन अज्ञानात्मक गुणांची निवृत्ति होते, असे सांगावे. त्यासाठी स्वधर्म सांगावा, सर्व गीताशास्त्रार्थाचा उपसंहार करावा आणि सर्व वेद व स्मृति यांचा प्रतिपाद्य अर्थ काय तो एवढाच असून पुरुषार्थेच्छूंनी त्यांचे अनुष्ठान करावे, म्हणून यापुढील प्रकरण आरंभिले जाते.
ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परंतप । हे परंतप ! ब्राह्मणक्षत्रियविशां च शूद्राणां कर्माणि - हे परंतपा ! ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची तसेच शूद्रांची कर्मे - स्वभावप्रभवैः गुणैः प्रविभक्तानि - स्वभावापासून उत्पन्न झालेल्या गुणांच्याद्वारा विभक्त केली गेली आहेत. ॥ ४१ ॥ व्याख्या : ननु-एवं सति सर्वस्य त्रिगुणात्मकत्वात् अनिर्मोक्षप्रसंगः प्रसज्येत । तत्र मोक्षे मुख्यो भक्तियोगः केनोपायेन लभ्यते साधनभक्तित्रपेण स्वस्वविहितकर्मणा ईश्वरं आराध्य तत्प्रसादलभ्यां भक्तिं अवाप्य गुणातीतः भूत्वा कृतकृत्यो भवति इत्यभिप्रायेणाह । ब्राह्मणेति । हे परंतप । हे शत्रुंजय । ब्राह्मणक्षत्रियविशां ब्राह्मणाश्च क्षत्रियाश्च विशश्च ब्राह्मणक्षत्रियविशः तेषां ब्राह्मणक्षत्रियविशां त्रैवर्णिकानां द्विजन्मनां चेत्यपरं शूद्राणां कर्माणि गुणैः सत्त्वादिगुणैः प्रविभक्तानि परस्परविलक्षणानि । भवंति इति शेषः । कथंभूतैः गुणैः ॥ स्वभावप्रभवैः स्वभावः सात्त्विकादिस्वभावः प्रभवति येभ्यः ते स्वभावप्रभवाः तैः स्वभावप्रभवैः । द्विजातिसंस्काररहितत्वात् शूद्राणां ब्राह्मणादिसमासात् पृथक्करणं ज्ञेयम् ॥ ४१ ॥
हे अर्जुना, स्वभाव म्ह० ईश्वराची प्रकृति, त्रिगुणात्मिका माया, तिच्यापासून झालेल्या सत्त्व, रज व तम या गुणांच्या अनुरोधाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची शमादिक कर्मे विभागली आहेत. किंवा ब्राह्मण स्वभावाचा सत्त्वगुण प्रभव म्ह० कारण आहे. सत्त्वगुण ज्यांत अमुख्य आहे असा रजोगुण क्षत्रिय स्वभावाचे कारण आहे. तमोगुण ज्यांत गौण आहे, असा रजोगुण वैश्य स्वभावाचे कारण आहे. रजोगुण ज्यांत अप्रधान आहे असा तमोगुण शूद्रस्वभावाचे कारण आहे. ब्राह्मणादि चारी वर्णांमध्ये अत्यंत शांति, ऐश्वर्य व मूढता ही त्या त्या गुणांची कार्ये दिसतात. त्यावरून अशी व्यवस्था करणे अयोग्य नाही. किंवा स्वभाव म्ह० प्राण्यांचा या जन्मी कार्योन्मुख होऊन अभिव्यक्त झालेला, पूर्वजन्मातील संस्कार, अशा स्वभावप्रभव गुणांनी आपापल्या कार्यांच्या अनुसार शमादि कर्मांचा पृथक् विभाग केला आहे. शास्त्राने ब्राह्मणादिकांच्या शमादि कर्मांचे जे विधान केले आहे, तेहि सत्त्वादिकांच्या अपेक्षेनेच आहे. त्यामुळे त्याचा येथील प्रतिपादनाशी काही विरोध येत नाही. विवरण :
आता ती कर्मे कोणती तेच पुढील तीन श्लोकांत सांगतात -
शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च । शमः दमः तपः शौचं - अंतःकरणाचा निग्रह करणे, इंद्रियांचे दमन करणे, धर्मपालनासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध असणे, - क्षांतिः आर्जवं आस्तिक्यं - दुसर्यांच्या अपराधांना क्षमा करणे, वेद, शास्त्र, ईश्वर आणि परलोक इत्यादींवर श्रद्धा ठेवणे - ज्ञानं च विज्ञानं एव - वेदशास्त्रांचे अध्ययन व ध्यापन करणे आणि परमात्म्याच्या तत्त्वाचा अनुभव घेणे ही सर्वच्या सर्व - ब्रह्मकर्म स्वभावजम् - ब्राह्मणांची स्वाभाविक कर्मे आहेत. ॥ ४२ ॥ व्याख्या : सत्त्वात् ब्राह्मणजातिस्वभावः । सत्त्वोपसर्जनात् रजसः क्षत्रियजातिस्वभावः तमउपसर्जनात् रजसः वैश्यजातिस्वभावः केवलात् तमसः शूद्रजातिस्वभावः इति उक्तम् । तत्र कस्य वर्णस्य कः स्वभावः इत्यपेक्षायां चतुर्णां वर्णानां स्वभावान् दर्शयति । शम इति । हे पार्थ ! एतत् ब्रह्मकर्म ब्रह्मणः ब्राह्मणस्य कर्म ब्रह्मकर्म स्वभावजं स्वभवात् जातं स्भावजं अस्ति । एतत्किम् । शमः अंतःकरणनियमः चेत्यपरं दमः बाह्येंद्रियोपरमः च तपः कृच्छ्रचांद्रायणादि च शौचं मृज्ज्लाभ्यां देहसंस्कारः च क्षांतिः सहिष्णुता च आर्जवं अकुटिलतया ऋजुस्वभावः च ज्ञानं सर्वशास्त्राभिज्ञात्वं चित्यपरं विज्ञानं अनुभवजन्यं ज्ञानं चेत्यपरं आस्तिक्यं वेदोक्तेषु कर्मसु विश्वासः परलोकः अस्ति इति निश्चयः ॥ ४२ ॥
अंतःकरणाची शांति, बाह्येंद्रियांचा निग्रह, १७ व्या अध्यायात सांगितलेले त्रिविध तप, अंतःशुद्धि व बहिःशुद्धि, क्षमा, अंतःकरणाचा सरळपणा, आत्मादि पदार्थांचे ज्ञान, शास्त्रार्थाचा अनुभव, श्रद्धालुत्व हे ब्राह्मण जातीचे स्वभावजन्य कर्म आहे. विवरण :
शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम् । शौर्यं तेजः धृतिः दाक्ष्यं - शूरवीरता, तेज, धैर्य, दक्षता - च युद्धे अपि अपलायनं, - आणि कोणतेही मोठे संकट आले तरी युद्धातून पळून न जाणे - दानं ईश्वरभावः - दान देणे आणि स्वामिभाव, - क्षात्रम् स्भावजम् कर्म - ही सर्वच्या सर्व क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे आहेत. ॥ ४३ ॥ व्याख्या : क्षत्रियस्य स्वाभाविकं कर्म आह । शौर्यमिति । हे पार्थ ! त्वं एतत् प्रसिद्धं क्षात्रं क्षतात् दुःखात् त्रायते संरक्षते इति क्ष्त्रं क्षत्रस्य क्षत्रियस्य इदं क्षात्रं कर्म स्वभावजं स्वभावात् जातं स्वभावजं नैसर्गिकम् । जानीहि इति अध्याहारः । एतत् किम् । शौर्यं शूरस्य कर्म शौर्यं पराक्रमं चेत्यपरं तेजः प्रागल्भ्यं चेत्यपरं धृतिः धैर्यं चेत्यपरं दाक्ष्यं दक्षस्य कुशलस्य इदं दाक्ष्यं कौशल्यं अथवा अनलसत्ता चेत्यपरं संग्रामे अपलायनं न पलायनं अपलायनं अपराङ्मुखता चेत्यपरं दानं औदार्यं याचकेषु मुक्तहस्तता चेत्यपरं ईश्वरभावः नियमनशक्तिः ॥ ४३ ॥
शूरपणा, प्रगल्भपणा, धैर्य, दक्षता, युद्धांतून न पळणे, औदार्य व प्रभुत्व हे क्षत्रियजातीचे स्वभावजन्य कर्म आहे. [शौर्य - आपल्यापेक्षा अधिक बलवान् असलेल्या पुरुषावरहि प्रहार करण्याची प्रवृत्ति, तेज - दुसर्याकडून पराभूत न होणे, धृति - मोठ्या आपत्तीमध्येहि देहेंद्रियादिकांना धारण करणारी चित्तवृत्ति, ज्या धृतीकडून धारण केल्या गेलेल्या पुरुषाचा सर्व अवस्थांमध्ये नाश होत नाही, त्यांचे धैर्य खचत नाही, दाक्ष्य - एकाएकी अनेक कार्ये उपस्थित झाली असतां व्यामोह न पावतां - न गांगरतां त्यांत प्रवृत्ति होणे - युद्धांतूनहि पलायन न करणे, शत्रूपासून पराङ्मुख न होणे, दान - देय पदार्थांमध्ये मुक्तहस्तत्व, धनादि कोणताहि पदार्थ सढळ हाताने देणे आणि ईश्वरभाव - ज्यांचे नियमन करावयाचे त्यांच्यापुढे आपली प्रभुशक्ति प्रगट करणे, त्यांना आपल्या सामर्थ्याची कल्पना आणून देणे, हे स्वभावजन्य क्षत्रियधर्म - क्षत्रिय जातीला विहित असलेले कर्म आहे.] विवरण :
कृषिगौरक्ष्य वाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् । कृषि गौरक्ष्य वाणिज्यं - शेती, गोपालन आणि क्रय-विक्रय रूप सत्य व्यवहार - वैश्यकर्म स्वभावजम्, - ही सर्व वैश्याची स्वाभाविक कर्मे आहेत - परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्य अपि स्वभावजम् - आणि सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचे स्वाभाविक कर्म आहे. ॥ ४४ ॥ व्याख्या : वैशस्य कर्म आह । कृषीति । हे पार्थ ! त्वं एतत् प्रसिद्धं वैश्यकर्म वैशस्य वैश्यजातेः इदं वैश्यं वैश्यं च तत् कर्म च वैश्यकर्म स्वभावजं स्वभावात् जातं स्वभावजं जानीहि । एतत् किम् । कृषिगोरक्ष्यवाणिज्यं गाः धेनूः रक्षतीति गोरक्षः गोरक्षस्य भावः गोरक्ष्यं कृषिः धान्योत्पत्तिनिमित्तं क्षेत्रकर्षणं च गोरक्ष्यं पाशुपाल्यं च वाणिज्यं क्रयविक्रयादि एतेषां समाहारः कृषिगोरक्ष्यवाणिज्यम् । शूद्रस्य कर्माह । त्वं शूद्रस्य कर्म स्वभावजं स्वभावात् जातं स्वभावजं नैसर्गिकं जानीहि । कथंभूतं कर्म । परिचर्यात्मकं परिचर्या वर्णत्रयसेवा आत्मास्वरूपं यस्य तत् परिचर्यात्मकं वर्णत्रयसेवारूपम् ॥ ४४ ॥
शेत नांगरणे, पशूंचे पालन करणे देव-घेव वगैरे व्यापार करणे, हे वैश्याचे स्वभावप्राप्त कर्म आहे. शुश्रूषा-द्विजसेवा हे शूद्राचेहि स्वभावजन्य कर्म आहे. विवरण :
७ स्वकर्मनिरताला सिद्धि मिळण्याचा प्रकार.
ब्राह्मणादि वर्गांना विहित असलेल्या व यथाशास्त्र अनुष्ठिलेल्या या कर्मांचे स्वभावतःच स्वर्गप्राप्ति हे फल आहे. “स्वकर्मामध्ये तत्पर असलेले वर्ण व आश्रम मेल्यावर कर्मफलाचा अनुभव घेऊन - कर्मफल भोगून अवशिष्ट राहिलेल्या कर्माने विशिष्ट देश, विशिष्ट जाति, विशिष्ट कुल, विशिष्ट धर्म, विशिष्ट आयुष्य, विशिष्ट विद्या, विशिष्ट वर्तन, विशिष्ट धन, विशिष्ट सुख, विशिष्ट मेधा-धारणाशक्ति यांनी युक्त असा जन्म घेतात” इत्यादि स्मृतींवरून ही गोष्ट सिद्ध होते. पुरणांमध्येहि वर्णी व आश्रमी यांना भिन्न भिन्न लोक व फले यांची प्राप्ति होते, असे म्हणून त्यांचे लोक व फल यांच्या भेदांचे प्रकार सांगितले आहेत. पण दुसर्या कारणाने-मोक्षाच्या अपेक्षेने अनुष्ठान केल्यास त्याचे कोणते फल मिळते ते सांगतात -
स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः । स्वे स्वे कर्मणि अभिरतः नरः - आपापल्या स्वाभाविक कर्मामध्ये तत्परतेने गढलेला मनुष्य - संसिद्धिम् लभते, - भगवत्प्राप्तीरूप परमसिद्धी प्राप्त करून घेतो - स्वकर्मनिरतः पुरुषः - आपल्या स्वाभाविक कर्मात गढलेला पुरुष- यथा सिद्धिं विन्दति - ज्याप्रकारे कर्म केल्याने परमसिद्धी प्राप्त करून घेतो - तत् श्रृणु - तो प्रकार तू ऐक. ॥ ४५ ॥ व्याख्या : किमभिप्रायं ब्राह्मणादिस्वभावजकर्मभिधानं इत्यत आहे । स्वे स्वे इति । हे पार्थ ! यः नरः स्वे स्वे स्वकीये स्वकीये कर्मणि वर्णात्मके कर्मणि अभिरतः सन् तात्पर्येण कर्तव्यतया परिनिष्ठितः सन् संसिद्धिं सम्यक सिद्धिः संसिद्धिः तां संसिद्धिः चित्तशुद्धिद्वारा स्वरूपावस्थानलक्षणां परमात्मप्राप्तिं लभते प्राप्नोति । स्वे स्वे कर्मण्यभिरतः कथं संसिद्धिं लभते इत्याक्षिप्य येन क्रमेण सिद्धिं प्राप्नोतो तं क्रमं दर्शयन् सन् श्रोतारं अभिमुखीकरोति । सः नरः यथा येन प्रकारेण स्वकर्मनिरतः सन् स्वस्य आत्मनः कर्म स्वकर्म स्वकर्नाणि निरतः अत्यंतरतः स्वकर्मनिरतः सिद्धिं पर्मात्मप्राप्तिरूपां मुक्तिं विंदति लभते । त्वं तत् तथाप्रकारं श्रृणु ॥ ४५ ॥
आपापल्या वर सांगितलेल्या लक्षणाचा भिन्न भिन्न कर्मांमध्ये अभिरत-तत्पर असलेला पुरुष संसिद्धीला-स्वकर्मानुष्ठानामुळे अशुद्धीचा क्षय झाला असतां, शरीरेंद्रियांची ज्ञाननिष्ठा योग्यता याच स्वरूपाच्या सिद्धिला प्राप्त होतो. [अर्थात् मोक्षाचे उपाय, अशी जी शमादि सात्त्विक कर्मे त्यांचा ब्राह्मणांनाच अधिकार असल्यामुळे त्यांनाच तेवढा मोक्ष मिळेल, क्षत्रियादिकांना शमादिकांचा अधिकारच नसल्यामुळे मोक्ष मिळणार नाही, ही शंका व्यर्थ आहे. आपापल्या विहित कर्मात तत्पर असलेल्या कोणत्याहि वर्णाच्या मनुष्याची चित्तशुद्धि होऊन तिच्या द्वारा ज्ञाननिष्ठायोग्यता प्राप्त होते आणि ज्याला त्या योग्यतेमुळे ज्ञान झाले आहे, त्याला मोक्ष प्राप्त होतो. ज्ञानी अब्राह्मणालाहि मोक्ष मिळतो, असा याचा भावार्थ. येथील ‘संसिध्दि’ शब्दाचा मोक्ष असा अर्थ घेऊन ‘केवल स्वधर्मनिष्ठ झाल्यानेच जर त्याचा लाभ होत असेल, तर त्यासाठी संन्यासादिकांचे विधान व्यर्थ आहे’, असे म्हणाल तर तसे नाही. नुसत्या स्वकर्मानुष्ठानानेच साक्षात् मोक्ष किंवा ज्ञाननिष्ठायोग्यता प्राप्त होत नाही.] तर मग स्वकर्मामध्ये निरत-तत्पर असलेला मनुष्य कोणत्या प्रकाराने सिद्धिला प्राप्त होतो ? ते ऐक. (तो प्रकार तू एकाग्र चित्ताने ऐकून त्याविषयी निश्चय कर.) विवरण :
यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् । यतः भूतानां प्रवृत्तिः - ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे - च येन इदं सर्वं ततं - आणि ज्या प्रमेश्वराने हे समस्त जग व्यापून टाकले आहे - तं स्वकर्मणा अभ्यर्च - त्या परमेश्वराची स्वतःच्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून - मानवः सिद्धिं विन्दति - मनुष्य परमसिद्धी प्राप्त करून घेतो. ॥ ४६ ॥ व्याख्या : एवं श्रोतारं संमुखीकृत्य प्रतिज्ञातं सिद्धिप्राप्तिप्रकारं दर्शयति । यत इति । हे पार्थ ! यतः यस्मादिति यतः यस्मात् अंतर्यामिणः परमात्मनः सकाशात् भूतानां अध्यात्मादिभेदभिन्नानां चराचराणां प्रवृत्तिः नियतव्यापारेषु प्रवर्तनं भवति । येन सत्यज्ञानानंतेन परमात्मना सर्वं संपूर्णं इदं चराचरं विश्वं ततं व्याप्तम् । यथा सुवर्णेन कुंडलादि । मानवः मनोः मैथुनसृष्टौ उत्पन्नः मानवः स्वकर्माधिकारी स्वकर्मणा स्वस्य आत्मनः कर्म स्वकर्म तेन स्वकर्मणा यथावर्णाश्रमविहितानुष्ठानेन तं परमात्मानं अभ्यर्च्य पूजयित्वा सिद्धिं क्रमेण मुक्तिं विंदति प्राप्नोति ॥ ४६ ॥
ज्या अंतर्यामी ईश्वरापासून भूतांची-प्राण्यांची प्रवृत्ति होते, व मृत्तिकेकडून जसे घटादि विकार व्यापले जावेत, त्याप्रमाणे ज्याने हे सर्व जगत् व्यापिले आहे, त्या ईश्वराला प्रत्येक वर्णासाठी वर सांगितलेल्या स्वधर्माने पुजून-त्याची पूजा-आराधना करून मनुष्य केवल ज्ञाननिष्ठायोग्यतारूप सिद्धीला प्राप्त होतो. [ब्राह्मणादिकांना केवल पूर्वोक्त स्वधर्मनिष्ठेने साक्षात् मोक्ष मिळणे शक्य नाही. कारण तो केवल ज्ञानानेच प्राप्त होणारा आहे. यास्तव स्वधर्मनिष्ठ झालेल्या ब्राह्मणादिकांची चित्तशुद्धि होते. कर्मफलाची आकांक्षा न करणार्या त्यांना ईश्वरप्रसादाने विवेक-वैराग्यादि साधनसंपत्ति प्राप्त होते. अशा ज्ञाननिष्ठेला योग्य झालेल्या संन्याश्यांना ज्ञानप्राप्तीनेच मुक्ति मिळते.] विवरण :
८ स्वधर्म श्रेष्ठ, त्याचा अत्याग, संन्यासाने नैष्कर्मसिद्धि.
ज्याअर्थी स्वधर्मानुष्ठानाचे चित्त्तशुद्ध्यादिकांच्या द्वारा मोक्षामध्ये पर्यवसान होत असते, त्याअर्थी स्वधर्मानुष्ठान आवश्यक आहे, असे आता सांगतात -
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् । स्वनुष्ठितात् परधर्मात् - चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसर्याच्या धर्मापेक्षा - विगुणः अपि स्वधर्मः श्रेयान् - गुणरहित असला तरी स्वतःचा धर्म श्रेष्ठ आहे - यस्मात् - कारण - स्वभावनियतं कर्म कुर्वन् - स्वभावाने नियत केलेले स्वधर्मरूप कर्म करणारा मनुष्य - किल्बिषं न आप्नोति - पाप प्राप्त करून घेत नाही (म्हणजे त्या मनुष्याला पाप लागत नाही. ॥ ४७ ॥ व्याख्या : ननु स्वकर्मणेति नियमः किमिति क्रियते ? कदाचित् स्वकर्म विगुणं चेत् परकर्मणा परामात्माराधनं भवतु इत्याशंक्याह । श्रेयानिति । हे पार्थ ! स्वनुष्ठितात् सम्यक् अनुष्ठितः अधिष्ठितः स्वनुष्ठितः तस्मात् स्वनुश्ठितात् परधर्मात् परेषां अन्येषां धर्मः परधर्मः तस्मात् परधर्मात् विगुणः विगतः गुणो यस्य सः विगुणः सदोषः स्वधर्मः स्वस्य आत्मनः धर्मः स्वधर्मः श्रेयान् श्रेष्ठः अस्ति । पुरुषः स्वभावनियतं स्वभावस्य ब्राह्मणादिजातेः नियतं नियमोक्तं स्वभावनियतं अक्र्म कुर्वन् करोतीति कुर्वन् सन् किल्बिषं दोषं नाप्नोति न प्राप्नोति । प्रायश्चित्ती न भवतीत्यर्थः ॥ ४७ ॥ उत्तमप्रकारे आचरिलेल्या परधर्माहून-अनेक उत्तम गुणांनी युक्त परधर्माहून, गुणरहित असलेलाहि स्वधर्म अधिक श्रेयस्कर आहे. स्वभावाने नियत केलेले कर्म-हिंसाप्रधान युद्धादि करणारा पापाला प्राप्त होत नाही. [ज्याप्रमाणे विषांतच उत्पन्न झालेला कृमि, विषाने मरत नाही, त्याप्रमाणे स्वभावनियत कर्म करणार्याला त्यापासून पाप लागत नाही.] विवरण :
स्वभावनियत सदोष कर्म करणार्यालाहि पाप लागत नाही व परधर्म भयावह आहे, असे सांगितले, त्यामुळे सर्वथा निर्दोष असलेले भिक्षाटनच सर्वांनी करावे, असे म्हणता येत नाही. तसेच कोणीहि अनात्मज्ञ एक क्षणभरसुद्धा कर्म न करता राहू शकत नाही, हेहि पूर्वी (अ. ३-५) सांगितले आहे. त्यामुळे पापाच्या प्राप्तीची शंकाच राहू नये, म्हणून सर्वांनी कर्मत्यागच करावा, असेहि म्हणता येत नाही. कारण ज्ञानाच्या अभावी कोणालाहि क्षणभरसुद्धा कर्म सोडून रहाता येत नाही. गुणातीत ज्ञानी मात्र ‘अकर्मकृत’ राहू शकतो. यास्तव आता आणखी प्रकारच राहिलेला नसल्यामुळे -
सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् । अतः कौन्तेय - म्हणून हे कुंतिपुत्रा ! - सहजं कर्म सदोषं अपि न त्यजेत् - सहज कर्म हे दोषयुक्त असले तरीसुद्धा ते टाकू नये - हि धूमेन अग्निः इव - कारण धुराने व्याप्त असलेल्या अग्नीप्रमाणे - सर्वारम्भाः दोषेण आवृताः - सर्व कर्मे कोणत्या ना कोणत्यातरी दोषाने युक्त असतात. ॥ ४८ ॥ व्याख्या : यदि पुनः सांख्यदृष्ट्या स्वधर्मे हिंसालक्षणदोषं मत्वा परधर्मं श्रेष्ठं मन्यते तर्हि सदोषत्वं परधर्मेपि तुल्यं इत्याशयेनाह । सहजमिति । स्वधर्मकारी इति शेषः । सहजं ब्राह्मणादियोनिजन्मना सह जातं सहजं सदोषमपि हिंसादिदोषेण सहवर्तमानमपि कर्म न त्यजेत् । हे कौंतेय । हि यस्मात् कारणात् सर्वारंभाः दोषेण आवृताः व्याप्ताः संति । तत्र दृष्टांतमाह । सहजेन धूमेन अग्निरिवेति । प्रवृत्तिः अथवा निवृत्तिः साधनतया दोषं विमान सिद्ध्यति ॥ ४८ ॥
हे कुंतीपुत्रा अर्जुना, जन्मामुळे प्राप्त झालेले, स्वभावाने नियत केलेले कर्म सदोष जरी असले, तरी त्याचा त्याग करू नये. (सत्त्वादि गुणांमुळेच ज्याचा आरंभ झाला आहे, असे कर्म हिंसादि दोषाने युक्त असले तरी, ते विहित असल्यामुळे अत्याज्य होय.) कारण स्वधर्मरूप किंवा परधर्मरूप अशी सर्वच कर्मे त्रिगुणात्मक असल्यामुळे दोषांनी युक्त आहेत. अग्नीबरोबरच उत्पन्न झालेल्या धूमाने अग्नि जसा आच्छादित असतो, त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषाने युक्त असतात. [स्वधर्म नावाच्या सहज कर्माचा सर्वथा परित्याग करून परधर्माचे अनुष्ठान जरी केले, तरी दोषापासून मुक्ति होतच नाही. शिवाय परधर्म भयावह आहे आणि ज्याअर्थी अज्ञाला सर्वकर्मत्याग करता येणे शक्य नसते, त्याअर्थी सहज कर्म सदोष जरी असले, तरी त्याचा त्याग करू नये, असा याचा भावार्थ.] विवरण :
कर्मापासून होणारी ज्ञाननिष्ठा योग्यतारूप सिद्धि सांगितली. आता तिची फलभूत ज्ञाननिष्ठारूप नैष्कर्म्यसिद्धि सांगतात -
असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः । सर्वत्र असक्तबुद्धिः - सर्वत्र आसक्तिरहित बुद्धी असणारा - विगतस्पृहः च जितात्मा - स्पृहारहित असणारा आणि ज्याने अंतःकरण जिंकले आहे असा पुरुष - संन्यासेन परमां नैष्कर्म्यसिद्धिं अधिगच्छति - सांख्ययोगाचे द्वारा ती परम अशी नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करून घेतो. ॥ ४९ ॥ व्याख्या : एवं फलशून्येन कर्मणा ईश्वराधने कृते सति किं फलं स्यात् इत्यभिप्रायेणाह । असक्तबुद्धिरिति । हे कौंतेय ! पुरुषः साधनचतुष्टयसंपनः सन् इति अध्याहारः । परमां चरमां नैष्कर्म्यसिद्धिं निर्गतं गतं कर्म यस्मात् निक्षर्म निष्कर्म एव नैष्कर्म्यं निष्कर्मस्य ब्रह्मपदस्य सिद्धिः प्रप्तिः नैष्कर्म्यसिद्धिः तां नैष्कर्म्यसिद्धिं सन्यानेन कर्मफलत्यागेन अधिगच्छति प्राप्नोतो । कथंभूतः पुरुषः । सर्वत्र ईश्वराराधनार्थे स्वधर्मानुष्ठानैः शुद्धांतःकरणेन इहामुत्रफभोगेषु असक्तबुद्धिः असक्ता संगशून्या बुद्धिर्यस्य सः असक्तबुद्धिः अत एव जितात्मा जितः वशीकृतः आत्मा कार्यकारणसंघातः येन सः जितात्मा अहंकारशून्यः । पुन्हः कथंभूतः पुरुषः । विगतस्पृहः विगता आत्मनोन्यत्र न गता स्पृहा इच्छा यस्य सः विगतस्पृहः विषयाभिलाषशून्यः संन्यासेनैव मोक्षः न कर्मणा इत्यभिप्रायेणोक्तम् - ’मुखजानामयं धर्मो यद्विष्णोर्लिंगधारणम् । बहुजातोरुजातानां नायं धर्मः प्रशस्यते॥’ ब्राह्मणस्यैव संन्यासे अधिकारः न क्षत्रियवैश्ययोः । शूद्रस्य तु उपनयनाभावात् स दूरतः उपास्तः । तस्मात् संन्यासेनैव ब्राह्मणस्य मोक्षाभिगमः न तद्व्यतिरिक्तानां त्रयाणां वर्णानाम् । वर्णबाह्यानां नैव इति भगवतः अभिप्रायो गम्यते । कर्मफलत्यागेन ईश्वरापितकर्मणा बहवः सिद्धिं गताः ॥ ४९ ॥
पुत्र, स्त्री इत्यादि आसक्तीच्या निमित्तामध्ये ज्याचे अंतःकरण आसक्त नसते, ज्याचे चित्त त्याच्या अधीन असते, ज्याला देह, जीवित, भोग, इत्यादिकांविषयीहि तृष्णा नसते, असा आत्मज्ञ संन्यासाने श्रेष्ठ नैष्कर्म्यसिद्धीला प्राप्त होतो. [‘निष्क्रिय ब्रह्मच आत्मा आहे’ असा साक्षात्कार झाल्यामुळे ज्याच्यापासून कर्माची निवृत्ति झाली आहे, तो निष्कर्मा, असले निष्कर्मत्व हेच नैष्कर्म्य व तीच सिद्धि किंवा निष्क्रिय आत्मस्वरूपाने अवस्थित होणे, हे नैष्कर्म्य. त्याची सिद्धि-निष्पत्ति. ‘परमां’ म्ह० कर्मजन्य सिद्धिहून विलक्षण-जीवन्मुक्तिरूप, अशा नैष्कर्म्यसिद्धिला पुरुष संन्यासाने-तत्त्वज्ञानाने किंवा तत्त्वज्ञानपूर्वक सर्वकर्मसंन्यासाने प्राप्त होतो.] विवरण :
आता वर सांगितलेल्या ईश्वरार्चनरूप स्वकर्मानुष्ठानाने उत्पन्न झालेल्या ज्ञाननिष्ठायोग्यतारूप सिद्धिला जो प्राप्त झाला आहे व त्यामुळे ज्याला आत्मविवेक झाला आहे, तो केवल ज्ञाननिष्ठारूप नैष्कर्म्यसिद्धीला कोणत्या क्रमाने प्राप्त होतो, ते सांगतात -
सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे । कौन्तेय, ज्ञानस्य या परा निष्ठा - हे कुंतिपुत्रा ! ज्ञानयोगाची जी काही परा निष्ठा आहे - सिद्धिं यथा प्राप्तः - अशी ती नैष्कर्म्य सिद्धी ज्याप्रकारे प्राप्त करून घेऊन- मनुष्यः ब्रह्म आप्नोति, - मनुष्य ब्रह्म प्राप्त करून घेतो - तथा समासेन एव मे निबोध - तो प्रकार संक्षेपतःच माझ्याकडून तू समजून घे. ॥ ५० ॥ व्याख्या : उक्त विशेषणविशिष्टः कथं सिद्धिं प्राप्नोति इत्यपेक्षायां आह । सिद्धिं प्राप्त इति । हे कौंतेय ! पुरुषः इति अध्याहारः । सिद्धिं नैष्कर्म्यसिद्धिं प्राप्तः स अधिकारी सन् यथा येन प्रकारेण ब्रह्म प्रत्यक् स्वरूपं प्राप्नोति आत्मत्वेन जानाति तथा तेन प्रकारेण त्वं समासेन संक्षेपेण मे मत्तः परात्परगुरोः निबोध जानीहि । ननु-एवम् साधारणं किमिति नियोजयसि इत्याशंक्य इयमेव ज्ञानस्य पराकाष्ठा इत्यभिप्रायेण आह । या प्रसिद्धा ज्ञानस्य परा सर्वोत्कृष्टा निष्ठा सीमा अस्ति सर्वांतरं ब्रह्मैव ज्ञानस्य परमा सीमा इत्यर्थः ॥ ५० ॥
हे कुंतीपुत्रा, स्वकर्माने ईश्वराचे अभ्यर्चन करून त्याच्या प्रसादाने शरीरेंद्रियांच्या ज्ञाननिष्ठा योग्यतारूप सिद्धीला प्राप्त झालेला आत्मविवेकी ज्या ज्ञाननिष्ठारूप प्रकाराने परमात्म्याला प्राप्त होतो, त्या ज्ञाननिष्ठाप्राप्तीच्या क्रमाला तू माझ्या वचनावरून संक्षेपतः ऐक. ब्रह्मप्राप्ती ही ब्रह्मज्ञानाची परा निष्ठा आहे. [अत्यंत परिसमाप्ति-पराकाष्ठा आहे. हा ब्रह्मप्राप्तीचाच साक्षात् निर्देश आहे.] विवरण :
९ चित्तशुद्ध झालेल्या पुरुषाच्या ब्रह्मप्राप्तीचा प्रकार.
ही ब्रह्मज्ञानाची परा निष्ठा कशी संपादन करावी ते सांगतात -
बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च । विशुद्धया बुद्ध्या युक्तः - विशुद्ध वुद्धीने युक्त असनारा - तथा लघ्वाशी, - तसेच हलके, सात्त्विक आणि नियमित भोजन करणारा - शब्दादीन त्यक्त्वा - शब्द (रूप, रस...) इत्यादि विषयांचा त्याग करून - विविक्त सेवी, - एकांत व शुद्ध अशा स्थानाचे सेवन करणारा - धृत्या आत्मानं नियम्य, - सात्त्विक धारण शक्तिच्या द्वारा अंतःकरण व इंद्रिये यांचा संयम करून - यतवाक् काय मानसः - मन, वाणी आणि शरीर यांना वश करून घेतलेला - रागद्वेषौ व्युदस्य, - राग आणि द्वेष यांना संपूर्ण नष्ट करून - वैराग्यं समुपाश्रितः - दृढ वैरागाचा चांगल्या प्रकारे आश्रय केलेला - च, अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च - तसेच अहंकार, बल, घमेंड, काम, क्रोध आणि - परिग्रहं विमुच्य, - परिग्रह यांचा त्याग करून - नित्यं ध्यानयोगपरः, - निरंतर ध्यानयोग परायण राहणारा - निर्ममः च शांतः - ममतारहित आणि शांतियुक्त असा पुरुष - ब्रह्मभूयाय कल्पते - सच्चिदानंदघन ब्रह्मामध्ये अभिन्न भावाने स्थित होण्यास योग्य होतो. ॥ ५१-५३ ॥
व्याख्या : तदेव ज्ञानमेव आह । बुद्ध्या इति । हे कौंतेय । मुमुक्षुः इति शेषः । मोक्तुं इच्छतीति मुमुक्षुः विशुद्धया पूर्वं स्वधर्मानुष्ठानेन रगादिमलरहितया बुद्ध्या निश्चयात्मिकया युक्तः सन् चेत्यपरं धृत्त्या आत्मावष्टंभेन आत्मानं स्थूलं शरीरं नियम्य नियुज्य चेत्यपरं शब्दादीन् शब्दः आदिर्येषां ते शब्दादयं तान् शब्दादीन् विषयान् विषिंचंति निबध्नं ते विषयाः तान विषयान् त्यक्त्वा त्वंपदं शोधयित्वा चेत्यपरं रागद्वेषौ रागः विषयप्रीतिः च द्वेषः अमर्षः रागद्वेषौ अंतःकरणवृत्तिविशेषय् व्युदस्य निरस्य ब्रह्मभूयाय ब्रह्मभावाय कल्पते योग्यो भवति इति तृतीयश्लोकस्य चरमपादेन संबंधः ॥ ५१ ॥
‘ब्रह्मच आत्मा’ अशा निश्चयात्मक व अत्यंत शुद्ध म्ह० मायासंशय-विपर्ययशून्य अशा बुद्धीने युक्त होऊन, धैर्याने शरीरेंद्रियाला नियमित करून, शरीरस्थितीला अवश्य तेवढ्या विषयांना सोडून केवल सुखासाठी इष्ट असलेल्या शब्दादि सर्व विषयांचा त्याग करून, शरीरस्थितीसाठीहि प्राप्त झालेल्या विषयांतील राग-द्वेषांचा त्याग करून, चित्ताचे ऐकाग्र्य व प्रसाद यांसाठी अरण्य, नदीचे तीर, पर्वताची गुहा, इत्यादि एकान्त व पवित्र प्रदेशाचे सेवन करण्याचे ज्याचे शीलच होऊन गेले आहे, असे व्हावे. निद्रादि दोषांच्या निवृत्तीसाठी परिमित, हितकर व पवित्र अन्नच खावे. वाक्, शरीर व मन यांचे पुर्णपणे नियमन करावे; नंतर आत्मस्वरूपाचे चिंतन हेच ध्यान व आत्म्यामध्येच मनाला एकाग्र करणे हाच योग. या ध्यान-योगामध्ये ‘श्रेष्ठ साधन’ या रूपाने नित्य तत्पर होऊन ऐहिक व पारलौकिक सर्व इष्ट विषयांविषयी विरक्त व्हावे. (वैराग्याचा सतत आश्रय करून नित्य ध्यानयोगपरायण व्हावे, असा याचा संबंध.) शरीरेंद्रियांना मी म्हणणे, हा अहंकार; काम-रागादियुक्त सामर्थ्य, हर्षानंतर होणारा व धर्माच्या अतिक्रमाला कारण होणारा दर्प, हा मानस विकार; इच्छा, द्वेष, शरीरधारणाच्या प्रसंगाने किंवा धर्मानुष्ठानाच्या निमित्ताने प्राप्त झालेला बाह्य परिग्रह, यांचा परित्याग करून-परमहंस परिव्राजक होऊन देहजीवनासाठी अवश्य असलेल्या वस्तूंविषयीहि ‘ममत्वभाव’ सोडून त्यामुळे शांत व सर्व आयासशून्य झालेला यति ब्रह्मभावास प्राप्त होतो. विवरण :
१० ब्रह्मभूत झालेल्या पुरुषाला भक्तीने ब्रह्मरुपत्व.
या क्रमाने ब्रह्मभूत झालेल्या पुरुषाला कोणते फल प्राप्त होते ते सांगतात -
ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति । ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति, - मग तर सच्चिदानंदघन ब्रह्मामध्ये ऐक्यभावाने स्थित असणारा, मन प्रसन्न असणारा असा योगी तर कुणासाठीही शोक करीत नाही - तथा न कांक्षति, - तसेच कशाचीही आकांक्षा करीत नाही - सर्वेषु भूतेषु समः, - समस्त प्राण्यांच्या ठायी समभाव असणारा असा तो योगी - परां मद्भक्तिं लभते - माझी परा भक्ति प्राप्त करून घेतो. ॥ ५४ ॥ व्याख्या : ब्रह्मभूतः कैः लक्षणैः ज्ञायते इत्यत आह । ब्रह्मभूत इति । हे कौंतेय ! ब्रह्मभूतः ब्रह्मरूपेण भूतः जातः ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा सन् प्रसन्नः आनंदरूपः आत्मा स्वरूपं यस्य सः प्रसन्नात्मा प्रसन्नचित्तः न शोचति नष्टं प्रति न शोकं करोति स्वस्य सत्यत्वेन नाशाभावात् चेत्यपरं क कांक्षति किमपि नेच्छति । चित्स्वरूपेण सर्व परिपूर्णत्वात् । कथंभूतो ब्रह्मभूतः । सर्वेषु समस्तेषु भूतेषु ब्रह्मादिस्थावरांतेषु समः समदृष्टिः कटककुंडलादिषु सुवर्णमिव सः ब्रह्मभूतः परां मद्भावलक्षणां मद्भक्तिं मयि परमात्मनि भक्तिः भजनं मद्भक्तिः तां मद्भक्तिं लभते तादात्म्यं प्राप्नोति ॥ ५४ ॥
वर सांगितल्याप्रमाणे ब्रह्माला प्राप्त झालेला म्ह० जिवंतपणी सर्व अनर्थशून्य होऊन ‘निरतिशय आनंदरूप ब्रह्मच मी’ असा अनुभव घेणारा व प्रसन्न चित्त झालेला जीवन्मुक्त बाह्य विषयातील एखादा पदार्थ नाहीसा झाला किंवा स्वतःच्याच शरीरेंद्रियांत काही वैगुण्य झाले, तर त्यासाठी शोक करीत नाही व कशाची आकांक्षाहि करीत नाही. शोक व आकांक्षा न करणे हा त्याचा स्वभाव बनतो. आपल्या उपमेने सर्व भूतांमध्ये सुख व दुःख सम पहातो. असा जीवन्मुक्त, ज्ञाननिष्ठ माझ्या ज्ञानलक्षण परम भक्तिला प्राप्त होतो. म्ह० त्याची ज्ञाननिष्ठा सुप्रतिष्ठित होते. [श्रवण, मनन, निदिध्यास करणार्या समाधियुक्त पुरुषाचे त्या श्रवणादिकांच्या अभ्यासानेच ‘ब्रह्मच आत्मा’ अशा स्वरूपाची ‘मोक्ष’ हेच फल देणारी अपरोक्ष ज्ञानसिद्धि होते.] विवरण :
या समाधिसाध्य परम भक्तिरूप ज्ञानाने कोणते अपूर्व फल प्राप्त होते, ते सांगतात -
भक्त्या मां अभिजानाति यौ अन्यश्चास्मि तत्त्वतः । अहं यः च यावान् अस्मि, - मी जो काही आहे आणि जेवढा काही आहे - एवं मां भक्त्या सः तत्त्वतः अभिजानाति, - अशा प्रकारे मज परमात्म्याला परा भक्तिच्याद्वारा तो जसेच्या तसे तत्त्वतः जाणतो - तथा ततः मां तत्त्वतः ज्ञात्वा - तसेच मग त्या भक्तीचे द्वारा मला तत्त्वतः जाणून घेतल्यावर - सः तदनन्तरं विशते - तो तत्काळच माझ्या ठिकाणी प्रविष्ट होतो. ॥ ५५ ॥ व्याख्या : ततोपि । किं इत्यत आह । भक्त्येति । हे कौंतेय ! अहं यावान् देशकालवस्तुपरिच्छेदशून्यः अस्मि चेत्यपरं यः सत्यज्ञानरूपः अस्मि ब्रह्मभूतः भक्त्या ऐकात्म्यलक्षणया मां परमात्मानं तत्त्वतः याथार्थ्यज्ञानीन देशकाल वस्तुपरिच्छेदशून्यं सत्यज्ञानरूपं परमात्मानं अभिजानाति समीपं जानाति । किंच ततः तदनंतरं यथार्थज्ञानप्राप्यनंतरं तत्त्वतः यथाशास्त्रं ज्ञात्वा अहं ब्रह्मास्मीति विदित्वा अनुभूय तदनंतरं प्रारब्धक्षयानंतरं मां सत्यादिलक्षणं विशते प्रविशति विदेहकैवल्यं प्राप्नोति इत्यर्थः । यथा घटध्वंसे घटाकाशः महाकाशं प्रविशते तद्वत् ॥ ५५ ॥
त्यानंतर पुरुष या ज्ञानलक्षण भक्तिने माझ्या उपाधिकृत भेदाचा विस्तार केवढा आहे व निरूपाधिक असा जो मी, त्या मला तत्त्वतः जाणतो म्ह० माझ्या औपाधिक स्वरूपाचा व्याप केवढा आहे, हे त्याला कळते व निरूपाधिक, अपरिच्छिन्न, असंग, अद्वैत, चैतन्यमात्र, एकरसरूप, अज, अमर, अभय, अनिधन-सर्व विकाररहित, अशा मला तो साक्षात् जाणतो आणि असे ज्ञान होताच तत्काल माझ्यामध्येच प्रवेश करितो. विवरण :
११ ईश्वरप्रसादाने शाश्वतपदप्राप्ति, विवेकाने ईश्वरचित्तत्व, त्याचे फल, विपक्षी दोष.
स्वकर्माने भगवानांचे पूजन करणे या भक्तियोगाचे ज्ञाननिष्ठायोग्यता हे फल आहे. त्या योग्यतेच्या निमित्ताने मोक्षफलामध्ये पर्यवसान पावणारी ज्ञाननिष्ठा सिद्ध होते. अर्थात् ज्ञाननिष्ठासिद्धीसाठी ज्ञाननिष्ठा योग्यता पाहिजे. म्हणून ती योग्यता देणार्या भक्तियोगाची या उपसंहारप्रकरणात स्तुति करितात -
सर्वकर्माणि सदा कुर्वाणः अपि, - सर्व कर्मे सदा करीत असूनही - मद्व्यपाश्रयः मत्प्रसादात् - मत्परायण असणारा योगी तर माझ्या कृपेमुळे - शाश्वतं अव्ययं पदं अवाप्नोति - सनातन, अविनाशी, परमपद प्राप्त करून घेतो. ॥ ५६ ॥ व्याख्या : एवं केनोपायेन कदा प्राप्नोति इत्यपेक्षायामाह । सर्वकर्माणीति । हे कौंतेय ! पुरुषः यदा यस्मिन् काले इति शेषः । मद्ब्यपाश्रयः सन् अहमेव भासरूपदेहद्वयस्य व्यपाश्रयः अधिष्ठानत्वेन आश्रयो यस्य सः मद्व्यपाश्रयः सर्वकर्माणि लौकिकवैदिकानि कर्माणि च नित्यनैमित्तिकानि कर्माणि सदा सर्वदा मदर्थमेव कुर्वाणः करोतीति कुर्वाणः । भवति इति शेषः । तदा तेनैव मदर्थकर्मकरणेन हेतुना मत्प्रसादात् पत्प्रसादेन शाश्वतं शश्वत् निरंतरं भवं शाश्वतं अवाप्नोति तादात्म्येन जानाति ॥ ५६ ॥
नित्य नैमित्यिक व काम्य कर्माप्रमाणे निषिद्ध कर्मेहि सतत करणारा पण माझ्या ठिकाणी ज्याने सर्वात्मभाव अर्पिला आहे,-माझाच ज्याने आश्रय केला आहे, असा मुमुक्षु मज ईश्वराच्या अनुग्रहामुळे नित्य अव्यय वैष्णव पदाला प्राप्त होतो. [हा श्लोक ईश्वराराधनेच्या स्तुतिपर असल्यामुळे सर्व कर्मात निषिद्ध कर्माचाहि अंतर्भाव होतो.] विवरण :
ज्याअर्थी परमेश्वराच्या प्रसादाचे असे माहात्म्य आहे, त्याअर्थी अनुग्रहासाठी तू यत्न करावास असे सांगतात -
चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः । चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य - मनाने सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून - तथा बुद्धियोगं उपाश्रित्य - तसेच समबुद्धिरूप योगाचा अवलंब करून - त्वं मत्परः च सततं मच्चितः भव - तू मत्परायण आणि निरंतर माझ्या ठायी चित्त ठेवणारा असा हो. ॥ ५७ ॥ व्याख्या : यस्मादेवं तस्मात् त्वमपि एव भव इत्याह । चेतसेति । हे पार्थ ! त्वं चेतसा अंतःकरणविवेकेन यथ अवकाशबलेनैव सर्वव्यापाराः भवंति अवकाशे एव पर्यवसानं प्राप्नुवंति तथा सर्वाणि कर्माणे मत्सत्तया भवंति मय्येव प्रविशंति इति विवेकेन सर्वकर्माणि नित्यनैमित्तिककर्माणि मयि परमेश्वरे संन्यस्य मदर्पणबुद्ध्या संकल्प्य मत्परः अहहेव परं प्राप्यः पुरुषार्थो यस्य सः मत्परः भव । ननु-त्वत्परं चित्ताधीनं तत्तु चांचल्यात् अनेकपरं, कथं त्वत्परं भवेत् इत्यपेक्षायामाह । त्वं बुद्धियोगं उपाश्रित्य आश्रयित्वा सततं निरंतरं मच्चितः मयि परमेश्वरे चित्तं अंतःकरणं यस्य सः मच्चित्तः भव ॥ ५७ ॥ विवेकबुद्धीने दृष्ट फल देणारी व अदृष्ट फल देणारी सर्व कर्मे ईश्वराच्या ठिकाणी ‘यत्करोपि यदश्नासि’ (९-२७) या न्यायाने समर्पण करून ‘मी वासुदेवच ज्याला श्रेष्ठ आहे असा मत्पर होऊन माझ्या ठिकाणी बुद्धीला समाहित करणे याच बुद्धियोगाचा आश्रय घेऊन-बुद्धियोगाला अनन्य शरण होऊन तू सतत मच्चित्त हो. सतत माझ्या ठिकाणीच चित्त ठेव’. विवरण :
मच्चित्त झाल्याने काय होते ते सांगतात -
मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि । मच्चितः त्वं - वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवलेला असा तू - मत्प्रसादात् अनायासेन - माझ्या कृपेने अनायासेच - सर्वदुर्गाणि तरिष्यसि, - सर्व संकटे पार करून जाशील - अथ चेत् अहंकारात् न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि - पण जर का अहंकाराने माझी वचने ऐकली नाहीस तर मात्र तू नष्ट होशील (म्हणजे परमार्थातून भ्रष्ट होशील). ॥ ५८ ॥ व्याख्या : ननु अत्यायाससाध्ये त्वत्परत्वे किं स्यात् ? इत्याशंक्य तत् अर्धेन आह । मच्चित्त इति । हे पार्थ ! त्वं मच्चित्तः सन् मयि परमेश्वरे चित्तं अंतःकरणं यस्य सः मच्चित्तः सर्वदुर्गाणि जन्ममरणसंकटानि सर्वदुर्गाणि पत्प्रसादात् मम परमेश्वरस्य प्रसादः सर्वप्रकारेण वर्तमानोपि मच्चित्तत्वात् अयं मया रक्षणीयः इति मत्कटाक्षः पत्प्रसादः तस्मात् मत्प्रसादात् तरिष्यसि संसारसंकटं न प्राप्स्यसि । एवं मया तव हितं उक्तं अनादृत्य स्वैरं वर्तमानस्य महान् अनर्थः भविष्य्ति इति अर्धेनाह । अथ मदुक्तश्रवणानंतरं त्वं अहंकारात् अहं नरावतारो न करिष्यामि इति अहंकारेण मम नियंतुः ईश्वरस्य वाक्यं न श्रोष्यसि चेत् न अंगीकरिष्यसि चेत् तर्हि विनक्ष्यसि जीवभावेन संसारं प्राप्नोषि ॥ ५८ ॥
माझ्याच ठिकाणी ज्याने चित्त लावले आहे, असा तू माझ्या कृपेमुळे संसाराला कारण होणार्या अज्ञानादि सर्व निमित्तांना तरून जाशील-त्यांचे उल्लंघन करून जाशील. पण असे असूनहि ‘मी पंडित आहे’ अशा अभिमानाने मी सांगितलेले हे जर न ऐकशील, तर विनाश पावशील. विवरण :
‘मी स्वतंत्र आहे, दुसर्याने सांगितलेले काय म्हणून ऐकू ?’ असे तू समजू नकोस कारण -
यद् अहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे । अहंकारं आश्रित्य इति यत् मन्यसे - अहंकाराचा आश्रय घेऊन हे जे तू समजत आहेस की - ’न योत्स्ये’, - ’मी युद्ध करणार नाही’ - एषः ते व्यवसायः मिथ्या, - हा तुझा निश्चय मिथ्या आहे - यतः तव प्रकृतिः त्वां नियोक्ष्यति - कारण तुझा स्वभावच तुला जबरदस्तीने युद्ध करावयास लावील. ॥ ५९ ॥ व्याख्या : निश्वयेन अहं विनंख्यामि बंधुभिः सह युद्धं न करिष्यामि इति चेत् तत्राह । यदिति । हे पार्थ ! त्वं अम्दुक्तं अनादृत्य केवलं अहंकारं अहमेव युक्तायुक्ताभिज्ञाता इति अभिमानं आश्रुत्य अवलंब्य गोत्रवधदोषं प्रकटयित्वा न योत्स्ये स्वधर्मेण प्राप्तं युद्धं न करिष्यामि इति मन्यसे चेत् निश्चयं करिष्यसि चेत् तर्हि यत् ते तव एषः प्रसिद्धः व्यवसायः निश्चयः मिथ्या मृषैव । यद्यपि धर्मयुद्धं मोहात् न करिष्यामि इति मन्यसे तथापि प्रकृतिः क्षत्रियस्वभावः त्वां युद्धे नियोक्ष्यति बलात् प्रवर्तयिष्यति स्वहननाय प्रवृत्तन् भीष्मादीन अवलोक्य त्वं अतिशूरत्वेन संभावितः सन् निरुद्योगः कथं भविष्यसि इत्यर्थः ॥ ५९ ॥
अहंकाराचा आश्रय करून ‘मी युद्ध करणार नाही’ असे जे तू समजतोस-तू म्हणत आहेस, तो तुझा खोटा निश्चय आहे. कारण तुझी प्रकृति-तुझा क्षत्रियस्वभाव तुला युद्धामध्ये नियुक्त करील-तुला युद्ध करावयास लावील. विवरण :
स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा । हे कौन्तेय ! मोहात् यत् कर्तुं न इच्छसि - हे कुंतिपुत्रा ! मोहामुळे जे कर्म करण्याची तू इच्छा करीत नाहीस - तत् अपि स्वेन स्वभावजेन कर्मणा - ते कर्मसुद्धा आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने - निबद्धः अवशः करिष्यसि - बद्ध असलेला असा तू परवश होऊन करशील. ॥ ६० ॥ व्याख्या : तदेव स्फुटयति । स्वभावजेनेपि । हे कौंतेय ! त्वं स्वेन स्वकीयेन कर्मणा क्षत्रियकर्मणा निबद्धः सन् नितरां अत्यंतं बद्धः यंत्रितः निबद्धः यत् स्वधर्माख्यं कर्म कर्तुं मोहात् मोहेन न इच्छसि तथापि एवं सत्यपि त्वं अवशः सन् न वशः न स्वाधीनः अवशः स्वभावस्वाधीनः सन् तत् स्वध्र्माख्यं कर्म करिष्यसि । अत्र संशयो नास्ति । कथंभूतेन कर्मणा । स्वभावजेन स्वभावात् क्षत्रियस्वभावान् जातं स्वभावजं तेन स्वभावजेन । ईश्वरेणापि स्वभावः अन्यथा कर्तुं न शक्यते तव का वार्ता इति भावः ॥ ६० ॥
हे अर्जुना, स्वभावजन्य पूर्वोक्त शौर्यादिक कर्माने-आपल्या स्वधर्मरूप कर्माने निश्चयाने बद्ध झालेला तू अविवेकामुळे जे कर्म करण्याची इच्छा करीत नाहीस, ते तू प्रकृतीच्या अधीन होऊनहि करशील. [तुझी प्रकृतिच-स्वभावच तुला ते करावयास लावील.] विवरण :
१२ ईश्वराचे हृदयस्थत्व, त्याची शरणता.
याहि कारणाने तू युद्ध करावेस असे भगवान् सांगतात -
ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । हे अर्जुन ! यंत्रारूढानि सर्वभूतानि - हे अर्जुना ! शरीररूपी यंत्रावर आरूढ असणार्या सर्व प्राण्यांना - ईश्वरः मायया भ्रामयन् - अंतर्यामी परमेश्वर स्वतःच्या मायेने त्यांच्या कर्मांना अनुसरून फिरवीत - सर्वभूतानां हृद्देशे तिष्ठति - सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित आहे. ॥ ६१ ॥ व्याख्या : तर्हि स्वभावबद्धः कथं मुक्तः स्यात् इत्याशंक्य सर्वस्यापि ईश्वरवर्तित्वात् तमेव ईश्वरमेव अनेनभावेन शरणं बच्छ मुक्तो भविष्यसि इत्याशयेनाह द्वाभ्याम् ईश्वर इति । हे अर्जुन ! ईश्वरः चराचरनियंता सर्वभूतानां ब्रह्मादिपिपीलिकांतानां हृद्देशे हृदः हृदयस्य देशः अवकाशः हृद्देशः हृद्देशः तस्मिन् हृद्देशे तिष्ठति व्यापकोपि तदुपलब्धिस्थानत्वात् तिष्ठति इति उक्तम् । कथंभूतः ईश्वरः । मायया सृष्ट्यादि जननानुकूल स्वशक्त्या सर्वभूतानि ब्रह्मादिपिपीलिकांतानि भ्रामयन् भ्रामयतीति भ्रामयत् तत्तत्कर्मानुसारेण पूर्वदेहं परित्याज्य देहांतरं प्रापयन् । कथंभूतानि भूतानि । यंत्रारूढानि यंत्रे प्रारब्धयंत्रे आरूढानि यंत्रारूढानि प्रारब्धवशवर्तीनि ॥ ६१ ॥
हे अर्जुना, ज्याप्रमाणे लौकिक मायावी कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणारा पुरुष काष्ठमय बाहुल्यांसारख्या यंत्रांना मायेने-काही गुप्त योजनेने फिरवीत-त्यांच्याकडून खेळ-भ्रमण करवीत रहातो, त्याप्रमाणे ईश्वरहि जणु-काय यंत्रारूढ झालेल्या या सर्व भूतांना मायेने भ्रमण करवीत त्यांच्या हृदयात रहातो. विवरण :
तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत । हे भारत ! तं एव सर्वभावेन त्वं शरणं गच्छ - हे भारता ! त्या परमेश्वरालाच सर्व प्रकारे तू शरण जा - तत्प्रसादात् - त्या परमेश्वराच्या कृपेनेच तू - परां शान्तिम् तथा शाश्वतं स्थानं प्राप्स्यसि - परमशांति आणि सनातन परमधाम प्राप्त करून घेशील. ॥ ६२ ॥ व्याख्या : एवं सति तेनैव ईश्वरेणैव स्वध्र्माख्यं युद्धं स्वभावजं कर्म प्रापितं तत् न करिष्यामि इति तव संकल्पः नष्टो भविष्यति इति कृत्वा तमेव ईश्वरमेव प्रसाद्य कृतार्थो भव इत्याशयेनाह । तमेवेति । हे भारत ! हे भरतवम्शोद्भव । त्वं ईश्वराधीनः सन् सर्वभावेन सर्वप्रकारेण तमेव कार्यकारणनियंतारमेव शरणं गच्छ स्वरक्षणाय संनिधिं कुरु । ततः किं स्यात् ? इत्याशंक्य तत्प्रसादात् कृतकृत्यो भवसीत्याशयेनाह । त्वं तत्प्रसादात् परां सर्वोत्कृष्टां शांतिं संसारोपरतिं प्राप्य शाश्वतं शश्वत् निरंतरं भवं शाश्वतं स्थानं सर्वाधिष्ठानं ब्रह्म प्राप्स्यसि ॥ ६२ ॥
हे अर्जुना, तू संसारपीडा नाहीशी व्हावी, म्हणून त्याच ईश्वराला शरीर, वाणी व मन यांच्या योगाने शरण जा. त्याचाच आश्रय कर. त्याच्या प्रसादाने म्ह० तत्त्वज्ञानोत्पत्तीपर्यंत ईश्वरानुग्रहाने सर्वोत्तम उपरतीला व ज्यांत मुक्त पुरुष रहातात त्या नित्य स्थानाला म्ह० मज विष्णूच्या परम पदाला प्राप्त होशील. विवरण :
१३ ज्ञानोपसंहार व उपदेश.
आता शास्त्राचे उपसंहार करणारे भगवान् सांगतात -
इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया । इति गुह्यात् गुह्यतमं इदं ज्ञानं मया ते अख्यातम् - अशा प्रकारे गोपनीय गोष्टींमध्येसुद्धा अति गोपनीय असे हे ज्ञान मी तुला सांगितले आहे - एतत् अशेषेण विमृश्य - या रहस्ययुक्त ज्ञानाचा पूर्णपणे, चांगल्याप्रकारे विचार करून् - यथा इच्छसि तथा कुरु - आता तुझी जशी इच्छा असेल त्याप्रमाणे कर. ॥ ६३ ॥ व्याख्या : सर्वगीतार्थं उपसंहरन् आह । इतीति । हे पार्थ ! इति अनेन प्रकारेण ते तुभ्यं मया परमकारुणिकेन शास्त्रयोनिना सर्वज्ञेन ज्ञानं आत्मानात्मप्रकाशकं आख्यातं कथितम् । उपदिष्टमित्यर्थः । त्वं एतत् गीताशास्त्रं मदुपदिष्टं ज्ञानं अशेषेण समग्रेण विमृश्य विचार्य अवलोक्य दृढीकृत्य पश्चात् यथा येन प्रकाएण इच्छसि प्राप्तुं अभिलषसि तथा तेन प्रकारेण कुरु संपादय । कथंभूतं ज्ञानम् । गुह्यात् गोप्यात् गुह्यतरं अतिशयेन गुह्यं गोप्यं इति गुह्यतरं मंत्रयोगादीनां अतिरहस्यम् । एतस्मिन् अवलोकिते सति तव मोहः निवर्तिष्यत इति भावः ॥ ६३ ॥
याप्रमाणे मी सर्वज्ञ ईश्वराने तुला हे अशा प्रकारचे अतिशय गुह्य ज्ञान-गीताशास्त्र सांगितले आहे. या शास्त्राचा व त्यांतील सर्व विषयांचा पूर्णपणे विचार करून जशी तुझी इच्छा असेल तसे कर. [ज्ञान किंवा कर्म यांतील जे तुला श्रेष्ठ वाटेल, त्याचे स्वाधिकारानुसार अनुष्ठान कर.] विवरण :
गीताशास्त्राचे पूर्वापर विचाराने तात्पर्य ठरविण्यास जर तू असमर्थ असशील तर पुनरपि मी सांगत असलेले हे तू ऐक -
सर्वगुह्यतमं भूयः श्रृणु मे परमं वचः । सर्वगुह्यतमं मे परमं वचः भूयः श्रृणु; - सर्व गोपनीय गोष्टींमध्ये अतिशय गोपनीय असे माझे परम रहस्याने युक्त वचन पुन्हा एकदा तू ऐक - त्वं मे दृढं इष्टः असि, - कारण तू मला अतिशय प्रिय आहेस - ततः इति हितं ते भूयः वक्ष्यामि - त्यामुळे हे परम हितकर वचन तुला परत एकदा मी सांगतो. ॥ ६४ ॥ व्याख्या : अतिगंभीरं गीताशास्त्रं समग्रेण पर्यालोचयितुं अवलोकयितुं अशक्नुवतः अर्जुनस्य कृपया स्वयमेव तस्या गीताशास्त्रस्य सारं संगृह्य कथयति सर्वगुह्यमिति त्रिभिः । हे अर्जुन । त्वं मे मम वचं वाक्यं भूयः पुनः श्रृणु सावधानतया अवधारय । कथंभूतं वचः । परमं पतीति पं पं परमेश्वरं रमयति तत् परमं निरतिशयम् । पुनः कथंभूतम् । सर्वगुह्यतमं सर्वघ्येभ्यः अति सर्वगुह्यतमं अतिगुह्यम् । पुनः पुनः कथने हेतुमाह । त्वं दृढं अत्यंतं मे मम इष्टः प्रियः असि इति मत्वा ततः तस्मात् हेतोः अहं ते तव हितं वक्ष्यामि पुनः गुह्यतमं वचं कथयामि । ’दृढमतिः’ इति पाठः केचित् पठंति ॥ ६४ ॥
सर्व गुह्यांहून अत्यंत गुह्य, अत्यंत रहस्य, असे हे माझे उत्कृष्ट वाक्य तू पुनः ऐक. मला तू अत्यंत प्रिय आहेस, म्हणून मी तुझे हित सांगतो. [मी पूर्वी वारंवार जरी हे सांगितले आहे, तरी पुनः सांगतो. भीतीने किंवा धनाच्या इच्छेने मी ते तुला सांगत नसून तू मला अत्यंत प्रिय आहेस, म्हणून पुनः पुनः तुला सांगतो. ज्ञानप्राप्तीचे साधन सर्व हितामध्ये अतिशय हित आहे. म्हणून मी तुला हित-ज्ञानप्राप्तीचे श्रेष्ठसाधन सांगेन.] विवरण :
आता अत्यंत गुह्य काय आहे ते सांगतात -
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु । हे अर्जुन ! मन्मना भव, - हे अर्जुना, तू माझ्या ठिकाणी मन असणारा असा हो - मद्भक्त भव, - माझा भक्त हो - मद्याजी भव च मां नमस्कुरु, - माझीच पूजा करणारा हो आणिमलाच प्रणाम कर - एवं - असे एले असता - त्वं मां एव एष्यसि, - तू मलाच प्राप्त करून घेशील - एतत् अहं ते सत्यं प्रतिजाने, - हे मी तुला सत्य प्रतिज्ञेवर सांगतो - यतः त्वं मे प्रियः असि - कारण तू मला अत्यंत प्रिय आहेस. ॥ ६५ ॥ व्याख्या : किं तत् इति अपेक्षायां आह । मन्मना इति । हे पार्थ ! त्वं मन्मनाः मय्येव परमात्मन्येव मनः अंतःकरणं यस्य सः मन्महां भव । यथा पुरुषः राजानं भजति तथा मा भूः । किंच त्वं मद्याजी मामेव बाह्येंद्रिय यजितुं पूजितुं शीलं यस्य सः मद्याजी भव । किंच त्वं मां सर्वांतर्यामिणं नमस्कुरु नमस्कारं कुरु । अनेन किं स्यात् इत्याह । त्वं मामेव एष्यसि पुनर्जन्म न प्राप्स्यसि । अहं ते त्वांप्रति सत्यं यथा स्यात् तथा प्रतिजाने प्रतिज्ञां करोमि । ननु - मांप्रति प्रतिज्ञाकरणे को हेतुः तत्राह । हे पार्थ ! त्वं मे अत्यंतं प्रियः इष्टः असि । त्वमेव अहं अहमेव त्वं इति ऐक्यानुभवाय प्रतिज्ञां करोमीति भावः ॥ ६५ ॥
तू माझ्याचमध्ये ज्याचे मन आहे, असा हो. माझाच भक्त हो. माझेच यजन-पूजन कर. मलाच नमस्कार कर. मी तुला सत्य प्रतिज्ञा करून सांगतो की, या व्यवहारभूमीत अशा रीतीने वागणारा -वासुदेवामध्येच ज्याने सर्व साध्य-साधन-प्रयोजनभाव, समर्पिला आहे, असा तू मलाच येऊन पोचशील. तू मला प्रिय आहेस, म्हणून मी अशी प्रतिज्ञा करतो. [याप्रमाणे भगवानांची प्रतिज्ञा सत्य आहे. ती केव्हाहि असत्य होणार नाही. भगवद्भक्तीचे मोक्ष हे फल अवश्य प्राप्त होणारे आहे असा निश्चय करून केवल भगवच्छरण व्हावे. भगवच्छरण होणे हीच श्रेष्ठ गति आहे. तेच परम साधन आहे. असे समजून त्याप्रमाणे वागावे.] विवरण :
कर्मयोगनिष्ठेचे जे परम रहस्य-ईश्वरशरणता, तिचा उपसंहार करून आता यापुढे कर्मयोगनिष्ठेचे फल सर्व वेदान्तविहित सम्यग्दर्शन सांगावे म्हणून भगवान् म्हणतात -
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज । सर्वधर्मान् मयि परित्यज्य - सर्व धर्म, म्हणजे सर्व कर्तव्य कर्मे यांचा माझ्या ठायी त्याग करून - एकं मां शरणं व्रज - सर्वशक्तिमान, सर्वाधार अशा मज एका परमेश्वरालाच शरण ये - सर्वपापेभ्यः अहं त्वा मोक्षयिष्यामि, - मी तुला सर्व पापांपासून मुक्त करून टाकीन - मा शुचः - तू अजिबात शोक करू नकोस. ॥ ६६ ॥ व्याख्या : ततोपि गुह्यतमं आह । सर्वधर्मानिति । हे अर्जुन ! त्वं सर्वधर्मान् सर्वे संपूर्णाश्च ते धर्माः तत्त्वमस्यादिमहावाक्यधर्मां सर्वधर्माः तात् सर्वधर्मान् कृपालुना सद्गुरुणा तत्त्वमसीति प्रथमं महावाक्यं उपदिष्टं तत्र धर्मान् सर्वज्ञत्वं किंचिज्ज्ञत्वं अपरोक्षत्वं परोक्षत्वं सद्वयत्वं अनात्मत्वं ब्रह्मत्वं इति अविद्याकल्पितान् एकादशस्थान् विरुद्धान् तत्त्वंपदगतान् सर्वधर्मान् परित्यज्य अन्योन्यव्यभिचारित्वात् मिथ्यारूपान् त्यक्त्वा एक सजातीयविजातीय स्वगतभेदरहितं मां परमेश्वरं शरणं शरणं व्रज आश्रयं व्रज उपाधिपरित्यागेन अखंडं भज । ननु - ये धर्माः अनादिपरंपरया प्राप्ताः मया त्यक्ताः संतः ते धर्माः त्वदधीनाः संतः मां कथं त्यक्ष्यंति इत्याशंख्याह । अहमिति । अत्र पापशब्देन धर्मग्रहणं लक्ष्यते यावत् धर्माधर्मिभावः वर्तते तावत् दुःखरूपं संसारः न निवर्तते इति कृत्वा दुःखोपादान धर्मः पापशब्देन उच्यते । तथा च अयं अर्थः । हे अर्जुन ! अहं धर्माधर्मनियंता त्वा त्वां बहिर्मुखं सर्वपापेभ्यः नाम सर्वधर्मेभ्यः मोक्षयोष्यामि मोचयिष्यामि । तेभ्यः वियुज्य स्वरूपेण युक्तं करिष्यामेत्यर्थः । तेभ्यः सर्वधर्मेभ्यः अहं कथं मुक्तः स्यां इति माशुचः शोकं माकार्षीः । इति श्रीकृष्णाभिप्रायः । यद्वा द्वितीयार्थः सर्वधर्मानिति । हे पार्थ ! त्वं सर्वधर्मान् सर्वे च ते धर्मां नित्यनैमित्तिकधर्माः सर्वधर्माः तान सर्वधर्मान् वर्णाश्रमविहितान् धर्मान् परित्यज्य विधिना संन्यस्य संन्यासं कृत्वा एकं सजातीयादिभेदरहितं मां निरुपहितं ब्रह्म शरणं व्रज वाक्यज्ञानेन ऐक्यं गच्छ । ननु - यावज्जीवपर्यंतं वेदप्रेरितानि कर्माणि परित्यज्य वर्तमानस्य पुरुषस्य वर्णाश्रमविहिताकरण प्रत्यवायोत्थपापानि स्युः हत्याशंक्याह । अहं सर्वाधिष्ठाता त्वां बहिर्मुखं सर्वपापेभ्यः विहिताकरणपापेभ्यः मोक्ष्ययिष्यामि । यदा त्वं देहात्मबुद्धिं हित्वा अहं ब्रह्मास्मि इति मां शरणं गच्छसि तदैव तव सर्वपापविमोकः भविष्यति । इति हेतोः मा शुचः शोकं मा कुरु । अयं चिदानंदाभिप्रायः अस्मिन्पक्षे पूरोक्तः सर्वार्थः अंतर्भवति इति ज्~यम् । अतोपि गुह्यतमं आह । यद्वा तृतीयार्थः । सर्वधर्मानिति । हे पार्थ ! त्वं सर्वधर्मान् सर्वे संपूर्णाः च ते धर्माः वर्णाश्रमधर्माः सर्वधर्माः तान् सर्वधर्मान् परित्यज्य भक्त्यैव सर्वं भविष्यति इति दृढविश्वासेन त्यक्त्वा एकं अद्वितीयं मां परमेश्वरं शरणं व्रज मदैकशरणः भव । एवं वर्तमानः त्वं कर्मत्यागनिमित्तं पापं मा शुचः शोकं मा कार्षीः । यतः हेतोः अहं त्वां मदेकशरणं सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मुक्तं करोमि इति श्रीधराभिप्रायः ॥ ६६ ॥
सर्व धर्मांना व अधर्मांना सोडून-सर्व कर्मांचा संन्यास करून सर्वात्मा, सम, सर्वभूतस्य, ईश्वर, अच्युत, गर्भ, जन्म, जरा, मरणरहित अशा मला ‘मीच एक आहे, अन्य काही नाही’ अशाप्रकारे मज एकाला शरण जा. सर्वाचा आत्मा असा जो मी, त्या एका मजवाचून अन्य काही नाही, असा निश्चय कर. म्ह० मी तुज एकनिष्ठाला धर्म व अधर्म यांच्या बंधनरूप पापांपासून आपले निरूपाधिक स्वरूप प्रकाशित करून मुक्त करीन. तू शोक करू नको. [अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे त्याचा संन्यासद्वारा ज्ञाननिष्ठेत मुख्य अधिकार नाही. तथापि त्याला पुढे करून त्याच्या द्वारा अधिकार्यांना ज्ञाननिष्ठेचा हा उपदेश केला असल्यामुळे त्यांत काही विरोध नाही.] विवरण :
१४ संप्रदायविधि.
या अठराव्या अध्यायांत गीताशास्त्रार्थाचा उपसंहार करून आता यापुढे या शास्त्राचा संप्रदायविधि सांगतात -
इदं ते नातपस्काय न अभक्ताय कदाचन । इदं गुह्यं कदाचन ते अतप्स्काय न व्याच्यम्, - हे गीताशास्त्र तू कोणत्याही काळी तपरहित मनुष्याला सांगू नकोस - अभक्ताय न वाच्यम्, - भक्तिरहित माणसाला सांगू नकोस - च अशुश्रूषवे न वाच्यम् - तसेच ज्याला ऐकण्याची इच्छा नाही त्यालाही सांगू नकोस - च यः मां अभ्यसूयति - त्याचप्रमाणे जो माझ्या बाबतीत दोष्दृष्ती बाळगतो - तस्मै कदापि न वाच्यम् - त्यालादेखील कधीही सांगू नकोस. ॥ ६७ ॥ व्याख्या : एवं गीतार्थं उपदिश्य तत् संप्रदायप्रवर्तने नियममाह । इदिमिति । हे अर्जुन ! इदं मयोक्तं गीतातत्त्वं ते त्वया अतपस्काय स्वधर्मानुष्ठानहीनाय न वाच्यं न कथनीयम् । चेत्यपरं अभक्ताय न भक्तः अभक्तः तस्मै अभक्ताय स्वध्र्मानुष्ठानयुक्तोपि य मयि अभक्तः तस्मै न वाच्यं न वक्तव्यम् । चेत्यपरं कदाचन कदापि अशुश्रूषुः तस्मै न वाच्यं व वक्तव्यम् । यः विशेषेणत्रययुक्तः मां परमेश्वरं अभ्यसूयति मनुष्यदृष्ट्या दोशारोपेण निंदति तस्मै पुरुषाय कदाचन कदापि न वाच्यं न कथनीयम् । इत्यनेन संप्रदायशुद्धिर्दर्शिता ॥ ६७ ॥
हे शास्त्र तुझ्या संसाराचा विच्छेद होण्यासाठी-हितासाठी मी सांगितले. ते तू ‘अतपस्क’ म्ह० तपोरहित असलेल्या कोणालाहि सांगू नयेस. तपस्वी असलेल्यालाहि, गुरू-देव विषयक भक्तीने रहित असलेल्या अभक्ताला केव्हाहि सांगू नये. भक्त व तपस्वीहि असून जो गुरुशुश्रूषा न करणारा असतो, त्यालाहि सांगू नये व मज वासुदेवाला प्राकृत मनुष्य समजून जो अज्ञ मजवर दोषांचा आरोप करणे, माझे ईश्वरत्व सहन न करणे, इत्यादि माझी अत्यंत असूया करितो, त्यालाहि हे शास्त्र सांगू नये. [अर्थात् भगवानांच्या ठिकाणी परम भक्ति-निसीम प्रेम ठेवणारा, तपस्वी, शुश्रूषु व असूया न करणारा, अशा अधिकार्याला हे शास्त्र सांगावे.] विवरण :
आता या शास्त्र संप्रदायाची प्रवृत्ति होण्यासाठी संप्रदाय कर्त्याला फल सांगतात -
य इदं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यति । मयि परां भक्तिं कृत्वा - माझ्यावर परम प्रेम करून - यः इमं परमं गुह्यं - जो पुरुष हा परम रहस्ययुक्त गीतोपदेश - मद्भक्तेषु अभिधास्यति, - माझ्या भक्तांना सांगेल - असंशयः सः मां एव एष्यति - तो मलाच प्राप्त करून घेईल यात कोणताही संदेह नाही. ॥ ६८ ॥ व्याख्या : एतैः दोषैः विरहितेभ्यः मद्६भक्तेभ्यः गीताशास्त्रोपदेष्टुः फलं आह । य इदमिति । यः पुरुषः मद् उपदिष्टतत्त्वज्ञानानुयायी परमं सर्वशास्त्रसारं गुह्यं उक्तप्रकारं इदं गीताशास्त्रं मद्भक्तेषु मम परमात्मनः भक्ताः अनन्योपासकाः मद्भक्ताः तेषु मद्भक्तेषु मद्भक्तेभ्यः अभिधास्यति वक्ष्यति सः पुरुषः मयि परमात्मनि परां परमां भक्तिं कृत्वा संपाद्य असंशयः नास्ति संशयो यस्य सः असंशयः निःसंदेहः सन् मामेव एष्यति प्राप्नोति । मद्भक्तेः फलं अहमेव नान्यदस्तीत्यर्थः ॥ ६८ ॥
जो कोणी अध्यापक हे परमगुह्य माझ्या भक्ताला सांगेल, तो माझ्या ठिकाणी ज्ञानरूप श्रेष्ठ भक्ति करून मलाच प्राप्त होईल, यांत काही संशय नाही. [मी तुझ्या ठिकाणी याची जशी प्रस्थापना केली आहे, त्याप्रमाणे ‘परमगुरू जो भगवान् त्याची हि मजकडून शुश्रूषाच केली जात आहे’, अशा भावनेने परमभक्तिने माझ्या भक्तांना जो हे मोक्षशास्त्र शिकवील, तो मलाच प्राप्त होईल, यांत काही संशय नाही. ‘मद्भक्तेषु’ असे म्हणून भक्तिचे पुनः ग्रहण केल्यामुळे केवल ‘भगवद्भक्ति’ याच एका गुणाने मनुष्य या शास्त्रदानाचे पात्र होतो, असे सिद्ध होते.] विवरण :
‘अहो पण, सर्व मुक्तिसाधनांमध्ये ध्यान श्रेष्ठ असल्यामुळे ध्याननिष्ठ झालेला जो मुमुक्षु त्याची विद्यासंप्रदायामध्ये प्रवृत्ति होणार नाही’ अशी आशंका घेऊन भगवान् म्हणतात -
न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः । तस्मात् - त्या माणसापेक्षा श्रेष्ठ - मनुष्येषु कश्चित् च मे प्रियकृत्तमः न; - माणसांमध्ये कोणीही माझे प्रिय करणारा नाही - च भुवि तस्मात् मे प्रियतरः - तसेच पृथ्वीवर त्याच्यापेक्षा अधिक माझा प्रिय - अन्यं न भविता - दुसरा कोणीही भविष्यात होणार नाही. ॥ ६९ ॥ व्याख्या : तमेव अभिनंदति । न चेति । हे अर्जुन ! मनुष्येषु मध्ये तस्मात् मद्भक्तेभ्यो गीताशास्त्रस्य व्याख्यातुः सकाशात् कश्चित् पुरुषः मे मम प्रियकृत्तमः प्रियं इष्टं करोतीति प्रियकृत् अतिशयेन प्रियकृत् इति प्रियकृत्तमः अत्यंतं प्रियकारी अतिसंतोषकर्ता न नास्ति । चेत्यपरं तस्मात् उक्तपुरुषात् भुवि पृथिव्यां वा लोकत्रयेपि अन्यः पुरुषः मे मह्यं प्रियतरः अतिशयेन प्रियं इति प्रियतरः प्रियकर्ता न भविता न भविष्यति इत ऊर्ध्वं न भविष्यत्येव कश्चन तादृशः । सः स एवेति भावः ॥ ६९ ॥
असल्या शास्त्रसंप्रदायकर्त्या पुरुषाहून मनुष्यांतील दुसरा कोणीहि मला अधिक प्रिय नाही. माझे त्याहून अधिक प्रिय करणारा कोणी नाही. म्हणून मुमुक्षूने वर सांगितलेल्या विशेषणाने विशिष्ट अशा अधिकार्याला विद्यासंप्रदान करावे. सांप्रत काली विद्यमान असलेला कोणीच मला तसल्या मनुष्याहून अधिक प्रिय नाही. इतकेच नव्हे, तर भूतकालीन मनुष्यांतील कोणी अधिक प्रिय नव्हता व भविष्यकालीहि या भूलोकी त्या विद्यासंप्रदायकर्त्याहून मला दुसरा कोणी अधिक प्रिय होणार नाही. [अर्थात् ध्याननिष्ठ जरी श्रेष्ठ असला तरी, या शास्त्राचा संप्रदाय प्रवृत्त करणारा त्याहूनहि अत्यंत श्रेष्ठ असल्यामुळे ध्याननिष्ठानेहि विद्यासंप्रदान करणे सर्वथा उचित होय.] विवरण :
याप्रमाणे संप्रदायकर्त्याचे श्रेष्ठत्व सांगून आता याचे अध्ययन करणार्याला विशिष्ट फल सांगतात -
अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः । आवयोः इमं धर्म्यं संवादं - आपल्या दोघांचे हे धर्ममय संवादरूप गीताशास्त्र - यः अध्येष्यते, - जो पुरुष पहण करील - तेन च अहं ज्ञानयज्ञेन इष्टः स्याम् - त्याचे द्वारा सुद्धा मी ज्ञानयज्ञद्वारा पूजित होईल - इति मे मतिः - असे माझे मत आहे. ॥ ७० ॥ व्याख्या : अत्र गीताशात्रे अशक्तौ केवलं पठ्यमानस्य फलं आह । अध्येष्यत इति । हे पार्थ ! यं उक्तविलक्षण पुरुषः आवयोः मम चेत्यपरं तव इमं अध्यात्मनिष्ठं संवादं गीताशास्त्र्रं अध्येष्यते भक्त्या पठिष्यति । कथंभूतं संवादम् । धर्म्यं धर्मात् अनपेतः धर्म्यः तं धर्म्यं धर्मसरूपं तेन प्रसिद्धेन ज्ञानयज्ञेन ज्ञानमेव यज्ञः ज्ञानयज्ञः तेन ज्ञानयज्ञेन गीतापठनेन अहं परमेश्वरः तस्य अध्येष्यमाणस्य इति शेषः इष्टः इष्टकारी स्यां भवेयम् । इति एवं मे मम मतिः बुद्धिः अस्ति । अयं भावः यथा कश्चन पुरुषः स्वाभिमानं श्रुत्वा तेन नामश्वणेन तस्य पुरुषस्य पार्श्ववर्ती भूत्वा इष्टकारित्वेन वर्तते तथा अहमपि मत्प्रधानेन गीताशास्त्र पठनेन अयं पुरुषः मां आह्वयति इति बुद्धिं कृत्वा तत्पार्श्ववर्ती भूत्वा तत्प्रियकर्ता भवामि ॥ ७० ॥
जो कोणी भक्तिमान् धर्माला सोडून नसलेल्या आम्हां उभयतांच्या या संवादरूप ग्रंथाचे अध्ययन करील, त्याने ज्ञानयज्ञाने माझे पूजन केले आहे, असे मी समजेन. [सर्व यज्ञात ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. म्हणून गीताशास्त्राच्या अध्ययनाला ‘ज्ञानयज्ञ’ म्हणून स्तुति केली आहे किंवा हा फलविधिच आहे. ज्ञानयज्ञाचे कैवल्य हे फल आहे. गीताशास्त्राचे अध्ययन करणार्याला त्या सारखेच फल मिळते. अर्थात् त्या अध्ययन करणार्याने ज्ञानयज्ञतुल्य अध्ययनाने भगवानांची पूजा केल्यामुळे भगवत्प्रसादाने त्याला ज्ञान होते व तो ज्ञानाने मुक्त होतो.] विवरण :
आता श्रोत्याला कोणते फल मिळते ते सांगतात -
श्रद्धावान् अनसूयश्च श्रृणुयादपि यो नरः । श्रद्धावान् च अनसूयः - श्रद्धेने युक्त आणि दोषदृष्टीने रहित - यः नरः श्रृणुयात अपि, - जो मनुष्य गीताशास्त्राचे श्रवणही करेल - सः अपि पापेभ्यः मुक्तः - तो सुद्धा पापांपासून मुक्त होऊन - पुण्यकर्मणां शुभान् लोकान् प्राप्नुयत् - उत्तम कर्मे करणार्यांच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त करून घेईल. ॥ ७१ ॥ व्याख्या : पाठे अशक्तौ श्रवणपरस्य फलं आह । श्रद्धावानिति । हे पार्थ ! यः प्रसिद्धः नरः गीताशास्त्रं इति शेषः । श्रृणुयात् श्रवणं करोति सोपि पुरुषोपि शुभलोकप्राप्तिप्रतिबंधकैः पापैः इति शेषः मुक्तः सन् विमुक्तः सन् पुण्यकर्मणां पुण्यं पुण्यरूपं कर्म येषां ते पुण्यकर्माणः तेषां पुण्यकर्मणां अश्वमेधयाजिनां शुभान् मंगलरूपान् लोकान् ब्रह्मलोकपर्यंतान् प्राप्नुयात् गच्छति । कथंभूतः नरः । श्रद्धावान् श्रद्धा भक्तिः विद्यते यस्य सः श्रद्धावान् श्रवणेन अहं कृतार्थः स्यां इति विश्वासवान् अत एव अनसूयः न विद्यते असूया दोषदृष्टिः यस्य सः अनसूयः गीवाक्येषु गुणदोषदृष्टिरहितः ॥ ७१ ॥ जो कोणी मोठा श्रद्धालु व गुणामध्ये दोषारोप न करणारा मनुष्य हा आमचा संवाद नुसता श्रवणहि करील, तो सुद्धा पापापासून मुक्त होऊन अग्निहोत्रादि पुण्य कर्मे करणार्यांच्या अत्यंत प्रशस्त लोकांस प्राप्ता होईल. [नुसते श्रवण करणार्यालाहि जर एवढे फल मिळते, तर ज्याने या शास्त्राचे अर्थज्ञान संपादिले आहे, तो सर्व पापांपासून मुक्त होईल, हे काय सांगावे ! असा अर्थ ‘श्रृणुयादपि’ येथील ‘अपि’ शब्दावरून निघतो. ] विवरण :
१५ अर्जुनाचा मोहनाश व ग्रंथसमाप्ति.
शिष्याने शास्त्रार्थाचे ग्रहण केले किंवा नाही, हे जाणण्याच्या इच्छेने भगवान् प्रश्न करितात -
कच्चित् एतत् श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा । हे पार्थ ! एतत् त्वया एकाग्रेण चेतसा कच्चित् श्रुतम् ? - हे अर्जुना ! हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस काय ? - हे धनंजय ! ते अज्ञानसम्मोहः कच्चित् प्रनष्टः ? - आणि हे धनंजया ! तुझा तो अज्ञानजनित मोह नष्ट झाला काय ? ॥ ७२ ॥ व्याख्या : इदानीं गुरुणा शिष्य कृतार्थ कर्तव्यः इति शास्त्रमर्यादायां समग्रं तत्त उपदिष्टमपि शिष्येण अवधारितं वा नावधारितं इति परीक्षार्थं प्रष्टव्यम् । न अवधारितं चेत् पुनरपि प्रकारांतरेण वक्तव्यं इति गुरुकर्तव्यप्रदर्शनार्थं भगवान् अर्जुनं पृच्छति । कच्चिदिति । हे पार्थ ! त्वया एतत् ,अयोक्तं रहस्यं एकाग्रेण् सावधानेन चेतसा अंतःकरणेन श्रुतं कच्चित् अवधारितं किम् । हे धनंजय ! ते तव अज्ञानसंमोहः अज्ञानेन अन्यथाज्ञानेन संमोहः मिथ्याभ्रमः अज्ञानसंमोहः अहंता एते मदीयाः, मन्निमित्तेन मरिष्यंति, तन्मूलं स्वधर्माख्यं युद्धं न करिष्यामि इति संभ्रमः पणष्टः कच्चि प्रकर्षेण नष्टः किं अभावं गतः किम् । नो चेत् पुनः उपदेक्ष्यामीति भावः ॥ ७२ ॥
अर्जुना, मी सांगितलेले हे सर्व तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का ? व समाधान मनाने माझा उपदेश ऐकून तू याचा अर्थ बरोबर समजलास का ? किंवा त्याकडे दुर्लक्ष केलेस ? अज्ञानामुळे झालेला तुझा स्वाभाविक संमोह-अविवेक नष्ट झाला का ? [कारण त्या अविवेकाचा नाश व्हावा, म्हणूनच हा तुझा शास्त्रश्रवण करण्याचा आयास व माझा उपदेश करण्याचा आयास प्रवृत्त झाला आहे. अर्थात् ज्या अविवेकाच्या नाशासाठी तू शास्त्रश्रवण करावयास व मी त्याचा उपदेश करावयास प्रवृत्त झालो, तो तुझा अविवेक-मोह नष्ट झाला की नाही ? शिष्याने शास्त्रार्थाचे ग्रहण केले किंवा नाही, हे जाणून त्याने त्याचे ग्रहण केले नसल्यास दुसर्या उपायाने त्याच्याकडून शास्त्राचे ग्रहण करवावे, अशा अभिप्रायाने भगवान् येथे हा प्रश्न करीत आहेत. त्यावरून कोणत्या ना कोणत्या तरी उपायाने शिष्याला कृतार्थ करावे, हा आचार्याचा धर्म व्यक्त होतो.] विवरण :
याप्रमाणे भगवानांनी ज्याला मोठ्या प्रेमाने आत्मज्ञानाचा उपदेश केला आहे व त्यामुळे ज्याचे अज्ञान, संशय, विपर्यय नष्ट झाले आहेत, असा -
अर्जुन उवाच - हे अचुत ! त्वत्प्रसादात् मम मोहः नष्टः - हे अच्युता ! तुमच्या कृपेमुळे माझा मोह नष्ट झाला - च मया स्मृतिः लब्धा - आणि मला स्मृती प्राप्त झाली - अहं गतसंदेहः स्थितः अस्मि, - आता मी संशयरहित होऊन स्थित आहे - अतः तव वचनं करिष्ये - म्हणून आपली आज्ञा मी पाळेन. ॥ ७३ ॥ व्याख्या : अर्जुनः एवं भगवतः अभिप्रायं ज्ञात्वा कृतर्थोहं इति उक्तिः अनुचितापि भवदनुज्ञया त्वत्कृपया कृतार्थः अस्मि इति अभिप्रायेण उत्तरं उवाच इति आह । नष्टो मोह इति अच्युताश्रयेण मोहहेतुः च्युतिः कथं स्थास्यति इति अच्युतसम्बोधनाभिप्रायः । हे अच्युतः मदीयेने अवधारणेन इति शेषः । मम मोहः अनात्मविषयः अविवेकः नष्टः गतः सूर्यप्रकाशात् रात्रीगतं तम इव । किंच त्वत्प्रसादात् तव प्रसादः अनुग्रहः त्वत्प्रसादः तस्मात् मम स्मृतिः एक एव अहं आत्मा सर्वक्रियाशून्यं निर्विकार इति अनुसंधानुरूपा स्मृतिः लब्धा प्राप्ता अहं गतसंदेहः सन् गतः ध्वस्तः संदेहः संशयः यस्य सः गतसंदेहः स्थितः अस्मि स्वरूपेण अवस्थानं प्राप्तोस्मि । इदानीं अहं तव उपदेशकर्तुः वचनं आज्ञां करिष्ये करिष्यामि अत्र संशयो नास्ति ॥ ७३ ॥ अर्जुन भगवदनुग्रह झाल्याचे सांगून भगवानांना संतुष्ट करीत होत्साता म्हणाला - हे कृष्णा, संसारातील सर्व अनर्थांचा हेतु व सागरासारखा दुस्तर असा हा माझा अज्ञानजन्य अविवेक-मोह नष्ट झाला. तुझ्या कृपेमुळे मला आत्मतत्त्वाविषयीची आठवण झाली. मी आता सर्वसंदेहाने रहित होऊन राहिलो आहे. मी तुझे म्हणणे मानीन म्ह० तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागेन. [ ज्या स्मृतीच्या लाभामुळे कामादि सर्व ग्रंथींचा सर्वथा नाश होतो, ती आत्मतत्त्वाविषयीची स्मृति तुझ्या अनुग्रहाने मला झाली आहे. अज्ञानजन्य संमोहाचा अज्ञानासह नाश व आत्मस्मृतीचा लाभ, हेच सर्व शास्त्रार्थज्ञानाचे मुख्य फल आहे. याविषयी उपनिषदांत अनेक वचने आढळतात. शेवटी अर्जुन म्हणतो - ‘तुझ्या प्रसादाने मी कृतार्थ झालो आहे. माझे कर्तव्य काही उरलेले नाही.’] विवरण :
१६ कथासंदर्भ.
शास्त्रार्थ संपला. आता कथेचा संबंध प्रदर्शित करण्यासाठी -
सञ्जय उवाच - इति वासुदेवस्य च महात्मनः पार्थस्य - अशा प्रकारे श्रीवासुदेव आणि महात्मा पार्थ यांचा - इमं अद्भुतं च रोमहर्षणं - हा अद्भुत रहस्ययुक्त आणि रोमांचकारक - संवादं अहं अश्रुषम् - संवाद मी ऐकला. ॥ ७४ ॥ व्याख्या : संजयः एवं श्रीकृष्णार्जुनसंवादं धृतराष्ट्रं प्रति कथयित्वा प्रस्तुतं आह । इत्यहमिति । हे धृतराष्ट्र ! अहं महात्मनः सर्वसाक्षिणः वासुदेवस्य सर्वभूताधारप्रकाशकस्य चेत्यपरं पार्थस्य अर्जुनस्य इति उक्तप्रकारेण इमें प्रस्तुतं संवादं अश्रुषं श्रुतवान् । कथंभूतं संवादं, अद्भुतं अकस्मात् भूतः जातः अद्भुतः तं अद्६भुतं अभिनवं अत एव रोमहर्षणं रोम्णः शरीरकेशान् हर्षयतीति रोमहर्षणः तं रोमहर्षणं श्रवणेन्नैव आनंदाविर्भावात् रोमांचकरम् ॥ ७४ ॥
संजय म्हणाला - याप्रमाणे मी वासुदेवाच्या आणि महात्म्या अर्जुनाच्या या आश्चर्यकारक, अंगावर रोमांच उभे करणार्या संवादाला मी ऐकले. विवरण :
‘हा सर्वोत्तम संवाद तू कसा ऐकलास’ असे कोणी म्हणेल, म्हणून संजय सांगतो -
व्यासप्रसादात् श्रुतवान् एतद्गुह्यं अहं परम् । व्यासप्रसादात् एतत् प्रमं गुह्यं योगम् - श्रीव्यासांच्या कृपेमुळे दिव्य दृष्टी मिळून हा परम गोपनीय असा योग - अर्जुनं कथयतः, - अर्जुनाला सांगत असताना - स्वयं योगेश्वरात् कृष्णात् - स्वतः योगेश्वर अशा भगवान श्रीकृष्णाकडून - अहं साक्षात् श्रुतवान् - मी प्रत्यक्ष ऐकला आहे. ॥ ७५ ॥ व्याख्या : ननु - मन्निकटे वर्तमानस्य तव देशांतरवृत्तश्रवणं कथं इत्याशंक्य हेतुत्वेन कारणत्वेन श्लोकं अवतारयति । व्यासेति । अहं तव निकटस्थः सन्नपि इति शेषः । व्यासप्रसादात् व्यासस्य श्रीकृष्णद्वैपायनस्य प्रसादः दिव्यचक्षुःप्रसादः व्यासप्रसादः तस्मात् व्यासप्रसादात् एतत् श्रीकृष्णार्जुनयोः संवादरूपं परं निरतिशयं गुह्यं सर्ववेदांतसारं कृष्णात् श्रुतवान् श्रवणं कृतवान् । कथंभूतात् कृष्णात् । योगेश्वरात् योगानां ईश्वरः स्वामी योगेश्वरः तस्मात् । पुनः कथंभूतात् । स्वयं साक्षात् प्रत्यक्षं योगं कथयतः कथयतीति कथयन् तस्मात् कथयतः ॥ ७५ ॥
मी भगवान् व्यासांनी मजवर अनुग्रह करून मला दिव्यदृष्टि दिल्यामुळे या गुह्य व परम योगरूप संवादाचे योग्यांचा ईश्वर जो कृष्ण त्याच्या तोंडून साक्षात् श्रवण केले. [तो आपल्या परमेश्वरस्वरूपाने सांगत असताना मी प्रत्यक्ष आपल्या कानांनी ते सर्व ऐकले. हा संवाद ज्ञान व कर्म यांसाठी असल्यामुळे किंवा त्याला चित्तवृत्तिनिरोधरूप योगाचे अंगत्व असल्यामुळे त्याला ‘योग’ असे म्हटले आहे. तो परमपुरुषार्थोपयोगी आहे, म्हणून त्याला ‘परम’ हे विशेषण दिले आहे व ते अत्यंत रहस्य असल्यामुळे त्याला ‘गुह्य’ म्हटले आहे.] विवरण :
राजन् संस्मृत्य संस्मृत्य संवादं इमं अद्भुतम् । राजन् ! केश्वार्जुनयोः इमं पुण्यं - हे राजा ! भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांचा हा रहस्याने युक्त, कल्याणकारक - च अद्भुतं संवादम् - आणि अद्भुत असा संवाद - संस्मृत्य संस्मृत्य - पुनः पुनः आठवून - मुहुः मुहुः हृष्यामि - मी वारंवार आनंदित होत आहे. ॥ ७६ ॥ व्याख्या : तत् श्रुत्वा तव किं इत्यत आह । राजन्निति । हे राजन् ! हे धृतराष्ट्र ! अहं संजयः केशवार्जुनयोः केशवश्च अर्जुनश्च केशवार्जुनौ तयोः केशवार्जुनयोः श्रीकृष्णार्जुनयोः इमं प्रस्तुतं संवादं सम्यक् उत्तमप्रकारेण वादः आत्मविचारः यस्मिन् सः संवादः तं संवादं सम्स्मृत्य स्मृत्वा चेत्यपरं संस्मृत्य स्मृत्वा मुहुर्मुहुः वारं वारं हृष्यामि रोमांचितो भवामि हर्षं प्राप्नोमि । कथंभूतं संवादम् । अद्भुतं अलौकिकम् । पुनः कथंभूतम् । पुण्यं पवित्रं ॥ ७६ ॥
हे राजा धृतराष्ट्रा, कृष्ण व अर्जुन, यांच्या अद्भुत व पुण्यप्रद संवादाला पुनः पुनः आठवून मी वारंवार-प्रतिक्षणी आनंदित-हृष्ट-संतुष्ट होत आहे. विवरण :
आता संजय भगवानांनी अर्जुनाला ध्यानासाठी जे आपले सगुण विश्वरूप दाखविले, त्याची स्तुति करितो -
तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपं अत्यद्भुतं हरेः । राजन् ! हरेः तत् अति अद्भुतं रूपं च - हे राजा ! श्रीहरीच्या त्या अत्यंत अलौकिक रूपाचेही - संस्मृत्य संस्मृत्य - पुनः पुनः स्मरण करून - मे महान् विस्मयः - माझ्या चित्तात महान् विस्मय होत आहे - च पुनः पुनः हृष्यामि - आणि वारंवार हर्षपुलकित होत आहे. ॥ ७७ ॥ व्याख्या : किंच तच्चेति । हे राजन् ! हे धृतराष्ट्र ! अहं संजयः हरेः श्रीकृष्णस्य तत् प्रसिद्धं रूपं विश्वरूपन् । अदृष्टपूर्वत्वात् इति शेषः । संस्मृत्य स्मृत्वा चेत्यपरं संस्मृत्य स्मृत्वा । तेन विश्वरूपदर्शनेन इति शेष । पुनः पुनः वारंवारं हृष्यामि हर्षेण परिपूरितोस्मि । किंच मे मह्यं महान् अपरिच्छिन्नः विस्मयः इदं किं अदृष्टश्रुतपूर्वं इति चेत्तचमत्कारः बभूवः जातः इति शेषः । कथंभूतं रूपम् । अत्यद्भुतं अति अत्यंतं अद्भुतं अतर्कितोपपन्नम् ॥ ७७ ॥
हे धृतराष्ट्रा ! आणि ते हरीचे अतिशय अद्भुत विश्वरूप पुनः पुनः आठवून मला मोठा विस्मय वाटतो व मी आनंदित होत आहे. विवरण :
नर-नारायणरूप अर्जुन व कृष्ण यांच्या संवादाला प्रामाण्य आहे, हे सुचविण्यासाठी संजय त्यांचा परम उत्कर्ष सुचवितो -
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः । यत्र योगेश्वरः कृष्णः - जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत - च यत्र धनुर्धरः पार्थः, - आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे - तत्र श्रीः विजयः भूतिः च ध्रुवा नीतिः - तेथेच श्री, विजय, विभूति आणि अचल नीति हे आहेत - इति मम मतिः - असे माझे मत आहे. ॥ ७८ ॥ व्याख्या : यन्निमित्तं व्यासेन तव दिव्यचक्षुः दत्तं तन्निमित्तेन जयपराजयादिविभागं मह्यं कथय इति धृतराष्ट्राभिप्रायः । अयं संजयाभिप्रायः । अतः हेतोः त्वं स्वपुत्राणां राज्यादिशंकां परित्यज्य पांडवान् प्रसन्नान् कुरु इति अभिप्रायेणाह । यत्रेति । यत्र यस्मिन् पक्षे योगेश्वरः योगस्य नियतरचनाखचित जगत्सृष्ट्यादि घटनायोगस्य ईश्वरः नियात्मकः योगेश्वरः योगमायेश्वरः कृष्णः नारायणः परमात्मा वर्तते । यत्र यस्मिन् पक्षे पार्थः पृथायाः कुंतेः अपत्यं पुमान् पार्थः अर्जुनः धनुर्धरः धनुः गांडीवं धरतीति धनुर्धरः वर्तते इति शेषः । तत्र तस्मिन् पक्षे श्रीः राज्यलक्ष्मीः षड्गुणैश्वर्यसंपत्तिः अस्ति इति शेषः । चेत्यपरं तत्र पक्षे विजयः विशेषेण जयः विजयः धनुधर्रसंबंधी शत्रुपराजयझ् अस्ति । चेत्यपरं तत्र तस्मिन् पक्षे भूतिः उत्तरोत्तराभुवृद्धिः अस्ति । चेत्यपरं तत्रैव तस्मिनेव पक्षे ध्रुवा निश्चिता नीतिः सर्वशास्त्रार्थनिर्णयोपि तत्रैव वर्तते । इति एवंप्रकारेण मम मतिः निश्चयः भवति । व्यासप्रसादेन इति शेषः । नरनारायणयोः एकावतारत्वात् यत्र यस्मिन् पक्षे तौ नरनारायणौ स्तः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिः इति मत्वा त्वमपि पुत्रान् अधर्मात् निवार्य श्रीकृष्णपरः भव इति तात्पर्यम् । अत्र गीताशास्त्रे प्राधान्येन कर्म भक्तिः ज्ञानं च प्रतिपाद्यते हेतोः सर्वं विचारेण सिद्धं भवति इति निश्चयः । हे राजन् ! अतः हेतोः इदानीं तावत् त्वं सपुत्रः सन् श्रीकृष्णं शरणं उपेत्य प्राप्य पांडवान् प्रसाद्य प्रसन्नं कृत्वा सर्वस्वं तेभ्यः पांडवेभ्यः विवेद्य समर्प्य पुत्रप्राणरक्षणं कुरु इति भावः । नो चेत् यथेच्छसि तथा कुरु ॥ ७८ ॥ ज्या पक्षामध्ये योगेश्वर कृष्ण व गांडिव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे, त्या पांडवांच्या पक्षामध्येच लक्ष्मी, विजय-परम उत्कर्ष, भूति-श्रीचाच विशेष विस्तार व नित्य न्याय रहातात, असा माझा दृढ निश्चय झाला आहे. [या वाक्याने संजयाने धृतराष्ट्राची विजयाशा पार घालवून ‘पांडवांना निश्चयाने जय मिळणार’ हे सुचविले. योगाच्या उत्पत्तीचे कारण असल्यामुळे भगवान् सर्व योगांचा ईश्वर, ज्ञान आणि कर्म हाच सर्व योग; शास्त्रीय ज्ञान-वैराग्यादिक हेच त्याचे बीज, ते भगवानांच्या अधीन असते. त्यामुळे ज्याच्यावर भगवदनुग्रह झाला नाही, त्याला ते प्राप्त होत नाही. अर्थात् योग व त्याचे फल ही दोन्ही भगवदनुग्रहाधीन असल्यामुळे भगवानाला योगेश्वरत्व आहे. असो. याप्रमाणे येथे उपाय-उपेयभावाने सांगितलेल्या द्विविध निष्ठेची स्थापना केलेली असून ‘कर्मनिष्ठा परंपरेने चित्तशुद्धिच्याद्वारा ज्ञाननिष्ठेला कारण होते आणि ज्ञाननिष्ठा साक्षात् मोक्षाला कारण होते’ या शास्त्रार्थाचा उपसंहार केला आहे. ] विवरण : (येथे भगवद्गीतेचा ‘मोक्षसंन्यासयोग’ नावाचा अठरावा अध्याय समाप्त झाला.)
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु |